का लिहितो मी कविता?
कारण 'ती' लिहित नाही..
तीच जिला आजकाल गुलाबी रंग खूप आवडतो
किती ठोके चुकले त्याचा हिशेब नेहमी चुकतो
ती हसत राहते मनातल्या मनात
कुणालाच न सांगता
मी तेच मोती वेचतो आणि
गुंफतो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'तो' लिहित नाही..
तोच ज्याला कुठे दुखतंय तेच कळत नाही,
पण दु:ख उगाळायला आवडतं
त्याची व्यथा डोळ्यातून झरत राहते
काहीच न बोलता..
मी तेच शब्द टिपतो आणि
गातो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'तो' लिहित नाही..
तोच जो फक्त किनाऱ्याच्या दगडांवर आपटत राहातो
पुन्हा पुन्हा मागे जाऊन, पुन्हा पुन्हा उसळत राहातो
तो खवळतो, आतल्या आत खदखदतो..
कधीच न थकता
मी तोच उत्साह चोरतो आणि
उधळतो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'ते' लिहित नाहीत
तेच जे प्रत्येक गोष्ट शांतपणे बघतात
अन्याय, अत्याचार मूकपणे साहतात
चरफडतात, तळमळतात, धुमसतात
पण बायका-पोरं पाहून परत शांत होतात
ते चिडतात स्वत:वरच
पण कुणाला न दाखवता
मी तीच हताशा जाणतो आणि
देतो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'तो' कधीच लिहित नाही
तोच ज्याच्याकडे निर्मितीची शक्ती आहे,
पण व्यक्त व्हायची युक्ती नाही !
तो पाहतोय सगळं वर बसून
त्याने धरलाय हात माझा
आणि घेतोय सगळं लिहून
तोही होतो कधी खूष, कधी नाखूष
मग करतो मलाच लिहिता...
मी त्याचेच बोल बोलतो आणि
प्रसवते माझी कविता....
....रसप....
१३ जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_13.html
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2853
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्छा ! मला वाटले की वातुळ
म्हणजे ?
In reply to अच्छा ! मला वाटले की वातुळ by नाना चेंगट
म्हणजे ? नक्की काय म्हणायचं
In reply to म्हणजे ? by रसप
तू काय discoevry वरचा प्राणी
कल्पना
असेच म्हणतो.
In reply to कल्पना by मिसळलेला काव्यप्रेमी
अजून येऊ द्या. अजून येऊ द्या
In reply to असेच म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पु. का. स्फु. शु.
In reply to कल्पना by मिसळलेला काव्यप्रेमी
पुढील
In reply to पु. का. स्फु. शु. by जेनी...
तुमची ही कविता (अर्धवट) वाचुन
प्रश्न
कविला प्रश्न नाही कविता
In reply to प्रश्न by रमताराम
का वाचतो मी अशा कविता?
रसप, मला कविता आवडली , तिचा
असेच म्हणतो
In reply to रसप, मला कविता आवडली , तिचा by स्पंदना
+२
In reply to असेच म्हणतो by अमृत
पैसातै हा प्रतिसाद
In reply to +२ by पैसा