✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या तर्‍हा

श
श्रीरंग_जोशी यांनी
गुरुवार, 05/31/2012 - 11:32  ·  लेख
लेख
कंपनीतील अनेक दक्षिण भारतीय सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांचे उच्चार व नावांचे स्पेलिंग वाचून आपल्या मातृभाषेची थोरवी पटते. त्यापैकी काहींना त्यांच्या मातृभाषेचा अतिरेकी अभिमान असतो व त्यापुढे इतर भाषा तुच्छ आहे अशा आविर्भावात ते वावरत असतात. डोळ्यात भरणारे नेहमीचे उदाहरण म्हणजे 'H' चा नको तिथे वापर किंवा अनुपस्थिती. कविता चे स्पेलिंग Kavita असे न करता Kavitha (कविथा) असे करणे. भास्कर चे स्पेलिंग Bhaskar असे न करता Baskar (बास्कर) असे करणे. नावातील शेवटच्या अक्षराला उगाचच एक मात्रा जोडणे उदा महेंद्र च्या ऐवजी महेंद्रा. एस पी बालसुब्रमण्यम एकदा मराठी सा रे ग म प मध्ये लिटिल चॅम्पस ला सा रे गा मा पा असे म्हणायचा आग्रह करत होते. इंग्रजी शब्दांचे उच्चार मातृभाषेप्रमाणे करून अर्थच बदलून टाकणे उदा जहाजातल्या 'ज' चा उच्चार जनार्दन मधल्या 'ज' सारखा करणे. एकदा एका जणाने कॉन्फ़रन्स कॉलमध्ये Reason चा उच्चार रिझन ऐवजी रिजन (Region) धमाल उडवून टाकली होती. काही वेळा आपल्याही लोकांना यांचा गुण नाही तर वाण लागलेला दिसतो. जसे चेपूवर गुढी पाडव्याचे स्पेलिंग गुडी (Gudi) पाडवा असे करणे. सन्माननीय मिपाकरांनी आपलेही असे अनुभव मांडावे जेणेकरून अश्या विचित्र उच्चारांचा योग्य तो अर्थ लावण्याची क्षमता विकसीत होईल. एवढे सारे दोष असूनही अंगभूत चिकाटी व भरपूर श्रम करण्याच्या गुणांमुळे बहुसंख्येने हे लोक सगळीकडे यशस्वी होताना दिसतात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57586 वाचन

💬 प्रतिसाद (196)

प्रतिक्रिया

एका

चिरोटा
Fri, 06/01/2012 - 23:33 नवीन
लहानपणी ग्रूपमध्ये एक तामिळ मुलगा होता.खेळण्यासाठी बोलवायला त्याच्या घरी आम्ही गेलो. वडिलांनी दरवाजा उघडला."आहे का?" आम्ही मित्रांनी विचारले."आगनीकुगया"वडिल म्हणाले. अर्थच लागेना. शेवटी लाईट पेटला- मित्र संडासात होता.
  • Log in or register to post comments

च्यायला!!!

यकु
Fri, 06/01/2012 - 23:56 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=))=)) =))=)) =)) =)) =)) तोंडातल्या तोंडात बोललं की कुठल्याही भाषेची अशी काशी होते. तोतर्‍या माणसांची त्यामुळंच चेष्टा केली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

=)) हा हा हा !!

सूड
Sat, 06/02/2012 - 07:44 नवीन
=)) हा हा हा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

डायली राइड...

श्रीरंग_जोशी
Fri, 06/01/2012 - 23:52 नवीन
एकदा आमच्या कंपनीमध्ये एक नवी मुलगी रुजू झाली. तिला कुणीतरी कार्यालयात जाण्याऱ्येण्याच्या सोयीविषयी विचारले तर ती म्हणाली की ती डायली राइड शटल चा वापर करते. कुणाला काही कळेचना. मग एकाचा दिवा पेटला की तिला डेली राइड असे म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments

इंग्रजी व्याकरणाचा दर्जा यथा तथाच असतो.

श्रीरंग_जोशी
Fri, 06/01/2012 - 23:59 नवीन
खास करून पहिली नोकरी करणाऱ्या अभियंत्यांच्या विपत्र किंवा इतर ठिकाणी व्याकरणाची पार ऐशीतैशी झालेली असते. आपल्याला लहानपणीपासून सांगण्यात येते की दक्षिण भारतीय लोकांचे इंग्रजी फार उत्तम असते. त्यामुळे हि बाब अधिक ठळकपणे लक्षात येते...
  • Log in or register to post comments

हम्म

चिरोटा
Sat, 06/02/2012 - 00:09 नवीन
कदाचित द़़क्षिण भारतिय म्हणजे फक्त मद्रासी म्हणजे केवळ अय्यर्/अय्यंगार नामक व्यक्तीच असा (स्वातंत्र्यपूर्व)समज असल्याने असेल. अजूनही वरील आडनावाच्या(वा ज्ञातीच्या:टॅम्ब्रॅम!!) लोकांचे इंग्रजी बोलणे/लिहिणे बरेच उजवे असते असा माझा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आत्मपरीक्षणाचा अभाव

हुप्प्या
Sat, 06/02/2012 - 00:05 नवीन
दुसर्‍या देशात, राज्यात आपण जातो तेव्हा एक वेगळी संस्कृती तिथे असते. आपण तिथे रुळण्याकरता आपल्याला कसे बदलावे लागेल ह्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलाच पाहिजे. नाहीतर एक स्टिरियोटाईप बनतो. बोलण्यात, वागण्यात, आचार (मॅनर्स) ह्या बाबतीत बरोबर चूक असे काही नसते. भोवतालचे बहुजन जे करतात तेच प्रमाण मानणे फायद्याचे ठरते. पण स्वत:चे आत्मपरीक्षण केले गेले पाहिजे. त्याकरता तेवढी प्रगल्भता असली पाहिजे. परक्या भागात आपली संस्कृती टिकवणे आणि ती दुसर्‍यावर लादणे ह्यातला फरक ओळखता आला पाहिजे.
  • Log in or register to post comments

खूब कही ;-)

यकु
Sat, 06/02/2012 - 00:25 नवीन
परक्या भागात आपली संस्कृती टिकवणे आणि ती दुसर्‍यावर लादणे ह्यातला फरक ओळखता आला पाहिजे. +१ आमचं (आता काही दिवसच राहिलेत, तरी पण आमचंच ;-) ) इंदूर याचं जितंजागतं उदाहरण आहे. पहिल्यापासूनच मराठी लोक इथे होते वगैरे ठिकच, कारण आता अख्ख्या उ.प्र. बिहार मधले उथळ खळखळाट करणारे लोंढे म.प्र. मध्येही आले आहेत. पण इंदूरमध्ये मराठी आणि हिंदीचा वापर असा काही सेम टू सेम रक्तात भिनलाय की मूळ हिंदी वाल्यांना बिलकुल वाटत नाही हे परके आहेत आणि या हिंदी भागात गाड्यांच्या मागे 'मी मराठी' असं ठळक लिहीलेलं असलं तरी हिंदीवाल्यांनी मराठी लोकांना ठोकलं असं गेल्या सात महिन्यात तरी एकदाही झालेलं नाही
  • Log in or register to post comments

सहमत

श्रीरंग_जोशी
Sat, 06/02/2012 - 07:32 नवीन
मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये पूर्वीपासून स्थायिक झालेल्या मराठी लोकांनी मराठी भाषा व संस्कृतीचे संवर्धन उत्तमरीत्या केले आहे. विशेषतः तेथील स्थानिक भाषा व संस्कृतीचा योग्य मान ठेवून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

कियाली...?

श्रीरंग_जोशी
Sun, 06/03/2012 - 06:01 नवीन
एकदा मी अन माझा नव्याने रुजू झालेला कानडी सहकारी टॅक्सी ने जात होते. चालक नायजेरियन होता. माझ्या सहकाऱ्याकडे पाहून मोठ्या उत्साहाने व प्रेमाने म्हणाला, 'कियाली...?'....... 'कियाली...?' सहकाऱ्याला काहीच कळेना? प्रथम मला वाटले की चालक त्याच्या मातृभाषेत काही विचारतोय की काय? तेवढ्यात माझा दिवा पेटला, त्याला म्हणायचे होते 'कि हाल हैं?'. पूर्वी कधी तरी एका पंजाबी ग्राहकाकडून 'हॉउ आर यू? ' चे भारतीय भाषांतर त्याने शिकून घेतले होते? अन कुणीही भारतीय ग्राहक भेटला की तो संवादाची सुरुवात या शब्दाने करीत असे. मला या गोष्टीचे फार कौतुक वाटले. दुर्दैवाने कानडी सहकाऱ्याला पंजाबी ढंगाचे हिंदी कळणे शक्यच नव्हते. त्यामुळे मला अनुवादकाची भूमिका वटवावी लागली. चालकाने देखील नेमका उच्चार शिकून घ्यायचा प्रयत्न केला.
  • Log in or register to post comments

गुड्ड !

परिकथेतील राजकुमार
Mon, 06/04/2012 - 15:51 नवीन
आपल्याला किती भाषांचे किती ज्ञान आहे आणि आपण बोंबलत किती गावे आणि देश हिंडलो आहोत हे सांगण्याची सोय करणारा धागा आला एकदाचा. थोड्या वेळाने मोकळा वेळ मिळाला की विकीची मदत घेऊन देईन माझा सविस्तर प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

काय हे गुरूजी?

श्रीरंग_जोशी
Tue, 06/05/2012 - 04:16 नवीन
परा गुरूजी - माझ्यासाठी आपले मिपावरील स्थान असे आहे जसे एकलव्यासाठी द्रोणाचार्यांचे. अमेरिकेसारख्या देशात कामासाठी वास्तव्य असणे यात विशेष असे काय? अन आपल्याच देशातील इतर भाषेचे जुजबी ज्ञान असणे यातही विशेष असे काही नाही.
  • Log in or register to post comments

हा दुवा बघा....

श्रीरंग_जोशी
Wed, 06/06/2012 - 10:09 नवीन
टी राजेंदर यांची पत्रकार परिषद
  • Log in or register to post comments

कोण काय बोलतंय ते कळ्ळं तर

शिल्पा ब
Wed, 06/06/2012 - 10:47 नवीन
कोण काय बोलतंय ते कळ्ळं तर त्या व्हीडोचा उपेग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सप्प्रेस्सं, अप्प्रेस्सं, डिप्रेस्सं... तमीळीयनं पीपलं?

श्रीरंग_जोशी
Wed, 06/06/2012 - 10:55 नवीन
टी राजेंदर एक आघाडीचा दिग्दर्शक आहे तामीळ चित्रपटांचा. जरा शीघ्रकोपी आहे एवढच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आणखी एक दुवा

श्रीरंग_जोशी
Wed, 06/06/2012 - 18:56 नवीन
नेवान निगम नि केलेले विडंबन. या छोकऱ्याची कामगिरी बघून असे वाटते की याचे आई - वडील याच्या जन्माआधीपासून मिपावरील विडंबने वाचत असावेत.
  • Log in or register to post comments

अविनाश बिनीवाले यांचा लोकप्रभेतील नवा लेख

श्रीरंग_जोशी
Fri, 06/15/2012 - 11:04 नवीन
देवनागरीचा विस्तार - एक गरज योगायोग बघा - यातील काही मुद्दे मिपाकरांनी या धाग्यावर चर्चिले होते.
  • Log in or register to post comments

गंमत

पुष्कर जोशी
Tue, 04/23/2013 - 18:43 नवीन
आता गंमत पहा कि सगळ्या मीडिया चे camunication रोमन लिपी मध्ये होते... महाराष्ट्रास सगळे मीडिया दक्षिण भारतीय समाजात असल्याने ... Solapur चे शोलापूर होते... काही गमती बंगाली मध्ये V चा उच्चार "भी" असा करतात त्यामुळे सौरभ ला ते sauraV असे लिहितात आणि मग मराठी वर्तमानपत्रा मध्ये पण सौरव असे लिहून येते ... कारण बंगली लिपी > रोमन > देवनागरी अशा प्रवासाची गमत अवांतर : हवा > अरबी शब्द , मान > संस्कृत प्रत्यय ... मग हवानाम मराठी शब्द कसा ..?!
  • Log in or register to post comments

अवांतर++

श्रीरंग_जोशी
Wed, 04/24/2013 - 07:59 नवीन
इतर भाषांमधून शब्द आयात करणे हे कुठल्याही भाषेच्या प्रवाहीपणाचे लक्षण आहे. हवामानच काय गणना करणे अवघड होईल एवढे तत्सम व तत्भव शब्द आपल्य भाषेत मिळतील. इंग्रजीचेच बघाना कर्म, गुरू, मंत्र, अवतार, निर्वाण कितीतरी शब्द सर्रास वापरले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

आपल्याला काय अधिकार?

रमेश आठवले
Fri, 04/26/2013 - 09:31 नवीन
श्रीरंग जोशी म्हणतात - ''कंपनीतील अनेक दक्षिण भारतीय सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांचे उच्चार व नावांचे स्पेलिंग वाचून आपल्या मातृभाषेची थोरवी पटते." आणि सन्माननीय मिपाकरांनी आपलेही असे अनुभव मांडावे जेणेकरून अश्या विचित्र उच्चारांचा योग्य तो अर्थ लावण्याची क्षमता विकसीत होईल." ---- .सर्व दक्षिणी भाषा या आपआपल्या परीने समृद्ध आहेत आणि निदान १००० वर्षे तरी विकसित होत आल्या आहेत. त्यांच्या रूढी प्रमाणे त्यांनी इंग्लिश मध्ये लिहिण्यासाठी आणि उच्चारासाठी एक किंवा दुसरी पद्धत ( convention ) वापरली म्हणून त्यांची पद्धत विचित्र आणि मराठी पद्धत तेवढी थोर असे म्हणता येत नाही. . इंग्लिश मातृभाषा मानणार्या वेगवेगळ्या लोकांच्या स्पेलिंग आणि उच्चार यामध्ये साम्य असत अस नाही. schedule या शब्दाचा ब्रिटीश आणि अमेरिकन उच्चार सारखा नाही. george bernard shaw याने यावर त्याच्या खास शैलीत अशी मल्लीनाथी केलेली आहे.तो म्हणतो - - America and Britain are two nations divided by a common language -. .स्वातंत्र्या नन्तरच्या काही वर्षात नेहरू यांनी असे विधान केले होते - we have many English languages such as पंजाबी इंग्लिश, मराठी इंग्लिश ,बेंगाली इंग्लिश and मल्याळी इंग्लिश. .थोडे अवांतर - .थोडे अवांतर - १. फक्त मराठीत च च ज झ या व्यंजन समूहांचा दन्त्य आणि तालव्य असे दोन्ही उच्चार होतात यातील दन्त्य उच्चार दक्षिण भारतीय भाषांची देण आहे असे वाटते. संस्कृत आणि इतर उत्तरेकडील भाषात फक्त तालव्य उच्चार ऐकू येतो. २. आपण शासन या शब्दाचा सरकार अशा अर्थाने वापर करतो जसे महाराष्ट्र शासन व तसेच चेष्टा या शब्दाचा अर्थ थट्टा मस्करी असा करतो. माझ्या एका दक्षिणेतील पण मुंबईत वावरलेल्या मित्राला याचे हसू येते. बाकीच्या भाषांत या शब्दांचे punishment आणि effort असे मूळ संस्कृत मध्ये असलेले अर्थ वापरतात. .-भाय आर यु भांडरींग इन द भरान्डा लाईक ए भेग्याबॉन्ड मिस्टर भर्मा - हे बंगाली उच्च्चारांचे विडम्बन आपल्याला माहित असेलच.
  • Log in or register to post comments

स्पष्टीकरण

श्रीरंग_जोशी
Sat, 04/27/2013 - 01:34 नवीन
मूळ चर्चाविषय बराच त्रोटक असल्याने मी त्यांच्या भाषेलाच पूर्ण दोष देतोय असा अर्थ निघत असेल तर तो माझ्या मांडणीचा दोष आहे. आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल व उदाहरणांबद्दल धन्यवाद. या चर्चेच्या अगोदर माझ्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर जाणकारांच्या माहितीवर्धक प्रतिसादांमुळे मिळाले आहे. मूळ प्रस्तावात अन प्रतिक्रियांत अनेकांनी उदाहरणे दिली आहेत ती प्रवृत्तीची. मी मा.त. क्षेत्रात काम करत असल्याने नोकरीच्या पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत अवतीभवती बहुसंख्येने असणार्‍या दक्षिण भारतीय सहकार्‍यांकडून आलेल्या अनुभवांनुसारच निरिक्षणे लिहिली आहेत. बरेचदा कामाशी संबंधीत मिटिंग्ज फोनवरून होतात कारण सहभागी होणारे वेगवेगळ्या शहरांत अन देशांत असतात. आता जर कुणी reason चा उच्चार रिजन असा करत असेल तर इतरांचा गैरसमज अन गैरसोय होणारच नं? वर्षानुवर्षे परदेशात राहूनसुद्धा आपले उच्चारांमुळे दुसर्‍यांची गैरसोय होऊ नये असा विचार न करता स्वतःला न बदलणार्‍यांच्या प्रवृत्तीवर हे भाष्य आहे. माझ्या नावाचे स्पेलिंग (Shrirang) इमेल पत्त्यात व माझ्या इमेल स्वाक्षरीत स्पष्ट दिसतानाही Srirang असे करणारे नेहमीच भेटतात. माझ्या वडीलांचे नाव श्रीनिवास असे असूनही तेच नाव असणार्‍या एकाही दक्षिणी सहकार्‍याचे स्पेलिंग मी Shrinivas आजवर केलेले नाही. कालचेच उदाहरण आहे एक प्रेमळ स्वभावाची म्हातारी अमेरिकन मॅनेजर (७० च्या आसपास वय असलेली) फोनवरची मिटींग संपल्यानंतर वैतागून म्हणत होती. अरे किती हे मनि (मणि) एकाच टिममध्ये? नावे घेताना पूर्ण घेत जा की. कोणता मनि (मणि) काय काम करत आहे हे आम्हाला कसे कळणार? मी मराठी माध्यमात शिकलेला असल्याने मला ज्याप्रकारचे इंग्रजी उच्चार पाचवीपासून शिकवले गेले होते ते मी आजही वापरत राहिलो तर माझ्यामुळेही कदाचित इतरांची गैरसोय होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

आधी आपले पहा

रॉजरमूर
Fri, 09/20/2013 - 00:59 नवीन
आपल्याच लोकांनी इंग्रजीत लिहितांना राम चे Rama आणि योग चे योगा केले त्याचे काय ?
  • Log in or register to post comments

हायला

रामपुरी
Fri, 09/20/2013 - 03:30 नवीन
एवढा मनोरंजक धागा नजरेतून सुटला कसा? :) :) (पण एकंदरीत दक्षिण भारतीय, त्यातल्या त्यात तमिळ, डोक्यात जातात ते त्यांच्या प्रत्येक ठिकाणी फक्त स्वभाषिकांचे कोंडाळे करून राहण्याच्या सवयीने...)
  • Log in or register to post comments

खाना खाया ? = काना काया ?

खटपट्या
Fri, 09/20/2013 - 04:30 नवीन
खाना खाया ? = काना काया ? न्युयोर्क मध्ये एका टैक्सी वल्याने विचारले होते की पटेल चा अर्थ दुकान होतो का ? कारण सर्व भारतीय दुकानावर पटेल असे लीहीलेले असते.
  • Log in or register to post comments

हाहाहाहाहाहा +१ मीही हे असं

वेल्लाभट
Fri, 09/20/2013 - 06:37 नवीन
हाहाहाहाहाहा +१ मीही हे असं ऐकलेलं आहे... लोळलेलो नंतर.
  • Log in or register to post comments

@ हे उत्तर मिशन = मशीन ला

वेल्लाभट
Fri, 09/20/2013 - 06:39 नवीन
@ हे उत्तर मिशन = मशीन ला होतं. द्याचा सेपरेड ब्रतिसाद गसा थयार जाला माईत्त्त नई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

असाच गुजराती उच्चारांचा धागा उघडा

वेल्लाभट
Fri, 09/20/2013 - 06:55 नवीन
म्हणजे समस्त वाचक हसून हसून हेपी होतील.
  • Log in or register to post comments

मात्रा नवे काना!!!

ज्ञानव
Fri, 09/20/2013 - 08:30 नवीन
महेंद्र ला काना लावला तर महेंद्रा होतो मात्र मात्रा लावली तर महेंद्रे होते.....
  • Log in or register to post comments

आमच्या डिपार्टमेंट मधील एक (उत्तर भारतीय) संवाद:

मनिम्याऊ
Sat, 09/21/2013 - 11:10 नवीन
"मिस कोल, मिसेस पोल आपके होल मे स्नेक्स खाणे को बुला रही है" (अर्थ- मिस कौल, मिसेस पॉल आपको हॉल मे स्नॅक्स खाने को बुला रही है)
  • Log in or register to post comments

.

दादा कोंडके
Sat, 09/21/2013 - 13:30 नवीन
:)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिम्याऊ

~blush~

आनंदी गोपाळ
Sun, 09/22/2013 - 21:24 नवीन
अश्लिल आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिम्याऊ

हे तर गुज्जू इंग्लिश आहे.

बॅटमॅन
Mon, 09/23/2013 - 12:03 नवीन
हे तर गुज्जू इंग्लिश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिम्याऊ

kannada

उद्दाम
Sat, 09/21/2013 - 11:48 नवीन
कन्नड जोक . बाईकडे दूधवाला येतो आणि दूध देता देता बाईना विचारतो, आज मालक नोकरीवर का गेले नाहीत? बाईची मुलगी त्याच वेळी बाईला विचारते दुधाचे काय करु? बाई एकाच शब्दात उत्तर देते -- हालिडे हॉलिडे म्हणजे सुट्टी . हाल ईडे म्हणजे दूध ठेव.
  • Log in or register to post comments

मर्‍हाटी

बॅटमॅन
Tue, 10/01/2013 - 14:14 नवीन
हाही एक जोक. तसा यत्ता चौथीतला वैग्रे आहे अन बहुत प्राचीन आहे. एक मुलगा एका मुलीला विचारतो, तुझे नाव काय आणि तू कुठे चाललीस? मुलगी एका शब्दात उत्तर देते. (हो, तीच ती, कुणाच्याही हाथ न आनेवाली)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

सुशीला??? :प

टवाळ कार्टा
Tue, 10/01/2013 - 15:53 नवीन
सुशीला??? :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वरिजिनल उत्तरापेक्षा एक अक्षर

बॅटमॅन
Tue, 10/01/2013 - 15:55 नवीन
वरिजिनल उत्तरापेक्षा एक अक्षर जास्त आलेय :P पण हेही बरोबरच उत्तर :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कनडा ज्योक

यसवायजी
Tue, 10/01/2013 - 19:36 नवीन
ए अजुन १ अजुन १ - कनडा ज्योक वेटर गिर्र्हाईकाला एन बेकु? (काय पायजे) विचारतो अन त्याचा मित्र विचारतो की ते चित्र कशाचं आहे? तो म्हंतो 'वंटी'. (वंटी= उंट/ One Tea)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अजून एक कन्नड ज्योक

बॅटमॅन
Tue, 10/01/2013 - 19:47 नवीन
कन्नड समजू लागल्यावर "हेल काढून बोलणे" आणि "हेवन व हेल" यातील "हेल" ची इंटेन्सिटी समजली =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

"हेल" ची इंटेन्सिटी

यसवायजी
Tue, 10/01/2013 - 19:55 नवीन
"हेल" ची इंटेन्सिटी :)) हहपुवा झाली. आम्ही शाळेत असताना चेष्टेत हेळ ला हेल म्हणायचो त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हीहीही

बॅटमॅन
Tue, 10/01/2013 - 19:59 नवीन
इल्ले यारिगे जास्ती तिळंगिल्ला तेच बरेय =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

.

आशु जोग
Sun, 09/22/2013 - 19:06 नवीन
मराठी लोकच मराठी बिघडवतात तेव्हा डोक्यात जातात. केलं होतं -> केलेलं मे गेलो होतो -> मी गेलेलो. बाकी देवाला प्रसाद चढवणे देवळाऐवजी मंदिरात जाणे मी तुझ्या नजरेत उतरलो इ. इ.
  • Log in or register to post comments

थोडी असहमती

श्रीरंग_जोशी
Sun, 09/22/2013 - 21:37 नवीन
स्वभाषेबाबत तुमची काळजी समजू शकतो परंतु कुठलीही भाषा विविध भौगोलिक विभागात वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाणारच तसेच काळानुरूप त्यात बदल होणारच. इंग्लंडमध्येसुद्धा इंग्रजीची कॉकनी ही शैली काही प्रदेशात वापरली जाते. आपल्याला परिचित नसलेली आपल्याच भाषेची दुसऱ्या शैली ऐकताना जरा विचित्र वाटते. मला स्वतःला 'म्हणाला' / 'म्हणाली' ऐवजी 'म्हणला' / 'म्हणली' ऐकणे विचित्र वाटायचे पण हळूहळू सवय झाली. हिंदी भाषेच्या संवादांत उर्दूचा वापर नसता झाला तर हिंदी चित्रपट कसे वाटले असते याची कल्पना करवत नाही. बाकी मटा-मराठी बद्दल न बोललेलेच बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

हायला..

मनिम्याऊ
Tue, 09/24/2013 - 19:32 नवीन
आजपरेन्त या जुन्या पर्सन्गात "अश्लील्ता" कधी जाणवली ना बा... असेल असेल... अश्लील असेल
  • Log in or register to post comments

पर्वाच माझ्यावर व माझ्या

रेवती
Mon, 09/30/2013 - 01:59 नवीन
पर्वाच माझ्यावर व माझ्या मराठी मैत्रिणीवर आरोप झाला की आम्ही भेटलो की फक्त मराठी बोलतो. पण त्यांना फक्त हिंदी बोललेलं समजतं म्हणून त्यांच्याशी हिंदीत (जसे येत असेल तसे) बोलतो ना आम्ही. आता एकमेकिंशी फक्त दोघीच असताना हिंदीत बोलायचे म्हणाजे कमाल आहे! अमूक एका मसाल्यात 'दगडफूल' असते असे हिंदीत कसे बोलायचे ते समजले नाही त्यामुळे उधर हमारा घोडा अड्या था|
  • Log in or register to post comments

आता एकमेकिंशी फक्त दोघीच

बॅटमॅन
Mon, 09/30/2013 - 18:06 नवीन
आता एकमेकिंशी फक्त दोघीच असताना हिंदीत बोलायचे म्हणाजे कमाल आहे!
उत्तर भारतीयांना ही अक्कल साधारणपणे आजिबात नसते असे म्हटले तरी चालेल. हिंदी सोडून अन्य भारतीय भाषांचे अस्तित्त्व त्यांच्या लेखी नसल्यात जमा. आणि हे इथपर्यंत मर्यादित नाही, फेसबुकच्या भिंतीवरही मराठी मजकूर जास्त का लिहितोस असे विचारण्यापर्यंत काही *&^% ची मजल गेली होती. फार डोक्यात जातात अशावेळी. "मलाही एकदादोनदा बोलले तेव्हा मी सरळ उत्तर दिले. "माझी भिंत अन मी. काय अन कुठल्या भाषेत शेअर करायचे ते मी पाहीन. मला बोलणारे तुम्ही कोण?" इतके सरळ बोलल्यावरही धुसफूस सुरूच असते. डोक्याचा भागच अंमळ कमी म्हटले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

फेसबुक

क्लिंटन
Tue, 10/01/2013 - 15:16 नवीन
फेसबुकच्या भिंतीवर मराठी का लिहितोस असा प्रश्न आला म्हणजे त्या व्यक्तीला आपण काय लिहिले आहे हे वाचायची इच्छा आहे पण मराठी समजत नसल्यामुळे काय लिहिले आहे हे समजत नाही असा होतो. फेसबुकावर आपण ज्या काही कारणांनी लिहित असतो त्यात इतरांनी आपण लिहिलेले वाचावे हे पण एक कारण असतेच. तेव्हा ज्यांना आपण काय लिहिले आहे ते कळणार नाही किंवा त्यात इंटरेस्ट वाटणार नाही अशांपासून असे पोस्ट हाईड करता येतात. तसे केल्यास चांगले होईल. तसेच फेसबुकावर मी प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे त्यामुळे मला एक गोष्ट नक्कीच माहित आहे (इतरांनी सांगितली आहे). चर्चांमध्ये अमराठी मित्रांनाही सहभागी होता यावे म्हणून मुद्दामून इंग्रजीत पोस्ट लिहिली आणि त्यात एखादा मराठी प्रतिसाद आला तर तो इतरांना न कळून त्यांचा विरस होऊ शकतो. शक्यतो असे प्रकार टाळलेले बरे असे माझे वैयक्तिक मत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म ते आहे, पण अंततोगत्वा हा

बॅटमॅन
Tue, 10/01/2013 - 15:51 नवीन
हम्म ते आहे, पण अंततोगत्वा हा प्रकार वैयक्तिक अभिव्यक्तीचा असल्याने असे कुणी बोलू नये असे माचे मत आहे. असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

पब्लिक फोरम

क्लिंटन
Tue, 10/01/2013 - 16:10 नवीन
हा प्रकार वैयक्तिक अभिव्यक्तीचा असल्याने असे कुणी बोलू नये असे माचे मत आहे.
पण पब्लिक फोरमवर अशी अपेक्षा करता येणार नाही ना. पब्लिक फोरमवर काहीही लिहिले की ते "मी केवळ माझ्यासाठी लिहिले आहे" असे म्हणता येणार नाही.तसे लिहायचे असते तर ते स्वतःच्या डायरीत का लिहिले नाही आणि फेसबुकावर का लिहिले हा प्रश्न येणारच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

असहमत

बॅटमॅन
Tue, 10/01/2013 - 16:25 नवीन
पब्लिक फोरमवर लिहिले तेव्हा लोक बघणार आणि बोलणार हे खरेच, पण प्रत्येकाला स्वतःला पाहिजे त्या भाषेत बोलायचे स्वातंत्र्य नसेल तर त्याला काही अर्थ नाही. एखादा डिस्कशन ग्रूप असेल तर गोष्ट वेगळी, पण जण्रल फेसबुकबद्दल असे बोलता येणार नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

फेसबुक

क्लिंटन
Tue, 10/01/2013 - 16:50 नवीन
पब्लिक फोरमवर लिहिले तेव्हा लोक बघणार आणि बोलणार हे खरेच, पण प्रत्येकाला स्वतःला पाहिजे त्या भाषेत बोलायचे स्वातंत्र्य नसेल तर त्याला काही अर्थ नाही.
प्रत्येकाला आपल्या भाषेत लिहायचे स्वातंत्र्य नक्कीच आहे.मी हिरव्या देशात असताना अनुभव घेतला आहे की इतर भाषीय भारतीय विद्यार्थी असतानाही (२/५/१० किंवा कितीही) अनेकदा तामिळ आणि तेलुगु भाषिक विद्यार्थी त्यांच्या भाषेत बोलायला सुरू करून द्यायचे.ते मुद्दामून करायचे की नाही अशी कल्पना नाही.पण त्यामुळे होते काय की आपल्याला कळू नये म्हणून मुद्दामून हे विद्यार्थी त्यांच्या भाषेत बोलत आहेत असा समज/गैरसमज इतरांचा होतो. (या बाबतीत मराठी विद्यार्थी इतर भाषिक बरोबर असताना बहुतांश वेळा हिंदी/इंग्रजीतून बोलायची काळजी घ्यायचे हे पण लिहितो).आता या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत बोलायचे स्वातंत्र्य नाही का? तर तसे नक्कीच नाही.पण तरीही असा समज्/गैरसमज इतरांचा होऊ शकतो. त्याचप्रमाणे फेसबुकवर मुद्दामून मराठीत लिहिल्यामुळे अमराठी मंडळींना कदाचित तसेच वाटत असावे.असे वाटणे समर्थनीय आहे की नाही हा मुद्दाच नाही पण असे वाटू शकते हे नक्कीच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा