Skip to main content

देव,धर्म,श्रद्धा आणि विवेक-विचार

देव,धर्म,श्रद्धा आणि विवेक-विचार

Published on शुक्रवार, 15/06/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
देव,धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार सामान्य जनातील अंधश्रद्धा नाहिशी करण्याचा प्रयत्न म. ज्योतिबा फुले यांच्यापासून श्री. दाभोळकर यांच्यापर्यंत अनेकांनी केला. "बुडती हे जन " हे न बघवून त्यांना वाचविण्याकरिता पोटतिडिकेने लिखाणही केले. त्यांचा वसा चालविणारे एक लेखक म्हणजे प्रा. य. ना. वालावलकर. उपक्रमसारख्या संस्थळावर व वर्तमानपत्रात नियमितपणे त्यांचे लेख-पत्रे प्रसिद्ध होत असतात. प्रा. वालावलकरांचे वरील नावाचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात ६२ लेख आहेत. साधारणत: दोन-तिन पान लांबीच्या या लेखात देव, धर्म वा श्रद्धा यातील एखादा विषय निवडून त्यावर भाष्य केलेले आहे. बरेच लेख संवादात्मक आहेत. याचा फायदा म्हणजे लक्ष वेधून घेऊन वाचकाला खिळवून ठेवता येते. वर्तमानपत्रातील स्तंभासारखे छोटेखानी लेख वाचक शेवटपर्यंत वाचतोच. सामान्य वाचकाला बोधप्रद लिखाण वाचावयाचा कंटाळा येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पद्धत स्विकारली असावी. प्रा. यनावाला त्यात यशस्वी झाले आहेत. एखाद्या श्रद्धाळू माणसाच्या जीवनातील एखादा प्रसंग निवडून विवेकाने तर्कनिष्ठ विचार केला तर त्याची अंधश्रद्धा कशी असंभव आहे हे दाखवून दिले जाते. काही लेखांची शीर्षके पाहिली तरी लेखांचा आवाका लक्षात येईल. गुरूपुष्यामृत योग, स्वर्ग, मोक्ष आणि गाजरचित्रे, गतजन्मीची आठवण, मुहुर्ताचे खुळ, बुवा,बाबा, बापूंना आव्हान, काल्पनिक ईश्वर. दैव जाणिले कुणी, उदकी अभंग रक्षिले, पानिपतचा पराभव, कर्मफल सिद्धांत अशी काही नमुना म्हणून सांगता येतील. यातील काही लेख उपक्रममध्ये प्रसिद्ध झाले आहेत. दुसर्‍या भागात विवेक व विज्ञान या विषयांच्या संबधित विचारवंतांच्या सुवचनांचा समावेष आहे. अर्थातच हे विचारवंत बहुतेक परदेशीच आहेत. त्यामुळे डॉ. राधाकृष्णन वा डॉ.रानडे ( मी यांना विचारवंत समजतो) यांचे विचार येथे वाचावयास मिळत नाहीत. असो. विज्ञान, विवेक, बुवा-बापू, फलज्योतिष, धर्म, देव आणि संकीर्ण या सात विभागात हे वाटले असून अगदी थोडक्यात (म्हणजे काही ओळीत) ते संपादित केले असल्याने जास्त उपयुक्त वाटतात. पुस्तकाचा एक मोठा गुण म्हणजे तुम्ही ते कुठलेही पान उघडून वाचावयास सुरवात करू शकता व केव्हाही थांबू शकता. वर सांगितल्याप्रमाणे अशी पुस्तके सुरवातीपसून शेवटपर्यंत एका बैठकीत वाचणे अवघड असते. आणि हो, हे पुस्तक तुम्ही जरा चाळलेत तरीही चार लोकांत बोलतांना या विषयांवर तुमचा खूप अभ्यास आहे असे दाखविण्यापुरते साहित्य(material) तुमच्या गाठीशी असेल. देव, धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार लेखक : प्रा. य.ना. वालावलकर. वरदा प्रकाशन, पुणे. शरद
लेखनप्रकार

याद्या 9461
प्रतिक्रिया 51

>>>>>हो, हे पुस्तक तुम्ही जरा चाळलेत तरीही चार लोकांत बोलतांना या विषयांवर तुमचा खूप अभ्यास आहे असे दाखविण्यापुरते साहित्य(material) तुमच्या गाठीशी असेल. हा हा हा ! अगदी अगदी !! तोंड पाटिलकी करायला अजून काय लागते? यनावाला हुशार आहेत. कोणता माल कोणत्या वेष्टनात किती प्रमाणात विकु शकतो, विकला जाईल, गिर्‍हाईक कोण हे त्यांना नक्की माहित आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी म्हणून हे लेख लिहिले आहेत त्यांनी ते लेख वाचण्याची आणि यनावालांच्या मते अपेक्षित असलेली सुधारणा स्वतःमधे घडवून आणण्याची शक्यता शून्य. जे वाचतील ते आधीच जन्मजात का काय म्हणतात तसे विवेकवादी वगैरे असल्याने त्यांना उपयोग शून्य. थोडक्यात काय पुस्तक प्रसिद्ध झाले ब्वा ! हांग आश्शी !! जोर्दार अभिनंदन !!

In reply to by नाना चेंगट

त्यामुळे ज्यांच्यासाठी म्हणून हे लेख लिहिले आहेत त्यांनी ते लेख वाचण्याची आणि यनावालांच्या मते अपेक्षित असलेली सुधारणा स्वतःमधे घडवून आणण्याची शक्यता शून्य. बास बास. बाकी यनावालांचे अभिनंदन.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ह्म्म्म्म... ते एफ सी. रोडवरचं "याना" रेस्ताँरन्ट या यनावाल्यांचं आहे का? मला तिथलं "गार्लिक सिझलर" प्रचन्ड आवडतं!!!! :) :) काय आहे.. शेवटी माणसाला जगण्यासाठी वस्त्र, निवार्‍याबरोबरच अन्ना'ची (पक्षी: फूड) जास्त गरज असते.. असे मला वाटते.. :) बाकी याना'चे...देव-धर्म वगैरे... चालू द्यात.... कधी कधी साईड बिझनेस पण बराच फायदा कमावून देतात!!!! :)

पुस्तकाचा एक मोठा गुण म्हणजे तुम्ही ते कुठलेही पान उघडून वाचावयास सुरवात करू शकता व केव्हाही थांबू शकता.> ;) @ संजय क्षीरसागर : देव ही माणसानं निर्माण केलेली `कल्पना' आहे>> मला तर आत्तापर्यंत वाटायचे की माणूस ही देवानी निर्माण केलेली कल्पना आहे! काहितरी मेजर लोच्या दिसतोय माझ्या समजूतीत........ :(

In reply to by कवितानागेश

बहुतेक देवानी माणसाना व माणसानी देवाना तयार केल असाव. दोघांचाही वेळ जात नसावा म्हणुन हे उपद्व्याप सूचले बहुतेक देवाना व माणसानाही.

In reply to by कवितानागेश

लीमाउनं मानला तर देव आहे आणि नाही तर नाही पण लीमाउ आहे हे निर्विवाद कारण लीमाउ नाही म्हणायला तरी लीमाउ हवीच थोडक्यात देव असणं किंवा नसणं यासाठी लीमाउचं असणं आवश्यक आहे आणि लीमाउनं मानला तर देव आहे आणि नाही तर नाही (आता लीमाउ पूर्वी काय होतं? हा पुढचा धडा आहे, तो पहिला धडा पक्का झाल्यानंतर आणि हो, प्रतिसादातून प्रामाणिकता दिसली तरच)

In reply to by JAGOMOHANPYARE

पण अनेकांना वेगवेगळे देव दिसतील आणि त्यातनं वेगवेगळे धर्म निर्माण होतील आणि मग व्यक्तीगत श्रद्धा आणि त्यामुळे एकसंध मानवता विभागली जाईल... खरं तर गेली आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

श्रद्धेला व्यक्त व्हायला / श्रद्धा असण्याला धर्माची काय गरज? आणि मानवता एकसंघ कशी काय? खरं तर "मानवता" हाच अभंगावर पहिला प्रहार आहे. मानवता विभागायला निसर्गाने आज इथं तर उद्या तिथं असे दाणे पेरुन ठेवलेत... आपापली चोच, पोट आणि भुक घेतलेले प्रवाह फाटे फोडत, पुन्हा एकत्र होत वाहात राहातात. शिवाय, त्यात वाईट काय ? सुखी सामुदाईक जीवन एक अत्यंत साधी, सोपी, सरळ गोष्ट आहे. आपल्या दु:खभोगाला मानवतेने स्वःत सोडुन इतर कुठल्याही गोष्टीला जवाबदार धरणे हाच सर्वात मोठा विनोद/भाबडेपणा/धूर्तपणा/करंटेपणा आहे. असो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

जगातली सर्वात जास्त युद्ध धर्माच्या नांवावर झालीयेत आणि धर्मामुळेच जग विभक्त आहे. देव ही `कल्पना' सगळ्याचा स्त्रोत आहे. तुम्ही शांतपणे विचार केलात तर लक्षात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

जग धर्मामुळे'च' विभक्त आहे हे अगदी पोक॑ळ आणि वरवरचे बोलणे झाले. उद्या सगळ्या धर्माच्या प्रचलित कल्पना उखडून टाकल्या तर माणूस शांतपणे जगेल असे वाटते का तुम्हाला? अमेरीका आणि रशिया यांच्यामध्ये कुठल्या धर्माच्या नावावर शीतयुद्ध सुरू होते?

In reply to by स्वानन्द

क्रिस्टशन, मुस्लिम, हिंदू, ज्यू अशा धर्मात राष्ट्र विभागली गेली नाहीयेत का? प्रत्येक निधर्मी जन्मलेल्या व्यक्तीला जन्मतःच धर्माचा शिक्का बसत नाही का? तुम्ही प्रतिसाद नीट वाचलात तर मी लिहिलय : "जगातली सर्वात जास्त युद्ध धर्माच्या नांवावर झालीयेत आणि धर्मामुळेच जग विभक्त आहे" धर्मविस्तार हे मानवी कलहाच प्रमुख कारण आहे. दुसरं कारण आर्थिक विषमता, नैसर्गिक संपतीचं स्वामित्व किंवा निरांकुश सत्ता मिळवण्याचा हव्यास आहे पण तो प्रस्तुत लेखाचा विषय नाही >उद्या सगळ्या धर्माच्या प्रचलित कल्पना उखडून टाकल्या तर माणूस शांतपणे जगेल असे वाटते का तुम्हाला? = येस! अंतरजातिय विवाह हा भारतातल्या जातीयतेच्या अत्यंत मूलगामी प्रश्नावर सुप्रिम कोर्टानं (एका निकालाच्या दरम्यान ) सुचवलेला अत्यंत स्वागतार्ह उपाय आहे

In reply to by संजय क्षीरसागर

खरे खोटे रामायणातले - महाभारतकालीन युद्ध घ्या, अलेक्झांडर, आशोक, चंगेझखान वगैरेंची आक्रमणे घ्या, युरोपने उत्तर-दक्षीण अमेरीका व आशिया खंडात केलेला साम्राज्यविस्तार घ्या, २०व्या शतकातले २ महायुद्ध, त्यानंतर तेलाच्या हव्यासपोटी नाटो-अमेरीका-रशीया वगैरेंनी अरबस्थानात केलेला धुमाकुळ घ्या.... धर्म कुठे दिसतोय ? (महाभारतकालीन युद्धाला श्रीकृष्णाने धर्मयुद्ध म्हटले होते, पण त्याचे संदर्भ पूर्णपणे वेगळे आहेत, हे बाकी कोणाला कळो ना कळो, पण क्षीरसागरसाहेब, तुम्हाला नक्की कळेल म्हणुन त्याविषयी जास्त काहि लिहीत नाहि) क्रुसेड ला जो धर्माचा आधार आहे त्याचे मूळ कारण संपत्तीच्या वाटपात आहे (संपूर्ण जग म्हणजेच आपली संपत्ती य न्यायाने). मानवतेने आपल्या हावरटपणाला साळसूदपणे बाजुला सारुन मनुष्यवधाचे खापर धर्माच्या माथी फोडणे हा सर्वात मोठा दांभीकपणा-हिपोक्रसी. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तुम्ही प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही, मी वर म्हटलय : दुसरं कारण आर्थिक विषमता, नैसर्गिक संपतीचं स्वामित्व किंवा निरांकुश सत्ता मिळवण्याचा हव्यास आहे पण तो प्रस्तुत लेखाचा विषय नाही

In reply to by संजय क्षीरसागर

मी एक्साईट होत नाहिए हो साहेब. माझ्या एनॅलिसीसच्या अगदी विरुद्ध कारणामिमांसा तुमच्या प्रतिसादात वाचली आणि मी आपलं मत मांडतोय बस्स... आर्थीक विषमता, संपत्तेचं स्वामीत्व हे कारण दुय्यम नाहि तर प्रथम आहे... किंबहुना या आर्थीक आणि दुसर्‍या कुठल्याही कारणामध्ये इतकं प्रचंड अंतर आहे कि हे आर्थीक कारण एकमेव वाटावे. या आर्थीक कारणामागे मूळ वृत्ती समर्पणाला फटकारुन कुरघोडी करण्याची आहे... पण हे पुन्हा धाग्याच्या विषयाला अवांतर, म्हणुन.. असो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

हे उघड आहे आणि त्यामुळे तणाव आहे हे नाकारुन कसं चालेल? आर्थिक विषमता हे फिजिकल कारण आहे पण धर्म हे निव्वळ सायकलॉजिकल कारण आहे. एक साधी धारणा सोडली तर सामंजस्य निर्माण होईल त्यासाठी इतर काहीही करायची गरज नाही. कारण प्रथम आहे की दुय्यम या मुद्यावर वाद घालण्यापेक्षा कारण आहे हे महत्त्वाचय

In reply to by संजय क्षीरसागर

धर्म गेला तर दुसरं काहि... म्हणजे कातडीचा रंग, प्राण्यांच्या शेपट्यांची लांबी, समुद्रकिनार्‍याच्या वाळुतील रुपेरी/चंदेरी झाक, मिरचीचा तिखटपणा, बोली भाषेतील व्यंजनांची संख्या ... असलं कुठलही अत्यर्क कारण येईल. "भला उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे", "नेबर्स एन्व्हे, ओवनर्स प्राईड" हा मूळ मुद्दा आहे... आणि तो धर्म राहो वा जाओ, आपलं अस्तीत्व कायम तेव्हढच धारदार ठेऊन असेल. दिसायला हि गोष्ट जेव्हढी साधी वाटते, समाजाच्या सौख्य हितसंबंधाला तेव्हढीच ती घातक आहे. आर्थीक विषमता भौतीक कारण नाहि. चौतकर भाकरीने पोट भरत असताना ४०० भकर्‍यांची भुक जाणवणे हा सायकोलॉजीकल मुद्दा त्यातही आहे... किंबहुना मानवतेच्या रोगाचं हेच मूळ कारण आहे. मानवतेच्या मनाच्या या सर्व चुकीच्या धारणांना योग्य वळण/वेसण घालण्याचं काम जितक्या प्रामणीकपणे धर्माच्या माध्यमातुन झालय तेव्हढं अन्य कुठल्याही माध्यमातुन झालेलं नाहि... कारण धर्माने अधिकृत रित्या कुठलही रेस्क्यु सेंटर न उभारता दैनंदीन जीवनातल्या संस्कारांच्या माध्यमातुन हे आव्हान पेलायचा प्रयत्न केला. आणि मानवतेने आपला कपटी स्वार्थ साधण्यासाठी याच संस्कार संस्थेला बाजाराचं रूप देऊन तिची पार गटारगंगा करुन टाकली. सगळे विचारवंत मानवतेच्या अंगभूत रोगावर काम करण्यापेक्षा याच रोगाने पिडीत अश्या धर्माला उगाचच बोल लावतात, हा माझा मुख्य आक्षेप आहे. चोर तर घरभर राजरोसपणे फिरतोय, आणि आपण उगाच संन्यास्याला लाथा मारतोय. हे सर्व मला माझ्या गुरुनेच शिकवलं... असा गुरु ज्याने आयुष्यात कधीच धर्माचं बोट धरलं नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

धर्म गेला तर दुसरं काहि... म्हणजे कातडीचा रंग, प्राण्यांच्या शेपट्यांची लांबी, समुद्रकिनार्‍याच्या वाळुतील रुपेरी/चंदेरी झाक, मिरचीचा तिखटपणा, बोली भाषेतील व्यंजनांची संख्या ... असलं कुठलही अत्यर्क कारण येईल. हे मात्र पटलं. बाकी, पारंपरिक अशा धर्माच्या मांडणीऐवजी काही विचारवंत वैश्विक धर्माची आवश्यकता यासाठीच बोलून दाखवतात. . असो, बाकी दोघांचेही संवाद उत्तम चालला आहे, वाचतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by संजय क्षीरसागर

= येस! अंतरजातिय विवाह हा भारतातल्या जातीयतेच्या अत्यंत मूलगामी प्रश्नावर सुप्रिम कोर्टानं (एका निकालाच्या दरम्यान ) सुचवलेला अत्यंत स्वागतार्ह उपाय आहे हा हा हा. हे वाचून डोळे पाणावले (अर्थात हसून हसून). आंतरजातीय लग्न काय पूर्वी नव्हती का? का आता नाहीयेत. अगदी पुराणकालापासून चालू आहेत. अगदी अनुलोम प्रतिलोम वगैरे त्याचे प्रकार पण भागवतात सांगितली आहेत. पण जेवढी माझी अल्पबुद्धी दाखवते त्यानुसार या सर्व विवाहांची परिणती ही ज्या संततीमधे झाली त्या अमानवी गोष्टींना कारण ठरल्या. जर हे सुप्रिम कोर्ट हजार दोन हजार वर्ष विचारानी चालत आलेल्या गोष्टींवर गेल्या ५०-६० वर्षाच्या अनुभवाचे भांडवल वापरून टीका करून असे उपाय सुचवत असेल तर ते अपरिपक्वच मानले पाहीजे. (बघूया आता कंटेप्ट ऑफ कोर्टची केस कोण घालतंय ते) बाकी (नेहेमीप्रमाणेच) चालूद्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>पण जेवढी माझी अल्पबुद्धी दाखवते त्यानुसार या सर्व विवाहांची परिणती ही ज्या संततीमधे झाली त्या अमानवी गोष्टींना कारण ठरल्या. हहपुवा. बाकी चालूद्या.

In reply to by JAGOMOHANPYARE

लीमाउ म्हटलं की देव दिसत नाही. माउली म्हटलं की दिसतो >> असे काहितरी शब्द म्हणून देव दिसतो? कमालच झाली! शिवाय देव 'दिसतो'? मला वाटायचे आतून जाणीव होते फक्त! :) असो. 'माउली' म्हट्लं की दिसतो ना? बरे झाले. लोकहो, यापुढे जामोप्यांना देव दाखवायची वेळ येइल तेंव्हा प्रतिसादात फक्त 'माउली माउली' लिहायचे बरं का. :) अवांतरः थँक्स टू धागाकर्ते. कुणाकुणाचे कुठलेकुठले वीक पॉईंट्स बाहेर येतायत बघुयात. ;)

In reply to by कवितानागेश

मुळात कुठल्याही निर्मीती बद्दल इतक़ छातीठोकपणे दावा कसा काय करता येतो याचच आश्चर्य वाटतं मला... अर्धवटराव

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्यामुळे आधी माणूस आणि त्यानी कल्पना केली म्हणून देव

>चार लोकांत बोलतांना या विषयांवर तुमचा खूप अभ्यास आहे असे दाखविण्यापुरते साहित्य(material) तुमच्या गाठीशी असेल हा हा हा शरदकाका हे बेश्ट मार्केटींग आहे. असो. जगात अनेक धार्मीक लोक आहेत पण आहारी जाउन वाईट करुन घेणारे थोडेसेच व त्याकरता समाजात अनेक संस्था, लोक, उपचार, कायदे, विचार आहेत. जगात दारु पिणारे अनेक लोक आहेत पण आहारी जाउन वाईट करुन घेणारे थोडेसेच व त्याकरता समाजात अनेक संस्था, लोक, उपचार, कायदे, विचार आहेत. जगात गोड /तेलकट/ तिखट/ अन्न खाणारे अनेक लोक आहेत पण आहारी जाउन वाईट करुन घेणारे थोडेसेच व त्याकरता समाजात अनेक संस्था, लोक, उपचार, कायदे, विचार आहेत. जगात पालथे धंदे करणारे अनेक लोक आहेत पण आहारी जाउन वाईट करुन घेणारे थोडेसेच व त्याकरता समाजात अनेक संस्था, लोक, उपचार, कायदे, विचार आहेत. जगात आर्थिक व्यवहार करणारे अनेक लोक आहेत पण आहारी जाउन वाईट करुन घेणारे थोडेसेच व त्याकरता समाजात अनेक संस्था, लोक, उपचार, कायदे, विचार आहेत. जगात लोक काय म्हणतील हा विचार करुन झेपत नसताना उलटपालट वागणारे अनेक लोक आहेत पण आहारी जाउन वाईट करुन घेणारे थोडेसेच व त्याकरता समाजात अनेक संस्था, लोक, उपचार, कायदे, विचार आहेत. बघा अजुन कित्ती कित्ती पुस्तके लिहायचा चान्स आहे!!!!

अर्रे वा......! पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल आभार. आणि यनावालांना पुढील पुस्तकासाठीही शुभेच्छा..........! -दिलीप बिरुटे

एक दोन लेख वाचलेत मी यानावालांचे. यासारख्या लोकांचा एक प्रोब्लेम आहे... समाजच्या वैचारीक अपरिपक्वतेचं खापर ते इतर भलत्याच गोष्टींवर फोडतात. कारण बहुदा हे लोकं सुद्धा तेव्हढेच अपरिपक्व असतात. म्हणुनच त्यांचे विचार वर वर जरी फार उद्बोधक वाटले तरी ते समस्येचं निवारण करु शकत नाहि. अर्थात, "खटासी खट" या न्यायाने अंधश्रद्धाळु आणि यानावाला सारखे लोक एकमेकांना भिडत असतात... आणि दोघेही शेवटपर्यंत असमाधानीच रहातात. असो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

बहुदा हे लोकं सुद्धा तेव्हढेच अपरिपक्व असतात> तुम्हाला नक्की कुणाकुणाला अपरिपक्व म्हणायचे आहे? :P अवांतरः हे प्रभू, (नॉट मास्तरबरं का, रीयल वन ) हे अर्धवट राव कुणाला काय बोलत आहेत हे त्यांचे त्यांना कळत नाही. त्यांना क्षमा कर.

In reply to by कवितानागेश

>>तुम्हाला नक्की कुणाकुणाला अपरिपक्व म्हणायचे आहे? -- बरं बरं.. असं म्हणुया... जे अपरिपक्व आहेत असे दुर्दैवी आणि आपण अपरिपक्व आहोत असे ज्यांना कळलय ते सुदैवी :D आणि तो प्रभू आम्हाला कसला क्षमा करतोय... तो हि शेवटी आम्हा अर्धवटांची निर्मीती :P ( काय, वाटतय का नाहि एकदम "विठ्ठला... तू वेडा कुंभार" स्टाईल ;) ) अर्धवटराव

यनावालांचे लेख आवडतात. त्यात त्यांची तळमळ दिसते आणि केलेले युक्तीवाद फ्लॉलेस असतात. :) पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतो.

देव दानवा नरे निर्मिले ...हे मत लोका कळवू द्या... कवि केशवसूत नरामाजी देव दानव देवे निर्मिले हे मत लोका कळवू द्या......

तथाकथित धर्म ( मग तो कोणताही असो) हा `माणसाला देवाप्रत नेणारा मार्गदर्शक' मानला गेलाय आणि प्रत्येकाला त्याचा मार्गच तिथपर्यंत पोहोचवेल असं वाटतय. तुम्ही म्हणता तसं "मानवतेच्या मनाच्या या सर्व चुकीच्या धारणांना योग्य वळण/वेसण घालण्याचं काम" हे वर्तणुक सुधारण्याच्या उपदेशातून झालय पण ती मूळ हेतू साधण्यासाठी सांगितलेली उपाय योजना आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की वर्तणूक सुधारून देवप्राप्ती होत नाही कारण देव हीच मुळात कल्पना आहे! > मानवतेने आपला कपटी स्वार्थ साधण्यासाठी याच संस्कार संस्थेला बाजाराचं रूप देऊन तिची पार गटारगंगा करुन टाकली. = हेच मी म्हणतोय धर्माचा उपयोग वारंवार राजकीय हेतूसाठी करुन घेतला आहे कारण आख्खा देश युद्धप्रवण करायला धर्मा इतकं सोपं दुसरं कोणतही हत्यार नाही >सगळे विचारवंत मानवतेच्या अंगभूत रोगावर काम करण्यापेक्षा याच रोगाने पिडीत अश्या धर्माला उगाचच बोल लावतात, हा माझा मुख्य आक्षेप आहे. = मला इतर विचारवंतांच माहिती नाही पण एक नक्की आहे की व्यक्तिगत विचारांचा रोख बदलणं हे सर्वस्वी प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे. कोणत्याही कारणास्तव युद्ध गैर आहे हे व्यक्तीला पटलं की झालं त्यासाठी धर्माची आवश्यकता नाही. एकदम सारांशानं सांगायच झालं तर धर्म ही जन्मानं प्राप्त होणारी अनिवार्यता न होता तो व्यक्तीच्या आवडीनं निवडलेला पर्याय झाला (भले मग तो काल्पनिक देवप्राप्तीसाठी असला तरी चालेल) तर धर्म व्यक्तीगत होईल आणि एका घरात जसे भिन्न विचारसरणीचे लोक राहू शकतात तसे वेगवेगवेगळे धर्माचरण करणारे एकत्र राहू शकतील.

In reply to by संजय क्षीरसागर

बहुतेक पूर्वी असं होतं, निदान काही काळ तरी. चंद्रगुप्त मौर्य आधी वैदिक मतानुयायी होता नंतर अखेरिस श्रवणबेळगोळ येथे जाउन राहिला, जैन श्रमण म्हणून उत्तराअयुष्य व्यतीत केले. त्याची बायकापोरे हे सगळे पुन्हा पहिलेसारखेच(वैदिक ) राहिले. तीच गोष्ट अशोकाची. तो स्वतः बौद्ध बनला, तरी त्याच्या सर्व राण्या किंवा राजपुत्र काही बौद्ध बनले नाहित. एकाच घरात वेगवेगळ्या मार्गानी जाणारे सदस्य असत. इसवीसनाच्या तेराव्या शतकाच्या मध्यावर आलो तर काय दिसतं? आख्ख्या जगावर मंगोलांचा धुडगूस होता. आजचा आख्खा चीन,अफगाणिस्तान,इराण, मध्याअशिया(उझबेकिस्तान्,ताजिकिस्तान वगैरे), तिकडे मध्यपूर्वेत इराण, इराक, सिरिया,जॉर्डन असे सर्व देश व युरोपचाही काही भाग मिळून एक अतिप्रचंड मंगोल साम्राज्य उभं होतं. ह्या सत्तेचा प्रमुख, हलागु खान स्वतः बौद्ध होता, मुस्लिम बहुसंख्य एरियात रहात होता, त्याच्या काही राण्या ख्रिश्चन, काही मुस्लिम व काही स्थानिक मंगोलिअन आकाश देवतेच्या पाइक ह ओत्या. कुणालाही त्यानं कसलीही सक्ती केली नाही. पाचव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात युरोपमध्ये, विशेषतः रोमन अंकित भागात, एकाच कुटुंबात पेगन(मूर्तीपूजक) व ख्रिश्चन असे कॉम्बिनेशन काही दशके तरी चालले. थोडक्यात जगाच्या इतिहासात काही काळ तरी धर्म आपण म्हणता तशी ऐच्छिक बाब होती. हां हाणामार्‍या झाल्याच पण त्या नंतरच्या काळात; त्याही कुणामुळे झाल्या हा भाग वादग्रस्त आहे. जो तो दुसर्‍यावर खापर फोडतो. गंमत म्हणजे जगात आजवर सर्वाधिक युद्धे, नरसंहार हा "शांतीसाठी केलेल्या युद्धांनी" घडवलाय. तस्साच प्रकार "मानवतावादी महान संदेश " देण्याच्या महान उद्देशाने फार मोठा रक्तपात झालाय!

In reply to by संजय क्षीरसागर

>>तथाकथित धर्म ( मग तो कोणताही असो) हा `माणसाला देवाप्रत नेणारा मार्गदर्शक' मानला गेलाय आणि प्रत्येकाला त्याचा मार्गच तिथपर्यंत पोहोचवेल असं वाटतय. -- नाहि. व्यक्तीगत जीव आणि त्याचच इंटीग्रेटेड स्वरुप म्हणजे जे विश्व या दोहोंची एकमेकांप्रती असलेली भुमीका दाखवणारे तत्व म्हणजे धर्म. या विश्वाला धारण करणारा म्हणुन देव आला आणि तेव्हढच त्याचा धर्माशी संबंध. तसं नसतं तर बौद्ध, जैन, शंकराचार्यांचा अद्वैतमार्गी सनातनी वगैरे धर्म म्हणुन प्रस्थपीत झाले नसते. >>तुम्ही म्हणता तसं "मानवतेच्या मनाच्या या सर्व चुकीच्या धारणांना योग्य वळण/वेसण घालण्याचं काम" हे वर्तणुक सुधारण्याच्या उपदेशातून झालय पण ती मूळ हेतू साधण्यासाठी सांगितलेली उपाय योजना आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की वर्तणूक सुधारून देवप्राप्ती होत नाही कारण देव हीच मुळात कल्पना आहे! -- वर्तणुकीतील सुधारणाअ कुठल्याही कृत्रीम रितीने करण्याचा प्रयत्न म्हणुन धर्म रेफर केला गेला नाहि... तर सत्य समजुन घेऊन त्यानुसार वागलं कि आपोआप शांती लाभेल हा त्यामागचा कन्सेप्ट. राहिला विषय देवाचा, तर त्याविषयी आपली बेसीक मतभिन्नता आहे, म्हणुन त्याविषयी काहि टंकत नाहि. >> हेच मी म्हणतोय धर्माचा उपयोग वारंवार राजकीय हेतूसाठी करुन घेतला आहे कारण आख्खा देश युद्धप्रवण करायला धर्मा सारखं सोपं दुसरं कोणतही हत्यार नाही -- हा दोष धर्माचा नाहि. आणि म्हणुनच तुम्ही म्हणता तसं धर्म बाद झाला तरी जगात शांतता नांदणार नाहि.. राजकारणी इतर कुठला बागुलबुवा उभा करतील. >> मला इतर विचारवंतांच माहिती नाही पण एक नक्की आहे की व्यक्तिगत विचारांचा रोख बदलणं हे सर्वस्वी प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे. कोणत्याही कारणास्तव युद्ध गैर आहे हे व्यक्तीला पटलं की झालं त्यासाठी धर्माची आवश्यकता नाही. -- एक्झॅक्टली. युद्ध गैर आहे हे मानायला मानवता तयारच नाहि. आणि आपले हृदयदौर्बल्य मान्य करण्याऐवजी ति धर्माला दोष देतेय. राहिला विषय धर्माच्या आवष्यकतेचा, तर धर्म तसही आवष्यकतेच्या कुठल्याच व्याखेत बसत नाहि... माणसाने आपल्या जिज्ञासेने त्याला जाणुन घ्यायचा प्रयत्न केला आणि ते जाणल्याने मिळणारी मनःशांती इतरांना देखील मिळावी म्हणुन त्याचा प्रसार झाला. पुढे काय रामायण झाले हे सर्वशृत आहे. >>एकदम सारांशानं सांगायच झालं तर धर्म ही जन्मानं प्राप्त होणारी अनिवार्यता न होता तो व्यक्तीच्या आवडीनं निवडलेला पर्याय झाला (भले मग तो काल्पनिक देवप्राप्तीसाठी असला तरी चालेल) तर धर्म व्यक्तीगत होईल आणि एका घरात जसे भिन्न विचारसरणीचे लोक राहू शकतात तसे वेगवेगवेगळे धर्माचरण करणारे एकत्र राहू शकतील -- धर्म जन्माने प्राप्त होणारी अनिवार्यता नाहिच. आणि वेगवेगळे धर्माचरण करणारे एका कुटुंबात रहायला धर्माची अजीबात आडकाठी नाहि... हि लिमेटेशन मानवतेने स्वतःवर लादली आहे, आणि दोष धर्माला देण्यात येत आहे. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तुमच्या धर्माविषयीच्या कल्पना सुस्पष्ट नाहीत किंवा आपल्या दोघांच्या धर्माच्या व्याख्येतच फरक आहे . उदाहरणार्थ हिंदू धर्मात अनेक देव मानले आहेत आणि भक्ती हा त्याप्रत नेणारा मार्ग मानला गेलाय. मुस्लिम धर्म अल्ला हा देव मानतो आणि समर्पण हा त्याप्रत नेणारा मार्ग मानतो. क्रिस्टशन धर्म येशूला देव मानतो आणि सेवा हा त्याप्रत नेणारा मार्ग मानतो पण तुमच्या आकलनानुसार : >>व्यक्तीगत जीव आणि त्याचच इंटीग्रेटेड स्वरुप म्हणजे जे विश्व या दोहोंची एकमेकांप्रती असलेली भुमीका दाखवणारे तत्व म्हणजे धर्म. हा फार मुलभूत मतभेद आहे त्यामुळे इथे थांबतो जाताजाता ओघानं येणारे दोन मुद्दे जे इतरांनाही उपयोगी ठरतील ते असे: >व्यक्तीगत जीव आणि त्याचच इंटीग्रेटेड स्वरुप म्हणजे जे विश्व या दोहोंची एकमेकांप्रती असलेली भुमीका दाखवणारे तत्व म्हणजे धर्म. = प्रत्येकजण मुळात अस्तित्वाशी एकरुप आहेच हे अत्यंत सहजपणे दाखवता येईल, पण कोणताही धर्म अस्तित्वाला देव मानत नाही (अर्थात हे तुमच्याच पुढील वाक्यात आलेलं आहे) किंवा व्यक्ती आणि समष्टीची एकरुपता (जी मुळातच आहे) ती विशद करण्याचा प्रयत्न हा मूळ उद्देश मानत नाही >या विश्वाला धारण करणारा म्हणुन देव आला आणि तेव्हढच त्याचा धर्माशी संबंध. = धर्माचा संबंध देवाशी नाही हे अनाकलनीय विधान आहे, प्रत्येक धर्माचा आपापला देव आहे ही अत्यंत उघड गोष्ट आहे. माझं म्हणण फार सरळ आहे : अस्तित्व स्वयंभू आहे त्याला कुणीही धारण करण्याची किंवा चालवण्याची गरज नाही आणि त्यामुळे माझ्या पहिल्या प्रतिसादातलं पहिलं वाक्य पुन्हा उधृत करतो : देव ही माणसाची कल्पना आहे. तुमच्या प्रतिसादामुळे मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली याबद्दल मी तुमचा आभारी आहे. माझ्या यापूर्वीच्या लेखावर तुम्ही व्य. नि. तून शेअर केलेल्या मतांचीही मला जाणीव आहे आणि त्यामुळे तुम्ही गैरसमज करुन घेणार नाही अशी आशा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

>>तुमच्या धर्माविषयीच्या कल्पना सुस्पष्ट नाहीत किंवा आपल्या दोघांच्या धर्माच्या व्याख्येतच फरक आहे . -- धर्माविषयीच का... अहो आमच्या कुठल्याच कल्पना सुस्पष्ट नाहित. काहि काहि आहेत, पण ते असं चारचौघात बोलणं उचीत नाहि. आणि हो, आपल्या दोघांच्या धर्माच्या व्याख्येत मूलभूत फरक आहे. तुमची धर्माची व्याख्या माणसाच्या कल्पनेतुन सुरु होऊन माणासाच्या कल्पनेच संपते. मी ज्याला धर्म म्हणतो तो अस्तित्वाच्या निश्क्रीयतेशी एकरूप असतो आणि अस्तित्वाच्या क्रिया शीलतेला परिमाणं देतो. तो अनादी अनंत आहे. >>उदाहरणार्थ हिंदू धर्मात अनेक देव मानले आहेत आणि भक्ती हा त्याप्रत नेणारा मार्ग मानला गेलाय. -- हिंदु संस्कृतीत एकेश्वर, बहुईश्वर, निरिश्वर इ. सगळे प्रवाद आलेत. आणि ते जाणण्यासाठी अनेक मार्गही सांगीतले गेलेत. भक्ती मार्ग त्यापैकी एक. >>मुस्लिम धर्म अल्ला हा देव मानतो आणि समर्पण हा त्याप्रत नेणारा मार्ग मानतो. -- मुस्लीम धर्म (बहुतेक) निराकार सर्वशक्तीमानतेला मानतो... बाकी काहि विषेश अभ्यास नाहि >>क्रिस्टशन धर्म येशूला देव मानतो आणि सेवा हा त्याप्रत नेणारा मार्ग मानतो -- क्रिस्टशन येशुला देवपुत्र मानतात. बाकी त्यांचा आकाशातला बाप वेगळा. सेवा, भक्ती यांचं मनोहर दर्शन क्रिस्टशन धर्मात आढळ्त... पण तरिही.... हिंदु, मुस्लीम, क्रिस्टशन वगैरे हे फार फार तर संस्कृती, उपासना पद्धती, पंथ आहेत... ते धर्म नाहित. धर्माला मुळी "धर्म" या खेरीज इतर कुठलं नावच देता येत नाहि. >>पण तुमच्या आकलनानुसार : व्यक्तीगत जीव आणि त्याचच इंटीग्रेटेड स्वरुप म्हणजे जे विश्व या दोहोंची एकमेकांप्रती असलेली भुमीका दाखवणारे तत्व म्हणजे धर्म. हा फार मुलभूत मतभेद आहे त्यामुळे इथे थांबतो. -- येस सर. हा अगदी मूलभूत फरक आहे. = प्रत्येकजण मुळात अस्तित्वाशी एकरुप आहेच हे अत्यंत सहजपणे दाखवता येईल, -- ज्याक्षणी तुम्ही "असं दाखवता येईल" म्हटलं तिथेच ते दाखवण अशक्य करुन टाकलं... असो. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हे कळतय, आणि त्याबद्दल मतभेद नाहित. >>पण कोणताही धर्म अस्तित्वाला देव मानत नाही (अर्थात हे तुमच्याच पुढील वाक्यात आलेलं आहे). किंवा व्यक्ती आणि समष्टीची एकरुपता (जी मुळातच आहे) ती विशद करण्याचा प्रयत्न हा मूळ उद्देश मानत नाही -- अनेक नामधारी धर्म अस्तित्वाला देवाच्या रुपाने डिफाईन करतात. आणि "देव" या संकल्पनेवर जे जे आक्षेप घेता येतात ते सर्व "अस्तीत्व" या संपल्पनेवर देखील घेता येतील. आणि जे नामधारी धर्म देव मानत नाहित त्यांचे अस्त्वेत्वाबद्दलचे निरुपण थोड्या वेगळ्या शब्दात असते... पणा शेवटी प्रत्येक नामधारी धर्म अस्तित्वाविषयीच बोलतो. व्यक्ती आणि समष्टीच्या एकरुपतेवर कुठल्याही नामधारी धर्माचा आक्षेप नसावा... हिंदुधर्माचा तर अजीबात नाहि. जेंव्हा मी "विश्व हे व्यक्तीचं इंटीग्रेटेड स्वरुप" म्हणतो त्यातन अदरवाईज काय बोध होतो ? हिंदु धर्मातला पिंड-ब्रह्मांड विचार देखील त्याच पठडीतला. >> धर्माचा संबंध देवाशी नाही हे अनाकलनीय विधान आहे, प्रत्येक धर्माचा आपापला देव आहे ही अत्यंत उघड गोष्ट आहे. -- ते अनाकलनीय असलं तरी सत्य आहे. बौद्धांचा देव दाखवा. शांकराद्वैताचा देव दाखवा. वेदांतींचा देव दाखवा. तुम्ही ज्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केलाय त्याचा देव दाखवा. >>माझं म्हणण फार सरळ आहे : अस्तित्व स्वयंभू आहे त्याला कुणीही धारण करण्याची किंवा चालवण्याची गरज नाही आणि त्यामुळे माझ्या पहिल्या प्रतिसादातलं पहिलं वाक्य पुन्हा उधृत करतो : देव ही माणसाची कल्पना आहे. --देव स्वयंभू आहे. आपल्या निश्क्रीय आणि क्रीयाशील परिमाणांचं त्याला संपूर्ण भान आहे. कुठल्याही कल्पनाविलासापासून अलिप्त आहे... आणि हे माझं वाक्य नाहि तर आजवर जो काहि थोडाफार विचार केला तो शब्दात मांडण्याचा हा अल्प प्रयत्न. असो. जाता जाता... मूळ चर्चेचा रोख "धर्म बाद झाल्यास जगात शांतता नांदेल" या तुमच्या दाव्यावर होता. आणि हा दावा अत्यंत पोकळ आहे हे माझं त्यावरचं मत. माणसाला अशांतीची हौस आहे म्हणुन जगात अशांती आहे बाकी काहि नाहि. पंडीत-बुवा-उस्ताद-खां साहब-बेगम इ. मंडळींचे एकाच रंगमंचावरुन सादर केलेले राग-स्वर-ताल ऐकुन आनंदाने बेभाम व्हायचे कि सर्वांच्या हाती बंदुका देऊन कधी न संपणार्‍या हावरटपणाच्या आगीत आपले होश जाळुन घ्यायचे हि चॉईस मानवतेने स्वतः करायची आहे. आणि एकदा चॉईस केली कि त्याचे अटळ परिणाम भोगायला तयार रहायचं आहे. धन्यवाद. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तुम्ही म्हणताय : >देव स्वयंभू आहे. आपल्या निश्क्रीय आणि क्रीयाशील परिमाणांचं त्याला संपूर्ण भान आहे आणि पुढे म्हणताय : >तुम्ही ज्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केलाय त्याचा देव दाखवा = मी सुरुवातीपासूनच देव ही कल्पना आहे म्हणतोय! >मूळ चर्चेचा रोख "धर्म बाद झाल्यास जगात शांतता नांदेल" = देव नाही म्हटल्यावर धर्माची आवश्यकता नाही. मी म्हणतोय जगाचं सर्व विभाजन धर्माधिष्ठित आहे (भारत-पाकिस्तान फाळणी काय आहे? आणि दोन देशात तणाव आहे की नाही?) आणि तुम्ही म्हणताय धर्मामुळे अशांतता नाही. आता तुम्ही फक्त एक गोष्ट निश्चित ठरवा : देव आहे की नाही? मग तुम्हाला जी उघड गो ष्ट आहे (जगाचं सर्व विभाजन धर्माधिष्ठित आहे) ती लक्षात येईल आणि विभाजन हे अशांततेचं कारण आहे हे पण कळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

गाडी दोन भिन्न ट्रॅकवर धावते आहे. पहिला ट्रॅकः चर्चेचा मूळ विषय "धर्म बाद झाल्यास जगात शांतता नांदेल" हा तुमचा मुद्दा, आणि तो मला अजीबात पटला नाहि असा आहे. बाकी भारताची फाळणी का झाली, कुणाचे हितसंबंध जपण्याला झाली हा स्वतंत्र विषय आहे. भाषावार प्रांतरचनेच्यावेळी तर धर्म मुद्दा अजीबात नव्हता. तरी मुंबई महाराष्ट्रात आणायला रक्ताचे सडे पडले. उत्तरांचल वगैरे मागण्यांसाठीही रक्त सांडलं. आज नॉर्थ इस्ट राज्ये भारतापासुन वेगळं व्हायच्या मार्गाने जाताहेत. श्रीलंका जर एक सशक्त राष्ट्र असतं तर तामिळानाडु कश्मीरच्याच मार्गाने गेला असता. असो. राजकारणाने धर्माचा वापर केला. उद्या धर्म बाद झाले तर राजकारण इतर दुसरे हत्यार उपसेल. राजकारणाला मुद्यांची कमतरता कधीच भासणार नाहि. दुसरा ट्रॅकः चर्चेचा उपविषय, देव धर्म वगैरे वगैरे... याबाबतीत आपले मतभेद खुले आहेत. तुमच्या सांख्य तत्वज्ञानात देव दाखवा असं केवळ याकरता लिहीलं कारण तुम्ही म्हणाताय कि सर्व धर्मांचं प्रयोजन देवप्राप्ती आहे... आणि ३ असे उदाहरणं दिलीत कि ज्या धर्मांचं प्रयोजन नावाला देखील देवप्राप्ती नाहि. यात काय कन्फ्युजन आहे? >>आता तुम्ही फक्त एक गोष्ट निश्चित ठरवा : देव आहे की नाही? मग तुम्हाला जी उघड गो ष्ट आहे (जगाचं सर्व विभाजन धर्माधिष्ठित आहे) ती लक्षात येईल आणि विभाजन हे अशांततेचं कारण आहे हे पण कळेल. -- माझ्याकरता एकच गोष्ट एकदम उघड आहे. देव/धर्म वगैरे असण्याशी-नसण्याशी मानवजातीच्या अशांततेचा काहिही संबंध नाहि. माणुस अशांत आहे कारण हि अशांती त्याची हौस आहे. देव-धर्मावर त्याचं खापर फोडणे हा शुद्ध दांभीकपणा आहे, माणसाने स्वतःच्या डोळ्यात धुळ फेकणे आहे. उद्या यच्चयावत धर्म अगदी मुळासकट उपटुन फेकले तरी माणसाला भांडायला इतर हजारो कारणे सापडतील... कारण भांडल्याशिवाय मनुष्याला चैन पडत नाहि. इतकं गणित सिंपल आहे. एक (काल्पनीक) उदाहरण देतो. संजय क्षीरसागर नामक आयडी मिसळपाव नामक संस्थळावर आपले अस्तित्वाबद्दलचे विचार प्रकट करते. काहि जणांना ते पटतात, काहिंना त्यात शंका येतात, काहिंना अजीबात पटत नाहि. मग या आधारावर मिपावर कंपूबाजी सुरु होते. जे आपल्याला पटलं/पटलं नाहि ते इतरांना पटावं/पटु नये असा आग्रह सुरु होतो. हा आग्रह दुराग्रहात बदलतो. मग एकमेकांच्या धाग्यांचे ख.फ. करणे सुरु होते. शक्य असल्यास एकमेकांचे आयडी/संदेश बॉक्स/संगणक हॅक करणे इथपर्यंत मजल जाते. आणि मग मिपा-२, मिपा-रिलोडेड, अस्सल - मिपा, असे वेगवेगळे संस्थळे सुरु होतात. अर्धवटराव या गदारोळाला क्षीरसागर वा त्यांचे विचार जिम्मेदार मानत नाहि. कंपूबाजी करणे हि मिपाकरांची हौस आहे, आणि क्षीरसागरांनी आपले विचार मांडले नसते तर इतर कुठल्या धाग्यावरुन हि कंपूबाजी झाली असती अशी अर्धवटरावांची खात्री आहे ...म्हणजे गांधी-सावरकर, निवासी -अनिवासी भारतीय, शाकाहारी-मांसाहारी-बँडविड्थहारी, ब्राह्मण-अब्राह्मण, स्त्रीमुक्ती-पुरुषसक्ती/मुक्ती, महर्षींच्या नाड्या-इतरांचे सदरे, डॉलर-रुपया , मनमोहनसींग-अणा हजारे, स्वयंभू परा आणि त्याचे चित्रपट परिक्षण... इत्यादी इत्यादी. तुमचं काय मत ? अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

१०० टक्के सहमत. माणूस हा संघर्षप्रेमी आहे. जगाचा इतिहास शांततेचा कधीच नव्हता. शांतता ही केवळ माणसाच्या मनातच नांदू शकते अन्यत्र नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तुमचं कन्क्लूजन आहे : माणुस अशांत आहे कारण हि अशांती त्याची हौस आहे ....कारण भांडल्याशिवाय मनुष्याला चैन पडत नाहि. इतकं गणित सिंपल आहे पर्यायानं काहीही झालं तरी अशांतता तशीच राहणार इतकाच मतभेद असेल तर फार सोपं काम आहे! माझं म्हणणय प्रत्येक जण मूळात शांत आहे कारण शांतता हा आपला स्वभाव आहे. प्रत्येकाला शांततेचीच आस आहे आणि चुकीच्या धारणा हे अशांततेचं कारण आहे मग ती धारणा कोणतीही असो (उदाहरणार्थ, तुमची ही धारणा : माणुस अशांत आहे कारण हि अशांती त्याची हौस आहे) (किंवा पुपेची ही आता अपलोड झालेली सहमती दर्शक धारणा : माणूस हा संघर्षप्रेमी आहे. ... शांतता ही केवळ माणसाच्या मनातच नांदू शकते अन्यत्र नाही) आता ही धारणा सकृद्दर्शनी योग्य वाटली तरी किती विरोधाभासी आहे - जर माणसाचं मन शांत झालं तर तो युद्ध कशाला करेल? मग इतिहास काहीही असो.

In reply to by संजय क्षीरसागर

एकदा का मनुष्याला या शांतीतला आनंद उमगला तर तो परत संघर्ष्याच्या वाटेला जाणार नाहि . पण जोवर हि शांती त्याला गावत नाहि तोवर त्याच्या मनातली तगमग या ना त्या बहाण्याने बाहेर पडत राहील. म्हणुन खरच जर शांती हवी असेल तर अशांतीच्या जबाबदार्‍या इतरत्र न ढकलता माणसाने स्वपरिक्षण करणे उत्तम. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

`प्रत्येक जण मूळात शांत आहे कारण शांतता हा आपला स्वभाव आहे ' हे लक्षात आलं की स्वपरिक्षण सुरु होतं आणि मग सर्व चुकीच्या धारणांचं निराकरण झालं की शांती आहे. धन्यवाद!