तुझे हात नाग गळ्याभोवताली
सुर-केवड्याचे रान बहरून आले
देहवाटेवरी मिठीचा चकवा
हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे
सुखाचा बसे काळजास दंश
शरीरावरी शरीर ठिणगी सोसणारे
विष-वादळानंतर उरे दगडदेह
अन मन पिसापरी तरंगणारे
चांदणे रमावे असा हा प्रदेश
स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे
-पुर्वप्रकाशित
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1922
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय ..? काय नक्की काय
@नक्की काय म्हणायचे आहे
आयला घंटा कळालं नाही...
पेशवा, सुरेख कविता आहे.
पेशवा, सुरेख कविता आहे.
In reply to पेशवा, सुरेख कविता आहे. by यशोधरा
क्या बात..
मस्त..
सुंदर उपमा वापरल्या आहेत पण
तुझे हात नाग