Skip to main content

विलासराव देशमूख

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 07/08/2012 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतातील ज्येष्ठ राजकारणी विलासराव देशमूख यांची प्रकृती गंभीर आहे असे वाचण्यात आले. मला राजकारण्याबद्दल आणि चित्रपटक्षेत्रातील अभिनेते आणि कलाकारांबद्दल विलक्षण आत्मियता आहे हे अगोदरच नमूद करतो. विलासरावांचे मूंबई दंगलीबद्दल नेमकेच मूख्यमंत्रीपद गेले होते आणि त्याकाळातच त्यांचा पूण्यात एक सार्वजनिक समारंभात भाषण ऐकण्याचा योग आला होता. विलासरावांच्या चेहर्‍यावर विलक्षण असा ताण दिसत होता. मूख्यमंत्रीपदासारखे पद गमावल्यानंतर विलासराव बरेच कृद्ध अथवा निराश झालेले असतील आणि त्यांचा त्रागा भाषणात दिसेल असा कयास मला वाटत होता. परंतु जसे ते भाषण करायला लागले तसे त्यांनी अतिशय खेळकर पद्धतीने सर्व भाग सांगितला. मूख्यमंत्री पद नसतानाही आयोजकानी ठरविल्याप्रमाणे येण्याची गळ घातली याबद्दल त्यांनी आयोजकाचे आभारही मानले. विलासारावांची व्यावसायिक कारकिर्द पुण्यातच चालू झाली. तेंव्हा वकिलीकरत असताना त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यावेळेस ते बरेच भावनाशिल झालेलेही मला जाणवले. १९६७ च्या सुमारास प्रारंभीच्या काळी त्यांनी जो खटला चालवला होता त्याचे वृत्त त्यावेळेस वर्तमानपत्रात आलेले हे समजताच त्यांनी सायकलवर १० / १२ किमी जावून ती प्रतही मिळवली. तेंव्हाचा आनंद आणि आता वर्तमानपत्रात नाव आलेतर कशी भिती वाट्ते हेही त्यांनी हास्याच्या कल्लोळात सांगितले. जवळ जवळ ४०/ ५० मिनिटाच्या भाषणात त्यांनी मला बर्‍यापैकी प्रभावित केल्याचे आठवते. काळाच्या ओघात अनेक भ्रष्टाचार्‍याच्या खटल्यात त्यांच्यावर ताशेरे मारलेले वाचतांना मला नेहमीच वाईट वाटत असे, दोन्ही मूत्रपींडे आणि यकृतात बिघाड झाल्याने मला व्यक्तिगत त्यांच्याबद्दल काळजी आणि सहानूभुती वाटते. विलासराव लवकरच बरे होवो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

वाचने 38125
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

*

विलासरावांचे वय ६७ वर्षे आहे. थोडक्या आजोबा टाईप! त्यात आयुष्यभरात केलेल्या कुकर्मांची फळे सुद्धा या जन्मीच भोगावी लागतील. तेव्हा जनतेने त्यांची बाजु घेण्यात किंवा त्यांच्या कुकर्मांचा पाढा वाचण्यात काही फायदा नाहिए!

छान. पण आनंद फार काळ टिकणार नाही असं वाटतंय. सध्या तरी विलासची प्रकॄती स्थिर आहे अशीच बातमी आहे. जितका त्रास होईल तेवढं बरंच आहे.

विलास ....भोग विलास ....सुधार .....कल्पनाविलास..... भोगमुख ....वि-देश वि-मुख .....शेवट..... वरासलावि-विमुख! मरेना का तिकडे ?

विलासरावाच्या मरणावर टपलेली एव्हडी लोकं बघून आनंद वाटला. आता एक शिवी देउनच घेतो, विलासरावाच्या बैलाला........ हो! :)

नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्य्कर्त्यांना विलासरावांसाठी एका यकृताची तातडीनं सोय करायला सांगितलं आहे अशी बातमी वाचली. नुकत्याच निवर्तलेल्या मनुष्याच्या शरिरातून चांगलं यकृत असेल तर काढून घेउन वापरता येतं म्हणे.

In reply to by पुष्करिणी

नरेंद्र मोदी झिंदाबाद !!! (नाय...... त्यांनी काहीही केलं की त्यांचं कौतुक करायचं असतं म्हणून झिंदाबाद)

In reply to by नितिन थत्ते

थत्ते चाचा , जाउन आलात का चेन्नै ला? कधी आहे म्हणे ऑपरेशन ? वागळे होते ना तिथेच , खिमट भरवायला ?

In reply to by नितिन थत्ते

तुमच्याकडे पाहिले ना, की का कोणास ठावूक पण मला कायम बॅ. गाडगिळांची आठवण येते. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

कोणते गाडगीळ ? न. वि. गाडगीळ की विठ्ठलराव की अनंतराव की आणखी कोणी गाडगीळ? पराला न. वि. गाडगीळ किंवा विठ्ठलराव गाडगीळ आठवायची शक्यता कमीच आहे

In reply to by नितिन थत्ते

थत्तेसाहेब, पराला एवढा अंडरएस्टिमेट करू नका. तुम्हाला माहित नाहीये तो काय प्रकार आहे ते. :)

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन

'आदर्श' नेता हरपला.

नंतर नाही म्हणणार्‍या त्या मृत ड्रायव्हरच्या(ज्याची किडनी,यक्कृत लावणार होते) नातेवाईकांचा तीव्र निशेध. झाले मनासारखे ??? आपली ती संस्कृती नाही म्हणुन श्रद्धांजली. मोदींचा सौम्य धिक्कार. एक यकृत नाय देवु शकले. बरं असो. ते पल्याडचे होते त्यांना दोष देवुन काय उपयोग.पण अल्याडच्यांनी काय @#$% घेतले.

विदर्भामधले आत्महत्या केलेले ४१० शेतकरी त्यांची वाट बघत असतील ..

कोणीही त्याना मनापासुन आपल्या आयुष्यातील एक्-दोन महिने देवु केले नाहीत. शेवटी काय आप-आपल्या कर्माची फळे................

आत्ता टी.व्ही. वरील बातम्या बघितल्या. ढोंगी राजकारणी, विलासरावांवर जी स्तुतीसुमने उधळत होते, ती पाहून वाटले की हेच राजकारणी जेंव्हा कधी नैसर्गिकरीत्या 'कसाब' मरेल तेंव्हा त्याच्यावरही अशीच उधळण करायला कमी करणार नाहीत. 'त्याने इतकी वर्षे इथे राहून आम्हाला लळा लावला होता', अशीही वाक्ये ऐकू येतील. असो. मृतात्म्यास सदगती लाभो.

In reply to by तिमा

'त्याने इतकी वर्षे इथे राहून आम्हाला लळा लावला होता', अशीही वाक्ये ऐकू येतील.
हा हा.. खरंय! अवांतरः माझी देखील विलास देशमुखना विनम्र श्रद्धांजली.

येथे चर्चेला उत आला आणि फाकडा मंत्री दगावला ! अश्या आजारी माणसाची आणि त्याच्या कारकीर्दीची चर्चा हया पुढे करू नये हया ठरावासह श्रद्धांजली !

विलासराव देशमुख यांना माझी श्रद्धांजली !

विलासरावजी यांचे निधन झाल्याचे वृत्त वाचले. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो. काही गोष्टींचे वाईट वाटल्याशिवाय राहवत नाही. विलासरावजी आपल्या मूलांच्या प्रेमात नको तितके वाहवत गेले. पूत्रमोह आवरला असता तर विलासरावजी एक निष्णांत राजकारणी म्हणून नक्कीच आपल्या सर्वांच्या स्मृतीत राहिले असते. शेवटच्या वर्षभर त्यांची प्रकृतीही ठिक नव्हती, हे जर खरे असेल तर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी होती. शेवटी पूर्वपुण्याईवर राजकारणाची जागा अडवून बसणे त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे नव्हते. यशवंतरावांचा वारसा जपणारा राजकारणी कधी जन्माला येईल कोणास ठाऊक?

विलासरावांना विनम्र श्रद्धांजली. प्रकृती त्रास देतेय, जीवावरचं दुखणं मागे लागलय, मुलांना राजकारणात सेटल करायचय, उघड आणि गुप्तहितशत्रुंना चाप लावायचाय, आदर्श वगैरे प्रकरणातुन आपली अब्रु वाचवायची आहे.. एक ना दो, हजार कटकटींपासुन एका झटक्यात सुटले विलासराव. अवांतर : अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आपले सी.एम. साहेब वगैरे मंडळींना मनात थोडंफार हायसं वाटलं असेल... आता सगळ्या "आदर्श"चं बालंट त्या दिवंगत व्यक्तीच्या नावे खपवलं कि हे सगळे मोकळे :( अर्धवटराव

पूर्वी ह्यांच्या पोराचा पहिला चित्रपट प्रदर्शित झालेला तेव्हा पासून ते आत्तापर्यंत(किंवा बर्याच वर्षान पर्यंत ) त्य चित्रपटाची एकदाही पायरसी झालेली नाहीहे..काय वट आहे...!!!!! बाकी आत्ता बातम्यान मध्ये पहिले कि आपले नव गृहमंत्री नकाश्रू ढळत होते माझा मित्र गेला म्हणून..(मनात म्हणंत असतील च्यायला जणारास च होतास तर आदर्श चा ब्लेम तरी घेऊन जायचास!!) आता कोणत्या पावर फुल्ल माणसाची वर्णी लागत्येय ते पाहूया.. एक राजकारणी गेला कि पंचक पूर्ण होते असे ऐकले आहे.. :)

याच राजकारण्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवस्थेची वाट लावलीये ना? यांना कल्पनाही नसेल की त्याच मुळे यांचा ही बळी जाइल म्हणून. एवढे सगळे कॉलेजेस काढले, जागा हडपली, पैसे ढापले आणि एक यकृत मिळालं नाही?

In reply to by काळा पहाड

विलासरावांना श्रद्धांजली... एक यकृत मिळालं नाही? यकृत आणि मुत्रपिंड दोन्ही मिळाले होते. चेन्नईतील एका ब्रेनडेड टॅक्सिड्रायव्हरचा रक्त गट वगैरे सर्वकाही जुळले होते. त्याच्या कुटूंबियांनी देखील यक्रूत आणि मुत्रपिंडदानासाठी परवानगी दिली. त्यानंतर कायद्याप्रमाणे लागणार्‍या सर्व अधिकृत परवानग्या देखील राज्यसरकारकडून मिळाल्या. शस्त्रक्रियेची तयारी होत असतानाच, त्या मृत ड्रायव्हरच्या कुटूंबियांनी मत बदलले आणि अवयवदानास नकार दिला. त्यामुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही.... विलासराव, त्यांचे राजकारण वगैरे आवडो-न आवडो हा ह्यातील दुय्यम भाग आहे. पण अवयवदानाने जर कोणाचा प्राण वाचत असेल तर त्यासाठी मदत करता येत असताना देखील मदत न करण्याची वृत्ती आपल्या समाजासाठी दुर्दैवी आहे, इतकेच या घटनेमुळे वाटले.

विलासरावांना श्रद्धांजली!! खेडेकर वगैरे प्रभ्रुती पहाता विलासराव देशमुख खरच सुसंस्कृत होते हे (बाकीच्या आदर्श गोष्टींकडे डोळेझाक करून) म्हणावेसे वाटते. अताच कोणी तरी आयबिएन लोकमत वर 'त्यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता होती' असे स्टेटमेंट केले ते जरा अतिशयोक्तीपुर्ण वाटतय

दै. सकाळच्या औरंगाबाद आवृत्तीत मोरपीस या शीर्षकाचा विलासरावांच्या आठवणीचा एक सुंदर लेख कवी प्रा.फ.मु.शिंदे यांनी लिहिला आहे, काही वाचकांना आवडेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही वाचकांना आवडेल असे वाटते. हा: ..हा:..हा:...किती घाबरत-घाबरत हे विधान केले आहे!

In reply to by प्रभाकर पेठकर

हाहाहा! सानंदा प्रकरणात, या 'राजहंसाच्या' वरदहस्ताखाली ज्यांच्या जमीनी गेल्या आहेत, त्यांना नक्कीच आवडणार नाही हा लेख.

लातुर पोरके कि काय झाले म्हणे ! आम्च्या सोलापुरने काय घोडे (नेमका हाच प्राणी का ? हे माहित नाही ,प्राणीमित्रांनी उगाच संशय घेउ नये म्हणुन हा कंसात्मक खुलासा ) मारले हे काही कळतच नाही ..... ज्ञानी जनतेने प्रकाश टाकावा ....!

मिपावरील जाणकार? वाचकांच्या प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले. एखाद्या माणसाच्या ३२ वर्षांच्या सामाजिक जीवनातील उणे पुरे दोन चार प्रसंग माहित झालेल्या लोकांनी विलासरावांच्या बद्दल इतक्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत विशेषतः ते मृत्यूशय्येवर असताना हिणकसपणे लिहिलेल्या काही प्रतिक्रिया पाहून वाईट वाटले. प्रथम मी काँगेस व विलासराव यांचा समर्थक /लाभार्थी नाही हे स्पष्ट करु इच्च्छितो. त्यांच्यववर भ्रष्टाचाराचे आरोप झाले व त्यात तथ्य असेलही. सानंदा, व्हिसलिंविवुड्स, आदर्श, राम गोपाल वर्मांची सोबत हे त्यांच्या कारकिर्दीतिल वादग्रस्त निर्णय ठरले. या प्रकरणांमुळॅ काही लोकांनी इतक्या वाईट प्रकारे प्रतिक्रिया दिल्या असतील तर ही चीड इतर राजकारण्यां विरुध इतक्या ठळकपणे या व्यासपिठावर का मांडली गेली नाही? शरदराव पवार, अजित पवार, ए राजा, येडि, मनमोहन(कोळसा घोटाळा), चिदंबरम, हे मेले तर बरे होईल असे विधान माझ्या तरी वाचण्यात आले नाही. विलासरावांबद्दल काही चांगले माझ्या अनुभवानुसारः विलासरावांमध्ये निर्णय क्षमता होती व निर्णयांची अम्मलबजावणी करुन घेण्याची प्रशासकीय जाणही होती. त्यांचा जनसंपर्क प्रचंड होता कार्यकर्त्यांना व्यक्तिशः ते ओळखत असत. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही आपुलकीने चौकशी ते करत असत. नुसतीच चौकशी नाही तर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी वाहनाची जेवणाखाण्याची व्यवस्था केल्याची उदाहरणे मला ठाऊक आहेत. १०-१५ वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या सरकारी अधिका-यांशी (यात त्यांना कसलाही फायदा नसताना)स्वतःहून व्यक्तिगत संपर्क त्यांनी ठेवला होता. हे सर्व ते मुख्यमंत्री असताना सुद्धा करत होते. जबरदस्त वक्तृत्रुत्वगुण तांच्या जवळ होते. जे एक उत्कृष्ट राजकारणी होण्यासाठी आवश्य्क आहेत. त्यांना कला, संस्कृती याबद्दल आस्था होती. शास्त्रीय संगीताचे ते मोठे चाहते होते. गाण्याला कलेला दाद देणारे ते रसिक होते. महारष्ट्राचे नुसतेच राजकरण नव्हे तर संस्कृती चे ते जाणते होते. आघाड्यांचे राजकारण राजकीय डावपेच यात ते तरबेज होते. मुंबईच्या गिरणीकामगरांच्या प्रश्नातील त्यांनी केलेली मदत असेल, पहिली पासून इंग्रजी शिक्षणाच्या निर्णयाचे समर्थन असेल अशी लोकोपयोगी कामे त्यांनी केली . मराठवाड्यातील अनेक गावांचे पाण्याचे प्रश्न त्यांनी सोडवले. महिन्यातून दोन वेळा पाणी येणा-या घरात एक दिवसाआड पाणी आले की कसे वाटते हे समजण्यासाठी ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असावी लागते. मराठवाड्यात त्यांनी सुरु केलेल्या रेल्वे असोत किंवा विमानसेवा असोत किंवा त्यांनी आणलेले उद्योग धंदे असोत त्यामुळे विकासाला हातभार लागला हे मान्य करावेच लागेल. फक्त मराठवाड्यासाठी च त्यांनी कार्य केले असा प्रतिवाद कुणी करु इच्छित असतील तर त्यांना सांगावेसे वाटते की कोणीच काही न केलेल्या प्रदेशासाठी त्यांनी कार्य केले हे काही कमी नाही. व मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग असल्याने त्यांनी पर्यायाने महाराष्ट्राच्याच विकासाला हातभार लावला असे म्हणावे लागेल. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला व पदाचा दुरुपयोग करुन परिचितांना लाभ मिळवून देण्याच्या त्यांच्या कृतींना मी कदापि समर्थन देणार नाही. पण एखाद्याच्या मृत्यूबद्दल असुरी आनंद व्यक्त करणे रुचले नाही म्हणून हा टंकन प्रपंच.

In reply to by सोम्यागोम्या

मराठवाड्यातील अनेक गावांचे पाण्याचे प्रश्न त्यांनी सोडवले. महिन्यातून दोन वेळा पाणी येणा-या घरात एक दिवसाआड पाणी आले की कसे वाटते हे समजण्यासाठी ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असावी लागते. मराठवाड्यात त्यांनी सुरु केलेल्या रेल्वे असोत किंवा विमानसेवा असोत किंवा त्यांनी आणलेले उद्योग धंदे असोत त्यामुळे विकासाला हातभार लागला हे मान्य करावेच लागेल
प्रचंड अनुमोदन्.बाकि प्रतिक्रिया देणार्यानि एकदा लातुरला जाऊन यायला हर्कत नाहि...

In reply to by सोम्यागोम्या

मराठवाड्यातील काही गावांमध्ये एकदिवसाआड पाणी... अरे वाह! भलतीच दैदिप्यमान कारकीर्द म्हणायची, अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनून राहिलेल्या माणसाची. तहानलेला विदर्भ याच महाराष्ट्रातला ना हो? असो. हजारो कोटीची संपत्ती त्यांनी कशी जमवली हे पण सांगा जरा. अनुकरणीय असेल तर आपण सर्वच प्रयत्न करू. शरदराव पवार, अजित पवार, ए राजा, येडि, मनमोहन, चिदंबरम, यांच्यापेक्षा ते कमी भ्रष्ट असल्याचं तुम्ही सुचवू पाहताय. ही देखील मोठी अचीव्हमेंट मानली पाहिजे का? बाकी मनमिळावू, विनोदी, कर्यकर्त्यांशी गोग्गोड बोलणारे वगैरे ते असतील कदाचित.

'फेसबुक'वर आलेला आणि मला आवडलेला एक प्रतिसाद: "इतर कुठल्याही देशात अशा भ्रष्ट माणसाचे निधन एकाद्या इस्पितळात न होता एकाद्या तुरुंगात झाले असते! आता त्यांच्या वैद्यकीय इलाजापायी आलेल्या खर्चाची तरतूद आपल्यासारख्या करदात्यांनाच करावी लागणार." "मरणांति वैराणि" अशी आपली संस्कृति असूनही विलासरावांच्या निधनानंतर दुर्दैवाने असे नकारात्मक प्रतिसादच बहुतांशी वाचायला मिळाले हे मात्र खरे.

विलासराव जाउन मोठेच नुकसान झालेले दिसत आहे. त्यांच्यासारख्यांना वाचवायला हा तरी उपाय वापरायला हवा होता. मागचे काही दिवस "कसाबला फासावर लटकवा " अशी मागणी बरेच लोक करत होते. मला तर वाटते आत्यंतिक क्रूर गुन्हा केलेल्यास फाशी देण्यापूर्वी त्यांची एखादी किडनी, शेवटच्या क्षणी यकृत वगैरे का काढून घेउ नये? समाजासाठी ते हितावह नाही का? आमचे दिग्गज विलासराव तरी वाचले असते कसाबचे यकृत जुळले असते तर. मला तर विश्वास वाटतो की ते नक्की जुळले असते. कसाब आणि विलासराव एकाच रक्ताचे (आय मीन एकाच रक्तगटाचे) आहेत असा मला विश्वास आहे

In reply to by मन१

मग ते नवीन आदर्श ठेवायला अजुन जोमाने काम करु शकले असते.