✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छगनलालांचे सापळे (भाग १)

म
मुक्त विहारि यांनी
Wed, 06/27/2012 - 04:55  ·  लेख
लेख
छगनलाल आणि कं.त नौकरीला लागून मला आज बरोब्बर २ वर्षे झाली होती.सलग २ वर्षे काम केलेली, ही माझी गेल्या ५/६ वर्षातील पहिलीच नौकरी.काय करणार, मागच्याच वर्षी लग्न झाले होते आणि घराचे हप्ते पण फेडायचे होते.तशी कं. बरी आहे.मालक बराच रगेल आणि रंगेल असला तरी, धंद्यावर त्याचे मूळापासून प्रेम आहे.आता धंद्यावर का ह्यातील पैशांवर, हा प्रश्न सोडून द्या.मारवाडी लोकांचे खरे प्रेम कोणावर, हा काही संशोधनाचा विषय नाही आहे. ह्या नौकरीवर माझा काही जीव न्हवता, पण मालकांची वागणूक , जे शिकवायची , ते कॉलेजमध्ये शिकायला मिळत न्हवते.फसवणे आणि प्रामाणीकपणा ह्या दोन पायांवर मालकांचे विश्व उभे होते. इतरांना फसवणे आणि नोकरांकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे, ही खरी मेख.माणसे ओळखण्याची कला ह्यांना जन्मजात होती आणि अतिशय गोड वाणी, ह्या फसवण्याच्या धंद्याला जोड देत होती. हा माणूस खरे तर , मूत्सद्दी म्हणून अतियोग्य.चीनची जमीन, अमेरिकेला भरमसाठ व्याजाने देवून , जपानकडून पैसे काढेल असा आणि परत दाखवेल असे , की ह्या सगळ्या भानगडीत नूकसान मात्र त्याचेच होत आहे. छगनलाल, एकदम गरीब कूटंबातील.ज्या कं,त कामाला लागला, त्याच मालकाच्या मूलीशी लग्न केले.मालकाला दूसरा पर्याय ठेवला नाही.लग्न झाले आणि दूसर्‍याच महिन्यात बाप पण झाला.म्हणजे बघा , बायको पण मिळाली, रेडीमेड धंदा पण मिळाला आणि दाखवले असे की, बघा, मी कूठे पाप लपवले आहे? शिवात मेहूणी बोनस.(हा मेहूणीचा किस्सा परत कधी तरी) माझी आणि छगनलालची ओळख माझ्या मित्रा मूळे झाली.त्याने नौकरी सोडली आणि मालकाकडे माझी शिफारस केली.मालकाने मला इंटरव्ह्यूला मुंबईला बोलावले.ऑफीस एकदम चकाचक.एक पण पूरूष स्टाफ नाही.सगळ्या मूली, स्वर्ग सोडून मुंबईला आल्या आहेत की काय? असे वाटावे.ह्यातली एक पण मूलगी , आपल्याला मिळणार नाही, मग कशाला त्यांच्यावर लाईन मारा आणि आपला वेळ खर्च करा.नंतर समजले की, ह्या मूली , एयरर्लाइन इन्स्टिट्यूट मधल्या आहेत आणि ही सगळी मालकांच्या मूलाची कामगिरी आहे.(बाप बोटभर तर बेटा हात भर).सवईप्रमाणे मी पुस्तक वाचायला सूरूवात केली.इंटरव्ह्यूला जातांना , मी पुस्तक घेवून जातो.तेव्हढाच टाईमपास. १५/२० मिनिटांनीच साहेबांनी बोलावले.प्रथमदर्शनीच नजरेत भरले ते, त्यांचे टोकदार नाक आणि भेदक डोळे.छान दाढी केलेला चेहरा आणि सूवासिक अत्तराचा घमघमाट.शिक्षण किती वगैरे गोष्टीत जास्त रस न घेता, कूठे जॉब करतोस ते विचारले.हाताखाली कामगार किती?आई वडील काय करतात? भाउ-बहीण किती? असेच प्रश्न विचारले. काम करतांना काय-काय अडचणी आल्या , आणि त्या कशा सोडवल्या, ह्यातच रस जास्त होता.मित्राने , आधीच कल्पना दिली होती,प्रामाणिक रहा.खोटे बोलू नकोस.शाळा ते कॉलेज काय उद्योग केले ते सगळे सांगातले.अगदी मारामार्‍या ते दारूची अवैध वाहतूक.(मी दमण ते बलसाड , दारू नेत असे) अवैध वाहतूक , म्हणाल्याबरोबर , त्यांचे डोळे , मवाळ झाले.मवाळ डोळे म्हणजे धोका, हे ओळखायची वेळ अजून यायची होती.आज देखील, मी कूणी जास्त सलगी दाखवायचा किंवा अति प्रेमाने बोलायचा प्रयत्न केला की सावध होतो.त्या नौकरीनंतर मला कूणीच फसवू शकले नाही.शेवटी मालकाने एक प्रश्न विचारला. अवैध वाह्तूकीत तूझा जोडीदार कोण? मी म्हणालो, "नौकरी द्यायची असेल तर द्या.मित्राचे नांव सांगणार नाही." वातावरण थोडे तापले, असे त्याला वाटले आणि त्याने जॉब ऑफर दिली.सगळा तोंडी व्यवहार.पगार अमुक तमुक, बोनस नाही , ट्रॅव्हलिंग अलाउन्स अमुक-तमुक इ.ऑफीस जरी मुंबईला असले तरी , मला दमणची फॅक्टरी, बघायची होती.मालक आठवड्याला जे टार्गेट देईल, ते पूर्ण करायचे आणि ते पण ओव्हरटाईम न देता. दूसर्‍या दिवशी , कामावर रूजू झालो.काम काय तर, CO2 मीटर बनवायचे.हे सगळे मीटर जाणार कूठे ? तर, गुजरात सरकारने, नविन कायदा आणला होता, की दर सहा महिन्यांनी , प्रत्येक वाहनाची तपासणी करायची, की ते किती धूर सोडत आहेत?आपण त्यात जास्त डीटेल्स मध्ये नको जायला.खुद्द मालकाच्या जावयानेच , मोठ्या शहरांत ह्याची एंजन्सी घेतली होती.तालूका प्रदेश मात्र सोडले होते.आमचे मशीन काय लायकीचे होते , ते आमचे आम्हालाच माहीत. मूळात , ती एका फ्रेंच मशीनची भ्रष्ट नक्कल होती. एके दिवशी , मालकाला समजले, की गूजरातमध्ये हा असा-असा कायदा येणार आहे.मालकाने लगेच चौकशी केली आणि समजले की , असे मशीन फ्रान्स मध्ये बनते,मालकाने ते खरेदी करायला पैसे गोळा करायला सुरुवात केली.जवळचा माणूस न बघता, दूरचा माणुस बघितला.अहमदाबाद मधला एक व्यापारी गळाला लागला.त्याच्या बरोबर तोंडी व्यवहार ठरवला.मशीनची मूळ किंमत अधिक टॅक्स मिळून जवळ-जवळ ४ लाख रुपये होते.मालकाने त्याच्याकडून २ लाख घेतले.त्याबद्दल त्याला ५०% पार्टनरशीपची ऑफर दिली. फ्रान्स मधून मशीन मागवले, ते परत बोलीवर.९० दिवसांचा वेळ घेतला. मशीन आल्याबरोबर,पैसे चारून , बिना कस्टम बाहेर काढले.दूसर्‍या दिवशी, एका एक्स्पर्ट तंत्रज्ञानाला बोलावून ते मशीन दाखवले.असेच दूसरे मशीन तयार केलेस तर, ५% पार्टनरशीप देवू केली.त्याने, भरपूर मेहनत घेवून ते मशीन तयार केले, पण एक प्रॉब्लेम आलाच. मुख्य सेंसर सोडून बाकी सगळे पार्टस इथे मिळत होते.पण सेंसर काही इथे तयार करता येणार न्हवता आणि आयात सेंसरची किंमत एक लाख रु. होती. मालकाने डोके लावले, आणि म्हणाला. दूसरे कोई भी गॅस का चलाके देख.ऑक्सीजन नही तो हवा,कुछ तो दिखायेगा. अपनेको तो रीडींग दीखानेका है. सेंसर थोडी दिखानेका है? लडकी देखनेको जाता है, तो क्या देखता है? लडकी का चेहरा ..... या.... उसके......... पाँव? (मालकाचा हा डायलॉग नंतर पूर्ण कं.त फेमस झाला) शेवटी, एक ऑक्सीजन सेंसर थोडा मॅच झाला.रीडींग डिस्प्ले सर्कीट मध्येच थोडा फेर फार केला आणि मशीन बनवले.ओरिजनल मशीनचा सेंसर आपल्या मशीनला लावला आणि आपले मशीन पास करून घेतले.ते पास झाल्यावर, मूळ मशीन, बिना सेंसरचे , परत कस्टम मध्ये ठेवून दिले.मोजून ३ दिवसांत ही भानगड केली.दूपारी २ ला मशीन दाखवून संध्याकाळी ४च्या आत सर्टिफिकेट मिळवले. दूसर्‍या दिवशी, ते राजरोस फ्रेंच कं.च्या इथल्या इंजिनियर बरोबर बाहेर काढले.त्याने पॅकिंग उघडताच ओळखले, की काही तरी मामला आहे. छगनलालने तोपर्यंत ह्या ५/६ तासांत त्या माणसाला पटवले होतेच आणि पोलीस केस केली तर , आपल्याच देशाचे कसे नूकसान होईल, तिच्या प्रतिष्ठेला कसा धक्का लागेल, वगैरे सांगून.. आपण एक वेगळा अर्ज लिहू या, की मशीन मधला सेंसर काम करत नाही आहे.तू मला स्पेयर सेंसर दे.मी तूला पैसे देतो.आता माझ्याकडे १० हजार आहेत. ते तू घे आणि एखादा बिघडलेला सेंसर कं.ला दाखव.मी केस करत नाही. तसा अर्ज लिहून घेतला आणि सही मात्र नौकराची घेतली. नौकर पण तयार, त्याने पण लगेच सही केली. एका सहीचे त्याला ५००रु. मिळायचे. (पण मालकाने केस केलीच) अशा प्रकारे, CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर लावून आमची कं. चालू झाली.शिवाय आता एकाच्या जागी २ सेंसर झाले.५% वाला पार्टनर आणि ५० % वाला पार्टनर , ह्यांचे काय झाले, ते आपण , पूढील भागात पाहू या.....
  • छगनलालांचे सापळे (भाग २)
  • छगनलालांचे सापळे (भाग ३)
  • छगनलालांचे सापळे (भाग ४)
  • छगनलालांचे सापळे (भाग ५)
  • छगनलालांचे सापळे (भाग ६)
  • छगनलालांचे सापळे (भाग ७)
  • छगनलालांचे सापळे (भाग ८)
  • छगनलालांचे सापळे (भाग ९)

Book traversal links for छगनलालांचे सापळे (भाग १)

  • छगनलालांचे सापळे (भाग २) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
26674 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

रोचक सुरूवात...

श्रीरंग_जोशी
Wed, 06/27/2012 - 05:10 नवीन
एका चालू कंपनीच्या महाचालू मालकाचे चित्र चांगले आहे. मात्र कथेने अजून तेवढी पकड घेतल्याचे वाटत नाही. पुभाप्र!!
  • Log in or register to post comments

परखड आणि स्पष्ट , प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

मुक्त विहारि
Wed, 06/27/2012 - 05:21 नवीन
... सुधारायचा प्रयत्न करीन... जमेल की नाही ते माहीत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

खरी असल्यासारखेच वाटते आहे..

मराठमोळा
Wed, 06/27/2012 - 06:11 नवीन
खरी असल्यासारखेच वाटते आहे.. कारण लुप होल सापडायला मार्ग नाही. (मला फार कळतं अशातला भाग नाही) लिहा पुढचे लवकर. :)
  • Log in or register to post comments

+१ आणि +१

शिल्पा ब
Wed, 06/27/2012 - 06:47 नवीन
+१ आणि +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

आयला !!

अर्धवटराव
Wed, 06/27/2012 - 06:32 नवीन
इंडीया शायनींग ची कथा ;) मस्त सुरुवात झाली. येउ देत पुढील भाग लवकर. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

हा हा हा! असेच म्हणतो! येऊदे

ऋषिकेश
Wed, 06/27/2012 - 12:05 नवीन
हा हा हा! असेच म्हणतो! :) येऊदे पुढला भाग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अगदी अगदी पुढिल भाग लौकर

नाना चेंगट
Wed, 06/27/2012 - 12:22 नवीन
अगदी अगदी पुढिल भाग लौकर टाकणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मस्त लिहिलं आहेस, एका खुप

५० फक्त
Wed, 06/27/2012 - 07:55 नवीन
मस्त लिहिलं आहेस, एका खुप मोठ्या विषयाला हात घातला आहेस, अशी ट्रेड सिक्रेट प्रत्येक धंद्यात असतातच, उदा. तुम्ही इथं जे फ्रेंच मशीन म्हणताय तेच मशीन जर त्या मुळ कंपनीला फ्रान्समध्ये वापरण्यासाठी करायचे असेल तर त्याचे स्पेसिफिकेशन्स तिथल्या सिस्टिमला अ‍ॅडजेस्ट केलेले असतील,
  • Log in or register to post comments

मूळात आपले सरकार

मुक्त विहारि
Wed, 06/27/2012 - 08:06 नवीन
चालते ते कागदपत्रावर. रीडींग दाखवतय ना? आणि ते त्या रेंज मध्ये आहे ना? मग झाले. सरकारची अशीच भूमिका असते आणि व्यापारी , बनेल लोक ह्याचाच फायदा घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

उत्तम

अमितसांगली
Wed, 06/27/2012 - 08:19 नवीन
मालक व त्याच्या मुलाचे पराक्रम बघून काही काळ मल्ल्यांची आठवण झाली.... फसवणे आणि प्रामाणीकपणा ह्या दोन पायांवर मालकांचे विश्व उभे होते. चीनची जमीन, अमेरिकेला भरमसाठ व्याजाने देवून , जपानकडून पैसे काढेल असा आणि परत दाखवेल असे , की ह्या सगळ्या भानगडीत नूकसान मात्र त्याचेच होत आहे. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

मस्त

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 06/27/2012 - 11:22 नवीन
फसवणे आणि प्रामाणीकपणा ह्या दोन पायांवर मालकांचे विश्व उभे होते. चीनची जमीन, अमेरिकेला भरमसाठ व्याजाने देवून , जपानकडून पैसे काढेल असा आणि परत दाखवेल असे , की ह्या सगळ्या भानगडीत नूकसान मात्र त्याचेच होत आहे
मस्त सुरवात, पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments

मुव्या, लै भारी, लेका असं काही तरी लिही!

संजय क्षीरसागर
Wed, 06/27/2012 - 11:31 नवीन
मी तर पैल्यांदाच बोल्लोय - पैसा ( http://www.misalpav.com/node/22039) झाला मोठा माणूस झाला खोटा
  • Log in or register to post comments

माणूस झाला खोटा

रामदास
Wed, 06/27/2012 - 21:04 नवीन
एक वाचलेली कविता आठवली ती अशी... ये रे ये रे माणसा तुला देतो पैसा पैसा झाला मोठा माणूस झाला खोटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कथा एक नंबर!!!! पुभाआप्र.

बॅटमॅन
Wed, 06/27/2012 - 11:57 नवीन
कथा एक नंबर!!!! पुभाआप्र.
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात ..

पहाटवारा
Wed, 06/27/2012 - 13:28 नवीन
पुढील कारनाम्यांच्या प्रतिक्षेत !
  • Log in or register to post comments

हुशारी.

प्रभाकर पेठकर
Wed, 06/27/2012 - 14:20 नवीन
एक सेन्सरचा मुद्दा सोडला तर बाहेरचे मशीन आणून तसेच्या तसे इथे बनवायचे ह्यात गैर काही नाही. सरकरला फसविणे, कस्टमला 'मॅनेज' करणे इत्यादी प्रकार सर्रास अनेक कंपन्या(नुसत्या भारतियच नाही तर, परदेशी कंपन्याही) करीत असतातच. तेंव्हा इतर उद्योजकांच्या तुलनेत त्यांनी काही फार गंभिर गुन्हा केला आहे असे नाही. उद्योजकांच्या जमातीत ह्याला 'हुशारी' म्हणतात. पण, कथा म्हणून मस्त आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे. लवकर येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

+१

प्रास
Wed, 06/27/2012 - 15:29 नवीन
पेठकर काकांशी सहमत आहे. कथा छान वाटतेय. आवश्यक ती सगळी सामग्री त्यात उपलब्ब्ध असल्याचे जाणवतेय. मुविंना शुभेच्छा! पुभाप्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पुढच्या

sneharani
Wed, 06/27/2012 - 14:30 नवीन
पुढच्या भागाची प्रतिक्षा...येऊ दे लवकर! :)
  • Log in or register to post comments

छान सुरुवात बर्याचदा अस्सच

पियुशा
Wed, 06/27/2012 - 15:25 नवीन
छान सुरुवात :) बर्याचदा अस्सच चालत ,दिखाउ माल फसवा धंदा , पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

काही प्रतिसाद फार लाजीरवाणे वाटले

संजय क्षीरसागर
Wed, 06/27/2012 - 16:01 नवीन
ज्या प्रकारे हा उद्योजक धंदा करतोय त्याला हुशारी म्हणण अत्यंत खेदजनक आहे. जगभरात काय चालतं किंवा इतर काय करतात हा प्रश्न नाही आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे. संपूर्ण भारतीय बिजिनेस एथिक्सला ही मानसिकता लाजेनं खाली मान घालायला लावेल. मुविनं नोकरी स्विकारली आणि ती घटना घडून गेलीये म्हणून जाऊं द्या मी व्यक्तीशः अश्या क्लायंटसाठी कधीही काम करणार नाही .
  • Log in or register to post comments

अरे बाबा!!!

मुक्त विहारि
Wed, 06/27/2012 - 18:09 नवीन
हे सगळे, काल्पनिक आहे... सरकार एखादे चांगले काम करायला जाते आणि त्या कामाची वाट लावायला, त्यातून फायदा काढायला सगळे तयार होतात. सरकारी धोरण, जनतेचा फायदा कसा होईल ते ठरवते. व्यापारी लोक, मुख्य मलिदा कसा काढता येईल, हे बघतात. तर बाबू लोक. कागदपत्रांची किंमत वसूल करतात. ह्या ३ बेसिक गोष्टींवर , हे आधारीत आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वास्तव..

प्रभाकर पेठकर
Wed, 06/27/2012 - 19:24 नवीन
सरकारी धोरण, राजकारण्यांचा फायदा कसा होईल ते पाहते. व्यापारी लोक, मुख्य मलिदा कसा काढता येईल, हे बघतात. तर बाबू लोक. कागदपत्रांची किंमत वसूल करतात. असहाय्य जनता मात्र भरडली जाते. कथानक काल्पनिक असलं तरी, हे वास्तव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

१००%सत्य...

मुक्त विहारि
Wed, 06/27/2012 - 19:37 नवीन
अगदी योग्य..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

जनता मात्र भरडली जाते.

रामदास
Wed, 06/27/2012 - 21:07 नवीन
क्या फर्क पडता है राजा राम हो या रावण जनता तो सिता होती है अगर राजा रावण है तो सिताको घरसे अगवा करेगा अगर राम है तो जिंदा जमीनमे दफनाएगा क्या फर्क पडता है (जशी आठवली तशी लिहीलेली आहे.चूभूदेघे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

राम रावण

स्मिता.
Wed, 06/27/2012 - 22:46 नवीन
राम / रावण यांच्यात तुलना होते तेव्हा नेहमीच राम सज्जन आणि रावण दुर्जन असतो. पण शेवटी सितेच्या सोबत जे घडले त्याबाबतीत दोघांनाही एकाच माळेत बघून वेगळे (चूक नाही) वाटले, रूपक समर्पकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

असहमत.

आनंदी गोपाळ
Sat, 06/30/2012 - 21:52 नवीन
सरकारी धोरण, राजकारण्यांचा फायदा कसा होईल ते पाहते. व्यापारी लोक, मुख्य मलिदा कसा काढता येईल, हे बघतात. तर बाबू लोक. कागदपत्रांची किंमत वसूल करतात. असहाय्य जनता मात्र भरडली जाते. कथानक काल्पनिक असलं तरी, हे वास्तव आहे.
माफ करा. पहिल्या प्रतिसादात मुवि लिहितात ते बरोबर आहे. सरकारी धोरण 'जनतेचाच' कसा फायदा ते पहात असते. राजकारणी व धंदेवाले चांगली 'स्कीम' 'खाली' पोहोचू देत नाहीत, अन बाबू लोक + बेपारी मिळून लूटमार करतात. सगळे खापर 'सरकार' नावाच्या अमॉर्फस वस्तूवर फोडले कसे जाईल हेही पहातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

थोडं जास्त काळं बेरं आहे, मान्य...

अर्धवटराव
Wed, 06/27/2012 - 23:07 नवीन
या केस मुख्य सेवेच्या प्रामाणीकपणाच्या बाबतीतच तडजोड आहे, तेंव्हा तो गंभीर गुन्हा आहे, मान्य. पण लॉबींग करुन आपल्या उत्पादनाची खरेदी करायला भाग पाडणे, गरज निर्माण करणे, प्रतिस्पर्ध्याला भांडवल-कॉपी राईट्स-आय पी वगैरे जंजाळात बुडवुन मागे पाडणे.. अश्या अनेक "एथिकल" मार्गाने दुनियाभरचे बिझनेस चालतात- वाढतात. चीन च्या घोडदौडीला हा वारु तर फार मदत करतोय. अश्यावेळी कितिही चोख आणि प्रामाणिकपणे सेवा देतो म्हटलं तरी पंखच छाटले जातात तेंव्हा अशे तेढे मार्ग अवलंबणे भाग असते. अफु आणि मक्याच्या पिकाचे माफिया आणि पोर्क-बीफ सप्लाय करणार्‍या अवाढव्य कंपन्या मेक्सीकोच्या शेती व्यवसाय गुंडाळायला निघालेत. शिवाय तिथल्या तेलविहीरींची मक्तेदारी बिगब्रदर कडे. तेथील शेतकर्‍याला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी शेवटी कायद्याच्या लुपहोल्स्चा, भ्रष्टाचाराचा मार्गच निवडावा लागतोय... काय करतो बिचारा. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>अश्यावेळी कितिही चोख आणि प्रामाणिकपणे सेवा देतो म्हटलं तरी

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/28/2012 - 08:25 नवीन
पंखच छाटले जातात तेंव्हा अशे तेढे मार्ग अवलंबणे भाग असते = ही अत्यंत चुकीची आणि सर्वस्वी गर्तेत नेणारी मानसिकता आहे. प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या व्यक्तीसमूहाला समाज किंवा देश म्हटलय त्यामुळे व्यक्ती नेहमी प्रार्थमिक आहे, देश किंवा समाज या निव्वळ उपयोगी कल्पना आहेत. जर समाज किंवा देश नितीमान व्हावा असं वाटत असेल तर व्यक्तीची मानसिकता बदलायला लागते आणि सुरुवात नेहमी स्वतःपासून होते. आपण आपला मोह व्यवस्था, राजकारणी, समाज यांच्यावर ढकलून स्वतःला जस्टीफाय करतो त्यामुळे स्वतः कधीही बदलत नाही आणि भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनून पुन्हा ती सुदृढ करतो. याउप्पर अशी विचारसरणी चारचौघात पसरवून इतरांनाही `हे असंच चालायच' अशी मनोधारणा करायला प्रवृत्त करतो त्यामुळे कोणताही बदल असंभव होतो. चूक आणि भ्रष्टाचार यात फरक आहे, माझी चूक होऊ शकते पण मी भ्रष्ट कधीही होणार नाही किंवा कुणाला भ्रष्ट करणार नाही ही मानसिकता ठेवा तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटायला लागेल. चूक झाली तर आपण ती मान्य करुन, त्याचे परिणाम स्विकारुन त्यातनं मोकळे होऊ शकतो पण भ्रष्टाचार तुम्हाला तुमचं इमान विकायला लावतो कारण ती जाणूनबुजून केलेली फसवणूक असते. भ्रष्टाचार किंवा फसवणूक ही हुशारी नाही, ती स्वतःची केलेली फसवणूक आहे. भले तुम्ही त्यातनं कितीही सहीसलामत बाहेर पडा तुम्ही स्वतःला अत्यंत दयनीय पातळीवर आणून ठेवलेलं असतं, पैश्यापुढे तुम्ही स्वतःला क्षूद्र केलेलं असतं. मग अश्या व्यक्ती स्वतःला आणि दुसर्‍याला त्याच्या सांपत्तिक स्थितीवर तोलतात आणि इतरांना आधीच आर्थिक काँप्लेक्स असल्यानं ते खजील होतात. चुकीच्या साधनांनी कधीही श्रेयस साधता येत नाही... ते चुकीचा रस्ता योग्य ठिकाणी नेईल अशा भ्रमात राहणं आहे. इमानी माणसाला समाज साथ देतो का आणि नियतीला तारतम्य आहे का मला माहिती नाही पण तुमचं मन तुम्हाला कधीही लज्जित करु शकत नाही आणि ज्याला मन लज्जित करु शकत नाही त्याला मोह आणि मत्सर कधीही स्पर्श करु शकत नाहीत. मी तुम्हाला उगीच तत्वज्ञान शिकवत नाही, तुमचा पूर्वेतिहास किंवा धारणा काहीही असोत, तुम्ही आजपासून तुमची मानसिकता बदलून पाहा तुम्हाला एकदम स्वच्छ आणि मोकळं वाटायला लागेल. साली ही प्रामाणिकता चीजच काही और आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

साली ही प्रामाणिकता चीजच काही और आहे!

अर्धवटराव
गुरुवार, 06/28/2012 - 08:49 नवीन
होय. मरे हुए जमीर का बोझ सबसे भारी होता है. आणि भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याचाही प्रश्न नाहि. पण जसा रोग तसा इलज करावा लागतो. खेळाचे नियम जर एका पार्टीने जिंकावे या उद्देशानेच बनले असतील तर दुसर्‍या पार्टीला नियम मोडल्यावाचुन पर्याय नसतो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

उगीच कल्पनाविलासात अर्थ नाही

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/28/2012 - 08:57 नवीन
ट्रकही आपला नाही, टोल नाक्यावर आपण उभे नाही आणि ट्रकमधे माल काय आहे ते माहिती नाही. मला वाटतं काय लिहिलय ते शांतपणे न वाचता उगीच लगबगीनं प्रतिसाद दिले जातायत. इमान कुणाचं विकलं गेलय आपलं की कंपनीच? तुमचं इमान शाबूत ठेवणं तुमच्या हातात आहे आणि हे प्रत्येकाच्या लक्षात आलं तरच इमान काय चीज आहे ते कळेल. पहले खुदका इमान तो परखो फिर उसमें जिओ तब जानोगे इमान क्या कयामतकी चीज थी (हे असं होतं, माझं उत्तर यायच्या आत तुम्ही पुन्हा प्रतिसाद बदलला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सत्य/कल्पित काहीही असले तरी

बॅटमॅन
गुरुवार, 06/28/2012 - 17:39 नवीन
सत्य/कल्पित काहीही असले तरी त्यावर बोधपर प्रतिसाद दिलाच पाहिजे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दुर्दैवाने म्हणावं लागतय...

अर्धवटराव
गुरुवार, 06/28/2012 - 21:27 नवीन
संजयजी, तुम्ही मनमानिपणे चर्चेचा ट्रॅक ठरवण्याचा अट्टहास धरता. >>ट्रकही आपला नाही, टोल नाक्यावर आपण उभे नाही आणि ट्रकमधे माल काय आहे ते माहिती नाही. -- अत्यंत असंबद्ध प्रतिसाद. या पलिकडे काहिही म्हणता येणार नाहि या वाक्याला. >>मला वाटतं काय लिहिलय ते शांतपणे न वाचता उगीच लगबगीनं प्रतिसाद दिले जातायत. -- दुर्दैवाने मला हे सतत तुमच्या बाबतीत जाणवायला लागलय. >>इमान कुणाचं विकलं गेलय आपलं की कंपनीच? तुमचं इमान शाबूत ठेवणं तुमच्या हातात आहे आणि हे प्रत्येकाच्या लक्षात आलं तरच इमान काय चीज आहे ते कळेल. -- आयडीअल सिचुएशन काय असावी हा चर्चेचा मुद्दाच नाहि. >>पहले खुदका इमान तो परखो फिर उसमें जिओ तब जानोगे इमान क्या कयामतकी चीज थी -- अशी परख न करता लोकं तुम्हाला रिप्लाय देतात असा ग्रह आहे का तुमचा ? >>(हे असं होतं, माझं उत्तर यायच्या आत तुम्ही पुन्हा प्रतिसाद बदलला) -- हे असं पहिल्यांदा झालय. आणि याचं मुख्य कारण म्हणजे मी पहिले प्रातिनिधीक उदाहरण दिलं होतं ( टोलनाक्याचं ) आणि त्याचा मतितार्थ लक्षात न घेता, मतितार्थावर चर्चा न करता त्यावरुन चर्चेला वेगळे फाटे फुटतील ( जसं तुमच्या प्रतिसादात झालय) असं माझ्या लक्षात आलं म्हणुन मी मग डायरेक्ट मतितार्थ मांडला. तरि दुर्दैवाने असे फाटे फुटलेच. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ बॅटमन आणि अर्धवटराव

संजय क्षीरसागर
Fri, 06/29/2012 - 00:10 नवीन
@ बॅटमन >सत्य/कल्पित काहीही असले तरी त्यावर बोधपर प्रतिसाद दिलाच पाहिजे का? = कथा कल्पित आहे हे मुविनं माझ्या प्रतिसादा नंतर क्लिअर केलय तस्मात तुमचा प्रतिसाद गैरलागू आहे @ अर्धवटराव >संजयजी, तुम्ही मनमानिपणे चर्चेचा ट्रॅक ठरवण्याचा अट्टहास धरता. = तसं अजिबात नाही , माझ्या अशा प्रतिसादावर : `जगभरात काय चालतं किंवा इतर काय करतात हा प्रश्न नाही आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे' तुमच्या प्रतिसादात असा मुद्दा आहे : >अश्यावेळी कितिही चोख आणि प्रामाणिकपणे सेवा देतो म्हटलं तरी पंखच छाटले जातात तेंव्हा अशे तेढे मार्ग अवलंबणे भाग असते त्याला मी उत्तर दिलय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

माझंही उत्तर अगदी साफ होतं...

अर्धवटराव
Fri, 06/29/2012 - 00:40 नवीन
बायस्ड नियमांवर आधारीत निकष प्रामणिकपणाला चॅलँज देऊ शकत नाहि इतका सिंपल मुद्दा मी मांडला. आणि हे ज्याचं तो ठरवेल. आणि ते ठरवताना नियमांचे अर्थ आंधळेपणाने स्विकारता येत नाहि. जगभर - इतर जर आपल्यासंबंधी व्यवहारात नेमकं काय चाललय हे ठरवल्याशिवाय पाऊल टाकता येते नाहि. त्यात कुठलीच आत्मघाती/गलिच्छ वृत्ती नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझी टॅग लाईन ही आहे

संजय क्षीरसागर
Fri, 06/29/2012 - 00:42 नवीन
`ज्या प्रकारे हा उद्योजक धंदा करतोय त्याला हुशारी म्हणण अत्यंत खेदजनक आहे. जगभरात काय चालतं किंवा इतर काय करतात हा प्रश्न नाही आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे' आणि ती प्रामाणिकपणाची व्याख्या आहे, तो बायस्ड नियमांवर आधारित निकष नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

माझं अगदी पहिलं वाक्य...

अर्धवटराव
Fri, 06/29/2012 - 01:07 नवीन
"या केस मुख्य सेवेच्या प्रामाणीकपणाच्या बाबतीतच तडजोड आहे, तेंव्हा तो गंभीर गुन्हा आहे, मान्य." प्रामाणीकपणाच्या आवश्यकतेत कुठेच छेद दिलेला नाहि. हि प्रामाणिकता नियमाधारीत नाहि एव्हढाच काय तो मुद्दा आहे. आणि हा मुद्दा कुठल्याच गर्तेत नेत नाहि, उलट गर्तेतुन बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतो हि व्यवहार्यता. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अर्धवटराव जाऊं द्या

संजय क्षीरसागर
Fri, 06/29/2012 - 01:18 नवीन
तुमच्या त्याच प्रतिसादात तुम्ही शेवटी म्हटलय >तेथील शेतकर्‍याला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी शेवटी कायद्याच्या लुपहोल्स्चा, भ्रष्टाचाराचा मार्गच निवडावा लागतोय... काय करतो बिचारा याला माझं पहिल्या प्रतिसादापासून कायम एकच उत्तर आहे : `आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे' आणि अर्थात तोच गर्तेतनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बरं.. जाऊ द्या.

अर्धवटराव
Fri, 06/29/2012 - 01:25 नवीन
>>याला माझं पहिल्या प्रतिसादापासून कायम एकच उत्तर आहे : `आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा किती चोख देतो याला महत्त्व आहे' आणि अर्थात तोच गर्तेतनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे -- म्हणजे व्यवहारातला चोखपणा हा गर्तेतं निघण्याचा मार्ग आहे, नियमातला प्रामाणिकपणा नाहि. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्रामाणिकता ही अंतर्बाह्य एकच आहे

संजय क्षीरसागर
Fri, 06/29/2012 - 08:53 नवीन
आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा चोख देतो याचा अर्थच आपण नियमातही प्रामाणिक आहोत. व्यवहार आणि नियम दोन्ही एकच आहेत. या कथेसंदर्भात `CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर' लावला तेव्हा एकाच वेळी प्रामाणिकता, नियम आणि व्यवहार सगळ्याच बाबातीत इमान हरवलं आणि ज्या क्षणी तो सेंसर योग्य असेल त्या क्षणी ही सर्व परिमाणं एका वेळी साध्य होतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आय डिसअ‍ॅग्री

अर्धवटराव
Fri, 06/29/2012 - 09:45 नवीन
>>आपण आपलं प्रडक्ट आणि सेवा चोख देतो याचा अर्थच आपण नियमातही प्रामाणिक आहोत. -- अनेक ठिकाणी असं नसतं. ( आणि हे केवळ अप्रामाणीकपणे फायदा कमवायला नाहि तर कर्तव्यपुर्तीसाठी देखील करावं लागतं... पण हे झालं अवांतर) >>व्यवहार आणि नियम दोन्ही एकच आहेत. -- अनेक ठिकाणी असं नसतं. >>या कथेसंदर्भात `CO2 सेंसरच्या जागी, ऑक्सीजन सेंसर' लावला तेव्हा एकाच वेळी प्रामाणिकता, नियम आणि व्यवहार सगळ्याच बाबातीत इमान हरवलं -- या कथेसंदर्भात इमान हरवलं. नियम वाकवले. व्यवहार साधला. >>आणि ज्या क्षणी तो सेंसर योग्य असेल त्या क्षणी ही सर्व परिमाणं एका वेळी साध्य होतील -- आय सी. म्हणजे सेन्सर जर बरोबर असेल तरः १) अश्या डिव्हायसेसची गरज निर्माण होणार आहे हे जाणणे (अर्थात, इथे आपले पॉलिटिकल कनेक्शन वापरुन. इथेही "रोकडा" व्यवहार आलाच ) २) कस्ट्म मधुन इल्लीगली डिव्हाइइस बाहेर काढणे ३) मूळ निर्मात्या कंपनीची परवानगी न मागता त्याचे डुप्लिकेट तयार करणे ४) इतर कुणाला सुगावा लागण्या अगोदर, टेंडर वगैरे निघण्या अगोदर आपले डिव्हाईस पास करुन घेणे ५) चोरी पकडली गेल्यास "यात देश्याच्या अब्रुचे धिंडवडे निघतील" अशी भिती घालणे व प्रकरण दाबणे हे सर्व व्यवहार "प्रामाणीक"पणा पावतील, आणि सर्व काहि "नियमात" बसेल. इंटरेस्टींग. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अरा, तुमच्याकडून एक इंटरेस्टींग गोष्ट शिकण्यासारखी आहे

संजय क्षीरसागर
Fri, 06/29/2012 - 11:45 नवीन
आपलं चुकीचं म्हणणं दुसर्‍याला सिद्ध करायला लावणं! प्रतिसाद खाली दिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तुम्ही असं म्हणताय गुरु??

अर्धवटराव
Fri, 06/29/2012 - 18:33 नवीन
आता हे तुम्ही सिद्ध करा बघु :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दादा, प्रतिसाद खाली दिलाय

संजय क्षीरसागर
Fri, 06/29/2012 - 18:51 नवीन
हे वाचलं नाहीत बहुदा! असं होतं गडबडीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अजीबात गडबडीत नाहि.

अर्धवटराव
Sat, 06/30/2012 - 02:02 नवीन
खालचा प्रतिसाद देखील वाचला होता. त्यात काहिच सिद्ध झालेलं नाहि :( अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मुळात कथा सत्य आहे की मिथ्या

बॅटमॅन
Sat, 06/30/2012 - 01:59 नवीन
@ संजय क्षीरसागर मुळात कथा सत्य आहे की मिथ्या याचा त्या बोधामृताशी काहीही संबंध नाही . ही ऊठसूट बोधपर जिलेब्या पाडण्याची सुरसुरी गैरलागू आहे इतकेच निरीक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काय लागू आहे आणि काय गैर

संजय क्षीरसागर
Sun, 07/01/2012 - 00:17 नवीन
यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तस्मात पुन्हा गैरलागू प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा सल्ला नसून हे एक निरीक्षण

बॅटमॅन
Sun, 07/01/2012 - 01:52 नवीन
हा सल्ला नसून हे एक निरीक्षण आहे असे प्रतिसादातच स्पष्ट केलेले आहे आणि निरीक्षणे लागू/गैरलागू नसतात. मला ऊठसूट सल्ला देण्याची सुरसुरी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

काहीही कारण नसताना तुमचे माझ्या लेखनावर चार तिरकस

संजय क्षीरसागर
Sun, 07/01/2012 - 10:51 नवीन
प्रतिसाद आहेत. नुसतं निरिक्षण नोंदवतो म्हटल्यानं तिरकसपणा लपत नाही. असे प्रतिसाद मत्सर दर्शवतात असा निष्कर्श आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ब्वॉर्र्र्र्र...........चालूद

बॅटमॅन
Sun, 07/01/2012 - 14:51 नवीन
ब्वॉर्र्र्र्र...........चालूद्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मस्त कथा!

पैसा
Wed, 06/27/2012 - 19:43 नवीन
लवकर येऊ द्या पुढचा भाग!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा