एका सत्याघट्नेवर आधारीत
एका गावत गावकर्यांनी महराज श्रीश्रीश्री बाबांचे सत्संग आयोजित करायचे ठरवले. गावकर्यांच्या विनंतीवरुन १० दिवस सत्संगाचे आयोजन केले. त्या सत्संगाला एक सुट्बूट घातलेला भक्त नियमीतपणे हजेरी लावत होता. तो रोज आपल्या मर्सीडीज गाडीने येत असे आणि भक्तीभावाने बाबांची प्रवचने ऐकत असे.
सत्संगाच्या शेवटच्या काही दिवसात त्याने एका चेल्याला बाबांना भेट्न्याची इछ्छा व्यक्त केली.
चेल्याने थोदे आढेवेढे घेतले. पन त्या भक्ताने ट्र्स्ट्ला १ लक्ष रुपये देनगी देउ केली बदल्यात बाबांना भेट्न्याची परवानगी मागितली.
देनगी देतो आहे हे पाहून चेल्याने लगेच त्याची भेट बाबांशी करवली.
बाबा: कोन आहात आपण?
भक्त: मी राज मुम्बैला राहतो. माझा छोटा व्यवसाय आहे. आपल्या विचारने खुप प्रभावीत झालो. आपली क्रूपा असावी या भक्तावर.
बाबा:देव तुमचे कल्याण करो.
भक्तः बाबा एक विनंती आहे ?
बाबा: बोला.
भक्त: एकदा तुमचे चरणस्पर्श माझ्या घराला लावुन माझ्यावर आणि कुटूंबावर आपली क्रुपा करावी?
बाबा: हे शक्य नाही?
भक्तः तुम्ही म्हनाल तेवढी देणगी देतो पन तुम्ही घरी येवून आपला क्रुपाप्रसाद आम्हावर करावा.
बाबा: ठीक आहे. पुढच्या आठवड्यात येतो, देणगीचे चेल्याशी बोलुन घ्या.
मग राज ने १०लक्ष रुपये देवुन बाबांना घरी येन्याचे नक्की केले.
मग तो सोनीयाचा दिवस उजडला. बाबांना घ्यायला त्याने गाड्यांचा ताफा आणि नोकरांची फौज पाठवली.
बाबा राजच्या घरी पोहोचले. एका महालासारखा सुरेख बंगला होता राजचा. राजने बाबाचे पाय गुलाबजलने धुतले. राजची श्रीमंती बघुन बाबाचे डोळे दिपले.
कुतुहलाने बाबाने राजला व्यवसायाबाबद विचारले.
बाबा: आपाल्या सेवेने आम्ही प्रसन्न्न झालो.
राजः आपली क्रुपा आहे सर्व.
बाबा: पण तुम्ही काम काय करतात?
राजः मी शेअर मार्केट दलाल आहे. आपण सर्व जाणता तरी सांगतो. मी काळा पैसा पांढरा करतो. शेअर मधे गुंतवतो व काही दिवसात पैसे दुप्पट करून देतो. त्यातुन हे सर्व वैभव उभे केले आहे.
बाबाने मग राजकडुन मार्केट्ची सर्व माहीती घेतली आणि राजचा निरोप घेउन परत आपल्या आश्रमात आले.
नंतर बाबाने राजला भेट्न्यासाठी आपल्या आश्रमात बोलवले.
राज बाबांना भेट्न्यासाठी आश्रमात गेला.
राजः बाबांची क्रुपा असावी
बाबा: राज एक काम होते तुझ्याकडे.
राजः आदेश करा बाबा. काय सेवा करू.
बाबा: तुला माहीत आहे की ट्रस्ट्ला देणगी स्वरूपात बरीच रक्कम मिळते. लोककल्याणाकरता मला ट्रस्ट्चा काही पैसा शेअरमधे टाकाय्चा आहे .
राजः समजले बाबा. पण किमान १० कोटि हवेत यासाठी.
बाबा: सध्या ५ कोटि आहे जमत असेल तर बघ.
राज: ठिक आहे बाबा . मी करतो तुमच्यासाठी.
बाबा: मग आजच पैसे घेउन जा.
मग एका चेल्याने पैश्याने भरलेली बॅग राज्च्या गाडीत ठेवली.राजने बाबांचे दर्शन घेतले व १५ दिवसात पैसे दुप्पट करुन देतो हे आश्वासन देवुन निघतो.
तीन आठवडे झाले राज्चा काहीही निरोप नाही हे पाहून बाबाने चेल्याला राजच्या घरी धाडले.
राजच्या घर पाहुन चेल्याला भोवळ येते कारण ते घर भाड्याचे असते कुनीतरी १ महीन्याकरीता पिक्चर्च्या शूटींग करीता ते भाड्याने घेतलेले असते हे चेल्याला कळते.
बाबा पुरता गंडलेला असतो पण सांगनार कोणाला
कारण बुडालेला सर्व पैसा हा काळा असतो
वाचन संख्या
4984
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडले...
म्रुगजळाच्या पाठीमागे धावू नका..
ही कथा तुमची आहे ? नक्कीच
+१
In reply to ही कथा तुमची आहे ? नक्कीच by परिकथेतील राजकुमार
सहमत आहे, पण कुणा बाबाचे नाव
In reply to +१ by अमोल खरे
ते राननामाच्या वह्यान्वले का?
In reply to +१ by अमोल खरे
ते राननामाच्या वह्यान्वले का?
In reply to +१ by अमोल खरे
एका सत्याघट्नेवर आधारीत असे
In reply to ही कथा तुमची आहे ? नक्कीच by परिकथेतील राजकुमार
चोराच्या उलट्या बोंबा.
In reply to एका सत्याघट्नेवर आधारीत असे by जोयबोय
आ.बापु भक्त वाटत आहे तु.
In reply to चोराच्या उलट्या बोंबा. by परिकथेतील राजकुमार
आणि जी लिन्क तुझ्या चेल्याने
In reply to आ.बापु भक्त वाटत आहे तु. by जोयबोय
परा, कोणी "अरेतुरे" ची
In reply to चोराच्या उलट्या बोंबा. by परिकथेतील राजकुमार
खोसला का घोसला
In reply to एका सत्याघट्नेवर आधारीत असे by जोयबोय
मारिच
हेच सांगायला आलो होतो
In reply to मारिच by कानडाऊ योगेशु
@पण एकाच घटनेकडे पाहण्याचा
In reply to मारिच by कानडाऊ योगेशु
चिर्मल बाबा - आज तुमने मनोगत
+१
In reply to चिर्मल बाबा - आज तुमने मनोगत by ५० फक्त
ही ही ही
In reply to चिर्मल बाबा - आज तुमने मनोगत by ५० फक्त
काय चुकलं?
पराने चोरी पकडली
शिर्षक अंगावर येतय.