Skip to main content

प्रदेश

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 27/07/2012 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे हात नाग गळ्याभोवताली सुर-केवड्याचे रान बहरून आले देहवाटेवरी मिठीचा चकवा हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे सुखाचा बसे काळजास दंश शरीरावरी शरीर ठिणगी सोसणारे विष-वादळानंतर उरे दगडदेह अन मन पिसापरी तरंगणारे चांदणे रमावे असा हा प्रदेश स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे -पुर्वप्रकाशित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1932
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

पेशवा, सुरेख कविता आहे. आवडली. बोरकरांच्या ओळी आठवल्या.. कात सोडिल्या नागिणीचे ते नवयौवन होतें विलख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें गरळ तनूतील गोठूनी झाले अंतरांत गोड कळले का मज जडते देवां नरकाची ओढ

In reply to by यशोधरा

पेशवा, सुरेख कविता आहे. आवडली. बोरकरांच्या ओळी आठवल्या.. :bigsmile: :bigsmile: :bigsmile: अभिनंदन

आवडली कविता. देहवाटेवरी मिठीचा चकवा हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे या ओळी विशेष. हरवणे सापडावे यातला (शब्दांतला) विरोधाभास, हरवणे सापडावे तेही कसे? तर नव्याने आणि पुन्हा 'जीवघेणे' .. क्या बात है! या एका ओळीसाठी 'कुर्बान' अशी कविता आहे जियो!

सुंदर उपमा वापरल्या आहेत पण घाईघाईनी लिहिल्यासारखी वाटत आहे. हेच सगळे अजून चांगले लिहिता येइल.

तुझे हात नाग गळ्याभोवताली सुर-केवड्याचे रान बहरून आले
संपुर्ण काव्यच किंकी* (Kink) भासत आहे. * मराठी शब्द आठवत नाही.