Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Wed, 06/27/2012 - 04:55
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
छगनलाल आणि कं.त नौकरीला लागून मला आज बरोब्बर २ वर्षे झाली होती.सलग २ वर्षे काम केलेली, ही माझी गेल्या ५/६ वर्षातील पहिलीच नौकरी.काय करणार, मागच्याच वर्षी लग्न झाले होते आणि घराचे हप्ते पण फेडायचे होते.तशी कं. बरी आहे.मालक बराच रगेल आणि रंगेल असला तरी, धंद्यावर त्याचे मूळापासून प्रेम आहे.आता धंद्यावर का ह्यातील पैशांवर, हा प्रश्न सोडून द्या.मारवाडी लोकांचे खरे प्रेम कोणावर, हा काही संशोधनाचा विषय नाही आहे. ह्या नौकरीवर माझा काही जीव न्हवता, पण मालकांची वागणूक , जे शिकवायची , ते कॉलेजमध्ये शिकायला मिळत न्हवते.फसवणे आणि प्रामाणीकपणा ह्या दोन पायांवर मालकांचे विश्व उभे होते. इतरांना फसवणे आणि नोकरांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे, ही खरी मेख.माणसे ओळखण्याची कला ह्यांना जन्मजात होती आणि अतिशय गोड वाणी, ह्या फसवण्याच्या धंद्याला जोड देत होती. हा माणूस खरे तर , मूत्सद्दी म्हणून अतियोग्य.चीनची जमीन, अमेरिकेला भरमसाठ व्याजाने देवून , जपानकडून पैसे काढेल असा आणि परत दाखवेल असे , की ह्या सगळ्या भानगडीत नूकसान मात्र त्याचेच होत आहे. छगनलाल, एकदम गरीब कूटंबातील.ज्या कं,त कामाला लागला, त्याच मालकाच्या मूलीशी लग्न केले.मालकाला दूसरा पर्याय ठेवला नाही.लग्न झाले आणि दूसर्‍याच महिन्यात बाप पण झाला.म्हणजे बघा , बायको पण मिळाली, रेडीमेड धंदा पण मिळाला आणि दाखवले असे की, बघा, मी कूठे पाप लपवले आहे? शिवात मेहूणी बोनस.(हा मेहूणीचा किस्सा परत कधी तरी) माझी आणि छगनलालची ओळख माझ्या मित्रा मूळे झाली.त्याने नौकरी सोडली आणि मालकाकडे माझी शिफारस केली.मालकाने मला इंटरव्ह्यूला मुंबईला बोलावले.ऑफीस एकदम चकाचक.एक पण पूरूष स्टाफ नाही.सगळ्या मूली, स्वर्ग सोडून मुंबईला आल्या आहेत की काय? असे वाटावे.ह्यातली एक पण मूलगी , आपल्याला मिळणार नाही, मग कशाला त्यांच्यावर लाईन मारा आणि आपला वेळ खर्च करा.नंतर समजले की, ह्या मूली , एयरर्लाइन इन्स्टिट्यूट मधल्या आहेत आणि ही सगळी मालकांच्या मूलाची कामगिरी आहे.(बाप बोटभर तर बेटा हात भर).सवईप्रमाणे मी पुस्तक वाचायला सूरूवात केली.इंटरव्ह्यूला जातांना , मी पुस्तक घेवून जातो.तेव्हढाच टाईमपास. १५/२० मिनिटांनीच साहेबांनी बोलावले.प्रथमदर्शनीच नजरेत भरले ते, त्यांचे टोकदार नाक आणि भेदक डोळे.छान दाढी केलेला चेहरा आणि सूवासिक अत्तराचा घमघमाट.शिक्षण किती वगैरे गोष्टीत जास्त रस न घेता, कूठे जॉब करतोस ते विचारले.हाताखाली कामगार किती?आई वडील काय करतात? भाउ-बहीण किती? असेच प्रश्न विचारले. काम करतांना काय-काय अडचणी आल्या , आणि त्या कशा सोडवल्या, ह्यातच रस जास्त होता.मित्राने , आधीच कल्पना दिली होती,प्रामाणिक रहा.खोटे बोलू नकोस.शाळा ते कॉलेज काय उद्योग केले ते सगळे सांगातले.अगदी मारामार्‍या ते दारूची अवैध वाहतूक.(मी दमण ते बलसाड , दारू नेत असे) अवैध वाहतूक , म्हणाल्याबरोबर , त्यांचे डोळे , मवाळ झाले.मवाळ डोळे म्हणजे धोका, हे ओळखायची वेळ अजून यायची होती.आज देखील, मी कूणी जास्त सलगी दाखवायचा किंवा अति प्रेमाने बोलायचा प्रयत्न केला की सावध होतो.त्या नौकरीनंतर मला कूणीच फसवू शकले नाही.शेवटी मालकाने एक प्रश्न विचारला. अवैध वाह्तूकीत तूझा जोडीदार कोण? मी म्हणालो, "नौकरी द्यायची असेल तर द्या.मित्राचे नांव सांगणार नाही." वातावरण थोडे तापले, असे त्याला वाटले आणि त्याने जॉब ऑफर दिली.सगळा तोंडी व्यवहार.पगार अमुक तमुक, बोनस नाही , ट्रॅव्हलिंग अलाउन्स अमुक-तमुक इ.ऑफीस जरी मुंबईला असले तरी , मला दमणची फॅक्टरी, बघायची होती.मालक आठवड्याला जे टार्गेट देईल, ते पूर्ण करायचे आणि ते पण ओव्हरटाईम न देता. दूसर्‍या दिवशी , कामावर रूजू झालो.काम काय तर, CO2 मीटर बनवायचे.हे सगळे मीटर जाणार कूठे ? तर, गुजरात सरकारने, नविन कायदा आणला होता, की दर सहा महिन्यांनी , प्रत्येक वाहनाची तपासणी करायची, की ते किती धूर सोडत आहेत?आपण त्यात जास्त डीटेल्स मध्ये नको जायला.खुद्द मालकाच्या जावयानेच , मोठ्या शहरांत ह्याची एंजन्सी घेतली होती.तालूका प्रदेश मात्र सोडले होते.आमचे मशीन काय लायकीचे होते , ते आमचे आम्हालाच माहीत. मूळात , ती एका फ्रेंच मशीनची भ्रष्ट नक्कल होती. एके दिवशी , मालकाला समजले, की गूजरातमध्ये हा असा-असा कायदा येणार आहे.मालकाने लगेच चौकशी केली आणि समजले की , असे मशीन फ्रान्स मध्ये बनते,मालकाने ते खरेदी करायला पैसे गोळा करायला सुरुवात केली.जवळचा माणूस न बघता, दूरचा माणुस बघितला.अहमदाबाद मधला एक व्यापारी गळाला लागला.त्याच्या बरोबर तोंडी व्यवहार ठरवला.मशीनची मूळ किंमत अधिक टॅक्स मिळून जवळ-जवळ ४ लाख रुपये होते.मालकाने त्याच्याकडून २ लाख घेतले.त्याबद्दल त्याला ५०% पार्टनरशीपची ऑफर दिली. फ्रान्स मधून मशीन मागवले, ते परत बोलीवर.९० दिवसांचा वेळ घेतला. मशीन आल्याबरोबर,पैसे चारून , बिना कस्टम बाहेर काढले.दूसर्‍या दिवशी, एका एक्स्पर्ट तंत्रज्ञानाला बोलावून ते मशीन दाखवले.असेच दूसरे मशीन तयार केलेस तर, ५% पार्टनरशीप देवू केली.त्याने, भरपूर मेहनत घेवून ते मशीन तयार केले, पण एक प्रॉब्लेम आलाच. मुख्य सेंसर सोडून बाकी सगळे पार्टस इथे मिळत होते.पण सेंसर काही इथे तयार करता येणार न्हवता आणि आयात सेंसरची किंमत एक लाख रु. होती. मालकाने डोके लावले, आणि म्हणाला. दूसरे कोई भी गॅस का चलाके देख.ऑक्सीजन नही तो हवा,कुछ तो दिखायेगा. अपनेको तो रीडींग दीखानेका है. सेंसर थोडी दिखानेका है? लडकी देखनेको जाता है, तो क्या देखता है? लडकी का चेहरा ..... या.... उसके......... पाँव? (मालकाचा हा डायलॉग नंतर पूर्ण कं.त फेमस झाला) शेवटी, एक ऑक्सीजन सेंसर थोडा मॅच झाला.रीडींग डिस्प्ले सर्कीट मध्येच थोडा फेर फार केला आणि मशीन बनवले.ओरिजनल मशीनचा सेंसर आपल्या मशीनला लावला आणि आपले मशीन पास करून घेतले.ते पास झाल्यावर, मूळ मशीन, बिना सेंसरचे , परत कस्टम मध्ये ठेवून दिले.मोजून ३ दिवसांत ही भानगड केली.दूपारी २ ला मशीन दाखवून संध्याकाळी ४च्या आत सर्टिफिकेट मिळवले. दूसर्‍या दिवशी, ते राजरोस फ्रेंच कं.च्या इथल्या इंजिनियर बरोबर बाहेर काढले.त्याने पॅकिंग उघडताच ओळखले, की काही तरी मामला आहे. छगनलालने तोपर्यंत ह्या ५/६ तासांत त्या माणसाला पटवले होतेच आणि पोलीस केस केली तर , आपल्याच देशाचे कसे नूकसान होईल, तिच्या प्रतिष्ठेला कसा धक्का लागेल, वगैरे सांगून.. आपण एक वेगळा अर्ज लिहू या, की मशीन मधला सेंसर काम करत नाही आहे.तू मला स्पेयर सेंसर दे.मी तूला पैसे देतो.आता माझ्याकडे १० हजार आहेत. ते तू घे आणि एखादा बिघडलेला सेंसर कं.ला दाखव.मी केस करत नाही. तसा अर्ज लिहून घेतला आणि सही मात्र नौकराची घेतली. नौकर पण तयार, त्याने पण लगेच सही केली. एका सहीचे त्याला ५००रु. मिळायचे. (पण मालकाने केस केलीच) अशा प्रकारे, CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर लावून आमची कं. चालू झाली.शिवाय आता एकाच्या जागी २ सेंसर झाले.५% वाला पार्टनर आणि ५० % वाला पार्टनर , ह्यांचे काय झाले, ते आपण , पूढील भागात पाहू या.....
  • Log in or register to post comments
  • 26674 views
  • छगनलालांचे सापळे (भाग २)
  • छगनलालांचे सापळे (भाग ३)
  • छगनलालांचे सापळे (भाग ४)
  • छगनलालांचे सापळे (भाग ५)
  • छगनलालांचे सापळे (भाग ६)
  • छगनलालांचे सापळे (भाग ७)
  • छगनलालांचे सापळे (भाग ८)
  • छगनलालांचे सापळे (भाग ९)

Book traversal links for छगनलालांचे सापळे (भाग १)

  • छगनलालांचे सापळे (भाग २) ›

प्रतिक्रिया

Submitted by आशु जोग on Wed, 06/27/2012 - 22:28

Permalink

खूप भारी वाटलं होतं पण हे

खूप भारी वाटलं होतं पण हे दिसलं >> CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर लावून आमची कं. चालू झाली सगळच संपलं. इथे कथा पंक्चर होते
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 06/28/2012 - 01:51

Permalink

मुवि अहो कथा काल्पनिक आहे असे

मुवि अहो कथा काल्पनिक आहे असे आधीच सांगून जरासा रसभंग केला. नाहीतर आमचे दादा ह्यां प्रकरणातून कधीकाळी गेले आहे असे वाटून कथा वाचण्याची खुमारी वाढली असती. हे लेखकांच्या धंद्यातील ट्रेड सिक्रेट असते. खरे आणि काल्पनिकता ह्यांची बेमालूम सरमिसळ रामदासांचे प्रतिसाद मस्त त्यांची शेअर मार्केट वरील कथा ह्याच जात कुळीतील ती काल्पनिक का कितपत खरी हे अजून गुलदस्त्यात पण अधुरी एक कहाणी
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 06/28/2012 - 11:14

Permalink

लै बेश कथा आहे. मला तर बराच

लै बेश कथा आहे. मला तर बराच वेळ खरीच वाटत होती. मस्त जमली आहे. पुभाप्र
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा नाईक on गुरुवार, 06/28/2012 - 15:04

Permalink

इतके details दीले आहेत की मला

इतके details दीले आहेत की मला वाटतच नाही कि काल्पनीक वगरे आहे. या अश्या comman घटना रोज घडतच असतात, फक्त जे या commercial कामाच्या पासून लांब असतात त्यांना ते नवल वाटू शकत. पण हे मारवाडी/गुजराथी व्यापारी लोक जे करतात ते समोर आलेच पाहीजे अस वाटत.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 06/28/2012 - 17:38

Permalink

पण हे मारवाडी/गुजराथी

पण हे मारवाडी/गुजराथी व्यापारी लोक जे करतात ते समोर आलेच पाहीजे अस वाटत. शिल्पा ताई तुमचे हे विधान जातीवाचक आहे. शिर्के / पवार / पाटील / महाजन /राणे /कदम /वाघ/चव्हाण्,जोशी , आडनावाचे लोक्स जणू हे असले काही करीतच नाहीत. असे म्हणायचे आहे काय तुम्हाला? (उदा: "पुण्यात बापट या आडनावाची एक आडबाजूला पडलेली अभिनेत्री कोथरुडमध्ये वेश्या व्यवसाय चालवायची " याचा अर्थ तुम्ही लावलेल्या मापाने कोणी लावला तर काय अनर्थ होईल?) सरसकट सर्वाना एकाच मापाने मोजू नका.पी जी वुडहाऊसचे उद्गार आठवतात का" आय डोन्ट हेट इन प्लुरल"
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा नाईक on Fri, 06/29/2012 - 11:10

In reply to पण हे मारवाडी/गुजराथी by विजुभाऊ

Permalink

मी कोणाच्या जाती बद्द्ल बोलत

मी कोणाच्या जाती बद्द्ल बोलत नाही. गुजराथी लोक स्वत च्या समाजातच एकी करुन व्यवसाय करतात. या एकीच्या बळावर ते ह्या अश्या गोष्टी सहज manage करतात. (उ. हीरे व्यापार) मी तरी माझ्या आयुष्यात कोणी मराठी समाजाने अस केल्याच पाहील नाही. म्हणून वर अस लिहिल. तुमच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागते.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Fri, 06/29/2012 - 21:02

In reply to मी कोणाच्या जाती बद्द्ल बोलत by शिल्पा नाईक

Permalink

मतभेद हा तर मराठी माणसाचा हाय

मतभेद हा तर मराठी माणसाचा हाय पॉइंट आहे ना!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 06/28/2012 - 22:12

Permalink

छान..

सुरुवात रोचक! पु भा प्र, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 06/29/2012 - 11:39

Permalink

@ अरा,

> आय सी. म्हणजे सेन्सर जर बरोबर असेल तरः १) अश्या डिव्हायसेसची गरज निर्माण होणार आहे हे जाणणे (अर्थात, इथे आपले पॉलिटिकल कनेक्शन वापरुन. इथेही "रोकडा" व्यवहार आलाच ) २) कस्ट्म मधुन इल्लीगली डिव्हाइइस बाहेर काढणे ३) मूळ निर्मात्या कंपनीची परवानगी न मागता त्याचे डुप्लिकेट तयार करणे ४) इतर कुणाला सुगावा लागण्या अगोदर, टेंडर वगैरे निघण्या अगोदर आपले डिव्हाईस पास करुन घेणे ५) चोरी पकडली गेल्यास "यात देश्याच्या अब्रुचे धिंडवडे निघतील" अशी भिती घालणे व प्रकरण दाबणे हे सर्व व्यवहार "प्रामाणीक"पणा पावतील, आणि सर्व काहि "नियमात" बसेल. इंटरेस्टींग = आहो सेंसर प्रामाणिकपणे बसवणार्‍या माणसाच्या मनात असे विचार सुद्धा येणार नाहीत त्यामुळे `बाकीचे व्यवहार प्रामाणिकपणा' पावण्याचा प्रश्नच नाही; तसले व्यवहार होणारच नाहीत! आता राहिला प्रश्न `अश्या डिव्हायसेसची गरज निर्माण होणार आहे हे जाणणे' ; कोणताही व्यावसायिक त्याच्या उप्तादनाला कुठे संधी आहे हे शोधतच असतो पण त्यासाठी ,(> इथे आपले पॉलिटिकल कनेक्शन वापरुन. इथेही "रोकडा" व्यवहार आलाच ) अशी सुरुवात करणं हीच अप्रामाणिकता आहे आणि एकदा सुरुवात चुकीची झाली की शेवट चुकीचाच होणार. उगीच का मी म्हटलय `चुकीच्या साधनांनी कधीही श्रेयस साधता येत नाही... ते चुकीचा रस्ता योग्य ठिकाणी नेईल अशा भ्रमात राहणं आहे'
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 06/29/2012 - 19:39

In reply to @ अरा, by संजय क्षीरसागर

Permalink

असं म्हणताय...

>>= आहो सेंसर प्रामाणिकपणे बसवणार्‍या माणसाच्या मनात असे विचार सुद्धा येणार नाहीत त्यामुळे `बाकीचे व्यवहार प्रामाणिकपणा' पावण्याचा प्रश्नच नाही; तसले व्यवहार होणारच नाहीत! -- मी जो काहि थोडबहुत बिझनेस बघितलाय त्यावरुन असा छातीठोकपणे दावा करुन शकत नाहि. पण तुमचा अनुभव दांडगा आणि परिपक्व... तेंव्हा माझी धारणा चुकीची ठरो अशी प्रार्थना करतो. असो. >>उगीच का मी म्हटलय `चुकीच्या साधनांनी कधीही श्रेयस साधता येत नाही... ते चुकीचा रस्ता योग्य ठिकाणी नेईल अशा भ्रमात राहणं आहे' -- परत ट्रॅक बदलला. या तुमच्या फिलॉसॉफीला मी कधिच प्रश्न केला नाहि. माझा प्रश्न एकदम सिंपल आहे. समजा मी एका कॉम्पीटिशन मध्ये आहे. आणि मला माहित आहे त्यातले नियम हे माझ्या प्रतिस्पर्ध्याला जिंकवण्यासाठी बनवले गेलेत (आता माझ्या समझदारीवर शंका घेतली, किंवा मी त्या कॉम्पीटीशन मध्ये पडलोच का, हे प्रश्न निरर्थक आहे ) अशा वेळी मी जर शक्य तेथे नियम वाकवले तर तो माझा अप्रामाणीकपणा ठरावा काय? (याला "हो" अथवा "नाहि" इतकं साधं उत्तर देता येऊ शकतं.) सर्वात मुख्य गोष्ट... मी कुणाला काहि सिद्ध करायला सांगत नाहिए. मी फक्त माझ्या धारणा मांडतोय आणि इतरांच्या धारणांचे तौलनीक वाचन (अभ्यास म्हणा हवं तर) करतोय. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 06/29/2012 - 23:03

In reply to असं म्हणताय... by अर्धवटराव

Permalink

अरा, हा तुमचा प्रश्न सर्वस्वी नव्या अँगलनं आहे

माझा बेसिक मुद्दा (सर्वप्रथम प्रतिसाद असाय : ज्या प्रकारे हा उद्योजक धंदा करतोय त्याला हुशारी म्हणण अत्यंत खेदजनक आहे).... (थोडक्यात भ्रष्टाचार म्हणजे हुशारी नाही) आणि माझं एकच म्हणणंय : जगभरात काय चालतं किंवा इतर काय करतात हा प्रश्न नाही आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे. आता तुम्ही विचारताय : >समजा मी एका कॉम्पीटिशन मध्ये आहे. आणि मला माहित आहे त्यातले नियम हे माझ्या प्रतिस्पर्ध्याला जिंकवण्यासाठी बनवले गेलेत (आता माझ्या समझदारीवर शंका घेतली, किंवा मी त्या कॉम्पीटीशन मध्ये पडलोच का, हे प्रश्न निरर्थक आहे ) अशा वेळी मी जर शक्य तेथे नियम वाकवले तर तो माझा अप्रामाणीकपणा ठरावा काय? = तुम्ही ही वेगळी स्टोरी सुरु केलीये आणि त्यात तुमचे व्यक्तीगत पॅरामिटर्स आहेत (त्यातले नियम हे माझ्या प्रतिस्पर्ध्याला जिंकवण्यासाठी बनवले गेलेत) तस्मात हा प्रश्न या कथेवर गैरलागू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 06/30/2012 - 02:01

In reply to अरा, हा तुमचा प्रश्न सर्वस्वी नव्या अँगलनं आहे by संजय क्षीरसागर

Permalink

नवा अँगल ??

प्रतिसाद १) ...पण लॉबींग करुन आपल्या उत्पादनाची खरेदी करायला भाग पाडणे, गरज निर्माण करणे, प्रतिस्पर्ध्याला भांडवल-कॉपी राईट्स-आय पी वगैरे जंजाळात बुडवुन मागे पाडणे.. अश्या अनेक "एथिकल" मार्गाने दुनियाभरचे बिझनेस चालतात- प्रतिसाद २) खेळाचे नियम जर एका पार्टीने जिंकावे या उद्देशानेच बनले असतील तर दुसर्‍या पार्टीला नियम मोडल्यावाचुन पर्याय नसतो. प्रतिसाद ४) बायस्ड नियमांवर आधारीत निकष प्रामणिकपणाला चॅलँज देऊ शकत नाहि इतका सिंपल मुद्दा मी मांडला. आणि हे ज्याचं तो ठरवेल. आणि ते ठरवताना नियमांचे अर्थ आंधळेपणाने स्विकारता येत नाहि. प्रतिसाद ५) प्रामाणीकपणाच्या आवश्यकतेत कुठेच छेद दिलेला नाहि. हि प्रामाणिकता नियमाधारीत नाहि एव्हढाच काय तो मुद्दा आहे. प्रतिसाद ६) समजा मी एका कॉम्पीटिशन मध्ये आहे. आणि मला माहित आहे त्यातले नियम हे माझ्या प्रतिस्पर्ध्याला जिंकवण्यासाठी बनवले गेलेत (आता माझ्या समझदारीवर शंका घेतली, किंवा मी त्या कॉम्पीटीशन मध्ये पडलोच का, हे प्रश्न निरर्थक आहे ) अशा वेळी मी जर शक्य तेथे नियम वाकवले तर तो माझा अप्रामाणीकपणा ठरावा काय? या सर्व प्रतिसादांवरुन जर तुम्ही म्हणत असाल कि आता माझ्या प्रश्नाचा अँगल बदललाय, तर तुम्हाला त्यात नवा अँगल दिसण्याचं एकच ( पटण्यालायक ) कारण असावं कि तुम्ही माझे प्रतिसाद वाचलेच नाहित. (न पटण्यालायक कारण- तुम्हाला माझे प्रतिसाद कळलेच नाहि). आता पर्यंत मी मिपावर अनेक बुच पाहिलेत... एव्हढा सॉलीड बुच या सम हाच. मान गए :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 06/30/2012 - 21:48

In reply to नवा अँगल ?? by अर्धवटराव

Permalink

अरा, प्रामाणिकता काय आहे हे प्रत्येकाला माहिती आहे

आता तुमचा प्रश्न असाय की तुम्ही वर्णन केलेल्या परिस्थितीत ती राखायची कशी? त्यामुळे तुम्ही अप्रामाणिक दुनियेत अप्रामाणिकता जस्टीफाय करताय > अश्या अनेक "एथिकल" मार्गाने दुनियाभरचे बिझनेस चालतात >खेळाचे नियम जर एका पार्टीने जिंकावे या उद्देशानेच बनले असतील तर दुसर्‍या पार्टीला नियम मोडल्यावाचुन पर्याय नसतो >आणि ते ठरवताना नियमांचे अर्थ आंधळेपणाने स्विकारता येत नाहि. >हि प्रामाणिकता नियमाधारीत नाहि एव्हढाच काय तो मुद्दा आहे. >अशा वेळी मी जर शक्य तेथे नियम वाकवले तर तो माझा अप्रामाणीकपणा ठरावा काय? = थोडक्यात तुम्ही तुमच्यापरिनं उत्तर शोधलय, मग तुम्ही उद्विग्न ( >आता पर्यंत मी मिपावर अनेक बुच पाहिलेत... एव्हढा सॉलीड बुच या सम हाच. मान गए) का होताय? आपल्या दोघात कुठे काय वैयक्तिक आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/01/2012 - 00:46

In reply to अरा, प्रामाणिकता काय आहे हे प्रत्येकाला माहिती आहे by संजय क्षीरसागर

Permalink

आता हे वैयक्तीक वगैरे कुठुन आलं ??

ओ अंकलजी. टेक इट इझी. मुळात माझ्या प्रश्नाला "हो" अथवा "नाहि" इतक्या सिंपल शब्दात उत्तर देणं शक्य असताना त्यात तुम्हाला प्रथम वेगवेगळे एंगल दिसले, आता उद्विग्नता, आणि काहितरी वैयक्तीक दिसतय. आय थिंक देअर इस अ मेजर डिस्कनेक्ट. आपल्या दोघात वैयक्तीक वगैरे असायचा प्रश्नच कुठे येतो ? तुम्ही एक सिद्धांत मांडला आणि मला त्यातल्या एका उपसिद्धांतावर मी प्रश्न विचारला... बस्स. कृपया कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये. असो. एक अनुत्तरीत प्रश्न मागे ठेऊन हि चर्चा मी क्लोस करतोय. परत एकदा... कृपया कुठलाहि गैरसमज करुन घेऊ नये. आदिओस. ( भेटुया... पुढील चर्चेत... एक नए प्रश्न के साथ ;) ) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 07/01/2012 - 10:54

In reply to आता हे वैयक्तीक वगैरे कुठुन आलं ?? by अर्धवटराव

Permalink

>आता पर्यंत मी मिपावर अनेक बुच पाहिलेत

... एव्हढा सॉलीड बुच या सम हाच. मान गए हा व्यक्तीगत शेरा आहे. तुमच्या प्रश्नाला "हो" अथवा "नाही" असं उत्तर येऊ शकत नाही कारण `अप्रामाणिक दुनियेत अप्रामाणिकता जस्टीफाय होते का? असा तुमच्या प्रश्नांचा अर्थ आहे; आणि तुम्ही होते असा सूर लावला आहे हे तुमचेच प्रतिसाद वाचून तुम्हाला समजेल. तुम्हाला बहुदा उत्तरा ऐवजी सहमती हवी आहे. प्रश्न अनुत्तारित आहे असं वाटलं तरी प्रतिसाद संयत असला तर गैरसमज होणार नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/01/2012 - 18:16

In reply to >आता पर्यंत मी मिपावर अनेक बुच पाहिलेत by संजय क्षीरसागर

Permalink

हा आणखी एक वेगळा अँगल काय??

बुच बद्दल म्हणाल तर ते कोम्प्लिमेण्ट होते. त्यातही तुम्हाला व्यक्तीगत शेरा दिसला? पण आता त्यात काहि आश्चर्य वाटत नाहि. विनाकारण व्यक्तिगत शेरेबाजी आम्हि करत नाहि हो... प्रतिसाद संयतच होता. असो. चिल्ल माडी. आणि प्रश्नाबद्दल म्हणाल ते मॅटर क्लोस झालय. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 07/02/2012 - 05:57

In reply to हा आणखी एक वेगळा अँगल काय?? by अर्धवटराव

Permalink

अ‍ॅबसल्यूटली चिल्ड!

धारणारहित चित्त आहे सबब कोणत्याही धारणेला शह बसत नाही त्यामुळे कायम चिल्ड असतो. तुमच्या प्रतिसाद काँप्लिमेंटरी होता आणि व्यक्ती शेरेबाजी करत नाही या विधानांवर विश्वास ठेवून चर्चा संपवतो, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 06/30/2012 - 01:55

Permalink

डबल प्रतिसाद...

प्र.का.टा.आ. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 08/07/2018 - 13:44

Permalink

छगनलालांचे सापळ्याची कहाणी

छगनलालांचे सापळ्याची कहाणी अदभूतच आहे राव ! आता, पुढचा भाग वाचणं आलं ....... ! मुविबॉस..... _/\_ धन्यवाद, ट्रम्प ! या कहाणीचा धागा दुसर्‍या एका चर्चेत दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com