Skip to main content

तुमची "लाडकी" यमी आज टीव्हीवर

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 12/08/2008 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
बय्राच खरडींना उत्तरं देण्यापेक्षा मी जाहीर करून टाकते की आज झी २४ तास वर माझी मुलाखत दाखवणार आहेत. पण संध्याकाळी ४:३० (भारतीय वेळेनुसार)! शक्य झालं तर रेकॉर्डींग कुठेतरी उपलब्ध करून देईन, त्या वेळी हापिसातून मिपा वाचणाय्रांसाठी! यमी /अदिती / यमी आज्जी वगैरे वगैरे वगैरे! अवांतर (पण महत्त्वाचं): माझं खरं नाव संहिता जोशी आहे (आणखी एक जोसपड मिपावरची)! :-)

वाचने 19521
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

अभिनन्दन !! नक्कि कोणत्या विषयावर आहे ? मजेदार विदुषक

In reply to by विदुषक

अरे हो, ते सांगायचंच राहिलं! 'करीयर इन ऍस्ट्रॉनॉमी' या विषयावर. आणि ही मुलाखत "बोली शहरी", मराठीत आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यमूताई, नक्की रेकॉर्डिंग करून अपलोड कर. आम्हाला इथे पहाता येईल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद! तुम्ही सर्वांनी मला खूपच प्रोत्साहन दिलंत. पन लफ्रा जाला! काल झी ची पुण्यातून मुंबईमधली लिंक फारच नॉयजी होती, त्यामुळे माझी रेकॉर्डेड मुलाखत ऐन वेळी मुंबईला जाईपर्यंत फारच नॉईजी झाली. म्हणून एवढं करूनही तुमची "लाडकी" यमी काल टीव्हीवर दिसलीच नाही :-) माझा आणखी एक ऍस्ट्रॉनॉमर मित्र तिथे त्यांच्या स्टुडिओमधे मुलाखतीसाठी गेला होता ते मात्र प्रसारीत झालं. आणि तेव्हा त्यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आणि पुन्हा जेव्हा खगोलशास्त्रावर कार्यक्रम करतील तेव्हा दाखवतील असं सांगितलं! ठीक आहे, बेटर लक नेक्स टाईम! ("स्किझोफ्रेनिक") यमी / अदिती / संहिता अवांतर: "करीयर इन ऍस्ट्रॉनॉमी' या विषयावर मी पूर्वी लिहिलेला एक लेख इथे पहा.

आमच्या गल्लीतली चिउ एकदा बुगी वुगी मंदी आली व्हती .. त्यानंतर डायरेक्ट टीवी वर दिसणारी आमच्या ओळखीची यमीच ;) जोक्स अपार्ट .. पण सायंकाळी किंवा रात्री पुनःप्रसारण असेल तर विचारुन ठेव नं ! आनंद होईल पहायला :) पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ! आई वडिलांना अभिमान वाटेल तुमच्या !!

थ्यांकू जाहीर केल्याबद्दल!

यमूतै, व्हिडीओ करुन कृपया यूट्यूब वर टाका, आमच्या सारख्यांची सोय होईल... आणि तुमचं अभिनंदन!!! (शुभेच्छुक) भटोबा

अरे वा वा! अभिनंदन यमी आज्जी!! पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D

अभिनंदन! रेकॉर्डींग लोड कर नक्की. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by मनस्वी

तुमचे अभिनंदन, व्हिडिओची लिंक द्यावी ही विनंती ... आम्ही त्या वेळेस घरीच असेन पण बंगरुळ सरकारच्या कॄपेने आमच्याकडे "झी २४ तास" दिसत नाही. असो. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

करीयर इन ऍस्ट्रॉनॉमी ची मुलाखत युट्युबवरुन इथे नक्की टाका.

In reply to by मनस्वी

यमूताई, नक्की रेकॉर्डिंग करून अपलोड कर. आम्हाला इथे पहाता येइल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नमस्कार, मनापासून अभिनंदन. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

वावा..यमे, अभिनंदन! भटोबा म्हणतात तसे रेकॉर्डिंग यु ट्यूब वर टाकले तर आम्हाला (उशिरा का होईना) पाहता येईल. स्वाती

अभिनंदन आज्जी , ;) व्हिडिओची लिंक टाक ईथे ही विनंती ... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वोक्के! टि.व्ही. नसणाय्रांसाठी आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणाय्रांसाठी आणि त्या वेळी हापिसात बसून हाटेलात मिसळ खाणाय्रांसाठी, मला जर रेकॉर्डींग करता आलं तर यूट्यूब वर जरूर टाकेन!

अभिनंदन !! आणी हो आम्ही चायना त बसलोये .. त्या मुळे लाइव्ह नाय बघता येणार, युट्युब वर विडीओ टाकलात तर बघता येइन आम्हाला !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

In reply to by अनिल हटेला

म्हणजे चीनी सरकारला मिपा आक्षेपार्ह वाटत नाही तर! गुड फॉर अस! :-)

नमस्कार, मनःपुर्वक अभिनंदन!! सकाळ्ची पाळी असल्याने नक्की पाहीन अन् उंद्याच्याला परतिक्रीया !!! ऐकावे जनाचे करावे मनाचे!!

आरे मिपा अखिल विश्वाला प्यारे आहे !! ( मराठी समजायला हव ,आणी वाच्ता यायला हव , एवढी माफक पात्रता) आणी मी ह्या लोकाना अभिमानाने ही साइट दाखवतो आणी सान्गतो की , ही माझी मातॄभाषा !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

काय हो यम्मी आज्जी , हे तुम्हाला ७ वर्षांपुर्वी न्हाय का मुलाकात द्येता आली ? आमची करियरची वाट चुकली ना ? आमाला कसं टिवीव यता यनार आता ? अफ्रिकेत असल्याने फकस्त नॅट जिओ,डिस्कव्हरी अन् ऍनिमल प्लॅनेट वर झळकता यिल ... :(( असो विनोद बाजूला ... मला तुनळी (युट्युब) ची लिंक दे.... आनंद झालाय .. आमची १७५ वर्षाची छोटीशी यम्मी आज टिव्हीत दिसनार ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

अभिनंदन. आज मंगळवार म्हणजे नेमकी संध्याकाळी मिटींग :( . युट्युब चीच वाट बघावी लागेल आम्हाला. - सूर्य.

मनःपुर्वक अभिनंदन. युट्युब वर व्हिडीओ नक्की टाका.

यमे, यमे, अगं किती भटकशील? आता काय टि.व्ही. वर चाललियेस? जपून हो... शोभत नाही हे असं मुलीच्या जातीला... :D (ह.घे.) कार्यक्रम बघता येईल की नाही शंकाच आहे... पण पुनःप्रक्षेपण नक्कीच असणार. जरा त्यांना विचारून बघ की? नाही तर तूनळी वर बेष्ट.... बघ जमतंय का... आणि टार्‍याशी सहमत, फक्त ७ वर्षांच्या ऐवजी २०-२२ वर्षे अगोदर का नाही केलास हा प्रोग्राम? बिपिन. (स्वगतः ही यमी नक्की आहे तरी कोण? कोणी यमुताई म्हणतं, कोणी आज्जी म्हणतं, अजून कोणी अदिती, ती स्वतः म्हणते माझं नाव संहिता ... अरे काय प्रकार काय आहे हा? एक व्यक्ति वेगवेगळ्या आयड्या घेऊन वावरते हे तर मोप बघितलंय, पण एकाच आयडीतून इतक्या व्यक्ति वावरतात हे भारी आहे राव!!!) :O :?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ही यमी नक्की आहे तरी कोण? कोणी यमुताई म्हणतं, कोणी आज्जी म्हणतं, अजून कोणी अदिती, ती स्वतः म्हणते माझं नाव संहिता ... अरे काय प्रकार काय आहे हा? एक व्यक्ति वेगवेगळ्या आयड्या घेऊन वावरते हे तर मोप बघितलंय, पण एकाच आयडीतून इतक्या व्यक्ति वावरतात हे भारी आहे राव!! संहिता हे माझं खरं नाव! ते कठीण आणि अद्वैतची बहिण म्हणून हाक मारायला अदिती! आता आई आणि शेजारच्या आजीनी माझं नाव ठेवलं मी स्वतःलाच का नाही नावं ठेवायची, म्हणून इथे यमी! हुश्श्!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हुश्श!!! मी तर वाचूनच दमलो. तुला लिहिताना किती कष्ट पडले असतिल!!! :) बाकी स्वतःला नावं ठेवायची जिंदादिली आवडली, दुर्मिळ आहे ही गोष्ट, जियो. बिपिन.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी स्वतःलाच का नाही नावं ठेवायची, म्हणून इथे यमी!
आन आमी ठुल्याल नावं पाच षष्ठांश काळी ठमी. ;) प्रकाश घाटपांडे

अभिनंदन !!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

यमु आजी :) म्हणजे आता तू ऍस्ट्रोनॉमीमध्ये करिअर गायडन्स पण करतेस? ग्रेट्च आहेस की. शाब्बास !!! बाकी, ते 'तु नळी'चं पहा बुवा जमलं तर. म्हणजे आम्हा गरिबांनाही ही मुलाखत पाहता येईल. अगदी टारझनसारखंच म्हणतो "हे तुम्हाला ७ वर्षांपुर्वी न्हाय का मुलाकात द्येता आली ? आमची करियरची वाट चुकली ना ? " (स्वगतः ह्या यमीनं ७-८ काय किंवा २०-२५ वर्षांपुर्वी जरी हाच कार्यक्रम केला असता तरी शिंच्या तुला रे काय कळतं त्यातलं? साधं दुसरीच्या गणिताच्या पेपरात पास नाही होता येत नीट, चाल्लाय ऍस्ट्रोनॉमीत करीअर करायला...तू आपला बस तुझ्या फेदरवेट सायबाच्या हुकुमाची वाट पहात विदा चिवडत...)

In reply to by धमाल मुलगा

ह्या यमीनं ७-८ काय किंवा २०-२५ वर्षांपुर्वी जरी हाच कार्यक्रम केला असता तरी शिंच्या तुला रे काय कळतं त्यातलं? साधं दुसरीच्या गणिताच्या पेपरात पास नाही होता येत नीट, चाल्लाय ऍस्ट्रोनॉमीत करीअर करायला...तू आपला बस तुझ्या फेदरवेट सायबाच्या हुकुमाची वाट पहात विदा चिवडत... =)) तुला यायचंय का इथे टेलिस्कोप्सवर काम करायला?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुला यायचंय का इथे टेलिस्कोप्सवर काम करायला?
कशाला जागवतेस निद्रीस्त समंधाला ... तो आहे तिथेच बरा आहे ... तिकडे येउन तो काम तर करणार नाहीच, दिवसभर "मिपा" वर पडीक राहिल ... उलट त्याच्या खरडवहीत टाकायला म्हणुन "तुमच्या टेलिस्कोपवर पाय टाकुन बसलेला फोटो " तो "This is How I Work " ह्या टायटल खाली काढेल व आख्ख्या गावात मिरवेल ... ;) ;) ;) त्यापेक्षा मलाच घे, मी एकदम सज्जन आणि सोज्वळ आहे ... :) :) :) [ कोण आहे रे ते दाताड काढुन हासतेय ? ६४ च्या ६४ दात बाहेर काढीन ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

उलट त्याच्या खरडवहीत टाकायला म्हणुन "तुमच्या टेलिस्कोपवर पाय टाकुन बसलेला फोटो " तो "This is How I Work " ह्या टायटल खाली काढेल व आख्ख्या गावात मिरवेल ...
=)) =)) =)) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by छोटा डॉन

तुला यायचंय का इथे टेलिस्कोप्सवर काम करायला? कशाला जागवतेस निद्रीस्त समंधाला ... तो आहे तिथेच बरा आहे ...
डान्या लेकाचा हुशार आहे हां!!! त्याची आन् माझी मतां बराब्बर जुळतां. बाकी, मी तिथे आलो तर तुमच्या त्या टेलिस्कोपचा शिनेमास्कोप व्हायला वेळ नाही लागायचा ;)
तिकडे येउन तो काम तर करणार नाहीच, दिवसभर "मिपा" वर पडीक राहिल ...
आणि उरलेल्या वेळात पाखरं निरखत बसेन. उदा. झाडावर टकटकणारा सुतारपक्षी, एखादा नदीकाठचा खंड्या, घरट्यातल्या पिलांना घास भरवणारी एखादी शिंपीण वगैरे वगैरे. (तो आंद्या हसला बघ खवचटपणे, मी 'पाखरं' म्हणालो की.. हल्ली काही बोलायची सोयच उरली नाहीय्ये.)
"तुमच्या टेलिस्कोपवर पाय टाकुन बसलेला फोटो " तो "This is How I Work " ह्या टायटल खाली काढेल
धन्य आहेस रे बाबा....कुठुन कुठे धावते तुझी कल्पनाशक्ती! ऑप्शनल केस म्हणून दे पाठवून ऑलिंपिकात...लै जोरात धावेल.
त्यापेक्षा मलाच घे, मी एकदम सज्जन आणि सोज्वळ आहे ..
हो हो...त्यालाच घे हो. म्हणजे पुढच्या सहा महिन्यात तुमच्या टेलिस्कोपला हे महाराज फोर-स्ट्रोक ब्लॉक पिस्टन जोडून "फ्युएल इफिशिएंट टेलिस्कोप" किंवा "टेलिस्कोपिक फ्युएल इफिशियन्सी" असल्या अगम्य प्रकारावर 'प्रेझेंटेशन देत फिरतील.
६४ च्या ६४ दात बाहेर काढीन
=)) देवाऽऽऽऽ आत्ता मला कळलं, मी गणितात नापास का व्हायचो...एकाच बाजुची मोजणी केल्यावर उत्तर निम्मंच येणार नाही का? तात्पर्यः मला बोलावुन नसते झेंगट ओढवुन घेऊ नये. भारताची सॉफ्टवेअर क्षेत्रात आम्ही करत असलेली नाचक्की पुरेशी आहे. अवांतरः विषयाला सोडून बरंच अवांतर झालं, नाही? क्षमस्व! (उर्वरीत खेचाखेची खरडीतून खेळावी झालं.)

मज्जा आहे बॉ एका मुलीची.. अभिनंदन ग, (लिन्क ची वाट पहाणारी) फुलवा

अभिनंदन!! मी हाफिसात असेन पुनःप्रक्षेपण आहे का? नसल्यावा दुवा दे आणि आमचा दुवा मिळव :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

त्यापेक्षा मलाच घे, मी एकदम सज्जन आणि सोज्वळ आहे .. [ कोण आहे रे ते दाताड काढुन हासतेय ? ६४ च्या ६४ दात बाहेर काढीन ] लै भारी !!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अभिनंदन !!!!! कालचा दिवस अभिनव चा, आजचा दिवस यमी चा, ऊद्या कोण नंबर लावतोय?

मंदार वासी सॉलीड चमकत आहेत झी टि.व्ही. वर. अभिनंदन आदिती....... :) =D> --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

यमुताई आपली अशीच प्रगती होत राहो व आम्हाला नेहमी अशा वृत्तांताचे वृत्त समजत राहो अशी प्रामाणिक इच्छा आमच्या घरी दुरदर्शन नामक झेंगाट नसल्यामुळे आम्ही सदर कार्यक्रम पाहु शकणार नाही तरी चित्रफित उपलब्ध केल्यास जरुर आस्वाद घेवु व प्रतिक्रिया कळवु (शुभेच्छुक) नाना

.

In reply to by टारझन

हा हा हा अरे (खविसा) आता टारझना असे नाव बदलण्यापेक्षा नवीन आय डी करुन लेख लिहिले असते तर आज तु पण लाडका नसता का झाला‍? अहो रुपम अहो ध्वनी विसरलास काय तसेच आहे . चालायचेच आभाळातले जमीनी वर आलेले .... तारे जमी पर रे ... जावु दे चालु दे तुझे ..एएओओओओएएएओओओ

In reply to by टारझन

हे लोक तुझी मुलाखत पहायला ऊत्सुक आहेत का तुला पहायला ? जगदंब जगदंब ... हे बघ आता लोक (पुरूष) माकडं पहाणार का मुलगी? :p आणि बायका पण मुली-बायकांकडेच जास्त पहातात, माकडांकडे नाही!

हे लोक तुझी मुलाखत पहायला ऊत्सुक आहेत का तुला पहायला ? जगदंब जगदंब ... मी ईवढ्या वेळा डिस्कव्हरी वर दिसलो .. मी पण एक धागा टाकला असंता .. पण टारझनाला पहायला कोण ऊत्सुक? जंगलातल्या माकडांच्या (संदर्भ: जंगलकथा) प्रतिक्रियांवर समाधान.. आणि धागा रिसेंट लिस्ट मधे दिसावा म्हणून दर पाच तासाला एक नवा आयडी ऊघडून आपणच प्रतिक्रिया लिहायची ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

हा हा हा अरे (खविसा) आता टारझना असे नाव बदलण्यापेक्षा नवीन आय डी करुन लेख लिहिले असते तर आज तु पण लाडका नसता का झाला‍? अहो रुपम अहो ध्वनी विसरलास काय तसेच आहे . चालायचेच आभाळातले जमीनी वर आलेले .... तारे जमी पर रे ... जावु दे चालु दे तुझे ..एएओओओओएएएओओओ

तू नळीवर विडिओ टाकणार का?

In reply to by प्रियाली

मला एका मित्राकडे TV tuner card असल्याचं कळलं आहे. त्याच्याकडे झी २४ तास लागत असेल तर नक्कीच टाकेन!

अभिनंदन यमु ताई............... :) जमल तर रेकोरर्डिंग करून ठेव म्हणजे मग आम्हाला बघता येईल......

यमे, हार्दिक अभिनंदन! शक्य असेल तर मुलाखत यु ट्युबवर अपलोड कर! - टिंग्या

यमुताई, ह्या टि.व्ही. मुलाखतीबद्दल अभिनंदन. युटयुब ची लिंक नक्की द्या. पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिज्ञ.

"बोली शहरी", मराठीत आहे.
मंग त्येलाच " आमची माती आमची मान्स" मधी कनवर्ट करु कि. शेवटी आपन आभाळातुन मातीतच पडनार न्हवं? प्रकाश घाटपांडे

अर्रे वा! यमे, तुझं अभिनंदन हो! :)

या वेळेस आम्ही कचेरीत! असो इथे काही चिकटवले तर पाहता येईलच आपण आता दूरदर्शित होणार ! अभिनंदन

अभिनंदन, यमुताई(का यमूआज्जी म्हणू!) माझे 'करियर' अजून चालू व्हायचे आहे. त्यामुळे मला हा कार्यक्रम पाहायला नक्की आवडेल, पण आमच्याकडे ही वाहिनी दिसत नाही.(अरेरे!) त्यामुळे, कृपया व्हिडिओ लिंक द्यावी, ही विनंती. -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.

अभिनंदन! आपली मुलाखत निश्चितच जालावर दाखवण्याची व्यवस्था करा. अवांतरः घरात सध्या झी-मराठी ऑनलाईन दिसतो म्हणून ही बातमी वाचताच झी-२४ आणि झी-मराठीतील फरक न समजून तो लावला आणि "या सुखानो या" का काहीतरी दिसले. मुकाट्याने बंद केले.

झाला का गं प्रोग्रॅम? बिपिन.

मला पण दिसलं नाही ... ऐन वेळेला इथल्या होस्टेलमधला टि.व्ही. बोंबलला! तेव्हा आता पाहूया काय करता येतंय ते! आणि ज्याच्याकडे TV tuner card आहे त्याच्याकडे झी २४ तास दिसत नाही!

यमुताई मुलाखतीसाठी शुभेच्छा, एका दुसर्‍या संकेतस्थळावर माझं नाव "अंतरिक्ष" होतं, असो ऍस्ट्रॉनॉमी हा आमचा अत्यंत आवडीचा व जिव्हाळ्याचा विषय. मानस

रिपीट टेलिकास्ट केव्हा आहे?

आपले अभिनंदन, मुलाखतीसाठी व आपण निराळ्या विषयात करियर केल्याबद्दल ! रेवती

जमल्यास यूट्यूबवर तुझी मुलाखत नक्की चढव गं, बघायला खूप आवडेल.

झी२४ आणि इतर अनेक संस्थळावर कार्यक्रमाची माहिती न मिळाल्याने मी जालावर शोधून एका संहिता जोशी नामक डॉक्टोरल विद्यार्थिनीची खालील माहिती मिळवलेली आहे. हीच आपली 'यमी' असल्यास तिच्या खगोलशास्त्रीय कामाची माहिती मिळावी म्हणून हे दुवे देत आहे. बहुतेक हे अदितीचे मुंबईतील खगोलमंडळ असावे. आणि ही जॉड्रेल ऑब्झर्वेटरी च्या स्थळावरील अदितीची माहिती. अदिती: हा तुझा फोटो आहे का? नसल्यास संपादकांनी ही लिंक काढून टाकावी ही विनंती. - बहुगुणी