तुकोबा जितोबा तुकाराम... ढिंच्याक ढिच्यांग!
येणार येणार म्हणुन ज्याची वाट पहात होतो,तो अमच्या जित्याचा,,, होय जित्या म्हणजे जितेंद्र जोशी यानी साकारलेला त्याच्या इतकाच सहज सुंदर चित्रपट ''तुकाराम''...
काय वर्णू ज्याच्या लीला अगाध,अंतरीची कळा तोच असे।
सहजभावी सामर्थ्य,हेची मूळ रूप,तया अंतरी अन्य,काही नसे॥
या दोन ओळी आमच्या जित्याला मनापासून समर्पीत करुन हा एक जिवंत/मनस्वी/स्फूर्तीदायक चित्रानुभव लिहायला घेतो...
या सिनेमाच्या पहिल्या काहि फ्रेम सरके पर्यंतच मी मनाशी एक खुणगाठ बांधली(खरं म्हणजे ती आधी बांधलेली अटकळही होती..) ती खुणगाठ म्हणजे ही की आज आपल्याला एक नवा तुकाराम पहायला मिळणार... अता नवा म्हणजे काय? तर जुन्याशी म्हणजे पागनीसांनी जो पहिला (त्यातल्या अवडाबाई इतकाच) तुकाराम मनावर कोरुन ठेवलाय/त्याच्या जोडिनी हा दुसरा तुकाराम प्रतिष्ठित होणार. आणी खरोखर तसच झालं.हा संपूर्ण चित्रपट म्हणजे तुकारामांच्या बालजीवनापासून ते त्यांच्या इंद्रायणीत गाथा बुडविण्याच्या प्रंसंगा पर्यंतचा एक जिवनपट आहे. अता हेच आधीच्यापण सिनेमात होतच की...मग यात नवं काय? असा सहाजिक प्रश्न आपल्या मनापुढे येतोच... नवं हे.. की सगळ्या कलाकारांचा सहज सुंदर आणी वास्तववादी अभिनय... कथा/पटकथा/ संगीत/गायन या प्रत्येक आघाडीवर हा सिनेमा शंभर टक्के उतरतो. अता यात कौतुक करण्यासारखं काय? असं म्हणाल तर कौतुक यासाठी की शेवटी जुन्या पागनीसांच्या तुकारामापुढे हा नवा तुकाराम उभा करणं,हे खरोखर कुठल्याच दृष्टीने खायच काम नव्हे. पण या सगळ्या टीमनी अतिशय लीलया आणी निर्भिडपणे हे आव्हान पेललय...
सुरवात होते ती तुकारामाच्या बाल जीवनापासून,हा बाल तुकारामपण पद्मनाभ गायकवाड या चुणचुणीत मुलाने तितक्याच चुणचुणीतपणानी सादर केलाय.
त्याचा अभिनय बघताना आपल्याला हे जाणवतं,की तुकारामाचं बालपण हे ही सर्वसामान्य माणसासारखच आहे,पण त्यात चौकसपणा/हजरजबाबीपणा/मानवते विषयी करुणा आणी निर्भिड वृत्त्ती या गोष्टी विशेषत्वानी आहेत. सुरवातीचा हा बालपणातला भाग पहाताना,आपलं शंकेखोर मन या बालपणातच सिनेमाचं मध्यंतर येणार काय? म्हणुन काहिसं व्याकुळ होतं.पण चित्रपटाची कथा अशी सहजतेनं हळूहळू पुढे सरकते की आपली ती शंकाही कुतुहला पोटी विसरली जाऊन आपण चित्रपटात कधी बुडून जातो ते कळूही नये.या बालपणातल्या/किशोरवयातल्या नानाविध प्रसंगांपासूनच आपल्याला हे जाणवू लागतं की या माणसात ही संतत्वाची बीजं मुळचीच होती. हा काही अचानक घडलेला इश्वरी चमत्कार नव्हे,तर..विलक्षण प्रतिभा आणी असामान्य मानवी गुणांचा हा एक वेगळा व्यक्तिविशेष आहे.
उदाहरणा दाखल आपण यातले दोनच प्रसंग बघू या... वडीलांची सावकारी हा मुलगा लहानपणा पासुन बघत असतो... या दरम्यान एकदा तो आपल्या गरीब मित्राला हतातलं चांदिचं कडं देतो,आणी घरी ते नदीत पडलं असं सांगतो. काही अवधीत ही गोष्ट घरच्यांच्या लक्षात येते,आणी त्याबद्दल त्याला आई जाब विचारते,''अरे मैत्रीमधे कोणी चांदीचं कडं देतं का..? कशाला दिलसं ते कडं?'' हा उत्तरतो,'' सोन्याचं नव्हतं ना,म्हणून'' क्षणभर आपण हास्यकल्लोळात रमतो,पण मागून हे लक्षात येतं अश्या लहान वयातही की आपण बहुशः बोलणारे असतो,हा करणारा आहे.
दुसरा प्रसंग आहे तो जकातठाण्यावरचा... वडिलांनी व्यापाराचं दिलेलं काही सामान घेऊन तुकाराम आणी त्याचा गडी माणुस असे जकात ठाण्याजवळ येतात,आणी त्यांच्यात व जकात अधिकार्यात जकातीवरुन काही वादसंवाद घडत असतात.अश्यातच मठासाठी अन्नधान्य वाहून नेणारे दोन ब्राम्हण तिथे येतात,आणी त्यांनाही जकात ''लागू'' आहे या कारणावरुन ते अधिकार्यावर भडकतात. 'ब्राम्हणाकडून देवाधर्मासाठी न्यायच्या अन्नावर(धान्यावर) जकात कसली घेता?' असं विचारतात... तुकाराम जकात अधिकार्याला सुनावतो,की 'त्यांच्याकडून जकात घ्यायची नसेल,तर आमच्याकडून तरी का घेता?' या बाणासारख्या सटासट बसणार्या संवादाचा शेवट,सगळ्यांना एकच कायदा लागू पडण्यात होतो.आणी ते ब्राम्हण कर देऊन तुकारामावर चडफडत निघुन जातात. ... पडद्यावर प्रसंग पहातांना, हा निर्भिडपणाही सामान्य नव्हे ,हे आपल्याला जाणवल्या शिवाय रहात नाही.
नंतर मग पुढे तुकारामाच्या वडिलांचा,,,मागून आईच्या मृत्यूचे दोन हृदयद्रावक प्रसंग आहेत.त्यावेळी पडलेल्या भिषण दुष्काळात घरातली अजुनही एकदोन जणं दगावतात. या पूर्वी तुकारामाचं आई/वडिलांच्या इच्छेनी(पहिल्या बायकोची कुस उजत नाही,याच्या दबावामुळेही) दुसरं लग्नही झालेलं असतं. ही दुसरी बायको म्हणजे अर्थातच फटकळ अवडाबाई... ही अवडाबाईपण पहिल्या सिनेमातल्या अवडाबाईच्या अगदी तोडीसतोड आहे... जितकी कजाग तितकीच धिरोदात्तही.
अवडाबाई हे तुकारामाच्या आयुष्यातलं एक प्रभावी आणी महत्वाचं पात्र आहे. ती तुकारामावर सारखी जितकी चिडते/ओरडते,तितकीच खंबीरपणे त्याला सावधही करते.गावातल्या दु:ष्काळाच्या प्रसंगी तुकाराम स्वतःच्या घरातल्या धान्याच्या कणग्या गरीबांसमोर रित्या करतो, तेंव्हा त्याच्यावर चिडणारी अवडा... तुकारामाच्या आयुष्यात संतत्वाची पहिली ठिणगी पडल्यावर त्याला, ''संतत्व की संसार?'' असा खडा सवालही करते. हा प्रसंग असा..की...ज्यांच्याकडे काहिही उरलेलं नाही,निसर्गानं दुष्काळाच्या रुपानी जोरदार चपराक मारलीये,अश्या गरीब शेतकरी/कामकरी जनतेचं आपल्याकडे असलेलं आपल्या वाट्याचं कर्ज,तुकाराम माफ करुन टाकतो...स्वतःच्या वाट्याची कर्जखतं तो इंद्रायणीत बुडवतो,आणी सावकारीला रामराम ठोकुन भांबनाथाच्या डोंगरावर चिंतन करायला निघुन जातो.
घरचे शोधाशोध करतात आणी अठवड्याभराच्या कालावधी नंतर तुकोबा घरी परततात. ते थेट अवडाबाईच्या तोफेच्या तोंडी पडायला..! अवडाबाई तुकोबांना,,, ''संसार की संतत्व?'' असा खडा सवाल करते.पण या दोहोतलं एकच स्विकारतील,तर ते तुकोबा कसले? तेही तीला संसार आणी संतत्व(लोकसेवा) या वेगळ्या गोष्टी नव्हेत हे धीर देऊन सांगतात,आणी पुढे तितक्याच कठोरपणे पाळुनही दाखवतात.नंतरचे सगळे प्रसंग हे मंबाजीबुवा/रामेश्वरभट्ट यांच्या रूपानी असलेल्या अन्यायी धर्मव्यवस्थे विरुद्ध तुकारामानी जे जिवनव्यापी युद्ध खेळलं,ते दाखवणारे आहेत. हे सगळे प्रसंग म्हणजे तुकाराम या बीजामधली ''कठिण वज्रासही भेदू ऐसे'' ही वृती म्हण्जे काय? ते दाखवणारे आहेत...
चित्रपटातला उत्तरार्धाचा भाग फार महत्वाचा आहे..जुना तुकाराम(पागनीसांचा) आपल्यापासून फारकत घ्यायला लागतो तो इथेच... अर्थातच... म्हणजे काय..? हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट पहावाच लागेल. तुकारामाबद्दलच्या नवसंशोधनाचा प्रभाव चित्रपटावर आहेच,पण तो स्विकार म्हणुन,सोपस्कार म्हणुन नव्हे....! आणी यातच या नव्या म्हणजे मुळच्या तुकारामाचं वेगळेपण सामावलेलं आहे.
या चित्रपटाच्या जमेच्या बाजू...
१)जितेंद्र जोशी(तुकोबा)/पद्मनाभ गायकवाड(बाल तुकाराम)/राधिका अपटे(अवडा) यांचा लक्षात रहाणारा अभिनय...
२)संगीत ही या चित्रपटासाठी असलेली आव्हानात्म बाजू यशस्वीपणे सांभाळलेले संगीतकार- अशोक पत्की आणी अवधूत गुप्ते...
३)ज्ञानेश्वर मेश्राम यानी अतीशय समरसतेनी गायलेली गाणी...
४)शिवाजी-तुकारामाची लक्षात रहाणारी महत्वपूर्ण भेट...
५)तुकारामावरिल नवसंशेधनानुसार चित्रपटाची केलेली (बुडलेली गाथा वर येणे... इत्यादी...चमत्कार विरहीत) मांडणी
या चित्रपटाची उणी बाजू म्हणावी तर ती अशी,की चित्रपटाच्या उत्तरार्धात तुकारामानी मंबाजीबुवा/रामेश्वरभट्ट-यांच्या रुपानी असलेल्या, प्रचलीत धर्मव्यवस्थेशी जो जिवन मरणाचा लढा दिला... तो हवा तितक्या विस्तारानी दाखवला गेलेला नाही. तसा जर तो दाखवला गेला असता तर तुकारामाच्या मृत्युचं गूढ सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आलं असतं. आणी ''तुकारामांची गाथा ही पाण्यातुन वर आली नाही,तर लोकगंगेनी लोकमुखी ती तरलेली राहिली'' या प्रसंगावर चित्रपटाचा शेवट करावा लागला नसता...
लहानपणापसून मनावर घडलेले संस्कार आणी आजुबाजुला असणार्या दीन दुबळ्यांना पिचवणार्या समाजव्यवस्थे विरुद्धचा विस्फोट म्हणावा,अश्या स्वरुपाचा परिणाम,म्हणजे भांबनाथाच्या डोंगरावरुन परतलेले ''संत तुकाराम'' असं आपण या तुकारामाविषयी म्हणायला हरकत नाही :-)

याद्या
12446
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
थॅन्क्स अ.आ. .... आपल्या
नैनाबै
In reply to थॅन्क्स अ.आ. .... आपल्या by मृगनयनी
ओह येस्स येस्स.. परा!..
In reply to नैनाबै by परिकथेतील राजकुमार
ते नाव है "ऑन्तोहीन", म्हणजेच
In reply to नैनाबै by परिकथेतील राजकुमार
छान.
गाणी यु ट्युबवर आली नाहीत का?
हा माझा सगळ्यात आवडता
छान परिक्षण. शिनेमा पहावासा
@आवडाबाईचं ते संसारासाठी तडतड
In reply to छान परिक्षण. शिनेमा पहावासा by रेवती
काही गाणी ऐकली.. पण मॉडर्न
In reply to @आवडाबाईचं ते संसारासाठी तडतड by अत्रुप्त आत्मा
कोम्बडी पळाली तंगडी धरून......
जोग बुवा जरा दमानं...
In reply to कोम्बडी पळाली तंगडी धरून...... by आशु जोग
बुवा हाईत व्हय !!!
In reply to जोग बुवा जरा दमानं... by अत्रुप्त आत्मा
काहो अत्रुप्त आत्मा, पण जुना
मस्त लिहलंय परिक्षण. खरंतर
@किसन देवा, तुमची शंका
In reply to मस्त लिहलंय परिक्षण. खरंतर by किसन शिंदे
हेच हेच..
In reply to @किसन देवा, तुमची शंका by अत्रुप्त आत्मा
@त्यामुळे साहजिकच तुलना
In reply to हेच हेच.. by किसन शिंदे
ते
In reply to @त्यामुळे साहजिकच तुलना by अत्रुप्त आत्मा
खरंतर विष्णूपंत पागनिसांचा
In reply to मस्त लिहलंय परिक्षण. खरंतर by किसन शिंदे
हो खरयं
In reply to मस्त लिहलंय परिक्षण. खरंतर by किसन शिंदे
नक्किच पहावासा वाटतो आहे हा
वाचणार नाही
उत्तम परिक्षण बुवा. तशाही
सुंदर परिक्षण.. चित्रपट
आवडले.
चांगल परीक्षण चित्रपट पाहणार
तुकारामाची गाथा ही पाण्यातुन वर आलेली नाही,
अत्रुप्तताने केले तृप्त
@त्याच्या नशिबी लिजेंड होणे
In reply to अत्रुप्तताने केले तृप्त by निनाद मुक्काम …
खरं की काय? कमाल आहे
In reply to @त्याच्या नशिबी लिजेंड होणे by अत्रुप्त आत्मा
@कमाल आहे ब्वा. >>>
In reply to खरं की काय? कमाल आहे by प्रचेतस
अहो खरंच.राजा गोसावी, राजा
In reply to @कमाल आहे ब्वा. >>> by अत्रुप्त आत्मा
@काय दिसला हो??? >>> मला
In reply to अहो खरंच.राजा गोसावी, राजा by प्रचेतस
ऑ..??
In reply to अहो खरंच.राजा गोसावी, राजा by प्रचेतस
ते आहेतच की. नाही कोण म्हणतय.
In reply to ऑ..?? by मोदक
ओक्के...
In reply to ते आहेतच की. नाही कोण म्हणतय. by प्रचेतस
अशोक मामा म्हणजे पहिले
In reply to ऑ..?? by मोदक
चित्रपट!
छान परिक्षण अमोल
मस्तच
मस्त जमलय
फुटकं नशीब
कठीण आहे
सुंदर परीक्षण!
मी नक्की बघणार....
@तद्दन फालतू हिंदी चित्रपट
In reply to मी नक्की बघणार.... by सुहास झेले