उशीर
उशीर
ती ही समीप होती, पुनवेस चांद राती
अन बात छेडण्याची फक्त देर होती
नक्षत्र पाहतांना थोडीच रेलली ती
आधार द्यावयाची फक्त देर होती
ठावे मलाही होते, अनभिदन्य ती ही नव्हती
शब्दात सांगण्याची फक्त देर होती
आतूर भावनाही येऊन दाविते ती
डोळ्यात वाचण्याची फक्त देर होती
तीसरे कुणीही नव्हते, दोघात रात्र होती
वाटून घ्यावयाची फक्त देर होती
गेल्या अशाच रात्री, कां दूर राहते ती
सर्वांस कारणे ही, फक्त देर होती
--अशोक
वाचने
1709
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
डॉ. साहेब मिपावर स्वागत.
In reply to डॉ. साहेब मिपावर स्वागत. by प्रचेतस
+१ असेच म्हणतो..
छानच कविता आवडली
सर्वांस कारणे ही, फक्त देर
वल्ली, जाई आणि अपर्णा....
तीसरे कुणीही नव्हते, दोघात
तीसरे कुणीही नव्हते, दोघात