कळले ते अंडे
थकल्या भुकेस पटकन केवळ कळले ते अंडे
नेमक्यावेळी पचका करूनी जळले ते अंडे
खरपूस वास, तोंडी पाणी, भट्टी जमली वाट्टं
परंतु केकच्या झाकणामागे हसले ते अंडे
गणिताच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी
तरी पेपरावरती शेवटी उरले ते अंडे
कठोर तपाच्या नंतर देवा मनभावे स्मरले.
विश्वाचे इंगीत म्हणूनी दिसले ते अंडे
रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान
पण स्टेजवर बसल्याबसल्या झेलले ते अंडे
**सध्याच्या अंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही
मस्त
संडे हो या मंडे
छान
खिक
एगालिटेरियन
दुवा
छान.
मस्त झक्कास..
मस्तच...
रूष ! आता ही कविता अंडे न
मस्तच
:)
सहीच!
करा आता विडंबन