Skip to main content

शेरास सव्वा शेर

लेखक जोयबोय
Published on शनीवार, 23/06/2012
एका सत्याघट्नेवर आधारीत एका गावत गावकर्यांनी महराज श्रीश्रीश्री बाबांचे सत्संग आयोजित करायचे ठरवले. गावकर्यांच्या विनंतीवरुन १० दिवस सत्संगाचे आयोजन केले. त्या सत्संगाला एक सुट्बूट घातलेला भक्त नियमीतपणे हजेरी लावत होता. तो रोज आपल्या मर्सीडीज गाडीने येत असे आणि भक्तीभावाने बाबांची प्रवचने ऐकत असे. सत्संगाच्या शेवटच्या काही दिवसात त्याने एका चेल्याला बाबांना भेट्न्याची इछ्छा व्यक्त केली. चेल्याने थोदे आढेवेढे घेतले. पन त्या भक्ताने ट्र्स्ट्ला १ लक्ष रुपये देनगी देउ केली बदल्यात बाबांना भेट्न्याची परवानगी मागितली. देनगी देतो आहे हे पाहून चेल्याने लगेच त्याची भेट बाबांशी करवली. बाबा: कोन आहात आपण? भक्त: मी राज मुम्बैला राहतो. माझा छोटा व्यवसाय आहे. आपल्या विचारने खुप प्रभावीत झालो. आपली क्रूपा असावी या भक्तावर. बाबा:देव तुमचे कल्याण करो. भक्तः बाबा एक विनंती आहे ? बाबा: बोला. भक्त: एकदा तुमचे चरणस्पर्श माझ्या घराला लावुन माझ्यावर आणि कुटूंबावर आपली क्रुपा करावी? बाबा: हे शक्य नाही? भक्तः तुम्ही म्हनाल तेवढी देणगी देतो पन तुम्ही घरी येवून आपला क्रुपाप्रसाद आम्हावर करावा. बाबा: ठीक आहे. पुढच्या आठवड्यात येतो, देणगीचे चेल्याशी बोलुन घ्या. मग राज ने १०लक्ष रुपये देवुन बाबांना घरी येन्याचे नक्की केले. मग तो सोनीयाचा दिवस उजडला. बाबांना घ्यायला त्याने गाड्यांचा ताफा आणि नोकरांची फौज पाठवली. बाबा राजच्या घरी पोहोचले. एका महालासारखा सुरेख बंगला होता राजचा. राजने बाबाचे पाय गुलाबजलने धुतले. राजची श्रीमंती बघुन बाबाचे डोळे दिपले. कुतुहलाने बाबाने राजला व्यवसायाबाबद विचारले. बाबा: आपाल्या सेवेने आम्ही प्रसन्न्न झालो. राजः आपली क्रुपा आहे सर्व. बाबा: पण तुम्ही काम काय करतात? राजः मी शेअर मार्केट दलाल आहे. आपण सर्व जाणता तरी सांगतो. मी काळा पैसा पांढरा करतो. शेअर मधे गुंतवतो व काही दिवसात पैसे दुप्पट करून देतो. त्यातुन हे सर्व वैभव उभे केले आहे. बाबाने मग राजकडुन मार्केट्ची सर्व माहीती घेतली आणि राजचा निरोप घेउन परत आपल्या आश्रमात आले. नंतर बाबाने राजला भेट्न्यासाठी आपल्या आश्रमात बोलवले. राज बाबांना भेट्न्यासाठी आश्रमात गेला. राजः बाबांची क्रुपा असावी बाबा: राज एक काम होते तुझ्याकडे. राजः आदेश करा बाबा. काय सेवा करू. बाबा: तुला माहीत आहे की ट्रस्ट्ला देणगी स्वरूपात बरीच रक्कम मिळते. लोककल्याणाकरता मला ट्रस्ट्चा काही पैसा शेअरमधे टाकाय्चा आहे . राजः समजले बाबा. पण किमान १० कोटि हवेत यासाठी. बाबा: सध्या ५ कोटि आहे जमत असेल तर बघ. राज: ठिक आहे बाबा . मी करतो तुमच्यासाठी. बाबा: मग आजच पैसे घेउन जा. मग एका चेल्याने पैश्याने भरलेली बॅग राज्च्या गाडीत ठेवली.राजने बाबांचे दर्शन घेतले व १५ दिवसात पैसे दुप्पट करुन देतो हे आश्वासन देवुन निघतो. तीन आठवडे झाले राज्चा काहीही निरोप नाही हे पाहून बाबाने चेल्याला राजच्या घरी धाडले. राजच्या घर पाहुन चेल्याला भोवळ येते कारण ते घर भाड्याचे असते कुनीतरी १ महीन्याकरीता पिक्चर्च्या शूटींग करीता ते भाड्याने घेतलेले असते हे चेल्याला कळते. बाबा पुरता गंडलेला असतो पण सांगनार कोणाला कारण बुडालेला सर्व पैसा हा काळा असतो
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 4984
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

एकदम पर्फेक्ट संदेश देणारी कथा!!! असेच लिहीत राहा!!

ही कथा तुमची आहे ? नक्कीच नाही. मग अशी उचलून आणलेली कथा स्वतःच्या नावावरती खपवायचे कारण काय ? ही कथा ज्या ब्लॉगवरती वाचली होती तो नेमका आत्ता सापडत नाहीये. पण ही कथा १००% तुमची नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ही गोष्ट बापुंबरोबर झाली होती असे लोकल मधुन प्रवास करताना ऐकले होते. थोडा फरक आहे. तो माणुस म्हणे बापुंकडे रोज येऊन पंचवीस लाख दक्षिणा म्हणुन ठेवायचा. असे एक महिना झाल्यावर बापुंनी म्हणे त्याला बोलावुन असे काही कोटी रुपये दिले. आणि पुढची स्टोरी वरीलप्रमाणे.

In reply to by जोयबोय

एका सत्याघट्नेवर आधारीत असे आगोदरच लिहिले आहे.
सत्यघटना आणि किस्सा ह्यातला फरक कळतो का ? सत्यघटना म्हणजे जी आपल्या डोळ्यासमोर घडते. ही घटना तुमच्या डोळ्यासमोर घडली आहे का ? सदर घटनेच्यावेळी तुम्ही तिथे हजर होतात का ? असे असेल, तर मग असा काळा पैसा बाळगून असणारा बाबा तुम्हाला माहिती आहे. त्याचे नाव तुम्ही सरकारला कळवले का ? नसेल तर मग तुम्हाला देखील तेवढेच गुन्हेगार का मानू नये ? 'अ' व्यक्तीच्या बाबतीत घडलेली घटना 'ब' च्या तोंडून ऐकली तर त्याला किस्सा म्हणतात, सत्यघटना नाही. (अर्थात हा 'ब' देखील ती घटना 'क' च्या तोंडून ऐकून आला आहे असे गृहीत धरले आहे.) सबब तुम्ही एका गुन्हेगाराला पाठीशी घालत आहात असे सरकारलाका कळवू नये ?
ब्लॉग ची लिन्क दे मग बोल
खाली योगेशने फेकून मारली आहेच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आ.बापु भक्त वाटत आहे तु. लिन्क तर दिलिच नाही तु. आणि जी लिन्क तुझ्या चेल्याने दिलि तिचा या कथेशी काडिमात्र संबंध नाही.

In reply to by जोयबोय

आणि जी लिन्क तुझ्या चेल्याने दिलि कानडाऊ योगेश बरेच दिवस मिपासदस्य आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे ते नेहमी " स्वतःची " मते मांडत असतात. उगाच हेटाळणीपुर्वक त्यांना पराचे "चेले " वगैरे म्हणण्यात काय हशील आहे? जर कथा तुम्ही स्वत: लिहिली असेल तर तसे ठामपणे लोकांना सांगा. विषय संपला. उगाच दूसरा कोणीतरी चेलेगिरी करतो आगे वगैरे कशाला बोलत आहात. आता तर लोकांनी तसे स्पष्ट पुरावे दिले आहेत. मारिच कथा अगदी याच कथाबीजावर आहे. तरीही तुम्ही ही कथा तुमच्या मनाने लिहिली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तसे स्पष्टीकरण द्या म्हणजे प्रश्न मिटला. असो. तुमची कथा चौर्यकर्म असो अथवा नसो, तुम्ही जे पर्सनल रिमार्क्स केले आहेत ते सर्वथा अयोग्य आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा, कोणी "अरेतुरे" ची अरेरेवी ची भाषा करूनही , संयम ढळू न देता तू, "तुम्ही" हे आदरार्थी वचन वापरतो आहेस याचे एक मिपाकर म्हणून कौतुक वाटते. कुठे ते माहीत नाही पण मीदेखील ही कथा वाचली आहे - शुद्ध मराठीमध्ये :)

प.रा.शी काही अंशी सहमत. कथेचा बाज जरी आपण कोणाला तरी एक अनुभव सांगत असलो असा असला तरी कथासूत्राची प्रेरणा खालील कथेवरुन घेतल्यासारखी वाटतेय. http://mr.upakram.org/node/103 पण एकाच घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असु शकतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

ही श्री. संतोष शिंत्रे यांची 'मारिच' नावाची कथा आहे. (पण ती उपक्रमावर कशी? असाही प्रश्न पडलाच!) मारिच मनोगतावरही प्रसिद्ध झाली आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

@पण एकाच घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा असु शकतो. सहमत येथे ही कथा जास्त पाल्हाळ न लावता सुटसुटीत झाली आहे: सदर कथा वाचून "चोर के घर मे चोरी , चोरी नही ,हेराफेरी केहेलाती हे हा सिनेमातील डायलॉग आठवला. मराठीत म्हण चोरावर मोर अवांतर जाता जाता सांगू इच्छितो. की मागे शेतकऱ्यांच्या धाग्यावर माझ्यासह अनेकांनी जो ह्यांच्या विचाराशी मतभेद असणारे प्रतिसाद भरभरून दिले. पण लेखकाने स्वतः चा तोल जाऊ दिला नाहि, ह्याचे कौतुक करावेसे वाटते.

चिर्मल बाबा - आज तुमने मनोगत पढा ? भ्कत - हां बाबा. चिर्मल बाबा - आज तुम उपक्रम पे गये थे ? भ्कत - हां बाबा. चिर्मल बाबा - आज तुमने मिपापे कुछ लिखा ? भ्कत - नही बाबा. चिर्मल बाबा - उधरका पुराना उठाके इधर उपर निचे करके लिखो, किरपा हो जायेगी. भ्कत - हां बाबा, जय बाबा की.

अरे तुरे करणार्‍यांकडे लक्ष द्यावे असे संपादकांना सुचवले तर माझीच प्रतिक्रिया उडवली!

मी सुद्धा ही कथा पूर्वी वाचली आहे. संपादक मंडळ काही कारवाई करेल काय? अमृत