Skip to main content

कळले ते अंडे

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 03/07/2012 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
थकल्या भुकेस पटकन केवळ कळले ते अंडे नेमक्यावेळी पचका करूनी जळले ते अंडे खरपूस वास, तोंडी पाणी, भट्टी जमली वाट्टं परंतु केकच्या झाकणामागे हसले ते अंडे गणिताच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी तरी पेपरावरती शेवटी उरले ते अंडे कठोर तपाच्या नंतर देवा मनभावे स्मरले. विश्वाचे इंगीत म्हणूनी दिसले ते अंडे रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान पण स्टेजवर बसल्याबसल्या झेलले ते अंडे **सध्याच्या अंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही
लेखनविषय:

वाचने 2615
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

हाहाहाहा..(मौजमजा) छान जमलीयं

अंडे का फंडा आवडला! गेल्या काही दिवसांपासून मिपाकरांची "अंड"श्रद्धा अगदी ओसंडून वाहते आहे, हे खरे :)

In reply to by सुनील

पहिली रेसिपी असल्यामुळे अंड्यावर माझा भारी जीव.
गेल्या काही दिवसांपासून मिपाकरांची "अंड"श्रद्धा अगदी ओसंडून वाहते आहे, हे खरे
:D

छान....मस्त जमलीय..........

:)

हे तर शीघ्र काव्य, मानले बुवा तुंम्हाला!!

In reply to by श्रीरंग_जोशी

करा आता विडंबन जोशी बुवा. कळते ते अंडे , पाडली ती ...... ;-)