रद्दीवाला -
काव्यरस
रद्दीवाला "या कविराज"- म्हणून माझे स्वागत करतो
त्याच्या पैशानेच मला तो कटिंग चहा पाजत असतो -
मला भेटल्यावरती तो आनंदी अन् खुषीत दिसतो
माझ्या कवितेच्या रद्दीवर त्याचा धंदा चालू असतो !
एके काळी 'रद्दीवाला' म्हणून ज्याला हिणवत होतो
सलाम करुनी मी आता त्याचे जंगी स्वागत करतो -
"आभारासह परती"चा कविता-कचरा माझा घेतो
रद्दीवाला धंदा करुनी , धंद्यामधुनी 'सोने' घेतो !
कवितांच्या रद्दीने माझ्या, रद्दीवाला झाला 'राव'
'अध्यक्ष'पदी खुर्चीवरती देणगीसाठी त्याचे नाव -
व्यासपिठावर बसून हल्ली तो कविसंमेलन गाजवतो
समोर सतरंजीवर बसुनी आम्ही टाळ्या वाजवतो !
वाचने
1644
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
तुमच्या या कवितेसाठी जोरदार टाळ्या !
H)
हाहाहाहा.. सही जमून आली आहे कविता..
झक्कास..पाकात मुरलेली...... जिलबी... ;)
काही संपादक आणि सदस्यांमधल्या परस्पस प्रेमसंबधाचा खुलासा आत्ता झाला.
In reply to भारीच! by परिकथेतील राजकुमार
काही संपादक आणि सदस्यांमधल्या परस्पस प्रेमसंबधाचा खुलासा आत्ता झाला.
च्यायला आस पन हाये का..? ;)
तुमच्या या कवितेसाठी जोरदार