✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(आपण शेवटचा घोट कधी घेतला?)

श
श्रीरंग_जोशी यांनी
Mon, 07/02/2012 - 00:51  ·  लेख
लेख
आपण शेवटचा घोट कधी घेतला ? माझ्याबद्दल सांगायचे तर, मी मुळात पितंच नाही. पण एका मराठी वर्तमानपत्राच्या प्रचारामुळे (दारू म्हणजे वाइन नाही) दोन चार वर्षातून एखादे वेळेस कुणा हुच्चभ्रू लोकांकडे जेवायला गेलो तर ष्टायील म्हणून इवलीशी वाइन चाखत राहतो. जेवणाच्या अगोदर सुरू करूनही ती शेवटपर्यंत संपतच नाही मुळी. चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव एखादा आयुर्वेदिक काढा जसे दाडीमावलेह किंवा द्राक्षासवासारखी लागते. त्यांच हुच्च्भ्रू लोकांस मी जेवायला आमंत्रित केले असेल तर वाइन ऐवजी त्यांचे स्वागत फळांच्या रसाने किंवा शीतपेयाने करतो. महाविद्यालयीन काळात व नंतरही आज शेवटची म्हणून पिणारे अनेक जवळचे मित्र आहेत. त्यातील बहुतेक सर्व थोड्या थोड्या काळाने पुन्हा पुन्हा शेवटचा घोट घेत असतात. काही मोठी माणसे शेवटचा घोट घेत घेतच काळाच्या पडद्याआड गेल्याचे ऐकले आहे. तर मंडळी, "आपण शेवटचा घोट कधी घेतला?" याबद्दल मिपाकरांचे अनुभव वाचायला आवडेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14665 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

आयला..

मुक्त विहारि
Mon, 07/02/2012 - 01:05 नवीन
सगळीच मजा आहे राव.. धागा टाकला रे टाकला , की "उपधागे" चालू होतात..
  • Log in or register to post comments

आमची आवडती रक्त वारूणी

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/02/2012 - 01:10 नवीन
आमची आवडती रक्त वारूणी (सामान्यतः ही उच्चभ्रूंकडे जेवणाबरोबर असते), त्याचे न्यूट्रीशन इथे पहा. श्वेत वारूणीचे इथे पहा. आणि संत्र्याच्या रसाचे इथे पहा. त्याच संस्थळावर कोक, पेप्सीमधून काहीही पोषण (कॅलर्‍या वगळता) होत नाही असं लिहीलेलं आहे. (कॅफीन फ्री, डाएट ड्रिंकांतून फक्त कार्सिनोजेन्स मिळतात. कॅफीन नसल्यामुळे साधी झोप किंवा मोठा हँगोव्हरही उडत नाहीत.) कॅलरींचे प्रमाण संत्र्याच्या रसात अधिक आहे, रक्त आणि श्वेत वारूणीच्या प्रमाणाच्या जवळजवळ दुप्पट. संत्रारसातून अ आणि क जीवनसत्त्वं मिळतात जे वारूणीतून अजिबात मिळत नाही. वारूणींमधेही कॅल्सियम आणि लोह मिळतं (रक्त वारूणीतून किंचित जास्त). थोडक्यात काही जीवनसत्त्व मिळतात या बदल्यात संत्रारस जाडा बनवतो. थोडक्यात माहिती मिळवूनही आम्ही आमच्या रक्तवारूणीत आनंदी आहोत. आमच्याकडे अज्ञानात (पक्षी: माहितीच्या अभावात) आनंद नाही.
  • Log in or register to post comments

उपयुक्त माहिती

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 01:20 नवीन
अरे वा प्रथमच याबाबत वाचतोय, पूर्वी कधी गरजच पडली नाही म्हणा. बरेच अमेरिकानो लोक तब्येतीने खातात पितात अन नंतर लठ्ठपणा आटोक्यात ठेवण्यासाठी दिवसातून केव्हाही जॉगिंग करत सुटतात ;-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्यासारखे काही दुर्दैवी जीव

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/02/2012 - 01:24 नवीन
आमच्यासारखे काही दुर्दैवी जीव हवा खाऊन बसले तरीही जाडे होतात. नंतर हा माज उतरवण्यासाठी चालू पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आमच्याहीसारखे काही दुर्दैवी जीव

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 01:38 नवीन
अन आमच्याहीसारखे काही दुर्दैवी जीव - बकासुरासारखे खाऊन व कुंभकर्णासारखे निद्रादेवीची आराधना करूनही अंगात भरत नव्हते. अखेर अमेरिकन हवेचाच काय तो गुण लागला अन आज जरा बरी अवस्था आहे ;-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्च्या गावाकड याला म्हनत्यात

jaypal
Mon, 07/02/2012 - 10:25 नवीन
"खाद बोकडाची अन कळा माकडाची." ;-) आता धाग्याबद्दल Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

लई भारी!!

आचारी
Mon, 07/02/2012 - 12:29 नवीन
लई भारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

चुकीची माहीती...

नेत्रेश
Tue, 07/03/2012 - 20:35 नवीन
> कॅलरींचे प्रमाण संत्र्याच्या रसात अधिक आहे, रक्त आणि श्वेत वारूणीच्या प्रमाणाच्या जवळजवळ दुप्पट तुम्हीच दीलेल्या दुव्यानुसार रक्त आणि श्वेत वारुणीतील कॅलरी संत्र्याच्या रसापेक्षा दुप्पट आहेत. 5 Fl Oz संत्र्याच्या रसात फक्त ७० कॅलरीज आहेत. पण तेवढ्याच रक्त आणि श्वेत वारुणीत १२५ कॅलरीज आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मुद्दा फॅट्स चा आहे...

श्रीरंग_जोशी
Tue, 07/03/2012 - 21:03 नवीन
लठ्ठपणा वाढू नये म्हणून प्रत्येक गोष्ट नॉन फॅट किंवा लो फॅट घ्यावी लागते आजकाल. मग ते दही असो वा दूध. तसेच लो कॅलरी स्वीटनर, डायट कोक वगैरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

अजुन काही उपविषय : किती वेळा

शिल्पा ब
Mon, 07/02/2012 - 01:42 नवीन
अजुन काही उपविषय : किती वेळा दारु सोडली? एका वेळेस किती ग्लास दारु घेता? कोणती दारु किती प्रमाणात घेता? कोणाबरोबर का एकटेच? लोकांना घरी बोलावल्यावर जेवणात वाईन नाही दिली तर वाईट इंप्रेशन पडते का? कारण काय? हुच्चभ्रु लोकांनी दारु पिणे अन सामान्यांनी दारु पिणे यात नेमका फरक काय? झालंच तर : सुरुवात ३० मीली. ने का एकदम पटीयाला ?
  • Log in or register to post comments

(No subject)

जेनी...
Mon, 07/02/2012 - 10:29 नवीन
:D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हे ही चालतील का?

कुंदन
Mon, 07/02/2012 - 19:20 नवीन
>>>किती वेळा दारु सोडली? एका वेळेस किती ग्लास दारु घेता? किती वेळा जिलबी खाल्ली?? एका वेळेस किती जिलबी खाउ शकता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हे पण बघा बरं ....

सूड
Wed, 07/04/2012 - 07:57 नवीन
'एकच जिलबी किती वेळा खाऊ शकता ?'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

वेळ आल्यावर कळेलच...

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 01:42 नवीन
अजून जीवंत आहे तेंव्हा 'शेवटच्या घोटाबद्दल' उगाच खोटारडेपणे कसे लिहू? मुलाला सांगून ठेवीन, माझ्या मृत्यू पश्चात, वेळ नोंदवून ठेव आणि हा धागा तेंव्हा खोल गेला असेल तर वर उचकटून त्यावर 'ती' वेळ लिहून ठेव.
  • Log in or register to post comments

आजवरचा शेवटचा लिहू शकता

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 01:48 नवीन
सत्यमेव जयते मध्ये काही लोकांनी १० वर्षे किंवा २१ वर्षांपूर्वी आजवरचा शेवटचा घोट घेतल्याचे सांगितले. हेच प्रमाण महिने, आठवडे किंवा दिवस या प्रमाणातही सांगता येईलच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सत्य, अर्धसत्य आणि पूर्ण खोटारडेपणा..

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 10:34 नवीन
'सत्यमेव जयते' मध्ये सर्वजणं 'सत्य'च बोलतात असा भाबडा विचार मी करत नाही. जरी (आज) बोलत असले तरी उद्या किंवा भविष्यात तीच माणसे काय करतील ह्यावर कोणी नियंत्रण ठेवू शकत नाही. भविष्यात त्यातील एखादा कोणी प्यायलाच तर तो काय पुन्हा वाहिनीवर येऊन सांगणार आहे की, 'मी मागे शेवटचा घोट म्हणालो होतो पण आज एक घोट दारू घेतली आणि आता हा घोट शेवटचा मानावा'. एखादा असेलही सत्यवचनी, मनाने खंबीर जो शेवटपर्यंत त्याचा शब्द पाळेल. पण, मी तेवढा खंबीर नाही. त्यामुळे माझा खोटारडेपणा लवकरच उघडकीस येईल. मग कशाला खोटारडेपणा करा? नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कैच्याकै

आनंदी गोपाळ
Mon, 07/02/2012 - 01:50 नवीन
कावळ्याच्या रुपाने 'शिवण्या'साठी वसूल केलेली क्वार्टर? तिथे मस्णात 'वाहिलेली' चिंटी? यांचे टाय्मिंग लिव्ले पाहिजे ब्वा! आन पुनर्जन्म झाला तं? आदिवासी (चुकलो! वनवासी) लोकांत बारशालाच मोहाची दारू ओठाला लाव्तात म्हणे ;) (पुढील जन्माच्या टायमिंगाच्या चिंतेत कर्मविपाक आनंदी) गोपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

:-)

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 02:24 नवीन
धरणे सोडणे अढळ सत्य हे, नियम हा अपेयपानाचा... आमची वाहिनी सह्याद्री वाहिनी वरील जन्म-मृत्यू नोंदणीकरणाबद्दलच्या जनहितार्थ जाहिरातीवरून साभार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

थोडा घोळ झाला ...

अर्धवटराव
Tue, 07/03/2012 - 04:38 नवीन
>>कावळ्याच्या रुपाने 'शिवण्या'साठी वसूल केलेली क्वार्टर? -- कावळा शिवण्याशी क्वार्टरचा काय संबंध म्हणुन खुप विचार केला आणि मग ५ मि. हसत फुटलो =)))))) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

इस्कटून सांगा

आनंदी गोपाळ
गुरुवार, 07/05/2012 - 21:47 नवीन
जोक समजवून सांगा (सरदार) गोपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

कावळा शिवण्याचे किती अर्थ तुम्हाला माहित आहेत?

अर्धवटराव
गुरुवार, 07/05/2012 - 22:46 नवीन
त्यावरुन जोक कळण्याची टक्केवारी समजेल. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

'प्रकाश' पडला! (धप्प्कन

आनंदी गोपाळ
Fri, 07/06/2012 - 12:16 नवीन
'प्रकाश' पडला! (धप्प्कन आवाजही आला पडण्याचा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

चालु द्या.. दारु पिणारे

मराठमोळा
Mon, 07/02/2012 - 06:49 नवीन
चालु द्या.. दारु पिणारे पिण्याच समर्थन करत राहतील आणि फायदे सांगतील तर न पिणारे त्या विरुद्ध.. थोडक्यात काय मानवी स्वभाव आहे, आपण जे करतो ते बरोबर असते हे दाखवण्याचे. विज्ञानाचे म्हणाल तर ते पिणार्‍यांचेही नाही आणि न पिणार्‍यांचेही, कारण मनसोक्त पिणारे भरपूर निरोगी आयुष्य जगणारे पाहिलेत आणी न पिणारे अकाली जाणारे देखील आनी व्हाईस वर्सा. प्रश्नाचं म्हणाल तर (नाना स्टाईल) वैयक्तीक प्रश्न. पास. (/नाना स्टाईल) बाकी आमची सही सगळं काही सांगते. :)
  • Log in or register to post comments

दारु पिणारे पिण्याच समर्थन

sagarpdy
Mon, 07/02/2012 - 09:54 नवीन
दारु पिणारे पिण्याच समर्थन करत राहतील आणि फायदे सांगतील तर न पिणारे त्या विरुद्ध.. थोडक्यात काय मानवी स्वभाव आहे, आपण जे करतो ते बरोबर असते हे दाखवण्याचे. विज्ञानाचे म्हणाल तर ते पिणार्‍यांचेही नाही आणि न पिणार्‍यांचेही, कारण मनसोक्त पिणारे भरपूर निरोगी आयुष्य जगणारे पाहिलेत आणी न पिणारे अकाली जाणारे देखील आनी व्हाईस वर्सा.
हेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

@आपण शेवटचा घोट कधी घेतला ?

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/02/2012 - 09:32 नवीन
@आपण शेवटचा घोट कधी घेतला ? >>> पहिल्याच्या नंतर ;-)
  • Log in or register to post comments

मजेदार उत्तर...

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 09:43 नवीन
बादवे तुमच्या विश्वात पिणे - धरणे - सोडणे हे सर्व चालत असते का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@पिणे - धरणे - सोडणे हे सर्व

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/02/2012 - 15:01 नवीन
@पिणे - धरणे - सोडणे हे सर्व चालत असते का हो? >>> आमच्या विश्वातं(ही) असू शकतं की... नाकारलय कोणी..? मी दिलेलं (पहिलं) उत्तर सार्वत्रिक,आणी व्यावहारिक आहे... फक्त ते कळ्ळं पाहिजे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

काय रंगा काका .. टॉपिक

जेनी...
Mon, 07/02/2012 - 09:46 नवीन
काय रंगा काका .. टॉपिक नावामध्ये मेन्शनलं का नै? कशाचा घोट ते? आमी टॉपिकाची नावं वाचुन आत घुसणारी मंडळी ...... नाव जरा सेन्सेशनल पायजेल व्हतं .....;)
  • Log in or register to post comments

लहान मुलांसाठी नाय...

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 09:53 नवीन
बाळ हा धागा लहान मुलांसाठी नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

/(

जेनी...
Mon, 07/02/2012 - 09:58 नवीन
/( \(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

"कशाचा घोट ते?"..

कुंदन
Mon, 07/02/2012 - 11:22 नवीन
"कशाचा घोट ते?".. म्हणजे तुला कळु नये ? दारु चा च असणार ना , जिलबीचा थोडीच असणारे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

रंगा काका ..

चिंतामणी
Mon, 07/02/2012 - 11:57 नवीन
:o Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आज

चिरोटा
Mon, 07/02/2012 - 10:25 नवीन
आजपासून विडंबन करणार्‍यांच्या गळ्याचा घोट घ्यायचे ठरवलेय. खूंदन
  • Log in or register to post comments

आता हा धागा ..

चौकटराजा
Mon, 07/02/2012 - 10:30 नवीन
आता हा धागा सेक्स च्या धाग्याला मागे टाकणार असे ग्रह सांगतात .
  • Log in or register to post comments

वाटत नाही...

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 10:49 नवीन
आता हा धागा सेक्स च्या धाग्याला मागे टाकणार असे ग्रह सांगतात . असे वाटत नाही. कितीही ओढली तरी, 'पालीची मगर करता येत नाही.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बेडकी आणि बैलाची उपमा माहिती

बॅटमॅन
Mon, 07/02/2012 - 10:53 नवीन
बेडकी आणि बैलाची उपमा माहिती होती. पण ही उपमा जास्त सयुक्तिक आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हा:..हा:..

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 11:14 नवीन
हा:..हा:.... हि उपमा आमच्या तरूण वयात, एखाद्या यशस्वी 'एकांकिके'चे पडेल 'नाटक' कोणी बनविले की वापरायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आमच्या मित्रांना सांगण्यासाठी

बॅटमॅन
Mon, 07/02/2012 - 14:52 नवीन
आमच्या मित्रांना सांगण्यासाठी उपयुक्त आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

बेक्कार हसतोय पेठकर काकांचा

निनाद मुक्काम …
Wed, 07/04/2012 - 12:03 नवीन
बेक्कार हसतोय पेठकर काकांचा प्रतिसाद वाचून ह्या धाग्यावर आल्याचे सार्थक झाले. पालीची मगर जबरा शेवटचा घोट म्हणत असाल तर इटली विरुद्ध हरलो तेव्हा गम मे रम ह्या उक्तीनुसार घेतला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

कितीही ओढली तरी, 'पालीची मगर

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/02/2012 - 15:05 नवीन
कितीही ओढली तरी, 'पालीची मगर करता येत नाही.' >>>Image removed. बाप रे...! पेठकर काका,मेलो...मेलो... आय आय आय आय... बाजार उठवला पार...बाजार! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

रंगराव हा धागा स्वतःच ताणुन

पक पक पक
Mon, 07/02/2012 - 22:49 नवीन
रंगराव हा धागा स्वतःच ताणुन ताणुन मोठा करणार हे नक्की ;) .....पालीची मगरच काय डायनासोर करायची ताकत आहे त्यांच्यात :crazy: लगे रहो रंगोबा :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काय राव हे?

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 22:58 नवीन
काय राव उगाच गरिबाची खेचताय? उगा एक माशी मारायची ऐपत नाही आमची अन गोष्ट करता मगरीची ;-) ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

रंगा काका आगे बढो हम तुमारे

जेनी...
Tue, 07/03/2012 - 01:15 नवीन
रंगा काका आगे बढो हम तुमारे साथेय ;) पालिकी मगर मगर्का डायनासूर करेंगे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

असं नाय वाटत, तितकासा धागा

मोहनराव
Mon, 07/02/2012 - 13:48 नवीन
असं नाय वाटत, तितकासा धागा सेक्सी नाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

काल परवाच एक फॉवर्डेड मेल वाचला

अमृत
Mon, 07/02/2012 - 10:39 नवीन
त्यातील 'चिअर्स' या अमेरिकन मालिकेतील क्लिफ क्लेविन या पात्राच्या तोंडचा एक संवाद. " हे बघ नॉर्म त्याचं असं आहे की म्हशींचा कळप हा त्या कळपातील सर्वात हळू म्हशीच्या वेगाने पुढे सरकतो. आणि जेव्हा या कळपावर शिकारी धावा बोलतात तेव्हा हीच सर्वात हळू म्हैस शिकार बनते. या नैसर्गिक नियमामुळे असं होतं की कळपाची सर्वसाधारण गती व शारिरीक क्षमता सुधारण्यास मदत होत राहाते. तसच मानवी मेंदू हा त्यातील सर्वात हळू पेशींच्या क्षमतेप्रमाणे कार्य करतो. आपल्याला माहिती अहेच की अल्कोहोलचे अतिसेवन केले तर मेंदुच्या पेशी नाश पावतात. पण अर्थातच सर्वात हळू/अकर्यक्षम पेशी प्रथम मारल्या जातात. त्यामूळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. हेच कारण आहे की २-३ बियर प्यायल्यावर आपल्याला ताजेतवानं वाटतं :-) अमृत
  • Log in or register to post comments

आणि जेव्हा या कळपावर शिकारी

बॅटमॅन
गुरुवार, 07/05/2012 - 12:29 नवीन
आणि जेव्हा या कळपावर शिकारी धावा बोलतात...
(मराठीचा धावा पाहून) डोळे पाणावले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

हरर्र् रररररर म्हाद्येव!

आनंदी गोपाळ
गुरुवार, 07/05/2012 - 21:50 नवीन
हरर्र् रररररर म्हाद्येव! बोला धावा. सहमत! आनं(दीऽन दीऽन) गोपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

म्हाद्येवाला बोलावतायसा वरडून

बॅटमॅन
Fri, 07/06/2012 - 12:58 नवीन
म्हाद्येवाला बोलावतायसा वरडून जनू ;) बोला धावा !!! बुधिया की जय! (कुंतलत्वग्विच्छेदनतज्ञ) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

पाय लागू

रमताराम
Fri, 07/06/2012 - 16:30 नवीन
कुंतलत्वग्विच्छेदनतज्ञ _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बाल की खाल..

आनंदी गोपाळ
Sun, 07/08/2012 - 01:14 नवीन
अन पा य ला गू कै तरि चुक्तंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा