✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विलासराव देशमूख

क
कलंत्री यांनी
Tue, 08/07/2012 - 21:14  ·  लेख
लेख
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले. मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो. विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्‍यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता. परंतु जसे ते भाषण करायला लागले तसे त्यांनी अतिशय खेळकर पद्धतीने सर्व भाग सांगितला. मूख्यमंत्री पद नसतानाही आयोजकानी ठरविल्याप्रमाणे येण्याची गळ घातली याबद्दल त्यांनी आयोजकाचे आभारही मानले. विलासारावांची व्यावसायिक कारकिर्द पुण्यातच चालू झाली. तेंव्हा वकिलीकरत असताना त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेस ते बरेच भावनाशिल झालेलेही मला जाणवले. १९६७ च्या सुमारास प्रारंभीच्या काळी त्यांनी जो खटला चालवला होता त्याचे वृत्त त्यावेळेस वर्तमानपत्रात आलेले हे समजताच त्यांनी सायकलवर १० / १२ किमी जावून ती प्रतही मिळवली. तेंव्हाचा आनंद आणि आता वर्तमानपत्रात नाव आलेतर कशी भिती वाट्ते हेही त्यांनी हास्याच्या कल्लोळात सांगितले. जवळ जवळ ४०/ ५० मिनिटाच्या भाषणात त्यांनी मला बर्‍यापैकी प्रभावित केल्याचे आठवते. काळाच्या ओघात अनेक भ्रष्टाचार्‍याच्या खटल्यात त्यांच्यावर ताशेरे मारलेले वाचतांना मला नेहमीच वाईट वाटत असे, दोन्ही मूत्रपींडे आणि यकृतात बिघाड झाल्याने मला व्यक्तिगत त्यांच्याबद्दल काळजी आणि सहानूभुती वाटते. विलासराव लवकरच बरे होवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
37740 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

आताच

कुंदन
Tue, 08/07/2012 - 21:23 नवीन
आताच आय बी एन - लोकमत वर बातमी ऐकतोय. वागळे सांगतायत , विलासरावांना यकृताचा त्रास होतोय अन त्यामुळे खायलाही त्रास होतो म्हणे. वागळे बहुधा लापशी / खिमट घेउन लवकरच चेन्नै ला पोहोचतील.
  • Log in or register to post comments

अरे बाप रे... ! असं झालं होय?

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/08/2012 - 06:21 नवीन
अरे बाप रे... ! असं झालं होय? ;-)
  • Log in or register to post comments

मला राजकारण्याबद्दल आणि

पक पक पक
Wed, 08/08/2012 - 08:35 नवीन
मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो. मला फक्त चित्रपट अभिनेत्रीं बद्दल आत्मियता आहे.त्या मुळे माझा पास.... :bigsmile:
  • Log in or register to post comments

@मला फक्त चित्रपट अभिनेत्रीं

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/08/2012 - 10:52 नवीन
@मला फक्त चित्रपट अभिनेत्रीं बद्दल आत्मियता आहे.>>>Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

निर्ढावलेला व सराईत

तर्री
Wed, 08/08/2012 - 08:46 नवीन
दिल्लीत साजूक तुपाचा रतीब चालू ठेवला की आपण आपली गुरे कशीही हकावीत - कुणाच्याही कुरणात चारावीत हे ओळखलेला व निर्ढावलेला राजकारणी मृत्यु शय्येवर आहे म्हणून सभ्य संकेतानुसार एवढेच ! विलास रावाना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसाद वाचल्यानंतर

सोत्रि
गुरुवार, 08/09/2012 - 09:20 नवीन
सर्व प्रतिसाद वाचल्यानंतर ह्या प्रतिसादाशी एकदम सहमत. -(संयत) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

शेतकरयांचे तळतळाट !

शेलार मामा मालुसरे
Wed, 08/08/2012 - 10:19 नवीन
शेतकरयांचे तळतळाट ! बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अनेक गोर गरीब शेतकरयांच्या जमीनी हड़प करून त्याना दिलीप सानंदा अन त्यांच्या कुटुंबियांनी अनेकांना देशोधडीला लावले..त्यातील एका शेतकरयाने आत्मह्त्या केली; त्याच्या कुटुंबियांनी पुढे पोलिस तक्रार केली...सर्व सोंगे झाली..सानंदा हे विलासरावांचे निकटवर्तीय..अन हद्द झाली - त्यावेळी मुख्यमंत्री असणारया विलासरावांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारयाना पत्र लिहून आदेश दिला की, तुम्ही सानंदावर कारवाई करू नका ... कारवाईचा फार्स लांबला...पुढे एका माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याने हे प्रकरण उकरुन काढले..सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला गेला.. त्यात विलासराव दोषी आढळले..कोर्टाने त्यांच्यावर कठोर ताशेरे ओढले..टिका झाली...किरकोळ बोम्ब झाली..पण विलासराव जैसे थे - केसाचा कोम्बडा,खुनशी हास्य अन सोबतीला खुर्चीची ऊब !...उलट हा १० लाख रुपयाचा दंड महाराष्ट्र शासनाने जनतेच्या पैशाच्या तिजोरीतुन भरला....शेतकरी फासावर - विलासराव खुर्चितच - जनतेचा पैसा दंडासाठी ! हा हरामखोरी अन निर्लज्जतेचा कळस होता !!!! पण त्या शेतकरयांचे तळतळाट विलासरावांना लागले नसतील काय ? त्याचेच तर हे फळ नसेल काय ? विलासरावांच्‍या दोन्‍ही किडन्‍या निकामी झाल्‍या आहेत. तसेच त्‍यांच्‍या यकृतावरही सूज आहे.
  • Log in or register to post comments

<<विलासरावांच्‍या दोन्‍ही

शिल्पा ब
Wed, 08/08/2012 - 11:01 नवीन
<<विलासरावांच्‍या दोन्‍ही किडन्‍या निकामी झाल्‍या आहेत. तसेच त्‍यांच्‍या यकृतावरही सूज आहे. फक्त विलासरावांच्याच बाबतीत हे असं ऐकुन बाकी राजकारण्यांनासुद्धा असंच कैतरी होउन हा प्रश्न एकदाचा मिटावा असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेलार मामा मालुसरे

अगदी मिपा स्टाइल कोण

माझीही शॅम्पेन
Wed, 08/08/2012 - 11:14 नवीन
अगदी मिपा स्टाइल कोण विलास-राव अस लिहिण्यासाठी आलो होतो पण नंतर आठवाल की त्याना मी नवीन पास-पोर्ट वरळी येथे टोकेन यंत्रणा बसवली तेंव्हा प्रत्यक्षयात भेटलो होतो आणि मीच पाहील टोकण त्याना प्रिंट करून दिल होत , टोकण प्रिंट होण्यासाठी जरा वेळ लागला तेंव्हा पटकन मिळण्यासाठी अजुन पैसे लागतील का असा टोला मारला होता. (ह्या निमित्ताने अस्मदिक आज-तक वर झलक्‍याण्याची जाहिरात करून घेतो) बाकी राजकारण्याविषयी मला फारशी आत्मियता नाही , एक गेला की त्याची जागा दुसरा घेतो आणि शोषण चालूच राहत....
  • Log in or register to post comments

त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो

पुण्याचे वटवाघूळ
Wed, 08/08/2012 - 11:31 नवीन
विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल. आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. पण विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.
  • Log in or register to post comments

विलासरावांची भ्रष्टाचाराच्या

पांथस्थ
Wed, 08/08/2012 - 13:30 नवीन
विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल.
खरंच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

सहमत!

दादा कोंडके
गुरुवार, 08/09/2012 - 10:21 नवीन
आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही.
खरंय, ह्या वेदनेतून त्यांची लवकरात लवकर कायमची सुटका कर देवा! ;) (कावळा) दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडो

पुण्याचे वटवाघूळ
Wed, 08/08/2012 - 11:31 नवीन
विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल. आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. पण विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत.
  • Log in or register to post comments

+१

सुनील
Wed, 08/08/2012 - 21:24 नवीन
विलासरावांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा निकाल न्यायालयातच लागेल. आजारी माणसाला लवकरात लवकर प्रकृतीस आराम पडो या सदिच्छेशिवाय आपण काही करू शकत नाही. पण विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत. सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

कमेंट

नितिन थत्ते
गुरुवार, 08/09/2012 - 10:25 नवीन
>>विलासरावांच्या प्रकृतीविषयी एकेक वाईट कमेन्ट येत आहेत त्या सहृदय माणसांना शोभणार नक्कीच नाहीत. लोक जगातून गेलेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा वाईट साईट बोलतात. तर जिवंत असलेल्याची काय कथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

हेहे

सुनील
गुरुवार, 08/09/2012 - 21:20 नवीन
लोक जगातून गेलेल्या व्यक्तींबद्दल सुद्धा वाईट साईट बोलतात. तर जिवंत असलेल्याची काय कथा. :) हीच मंडळी भारतीय संस्कृतीवरदेखिल गफ्फा हाणताना दिसतात. तेव्हा गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलणे हीच भारतीय संस्कृती असावी. काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अहो विलासराव अजून गेले

अप्रतिम
गुरुवार, 08/09/2012 - 22:58 नवीन
अहो विलासराव अजून गेले नाहीत...गेल्यानंतर कदाचित चांगले म्हणतील त्याना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ह्म्म्म्म

अर्धवटराव
गुरुवार, 08/09/2012 - 22:08 नवीन
ज्यांनी अनेकांचे संसार उध्वस्त केले अशा लोकांच्या मग आरत्या गायच्या काय? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

केलेली पापं याच जन्मात फेडावी

Dhananjay Borgaonkar
Wed, 08/08/2012 - 11:48 नवीन
केलेली पापं याच जन्मात फेडावी लागतात म्हणे.... अवांतर - राजकारणी हजारो कोटींची मालमत्ता कशी जमवतात याचा विचार करत आहे.
  • Log in or register to post comments

जमवलेल्या हजारो कोटींचं काय

शिल्पा ब
Wed, 08/08/2012 - 11:52 नवीन
जमवलेल्या हजारो कोटींचं काय करतात हा अजुन एक प्रश्न....निवडणुका जिंकायला प्रत्येकवेळी एवढे लागत नसावेत हा एक अंदाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

जमवलेल्या हजारो कोटींचं काय

बॅटमॅन
Wed, 08/08/2012 - 23:54 नवीन
जमवलेल्या हजारो कोटींचं काय करतात याचे उत्तर कदाचित ते जमवल्यावरच(त्या स्तरावर गेल्यावर) मिळत असेल. साधे उदा. लहान असताना १०० रुपये कसे खर्च होऊ शकतात असे वाटायचे, कॉलेजात असताना महिना १५,००० पेक्षा जास्त पगार घेऊन काय करायचं असे वाटायचे आणि आता कळतेय च्यायला ३०-४० लाख रुपयेदेखील कसे अपुरे पडू शकतात ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

बहोत खुब !!!

अर्धवटराव
गुरुवार, 08/09/2012 - 00:15 नवीन
मित्रा... असले कसले महगडे शौक म्हणायचे तुझे कि ३० - ४० लाख अपुने पडावेत ;) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हॅ हॅ हॅ... घर घर लागली की

बॅटमॅन
गुरुवार, 08/09/2012 - 00:19 नवीन
हॅ हॅ हॅ... घर घर लागली की होते हो तसे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

कळलं कळलं...

अर्धवटराव
गुरुवार, 08/09/2012 - 00:33 नवीन
घर घर = २ घर याला म्हणतात हौस मौज :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हॅ हॅ हॅ... घर घर लागली की

बॅटमॅन
गुरुवार, 08/09/2012 - 00:24 नवीन
डुप्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बाप्रे!

आनंदी गोपाळ
गुरुवार, 08/09/2012 - 00:25 नवीन
कसे पडतात अपुरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नियती.

प्रभाकर पेठकर
Wed, 08/08/2012 - 12:05 नवीन
अन्याय झालेले, शोषण झालेले, दडपशाही झालेले जास्त की हितचिंतक जास्त ह्या दोलायमान तराजूवर विलासरावांचे आयुष्य लोंबकळते आहे. नियतीच काय तो न्यायनिवाडा करेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

नाही हो

पुण्याचे वटवाघूळ
Wed, 08/08/2012 - 12:47 नवीन
अन्याय झालेले, शोषण झालेले, दडपशाही झालेले जास्त की हितचिंतक जास्त ह्या दोलायमान तराजूवर विलासरावांचे आयुष्य लोंबकळते आहे.
नाही हो. प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते. हितचिंतक जास्त की दडपशाही झालेले जास्त या तराजूवर काही अवलंबून नसते. तुम्ही म्हणता त्या न्यायाने आपले शिवराय अजूनही भूतलावरच असायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पाप-पुण्य.

प्रभाकर पेठकर
Wed, 08/08/2012 - 12:59 नवीन
प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते. मी प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल लिहिलेले नसून फक्त विलासरावांच्या आयुष्याबद्दल लिहिलेले आहे. पाप-पुण्याची संकल्पना आपल्या संस्कृतीत पूर्वापार चालत आली आहे त्याला अनुषंगुन ते वाक्य आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

सहमत..

अक्षया
Wed, 08/08/2012 - 12:58 नवीन
||नाही हो. प्रत्येकाला कधीनाकधी जावेच लागते. हितचिंतक जास्त की दडपशाही झालेले जास्त या तराजूवर काही अवलंबून नसते. तुम्ही म्हणता त्या न्यायाने आपले शिवराय अजूनही भूतलावरच असायला हवे होते.|| यावर सहमत..
  • Log in or register to post comments

सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक

गवि
Wed, 08/08/2012 - 13:37 नवीन
सर्वच आजीमाजी अन भावी इच्छुक राज्यकर्त्यांनी धाग्यावरचे प्रतिसाद वाचावेत अशी इच्छा.. कितीही धनलाभ झाला तरी जनमानसात वाईट राजकारणी म्हणून आपली कशी प्रतिमा होऊ शकते.. इतकी खालावलेली प्रतिमा की इतर कोणालाही अशा नाजुक आरोग्यस्थितीच्या वेळी लोक शुभआरोग्य चिंततील पण आपल्याला तेवढेही लाभणार नाही याची भयंकर जाणीव होऊन आधीच कारभारपद्धतीत काही सुधारणा झाली तर?
  • Log in or register to post comments

+१११

स्पा
Wed, 08/08/2012 - 14:05 नवीन
प्रचंड अनुमोदन बाकी आता च विलासरावांवर लेख लिहायला घेईन म्हणतो .. उपयोगी पडेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कल्पनाविलास चांगला आहे. '

प्यारे१
Wed, 08/08/2012 - 14:29 नवीन
कल्पनाविलास चांगला आहे. ' कामातुराणां न भयं न लज्जा ...'मध्ये 'काम' म्हणजे फक्त कामेचकामेअसं नाही तर इच्छा/वासना असा देखील अर्थ आहे म्हणतात. त्यामुळे हे (सुभाषित किंवा जे असेल ते) इकडे देखील लागू होतेच... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लेख

चिरोटा
Wed, 08/08/2012 - 14:44 नवीन
बाकी आता च विलासरावांवर लेख लिहायला घेईन म्हणतो
१९७९ साली जयप्रकाश नारायण जसलोक हॉस्पिटलमध्ये डायालिसिसवर होते. त्यावेळी ते 'गेल्याच्या' अफवा सारख्या पसरत असल्याने काही पत्रकारांनी तेव्हा लेख तयारच ठेवले होते. एकदा अफवा खरी मानून एका इंग्रजी दैनिकाने लेख छापलाही! नंतर माफी मागितली.(काही दिवसांनी जे.पी. खरेच गेल्याने मग लेख थोडासा बदल करून छापला).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

डीएनए वर्तमानपत्राने काल अशीच

अप्रतिम
Wed, 08/08/2012 - 17:21 नवीन
डीएनए वर्तमानपत्राने काल अशीच बातमी विलासरावांची छापली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

तयार मृत्युलेख

सुनील
Wed, 08/08/2012 - 21:23 नवीन
काही पत्रकारांनी तेव्हा लेख तयारच ठेवले होते प्रत्येक वर्तमानपत्र "संभाव्य" व्यक्तींबाबत असे लेख तयारच ठेवते. मिपावरील ह्या क्षेत्रातील जाणकार योग्य काय ते सांगतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

प्रतिमा

सुनील
Wed, 08/08/2012 - 21:20 नवीन
मिपावरील ५-२५ प्रतिसाद म्हणजे जनमानसातील प्रतिमा हे वाचून एक मिपाकर म्हणून द्वाळे पाणावले! चार जणांची टीम अण्णा १२० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते, हेदेखिल जाताजाता आठवून गेले! लोकशाहीत जनमानसातील प्रतिमा ठरविण्याचा निकष निवडणूकीच्या मार्गानेच जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

विनम्र मतांतर..

गवि
गुरुवार, 08/09/2012 - 11:08 नवीन
मिपावरील ५-२५ प्रतिसाद म्हणजे जनमानसातील प्रतिमा हे वाचून एक मिपाकर म्हणून द्वाळे पाणावले! चार जणांची टीम अण्णा १२० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते, हेदेखिल जाताजाता आठवून गेले! लोकशाहीत जनमानसातील प्रतिमा ठरविण्याचा निकष निवडणूकीच्या मार्गानेच जातो.
दादा... अहो उलट मला वाटतं की मिपावरचे प्रतिसाद हेच जनमानसातल्या प्रतिमेच्या जास्त जवळ जातात. इथे विशिष्ट नेत्याच्या बालेकिल्ला मतदारसंघात असलेला कोणताही लाभार्थी / पीडित नागरिकगट एकत्र आलेला नाही.. अत्यंत वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवरुन दिलेले अत्यंत व्यक्तिगत मताला दर्शवणारे प्रतिसाद आहेत हे. उलट निवडणुकीच्या मार्गाने आलेल्या निकालात जनमानसातील नैतिक प्रतिमा ठरत नसून मुत्सद्दीपणाची / ताकदीची परीक्षा होते. बारामती, सांगली, लातूर, अमेठी अशा कोणत्याकोणत्या एरियातल्या लिमिटेड लोकांना प्रचंड उपकृत करुन आणि त्यांच्यावर उपकारसदृश छाप ठेवून तिथे निवडणुकीत उभे राहून हुकमी विजय मिळवणं याला "देशविदेशातल्या भारतीयांच्या जनमानसातली प्रतिमा" म्हणणं पटत नाही. मी ज्या ज्या गावात राहिलो आहे तिथे हे पाहिलं आहे की तिथे हमखास निवडून येणार्‍या नेत्यांचा भ्रष्टपणा तिथले लोक जोखूनच होते. फक्त ते लाभार्थी ठरत असल्याने, कसा का असेना, माझ्या एरियातला आहे म्हणून माझ्या एरियाकडे खास लक्ष देईलच असं म्हणून त्याला मत देणारेच बरेच असतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आमीच लै भारी!!!

सुनील
गुरुवार, 08/09/2012 - 21:11 नवीन
फेसबुकी विचारवंतांची भूमिका ;) टीम अण्णादेखिल हेच म्हणत होती :) चालू द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आमीच लै भारी असं म्हणायचं

गवि
Tue, 08/14/2012 - 10:47 नवीन
आमीच लै भारी असं म्हणायचं नाहीये..तुमच्या मतावर फक्त माझं मत दिलं इतकंच. माझ्या मतात दुराग्रह दिसत असला (इथे किंवा आणखी इतर धाग्यांवरही कुठे) तर आमी भारी किंवा आमची लाल असं म्हणता येईल. पण आता तुम्ही एकदम मत बनवलेलं दिसतंय. तेव्हा ते जाऊ दे. बाकी या धाग्यावर अनेकांनी सिरियसली आजारी असलेल्या नेत्याला शुभेच्छा न देता (शुभेच्छा न देणंही एकवेळ ठीकच) स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे त्याला अधिक त्रास व्हावा किंवा जे होतं आहे ते योग्यच आहे असं म्हणणं कुठेतरी वाईट वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

सारखं आपलं "आम्ही कसे बै

शिल्पा ब
Tue, 08/14/2012 - 11:10 नवीन
सारखं आपलं "आम्ही कसे बै चांगल्या मनाचे, कसं बै सगळ्यांना समजुन घेतो" असं दाखवल्याशिवाय तुम्हाला कै चैन पडत नै वाटतं ! बाकी देशमुख किंवा त्यासारखा इतर कोणी नेता आजारातुन बरा झाल्यावर काय दिवे लावणार आहे ? कोणाचं भलं करणार आहे - स्वतः अन स्वत:च्या पिलावळीशिवाय? ह्या असल्या विचारांमुळेच मुंबई प्रकरण पुन्हा झालंय अन होतंच राहील एवढं नक्की. चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ज्याला सरळसरळ फाशीची शिक्षा

गवि
Tue, 08/14/2012 - 11:24 नवीन
ज्याला सरळसरळ फाशीची शिक्षा झाली आहे असा सिद्ध गुन्हेगार, उदा. कसाब याला लवकर फाशी द्यावी अश्याच मताचा मी आहे पण त्याच्याही बाबतीत ही प्रवृत्ती संपवायची असा न्याय करण्यासाठी त्याचा मृत्यू योग्य वेळेत घडवून आणावा असा भाव पाहिजे. त्याला मारण्याच्या विविध पद्धती किंवा तो मृत्यू घडत असताना त्याचा तमाशा पाहणं हे कितीही समाधानकारक वाटत असलं तरी चांगलं नव्हे असं मलातरी वाटतं. अशाने आपणही कसाबच्या दुसर्‍या टोकाला पोचतो. इथे एक नेता मरणोन्मुख आहे अशा वेळी मी कसाबची तुलना या केसशी करत नाहीये, पण अगदी तसं असलं तरी आपण न्यायबुद्धीने वागावं सूडबुद्धीने नाही हे मला पटलं आहे. मी इथेच पूर्वी एका लेखात सूडबुद्धीला कायदेशीर मान्यता का नसावी? असा प्रश्न विचारला होता. गुन्ह्याचे जे बळी आहेत त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांनाच शिक्षा ठरवण्याचा हक्क असावा असं माझं मत होतं. पण नंतर विचारा अंती ते बदललं. सुडातून काही संपत नाही. कोणाला सोडून द्यावं किंवा माफ करावं असं अजिबात नव्हे पण हत्याही केवळ न्यायनिवाडा म्हणूनच केली पाहिजे. "विलासराव मरेनात का. जितके हाल होतील तितके चांगलेच.." वगैरे प्रकारच्या वक्तव्यांनी अस्वस्थ वाटलं आणि सर्वांनाच वाटावं अशी इच्छा आहे. याला फेसबुकी म्हणायचं की विचारवंत / जंत वगैरे हा व्यक्तिगत पर्स्पेक्टिव्ह झाला. पण तुम्ही म्हणता आहात की :
सारखं आपलं "आम्ही कसे बै चांगल्या मनाचे, कसं बै सगळ्यांना समजुन घेतो" असं दाखवल्याशिवाय तुम्हाला कै चैन पडत नै वाटतं !
त्यामुळे असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी

शिल्पा ब
Tue, 08/14/2012 - 11:30 नवीन
न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी याचेही निकष नसतील तर असलेच पाहीजेत... पृथ्वीराज चौहानने घोरीला ७ वेळा जिवंत पकडुन सोडुन दिलं...असंच न्यायबुद्धी, सहानुभुती, सर्‍हदयता(कसं लिहायचं? ) वगैरे विचार घोरीने एकदाच पृथ्वीराजांना पकडलं अन मारुन टाकलं असो, इतिहासातुन काहीच न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही. दुर्दैव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी

गवि
Tue, 08/14/2012 - 13:03 नवीन
न्यायबुद्धी कोणासाठी वापरावी याचेही निकष नसतील तर असलेच पाहीजेत...
समोर कोण आहे ते पाहून न्यायाची पद्धत /न्यायबुद्धी बदलायची हा विचार व्याख्येतच बाधित होणारा आहे. "सब्जेक्टिव्ह न्याय" असूच शकत नाही.
पृथ्वीराज चौहानने घोरीला ७ वेळा जिवंत पकडुन सोडुन दिलं...असंच न्यायबुद्धी, सहानुभुती, सर्‍हदयता(कसं लिहायचं? ) वगैरे विचार घोरीने एकदाच पृथ्वीराजांना पकडलं अन मारुन टाकलं
घोरीला पकडून पहिल्यावेळीच मारायला हवं होतं. सोडलं ही चूक, सोडलं हाच अन्याय झाला. न्याय नव्हे. "सूड नको न्याय हवा" हा विचार म्हणजे बोटचेपेपणा किंवा आचरट सहिष्णुता नव्हे. अशा वेळी घोरी आजारी पडला आहे तर त्याला सडत तसाच मरु द्यावा की त्याला तहानभुकेने मारावा अशा प्रकारे दिशा असली तर त्याला सूड म्हणता येईल. न्याय नव्हे. त्या वेळच्या लोक आणि राजमान्य पद्धतीने फाशी किंवा अन्य प्रकारे एक्झेक्युशन करायला हवं. हे त्या वृत्तीच्या प्रीव्हेन्शनसाठी आहे.
असो, इतिहासातुन काहीच न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही. दुर्दैव !
अगदी मान्य.. इतिहासातून सकारात्मक आणि कठोर असं काही न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही हे दुर्दैव. इतिहास रानटी आहे तर आपणही रानटी होऊ. रानटीच रानटीला संपवू शकतो.. हो ना? शक्ती वापरुन फक्त रानटीपणा संपवून आपली दिशा माणूसपणाकडे ठेवू असं नव्हे. ज्याला संपवायचं असं नियमांनुसार ठरलं आहे त्याला संपवण्याच्याही पद्धती व्यक्तिगत नसाव्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कैच्या कै

शिल्पा ब
Tue, 08/14/2012 - 19:10 नवीन
<<इतिहासातून सकारात्मक आणि कठोर असं काही न शिकण्याची भारतीयांची वृत्ती जाणार नाही हे दुर्दैव. एवढं होउनही फक्त वरचंच वाक्य अधोरेखीत होतंय दुसरं काही नाही. <<"सूड नको न्याय हवा" हा विचार म्हणजे बोटचेपेपणा किंवा आचरट सहिष्णुता नव्हे. कोण न्याय देणार हो? डोकं फोडुन घेण्याची स्मायली द्या हो सरपंच ! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी मेलो....

मन१
Tue, 08/14/2012 - 16:44 नवीन
मी मेलो, माझं आख्खं घरदार उजाड झालं तर देशमुखाची प्रतिक्रिया काय असणार आहे? इथे हळहळणार्‍या काही सज्जन लोकांच्या बद्दल देव न करो असं काही झालं तर देशमुखराजे काय म्हणतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

.

गवि
Tue, 08/14/2012 - 16:56 नवीन
मी मेलो, माझं आख्खं घरदार उजाड झालं तर देशमुखाची प्रतिक्रिया काय असणार आहे? इथे हळहळणार्‍या काही सज्जन लोकांच्या बद्दल देव न करो असं काही झालं तर देशमुखराजे काय म्हणतील?
काय म्हणतील कल्पना नाही रे. पण अशा वेळी त्यांनी किंवा कोणीही काय "म्हणू नये" याविषयीची इच्छा आणि अपेक्षा मात्र आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

क्लीन ट्रॅप....

मन१
Tue, 08/14/2012 - 18:14 नवीन
मी क्लीन ट्रॅप झालेलो आहे. मुद्दा समजला. मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

@ सुनिल आमीच लै भारी!!! आपले

गणेशा
Tue, 08/14/2012 - 19:52 नवीन
@ सुनिल
आमीच लै भारी!!!
आपले मत जर एखाद्याला पटले नाही आणि तसे त्याने नमुद केले तर काय बिघडले. यात आम्हीच लै भारी हे तरी कुठे जाणवले नाही.. मात्र आमच्या मुद्याच्या उलट तुम्ही लिहिता आणि ते ही वाईट शब्द न वापरता तर तुम्ही फेसबुकी विचारवंत असे म्हणणे पटले नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

१००% सहमत.

श्रीरंग
गुरुवार, 08/09/2012 - 22:53 नवीन
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा