Skip to main content

राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

लेखक श्रीरंग_जोशी यांनी शनिवार, 16/06/2012 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात. जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते. पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात. आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार? यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये. मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...

वाचने 66498
प्रतिक्रिया 155

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

२००४ च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार नुकताच सुरू झालेला असताना बारामतीच्या साहेबांच्या प्रकृतीची समस्या उद्भवली. तर ते आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले, सेनापती नसला तरी मावळे ही निकराची लढाई जिंकतील असा विश्वास आहे. यावर कलानगरचे साहेब (या निवडणूकीनंतर वृद्धापकाळामुळे त्यांना कधीच महाराष्ट्रभर सभा घेता आल्या नाहीत) म्हणाले, त्यांच्याकडे कसले आले आहेत मावळे, ते तर कावळे नि बगळे...

सन १९९८ चा मार्च महिना. वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर लोकसभेत चर्चा चालू होती. राम विलास पासवानः ये भाजपावाले केहते है की राम उनके पास है| राम वहा कहा है? राम तो यहा है जनता दल मै (स्वतःला उद्देशून) ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे: अरे ये तो विलासी राम है. सच्चा राम हमारे यहा ही है| (असे काहीसे)

राज ठाकरे - माझं आणि त्यांचं रक्ताचं आणि भक्ताचं नातं आहे. आबा - बडे बडे शहरोंमें ऐसी छोटी छोटी घटनाए तो होती रहती है !

In reply to by कानडाऊ योगेशु

२००६ की २००७ ची एक पत्रकार परिषद, तेव्हा गृहमंत्री म्हणून आबा लोकप्रियतेच्या शिखरावर होते व पत्रकार परिषदेत हिंदी मध्ये उत्तरे द्यायची त्यांची हौसही जोरात होती. कुठल्या तरी अट्टल गुन्हेगारांना पकडल्या बद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले. त्यावर कुणा हिंदी वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना विचारले की अब इस मामले में आपकी सरकार क्या करेगी? यावर आबा चटकन म्हणाले की, उन्हे शिक्षा मिले इसका हम पूरा प्रयास करेंगे. जेव्हा कुणीतेरी ही चूक आबांच्या लक्षात आणून दिली व समजावले की मराठीमधली शिक्षा म्हणजे हिंदीतले शिक्षण, आबांनी सजा असे म्हणायला हवे होते. त्यावर आबांनी पत्रकारांना विनंती करून नव्याने बाईट दिला व यावेळी शिक्षेऐवजी सजा देंगे असं ते म्हणाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

समजावले की मराठीमधली शिक्षा म्हणजे हिंदीतले शिक्षण
उलटे झाले हो! मराठीतले शिक्षण म्हणजे हिंदीतली शिक्षा. मराठीतली शिक्षा म्हणजे हिंदीतली सजा.

In reply to by मिहिर

हो वाक्यरचनेत जरा घोळ झाला. त्या घटनेत सबंधितांनी आबांना समजावलं की तुम्ही हिंदी वाक्यात जो शिक्षा (मराठी) शब्द वापरताहेत तो वाक्य हिंदी असल्याने शिक्षण असा घेतला जातोय. इथे जे म्हणायचे आहे त्यासाठी सजा या शब्दाचा वापर करावा...

सन १९९९ चा एप्रिल महिना. लोकसभेत वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर चर्चा चालू होती (याच ठरावावरील मतदानात वाजपेयी सरकार एका मताने पडले होते). भाषण चालू होते सोमनाथ चटर्जींचे आणी त्यावेळी संसदीय कामकाजमंत्री होते पी.रंगराजन कुमारमंगलम. सोमनाथदांचे भाषण चालू असताना कुमारमंगलम nature's call साठी गेले होते. सोमनाथ चटर्जी: I cannot see parliamentary affairs minister here. I am sure he is indulging in non-parliamentary activities outside. कुमारमंगलम सभागृहात परतत असताना त्यांनी हे ऐकले. आपल्या जागेवर परतल्यावर लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने त्यांनी interject केले: "I respect Somnath Chatterjee for his long contribution to this house. But I regret to say that Mr. Somnath Chatterjee also indulges in the same unparliamentary activity everyday that he accused me of in his speech" असे म्हणत त्यांनी उजव्या हाताची करंगळी (लहान मुले करतात त्याप्रमाणे) दाखवली. सभागृहात हशा पिकला हे सांगणे न लागे. (असे काहीसे)

In reply to by क्लिंटन

क्लिंटन साहेब - या आठवणी आपण फार जपून ठेवलेल्या दिसताहेत. तसेही १९९६ ते १९९९ या काळात लोकसभेतील (विश्वास / अविश्वास प्रस्तावांवरील) वादळी चर्चा सारा देश मन लावून बघायचा...

In reply to by श्रीरंग_जोशी

ह्या आठवणी क्लिंटन साहेबांशिवाय कोणाकडे जास्त चांगल्या मिळणार.. [सुधीर काळे आणि ईंद्रराज पवार हे सोडुन]

हरदन हळ्ळी दोडे गौडा देवेगौडा यांना पंतप्रधानपदावरून घालवायची मोहीम मार्च १९९७ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी सुरू केली होती. देवेगौडांवर त्यांनी निकम्मा असल्याचा आरोप केला होता. यावर देवेगौडांनी आक्षेप व्यक्त करताना त्यांच्या मोडक्या तोडक्या हिंदीतून म्हटले की उन्होने मुझे हकम्मा कहा? अवांतर -देवेगौडांचे वक्तृत जरी प्रसिद्ध नसले तरी लोकसभेतले पंतप्रधान म्हणून त्यांचे शेवटचे भाषण फार मुद्देसुद्धा व प्रभावी ठरले होते.

महाराष्ट्रातील अनेक खासदार हिंदीतून बोलायले की हमखास "अध्यक्ष महाराज" असे म्हणत भाषणाला सुरवात करत. हिंदीमध्ये महाराज म्हणजे आचारी. त्यामुळे सभागृहात हशा पिकत असे. हा किस्सा आहे महाराष्ट्रातील बीडच्या खासदार केशरबाई क्षीरसागर यांच्या हिंदीचा. त्या काही कारणानिमित्त इंदिरा गांधींना भेटायला गेल्या होत्या. त्या इंदिरा गांधींच्या कार्यालयात जात असतानाच इंदिराजींचा पारा काही कारणाने चढलेला होता आणि त्यांनी हातातली पेन्सिल टेबलवर आपटत कार्यलयातील शिपायाला दरडावले हे केशरबाईंनी बघितले. इंदिराजींचा पारा चढलेला असताना त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे ते काम होणे शक्य नाही असे केशरबाईंना वाटले. तेव्हा केशरबाई इंदिराजींना नमस्कार वगैरे करून लगेच जायला निघाल्या. तेव्हा इंदिराजींनी त्यांना विचारले:"केशरबाई आप इतने जल्दी वापस क्यू जा रही है?". त्यावर केशरबाईंचा प्रतिसादः "आपने टेबलपर पेन्सिल आपटी तो मुझे लगा आपसे बात करने का ये टाइम ठिक नही". अर्थातच इंदिराजींना आपटी म्हणजे काय ते कळले नाही आणि केशरबाईंनी पेन्सिल आपटून दाखवली आणि अर्थ सांगितला तेव्हा इंदिराजी खळखळून हसल्या. नंतर अनेकदा केशरबाईंना त्या "आज मैने पेन्सिल आपटी नही तो आप अपनी बात केह सकती है" असे गमतीने म्हणत असत.

In reply to by श्रीरंग_जोशी

हो ते केशरबाईंचेच पुत्र.

In reply to by क्लिंटन

बीडात आपोझिशनवाले न्हेमी योकच लाईन माराय्चे .. "केशरकाकू .. !! तुहा नव्रा डाकू !! तुहे पोरं खिसेकापू !!! तं मी तुला मत कसं टाकू ???"

In reply to by क्लिंटन

महाराष्ट्रातील अनेक खासदार हिंदीतून बोलायले की हमखास "अध्यक्ष महाराज" असे म्हणत भाषणाला सुरवात करत. हिंदीमध्ये महाराज म्हणजे आचारी. त्यामुळे सभागृहात हशा पिकत असे. खरे आहे. विशेषतः, शरद पवार जेंव्हा प्रथम संसदेत गेले तेंव्हा त्यांच्याकडून असे म्हणले गेले म्हणून जरा जास्तच गवगवा झाला होता. केशरबाईंचा किस्सा एकदम मस्तच आहे! बाकी अजून एक गंमत म्हणजे, त्यांना काकू म्हणत असत. आता त्यांच्या नावाने जे कॉलेज आहे, त्याचे नाव देखील, "केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर, उर्फ काकू कॉलेज" असे आहे! अजून एक आठवले: बाळासाहेब भारद्यांनी केलेली भारतीय राजकारणाची व्याख्या: "काँग्रेसवाल्यांच्या खुर्च्या, जनसंघाच्या पुजाअर्चा, समाजवाद्यांच्या चर्चा आणि कम्युनिस्टांचा मोर्चा"

In reply to by विकास

अजून एक आठवले
हो हो. त्यांचीही बहुतेक वक्तव्यं विनोदीच असतात. ;)

किस्सा नक्की कुणाचा ते माहिती नाही पण परदेशी नेत्याचा आहे. ('आपले वक्तृत्व कसे सुधाराल ? ' पुस्तकात होता. ;) ) एका बिल ला त्यांचा पक्ष समर्थन करणार का असे विचारले असता तो नेता म्हणाला... आय विल... (समर्थक खूश) नॉट... (विरोधक खूश) टेल यु... (हशा नि टाळ्या)

मार्च १९९८ मध्ये प्रथमच बहुमताच्या जवळ पोचून भाजप व मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाले होते. परंतु त्यावेळी बारामतीच्या साहेबांच्या डावपेचांमुळे (शेतकरी दलित गोरगरिबांची माय - काँग्रेस सपा आर पी आय) युतीचे महाराष्ट्रात पानिपत झाले होते. प्रमोद महाजन, मधुकर सरपोतदार सारख्या दिग्गजांचाही पराभव झाला होता. त्या वेळच्या विश्वास प्रस्तावावरील चर्चेमध्ये लोकसभेमध्ये सेनेकडून बोलायची जबाबदारी तत्कालीन खासदार मोहन रावले यांच्यावर येऊन पडली. फारसे अभ्यासपूर्ण भाषण न करता भावनिक भाषण करायचा त्यांनी प्रयत्न केला. तो बऱ्यापैकी जमतोय असे दिसत असताना नेमका घात झाला. ते म्हणत होते, की २ वर्षांपूर्वी १३ दिवसांचे वाजपेयी सरकार लोकसभेत विश्वासमत प्राप्त करेल अशी शक्यता दिसता नसल्याने, अखेर अटलजींनी घोषणा केली की, मै जा राहा हूं राष्ट्रपतीजी के पास अपना त्यागपत्र देने... त्यावेळी महाराष्ट्रातील जनता हे दूरदर्शन वर बघत होती त्यात सामान्य मजूर, रिक्षेवाले वगैरे लोक होते. मोहनराव म्हणाले की, अटलजीकी यह बात सून कर लोगो की आंखों में पानी आ गया. ऐनवेळी मातृभाषेच्या प्रभावामुळे त्यांनी आंसू आ गये म्हणण्याऐवजी पानी आ गया असे म्हंटले. हे ऐकून विरोधी बाकांवर खसखस पिकली. सत्ताधारी पक्षाकडून मात्र भारदस्त आवाज असणाऱ्या कुणीतरी विरोधकांची खालील शब्दांत कान उघडणी केली... एक गैर हिंदी भाषी हिंदी में भाषण दे रहे है, कुछ तोह शिष्टाचार होना चाहिए... मग मात्र सभागृहात शांतता पसरली व मोहनरावांनी आपले भाषण संपवले.

येथे एक पुढारी चर्चिलसरकार वर टीका करीत असता चर्चिल(चू.भू.) ना म्हणाला की आपलयाला मृत्यू वेडेपणा मुळे किवां गुप्तरोगाने येवो. त्या वर चर्चिल म्हणाले " ते मी तुमची तत्वे स्वीकारतो (वेडेपणा) की प्रेयसीला मीठी मारतो (गुप्तरोग) त्यावर अवलंबून आहे.

‘आम्ही फक्त स्वप्नं विकली नाहीत. आम्ही जे बोललो ते ‘करून दाखवलं’ -दिलीप बिरुटे

आपला' बुश कसा विसरताहात. त्याचे जगप्रसिद्ध वाक्य आहे ना 'जे आमच्या बाजूचे नाहीत ते सारे दहशतवाद्यांच्या बाजूचे समजले जातील. ' (बुश मराठीत कसा बोलला हा हलकट प्रश्न फाट्यावर मारण्यात येत आहे. बुश हल्ली मराठी शिकतोय नि मिपावर त्याचा एक आयडीपण आहे हे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.) बुशिजम्स वर सर्च मारला तर बुशमहाशयांनी तोडलेले अनेक तारे सापडतील. बॉस्टनला खेळण्यांचा दुकानात बुश-डॉल्स मिळत, ज्याच्या पायावर दाब दिला की निवडक 'बुशिजम्स'पैकी एक ऐकायला मिळे. काही बुशिजम्स इथे

बाबासाहेब फारच विनोदी स्वभावाचे होते असे वाचले आहे. विरोधकांचा आक्षेप असायचा की त्यांची विनोदी वृत्ती पत्रकार परिषद, विधानसभेतील चर्चा यामधील गांभीर्य संपुष्टात आणते. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मी रांगत्या वयाचा असल्याने मला नेमकी उदाहरणे ठाऊक नाहीत पण आपल्यापैकी कुणाला ठाऊक असल्यास येथे टंकवावीत.

In reply to by श्रीरंग_जोशी

आता मला "माजी मुख्यमंत्री"पदावरुन कोणीही उतरवु शकणार नाही. असे काहीसे वाक्य त्यांनी म्हटल्याचे वाचले होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

You are from which city या प्रश्नावर दिलेले उत्तर. I am from Simplicity. :-o (शिरीष कणेकर फिल्लमबाजीमध्ये - महाराष्ट्रात फक्त दोनच भोसले प्रसिध्द, शिवाजीराजे भोसले आणि आशा भोसले, बाकीचे सगळे बाबासाहेब भोसले :-D)

In reply to by श्रीरंग_जोशी

बाबासाहेब अत्यंत बुद्धिमान होते, बॅरिस्टर होते. ते विनोदीही होते. शाब्दिक कोट्या व स्व्तःवरील विनोद करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या कारकीर्दीत, वारंवार होतो तसा, महाराष्ट्र काँग्रेसी अंतर्गत उद्रेक झाला. मग दिल्लीने तो तात्काळ शमवला. त्याविषयी त्यांना विचारावयास गेलेल्या पत्रकारांशी बोलतांना बाबासाहेब म्हणाले " बंडोबा थंडोबा झाले".

In reply to by प्रदीप

मला वाटते बाबासाहेब जेंव्हा मुख्यमंत्री होते त्याच सुमारास: पवारांची समाजवादी कॉंग्रेस ज्याला काँग्रेस (स) म्हणत काँग्रेसच्या विरोधात निवडूणकीत उभी होती. त्याला उद्देशून ते म्हणाले होते, काँग्रेस (स) म्हणजे काँग्रेस संपली! :-) (आधी कधीतरी सांगितलेला किस्सा:) एकदा महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री पार्वतीबाई परीहार ह्या त्या वर्षातील साहीत्यसंमेलनाध्यक्ष शंकरराव खरात यांच्या समवेत एकाच स्टेजवर कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्या बोलायला उठल्या पण एकदम शंकररावांचे नाव डोक्यातून गेल्याने (आपले हे, असे काहीसे म्हणत) अडखळल्या. म्हणून कोणी तरी पटकन सांगितले. कार्यक्रम सुरळीत पार पडला. पण दुसर्‍या दिवशी एका वृत्तपत्रात मथळा होता: "पार्वतीबाई, शंकररावांना विसरल्या!" ÌÌÌ

आचार्य कृपलानी हे प्रजा समाजवादी पक्षाचे तर त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी Congress पक्षाच्या खासदार होत्या. आचार्य कृपलानींनी त्यांच्या भाषणात Congress पक्षावर टिका करायला सुरवात केली. अर्थात त्यांच्या पत्नी त्याच पक्षाच्या खासदार म्हणून त्याच सभागृहात उपस्थित होत्या. आचार्य कृपलानी पुढे म्हणाले: "I knew that congressmen are crooks. Still I never expected them to run away with the wives of members of opposition parties". यावर सभागृहात हशा पिकला हे वेगळे सांगायला नको.

परवाच बिहारमध्ये १११ बालके मृत्युमुखी पडली. तेंव्हा तिथल्या आरोग्य मंत्री चौबेनी पालकांना मुलांच्या आरोग्यासाठी देवाची प्रार्थना करायला सांगितली! :)

मै दे रहा हूं, बालासाहबजी और उद्धवजी को हार्दिक बधाई, मै करता हूं अभी, दोनो कॉंग्रेस की खुदाई! .. ‘तुम्ही म्हणता आपली युती टिकेल वर्षे शंभर पण तुम्ही कुठे लावणार आमचा नंबर?’

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस - अरेरे अरे ये क्या हुआ, आ गयी सोनिया... चक्कर खा गई भाजपा.... डर गई शिवसेना... सेना भाजप युती - थोडा थोडा भाग भाग सा, देवेगौडा भाग भाग सा...

१९९८ च्या लोकसभा निवडणूकीच्या काळात स्व. प्रमोद महाजनांची यवतमाळातील सभा (या सभेत त्यांनी मोनिका लेवेन्स्की चा उद्धार केल्याने गाजलेली). अटलजींचे गुणगान करता करता ते म्हणाले की अटलजी जवळ जवळ ५० वर्षांपासून राजकारणात आहेत परंतु आजवर त्यांच्या धोतरावर कुठलाही डाग पडलेला नाहीये, अपवाद तुम्ही मारलेल्या मतदानाच्या शिक्क्यांचा. यावर श्रोत्यांमध्ये बसलेला एक युवक चटकन उभा राहून ओरडला, यावेळी तोही पडू देणार नाही. एरवी मिश्किल स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे महाजन त्यावेळी रागाने लाल झाले होते.

तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी त्यांच्या विशुद्ध हिंदीत पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना...

वाहयात बातें करता हैं ये मुशर्रफ...
ह्या विधानात 'गाजलेले (विनोदी)' म्हणावे असे काय आहे ? आणि दर दिड मिनिटांनी एक प्रतिसाद देण्यापेक्षा, एकाच प्रतिसादात तुमच्याकडे आहेत ती सगळे विधाने का देत नाही ? प्रतिसादांचा आकडा वाढवायचा असेल तर आम्हाला सांगा की, आम्ही मोकळेच आहोत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

गुरूजी - मान्य आहे की निखळ विनोदी असे काही नाही, पण केंद्रीय गृहमंत्री (सोबत उप-पंतप्रधानपद) असलेल्या अनुभवी माणसाने अश्या असांसदीय भाषेचा वापर करणे हा एक वेगळ्या प्रकारचा विनोद आहे असे माझे मत आहे. बाकी धाग्याच्या दर्जाला अधिक महत्त्व असावे, प्रतिसादसंख्या गौण आहे. प्रतिसादातील प्रत्येक विधान वेगवेगळे लिहिण्याचा उद्देश असा आहे की, इतर कुणास (१ किंवा अधिक) त्या पुढाऱ्याचे इतर कुठले विधान अथवा त्या घटनेशी संबंधीत इतर माहिती लिहायची असल्यास वाचकांस त्याचा माग ठेवणे सोपे जाईल. एकाहून अधिक पुढाऱ्यांची विधाने व घटना यांवरच्या प्रतिसादांची सरमिसळ होणार नाही. बाकी आपलं पॅकेज मात्र जोरदार दिसत आहे...

In reply to by श्रीरंग_जोशी

माणसाने अश्या असांसदीय भाषेचा वापर करणे हा एक वेगळ्या प्रकारचा विनोद आहे असे माझे मत आहे. जोशीबुवा, आपले विनोदाचे अंग फारच विनोदी आहे. ;)

जगन्नाथ राव जोशी हे मोठे ईरसाल व्यक्तिमत्व होउन गेले. जन संघ घडवण्यात ज्या अनेकांनी आयुष्य वेचले ( व पदरी काही पडले नाही - आपल्या दृष्टीने) त्या पैकी एक.ते अविवाहित होते ते मूळ कानडी असले तरी त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. भाषणे तर अती खुसखुशीत करीत असत. त्यांच्या भाषणात लैगिकता सूचकता , अतिशयोक्ती , बिनबुडाचे आरोप यांची बरसात असे. एकंदर जनसंघ-संघात थोडेसे मिसफिट असणारे व्यक्तिमत्व. त्यांनी महाराष्ट्र , कर्नाटक , म.प्रदेशातून अनेक निवडणुका लढवल्या ( म्हणजे बहुतेक वेळा पडले). लोकसभे साठी १९६७ सालच्या निवडणुकीमध्ये पुण्यात जगन्नाथ राव विरुद्ध आ. अत्रे सामोरा अमोर उभे होते. त्याच वेळी अत्रे विधान सभेची निवडणूक मुंबईतून लढवत होते. आ. अत्रे नी एका भाषणात जगणनाथ रावां वर भरपूर टीका केली. हया कानाड्याची (उपार्याची) पुण्यात हात भर " - - " फाटेल ..... पुढच्याच सभेत जगन्नाथ रावांनी ही कोटी उलटवली "ज्या अत्र्याचा एक पाय मुंबईत व एक पुण्यात आहे त्याची "- -" सव्वा हात फाटलेलीच आहे , शिवण्याची सोय करायची असेल तर सांगा". तर हया विद्वान ,सज्जन , निष्ठावान कानाड्याची पुण्यात खरच फाटली , आणि आज असाच एक भ्रष्टाचाराचा शिरोमणी कानाड्या पुण्यात संभावित पणे मिरवतो आहे. उतार वयात जगन्नाथ राव एकाकी झाले. प्रमोद महाजनांनी त्यांची निष्ठेने सेवा केली. हे ही थोडे अवांतर.

In reply to by मोदक

९ / १० वर्षांपूर्वी कोरेगावच्या ताईंच्या नेतृत्वात या मुद्द्यावर बरीच आंदोलने झाली होती....

In reply to by मोदक

त्यांचा रेफरन्स चुकला असेल पण पाण्यापासून वीज तयात केली तर कस कमी होतो हे सत्य आहे .. कारण पा ण्यामधे असणारे सुक्ष्म जीव जंतु , शेवाळे जे शेती पूरक असते ते औष्णिक विद्युत केंद्रात निघुन / मरून जाते ..

In reply to by कपिलमुनी

पण औष्णीक केंद्रात वीज कशापासुन करतात असं विचारल तर मी तरी कोळशापासुन्/गॅसपासुन किंवा इतर इंधनापासुन अस उत्तर देईन.

In reply to by शैलेन्द्र

कोळसा वगैरे इंधन म्हणून पाणि तापवायला वापरले जाते. माझ्या माहितीप्रमाणे वाफेच्या जोरावर वीज निर्माण केली जाते. कृपया जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

In reply to by शैलेन्द्र

माझ्या माहितीप्रमाणे वीज दोन्हीमध्ये नसते. वीजनिर्मितीसाठी कसली तरी शक्ती वापरुन मोशन (मराठी शब्द सुचवा) निर्माण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात. जसे पाण्यच्या वेगावर शक्तिशाली टर्बाईन्स (मराठी शब्द सुचवा) फिरतात व त्यापासून वीज निर्माण होते. तसेच थोडे वेगळ्या प्रकारे औष्णिक वीजप्रकल्पात होत असावे असे मला वाटते.

In reply to by श्रीरंग_जोशी

*औष्णिक/अण्वीक वीजप्रकल्पात इंधनात असलेली रासायनीक/ जैवीक उर्जा जाळुन मुक्त केली जाते, त्या उर्जेवर पाण्याची वाफ करुन, ती वाफ कोंडली जाते, त्या स्थीतीज उर्जेवर टर्बाईन्स फिरवुन त्यापासुन गतीज उर्जा तयार केली जाते, त्या गतीज उर्जेवर डायनामो फिरवुन तिचे विद्युत शक्तीत रूपांतर केले जाते. *जलविद्युत प्रकल्पात योग्य ठीकाणी साचवलेल्या पाण्याच्या स्थीतिज उर्जेचे रुपांतर गतीज उर्जेत करुन त्यावर डायनामो फिरवले जातात. *पवन विद्युत प्रकल्पात वाहत्या वार्‍याची गतिज उर्जा वापरुन त्यावर डायनामो फिरवले जातात.

In reply to by शैलेन्द्र

म्हणजेच पाण्याचा थोडा वापर होतो .. मूळ मुद्दा हा होता, अशा पद्धतीने वाफ केलेल्या पाण्याचा 'कस' गेलेला असतो ..

In reply to by श्रीरंग_जोशी

मोशन (मराठी शब्द सुचवा) - गती. टर्बाईन्स (मराठी शब्द सुचवा) - जनित्र.

In reply to by श्रीरंग_जोशी

वीज निर्मिती साठी टर्बाईन महत्वाची...कोणत्याही प्रकारे टर्बाईन विशिष्ट वेगाने फिरायसाठी फक्त औष्णिक,जल, वायु किंवा लाटांचा उपयोग होतो...

In reply to by प्यारे१

ही गोष्ट भाक्रानांगल धरणाच्या बाबतीतली आहे. आणि हायड्रो प्रकल्पात असा कस कमी होत नाही, पण औष्णिक प्रकल्पात मात्र हा खुप खुप मोठा प्रश्न आहे हे खरं.

मॅनहटनमध्ये एक फ्लायओव्हर किंवा रस्ता असे काहीतरी बांधणे रेंगाळले होते, बड्या बड्यांचे "हितसंबंध" आड येत होते. शेवटी कंटाळून President नी नकाशावर रस्त्याच्या दोन रेषा आखल्या, खाली सही केली व तो नकाशा हाच फायनल प्लॅन म्हणून अंमलात आणायला दिला. आणखी कुणाला काही माहिती आहे का या घटनेची?

दादाराजे खर्डेकर सातार्‍यात एक निवडणूक सभा घेत होते. भाषण संपल्या नंतर लोकानी घोषणा दिल्या शरद पवार झिंदाबाद. त्यानंतर कोणीतरी जोरात ओरडले "दादा राजे......" लोकाना जय म्हणावे /झिंदाबाद म्हणावे हे कळाले नाही एकदम शांतता पसरली. कोणीतरी त्या घोषणेला उत्तर दिले ".खर्डेकर........" सभेत एकदम हशा पिकला

शरद पवार बडा मालदार आदमी है ..... शरद यादव इन लोकसभा हम इंदिराजी जैसे खूबसूरत तो नही फिर भी इतने बुरे भी नही,,,, हमारी एक बार तो सही तस्वीर दिखाओ ना दूर दर्शन पर ,,,,, अटल बिहारी बाजपेयी इन तळेगाव दाभाड

खुप दिवसापुर्वी वाचण्यात आलेला किस्सा....संसदेत एका उत्तर भारतीय पांडे नावाच्या खासदारा नंतर एक मराठी खासदार भाषणाला उभे राहिले आणी त्याची सुरुवात " अध्यक्ष महओदय अभो जो पांडे जी ने विचार मांडे है.." ने केली तेव्हा सर्व संसद हसाय लागली..

In reply to by ramjya

ते मराठी नेते म्हणजे स का पाटील होते. "गांधीजी के नेतृत्व के नीचे हमने जो चलवल की" वैग्रे मुक्ताफळे पण त्यांचीच.

सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्यावर पहिल्याप्रथम जे भाषण केले ते फारच भावनिक होते. मी तुमच्या समोर सून म्हणुन आले.आणि तुमच्यासमोरच विधवा झाले ह्या प्रकारची भावनिक वाक्यरचना भरपूर होती.तेव्हा त्यांना भाषण लिहुन देणार्या टीमचे ही खूप कौतुक झाले होते. भाजप सरकारपडल्यावर व कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यावर पंतप्रधानपद नाकारताना ही "अंतरात्मा कि आवाज" नावाचा जबरदस्त गुगली मॅडमनी टाकला होता.

In reply to by कानडाऊ योगेशु

तेव्हा अशी वंदता होती की सोनियाजींना जावेद अख्तर यांच्याकडून घरपोच शिकवणी मिळत आहे व त्यांच्याकडूनच भाषणे पण लिहून मिळत आहेत. त्या सर्व कष्टांस फळ येण्यास २००४ साल उजाडले....