मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्लोरा,फोटो, फोकस- भाग १- देवपुष्प - कमल

चौकटराजा · · कलादालन
१९७६ च्या सुमारास पुणे येथे भुरके यांचेकडे ठेव ठेवून व्याजाच्या बदल्यात आयसोली वन हा कॅमेरा मिळवला. त्यात एक तिसांश सेकंद व बी अशी दोनच सेटिंग एक्सपोजर साठी होती व तीन सेमी बाय तीन सेमी या आकाराचे ३६ फोटो रोलमधे येत असत. सगळेच्या सगळे ३६ फोटो छपाईस पात्र होणे म्हणजे सीईटीत मोठे यश मिळविण्यासारखे असे. तरीही आपल्याकडे कॅमेरा आहे इतरांकडे तेवढाही नाही याचा सुखद अभिमान असे. काळ पुढे सरकला. माझा एक श्रीमंत मित्र त्यावेळी रंगीत फोटो घरीच तयार करण्याचा नादाला लागला होता. सारी आवश्यक सामग्री पेपर्स, रसायने त्याने पैदा केली होती. अंधारात आम्ही बारीक लाल दिव्यात काम करीत असू. टायमर म्हणून मी गीतेच्या पंधराव्या अध्यायातील श्लोक म्हणत असे. पण कधी फोटोत हिरवा कधी तांबडा कास्ट येत असे. " जो पर्यंत माणसाची कातडी कातडीच्या रंगासारखी दिसत नाही तोपर्यंत फोटो बिघडला असे समजायचे असे माझा मित्र कोठल्यातरी पुस्तकातून पाठ करून आला होता. बरेच कागद वाया गेले. त्यावेळी याशिका हा ब्रॅन्ड फार लोकप्रिय होता. पेंटेक्स ची ही चलती होती. ------- या भागात कमळ फूल ही थीम निवडून काही मी काढलेले फोटो टाकत आहे. कॅनन पॉवरशॉट ५२० चा उपयोग केला आहे. वरील सर्व फोटू हे लाल बाग बंगळूरू येथील आहेत. पुढील आकर्षणे- १ फ्लोरा,फोटो,फोकस- भाग २ - पुष्पराज गुलाब २फ्लोरा, फोटो, फोकस- भाग ३ - नाजुक फुलांची दुनिया ३.फ्लोरा, फोटो, फोकस, भाग ४- फुलला वनी बसंत बहार !

वाचने 11613 वाचनखूण प्रतिक्रिया 19

प्रचेतस Sun, 05/27/2012 - 10:05
फोटो मस्तच १,३ आणि ७ क्रमांकाच्या फोटोतली कमळे आउट ऑफ फोकस वाटत आहेत. ४था, ५वा आणि ६ वा तर अप्रतिमच आहेत. विशेषतः कमळपर्णावर बसलेला पक्षी एकदम सुरेख. कमळांचे हे आम्ही काढलेले काही फोटू. १. २. ३. ४. वरील सर्व फोटोंवर एडिटींगची कुठलीही प्रक्रिया केलेली नाही.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा Sun, 05/27/2012 - 13:30
यातील कमळे जवळ जवळ १५ ते २० फुटावरून चित्रित केली आहेत. २००७ म्हणजे ५ वर्षापूर्वी चे फोटो आहेत . कदाचित आज काढले तर अधिक चांगले येतील. वल्ली , तुझे चारही फोटो मस्त आलेयत ! क्लास !

In reply to by प्रचेतस

नरेंद्र गोळे Mon, 05/28/2012 - 17:26
वा! वल्ली खूपच सुरेख आहेत तुमची प्रकाशचित्रे! पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सरः

अतिशय सुरेख आणि अवर्णनीय फटू आहेत. ह्या आधी असली सुंदर चित्रे कधी बघण्यातच आली नव्हती. तुम्ही खरे तर तुमच्या चित्रांचे प्रदर्शन वैग्रेच भरवायला हवे. तुमची ही दैवी कलेने रंगलेली चित्रे पाहून ह्या आंतरजालावरच्या काही भिकार आणि 'केले क्लिक की आणून चिकटीव' अशा वृत्तीच्या स्वयंघोषीत फोटोग्राफर्सना काही अक्कल येईल अशी आशा करतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्यारे१ Mon, 05/28/2012 - 14:45
अरेरे, काय हे! एवढी छान छायाचित्रे आणि मला एकही दिसू नये... काय हा दैवदुर्विलास? हे ईश्वरा! काहीतरी कर रे बाबा आणि मला दिव्य दृष्टी दे. मला छायाचित्रे पाहायची आहेत रे! अरे खरंच एकही छा चि दिसलं नाही चौरांच्या धाग्यांमधलं .

In reply to by परिकथेतील राजकुमार

नरेंद्र गोळे Mon, 05/28/2012 - 17:23
शेर्पा तेनसिंग नोर्गे एव्हरेस्ट चढून गेला. म्हणजे मग इतरांनी हनुमान टेकडीही चढू नये की काय?

In reply to by मनिम्याऊ

चौकटराजा Tue, 05/29/2012 - 16:00
ओपन फोरमचा हाच मूळ हेतू आहे की एकाच विषयावर सर्व बाजूनी विचार व्हावा ! ज्याना हा हेतू पसंत नाही त्यांच्या कारवायांबद्द्ल न बोलणे बरे ! आपली प्रकाश चित्र आवश्य टाका. अर्थात संपादक मंडळाचा मान ठेवून.