✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विलासराव देशमूख

क
कलंत्री यांनी
Tue, 08/07/2012 - 21:14  ·  लेख
लेख
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले. मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो. विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्‍यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता. परंतु जसे ते भाषण करायला लागले तसे त्यांनी अतिशय खेळकर पद्धतीने सर्व भाग सांगितला. मूख्यमंत्री पद नसतानाही आयोजकानी ठरविल्याप्रमाणे येण्याची गळ घातली याबद्दल त्यांनी आयोजकाचे आभारही मानले. विलासारावांची व्यावसायिक कारकिर्द पुण्यातच चालू झाली. तेंव्हा वकिलीकरत असताना त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेस ते बरेच भावनाशिल झालेलेही मला जाणवले. १९६७ च्या सुमारास प्रारंभीच्या काळी त्यांनी जो खटला चालवला होता त्याचे वृत्त त्यावेळेस वर्तमानपत्रात आलेले हे समजताच त्यांनी सायकलवर १० / १२ किमी जावून ती प्रतही मिळवली. तेंव्हाचा आनंद आणि आता वर्तमानपत्रात नाव आलेतर कशी भिती वाट्ते हेही त्यांनी हास्याच्या कल्लोळात सांगितले. जवळ जवळ ४०/ ५० मिनिटाच्या भाषणात त्यांनी मला बर्‍यापैकी प्रभावित केल्याचे आठवते. काळाच्या ओघात अनेक भ्रष्टाचार्‍याच्या खटल्यात त्यांच्यावर ताशेरे मारलेले वाचतांना मला नेहमीच वाईट वाटत असे, दोन्ही मूत्रपींडे आणि यकृतात बिघाड झाल्याने मला व्यक्तिगत त्यांच्याबद्दल काळजी आणि सहानूभुती वाटते. विलासराव लवकरच बरे होवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37742 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

अखेर पैशाचे अजीर्ण झाले म्हणायचे

टवाळखोर
Wed, 08/08/2012 - 16:52 नवीन
जास्त दारू पिऊन यकृत बिघडते म्हणतात. पण जास्त पैसा खाल्लयाने पण यकृत बिघडते हे माहीत नव्हते!
  • Log in or register to post comments

त्यांच्या यकृताने सुद्धा

चेतन माने
Wed, 08/08/2012 - 17:47 नवीन
त्यांच्या यकृताने सुद्धा घोटाळा केला !!!
  • Log in or register to post comments

@यकृताने सुद्धा घोटाळा केला

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/08/2012 - 18:29 नवीन
@यकृताने सुद्धा घोटाळा केला !!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन माने

कोणी

तिमा
Wed, 08/08/2012 - 18:43 नवीन
कोणी तिरस्करणीय असू दे वा प्रातस्मरणीय असू दे. त्याच्या अंतकाळी वाईट लिहिणे, हे आपल्याच संस्कृतीचे प्रदर्शन करते.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी ! हेच आम्हाला

शिल्पा ब
Wed, 08/08/2012 - 23:35 नवीन
अगदी अगदी ! हेच आम्हाला सगळ्या राजकारण्यांविषयी अन त्यांचे पाहुणे जे की श्री. श्री. कसाब साहेब, श्री. अफजल गुरु साहेब, ब्रिगेडी साहेब इ. बद्दल वाटतं हेच फक्त नमुद करु इच्छीते. पवार साहेबांनी जशी पॅरालिसीसशी झुंज देउन नवी सुरुवात केली तोच "आदर्श" सगळ्यांनी ठेवावा हीच इश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

ह्या ह्या ह्या

अँग्री बर्ड
गुरुवार, 08/09/2012 - 10:03 नवीन
पवार साहेबांनी जशी पॅरालिसीसशी झुंज देउन नवी सुरुवात केली तोच "आदर्श" सगळ्यांनी ठेवावा
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

+१

ईन्टरफेल
Wed, 08/15/2012 - 21:04 नवीन
>>>>कोणी तिरस्करणीय असू दे वा प्रातस्मरणीय असू दे. त्याच्या अंतकाळी वाईट लिहिणे, हे आपल्याच संस्कृतीचे प्रदर्शन करते.<<< +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

कुठे जाशी भोगा

सूड
Wed, 08/08/2012 - 18:46 नवीन
'कुठे जाशी भोगा..आलो तुझ्या मागा' अशी कायशी म्हण आहे ती आठवली !! त्यांच्या नव्या सुनेचा पायगुण महाराष्ट्राला फलदायी होवो.
  • Log in or register to post comments

त्यांच्या नव्या सुनेचा पायगुण

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 08/09/2012 - 08:59 नवीन
त्यांच्या नव्या सुनेचा पायगुण महाराष्ट्राला फलदायी होवो म्हणुनच दुष्काळ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

विलासराव देशमुखांच्या

अपूर्व कात्रे
Wed, 08/08/2012 - 22:31 नवीन
विलासराव देशमुखांच्या प्रकृतीस आराम पडो आणि ते लवकरच बरे होवोत अशी प्रार्थना (मला असे वाटत नसतानाही) करणे हे मला चुकीचे वाटते. कोणताही माणूस (मग तो विलासराव देशमुखांसारखा भ्रष्टाचारी का असेना?) लवकर मरो असेही म्हणावेसे वाटत नाही. शेवटी देवाशी एकाच प्रार्थना.... त्यांना या जन्मीचे याच जन्मी भोगायला लागो.
  • Log in or register to post comments

विलासराव देशमुखांच्या

अपूर्व कात्रे
Wed, 08/08/2012 - 22:33 नवीन
विलासराव देशमुखांच्या प्रकृतीस आराम पडो आणि ते लवकरच बरे होवोत अशी प्रार्थना (मला असे वाटत नसतानाही) करणे हे मला चुकीचे वाटते. कोणताही माणूस (मग तो विलासराव देशमुखांसारखा भ्रष्टाचारी का असेना?) लवकर मरो असेही म्हणावेसे वाटत नाही. शेवटी देवाशी एकाच प्रार्थना.... त्यांना या जन्मीचे याच जन्मी भोगायला लागो.
  • Log in or register to post comments

का हो?

आनंदी गोपाळ
Wed, 08/08/2012 - 22:40 नवीन
समजा तुम्ही केलीत प्रार्थना, अन झालेत ते बरे. तर कोर्टासमोर काय ते इथेच अन अत्ताच 'फेडायला' उभे रहावे लागेल ना? त्यात काय चूक? शेवटी त्यांना या जन्मीचे याच जन्मी भोगायला लागायचे असेल तर हा जन्म जरा प्रोलाँग व्हावा अशी इच्छा करणेच बरोबर नाही काय? (तटस्थ, म्हणून आनंदी) गोपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अपूर्व कात्रे

विलासराव देशमुखांच्या

आनंद
Wed, 08/08/2012 - 23:07 नवीन
विलासराव देशमुखांच्या प्रकृतीस आराम पडो आणि ते लवकरच बरे होवोत अशी प्रार्थना . विलास रावां बद्द्ल लो़कात इतका राग असेल अस वाटल नव्हत.
  • Log in or register to post comments

विलास रावां बद्द्ल लो़कात

विलासराव
Wed, 08/08/2012 - 23:26 नवीन
विलास रावां बद्द्ल लो़कात इतका राग असेल अस वाटल नव्हत. :) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

या विलासराव तुमचीच धाग्यावर

माझीही शॅम्पेन
Wed, 08/08/2012 - 23:52 नवीन
या विलासराव तुमचीच धाग्यावर वाट पाहत होतो :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

अरे अरे अरे

वेताळ
गुरुवार, 08/09/2012 - 09:27 नवीन
ज्याना कुणाला वाईट वाटले त्यानी आप आपल्या आयुष्यातील एक- दोन महिने विलासरावाना मिळावे अशी देवा जवळ प्रार्थना करावी असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

ओ थोडे कमी करा

इरसाल
गुरुवार, 08/09/2012 - 09:42 नवीन
१/२ महिने जास्त होतील राव.ह्यांना* पण घरदार आहे. *ज्याना कुणाला वाईट वाटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

रितेश किडनी लिव्हर द्यायला तयार आहे

अभ्या..
गुरुवार, 08/09/2012 - 11:54 नवीन
बाकी त्यांचा रितेश किडनी लिव्हर द्यायला तयार आहे. ज्यांना कंत्राटे, प्रमोशने, बदल्या, जागा, नोकर्‍या, टोल नाके, पदे, पारितोषिके, सत्कार, परदेश प्रवास, ई. ई. त्यांच्याकडून मिळाले आहे, ते महिने देतात का बघा.
  • Log in or register to post comments

आज

आनंदी गोपाळ
गुरुवार, 08/09/2012 - 12:39 नवीन
प्रकृतीला थोडा उतार पडलाय म्हणे..
  • Log in or register to post comments

छान !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/09/2012 - 19:07 नवीन
हाथी चले बाजार...
  • Log in or register to post comments

*

मदनबाण
Fri, 08/10/2012 - 11:37 नवीन
*
  • Log in or register to post comments

म्हातारे!

स्वैर परी
Fri, 08/10/2012 - 18:43 नवीन
विलासरावांचे वय ६७ वर्षे आहे. थोडक्या आजोबा टाईप! त्यात आयुष्यभरात केलेल्या कुकर्मांची फळे सुद्धा या जन्मीच भोगावी लागतील. तेव्हा जनतेने त्यांची बाजु घेण्यात किंवा त्यांच्या कुकर्मांचा पाढा वाचण्यात काही फायदा नाहिए!
  • Log in or register to post comments

छान !

KHADADBHAU
Sat, 08/11/2012 - 16:01 नवीन
छान !
  • Log in or register to post comments

छान. पण आनंद फार काळ टिकणार

अप्पा जोगळेकर
Sat, 08/11/2012 - 16:21 नवीन
छान. पण आनंद फार काळ टिकणार नाही असं वाटतंय. सध्या तरी विलासची प्रकॄती स्थिर आहे अशीच बातमी आहे. जितका त्रास होईल तेवढं बरंच आहे.
  • Log in or register to post comments

+१. मरेनात तेच्यायला .

बॅटमॅन
Mon, 08/13/2012 - 01:06 नवीन
+१. मरेनात तेच्यायला . तेवढाच काव्यात्मक (आणि बव्हंशी फोल) न्याय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

भोग विलास

शेलार मामा मालुसरे
Mon, 08/13/2012 - 21:19 नवीन
विलास ....भोग विलास ....सुधार .....कल्पनाविलास..... भोगमुख ....वि-देश वि-मुख .....शेवट..... वरासलावि-विमुख! मरेना का तिकडे ?
  • Log in or register to post comments

शंभरी भरण्या आधी काही दिवस

मराठी_माणूस
Mon, 08/13/2012 - 22:00 नवीन
शंभरी भरण्या आधी काही दिवस (अगदी दोन दिवस सुध्दा चालतील) गजा आड काढावेत ही सदिच्छा
  • Log in or register to post comments

मन मोकळं करतो!

दादा कोंडके
Mon, 08/13/2012 - 22:08 नवीन
विलासरावाच्या मरणावर टपलेली एव्हडी लोकं बघून आनंद वाटला. आता एक शिवी देउनच घेतो, विलासरावाच्या बैलाला........ हो! :)
  • Log in or register to post comments

नरेंद्र मोदींनी त्यांच्या

पुष्करिणी
Mon, 08/13/2012 - 22:15 नवीन
नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्य्कर्त्यांना विलासरावांसाठी एका यकृताची तातडीनं सोय करायला सांगितलं आहे अशी बातमी वाचली. नुकत्याच निवर्तलेल्या मनुष्याच्या शरिरातून चांगलं यकृत असेल तर काढून घेउन वापरता येतं म्हणे.
  • Log in or register to post comments

झिंदाबाद

नितिन थत्ते
Tue, 08/14/2012 - 07:43 नवीन
नरेंद्र मोदी झिंदाबाद !!! (नाय...... त्यांनी काहीही केलं की त्यांचं कौतुक करायचं असतं म्हणून झिंदाबाद)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

हो ना! काँग्रेसवाल्यांचं

शिल्पा ब
Tue, 08/14/2012 - 10:36 नवीन
हो ना! काँग्रेसवाल्यांचं कोण्णी म्हणुन कौतुक करत नै बै ! काय तरी लोकं असतात नै ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थत्ते चाचा

कुंदन
Tue, 08/14/2012 - 11:03 नवीन
थत्ते चाचा , जाउन आलात का चेन्नै ला? कधी आहे म्हणे ऑपरेशन ? वागळे होते ना तिथेच , खिमट भरवायला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थत्ते चाचा

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/14/2012 - 14:13 नवीन
तुमच्याकडे पाहिले ना, की का कोणास ठावूक पण मला कायम बॅ. गाडगिळांची आठवण येते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कोणते

नितिन थत्ते
Tue, 08/14/2012 - 21:55 नवीन
कोणते गाडगीळ ? न. वि. गाडगीळ की विठ्ठलराव की अनंतराव की आणखी कोणी गाडगीळ? पराला न. वि. गाडगीळ किंवा विठ्ठलराव गाडगीळ आठवायची शक्यता कमीच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

थत्तेसाहेब, पराला एवढा

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/15/2012 - 11:59 नवीन
थत्तेसाहेब, पराला एवढा अंडरएस्टिमेट करू नका. तुम्हाला माहित नाहीये तो काय प्रकार आहे ते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

प्रश्नच नाही, कौतुकास्पद

पुष्करिणी
Tue, 08/14/2012 - 14:26 नवीन
प्रश्नच नाही, कौतुकास्पद वर्तन करणार्‍याचं कौतुक करावंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ताजी बातमी :

वसईचे किल्लेदार
Tue, 08/14/2012 - 15:54 नवीन
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन
  • Log in or register to post comments

माजी मुख्यमंत्री विलासराव

विजय_आंग्रे
Tue, 08/14/2012 - 16:02 नवीन
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन श्रद्धांजली :sad:
  • Log in or register to post comments

पोकळी

चिरोटा
Tue, 08/14/2012 - 16:03 नवीन
'आदर्श' नेता हरपला.
  • Log in or register to post comments

आधी हो म्हणुन.....

इरसाल
Tue, 08/14/2012 - 16:09 नवीन
नंतर नाही म्हणणार्‍या त्या मृत ड्रायव्हरच्या(ज्याची किडनी,यक्कृत लावणार होते) नातेवाईकांचा तीव्र निशेध. झाले मनासारखे ??? आपली ती संस्कृती नाही म्हणुन श्रद्धांजली. मोदींचा सौम्य धिक्कार. एक यकृत नाय देवु शकले. बरं असो. ते पल्याडचे होते त्यांना दोष देवुन काय उपयोग.पण अल्याडच्यांनी काय @#$% घेतले.
  • Log in or register to post comments

देव त्यांच्या आत्म्याला शांती

पुष्करिणी
Tue, 08/14/2012 - 16:17 नवीन
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. पण लोकसभा तहकूब कशासाठी ?
  • Log in or register to post comments

यकृत व दोन्ही मुत्रपिंड खराब झालेला

वेताळ
Fri, 08/17/2012 - 17:06 नवीन
माणुस व्हेन्टीवर किती दिवस काढु शकेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

आरोहण आणि स्वागत

कपिलमुनी
Tue, 08/14/2012 - 16:40 नवीन
विदर्भामधले आत्महत्या केलेले ४१० शेतकरी त्यांची वाट बघत असतील ..
  • Log in or register to post comments

विलासराव देशमुख गेले अखेर.

बॅटमॅन
Tue, 08/14/2012 - 16:47 नवीन
विलासराव देशमुख गेले अखेर.
  • Log in or register to post comments

देव करो अन म्रुतात्म्यास

स्वातीविशु
Tue, 08/14/2012 - 17:18 नवीन
देव करो अन म्रुतात्म्यास सद्गती लाभो.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

स्मिता.
Tue, 08/14/2012 - 18:16 नवीन
विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments

विलासराव देशमुख यांना माझीही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/14/2012 - 18:17 नवीन
विलासराव देशमुख यांना माझीही श्रद्धांजली ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

विलासराव देशमुख यांना माझीही

मदनबाण
Tue, 08/14/2012 - 18:25 नवीन
विलासराव देशमुख यांना माझीही श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

एकाच गोष्टीचे दु:ख होते कि

वेताळ
Tue, 08/14/2012 - 18:30 नवीन
कोणीही त्याना मनापासुन आपल्या आयुष्यातील एक्-दोन महिने देवु केले नाहीत. शेवटी काय आप-आपल्या कर्माची फळे................
  • Log in or register to post comments

ढोंगी राजकारणी

तिमा
Tue, 08/14/2012 - 18:42 नवीन
आत्ता टी.व्ही. वरील बातम्या बघितल्या. ढोंगी राजकारणी, विलासरावांवर जी स्तुतीसुमने उधळत होते, ती पाहून वाटले की हेच राजकारणी जेंव्हा कधी नैसर्गिकरीत्या 'कसाब' मरेल तेंव्हा त्याच्यावरही अशीच उधळण करायला कमी करणार नाहीत. 'त्याने इतकी वर्षे इथे राहून आम्हाला लळा लावला होता', अशीही वाक्ये ऐकू येतील. असो. मृतात्म्यास सदगती लाभो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा