का लिहितो मी कविता?
कारण 'ती' लिहित नाही..
तीच जिला आजकाल गुलाबी रंग खूप आवडतो
किती ठोके चुकले त्याचा हिशेब नेहमी चुकतो
ती हसत राहते मनातल्या मनात
कुणालाच न सांगता
मी तेच मोती वेचतो आणि
गुंफतो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'तो' लिहित नाही..
तोच ज्याला कुठे दुखतंय तेच कळत नाही,
पण दु:ख उगाळायला आवडतं
त्याची व्यथा डोळ्यातून झरत राहते
काहीच न बोलता..
मी तेच शब्द टिपतो आणि
गातो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'तो' लिहित नाही..
तोच जो फक्त किनाऱ्याच्या दगडांवर आपटत राहातो
पुन्हा पुन्हा मागे जाऊन, पुन्हा पुन्हा उसळत राहातो
तो खवळतो, आतल्या आत खदखदतो..
कधीच न थकता
मी तोच उत्साह चोरतो आणि
उधळतो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'ते' लिहित नाहीत
तेच जे प्रत्येक गोष्ट शांतपणे बघतात
अन्याय, अत्याचार मूकपणे साहतात
चरफडतात, तळमळतात, धुमसतात
पण बायका-पोरं पाहून परत शांत होतात
ते चिडतात स्वत:वरच
पण कुणाला न दाखवता
मी तीच हताशा जाणतो आणि
देतो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'तो' कधीच लिहित नाही
तोच ज्याच्याकडे निर्मितीची शक्ती आहे,
पण व्यक्त व्हायची युक्ती नाही !
तो पाहतोय सगळं वर बसून
त्याने धरलाय हात माझा
आणि घेतोय सगळं लिहून
तोही होतो कधी खूष, कधी नाखूष
मग करतो मलाच लिहिता...
मी त्याचेच बोल बोलतो आणि
प्रसवते माझी कविता....
....रसप....
१३ जून २०१२
https://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_13.html
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्छा ! मला वाटले की वातुळ
अच्छा ! मला वाटले की वातुळ खाऊन पोट खळबळते आणि मग तुम्ही कविता करता !!
म्हणजे ?
In reply to अच्छा ! मला वाटले की वातुळ by नाना चेंगट
म्हणजे ? नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला?
म्हणजे ? नक्की काय म्हणायचं
In reply to म्हणजे ? by रसप
म्हणजे ? नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला?
काय नाय हो 'रसप' त्यांनी जिलब्यांची 'रेसिपी' सांगितली.... ;)
तू काय discoevry वरचा प्राणी
तू काय discoevry वरचा प्राणी आहेस का ???
का तुला सकाळी सकाळी कविता होतात ????????????????
कल्पना
कल्पना चांगली आहे. कल्पनाविस्तार अजून चांगला होऊ शकला असता.
पु. का. स्फु. शु.
असेच म्हणतो.
In reply to कल्पना by मिसळलेला काव्यप्रेमी
कल्पना चांगली आहे. कल्पनाविस्तार अजून चांगला होऊ शकला असता.
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या. अजून येऊ द्या
In reply to असेच म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या.
अजून येऊ द्या की अजुन होउ द्या....?
पु. का. स्फु. शु.
In reply to कल्पना by मिसळलेला काव्यप्रेमी
म्हणजे कायो ?? :-O
पुढील
In reply to पु. का. स्फु. शु. by जेनी...
पुढील काव्य स्फुर्तीस शुभेच्छा! :D
तुमची ही कविता (अर्धवट) वाचुन
तुमची ही कविता (अर्धवट) वाचुन आम्हीच तुम्हाला विचारायला पाहिजे-' का लिहिता तुम्ही कविता'.
प्रश्न
प्रश्न चांगला आहे. प्रत्येक कविला पडायला हवा. (मग जगाचं नंदनवन होईल. :) )
कविला प्रश्न नाही कविता
In reply to प्रश्न by रमताराम
कविला प्रश्न नाही कविता पड्तात.... :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
का वाचतो मी अशा कविता?
हा प्रश्न आता मला पडला आहे.
रसप, मला कविता आवडली , तिचा
रसप, मला कविता आवडली , तिचा आशय कळला. अन भावला सुद्धा.
अतिशय छान मांडणी. एकाच प्रश्नाला उत्तर देत देता बरेच काही सांगुन गेलात.
लिहित रहा.
असेच म्हणतो
In reply to रसप, मला कविता आवडली , तिचा by स्पंदना
कविता आवडली.
अमृत
+२
In reply to असेच म्हणतो by अमृत
असंच म्हणते.
पैसातै हा प्रतिसाद
In reply to +२ by पैसा
आम्ही संपादकांच्या शुद्धलेखनाबाबत कानपिचक्या म्हणून घेतो. (कोणती स्मायली बसेल बरं इथे????)
अमृत