छगनलालांचे सापळे (भाग १)
छगनलाल आणि कं.त नौकरीला लागून मला आज बरोब्बर २ वर्षे झाली होती.सलग २ वर्षे काम केलेली, ही माझी गेल्या ५/६ वर्षातील पहिलीच नौकरी.काय करणार, मागच्याच वर्षी लग्न झाले होते आणि घराचे हप्ते पण फेडायचे होते.तशी कं. बरी आहे.मालक बराच रगेल आणि रंगेल असला तरी, धंद्यावर त्याचे मूळापासून प्रेम आहे.आता धंद्यावर का ह्यातील पैशांवर, हा प्रश्न सोडून द्या.मारवाडी लोकांचे खरे प्रेम कोणावर, हा काही संशोधनाचा विषय नाही आहे.
ह्या नौकरीवर माझा काही जीव न्हवता, पण मालकांची वागणूक , जे शिकवायची , ते कॉलेजमध्ये शिकायला मिळत न्हवते.फसवणे आणि प्रामाणीकपणा ह्या दोन पायांवर मालकांचे विश्व उभे होते. इतरांना फसवणे आणि नोकरांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे, ही खरी मेख.माणसे ओळखण्याची कला ह्यांना जन्मजात होती आणि अतिशय गोड वाणी, ह्या फसवण्याच्या धंद्याला जोड देत होती. हा माणूस खरे तर , मूत्सद्दी म्हणून अतियोग्य.चीनची जमीन, अमेरिकेला भरमसाठ व्याजाने देवून , जपानकडून पैसे काढेल असा आणि परत दाखवेल असे , की ह्या सगळ्या भानगडीत नूकसान मात्र त्याचेच होत आहे. छगनलाल, एकदम गरीब कूटंबातील.ज्या कं,त कामाला लागला, त्याच मालकाच्या मूलीशी लग्न केले.मालकाला दूसरा पर्याय ठेवला नाही.लग्न झाले आणि दूसर्याच महिन्यात बाप पण झाला.म्हणजे बघा , बायको पण मिळाली, रेडीमेड धंदा पण मिळाला आणि दाखवले असे की, बघा, मी कूठे पाप लपवले आहे? शिवात मेहूणी बोनस.(हा मेहूणीचा किस्सा परत कधी तरी)
माझी आणि छगनलालची ओळख माझ्या मित्रा मूळे झाली.त्याने नौकरी सोडली आणि मालकाकडे माझी शिफारस केली.मालकाने मला इंटरव्ह्यूला मुंबईला बोलावले.ऑफीस एकदम चकाचक.एक पण पूरूष स्टाफ नाही.सगळ्या मूली, स्वर्ग सोडून मुंबईला आल्या आहेत की काय? असे वाटावे.ह्यातली एक पण मूलगी , आपल्याला मिळणार नाही, मग कशाला त्यांच्यावर लाईन मारा आणि आपला वेळ खर्च करा.नंतर समजले की, ह्या मूली , एयरर्लाइन इन्स्टिट्यूट मधल्या आहेत आणि ही सगळी मालकांच्या मूलाची कामगिरी आहे.(बाप बोटभर तर बेटा हात भर).सवईप्रमाणे मी पुस्तक वाचायला सूरूवात केली.इंटरव्ह्यूला जातांना , मी पुस्तक घेवून जातो.तेव्हढाच टाईमपास.
१५/२० मिनिटांनीच साहेबांनी बोलावले.प्रथमदर्शनीच नजरेत भरले ते, त्यांचे टोकदार नाक आणि भेदक डोळे.छान दाढी केलेला चेहरा आणि सूवासिक अत्तराचा घमघमाट.शिक्षण किती वगैरे गोष्टीत जास्त रस न घेता, कूठे जॉब करतोस ते विचारले.हाताखाली कामगार किती?आई वडील काय करतात? भाउ-बहीण किती? असेच प्रश्न विचारले. काम करतांना काय-काय अडचणी आल्या , आणि त्या कशा सोडवल्या, ह्यातच रस जास्त होता.मित्राने , आधीच कल्पना दिली होती,प्रामाणिक रहा.खोटे बोलू नकोस.शाळा ते कॉलेज काय उद्योग केले ते सगळे सांगातले.अगदी मारामार्या ते दारूची अवैध वाहतूक.(मी दमण ते बलसाड , दारू नेत असे)
अवैध वाहतूक , म्हणाल्याबरोबर , त्यांचे डोळे , मवाळ झाले.मवाळ डोळे म्हणजे धोका, हे ओळखायची वेळ अजून यायची होती.आज देखील, मी कूणी जास्त सलगी दाखवायचा किंवा अति प्रेमाने बोलायचा प्रयत्न केला की सावध होतो.त्या नौकरीनंतर मला कूणीच फसवू शकले नाही.शेवटी मालकाने एक प्रश्न विचारला. अवैध वाह्तूकीत तूझा जोडीदार कोण? मी म्हणालो, "नौकरी द्यायची असेल तर द्या.मित्राचे नांव सांगणार नाही." वातावरण थोडे तापले, असे त्याला वाटले आणि त्याने जॉब ऑफर दिली.सगळा तोंडी व्यवहार.पगार अमुक तमुक, बोनस नाही , ट्रॅव्हलिंग अलाउन्स अमुक-तमुक इ.ऑफीस जरी मुंबईला असले तरी , मला दमणची फॅक्टरी, बघायची होती.मालक आठवड्याला जे टार्गेट देईल, ते पूर्ण करायचे आणि ते पण ओव्हरटाईम न देता.
दूसर्या दिवशी , कामावर रूजू झालो.काम काय तर, CO2 मीटर बनवायचे.हे सगळे मीटर जाणार कूठे ? तर, गुजरात सरकारने, नविन कायदा आणला होता, की दर सहा महिन्यांनी , प्रत्येक वाहनाची तपासणी करायची, की ते किती धूर सोडत आहेत?आपण त्यात जास्त डीटेल्स मध्ये नको जायला.खुद्द मालकाच्या जावयानेच , मोठ्या शहरांत ह्याची एंजन्सी घेतली होती.तालूका प्रदेश मात्र सोडले होते.आमचे मशीन काय लायकीचे होते , ते आमचे आम्हालाच माहीत. मूळात , ती एका फ्रेंच मशीनची भ्रष्ट नक्कल होती.
एके दिवशी , मालकाला समजले, की गूजरातमध्ये हा असा-असा कायदा येणार आहे.मालकाने लगेच चौकशी केली आणि समजले की , असे मशीन फ्रान्स मध्ये बनते,मालकाने ते खरेदी करायला पैसे गोळा करायला सुरुवात केली.जवळचा माणूस न बघता, दूरचा माणुस बघितला.अहमदाबाद मधला एक व्यापारी गळाला लागला.त्याच्या बरोबर तोंडी व्यवहार ठरवला.मशीनची मूळ किंमत अधिक टॅक्स मिळून जवळ-जवळ ४ लाख रुपये होते.मालकाने त्याच्याकडून २ लाख घेतले.त्याबद्दल त्याला ५०% पार्टनरशीपची ऑफर दिली. फ्रान्स मधून मशीन मागवले, ते परत बोलीवर.९० दिवसांचा वेळ घेतला.
मशीन आल्याबरोबर,पैसे चारून , बिना कस्टम बाहेर काढले.दूसर्या दिवशी, एका एक्स्पर्ट तंत्रज्ञानाला बोलावून ते मशीन दाखवले.असेच दूसरे मशीन तयार केलेस तर, ५% पार्टनरशीप देवू केली.त्याने, भरपूर मेहनत घेवून ते मशीन तयार केले, पण एक प्रॉब्लेम आलाच. मुख्य सेंसर सोडून बाकी सगळे पार्टस इथे मिळत होते.पण सेंसर काही इथे तयार करता येणार न्हवता आणि आयात सेंसरची किंमत एक लाख रु. होती.
मालकाने डोके लावले, आणि म्हणाला. दूसरे कोई भी गॅस का चलाके देख.ऑक्सीजन नही तो हवा,कुछ तो दिखायेगा. अपनेको तो रीडींग दीखानेका है. सेंसर थोडी दिखानेका है? लडकी देखनेको जाता है, तो क्या देखता है? लडकी का चेहरा ..... या.... उसके......... पाँव? (मालकाचा हा डायलॉग नंतर पूर्ण कं.त फेमस झाला)
शेवटी, एक ऑक्सीजन सेंसर थोडा मॅच झाला.रीडींग डिस्प्ले सर्कीट मध्येच थोडा फेर फार केला आणि मशीन बनवले.ओरिजनल मशीनचा सेंसर आपल्या मशीनला लावला आणि आपले मशीन पास करून घेतले.ते पास झाल्यावर, मूळ मशीन, बिना सेंसरचे , परत कस्टम मध्ये ठेवून दिले.मोजून ३ दिवसांत ही भानगड केली.दूपारी २ ला मशीन दाखवून संध्याकाळी ४च्या आत सर्टिफिकेट मिळवले.
दूसर्या दिवशी, ते राजरोस फ्रेंच कं.च्या इथल्या इंजिनियर बरोबर बाहेर काढले.त्याने पॅकिंग उघडताच ओळखले, की काही तरी मामला आहे. छगनलालने तोपर्यंत ह्या ५/६ तासांत त्या माणसाला पटवले होतेच आणि पोलीस केस केली तर , आपल्याच देशाचे कसे नूकसान होईल, तिच्या प्रतिष्ठेला कसा धक्का लागेल, वगैरे सांगून.. आपण एक वेगळा अर्ज लिहू या, की मशीन मधला सेंसर काम करत नाही आहे.तू मला स्पेयर सेंसर दे.मी तूला पैसे देतो.आता माझ्याकडे १० हजार आहेत. ते तू घे आणि एखादा बिघडलेला सेंसर कं.ला दाखव.मी केस करत नाही. तसा अर्ज लिहून घेतला आणि सही मात्र नौकराची घेतली. नौकर पण तयार, त्याने पण लगेच सही केली. एका सहीचे त्याला ५००रु. मिळायचे. (पण मालकाने केस केलीच)
अशा प्रकारे, CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर लावून आमची कं. चालू झाली.शिवाय आता एकाच्या जागी २ सेंसर झाले.५% वाला पार्टनर आणि ५० % वाला पार्टनर , ह्यांचे काय झाले, ते आपण , पूढील भागात पाहू या.....
- छगनलालांचे सापळे (भाग २)
- छगनलालांचे सापळे (भाग ३)
- छगनलालांचे सापळे (भाग ४)
- छगनलालांचे सापळे (भाग ५)
- छगनलालांचे सापळे (भाग ६)
- छगनलालांचे सापळे (भाग ७)
- छगनलालांचे सापळे (भाग ८)
- छगनलालांचे सापळे (भाग ९)
Book traversal links for छगनलालांचे सापळे (भाग १)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोचक सुरूवात...
परखड आणि स्पष्ट , प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
खरी असल्यासारखेच वाटते आहे..
+१ आणि +१
आयला !!
हा हा हा! असेच म्हणतो! येऊदे
अगदी अगदी पुढिल भाग लौकर
मस्त लिहिलं आहेस, एका खुप
मूळात आपले सरकार
उत्तम
मस्त
मुव्या, लै भारी, लेका असं काही तरी लिही!
माणूस झाला खोटा
कथा एक नंबर!!!! पुभाआप्र.
मस्त सुरुवात ..
हुशारी.
+१
पुढच्या
छान सुरुवात बर्याचदा अस्सच
काही प्रतिसाद फार लाजीरवाणे वाटले
अरे बाबा!!!
वास्तव..
१००%सत्य...
जनता मात्र भरडली जाते.
राम रावण
असहमत.
थोडं जास्त काळं बेरं आहे, मान्य...
>अश्यावेळी कितिही चोख आणि प्रामाणिकपणे सेवा देतो म्हटलं तरी
साली ही प्रामाणिकता चीजच काही और आहे!
उगीच कल्पनाविलासात अर्थ नाही
सत्य/कल्पित काहीही असले तरी
दुर्दैवाने म्हणावं लागतय...
@ बॅटमन आणि अर्धवटराव
माझंही उत्तर अगदी साफ होतं...
माझी टॅग लाईन ही आहे
माझं अगदी पहिलं वाक्य...
अर्धवटराव जाऊं द्या
बरं.. जाऊ द्या.
प्रामाणिकता ही अंतर्बाह्य एकच आहे
आय डिसअॅग्री
अरा, तुमच्याकडून एक इंटरेस्टींग गोष्ट शिकण्यासारखी आहे
तुम्ही असं म्हणताय गुरु??
दादा, प्रतिसाद खाली दिलाय
अजीबात गडबडीत नाहि.
मुळात कथा सत्य आहे की मिथ्या
काय लागू आहे आणि काय गैर
हा सल्ला नसून हे एक निरीक्षण
काहीही कारण नसताना तुमचे माझ्या लेखनावर चार तिरकस
ब्वॉर्र्र्र्र...........चालूद
मस्त कथा!