(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...)
आता पुन्हा उपोषण होणार
मग देश ढवळून निघणार
मग बेदींना कंठ फुटणार
मग मध्येच मोदी बोलणार
मग जुनाच खेळ चालू होणार...
काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...
मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार...
मग सारीपाट मांडणार...
मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार...
मग ते कुणीतरी ओरडणार
मग अण्णा-मित्र असतील तर रडणार
रामदेव बाबा असतील तर चिडणार
मग नसतोच खेळलो तर बरं असं वाटणार
आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना
काहीच घेण-देणं नसणार...
काय रेऽऽ देऽऽवा
मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार...
मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार...
मग त्याला अण्णांनी आपली संमती दिलेली असणार...
मग ते केजरीवालांनी लिहिलेलं असणार
मग ते अण्णांनी अप्रूव केलेलं असणार
मग रामदेवबाबांची मागणी नक्की काय
असावी असा प्रश्न सार्यांना पडणार
मग उगाच डोक्यात किडा वळवळणार
मग ना घेणं ना देणं पण गांधी टोपी घालणार....
काय रेऽऽ देऽऽवा
मग च्यानेलवाले उत्साहात सगळीकडे धावणार
मग केजरीवाल त्यांना स्पेशल बाईट देणार...
मग बेदी त्याचे खंडन करणार...
मग विरोधक अण्णांना पाठिंबा देणार
पण विधेयकाला विरोध करणार
मग सुंठेवाचून खोकला जाणार
म्हणून काँग्रेस खूश होणार
मग उगाच थोड्या वाटाघाटी होणार...
मग विधेयक पुनर्विलोकनासाठी जाणार...
काय रेऽऽ देऽऽवा
मग फेसबुकी समाजसेवक उत्साहित होऊन जाणार...
मग त्यांना नव्या क्रांतीची पुन्हा स्वप्न पडणार...
मग झुकरबर्गने दिलेल्या फुकट्च्या भिंतीवर
ते बरेच काही राष्ट्रप्रेमी वगैरे खरडणार...
मग लिहिण्यासाठी आपली वॉलही अपुरी वाटणार...
मग जाऊन ट्विटही करावंस वाटणार...
एखाद्या मित्राचे अकाउंट हॅक करून
त्याच्या नावेही आपणच लिहावंसं वाटणार...
मग सारंच कसं इजिप्तसारखं
पेटंत पेटंत जाणार
पण तरीदेखील सत्ताधारी
फक्त कूस बदलंत राहणार...
पण जागे नाही होणार!...
काय रेऽऽ देऽऽवा
आता उपोषण होणार
मग देश जागृत होणार
मग आयटीवालेही मागे नाही राहणार
मग मागच्या वेळच्या गांधीटोप्या
पुन्हा बाहेर काढणार
मग फेज-१ पासून फेज-२ पर्यंत
गांधीटोप्या नि तिरंग्यांचा मोर्चा काढणार
मग चार फोटो फेसबुकासाठी काढणार
मग एकदम लंच टाईम संपल्याचं समजणार
मग लगेचच बॉसचा फोनही येणार...
मग ते कंटाळणार....
मग पुन्हा हापिसात येणार...
घसा बसू नये म्हणून हापिसातल्या मशीनची कॉफी घेणार
मोर्चात कोण आले नव्हते त्यांना फोटो दाखवून जळवणार
लंच टाईम तोपर्यंत संपलेला असणार...
फेसबुकच्या वॉलवर फोटो पडलेले असणार...
माझ्या क्युबिकलमधे मी असणार...
त्याच्या क्युबिकलमधे तो असणार...
आमचा मोर्चा मात्र फेसबुकच्या साक्षीने आता
गावभर फेमस झालेला असणार...
उपोषण एप्रिल मध्ये झालं...
उपोषण जुलैमधे होतंय...
उपोषण डिसेंबरमधेही होणार...
काय रेऽऽ देऽऽवा
काव्यरस
वाचने
7617
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा ...
अण्णांध) छोटा डॉनल्ह्यायचे
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
हे असेच घडते आहे आणि असेच
विडंबन कोणत्या कवितेचे आहे ते
वाह वा !!
जबरा!
क ड क..
बास का राव!
+
In reply to बास का राव! by सहज
+२
In reply to + by नितिन थत्ते
सहज मामा आणि थत्ते चाचांशी सहमत
In reply to +२ by रमताराम
म्हणजे ?
In reply to सहज मामा आणि थत्ते चाचांशी सहमत by परिकथेतील राजकुमार
काय हे डान्राव
In reply to म्हणजे ? by छोटा डॉन
अच्छा अच्छा ...
In reply to काय हे डान्राव by रमताराम
आत्ताच ’स्वदेस’ नावाच्या
In reply to अच्छा अच्छा ... by छोटा डॉन
हा हा हा ...
In reply to आत्ताच ’स्वदेस’ नावाच्या by राजेश घासकडवी
हम्म्म
In reply to अच्छा अच्छा ... by छोटा डॉन
वा
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
निषेध !
In reply to वा by रमताराम
ग्लेन फिडिच, फ्रेंच फ्राइज
In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार
अरारारा
In reply to ग्लेन फिडिच, फ्रेंच फ्राइज by बिपिन कार्यकर्ते
श्या !
In reply to अरारारा by रमताराम
त्याचं काय आहे
In reply to श्या ! by परिकथेतील राजकुमार
रऽ ऽराऽऽ! खरच असच वाटल. अति
झक्कास विडंबन केलंय ररा
अहो
In reply to झक्कास विडंबन केलंय ररा by किसन शिंदे
मस्त!!
हाहाहा!
मस्त आशय !
काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...
आयला ! हे लै भारी..
In reply to काऽऽय रेऽऽ देवाऽऽ... by स्पा
अण्णा शाकाहारी का
In reply to काऽऽय रेऽऽ देवाऽऽ... by स्पा
मग एकदम लंच टाईम संपल्याचं
काये
In reply to मग एकदम लंच टाईम संपल्याचं by राजेश घासकडवी
'शान्याला शब्दांचा मार आन्
In reply to काये by रमताराम
वा वा
In reply to 'शान्याला शब्दांचा मार आन् by राजेश घासकडवी
(No subject)
हाहाहा
मग
In reply to हाहाहा by प्रीत-मोहर
actually मी बेक्कार बिझले
In reply to मग by रमताराम
ही ही ही!
झक्कास..
अण्णाप्रेमी आता परत
विदारक....
प्रभाकर पेठकर सर, अतिशय योग्य बोललात.
In reply to विदारक.... by प्रभाकर पेठकर
ठिणग्या
In reply to प्रभाकर पेठकर सर, अतिशय योग्य बोललात. by निश
लैच भारी...
अरेरे हे असले देशद्रोही
मस्त विडंबन अभिज्ञ.
__/\__