तुझे हात नाग गळ्याभोवताली
सुर-केवड्याचे रान बहरून आले
देहवाटेवरी मिठीचा चकवा
हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे
सुखाचा बसे काळजास दंश
शरीरावरी शरीर ठिणगी सोसणारे
विष-वादळानंतर उरे दगडदेह
अन मन पिसापरी तरंगणारे
चांदणे रमावे असा हा प्रदेश
स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे
-पुर्वप्रकाशित
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1943
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय ..? काय नक्की काय
काय ..? काय नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला.... ? :crazy: :crazy: :crazy:
@नक्की काय म्हणायचे आहे
@नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला.... ?
आयला घंटा कळालं नाही...
आयला घंटा कळालं नाही...
पेशवा, सुरेख कविता आहे.
पेशवा, सुरेख कविता आहे. आवडली.
बोरकरांच्या ओळी आठवल्या..
कात सोडिल्या नागिणीचे ते नवयौवन होतें
विलख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें
गरळ तनूतील गोठूनी झाले अंतरांत गोड
कळले का मज जडते देवां नरकाची ओढ
पेशवा, सुरेख कविता आहे.
In reply to पेशवा, सुरेख कविता आहे. by यशोधरा
पेशवा, सुरेख कविता आहे. आवडली.
बोरकरांच्या ओळी आठवल्या..
:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
अभिनंदन
क्या बात..
ह्यावेळी अंमळ रोमँटीक झालात की, राव.. छान छान..
मस्त..
आवडली कविता.
देहवाटेवरी मिठीचा चकवा
हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे
या ओळी विशेष.
हरवणे सापडावे यातला (शब्दांतला) विरोधाभास,
हरवणे सापडावे तेही कसे? तर नव्याने आणि पुन्हा 'जीवघेणे' .. क्या बात है!
या एका ओळीसाठी 'कुर्बान' अशी कविता आहे
जियो!
सुंदर उपमा वापरल्या आहेत पण
सुंदर उपमा वापरल्या आहेत पण घाईघाईनी लिहिल्यासारखी वाटत आहे.
हेच सगळे अजून चांगले लिहिता येइल.
तुझे हात नाग
संपुर्ण काव्यच किंकी* (Kink) भासत आहे.
* मराठी शब्द आठवत नाही.