Skip to main content

प्रश्न आणि प्रश्न...

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 02/05/2012 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या महायुद्धानंतर जगात दोन शक्ति अस्तित्वात आल्या. एक अमेरीका, दुसरा रशिया. रशियाचे मांडलिक म्हणवून घेतील असे अनेक देश. रशियाचा जगातल्या अनेक देशांवर वचक. जागतिक राजकारण बोटावर खेळवण्याचं सामर्थ्य रशियामधे होतं. असं काय झालं ताजिकीस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान असे रशियाचेच तुकडे कसे काय पडले. भारत हे महान राष्ट्र आहे. ज्या इंग्रजांचे जगावर राज्य होते त्या इंग्रजान्ना आमच्या लोकांनी इथून हाकलून लावले. एवढा बलाढ्य शत्रू परास्त केला मग फाळणी का वाचवू शकलो नाही. आज देशाचे एक नाही दोन नाही तीन तुकडे झालेत. भारत पाकिस्तान बांग्लादेश. का बरे ? बलाढ्य अमेरीका पण जुळे मनोरे उध्वस्त झाले तेव्हा कशी भयभीत झाली. नंतर अमेरीकेने मोठा आव आणला न घाबरल्याचा पण आता ताक सुद्धा फुंकून पिते आहे. का ? भिवंडीमधे पौलिसचौकी उभी करायला पोलिस का घाबरतात ? एकदा प्रयत्न झाला. काही पोलिस खलास झाले. काश्मीरमधे भारताचा तिरंगा फडकावायला विरोध होतो. का ? महाराष्ट्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे मराठी आपली मातृभाषा नाही असं का सांगतात ? आन्ध्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे तेलुगू सोडून हैद्राबादी हिन्दीत का बोलतात. नेहमी विचार करताना पडलेले हे काही प्रश्न या सगळ्याची संगती लावण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे नेमकं या सगळ्यामागे ? उत्तरे मिळतील का ...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19617
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

In reply to by गवि

मला पूर्वी हे "संस्कृतोद्भव शब्द वापरण्याचे वेड" असल्याचे वाटत असे. पण थोडा अधिक खोलात विचार केल्यावर ते "फारसी/अरबी शब्द काढण्याचे वेड" असल्याचे दिसून आले.

In reply to by नितिन थत्ते

मुस्लिम धर्माच्या आडमुठेपणाचा अनुभव आला असेल तर त्यामुळे भारतीय भाषांवरील मुस्लिम प्रभाव कमी करावा असे वाटणे स्वाभाविक आहे. आजही कुराणात काही चुकीचे, कालबाह्य आहे असे ते मानत नाहीत. शिवाजी महाराजांनी आपली राजमुद्रा संस्कृतात लिहून घेतली. त्या काळात तमाम राजे, उपराजे आपल्या मुद्रा फारसीतच लिहून घेत. महाराजांनी संस्कृतला प्रतिष्ठा मिळवून द्यायचा प्रयत्न केला हे कटू सत्य नाकारता येणार नाही. फारसी वा अरबी भाषा बोलणार्‍या लोकांनी जो विध्वंस केला आहे त्याचे अवशेष आजही दिसतात. त्याबद्दल कुणाला त्या संस्कृतीबद्दल राग वाटला तर त्यात इतके चूक आहे का? आक्रमकांचा प्रभाव मोडून काढण्याचा प्रयत्न जगभर होत असतो. उदा. जर्मन लोकांना लॅटिन भाषेतील उसनवार आवडत नाही. ज्यांची भाषा तुम्हाला प्रमाण मानावी असे वाटते ते खुद्द मुस्लिम लोक भाषांबद्दल किती सहिष्णू आहेत? अरबी भाषा सोडून इतर कुठल्याही भाषेत अजान देता येत नाही. भक्तगणांत एकही अरबी न जाणणारा असला तरी बेहत्तर, प्रार्थना केवळ अरबीतच म्हटली गेली पाहिजे असा दंडक आहे आणि त्यात बदल होणे नाही. कुराणाचे वेगवेगळे अध्याय मुखोद्गत करताना ते केवळ अरबीतच केले पाहिजेत असा नियम आहे. कुठल्या भाषेतल्या अनुवादाला घोकून पाठ करणे हे अमान्य आहे. कारण कुठलेही भाषांतर हे मूळ अरबीच्या जवळपासही जात नाही हा तमाम धार्मिक मुसलमानांचा आवडता सिद्धांत आहे.

आशू, तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर 'इस्लामिस्ट्स्‌मुळे' हे एकच आहे. अर्थात हे तुम्हाला नि इथे चर्चा करणाऱ्या सगळ्यांनाच माहिती आहे. इस्लामिक नि इस्लामिस्ट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जसा सिद्धिविनायकाला अनवाणी जाणारा प्रत्येकच भाविक हिंदू हा कट्टर हिंदूराष्ट्रवादी (हिंदूइस्ट) नसतो तसेच दिवसातून पाचवेळा नमाज पढणारा प्रत्येकच इस्लामिक हा दरूल-इस्लामवादी (इस्लामिस्ट) नसावा असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं. हिंदू समाजावरचा हिंदूइस्ट्स्‌चा पगडा हा मुसलमान समाजावरच्या इस्लामिस्ट्स्‌च्या पगड्याच्या तुलनेत नगण्य आहे. आणि इस्लामिस्ट्स्‌चा नुसता पगडाच नाही, तर दहशतही आहे. याचबरोबर हिंदूंमधल्या हिंदूइस्ट्स्‌चं प्रतिशत प्रमाण हे इस्लाममधल्या इस्लामिस्ट्स्‌च्या प्रतिशत प्रमाणाच्या तुलनेत नगण्य आहे. आंध्रमधे हनुमान जयंती / रामनवमीला मुसलमानांकडून विरोध होतो म्हणून त्या प्रचंड प्रमाणावर साजऱ्या करण्यात आल्या. इंटरनेटवर त्या लाखा लाखाच्या यात्रांचे फ़ोटो पाह्यले. मला प्रश्न असा पडला की हे साजरे करणारे नि त्याला विरोध करणारे इतक्या मोठ्या संख्येत, उत्साहात १५ ऑगस्टचं ध्वजवंदन का बरे नाही साजरं करत? यामुळे आणि एतद्देशीय लोक नि वाढते मुसलमान यांच्या परस्परसंबंधांबाबतीतला जगाचा इतिहास पाह्यला तर भारतासाठी दोन्हीकडे जबरदस्त भारतीयत्वाचा परिपोष हाच तुमच्या प्रश्नांवर उपाय आहे. पण भारतीयत्व ठरवताना मात्र राम की बाबर, औरंगजेब की छत्रसाल, अफ़झलखान की शिवाजीराजा, मनुस्मृती की राज्यघटना, बुलबुल-गुलिस्ताँ की मातृभूमी, शरीयत की समान नागरी कायदा, चातुर्वर्ण्य ग्राह्य की त्याज्य, प्रांतभावना आधी की राष्ट्र, जातीविद्वेष की जाती निर्मूलन - असे अगणित अडचणीचे प्रश्न या दोन्ही आणि बाकीच्याही गटांना भेडसावतील. त्यावेळी मात्र शेपूट न घालता विशुद्ध भारतीयता नि त्याहून व्यापक वैश्विक ग्राह्यता या दोन निकषांवर निवड करावी लागेल. आणि हे काम या चर्चागटाच्या क्षमतेपलिकडचे आहे. कारण यात चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे.

भिवंडी आणि तिथला समाज म्हणजे जणु काय देशद्रोही लोकांचाच इलाका आहे, असे समजणार्‍यानी सत्यमेव जयतेचा तिसरा भाग पहावा. http://www.satyamevjayate.in/issue03/videos/ ००.४२ मिनिटांपुढचा भाग

http://twocircles.net/2011jan16/muslims_just_3_army_account_6_martyrs.h… जम्मु आणि काश्मीर इन्फन्ट्रीत तर ५० % मुसलमान आहेत आणि १९४७ पासून आजअखेर झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणावर त्या धर्माचे लोक भारतासाठी शहीदही झालेले आहेत. http://www.globalsecurity.org/military/world/india/rgt-jakli.htm http://en.wikipedia.org/wiki/Jammu_and_Kashmir_Light_Infantry कुठल्याही धर्माला सरसकट धोपटणे बरे नव्हे....

In reply to by JAGOMOHANPYARE

http://www.faithfreedom.org/op-ed/sachar-committee-report-uncovered-bac… जवळपास सगळ्या राज्यात मुस्लिम गुन्हेगारांची टक्केवारी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बरीच जास्त आहे. आता ही टक्केवारी विचारात घेऊन ह्या धर्माला धोपटले तर चालेल का?

आम्ही आपले आम्हाला पडलेले साधे सुधे प्रश्न मांडले निष्कर्श अभ्यासकांनी, विचारवंतांनी आम्हाला सांगावेत

घोडं का अडलं ? पान का सडलं ? गर्लफ्रेंड का रुसली ? सगळ्यात महत्त्वाचं म्हण्जे यकुंच्या कोंबडीचं काय झालं ?

श्री आशु जोग, तुम्हाला एक सल्ला द्यावासा वाटतो. तुम्ही प्रश्न मांडले आहेत ते ठीक पण तुमचे त्या विषयावर पूर्ण समाधान व्हावे असे वाटत असेल आणि वस्तुनिष्ठ चर्चा घडवून आणायची असेल तर प्रत्येक प्रश्नाची पूर्वपिठीका, त्यावरची तुमची मते, विचार, इतर अभ्यासकांची मते , उपाय असा व्यवस्थित गोषवारा लिहून मग त्यावर चर्चा घडवून आणा. त्यासाठी लागणारा अभ्यास वाढवा. बर्याच वेळा तुम्हाला उत्तरं त्या अभ्यासातूनच मिळून जातील . मुळात वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न ठासून एका धाग्यात घुसडायचे आणि तो गडबडगुंडा हवेत फेकायचा, मग झेलायला पब्लिक येतंच,ती गम्मत बघत राह्यचं. शिवाय तुम्ही विचारलेल्या जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरं "मुस्लीम लोक, त्यांचा धर्म, भाषा आणि संस्कृती " असं तुम्ही आधीच मनात धरलेलं असतं असं वाटतं आणि फक्त त्याला अनुमोदन देणारे प्रतिसाद यावेत यासाठी तुम्ही जिलबी टाकता. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं,प्रतिवाद आले कि तुम्ही अजून वेगळेच , वेगळ्या विषयाशी संबंधित प्रश्न काढून किंवा मुद्दे उपस्थित करून गाडी वेगळ्याच रुळावर सोडून देता. चर्चा भरकटून जाते ती याचमुळे. तुमचे वरचे सर्व प्रतिसाद वाचले तर कुणालाही ते चटकन लक्षात येईल. आणि तुमचा मागचा धागा वाचनमात्र झाला त्याचं कारण हेच. बघा पटलं तर बाकी तुम्ही काय करावं याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. तरीपण हे असे धागे टाकण्यामागे तुमची प्रेरणा काय आहे याचा विचार 'सतत आपले मन आणि विचार जास्त सुसंस्कृत आणि प्रगल्भ करणारी एक प्रामाणिक व्यक्ती' बनण्यासाठी तुम्ही कराल अशी अपेक्षा ठेऊन दिलेला हा सल्ला.

भारतीय माणूस परदेशी जायच्या गोष्टी करतो, किवा परदेशात गेल्यावर, तिथून परत आल्यावर भारताला इंडिया असाच म्हणतो.लाज वाटते का मी भारतीय आहे अस सांगण्याची? कि आपल्या देशाच नाव भारत नाहीच?

खूप भाराभर लिहिले आहेस पण हारुन मित्रा एक गल्लत केलीस. माझ्या मुद्यांऐवजी तू मलाच टार्गेट करायला लागलास. टीका लेखनावर करा लेखकावर नको. मागील धाग्यातदेखील तू दहशतवादाचे कारण गरीबी, उपासामारी दिले होतेस. पण मग दाउदची कुठली गरीबी आहे, पाकिस्तान निर्मितीसाठी प्रचंड दंगे करणार्‍या जीनांची कोणती होती गरीबी. हे सांगणे तुला जमलेले नाही... कुठलेही कारण दिले तरी दहशतवाद, खून समर्थनीय कसे होऊ शकतात. >> तो गडबडगुंडा हवेत फेकायचा, मग झेलायला पब्लिक येतंच, मला नावे ठेवतो आहेसच पण आता पब्लिकलाही नावे ठेवतो आहेस. का बाकीच्या लोकांना स्वतंत्र बुद्धी नाही वाटते. --- आणि जोपर्यंत पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, मुम्बई रेल्वे बॉम्बस्फोट. मुम्बईवरचा २६/११ चा हल्ला काश्मीरातील पंडीतांना काश्मीरातून हाकलवून लावणे या गोष्टी चालू राहतील तोपर्यंत मी त्याविरुद्ध आवाज उठवतच राहणार ! सगळ्याच भारतीयांचा याला विरोध असला पाहीजे. --

In reply to by आशु जोग

कास्मिरी पंडितांच्या वाटोळे होण्याला तेच जबाबदार आहेत. जेंव्हा मुसलमान अब्दाली कडून सत्ता राजपुतांकडे गेली तेंव्हा सगळे मुसलमान राजाला भॅटले आणि आम्हाला हिंदु करा म्हणाले.. राजाने त्यासाठी मोठा समारंभही आयोजीत केला होता. पण आदल्या दिवशी कास्म्हिरी पंडीत राजाला म्हणाले त्याना हिंदु केलेत तर आम्ही प्राण देऊ.. त्यामुळे तो कार्यक्रम बारगळला. त्याची फळे म्हणजे आजची त्यांची अवस्था. हिंदु धर्म कर्मविपाक सांगतो ना? :)

In reply to by JAGOMOHANPYARE

?????????? काश्मिरी पंडितांनी बाटलेल्यांना हिंदु करु नका म्हणुन सांगितले. चुकलेच. पण म्हणुन त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हक्क इतरांना कोणी दिला? वर्षानुवर्षे महार मांगांवर जो अन्याय झाला त्याचे मूळही त्यांच्या पुर्वजांच्या पापांमध्ये आहे काय मग? नाही हिंदु धर्म कर्मविपाक सांगतो म्हणुन विचारले. जातीपातीच्या राजकारणाचा आणि द्वेषाचा हा कळस झाला. प्रत्येक गोष्टीसाठी ब्राह्मणांना दोष देउन तुम्ही काय साधताय हे कळत नाही पण त्यातुन तुमचेच हसे होत आहे हे तुम्हाला कळत नाही काय? असो. तुमचे अज्ञान, तुमची विद्वेषी वृत्ती आणि तुमचे टोकाचे जातीय विचार आणि त्यातुन तुमचेच होणारे नुकसान हाही तुमच्याच गतजन्मीच्या पापाचा कर्मविपाक असावा.

माझ्या मुद्यांऐवजी तू मलाच टार्गेट करायला लागलास. टीका लेखनावर करा लेखकावर नको. ---- श्री. आशु जोग टार्गेट करण्याची भाषा आवडली नाही. टीका खेळकरपणे घेतली असतीत तर तुम्हाला तसे वाटले नसते. शिवाय टीका लिखाणावरच होती. धाग्यातला विषय कसा मांडला जावा ते सांगावेसे वाटले तसे सांगितले. सातत्याने असे लिखाण करण्याची प्रेरणा तपासून पहा असे म्हंटले त्याचे वाईट वाटले काय ? तुमच्या लिखाणात तसे जाणवले म्हणून विचारले. बाकी तुमची मर्जी. मागील धाग्यातदेखील तू दहशतवादाचे कारण गरीबी, उपासामारी दिले होतेस. पण मग ---- ते कारण आहेच कि मग. त्याशिवायही अनेक कारणे आहेत. फक्त तेच आहे असे म्हंटले का ? बाकी ते एक प्रमुख कारण नक्कीच आहे. दाउदची कुठली गरीबी आहे, ---- तो एक क्रूर अपराधी आहे. आणि त्याच्या अपराधी कारवायांमागे त्याची अपराधी वृत्ती हीच कारणीभूत आहे. तो गरीब आहे (?) म्हणून समर्थनीय अपराधी आहे असे मी केंव्हा म्हंटले. किंवा भारतातल्या कुठल्या मुस्लिमांनी म्हंटले ते सांगा. पाकिस्तान निर्मितीसाठी प्रचंड दंगे करणार्या जीनांची कोणती होती गरीबी. हे सांगणे तुला जमलेले नाही... ---- परत वडाची साल पिंपळाला. जगातल्या किंवा भारतातल्या सगळ्याच समस्या गरीबीमूलक आहेत असं माझं मत असल्याचं तुम्ही सोयीस्कर ठरवून घेता आहात. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी नुसते दंगे कारणीभूत होते हे म्हणणं किती भोळेपणाचं आहे. त्यामागे आपल्या त्या काळातल्या नेत्यांनी ब्रिटीशांच्या मुत्सद्देगिरीपुढे पत्करलेली शरणागती, दाखवलेला दुर्दर्शितेचा अभाव, देशातल्या सर्व लोकसमूहांना एकजूट करण्यात त्यांना आलेले अपयश ह्या आणि अशा अनेक गोष्टी आहेत. व्ही. व्ही. नगरकरांचे ' the Genesis of Pakistan ' नावाचे पुस्तक खूप माहितीपूर्ण आहे. वाचायचा आग्रह करतो.खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील. कुठलेही कारण दिले तरी दहशतवाद, खून समर्थनीय कसे होऊ शकतात. ---- अलबत होऊ शकत नाही. पण ते घडण्यामागची कारणमीमांसा करणे ही एक निरोगी समाज बनवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आहे असं तुम्हाला वाटत नाही काय ? >> तो गडबडगुंडा हवेत फेकायचा, मग झेलायला पब्लिक येतंच, मला नावे ठेवतो आहेसच पण आता पब्लिकलाही नावे ठेवतो आहेस. का बाकीच्या लोकांना स्वतंत्र बुद्धी नाही वाटते. ---- मुळात असे द्वेषमुलक धागे काढायचे त्यावर भावना भडकावून प्रतिसाद गोळा करायचे आणि वर नावं ठेवली जातायत असा कांगावा करायचा. हो, प्रत्येकाला स्वतंत्र बुद्धी असतेच पण त्याखेरीज प्रत्येक माणसाच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करणारे भावना , वैयक्तिक श्रद्धा , लहानपणापासून आपण जीत वाढलो ती संस्कृती हे घटकहि असतात. या गोष्टींचा फायदा घेऊन वस्तुनिष्ठ विचार करण्याची क्षमता झाकोळून टाकणारे व त्यावर पोटं भरणारे राजकारणी नावाचे कीटक वर्षानुवर्षे पोसले जातात हे आपण पाहतोच. अर्थात म्हणूनच तुम्हाला तुमची प्रेरणा तपासून पहायचा सल्ला दिला होता. आणि जोपर्यंत पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, मुम्बई रेल्वे बॉम्बस्फोट. मुम्बईवरचा २६/११ चा हल्ला काश्मीरातील पंडीतांना काश्मीरातून हाकलवून लावणे या गोष्टी चालू राहतील तोपर्यंत मी त्याविरुद्ध आवाज उठवतच राहणार ! ---- त्याकरता शुभेच्छा , घटनांची निवड तुमचा एका समाजाविषयीचा द्वेष चटकन दाखवून देते. दांतेवाडा हत्याकांड , नक्सली चळवळ, अरुणाचलातील afspa , कश्मीरमधील afspa , उल्फा सन्घटना, खैरलांजी, मालेगाव बॉम्बस्फोट, गुजरात दंग्यातील बेस्ट बेकरी हत्याकांड, भिंद्रनवाले, खलिस्तान चळवळ यावरही तुम्ही आवाज उठवणारे धागे काढाल अशी अपेक्षा ! सगळ्याच भारतीयांचा याला विरोध असला पाहीजे. ---- भारतीयत्वाचा तुमचा आणखी एक निकष काय ? सगळ्या भारतीयांचा तुम्ही उल्लेखलेल्या गोष्टींना विरोध नाही असे गृहीत धरणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध.

काश्मीरमधील पंडीतांचे निर्वासित होणे किंवा २००६ चे रेल्वे मधील बॉम्बस्फोट असा विषय निघाला की दंतेवाडा, नक्षलवाद यावर बोला असे म्हणायचे आणि डॉ. नाईक यांचा विषय आला की सिंघल, तोगडीया अशी नावे फेकायची -- चालू द्या ...

In reply to by आशु जोग

उत्तरे अजून मिळाली नाहीत कारण प्रश्न चुकीचे आणि एका विशिष्ट उद्देशाने लोडेड आहेत. उदाहरणार्थ रशियाचे तुकडे झाले असं म्हणताना प्रश्नात असं दाखवलं गेलं आहे जुन्या सोव्हिएट युनियनमधून जणू फक्त मुस्लिम बहुल प्रांतच फुटले आहेत. सोव्हिएट रशियाचे विभाजन झाले तेव्हा युक्रेन, जॉर्जिया हेही वेगळे झाले हे झाकले गेले आहे. बाकी भिवंडीतल्या पोलीस चौकीबद्दल जे काही लिहिले आहे त्यावरून धागाप्रस्तावक कधीही भिवंडीला गेलेले नाहीत हे दिसून येते.

.

माझा प्रश्न हा आहे व मला एका परदेशी कलीग ने विचारलेला प्रश्न ही तोच होता- एव्ह्ढ्या मोठ्या भारतावर ( पाकिस्तान, बान्ग्लादेश व सध्याचा भारत) हे शम्भर ईन्ग्रज २०० वर्ष राज्यच कसे काय करु शकले? आय रेड युर हिस्टरी. आय कुड नॉट अन्डरस्ट्यान्ड वन थिन्ग द्याट हाउ कम सो स्माल ब्रिटिश इन नम्बर्स कॉन्कर सो बिग इन्डिया यान्ड रुल फॉर २०० इयर्स मी. मनोरा? मी आजही निरुत्तर.