Skip to main content

(आपण शेवटचा घोट कधी घेतला?)

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 02/07/2012 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपण शेवटचा घोट कधी घेतला ? माझ्याबद्दल सांगायचे तर, मी मुळात पितंच नाही. पण एका मराठी वर्तमानपत्राच्या प्रचारामुळे (दारू म्हणजे वाइन नाही) दोन चार वर्षातून एखादे वेळेस कुणा हुच्चभ्रू लोकांकडे जेवायला गेलो तर ष्टायील म्हणून इवलीशी वाइन चाखत राहतो. जेवणाच्या अगोदर सुरू करूनही ती शेवटपर्यंत संपतच नाही मुळी. चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव एखादा आयुर्वेदिक काढा जसे दाडीमावलेह किंवा द्राक्षासवासारखी लागते. त्यांच हुच्च्भ्रू लोकांस मी जेवायला आमंत्रित केले असेल तर वाइन ऐवजी त्यांचे स्वागत फळांच्या रसाने किंवा शीतपेयाने करतो. महाविद्यालयीन काळात व नंतरही आज शेवटची म्हणून पिणारे अनेक जवळचे मित्र आहेत. त्यातील बहुतेक सर्व थोड्या थोड्या काळाने पुन्हा पुन्हा शेवटचा घोट घेत असतात. काही मोठी माणसे शेवटचा घोट घेत घेतच काळाच्या पडद्याआड गेल्याचे ऐकले आहे. तर मंडळी, "आपण शेवटचा घोट कधी घेतला?" याबद्दल मिपाकरांचे अनुभव वाचायला आवडेल.

वाचने 14704
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by मराठे

आपण तर मिचिगन मध्ये राहता न. हापिसात बसून चहा, किंवा कॉफी गेलाबाजार एखादे ज्युस पित असणार ... ;-)

In reply to by गणपा

मी गेल्या वेळी जेव्हा वाचली होती तेव्हा ती इंग्रजी मध्ये होती. आज प्रथमच मराठीत वाचायला मिळाली. धन्यवाद!!

शेवटचा घोट घ्यायला अवकाश आहे अजून.... अभी तो रात जवाँ है प्यारे, आख़री जाम की बात क्यूं करें साथ में हो वो कमसिन तो, बुढापे की बात क्यूं करे? -ररा पुणेकरी

आताशी सुरवात झालिया आणि तुम्ही शेवटच्या घोताचा विचरतय. शेवटचा घोट शेवटीच घेणार ( कवळ्या बरोबर )