मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उशीर

डॉ अशोक कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
उशीर ती ही समीप होती, पुनवेस चांद राती अन बात छेडण्याची फक्त देर होती नक्षत्र पाहतांना थोडीच रेलली ती आधार द्यावयाची फक्त देर होती ठावे मलाही होते, अनभिदन्य ती ही नव्हती शब्दात सांगण्याची फक्त देर होती आतूर भावनाही येऊन दाविते ती डोळ्यात वाचण्याची फक्त देर होती तीसरे कुणीही नव्हते, दोघात रात्र होती वाटून घ्यावयाची फक्त देर होती गेल्या अशाच रात्री, कां दूर राहते ती सर्वांस कारणे ही, फक्त देर होती --अशोक

वाचने 1707 वाचनखूण प्रतिक्रिया 7

वल्ली, जाई आणि अपर्णा.... धन्यवाद !! अपर्णा: "छोटी सी बात" मधल्या अमोल पालेकरनं रंगवलेलं क्यारेक्टर समोर ठेवून लिहिलेली ही कविता आहे. बास्स इतकंच !!