स्किझोफ्रेनिया नावाचा एक आजार असतो. यात म्हणे रुग्ण मधूनच स्वत:च्या मूळ स्वभावाशी एवढा विसंगत वागतो, की "हाच का तो?" असा समोरच्याला प्रश्न पडावा. शिवा, सरकार, सत्या, कंपनी, बनवणारा रामगोपाल वर्मा पुढे RGVकी आग, जेम्स, डिपार्टमेंट बनवेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? हिंदी चित्रसृष्टीत रामू हा या आजाराचं सर्वात ठळक व एकमेव उदाहरण आहे.... असा मझा कालपर्यंतचा भ्रम होता.
गुलाल, ब्लॅक फ्रायडे, उडान, यासारख्या चित्रपटांचा अनुभव गाठीशी , व मनोज बाजपेयीसारख्या कसलेल्या अभिनेत्याला घेऊन अनुराग कश्यप साहेबांनी "गँग्स ओफ वासेपूर" प्रदर्शित केल्यामुळे सहाजीकच अपेक्षा उंचावल्या होत्याच ("तेरी कह के लूंगा" वगैरे जाहिरातीमध्ये दिसणार्या ओळी, वास्तवीक प्रेक्षकांना उद्देशून होत्या हे समजेपर्यंत उशीर झाला). असो.
या वास्तवदर्शी वगैरे चित्रपट बनवू पाहणार्यांची काही गृहतिके, काही ठाम समज असावेत.
१. गरज असो अथवा नसो, भ***, भो***, गां** आदि शब्दांची स्वैर उधळण ही चित्रपटातील संवादांना वेगळ्या उंचीवर नेते.
२. चित्रपटातील प्रमुख स्त्री पात्र जितकी भडक, आक्रस्ताळी, कर्कश दाखवता येतील तितक चित्रपट वास्तवाच्या अधिक जवळ जातो. प्रसूतीच्या वेळच्या किंकाळ्या दीर्घकाळ व बारकाईने दाखवणे हा तर प्रतिभेचा उत्कर्षबिंदू.
३. प्रमुख पात्रांच्या प्रणयक्रीडा, किमान त्याबद्दलचे सतत उल्लेख, वर्णनं ही कथानकाची गरज नसताना घुसवता आली तर उत्तमच.
४. हिंसा दाखवायची म्हणजे रक्ताची थारोळी, कल्पक व निर्विकारपणे केलेले खून, हे प्रचंड प्रमाणात आल्याशिवाय थरार वास्तवाबरहुकुम दाखवता येत नाही.
यातील बहुतेक 'क्लिशें' ना धक्का न लावता, कथानक, पटकथेची पर्वा न करता कश्यप साहेबांनी तीन तास प्रेक्षकांचा अंत पाहिला आहे.
चित्रपटाची कथा सुरू होते ती एका टोळीने कोणत्यातरी हवेलीवर जोरदार सशस्त्र हल्ला चढवण्यापासून. हल्ला संपतो न संपतो तोच फ्लॅशबॅक सुरू... बिहार / झारखंडमध्ये धनबादजवळ वसलेल्या वासेपूरमध्यक, पेशाने कसाई असलेल्या कुरेशी जमातीच्या मुसलमानांचं वर्चस्व असतं. याच कुरेशींपैकी एक सुलताना डाकू इंग्रजांच्या कैदेतून पळून आलेला असतो. एका चकमकीत, तो स्वतःच्या नावावर दरोडे घालणार्या तोतया शाहिद खान च्या सर्व टोळीचा खातमा करून त्याला एक साथिदार व गर्भवती बायकोसोबत पळून जायला भाग पाडतो. हा शाहिद, धनबादला जाऊन कोळश्याच्या खाणीत मजूरी करू लागतो. याच दर्म्यान, त्याची बायको मुलाला जन्म देऊन प्राण सोडते. कालांतराने देश स्वतंत्र होतो, इंग्रज जाऊन भारतीय खाणमालक येतात, खानकामगारांची अवस्था मात्र होती तशीच राहते. नवीन खाणमालक रामधीर सिंहने पूर्वीच शाहिदमधला स्पार्क, जिगरा इत्यादी हेरून ठेवलं असतं. तो शाहिदला स्वतःचा पाळीव पेहेलवान (मजूरांना धमकावून, प्रसंगी मारून मुटकून कामाला लावणारा गुंड) नियुक्त करतो, व नंतर तो डोईजड होण्याची शक्यता दिसताच त्याला आधी परगावी, आणी तिथूनच यमसदनी पाठवतो. शाहिदचा साथिदार कसाबसा त्याच्या मुलाला, सरदारला घेऊन निसटतो.
आता सरदारचा 'जिंदगीका मक्सद' एकच - रामधीरचा नायनाट. आता एकीकडे रामधीरचा सूड, दुसरीकडे पठाणांना त्रास देणार्या कुरेशेंच्या टोळ्या, यातील चकमकी, वर्चस्वासाठी स्पर्धा, डावपेच असे रंगेल असं आपल्याला वाटत राहतं, आणी टप्प्या टप्प्यानी आपली निराशा होत राहते.
पुढे रामधीर, त्याचा मुलगा दोघंही आमदार होतात, सरदार खानचं (मनोज बाजपेयी) एका भडक , कर्कश वागणार्या बाईशी लग्न होतं, दोन मुलं वगैरे होतात. बायको पोटुशी असल्याने 'नाईलाजाने' तो इतर ठिकाणी तोंडं मारत राहतो, असं बराच वेळ दाखवलंय. याचबरोबर तो रामधीरच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाक, त्याच्या जमिनीवर अवैध कब्जा कर, असल्या कुरापती चालू करतो. एका प्रसंगात तर चक्क पोलीस चौकीत रामधीरसमोर त्याच्या मुलाला फटकावून जेलमध्येही जातो. तुरुंगातच गावठी बाँब बनवण्याची कला आत्मसात करून कैद तोडून पळूनही जातो (अगदी ८० च्या दशकातील चित्रपटात असायचे तसे, पोलिसांना नाच गाण्यात गुंगवून ठेवून). पळून गेल्यावर पोलीस मागावर असताना हा ज्याच्या घरी आश्रयाला असतो, त्याच्याच बहिणीवर लायनी मारणे, अतीशय लोचट वागणे, चावट शेरेबाजी करणे वगैरे चाळे करत राहतो. त्याच्या या लीलांना ती भाळते देखील, आणी हा चक्क तिच्याबरोबर दुसरा घरोबा करतो. मग पहिल्या बायकोच्या मनात मत्सर, तिच्याकडे दुर्लक्ष, इत्यादि आलंच.
दर्म्यान दिग्दर्शकाला आठवतं, की अरेच्चा! हा टोळीयुध्दांवरचा चित्रपट आहे, नाही का! मग प्रेक्षकांना सरदारच्या प्रणयक्रीडांमध्ये 'अजून' जास्त वेळ मंत्रमुग्ध न ठेवता तो सरळ प्रचंड खूनखराबा, रक्ताचे पाट दाखवायला लागतो. बराच वेळ कोणी ना कोणी कोणाला ना कोणाला तरी क्रूरपणे मारत राहतं. रक्ताच्या नुसत्या चिळकांड्या..एका दृश्यात तर प्रेताचे खाटीकखान्यात तुकडे करताना दाखवलंय. आता बोला. आहे की नाही हार्ड हिटिंग आणी रियालिस्टिक!
सरदारच्या मुलांची उपकथानकं जोडून, चित्रपटकर्ता, प्रेक्षकांना अजून तासभर तरी या कथानकाची (!) चव घेता यावी याची सोय करतो.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मनोज बाजपेयी अपेक्षेप्रमाणेच परिणामकारक. त्याच्या तोंडी जी भाषा दिली आहे ती मात्र कित्येकदा व्यक्तिमत्वास शोभत नाही ('कष्ट', 'जीवन' 'मृत्यू' इत्यादी शब्द बिहारी मुसलमान सहसा बोलताना वापरत नसावेत). बाकी कलाकारांची फौज अगदीच नवोदित आणी यथातथा आहे. सरदारची बायको भडक वावरामुळे लक्षात राहते. सरदारची मुलं तर फक्त कळकटपणा हा निकष ठेवून निवडली असावीत. रामधीर सिंह मुद्दाम अंडरप्ले करतोय, की मुळातच तो इतका बथ्थड अभिनेता आहे याचा पत्ता लागू देत नाही.
गँग्स..चं संगीत त्याला अजून काही पायर्या खाली घेऊन जातं. अत्यंत कर्णकटू भेसूर, किरट्या आवाजात चिरकलेली अगम्य बिहारी/भोजपुरी/बुंदेलखंडी/ का काहीतरी भाषेतली गाणी सतत उंच स्वरात पार्श्वसंगीत म्हणून वाजवून वाजवून शिसारी आणली आहे.
सर्वाधिक भितीने खिळवून ठेवणारा चित्रपटातला प्रसंग म्हणजे शेवट... "TO BE CONTINUED" अशी धमकीवजा सूचना वाचून घाम फुटतो. म्हणजे हा ३ तासांचा(बघताना ६ तासांचा वाटतो) छळ कमी म्हणून याचा एक सीक्वेल येऊ घातलाय, आणी महागडं तिकीट विकत घेऊन आपण त्याला हातभार लावलाय ही अपराधीपणाची भावना आतल्या आत खात राहते.
वाचने
8346
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा! जबर्या झालय
_/\_
आम्ही सगळे षिणेमे यु ट्युबवर
शक्यतो टाळाच. वेळ तरी वाचवा.
In reply to आम्ही सगळे षिणेमे यु ट्युबवर by JAGOMOHANPYARE
परीक्षण जबरी आहे. फुकट
फुकट पाहिलात तरी नंतर जाणवेल,
In reply to परीक्षण जबरी आहे. फुकट by शिल्पा ब
ह.ह.पु.वा.... झाली वाचता
भोगा आपल्या कर्माची फळे...
परिक्षण आवडले
प्रतिभावान परिक्षक? नाही हो.
In reply to परिक्षण आवडले by श्रीरंग_जोशी
बापरे!!
हाहाहाहा....जबर्या लिहिल आहे
खल्लास!
कशाला उगाच?
In reply to खल्लास! by पैसा
अतिशय असहमत. सध्या इतकेच
बाजार उठवला आहे वासेपुरचा
एक निरीक्षण
परिक्षण नकारात्मकच असावे, असा
In reply to एक निरीक्षण by अमृत
हे घ्या हो श्रीरंग राव
In reply to परिक्षण नकारात्मकच असावे, असा by श्रीरंग
कॅनव्हास = पृष्ठ्भूमी कसा
In reply to परिक्षण नकारात्मकच असावे, असा by श्रीरंग
हौ अबौट "पट"?
In reply to कॅनव्हास = पृष्ठ्भूमी कसा by विकाल
"पट" साउंड्स बेटर, अँड मोअर
In reply to हौ अबौट "पट"? by बॅटमॅन
पार्श्वभूमि
In reply to कॅनव्हास = पृष्ठ्भूमी कसा by विकाल
शिव्या घालू परीक्षण.
चालायचंच. चित्रपटांबाबत
In reply to शिव्या घालू परीक्षण. by इष्टुर फाकडा
:)
In reply to चालायचंच. चित्रपटांबाबत by श्रीरंग
श्रीरंग साहेब,अगदी योग्य
गेट वेल सून, श्रीरंग!
गेट वेल सून, श्रीरंग!
In reply to गेट वेल सून, श्रीरंग! by बिपिन कार्यकर्ते
अजून बघितला नाहीये! मात्र
In reply to गेट वेल सून, श्रीरंग! by गणपा
अहो कार्यकर्ते, प्रोमोज,
In reply to अजून बघितला नाहीये! मात्र by बिपिन कार्यकर्ते
मात्र तुम्ही माझा प्रतिसाद
तुम्ही "प्रोमो बघून" असंही
In reply to मात्र तुम्ही माझा प्रतिसाद by बिपिन कार्यकर्ते
हम्म मी स्वत काही हा चित्रपट
या वयात खुनाखुनी वगैरे
>>>या वयात इतर ठिकाणच्या
In reply to या वयात खुनाखुनी वगैरे by शिल्पा ब
कधीकधी असा मुळ स्वभाव उफाळुन
In reply to >>>या वयात इतर ठिकाणच्या by प्यारे१
बॉक्स ऑफिसवर आपटला म्हणे. '
बास का!! गँग्स.. अनुरागच्याच
In reply to बॉक्स ऑफिसवर आपटला म्हणे. ' by गणपा
या चित्रपटाचं वर आधारित गँगस
अनुराग कश्यपचा मी फ्यान आहे,
+१
In reply to अनुराग कश्यपचा मी फ्यान आहे, by सुहास झेले
कुठे बघतो आहेस?
In reply to +१ by गणपा
बरोबर. मीही पहिला काही भाग
In reply to +१ by गणपा
ठिक होता. जस शाळा पुस्तक
In reply to बरोबर. मीही पहिला काही भाग by श्रीरंग
पुढच्या भागाचा प्रोमो शेवटी
In reply to अनुराग कश्यपचा मी फ्यान आहे, by सुहास झेले
झक मारली आणि हा चित्रपट
श्रीरंग तुमची लेखनशैली आवडली.