✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दक्षिण भारतीयांच्या विचित्र उच्चार पद्धती व स्पेलिंग लिहिण्याच्या तर्‍हा

श
श्रीरंग_जोशी यांनी
गुरुवार, 05/31/2012 - 11:32  ·  लेख
लेख
कंपनीतील अनेक दक्षिण भारतीय सहकाऱ्यांबरोबर काम करताना त्यांचे उच्चार व नावांचे स्पेलिंग वाचून आपल्या मातृभाषेची थोरवी पटते. त्यापैकी काहींना त्यांच्या मातृभाषेचा अतिरेकी अभिमान असतो व त्यापुढे इतर भाषा तुच्छ आहे अशा आविर्भावात ते वावरत असतात. डोळ्यात भरणारे नेहमीचे उदाहरण म्हणजे 'H' चा नको तिथे वापर किंवा अनुपस्थिती. कविता चे स्पेलिंग Kavita असे न करता Kavitha (कविथा) असे करणे. भास्कर चे स्पेलिंग Bhaskar असे न करता Baskar (बास्कर) असे करणे. नावातील शेवटच्या अक्षराला उगाचच एक मात्रा जोडणे उदा महेंद्र च्या ऐवजी महेंद्रा. एस पी बालसुब्रमण्यम एकदा मराठी सा रे ग म प मध्ये लिटिल चॅम्पस ला सा रे गा मा पा असे म्हणायचा आग्रह करत होते. इंग्रजी शब्दांचे उच्चार मातृभाषेप्रमाणे करून अर्थच बदलून टाकणे उदा जहाजातल्या 'ज' चा उच्चार जनार्दन मधल्या 'ज' सारखा करणे. एकदा एका जणाने कॉन्फ़रन्स कॉलमध्ये Reason चा उच्चार रिझन ऐवजी रिजन (Region) धमाल उडवून टाकली होती. काही वेळा आपल्याही लोकांना यांचा गुण नाही तर वाण लागलेला दिसतो. जसे चेपूवर गुढी पाडव्याचे स्पेलिंग गुडी (Gudi) पाडवा असे करणे. सन्माननीय मिपाकरांनी आपलेही असे अनुभव मांडावे जेणेकरून अश्या विचित्र उच्चारांचा योग्य तो अर्थ लावण्याची क्षमता विकसीत होईल. एवढे सारे दोष असूनही अंगभूत चिकाटी व भरपूर श्रम करण्याच्या गुणांमुळे बहुसंख्येने हे लोक सगळीकडे यशस्वी होताना दिसतात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57586 वाचन

💬 प्रतिसाद (196)

प्रतिक्रिया

माय २ सेन्ट्स

कौतिक राव
Tue, 06/05/2012 - 10:52 नवीन
आम्च्या येथील २ अनुभवः तमीळ लोक शिकागो ला चिकागो म्हणतात.. काही मराठी लोक आयडल ला आयडियल म्हणतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

चिकागो

श्रीरंग_जोशी
Tue, 06/05/2012 - 11:05 नवीन
मी पण चिकागो असा उच्चार मी तमीळ व गुल्ते लोकांकडून बरेचदा ऐकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौतिक राव

आम्ही 'मिचिगन' मधे राहतो!

मराठे
Wed, 06/06/2012 - 19:06 नवीन
आम्ही 'मिचिगन' मधे राहतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

झेकोस्लोव्हाकिया

श्रीरंग_जोशी
Wed, 06/06/2012 - 19:54 नवीन
झेकोस्लोव्हाकिया असा माझा उच्चार ऐकून एकदा एका उ. भा. मित्राने माझीही टर उडवली होती. मी म्हणालो आमच्या भाषेत असेच लिहितात म्हणून माझा उच्चार तसा आहे. यापुढे चेकोस्लोव्हाकिया असे म्हणत जाईन. त्या देशाचे विभाजन होऊन चेक रिपब्लिक व स्लोव्हाकिया अशी सुटसुटीत नावे असलेले २ देश निर्माण झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

प्रत्येकाच्या मातृभाषेचा

पिशी अबोली
Fri, 04/26/2013 - 17:50 नवीन
प्रत्येकाच्या मातृभाषेचा त्याच्या दुसर्‍या-तिसर्‍या भाषेवर प्रभाव पडतोच पडतो. आणि त्यात चूक काहीच नाही. उलट त्यात कमीपणा वाटून न घेता इंग्रजी उच्चारांचा बाऊ न करणे यात दाक्षिणात्यांचे मलातरी कौतुक वाटते. इंडियन इंग्लिश हा इंग्रजीचा मान्यताप्राप्त प्रकार आहे हे नमूद करावेसे वाटते. बाकी परदेशात किती जोरा-बिरात बोलतात मला माहीत नाही. पण मातृभाषेचा प्रभाव ही टाळता न येण्यासारखी गोष्ट आहे. आणि ती टाळायचा प्रयत्न भारतात तरी करायची गरज नाही,नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

...

आशु जोग
Mon, 10/07/2013 - 23:40 नवीन
अजून एक राहीलं टेम्परवारी. आणि ते चुम्मा आणि छुपके फार गोंधळात टाकतात. काय चाललय ? असं विचारल्यावर "कुछ नही छुपके" म्हणजे असच काहीतरी. आणि तेच तमिळवाल्यांचं चुम्मा. "व्हॉट धिस लेडी चुम्मा इटींग ग्वावा विधौट गिविंग एनिबडी" असं आमचा मास्तर म्हणाला होता एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मराठी माणूस जेव्हा जनरल

आशु जोग
गुरुवार, 05/31/2012 - 20:57 नवीन
मराठी माणूस जेव्हा जनरल तिमय्यांचा उच्चार थिमय्या करतो तेव्हा संताप येतो. वर्तमानपत्रातही तोच प्रकार. ज्या तिमय्यांनी प्रथम पंतप्रधानांशी पंगा घेऊन काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यातून पूर्ण मुक्त करण्याचा आटापिटा चालवला होता त्यांच्या नावाची मोडतोड नको. मुथ्थय्या मुरलीधरन चूक. मुत्तय्या मुरलीधरन
  • Log in or register to post comments

मराठी माणूस जेव्हा जनरल

अभ्या..
Wed, 10/09/2013 - 02:54 नवीन
मराठी माणूस जेव्हा जनरल तिमय्यांचा उच्चार थिमय्या करतो तेव्हा संताप येतो.
कुठला मराठी मनुष्य करीअप्पा असा न लिहिता अगदी बरोबर 'कार्यप्पा' असा लिहितो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

अजून भर

हुप्प्या
गुरुवार, 05/31/2012 - 21:41 नवीन
H ह्या अक्षराला हेच (अक्षराचा पाय कसा मोडायचा?) म्हणण्याची काही दाक्षिणात्य बांधवांची पद्धत असते. हे अक्षर ह ध्वनीकरता वापरले जाते याचा विसर पडू नये म्हणून एच ऐवजी हेच म्हणा असे कोणी ठरवले असेल बहुधा. दक्षिण भारत सोडून अन्य कुठे हा उच्चार ऐकला नाही. Fixed ला फिक्सेड म्हणणे. Bridge ला ब्रिज्ज्ज म्हणणे. मराठी भाषिक लोकांचे इंग्रजी बोलताना जे घोटाळे होतात त्यातला एक म्हणजे J चा उच्चार जोर ह्या शब्दातल्या ज सारखा करणे. दीर्घ ए व दीर्घ ओ नसल्यामुळे red आणि raid वा bread आणि braid चा उच्चार सारखाच करणे. (ह्यातल्या काही शब्दात चक्क दोन स्वर आहेत ज्याचा उच्चार रेडपेक्षा रेइड असा काहीसा होतो. )
  • Log in or register to post comments

लेख पटला नाही

सुनील
गुरुवार, 05/31/2012 - 22:03 नवीन
भारतात १४ भाषा आहेत आणि १४ प्रकारचे इंग्लिश येथे बोलले जाते! :) म्हणून काय सगळ्यांनीच एकमेकांची खिल्ली उडवत बसायची? दुसर्‍याची भाषा बोलताना स्वभाषेची लकब त्यात थोडीशी डोकावणारच. हे सगळ्यांच्याच बाबतीत होते. आणि इंग्रजी मातृभाषा असलेल्या देशांत काय अवस्था आहे? अमेरिकेत थोडाफारतरी एकजिनसीपणा आहे, पण इंङ्लंडात तर गावागावातून उच्चार बदलतात.
  • Log in or register to post comments

येग्ग = एग्ग

पान्डू हवालदार
गुरुवार, 05/31/2012 - 22:28 नवीन
येग्ग = एग्ग :)
  • Log in or register to post comments

उत्तरप्रदेशी नावातल्या 'श 'चा

भरत कुलकर्णी
गुरुवार, 05/31/2012 - 22:41 नवीन
उत्तरप्रदेशी नावातल्या 'श 'चा उच्चार 'स' करतात. जसे सुरेशकुमार=सुरेसकुमार, शिवशंकर=सिवसंकर बाकी श्रीरंग_जोशी यांचे आपल्या भाषेच्या थोरवीबद्दल मत पटले. सर्वसाधारण मराठी चांगले बोलणार्‍या व्यक्तींचे इंग्रजी / हिंदी शब्दोच्चार बहूदा निटच असतात. फक्त मिपावर 'केल्या गेले', 'पाहिल्या जाईल' असे लेखन का केले जाते ते समजत नाही. :-)
  • Log in or register to post comments

प्रत्येक भाजीला करी म्हणणे...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/31/2012 - 22:52 नवीन
आपण बनवत असलेल्या सुक्या भाज्या जसे बटाटा, भेंडी, त्यांनाही ते करी म्हणतात ; -). मातृभाषेचा प्रभाव प्रत्येकावर असणारच, आपल्या राज्यात वा आपल्या लोकांशी हवे तश्या पद्धतीने बोलावे. पण परदेशातील लोकांबरोबर संवाद साधताना थोडेतरी तारतम्य बाळगावे ही अपेक्षा अवाजवी म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments

कै च्य कै

अमृत
Sun, 06/03/2012 - 09:16 नवीन
तुम्ही किती वर्षे दक्षिणेत राहिले आहात? नक्कीच कोण्या मुर्ख दाक्षिणत्याला सुक्या भाजीला करी म्हणताना ऐकले असेल. इथे सुक्या भाजीला केवळ आणि केवळ फ्राय म्हणतात आलू फ्राय, भेंडी फ्राय,कॅरट फ्राय, प्रॉन फ्राय बरीच लांब यादी आहे . सर्सकट जन्रलायझेशन करू नये. अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हे मी ही ऐकले आहे. जोशींची

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 06/03/2012 - 10:16 नवीन
हे मी ही ऐकले आहे. जोशींची काही मते टोकाची असली तरी हे निरीक्षण बरोबर आहे. मुळात दाक्षिणात्य लोक हा एकजिनसी प्रकार नाही. चार राज्ये, त्यातील वेगवेगळे भाग.. बेंगळूरू आणि चेन्नई हे केवळ ५-६ तासांच्या अंतरावर असले तरीही लोकांमध्ये बराच फरक असू शकतो. (मुंबई -पुणे ३ तासांवर आणि एका राज्यात असूनही फरक नाही का पडत?) असो, तर माझा तमिळ रुममेट सुक्या भाजीला करी म्हणत असे. प्रास भाऊंच्या भाषेत, इत्यलम ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

काय करणार, असेच अनुभव आहेत

श्रीरंग_जोशी
Sun, 06/03/2012 - 19:56 नवीन
दक्षिणेकडल्या राज्यात मी एक दिवसही राहिलेलो नाहीये. परंतु परदेशात गेली अनेक वर्षे अश्या व्यक्तींबरोबर रूममेट म्हणून राहिलोय. कार्यालयात एकत्र काम केले आहे. हा अनुभव चारही राज्यातील लोकांकडून आलेला आहे. गंमत म्हणजे, काहींना सुचवून देखील पाहिले की प्रत्येक भाजी हि करी नसते. एकदा मी जेवणात आमरस बनवला, तर माझ्या कानडी (आपले सख्खे शेजारी राज्य हो) रूममेट ने असली उत्स्फूर्त व नकारात्मक प्रतिक्रिया दिली की आंब्यांचा असाही वापर करतात तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

त्या कानड्याला विचारा की

बॅटमॅन
Mon, 06/04/2012 - 00:37 नवीन
त्या कानड्याला विचारा की कर्नाटकातील तो नक्की कुठला म्हणून. उत्तर कर्नाटक भागात तरी आमरस विथ पुरणपोळी हा लै हिट्ट प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

दक्षिण कर्नाटक

श्रीरंग_जोशी
Mon, 06/04/2012 - 08:50 नवीन
दक्षिण कर्नाटक. परदेशात येण्यापूर्वी तो नोकरीनिमित्त दीड - दोन वर्षे पुण्यात होता. तरीही मराठी भाषा, संस्कृती व आहार याविषयी अनभिज्ञ होता हे वेगळे सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओके. बाकी उत्तर भारतीय

बॅटमॅन
Mon, 06/04/2012 - 10:56 नवीन
ओके. बाकी उत्तर भारतीय हेदेखील याबद्दल काऽही वेगळे नसतात. हा संकुचितपणाचा रोग भारतातील सर्व प्रांतांना सारखाच लागू आहे. तुम्हाला दाक्षिणात्यांचे अनुभव आले तसे इतर कितीतरी लोकांना उत्तर भारतीयांचे आलेत. मराठी, बंगाली आणि क्वचित इतर कोणी जरा ओपन असतात अन्य ठिकाणची संस्कृती जाणुन घेण्याबाबत. बाकी याबाबतीत मला आलेले अनुभव तरि चांगलेच आहेत. माझा एक तमिळ मित्र मराठी शिकला, मराठी सिनेमे बघतो, तर एक बंगाली मित्रदेखील मराठी शिकलाय, तीच गोष्ट एका तेलुगु मित्राची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

उत्तम अनुभव

श्रीरंग_जोशी
Mon, 06/04/2012 - 11:18 नवीन
अर्थातच उत्तर भारतीयांच्याही काही विचित्र तऱ्हा आहेतच. पण आपले व त्यांचे उच्चार, आपले हिंदीवरील प्रभुत्व, व खाण्या - पिण्याचे समान पदार्थ यामुळे बराच एकजिनसीपणा आला आहे. आपली उदाहरणे ऐकून बरे वाटले. हिंदीवर प्रभुत्व असणारे व राष्ट्रभाषा हिंदीच्या बऱ्याच परीक्षा दिलेले माझेही काही तामीळ मित्र आहेतच. पण हि सारी अपवादात्मक उदाहरणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>>पण आपले व त्यांचे उच्चार,

बॅटमॅन
Mon, 06/04/2012 - 11:31 नवीन
>>पण आपले व त्यांचे उच्चार, आपले हिंदीवरील प्रभुत्व, व खाण्या - पिण्याचे समान पदार्थ यामुळे बराच एकजिनसीपणा आला आहे. म्हणजे दाक्षिणात्य लोक निव्वळ वेगळे म्हणून त्यांचा त्रास आणि उत्तर भारतीय आपल्यासारखे असल्यामुळे त्यांचा त्रास नाही असेच ना? त्रास वगैरे गोष्टी या प्रवृत्तीवर आधारलेल्या असाव्यात, अमुक एका समाजाविरुद्ध तो डायरेक्टेड नसावा. बाकी ओपन दाक्षिणात्य अपवाद असतात(मलयाळी सोडून) हे मान्यच आहे, तसे उत्तर भारतीयपण. त्यांच्या लेखी भारतात हिंदी सोडून अन्य भाषा आणि उत्तर भारतीय सोडून अन्य संस्कृती अस्तित्वातच नसते. बाकी दाक्षिणात्य कितीही स्वतःत गुरफटलेले असले तरी इन जनरल ते थोडेतरी मिसळतात असा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

टेंपरवारी प्राजेक्ट यू वाण्ट

आशु जोग
Fri, 06/01/2012 - 00:04 नवीन
टेंपरवारी प्राजेक्ट यू वाण्ट टीय
  • Log in or register to post comments

पंच क्रोशीतील

शकु गोवेकर
Fri, 06/01/2012 - 10:38 नवीन
दर पाच मैलावर भाषा बद्लते म्हणजे पंच क्रोशी तील भाषा बद्ली होते असे म्हट्ले जाते मराठी सुद्धा १)पुणेरी - काय हो आजची बात मी काय आहे ते सांगा २)मुंबई ची - अपुन ला आजची वार्ता काय ते बोला ३)नाग पुरी- काय बे,आज पेपर ला काय हाय ४)गोंय ची- कित्या वार्ता असान ५)कोल्हापुरी-म्हंजे आजची बातमी सांगतु का ६)अहिराणि- ७)बेळगावी,जत्,जम खिंडी- काय बा,हमाला आजची बातमी सांगा की वो -- ८)सातारी-पन म्या बातमी सांगतु नव्ह ९)माल वणी-आज ची बातमी काय असा १०)विरार्,वसई- आजची खबर काय/केम ११) १२) निवड्णुकी च्या वेळी होउ पाहणारे /होउ घात लेले आम दार्,खास दार सुद्धा मुलाखाती च्या वेळी अशीच मराठी टी व्ही वर वापरताना दिसतात
  • Log in or register to post comments

शकुबै,

प्रास
Fri, 06/01/2012 - 12:56 नवीन
२)मुंबई ची - अपुन ला आजची वार्ता काय ते बोला
कै च्या कै, वाट्टेल ते.....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शकु गोवेकर

>>२)मुंबई ची - अपुन ला आजची

सूड
Fri, 06/01/2012 - 16:40 नवीन
>>२)मुंबई ची - अपुन ला आजची वार्ता काय ते बोला येवढी धेडगुजरी मराठी नाही बोलत मुंबैची माणसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शकु गोवेकर

हिंदाळलेली मराठी

प्रदीप
Fri, 06/01/2012 - 19:29 नवीन
पंच क्रोशीतील (पंचक्रोशीतील) मुंबई ची ( मुंबईची) नाग पुरी (नागपुरी) गोंय ची (गोंयची) माल वणी (मालवणी)...... .................. बाकी चालू दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शकु गोवेकर

बेळगावात कधी पाय तरी टाकला

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 06/02/2012 - 00:30 नवीन
बेळगावात कधी पाय तरी टाकला आहे काय ? उगाच नाटका सिनेमातली पात्रे बघून काहीही ठोकू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शकु गोवेकर

१. मुंबई मध्ये खुप english

शिल्पा नाईक
गुरुवार, 04/25/2013 - 13:13 नवीन
१. मुंबई मध्ये खुप english शब्द वापरून एक वेळ माणस बोलतात. हे असल रस्त्यावर राहणारे पण बोलत नाहीत. २. विरार वसई मध्ये अशी भाषा बोलली जाते हे तुम्हाला कोणी सांगीतल? प्रतिक्रीया द्यायची म्हणून काहीही लिहु नका Please.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शकु गोवेकर

+७८६

तुमचा अभिषेक
Fri, 04/26/2013 - 09:57 नवीन
सहमत बरेच लोकांचा गैरसमज आहे की मुंबईकरांच्या मराठीवर हिंदी टोनचा प्रभाव असतो.. पण प्रत्यक्षात आम्ही मुंबईकर हिंदीतले काही शब्दच वापरतो, ते ही बरेचदा चपलखपणे बसतील असे, पण अ‍ॅक्सेंट हा मराठीच असतो... तसेच हिंदी सुद्धा आम्ही चांगलीच बोलतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा नाईक

मला नाही असे वाटत

रणजित चितळे
Fri, 06/01/2012 - 13:57 नवीन
आपण आपल्या दृष्टीकोनातून बघतो. तमीळ मध्ये त, थ, द, ध हे वेगवेगळे नाहीत. त्या मुळे स्वाती चे स्वाथी करतात. आपल्या मध्ये सुद्धा खुप स्ट्रॉन्ग mti (mother tongue influence) आहे. आपण इंग्रजी बोलताना तो जाणवतो. हिंदी बोलताना तो जाणवतो. बंगाल्यांमध्ये पण खूप असतो. मध्ये प्रसिद्ध मराठी कवी (नाव आठवत नाही आता) ते म्हणत होते तमीळ लोक देवनागरी मध्ये का नाही लिहित तामीळ. मला असे म्हणायचे आहे का बरे लिहावे त्यांनी देवनागरी मध्ये तामीळ. त्यांची भाषा छान आहे. समृद्ध आहे. आपल्या परसेप्शन मध्ये ती वेगळी आहे म्हणून करप्ट आहे असे का वाटावे. आपले ते चांगले आपले ते बरोबर, दुस-यांचे सगळे चूकीचे असे का वाटते आपल्याला.
  • Log in or register to post comments

मध्ये प्रसिद्ध मराठी कवी (नाव

llपुण्याचे पेशवेll
Fri, 06/01/2012 - 20:38 नवीन
मध्ये प्रसिद्ध मराठी कवी (नाव आठवत नाही आता) ते म्हणत होते तमीळ लोक देवनागरी मध्ये का नाही लिहित तामीळ. मला असे म्हणायचे आहे का बरे लिहावे त्यांनी देवनागरी मध्ये तामीळ. त्यांची भाषा छान आहे. समृद्ध आहे. आपल्या परसेप्शन मध्ये ती वेगळी आहे म्हणून करप्ट आहे असे का वाटावे. याचे कारण असे असावे की पूर्वी मराठी भाषा देखील फक्त मोडीत लिहीली जायची. देवनागरीचा वापर कमी होता. शाळांमधे देखील मोडी शिकवली जायची. परंतु महाराष्ट्राने पुरोगामित्व स्विकारून देवनागरी लिपीचा अंगिकार केला तद्वत तमिळनाडूनेही तो का करू नये. कदाचित असा असेल त्यांचा आशय. आपले ते चांगले आपले ते बरोबर, दुस-यांचे सगळे चूकीचे असे का वाटते आपल्याला. आपले चांगले आहे ते बरोबर वाटण्यात काहीही चूक नाही. अतिरेकी सहिष्णुतेमुळे आपले जितके नुकसान झाले आहे तितके दुसर्‍या कशानेही झाले नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

देवनागरी

मिहिर
Sat, 06/02/2012 - 10:34 नवीन
याचे कारण असे असावे की पूर्वी मराठी भाषा देखील फक्त मोडीत लिहीली जायची. देवनागरीचा वापर कमी होता. शाळांमधे देखील मोडी शिकवली जायची. परंतु महाराष्ट्राने पुरोगामित्व स्विकारून देवनागरी लिपीचा अंगिकार केला
फक्त मोडी नव्हे. मराठी लिहिण्यासाठी मोडी आणि देवनागरीचा वापर पूर्वीपासून होत होता. मोडीचा वापर मुख्यतः पत्रव्यवहारासाठी होत असे. काव्य वगैरे देवनागरीमध्येच लिहिले जात असे. श्रवणबेळगोळ येथील 'श्रीचामुंडराजें करवियलें' हा शिलालेख सुद्धा देवनागरीमध्येच आहे. तेव्हा मराठीने मोडी सोडून नव्या देवनागरीचा अंगिकार केला असे नसून छपाईसाठीच्या सोपेपणामुळे (मुख्यतः) मोडी मागे पडून देवनागरीचा वापर वाढला. त्यामुळे मराठी देवनागरीत लिहिणे आणि तमिळ देवनागरीत लिहिणे या पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

फक्त मोडी नव्हे. मराठी

llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/04/2012 - 10:05 नवीन
फक्त मोडी नव्हे. मराठी लिहिण्यासाठी मोडी आणि देवनागरीचा वापर पूर्वीपासून होत होता. मोडीचा वापर मुख्यतः पत्रव्यवहारासाठी होत असे. काव्य वगैरे देवनागरीमध्येच लिहिले जात असे. श्रवणबेळगोळ येथील 'श्रीचामुंडराजें करवियलें' हा शिलालेख सुद्धा देवनागरीमध्येच आहे. तेव्हा मराठीने मोडी सोडून नव्या देवनागरीचा अंगिकार केला असे नसून छपाईसाठीच्या सोपेपणामुळे (मुख्यतः) मोडी मागे पडून देवनागरीचा वापर वाढला. त्यामुळे मराठी देवनागरीत लिहिणे आणि तमिळ देवनागरीत लिहिणे या पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत. असहमत. पत्रव्यवहार राज्यकारभार संपूर्णत:, इतकेच नव्हे तर कारकूनी कित्ते देखील सरसकट् मोडीतच लिहीले जात. 'श्रीचावुंडराये करवियलें' हे देवनागरीत नाही कारण सदरलेखामधे पृष्टमात्रा वापरल्या आहेत. पृष्ठमात्रा देवनागरीत वापरल्या जात नाही (कमीतकमी सध्याच्यातरी). मोडी मागे पडून देवनागरीचा वापर वाढला. छपाईतंत्र जसे सुधारत होते तसे मोडीमधे पुस्तके छापणे ही काही अत्यंत कीचकट किंवा अवघड बाब नव्हती. देवनागरीचा वापर हा विषेशत्वाने केला गेला. यावर सकाळमधे पूर्वी देखील अनेक लेख येऊन गेले आहेत. त्यामुळे मराठी देवनागरीत लिहिणे आणि तमिळ देवनागरीत लिहिणे या पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत. माझ्यामते या पूर्णतः भिन्न गोष्टी नाहीत. सार्वत्रिकीकरणासाठी आणि सोपेपणासाठी केलेल्या / स्वीकारलेल्या ह्या सुधारणा आहेत. असेक एक उदाहरण म्हणून 'अ‍ॅ' या व्यंजनाकडे बघता येईल. वस्तुतः हे व्यंजन मराठी अंकलिपीत अस्तित्वात नाही परंतु इंग्रजी शब्दांचा उच्चार नेमकेपणाने दाखवण्यासाठी मराठी भाषेने हे नवे व्यंजन स्वीकारले अन्यथा हिंदी भाषेप्रमाणे बँकेला 'बैंक' म्हणत राहीलो असतो. फरक आहे या वॄत्तीचा अभाव असण्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर

अंशतः सहमत

श्रीरंग_जोशी
Mon, 06/04/2012 - 10:51 नवीन
श्रीमंत - देवनागरी लिपीचा वापर करणे ही फारच लांबची गोष्ट झाली. मध्य व उत्तर भारताची संस्कृती थोडा उदारपणा दाखवून समजून घेतली तरी अनंत उपकार होतील. अन परदेशात आपल्या सवयी व भावना संयमात ठेवून वागले तरी इतर देशाबद्दल चुकीचे चित्र उभे राहणार नाही. अवांतरः हिंदी भाषेने सुद्धा काही वर्षांपूर्वी मराठीतून आलेल्या 'ळ' या अक्षराचा आपल्या वर्णमालेत समावेश केलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

<<अवांतरः हिंदी भाषेने सुद्धा

शिल्पा ब
Mon, 06/04/2012 - 11:22 नवीन
<<अवांतरः हिंदी भाषेने सुद्धा काही वर्षांपूर्वी मराठीतून आलेल्या 'ळ' या अक्षराचा आपल्या वर्णमालेत समावेश केलेला आहे. एखादं उदां देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

<<अवांतरः हिंदी भाषेने सुद्धा

शिल्पा ब
Mon, 06/04/2012 - 11:22 नवीन
<<अवांतरः हिंदी भाषेने सुद्धा काही वर्षांपूर्वी मराठीतून आलेल्या 'ळ' या अक्षराचा आपल्या वर्णमालेत समावेश केलेला आहे. एखादं उदा. देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

स्पष्टीकरण

श्रीरंग_जोशी
Mon, 06/04/2012 - 11:34 नवीन
त्याच्या वापराचे उदाहरण तर मलाही कधी दिसले नाही. परंतु २००१ साली याबाबतची बातमी वृत्तपत्रात वाचल्याचे स्मरणात आहे. त्यामागचा उद्देश परभाषांमधून हिंदीमध्ये येणाऱ्या शब्दांचा अपभ्रंश टाळणे हा होता. जसे बाळ ला बाल असे म्हटले जाते. एकंदरीत राजमान्यता मिळाली तरी 'ळ' अक्षराला हिंदी भाषेत लोकमान्यता मिळालेली नाही. परंतु भाषेविषयी अधिकार असणाऱ्या समितीने उदारपणा दाखवला हे स्पृहणीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

+१

बॅटमॅन
Mon, 06/04/2012 - 11:35 नवीन
ळ संस्कृतमध्ये आहे, पण हिंदीमध्ये तो घेतला गेला हे नक्कीच इंटरेस्टिंग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+२

llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/04/2012 - 12:49 नवीन
हिंदीमधे ळ लिहीता येईल पण तो हिंदीभाषिक बोलणार कसा? :) पुढची पायरी - आता हा ळ इंग्रजीत कसा नेता येईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

भाषाशास्त्रविषयक/प्राचीन

बॅटमॅन
Mon, 06/04/2012 - 12:56 नवीन
भाषाशास्त्रविषयक/प्राचीन भारतीय इतिहासविषयक इंग्रजी पुस्तकांमध्ये ळ हा विंग्रजी एल् च्या खाली एक डॉट् देऊन लिहिला जातो, ट व ड हे अनुक्रमे इंग्रजी टी व डी च्या खाली डॉट् देऊन लिहिले जातात, ऋ हा इंग्रजी आर् च्या खाली एक डॉट् देऊन लिहिला जातो, इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

शाळेत शिकवल्या गेल्यास...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/04/2012 - 12:56 नवीन
जर लहानपणापसून शिकवल्या गेल्यास ळ चा उच्चार अवघड नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

असहमत. पत्रव्यवहार

बॅटमॅन
Tue, 10/01/2013 - 18:08 नवीन
असहमत. पत्रव्यवहार राज्यकारभार संपूर्णत:, इतकेच नव्हे तर कारकूनी कित्ते देखील सरसकट् मोडीतच लिहीले जात. 'श्रीचावुंडराये करवियलें' हे देवनागरीत नाही कारण सदरलेखामधे पृष्टमात्रा वापरल्या आहेत. पृष्ठमात्रा देवनागरीत वापरल्या जात नाही (कमीतकमी सध्याच्यातरी).
बळंच? श्रीचावुंडराये करवियलें चा फटू बघा आणि कोई मुझे कहो कि ये देवनागरी नही है???????? Image removed. बाकी, मोडी आणि देवनागरीची तुलना केली तर लगेच कळून येईल की मोडी मागे का पडली ते. आणि अर्थातच, मराठी आणि तमिऴ देवनागरीत लिहिणे जवळपास पूर्णतःच वेगळे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

आपल्याच कोशात राहण्याचे दुष्परिणाम!!

श्रीरंग_जोशी
Fri, 06/01/2012 - 19:09 नवीन
मान्य आहे त्यांच्या भाषेत थ, भ नसतील पण इंग्रजी भाषेत एखाद्या स्पेलिंग चा उच्चार जसा होतो त्याचा काही संबंध ठेवावा ना. Thick चा उच्चार कुणी तिक नाही करत मग परभाषिक लोक मुथय्या, थिमय्या असे उच्चार करणारच. साध्या मराठी माणसांना दक्षिण भारताबद्दल जेवढी माहिती असते त्या तुलनेत त्या लोकांना महाराष्ट्राबद्दल किती माहिती असते हा विचार केल्यास कळेल हा कोश किती घट्ट विणलेला आहे. एका तटस्थ माणसाकडून ऐकले होते... परदेशात कसे राहू नये हे दक्षिण भारतीयांकडून शिकावे व कसे राहावे हे मराठी माणसांकडून शिकावे.
  • Log in or register to post comments

>> परदेशात कसे राहू नये हे

मराठे
Fri, 06/01/2012 - 20:54 नवीन
>> परदेशात कसे राहू नये हे दक्षिण भारतीयांकडून शिकावे व कसे राहावे हे मराठी माणसांकडून शिकावे. जोशीसाहेब, इतकं जनरलायझेशन करू नका! ह्यातूनच पुढे द्वेषाचे तण उगवतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सहमत

श्रीरंग_जोशी
Fri, 06/01/2012 - 23:46 नवीन
नक्कीच, द्वेषभावना वाढीस लागेल असे आपल्याकडून काहीच घडू नये. ते मत एका त्रयस्थ व्यक्तीचे आहे. मा. त. क्षेत्रात काम करीत असल्यामुळे अनेक दक्षिणी सहकारी आहेतच. अन वरील सर्व वर्णनाला अपवाद असणारेही लोक पाहिले आहेत (विशेष करून मोठ्या हुद्द्यावरील).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

परदेशात कसे राहू नये हे

रेवती
Fri, 06/01/2012 - 22:13 नवीन
परदेशात कसे राहू नये हे दक्षिण भारतीयांकडून शिकावे व कसे राहावे हे मराठी माणसांकडून शिकावे. किंचित सहमत. असे सरसकटपणे मात्र म्हणता येणार नाही. तरीही नॉर्थ इंडीयनांबाबत बोलायचे झाल्यास, इतकेही माजू नये असे म्हणावे लागेल.......सगळ्यांनाच नाही पण बर्‍याचजणांना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१ सहमत..!!

nishant
Fri, 04/26/2013 - 13:27 नवीन
+१ सहमत..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ह्याच धर्तीवर आपल्या

चेतनकुलकर्णी_85
Sat, 09/21/2013 - 15:06 नवीन
ह्याच धर्तीवर आपल्या मराठमोळ्या लोकांचे हिंदी तसेच फारिन मध्ये गेल्यावर आपल्या नावाची होणारी चिरफाड या वर पण ढासू धागा येऊ दे!! बाकी बॉस हा मराठी असल्या पेक्षा सौथ इंडिअन असलेला कधीही चांगला असे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

केमिकल फर्म्युला फार

प्रशांत उदय मनोहर
Fri, 06/01/2012 - 22:27 नवीन
केमिकल फर्म्युला फार व्हिनिगार यीज सी हेच् थ्री सी वो वो हेच या लोकांना च, छ, ज, ़झ मधला फरक (क,च,ट,त,प च्या वर्गांमधल्या अनुनासिक वगळता उरलेल्या चार व्यंजनांमधला भेद ) कळत नाही किंवा तो भेद असूनही गौण मानला जातो त्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. पाच-सहावर्षांपूर्वीची गोष्ट. एन.सी.एल.मध्ये आमच्या लॅबेत सुगता चौधुरी (बंगाली), टिजो (मलयालम्) तसेच काही मराठी, कन्नड इ. लोकं होते. एकजण सुगताला म्हणाला - your name is very big, so we'll call you "su" (सू) यावर टिजो उद्गारला, - but where are the animals? आम्हाला काही कळलं नाही की या प्राण्याला प्राणी कुठे हा प्रश्न अचानक का पडला? मग लक्ष्यात आलं की या महोदयांनी "सू" हा शब्द "झू" (zoo)सारखा वापरला. :-O
  • Log in or register to post comments

माझ्या मुलाला तेलुगु लोक

रेवती
Fri, 06/01/2012 - 22:43 नवीन
माझ्या मुलाला तेलुगु लोक मुकुल म्हणण्याऐवजी मुख्खल म्हणतात. इतकेच नाही तर नावाचे स्पेलींग माहीत असलेले लोक असं विचारत होते की मुख्खल तो पिक्कल जैसाही लगता है| अयसा नाम कायकू दिया? काय बोलायचे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा