Skip to main content

रद्दीवाला -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 03/08/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
रद्दीवाला "या कविराज"- म्हणून माझे स्वागत करतो त्याच्या पैशानेच मला तो कटिंग चहा पाजत असतो - मला भेटल्यावरती तो आनंदी अन् खुषीत दिसतो माझ्या कवितेच्या रद्दीवर त्याचा धंदा चालू असतो ! एके काळी 'रद्दीवाला' म्हणून ज्याला हिणवत होतो सलाम करुनी मी आता त्याचे जंगी स्वागत करतो - "आभारासह परती"चा कविता-कचरा माझा घेतो रद्दीवाला धंदा करुनी , धंद्यामधुनी 'सोने' घेतो ! कवितांच्या रद्दीने माझ्या, रद्दीवाला झाला 'राव' 'अध्यक्ष'पदी खुर्चीवरती देणगीसाठी त्याचे नाव - व्यासपिठावर बसून हल्ली तो कविसंमेलन गाजवतो समोर सतरंजीवर बसुनी आम्ही टाळ्या वाजवतो !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1648
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

काही संपादक आणि सदस्यांमधल्या परस्पस प्रेमसंबधाचा खुलासा आत्ता झाला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

काही संपादक आणि सदस्यांमधल्या परस्पस प्रेमसंबधाचा खुलासा आत्ता झाला. च्यायला आस पन हाये का..? ;)