डास व त्याचे चावणे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका. त्याचप्रमाणे हा धागा एकोळी-बहूओळी, गणपतीला स्वेटर, गुलाबजामाच्या पाकाचे काय करायचे, सोफा, फुडप्रोसेसर कसा घ्यावा असा वर्गीकृत करू नका.
डास, त्याच्या चावण्याने होणारे आजार, मलेरिया या कारणांमुळे सरकारे, महानगरपालिका, पालिका, ग्रामपंचायती, गल्या, कॉलन्या, आपली घरे व पर्यायाने आपण सर्वसामान्य जनता वैतागून त्याचप्रमाणे हादरून जातात. तुम्ही घरे बंद ठेवा, जाळ्या लावा, आजूबाजूला असणारे पाण्याचे साठे साफ करा, आठवड्यातून एक दिवस कोरडा ठेवा आदी अनेक उपाययोजना करूनही डास कुठेतरी असतातच.
डासांच्या चावण्यापासून टाळण्याजोगे उपाय खालीलप्रमाणे आहेत:
१) मच्छरदाणी लावून झोपणे:- झोपेपुरता हा उपाय रामबाण आहे पण मनुष्य सारखा दिवसभर घरात काही झोपूनच राहत नाही. काममाजाच्या वेळी डासांचा त्रास हा होतोच.
२) गुडनाईट, कासवछाप वा तत्सम डासांकरताच्या वड्या, द्रव, चक्री जाळणे:- हा उपाय करून डास खरोखर पळतात की नाही यावर आपल्याला अनुभव असतोच. डास या वड्यांनाही दाद देत नाहीत हे खरेच.
३) शरीरावर डासांविरूद्ध असलेले मलम चोपडणे:- हा खर्चीक उपायदेखील दररोज करून कंटाळा यायला लागतो.
४) इतर काही उपाय (जे मी केलेले नाहीत पण आंतरजालावर शोधले असता सापडले):- जसे:- शरीरावर वेगवेगळे रासायनीक औषधे लावणे, कोरफडीचा रस लावणे, लिंबूरस लावणे आदी. (पण हे उपाय डास चावल्यानंतर होणार्या वेदना कमी करण्यासाठीचे आहेत/ असावेत.)
आताशा काही मोबाईल अॅप पण तयार केलेले आहेत पण त्याबाबत शंका आहे. काही ईलेक्ट्रॉनीक किट्स पण बाजारात आहेत की ते अल्ट्रासाउंड आवाज बाहेर टाकतात की त्यामुळे डास पळून जातात. हा उपाय कितपत योग्य आहे?
डास घरात शिरू नयेत किंवा शिरलेल्या डासांनी चावू नये किंवा कमीतकमी चावावे (!) यावर काय काय उपाययोजना असू शकतात?
त्याचप्रमाणे डास चावण्यामुळे होणार्या वेदना कमी कशा करतात?
वरील काही युक्त्यांपेक्षा निराळ्या युक्त्या मिळाल्यास सर्वांचे प्रबोधन होईल.
प्रतिक्रिया
घरात कडुनिंबाचा पाला जाळणे
तुमच्या अमेरिकेत कसे मारतात
आमची अमेरिका?
सन्ध्याकाळच्या आधी खिडक्यादारे बन्द करणे..
मच्छरदाणी लावून झोपणे.
+१ आणि +१००
झोपण्यापुर्वी एक ९० मि.ली.चा
नाही हो.
गुड आयडीया!
संध्याकाळीच डास जास्त असतात.
मच्छरदाणी लावून झोपणे:-
:-D
हसु नका, उगाच आताच वाचलेल्या
डास
डासच नव्हे मिपावरचे अनेक
कुठेतरी आंजावर वाचल्याचे
लोक आंजा वर काहीही वाचतात
दहशतवाद
रिंग रिग रिंगा हे गाणं ऐकवत
इलेक्ट्रिक चार्ज असलेली रॅकेट
छे छे
?
भन्नाट कल्पना