जगज्जेता विशी!
गेल्या १२ वर्षात तो पाच वेळा जागतिक अजिंक्यपदाचा मुकुट डोक्यावरती चढवून आहे (ही 'तपःश्चर्याच' म्हणायला हवी! :)) , जगातले अनेक प्रतिस्पर्धी बुद्धीबळपटू त्याच्या खेळाला वचकून असतात, गॅरी कास्पारोवसारखा त्याचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि नंतरचा सहकारी देखील त्याच्याबद्दल अनुदार उद्गार काढतो तेव्हा तो एका अढळपदाला पोचलाय याची खात्रीच होते!
३१ मे २०१२ ला मॉस्कोतल्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये 'जन गण मन' वाजलं, आनंदने विजेतेपदाचा चषक उंचावला आणि माझे डोळे भरुन आले!
उजवीकडचा सोनेरी आहे तो विश्वजेतेपदाचा चषक आणि डावीकडचा संपूर्ण स्फटिकाचा बनवलेला खास चषक त्रेत्याकोव आर्ट गॅलरीतर्फे.
फिडेच्या परंपरेनुसर विजेत्याने गळ्यात ऑलिवच्या पानांचे मोठ्ठे चक्र धारण करुन या सोहोळ्याची सांगता झाली! आनंदच्या उजव्या हाताला फिडेचे अध्यक्ष किर्सान इल्युमझानोव.
फिडेने जेव्हा या स्पर्धेसाठी निविदा मागवल्या त्यावेळी कोणी प्रायोजक मिळेनात मग भारताने पुढाकार घेतला, तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिथा यांनी २० कोटी रुपयांची हमी दिली (कधीतरी चांगलं कामही करतात हे लोक! ;) )चेन्नैत स्पर्धा भरणार हे जवळपास निश्चित झालं, फिडेचे अध्यक्ष इल्युमझानोव चेन्नैत येऊनही गेले पण तसं व्हायचं नव्हतं. पोलादी पडद्यामागे हालचाली झाल्या आणि माशी शिंकली ती प्रायोजक आंद्रे फिलातोव यांच्यारुपाने.
आंद्रे फिलातोव
हा बुद्धीबळवेडा रशियन उद्योगपती बोरिस गेल्फंडचा अगदी जवळचा मित्र आहे. त्याने हरेकप्रकारे प्रयत्न करुन शेवटच्या क्षणी चेन्नैच्या तोंडून घास काढून घेतला आणि स्पर्धा मॉस्कोत होणार हे नक्की झाले. भारतात स्पर्धा झाली असती तर मिळणारे होम पिचचे अॅडवांटेज आनंदने आता गमावले होते!
परंतु आनंद खरोखरंच संयमी आहे. स्पर्धेचे ठिकाण बदलल्यावर तो म्हणाला की "काही हरकत नाही, एकदा स्पर्धा सुरु झाली की तुमच्यासमोर फक्त प्रतिस्पर्धी असतो मग तुम्ही इथे आहात की तिथे याने काहीही फरक पडत नाही!"
मला वाटते जेत्यांच्या वाटेतच संकटे जास्त असतात किंबहुना अशा संकटांवर मात करुन जे पुढे सरकतात तेच जेते होतात. हे मी नुसते कविकल्पना म्हणून म्हणत नाहीये. आठवा याआधीची २०१० मधली स्पर्धा. त्यावेळी आईसलँडमधल्या ज्वालामुखीने यूरोपच्या डोक्यावर उधळलेल्या राखेच्या ढगाने बल्गेरियापर्यंत हवाईमार्गाने पोचणे आनंदला अशक्य झाले. पठ्ठ्याने आपल्या टीमसकट सलग ४० तास गाडीने प्रवास करुन, मधे ७-८ देश ओलांडून सोफिया गाठले! या अपघाताने स्पर्धेच्या ठिकाणी पोचायला उशीर झाला. प्रत्यक्ष स्पर्धेआधी तीन दिवसांची विश्रांती मिळावी अशी मागणी आनंदने केली ती धुडकावून लावली गेली आणि फक्त एकच दिवस मधे मिळाला. कोई बात नहीं! एवढे सगळे होऊनही, स्पर्धेआधी वल्गना करणार्या आणि विचित्र सोफिया रुल्स लादणार्या वेसेलीन टोपालोवला आनंदने व्यवस्थित धूळ चारली!
आत्ता झालेल्या स्पर्धेत बोरिस गेल्फंडने टोपालोवसारखा माज केला नसला तरी काही गोष्टी पथ्यावर पडतात. तो इस्राएलचा नागरिक असला तरी जन्माने रशियन आहे, त्याला रशियन भाषा अवगत आहे. शिवाय प्रायोजक आंद्रे फिलातोव त्याचे दोस्त आहेत. नाही म्हंटले तरी या बाबींचा प्रभाव पडतोच. आधीच असलेल्या स्पर्धेच्या दडपणात या गोष्टींनी वाढ होते. शिवाय स्पर्धेच्या दरम्यान सलग ६ डाव बरोबरी झाल्यावर कास्पारोव महाशयांनी स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन " यावर्षी आनंदचा फॉर्म चांगला नाहीये, त्याची तयारी फारशी दिसत नाहीये, त्याने आता निवृत्त व्हायला हरकत नाही!" वगैरे मुक्ताफळे उधळली होती. आनंदने असल्या टिकेला त्याच्या खेळानेच प्रत्युत्तर देणे पसंत केले. सातव्या डावात धक्कादायक पराभवाला सामोरे जाताच बोरिस समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली. त्यांनी जल्लोष सुरुच केला होता
(वरच्या चौकटीत IMPORT PGN FILE असं लिहिलेल्या ठिकाणी टिचकी मारुन तिथे खाली दिलेल्या खेळ्या चिकटवा, तुम्हाला संपूर्ण डाव खेळून बघता येईल.
[Event "Anand-Gelfand World Chess Championship"]
[Site "Moscow RUS"]
[Date "2012.05.20"]
[EventDate "2012.05.10"]
[Round "7"]
[Result "1-0"]
[White "Boris Gelfand"]
[Black "Viswanathan Anand"]
[ECO "D45"]
[WhiteElo "?"]
[BlackElo "?"]
[PlyCount "75"]
1.d4 d5 2.c4 c6 3.Nc3 Nf6 4.e3 e6 5.Nf3 a6 6.c5 Nbd7 7.Qc2 b6
8.cxb6 Nxb6 9.Bd2 c5 10.Rc1 cxd4 11.exd4 Bd6 12.Bg5 O-O 13.Bd3
h6 14.Bh4 Bb7 15.O-O Qb8 16.Bg3 Rc8 17.Qe2 Bxg3 18.hxg3 Qd6
19.Rc2 Nbd7 20.Rfc1 Rab8 21.Na4 Ne4 22.Rxc8+ Bxc8 23.Qc2 g5
24.Qc7 Qxc7 25.Rxc7 f6 26.Bxe4 dxe4 27.Nd2 f5 28.Nc4 Nf6
29.Nc5 Nd5 30.Ra7 Nb4 31.Ne5 Nc2 32.Nc6 Rxb2 33.Rc7 Rb1+
34.Kh2 e3 35.Rxc8+ Kh7 36.Rc7+ Kh8 37.Ne5 e2 38.Nxe6 1-0
तेवढ्यात पुढल्या आठव्या डावात आनंद इरेला पेटून खेळला, सहाजिकच होते, अन्यथा त्याचा सामना डावागणिक अधिकाधिक कठिण होत गेला असता. फक्त सतरा खेळ्यात बोरिसला नमवून त्याने विश्वविजेतेपदाच्या इतिहासातल्या सगळ्यात कमी खेळ्यांच्या विजयाची नोंद केली!
(वरच्याच चौकटीत IMPORT PGN FILE असं लिहिलेल्या ठिकाणी टिचकी मारुन तिथे खाली दिलेल्या खेळ्या चिकटवा, तुम्हाला संपूर्ण डाव खेळून बघता येईल.
[Event "Anand-Gelfand World Chess Championship"]
[Site "Moscow, Russia"]
[Date "2012.05.21"]
[EventDate "2012.05.10"]
[Round "8"]
[Result "1-0"]
[White "Viswanathan Anand"]
[Black "Boris Gelfand"]
[ECO "D70"]
[WhiteElo "?"]
[BlackElo "?"]
[PlyCount "33"]
1.d4 Nf6 2.c4 g6 3.f3 c5 4.d5 d6 5.e4 Bg7 6.Ne2 O-O 7.Nec3 Nh5
8.Bg5 Bf6 9.Bxf6 exf6 10.Qd2 f5 11.exf5 Bxf5 12.g4 Re8+ 13.Kd1
Bxb1 14.Rxb1 Qf6 15.gxh5 Qxf3+ 16.Kc2 Qxh1 17.Qf2 1-0
बोरिसचा प्रयत्न होता की स्पर्धा पहिल्या १२ डावांमध्येच संपवायची कारण आनंद जलदगती स्पर्धेत वरचढ ठरणार याची शक्यता जास्त होती.
परंतु १२ डावांच्या मुख्य सामन्यातले पुढले चारही डाव अनिर्णित अवस्थेत संपले आणि स्पर्धा टायब्रेकरमध्ये गेलीच!
तिथेही बोरिसने कडवा खेळ केला परंतु क्रमांक दोनच्या डावात त्याला पराभव पत्करावा लागला आणि आनंदने एका गुणाची आघाडी घेतली. आता उरलेल्या दोन डावात एक डाव जरी बोरीसने जिंकला आणि दुसरा अनिर्णित राखला तरी पुढला टायब्रेकर अनिवार्य होता. परंतु आनंदने दोन्ही डाव अनिर्णित राखत बाजी मारली!
या सामन्यातले सगळे डाव मी थेट प्रक्षेपणात बघितले. आनंदच्या खेळाचे विश्लेषण करायचे झाले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की तो एका दडपणाखाली खेळल्यासारखा वाटत होता. आठवा डाव सोडला तर इतर सर्व डावात आनंद बराच बचावात्मक खेळला. किंबहुना अति बचावात्मक खेळामुळेच त्याच्या हातून सातवा डाव गेला होता. आनंदची शैली ही आक्रमक आहे. डावाची सुरुवात, मध्य आणि शेवट तीन्ही बाबी तो उत्तम हाताळू शकतो. अतिशय कमी वेळात उत्तम चाली हुडकण्यात त्याचा हातखंडा आहे. टॅक्टिकल गेम प्लॅन्स बनवण्यात आणि ते अचूकतेने अमलात आणण्यात त्याच्या खेळाची तुलना तालशी होऊ शकेल! वेळप्रसंगी मोहर्यांचे बलिदान करुन डाव जिंकण्याचे धाडस करायलाही तो कचरत नाही.
असे असल्याने बहुतांश बुद्धीबळ तज्ज्ञांच्यामते बोरिसविरुद्धची लढत जिंकणे आनंदला सोपे जायला हवे होते. प्रत्यक्ष लढत सुरु झाली तेव्हा चित्र वेगळेच दिसू लागल्यावर सगळेच अचंबित झाले. परंतु स्पर्धेनंतर आनंदने स्वतःच याचे उत्तर दिले आहे. तो म्हणतो "बोरिसला हरवणे सोपे जाईल असे लोकांना वाटत होते कारण त्याला अंडरएस्टिमेट केले गेले! त्यामुळे सलग सहा डाव बरोबरीत सुटल्यानंतर सगळ्यांना असे वाटायला लागले की मी नेहेमीसारखा खेळत नाहीये. पण मी हे ओळखून होतो की तो पूर्ण जिद्दीने स्पर्धेत उतरतो आहे आणि हा सामना अतिशय निकराचाच होणार. त्यामुळे मी नीट खेळूनही त्याच्या प्रचंड तयारीपुढे माझी डाळ शिजेना!"
२०११ च्या कँडिडेट स्पर्धेत बोरिस ज्याप्रकारे खेळला त्यावरुन कोणीही अंदाज लावू शकेल की तो किती जिगरबाजपणे जगज्जेतेपदाकडे बघतो आहे. शिवाय त्याच्या टीमने इतकी जबरदस्त तयारी केलेली होती की आनंदच्या प्रत्येक डावपेचाला त्याच्याकडे प्रत्युत्तर होते. त्यामुळे कोणते डावपेच लढवावेत याचा अंदाज लावणे 'टीम आनंदला' मुश्किल झाले होते. संधीची वाट बघत चिवट खेळ करत राहणे याखेरीज ते काही करु शकत नव्हते. अर्थात याचा परिणाम आनंदचा खेळ अधिकाधिक बचावात्मक होण्यात झाला असावा. सातव्या डावातला पराभव आनंदला इतका लागला की तो रात्रभर झोपू शकला नाही. संपूर्ण रात्र तो डावपेचांची आखणी करत होता आणि दुसर्या दिवशी तसाच सामन्याला गेला! त्याने नेहेमीचा आक्रमक खेळ केला आणि संधी मिळताच बोरिसचा वजीर अडकवून काम फत्ते केले.
माझ्या मते खेळाच्या शैलीत बदल होत जाणे नैसर्गिक आहे. वयानुसार प्रगल्भता येत जाते. आपल्या पूर्वीच्या सामन्यातल्या चुका कोणत्या कारणाने झाल्या याचा शोध घेताना शैलीत थोडेफर बदल करुन काही फायदे होतात का याचीही चाचपणी केली जाते. अत्त्युच्च दर्जाच्या सामन्यात खेळाडूंच्या क्षमतेतला, आणि खेळाच्या पातळीतला फरक इतक कणभर असतो की सहजासहजी निकाल लागणे अवघड असते. मानसिक आणि शारीरिक ताणांचा सामना जो कोणी अधिक चांगल्याप्रकारे करु शकेल तो सरस ठरतो. ही स्पर्धा सुरु होण्याआधी गेले वर्षभर आनंद इतर स्पर्धांमधे ज्याप्रकारे खेळत होता ते बघता त्याचा फॉर्म ढेपाळलेला होता की जाणूनबुजून तो जास्त शक्ती त्या सामन्यात खर्च करत नव्हता हे सांगणे अवघड आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धात खेळत राहून त्या दबावाचा आणि खेळण्याचा सराव ठेवायचा परंतु विजेतेपदासाठी फार प्रयत्न न करता स्पर्धेत सहभागी व्हायचे. हा लांबवरच्या डावपेचांचा भाग असू शकतो. शिवाय त्या सामन्यांच्या निकालामधून प्रतिस्पर्ध्याची (बोरिसची) मानसिकता नकळत तयार होत जाण्याची शक्यता असतेच.
शिवाय माझ्यामते आणखीही एक कारण असावे. गेल्या वर्षी २०११ मधे आनंद-अरुणाला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव अखिल. मूल झाल्यानंतर आणि ते लहान असताना एकप्रकारचा हळवेपणा स्वभावात निसर्गतः येतो असे मला वाटते. तुमच्या खेळाच्या आक्रमक शैलीवर त्या हळवेपणाचा (हार्मोन्सचा) प्रभाव पडणार नाही असे मला वाटत नाही. कदाचित त्यामुळेही आनंद थोडा बचावात्मक खेळू लागला असावा. कारण शेवटच्या टायब्रेकर नंतर जी पत्रकार परिषद झाली त्यात आनंद म्हणाला "दुसरा सामना जिंकल्यानंतर उरलेले दोन्ही सामने जिंकण्यासाठीच खेळायचे हे मी मनाने घेतले होते. कारण तुम्ही बरोबरीसाठी खेळलात की हरण्याची शक्यता हमखास. असे असूनही प्रत्यक्ष डावात मी पुन्हा बचावात्मक खेळलो. मला समजत होते की असे करुन चालणार नाही परंतु मी तसा खेळलो खरा. मी डाव वाचवू शकलो यातच समाधानी आहे."
सचिनने आता निवृत्त व्हावे म्हणून सल्ले देणारे जसे अनेक असतात तसेच आनंदनेही करावे असे वाटणारे बरेच जण आहेत.
लोकशाहीत कोणालाही मत व्यक्त करता येते याचा गैरफायदा किती घ्यावा म्हणतो मी!
परवा चेन्नैत झालेल्या पत्रकारपरिषदेत आनंदने खणखणीतरीत्या जाहीर केले आहे की २०१४ च्या विजेतेपदासाठी तो स्पर्धेत आहे! याचवेळी कास्पारोवचा समाचार घेताना तो म्हणाला "मी आणि बोरिस दोघेही चाळीशी पार केलेले खेळाडू स्पर्धेत बघून बहुदा कास्पारोवला तो लवकर निवृत्त झाल्याचा पश्चात्ताप होत असावा आणि निवृत्तीनंतर त्याच्याकडे प्रसिद्धीमाध्यमांचे तितकेसे लक्ष नाहीये ही बाब त्याला खटकत असावी!" ;)
विश्वविजेतेपदाचे साडेसात कोटी रुपयांचे बक्षीस मिळवल्यानंतर तामिळनाडू सरकारने त्याच्यासाठी दोन कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. धोनी निवृत्तीनंतर सैन्यात जाणार का नाही याची चवीने चर्चा करणार्या माध्यमांनी अजूनही या विजयाची म्हणावी तशी दखल घेतली नाही याचे वैषम्य वाटते. राष्ट्रीय पातळीवरही सरकार कडून बुद्धीबळासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत असे वाटते. एक पीटी उषा मग सगळा दुष्काळ, एक प्रकाश पदुकोण मग सगळा रखरखाट ही आपली परंपरा एक आनंद त्यानंतर सगळाच 'आनंद' अशा प्रकारे चालू राहू नये असे मनापासून वाटते.
सध्याच्या तरुण खेळाडूत हरेकृष्ण पेंद्याला, कोनेरु हंपी, तानिया सचदेव, सहज ग्रोवर, परिमार्जन नेगी असे अनेक खेळाडू आहेत परंतु जगज्जेतेपदाकडे झेप घेण्यासाठी लागणारे सरावाचे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याच्या संधीचे वावडे असल्याने हे खेळाडू ग्रँडमास्टरपदाच्या पलीकडे जाणे मुष्किल होऊन बसते हे खरे दु:ख आहे!
फिडेच्या पहिल्या शंभर खेळाडूंच्या यादीत फक्त आनंद, कृष्णन शशिकिरण आणि हरेकृष्ण पेंद्याला आहेत. चीनची याही क्षेत्रात जबर मुसंडी आहे. त्यांचे सहा खेळाडू या यादीत आहेत. आणि रशियाचे अर्थात पंचवीस आहेत!
महिलांच्या यादीत आपल्या ५, चीनच्या १२ आणि रशियाच्या १७ असा हा नंबरांचा सामना आहे. जागतिक स्तरावर रशिया आणि इतर देश यातला फरक झपाट्याने कमी होत चालला आहे. तसा तो होत जाणारही. परंतु भारताची मान याही स्पर्धेत उंच राहिली तर तीच आनंदसाठी आणि आपल्यासाठी समाधानाची बाब असणार आहे!
-चतुरंग
(सर्व छायाचित्रे जालावरून साभार.)
उजवीकडचा सोनेरी आहे तो विश्वजेतेपदाचा चषक आणि डावीकडचा संपूर्ण स्फटिकाचा बनवलेला खास चषक त्रेत्याकोव आर्ट गॅलरीतर्फे.
फिडेच्या परंपरेनुसर विजेत्याने गळ्यात ऑलिवच्या पानांचे मोठ्ठे चक्र धारण करुन या सोहोळ्याची सांगता झाली! आनंदच्या उजव्या हाताला फिडेचे अध्यक्ष किर्सान इल्युमझानोव.
फिडेने जेव्हा या स्पर्धेसाठी निविदा मागवल्या त्यावेळी कोणी प्रायोजक मिळेनात मग भारताने पुढाकार घेतला, तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिथा यांनी २० कोटी रुपयांची हमी दिली (कधीतरी चांगलं कामही करतात हे लोक! ;) )चेन्नैत स्पर्धा भरणार हे जवळपास निश्चित झालं, फिडेचे अध्यक्ष इल्युमझानोव चेन्नैत येऊनही गेले पण तसं व्हायचं नव्हतं. पोलादी पडद्यामागे हालचाली झाल्या आणि माशी शिंकली ती प्रायोजक आंद्रे फिलातोव यांच्यारुपाने.
आंद्रे फिलातोव
हा बुद्धीबळवेडा रशियन उद्योगपती बोरिस गेल्फंडचा अगदी जवळचा मित्र आहे. त्याने हरेकप्रकारे प्रयत्न करुन शेवटच्या क्षणी चेन्नैच्या तोंडून घास काढून घेतला आणि स्पर्धा मॉस्कोत होणार हे नक्की झाले. भारतात स्पर्धा झाली असती तर मिळणारे होम पिचचे अॅडवांटेज आनंदने आता गमावले होते!
परंतु आनंद खरोखरंच संयमी आहे. स्पर्धेचे ठिकाण बदलल्यावर तो म्हणाला की "काही हरकत नाही, एकदा स्पर्धा सुरु झाली की तुमच्यासमोर फक्त प्रतिस्पर्धी असतो मग तुम्ही इथे आहात की तिथे याने काहीही फरक पडत नाही!"
मला वाटते जेत्यांच्या वाटेतच संकटे जास्त असतात किंबहुना अशा संकटांवर मात करुन जे पुढे सरकतात तेच जेते होतात. हे मी नुसते कविकल्पना म्हणून म्हणत नाहीये. आठवा याआधीची २०१० मधली स्पर्धा. त्यावेळी आईसलँडमधल्या ज्वालामुखीने यूरोपच्या डोक्यावर उधळलेल्या राखेच्या ढगाने बल्गेरियापर्यंत हवाईमार्गाने पोचणे आनंदला अशक्य झाले. पठ्ठ्याने आपल्या टीमसकट सलग ४० तास गाडीने प्रवास करुन, मधे ७-८ देश ओलांडून सोफिया गाठले! या अपघाताने स्पर्धेच्या ठिकाणी पोचायला उशीर झाला. प्रत्यक्ष स्पर्धेआधी तीन दिवसांची विश्रांती मिळावी अशी मागणी आनंदने केली ती धुडकावून लावली गेली आणि फक्त एकच दिवस मधे मिळाला. कोई बात नहीं! एवढे सगळे होऊनही, स्पर्धेआधी वल्गना करणार्या आणि विचित्र सोफिया रुल्स लादणार्या वेसेलीन टोपालोवला आनंदने व्यवस्थित धूळ चारली!
आत्ता झालेल्या स्पर्धेत बोरिस गेल्फंडने टोपालोवसारखा माज केला नसला तरी काही गोष्टी पथ्यावर पडतात. तो इस्राएलचा नागरिक असला तरी जन्माने रशियन आहे, त्याला रशियन भाषा अवगत आहे. शिवाय प्रायोजक आंद्रे फिलातोव त्याचे दोस्त आहेत. नाही म्हंटले तरी या बाबींचा प्रभाव पडतोच. आधीच असलेल्या स्पर्धेच्या दडपणात या गोष्टींनी वाढ होते. शिवाय स्पर्धेच्या दरम्यान सलग ६ डाव बरोबरी झाल्यावर कास्पारोव महाशयांनी स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन " यावर्षी आनंदचा फॉर्म चांगला नाहीये, त्याची तयारी फारशी दिसत नाहीये, त्याने आता निवृत्त व्हायला हरकत नाही!" वगैरे मुक्ताफळे उधळली होती. आनंदने असल्या टिकेला त्याच्या खेळानेच प्रत्युत्तर देणे पसंत केले. सातव्या डावात धक्कादायक पराभवाला सामोरे जाताच बोरिस समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली. त्यांनी जल्लोष सुरुच केला होता
PGN Editor Chess Tool
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चतुरंगचा नेहमीप्रमाणे
हेच बोलतो. जबरी लेख.
+१
रंगा! रंगा!! रंगा!!! _/\_
चतुरंग, धन्यवाद!
ये खेलोका बादशहा है हुजुर...
ये खेलोका बादशहा है हुजुर...
अप्रतिम लेख
मस्त लेख!
सेकंड्स!
लेख छानच आहे. मनात एक बारीक
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत
क्या बात है, _/\_ _/\_ तुमचं
वाट पाहातंच होतो याची, उत्तम
रंगाकाका! __/\__
अभिनंदन.
६४
सुमित भातखंडेंशी बाडिस
एक चित्र हजार शब्दांचे काम करते
हेच्च बोल्तो, आनंद व्हर्सेस
परिपूर्ण लेख
उत्तम लेख. चतुरंगाकडुन नाही
मस्त
निवांत सवडीने वाचावासा
मस्त ...
अप्रतिम लेख.
अप्रतिम
च्यामारी
(खातोय आता मार...) तथास्तु!
अपेक्षीत
च्यामारी
सत्यानाश
च्यामारी
ररा
होतं काय
बरं
नकोऽऽ
मस्त
मस्तच! आनंदचे अभिनंदन
भारताकडचे ग्रँमा
एकदम झकास लेख
उचित ओळख!
+१००. येऊ द्या रंगाशेट.
मस्त लिहलंय रे मित्रा!
बुद्धीपेक्षा आमचा कल बळाकडेच
समयोचित चांगला लेख
स्सही.
नाय हो
व्वा..
वा छान लेख. ह्या खेळाच्या