Skip to main content

का लिहितो मी कविता?

लेखक रसप
बुधवार, 13/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
का लिहितो मी कविता? कारण 'ती' लिहित नाही.. तीच जिला आजकाल गुलाबी रंग खूप आवडतो किती ठोके चुकले त्याचा हिशेब नेहमी चुकतो ती हसत राहते मनातल्या मनात कुणालाच न सांगता मी तेच मोती वेचतो आणि गुंफतो माझी कविता ! का लिहितो मी कविता? कारण 'तो' लिहित नाही.. तोच ज्याला कुठे दुखतंय तेच कळत नाही, पण दु:ख उगाळायला आवडतं त्याची व्यथा डोळ्यातून झरत राहते काहीच न बोलता.. मी तेच शब्द टिपतो आणि गातो माझी कविता ! का लिहितो मी कविता? कारण 'तो' लिहित नाही.. तोच जो फक्त किनाऱ्याच्या दगडांवर आपटत राहातो पुन्हा पुन्हा मागे जाऊन, पुन्हा पुन्हा उसळत राहातो तो खवळतो, आतल्या आत खदखदतो.. कधीच न थकता मी तोच उत्साह चोरतो आणि उधळतो माझी कविता ! का लिहितो मी कविता? कारण 'ते' लिहित नाहीत तेच जे प्रत्येक गोष्ट शांतपणे बघतात अन्याय, अत्याचार मूकपणे साहतात चरफडतात, तळमळतात, धुमसतात पण बायका-पोरं पाहून परत शांत होतात ते चिडतात स्वत:वरच पण कुणाला न दाखवता मी तीच हताशा जाणतो आणि देतो माझी कविता ! का लिहितो मी कविता? कारण 'तो' कधीच लिहित नाही तोच ज्याच्याकडे निर्मितीची शक्ती आहे, पण व्यक्त व्हायची युक्ती नाही ! तो पाहतोय सगळं वर बसून त्याने धरलाय हात माझा आणि घेतोय सगळं लिहून तोही होतो कधी खूष, कधी नाखूष मग करतो मलाच लिहिता... मी त्याचेच बोल बोलतो आणि प्रसवते माझी कविता.... ....रसप.... १३ जून २०१२ http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_13.html
लेखनविषय:

वाचने 2853
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

कल्पना चांगली आहे. कल्पनाविस्तार अजून चांगला होऊ शकला असता. पु. का. स्फु. शु.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

कल्पना चांगली आहे. कल्पनाविस्तार अजून चांगला होऊ शकला असता. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे

प्रश्न चांगला आहे. प्रत्येक कविला पडायला हवा. (मग जगाचं नंदनवन होईल. :) )

रसप, मला कविता आवडली , तिचा आशय कळला. अन भावला सुद्धा. अतिशय छान मांडणी. एकाच प्रश्नाला उत्तर देत देता बरेच काही सांगुन गेलात. लिहित रहा.

In reply to by पैसा

आम्ही संपादकांच्या शुद्धलेखनाबाबत कानपिचक्या म्हणून घेतो. (कोणती स्मायली बसेल बरं इथे????) अमृत