✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(आपण शेवटचा घोट कधी घेतला?)

श
श्रीरंग_जोशी यांनी
Mon, 07/02/2012 - 00:51  ·  लेख
लेख
आपण शेवटचा घोट कधी घेतला ? माझ्याबद्दल सांगायचे तर, मी मुळात पितंच नाही. पण एका मराठी वर्तमानपत्राच्या प्रचारामुळे (दारू म्हणजे वाइन नाही) दोन चार वर्षातून एखादे वेळेस कुणा हुच्चभ्रू लोकांकडे जेवायला गेलो तर ष्टायील म्हणून इवलीशी वाइन चाखत राहतो. जेवणाच्या अगोदर सुरू करूनही ती शेवटपर्यंत संपतच नाही मुळी. चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव एखादा आयुर्वेदिक काढा जसे दाडीमावलेह किंवा द्राक्षासवासारखी लागते. त्यांच हुच्च्भ्रू लोकांस मी जेवायला आमंत्रित केले असेल तर वाइन ऐवजी त्यांचे स्वागत फळांच्या रसाने किंवा शीतपेयाने करतो. महाविद्यालयीन काळात व नंतरही आज शेवटची म्हणून पिणारे अनेक जवळचे मित्र आहेत. त्यातील बहुतेक सर्व थोड्या थोड्या काळाने पुन्हा पुन्हा शेवटचा घोट घेत असतात. काही मोठी माणसे शेवटचा घोट घेत घेतच काळाच्या पडद्याआड गेल्याचे ऐकले आहे. तर मंडळी, "आपण शेवटचा घोट कधी घेतला?" याबद्दल मिपाकरांचे अनुभव वाचायला आवडेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14665 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

मला वाटले शेवटचा घोट म्हण्जे

डावखुरा
Mon, 07/02/2012 - 10:46 नवीन
मला वाटले शेवटचा घोट म्हण्जे तो तुळशी पत्रासोबतचा की काय..म्हणुन न्हटलं शेवटचा घोट घेतलेल्या कोणकोणत्या भुतांच्या प्रतिक्रिया आल्यात ते तरि ढुंकुन पाहुन यावे म्हणुन धागा उघडल्या गेला.. ;)
  • Log in or register to post comments

अच्रत, बव्लत

सातबारा
Mon, 07/02/2012 - 11:46 नवीन
उद्या विचाराल व्हर्जिनिटी (शेवटी एकदाची) कधी गेली. तुझ्या जिभेला काही हाड? -३.१४
  • Log in or register to post comments

>>(शेवटी एकदाची) म्हणजे अशी

सूड
Mon, 07/02/2012 - 12:21 नवीन
>>(शेवटी एकदाची) म्हणजे अशी किती वेळा जाते म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

नक्की माहीती नाही ....

सातबारा
Mon, 07/02/2012 - 13:06 नवीन
अशी किती वेळा जाते या बद्दल माहीती नाही अथवा तसा काही विदाही माझ्याकडे नाही. पण काहींची जाता जात नाही, त्यांच्या दृष्टीने गेली (शेवटी एकदाची , हुश्श), असे वाचावे. - - - (प्रतिसादाच्या विडंबनाचा प्रयत्न हुकला काय ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

म्हणजे अशी किती वेळा जाते म्हणे ?

सूर्यपुत्र
Mon, 07/02/2012 - 19:16 नवीन
जेव्हढ्या वेळा ऑपरेशन करु तेवढ्यांदा... ;) सूडराव, गुगलून पहा.. :P -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव

अविनाशकुलकर्णी
Mon, 07/02/2012 - 12:09 नवीन
चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव एखादा आयुर्वेदिक काढा जसे दाडीमावलेह किंवा द्राक्षासवासारखी लागते. ==================================== Image removed.
  • Log in or register to post comments

याच साठी...

श्रीरंग_जोशी
Tue, 07/03/2012 - 21:06 नवीन
याच साठी टाकले होते हे वाक्य :hat:. यन्जॉय... :beer:.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

चवीचे म्हणाल तर मला वाइनची चव

अविनाशकुलकर्णी
Mon, 07/02/2012 - 12:10 नवीन
.
  • Log in or register to post comments

दारु प्रत्यक्षात सोडणारे

गवि
Mon, 07/02/2012 - 14:07 नवीन
दारु प्रत्यक्षात सोडणारे किंवा त्या दिशेने वारंवार प्रयत्न करणारेच "शेवटच्या" घोटाबद्दल सांगू शकतील. कारण अशा लोकांच्याच खोलवर लक्षात असतात हे दारुशी निगडीत दिवस अन तारखा.. ज्याला सोडण्याची खरंच गरज आहे, अर्थात जो अल्कोहोलिक झालेला आहे त्याला ती सोडण्याची इच्छा दोन एपिसोड्सच्या मधे तीव्रतेने होत असते पण सोडता येत नाही. हे अल्कोहोलिक व्यक्तीचं मुख्य लक्षण आहे. दारु सोडावी अशी अधूनमधून उपटणारी इच्छा ज्याला अजिबात होत नाही, दारु सोडण्याचा ज्याचा लाँग किंवा शॉर्ट टर्म प्लॅन नाही तो अद्याप दारुड्या झालेला नाही असं निर्धोकपणे समजावं. अशा व्यक्तींना आपण शेवटची कधी प्यायली तो दिवस आणि पुन्हा कधी पिणार याची तारीख या दोन्ही आवर्जून लक्षात राहात नाहीत. मी त्यातलाच एक. अर्थातच दारु ही चांगली सवय नव्हे. ती आनंददायक गोष्ट आहे, अ‍ॅट इट्स ओन कॉस्ट. ते निसरड्या रस्त्यावर धावणं आहे असंही म्हणता येईल.. काहींच्या पायात चांगल्या ग्रिपचे शूज असतात तर काहींच्या पायात स्लीपर्स.. एकदा मद्य प्यायला लागलेला मनुष्य मद्यपीच. वीस वर्षापूर्वी दारु सोडलेला मनुष्य वीस वर्ष "व्यसनमुक्त"असतो. निर्व्यसनी नाही. त्याने दारु तब्बल वीस वर्षं टाळलेली असते...
  • Log in or register to post comments

>>>>दारु सोडावी अशी अधूनमधून

प्यारे१
Mon, 07/02/2012 - 14:18 नवीन
>>>>दारु सोडावी अशी अधूनमधून उपटणारी इच्छा ज्याला अजिबात होत नाही, दारु सोडण्याचा ज्याचा लाँग किंवा शॉर्ट टर्म प्लॅन नाही तो अद्याप दारुड्या झालेला नाही असं निर्धोकपणे समजावं. अशा व्यक्तींना आपण शेवटची कधी प्यायली तो दिवस आणि पुन्हा कधी पिणार याची तारीख या दोन्ही आवर्जून लक्षात राहात नाहीत. मी त्यातलाच एक.<<< <श्रामो मोड >ह्या शेवटच्या वाक्यापर्यंत बरोबर वाटत होतं. शेवटचं वाक्य वाचल्यावर उगाचच समर्थन असावं का अशी शंका मनी दाटली. अर्थात म्हणायचं काहीच नाही पण समर्थन करण्याचं देखील काही वाटलं नाही <श्रामो मोड > ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हॅ हॅ..समर्थनाविषयी तुम्हाला

गवि
Mon, 07/02/2012 - 14:23 नवीन
हॅ हॅ..समर्थनाविषयी तुम्हाला आलेली शंका रास्त आहे.. मी (आत्तापर्यंत तरी) त्यातलाच एक,तस्मात मला शेवटच्या घोटाची तारीख लक्षात (राहात) नाही.. असं वाचावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सहमत मला एका लग्नाची ,दुसरी

निनाद मुक्काम …
Wed, 07/04/2012 - 12:13 नवीन
सहमत मला एका लग्नाची ,दुसरी गोष्ट ह्या मालिकेतील आनंद लुटणे ही संज्ञा प्रचंड आवडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शेवटचा ?

तिमा
Mon, 07/02/2012 - 14:41 नवीन
शेवटचा घोट ? हा विचार सुद्धा कधी मनांत आणणार नाही.
  • Log in or register to post comments

टोक

प्रदीप
Mon, 07/02/2012 - 17:40 नवीन
'दारू पिणे हे मर्दुमकीचे लक्षण आहे, ती न पिणारे केविलवाणे' ही टोकाची भूमिका जितकी तिरस्करणीय आहे तितकीच 'मी दारू अजिब्बात पीत नाही' ह्याचा गर्व करण्याची, दुसर्‍या टोकाची भूमिका देखिल. आपण दारू पीत नाही, ही आपली वैयक्तिक बाब आहे, त्याविषयी काही म्हणायचे नाही. पण आपणास घरी पार्टीस निमंत्रीत करून वाईन ऑफर करणार्‍यांना तुम्ही 'हुव्च्चभ्रू' असे कुत्सित संबोधन देता आहात, ते खटकले. तुम्ही त्यांना स्वतः दारू पीत नाही, असे सांगितले असतांनाही ते आग्रह करून तुम्हाला ती पिण्यास भाग पाडतात काय? (आणि असे हे एकच कुणी नव्हेत, तर तुमच्या लिखाणावरून अनेक असावेत असे दिसते)? हाच स्वतःच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीचे ढोल वाजवणारा धागा अजूनही पुढे चालवीता येईल!
  • Log in or register to post comments

पण आपणास घरी पार्टीस

गवि
Mon, 07/02/2012 - 17:44 नवीन
पण आपणास घरी पार्टीस निमंत्रीत करून वाईन ऑफर करणार्‍यांना तुम्ही 'हुव्च्चभ्रू' असे कुत्सित संबोधन देता आहात, ते खटकले
सहमत.. हेच जाणवलं होतं पण त्यावेळी दुर्लक्ष केलं. शिवाय त्या हुच्चभ्रूंकडची वाईन लेखक थोडीथोडी का होईना पण पितात.. तेव्हा अजिबात पीत नाही असंही नाही.. किंवा मग धड नीटसे पिण्यातली दिलखुलास मजाही नाही.. असा अवघडलेला अप्रोच वाटला. पण हलकंफुलकी सुरुवात आहे आणि मूळ मुद्दा पुढे आहे हे गृहीत धरुन पुढे वाचलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

उत्तर

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 17:50 नवीन
आपल्या परखड प्रतिसादाबद्दल आभारी आहे. या धाग्याचे शीर्षक कंसात आहे याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

विडंबन

प्रदीप
Mon, 07/02/2012 - 18:23 नवीन
आहे, हे मला माहिती आहे. तरीही लेखातून जाणवणारा, कुणी दारू पिणार्‍यांविषयींचा तिरस्कार (आणी तेही तुम्हास घरी भोजनास बोलावणारे) असह्य आहे. 'त्यांनी मला दारू ऑफर केली, मी नकार दिला, व अगदी फ्रूट ज्यूस पीत राहिलो, इतर सर्व वेगवेगळ्या प्रकारची मद्ये घेत राहिले') असे काहीसे चालले असते. त्यांची 'हुच्चभ्रू' अशा शब्दांत टिंगल कशाला? तुमच्या मते हा जर विनोद असेल तर ते चुकिचे आहे, असे निदर्शनास आणू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

स्पष्टीकरण

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 18:33 नवीन
मला तरी वाटत नाही की धाग्यात कुणाचाही तिरस्कार करण्यात आलेला आहे. मी हुच्चभ्रू म्हंटले आहे, उच्चभ्रू नव्हे. हा शब्द मिपावर विशेष अर्थाने वापरला जातो. तरीही आपल्या मताचा आदर करतो. यापूढेही परखड मत मांडल्यास मला मनापासून बरे वाटेल ही खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments

अस्सं?

प्रदीप
Mon, 07/02/2012 - 19:26 नवीन
मी हुच्चभ्रू म्हंटले आहे, उच्चभ्रू नव्हे. हा शब्द मिपावर विशेष अर्थाने वापरला जातो.
'उच्चभ्रू' चे मुद्दाम डिस्टॉर्शन करून 'हुच्चभ्रू' हा शब्द बनला आहे, आणि तसे कुणासही टिंगलीच्या सुरातच म्हटले जाते, असा अर्थ मलातरी समजतो. आणि मिपावरही तो ह्याच 'विशेष अर्थाने' वापरला जातो असा माझा अंदाज आहे. ह्यापलिकडे अजून त्याचा काही सौम्य अर्थ असेल तर तो कृपया सांगावा! तुमचा तथाकथित विनोद 'खाजरा' होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:-)

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 20:45 नवीन
असेलही, जे काही होते ते माझ्या स्वतःच्या मित्रांबाबत. अन मैत्रीमध्ये चेष्टा मस्करी होऊ शकत नसेल तर मग ती मैत्रीच कसली? अन चेष्टा मस्करीतल्या गोष्टींवर एवढा खोलवर विचार करू नये असे मला वाटते. चु भू. द्या. घ्या. बादवे - सर्व प्रतिसादांत एक मुद्दा दुर्लक्षित राहिलाय. >> पण एका मराठी वर्तमानपत्राच्या प्रचारामुळे (दारू म्हणजे वाइन नाही) काही वर्षांपूर्वी फार गाजावाजा करून राज्याचे वाइन धोरण आखण्यात आले होते. वाइनला सर्वसामान्यांनी मान्यता द्यावी यासाठीच्या प्रयत्नांत एक प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्र आघाडीवर होते. वाइन वाणसामानाच्या दुकानातून विकता यावी यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू होते. यातून शेतकऱ्यांना लाभ होईल असे मलाही वाटत होते. पण दुर्दैवाने नेहमीप्रमाणेच अंमलबजावणीत धरसोड असल्याने सगळाच बट्ट्याबोळ झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

>>(आपण शेवटचा घोट कधी

मराठे
Mon, 07/02/2012 - 21:50 नवीन
>>(आपण शेवटचा घोट कधी घेतला?) हा आत्ताच संपवला तो शेवटचाच्च!
  • Log in or register to post comments

पण कसला?

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 22:14 नवीन
आपण तर मिचिगन मध्ये राहता न. हापिसात बसून चहा, किंवा कॉफी गेलाबाजार एखादे ज्युस पित असणार ... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

का कुणास ठाऊक पण हा विषय

गणपा
Mon, 07/02/2012 - 22:09 नवीन
का कुणास ठाऊक पण हा विषय निघाला की हा धागा आठवतोच. :)
  • Log in or register to post comments

कविता आवडली...

श्रीरंग_जोशी
Mon, 07/02/2012 - 22:12 नवीन
मी गेल्या वेळी जेव्हा वाचली होती तेव्हा ती इंग्रजी मध्ये होती. आज प्रथमच मराठीत वाचायला मिळाली. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१ हा हा हा

एमी
Tue, 07/03/2012 - 05:16 नवीन
+१ हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

शेवटचा घोट घ्यायला अवकाश आहे

रमताराम
गुरुवार, 07/05/2012 - 16:13 नवीन
शेवटचा घोट घ्यायला अवकाश आहे अजून.... अभी तो रात जवाँ है प्यारे, आख़री जाम की बात क्यूं करें साथ में हो वो कमसिन तो, बुढापे की बात क्यूं करे? -ररा पुणेकरी
  • Log in or register to post comments

र.रा... बहुत बढिया ....!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/05/2012 - 18:21 नवीन
र.रा... बहुत बढिया ....! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हेच म्हणतो...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/05/2012 - 23:47 नवीन
ररांचा रसिक प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

शेवटचा घोट शेवटीच घेणार

पाटील हो
Tue, 05/26/2015 - 10:08 नवीन
आताशी सुरवात झालिया आणि तुम्ही शेवटच्या घोताचा विचरतय. शेवटचा घोट शेवटीच घेणार ( कवळ्या बरोबर )
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा