Skip to main content

हे धदंड तत्तड...पेट्रोल अजून महाग झाले

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 23/05/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! पेट्रोल साडेसात रुपयांनी महाग झाले धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13411047.cms सरकारला शिव्या घालून, संताप करुन काही उपयोग नाही :) त्यापेक्षा नाचलेले काय वाईट ! :) धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! नाचा रे नाचा !!! आज सोनियाचा दिन आला... धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

वाचने 22819
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

धन्यवाद क्लिंटन, तुमच्या प्रतिसादाचीच वाट पाहात होतो. तुम्ही दुवा दिलेला लेख सुद्धा वाचेन.

क्रूड ऑईल आयात केल्या पासून ते बाजारात विक्रीला येई पर्यंत त्यात काय खर्च येतो हा डाटा कोणाकडे आहे का ? तेल कंपन्यांना जो तोटा होतो तो फक्त आयातीच्या भावामुळे होतो का त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेही होतो हे कोणी सांगेल का ? जर या कंपन्या तुमच्या आमच्या आहेत तर आपण या लोकांना एवढा पगार देऊ शकतो का ? तुमच्या घरातील मोलकरणींना तुम्ही ५००० पगार देऊ शकता का ? या कंपन्यांमधे नोकरांच्या बाबतीत सप्लाय-डिमांड हे नैसर्गिक तत्व डावलले जाते त्यासाठी काय करावे लागेल ? म्हणजे बाहेर लाखो लोक नोकर्‍यांसाठी रांग लावून उभे असताना कमी पगारावर माणसे आपण का लाऊ शकत नाही ? पैसे मिळवायचे इतर मार्ग भ्रष्टाचाराने संपले आहेत त्यामुळे हा मार्ग स्विकारला गेलाय का ? म्हणजे जर २जी मधे लाखो करोड रुपये जर सरकारच्या तिजोरीत जमा झाले असते तर ही भाववाढ करायला लागली असती का ? किंवा जे सरकारने म्हटले होते की जर तेलाच्या किंमती जागतीक बाजारभावाशी जोडल्या गेल्या तर आम्ही त्यावर शून्य टॅक्स करू हे वचन पाळता अले असते का ? पण एक बरे झाले की सरकारच्या अकार्यक्षमता व चुकीच्या धोरणांचे परिणाम जनतेच्या दरवाजापर्यंत येऊन ठेपले ते. जनता पुढच्या निवडणूकीच्या वेली निश्चितच विचार करेल. भारतामधे जे जे अकार्यक्षम आहे त्याला घाणीतून बाहेर काढायला करदात्यांचा पैसा वापरला जातो ती सबसिडी थांबवता येईल का ? उदा. सहकार क्षेत्र......असे अनेक प्रश्न या वाढीमुळे मनात उभे राहिले आहेत हे खरे.......

In reply to by जयंत कुलकर्णी

हा जवळ जवळ ६०-७० टक्के असतो. त्या मध्ये केंद्रा चा आणि राज्य सरकार पासून शहराचा वाटा असतो. http://www.dayandnightnews.com/2011/11/petrol-without-tax-cost-rs-42-ap… http://www.indiandefence.com/forums/social-political-issues/10989-why-p… जागतिक बाजारात पेट्रोल ची किंमत वाढते ते ठिक आहे, भारतात पण वाढवा पण ह्या गरजे पेक्षा जास्त "करा" चे काय. बरे, हा कर गोळा करून सुद्धा रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक पण बेकार. त्या मध्ये सुधारणा शून्य. मग हा कर जातो कुठे?

In reply to by सुमीत

पेट्रोलच्या किमतीतील ६०-७० टक्के वाटा हा करांचा असतो. (म्हणजे कर हे ७०% पेक्षा जास्त असतात). E.D,. V.A.T. त्या व्यतीरीक्त अनेक अधीभार आणि (फक्त महाराष्ट्रातच) ऑक्ट्राय हे सर्व वाटेकरी आहेत. अवांतर- (१) अनेकांना माहीत नसेल की या अधीभारातील एक अधीभार रस्त्यांसाठी असतो. आपण अधीभार देतोच. त्याशिवाय "टोल" देतो. (२)भारतातच नव्हे तर संपुर्ण जगा२)ऑकट्राय फक्त महाराष्ट्रात आणि तोसुद्धा फक्त मोठ्या शहरात चालू आहे.

In reply to by चिंतामणी

की फक्त महाराष्ट्रात "जकात" (की जिझिया ?) कर आहे. आता प्रश्न असा की एकूण कर पद्धतीला आळा कसा घालायचा? "जन हीत" याचीका दाखल करू शकतो का?

In reply to by सुमीत

फक्त महाराष्ट्रात आणि तोसुद्धा निवडक शहरातच चालु आहे. जकात सर्व टॅक्सेस किमतीत मिळवून आणि वाहतूक खर्चसुद्धा त्यात मिळवुन होणा-या रकमेवर घेतली जाते. म्हणजे ती पेट्रोलचा दर + E.D. + त्यावरील अधीभार + V.A.T+ राज्य सरकारचे अधीभार एव्हढ्या सगळ्यांची बेरीज करून त्यावर ऑक्ट्राय लागू करतात. अवांतर- प्रामाणीकपणे जकात भरणा-याकडे चोर असल्यासारखे बघीतले जाते आणि तशी वागणूक मिळते. त्याशिवाय कितीही प्रामाणिक असलात तरी चिरीमिरी वसूल केलीच जाते.

आज सकाळीच पेट्रोल भरले ८३.९२ प्रती लिटर (हैद्राबाद मधे) अमृत

नानू लेका, आमच्या दु:खावर फूंकर घालण्याऐवजी आनंद व्यक्त करत आहात कुठे फेडाल हे पाप ? आपण स्वत: पेट्रोलला काही पर्याय निर्माण केले पाहिजेत. काहीतरी टाकावू वस्तू आणि कोणत्या तरी झाडाची जडीबूटी कुटून त्याचा एक थेंब पाण्यात मिसळून कमीत कमी एका थेंबापासून पाच पंचवीस टँकर पेट्रोल निर्मिती झाली पाहिजे त्याशिवाय पेट्रोलचे भाव काही कमी होणार नाही. :) -दिलीप बिरुटे

फक्त पेट्रोल महागलंय ना! मग ठिक आहे डीझेल महागलं असतं तर बर्‍याच गोष्टी महाग झाल्या असत्या. पेट्रोलवाढीमुळे फार वाईट वाटत नाही. (मी पेट्रोल किंवा डीजेलवर चालणारे कोणतेही वाहन बाळगत अथवा चालवत नाही.)

बाबाजी के चरणों में कोटी कोटी प्रणाम ! बाबाजी ये मेहेंगाई बोहोत बढ गई है... पेट्रोल तो मेहंगा ही होते जा रहा है ! क्या आपकी "कॄपा" से ये मेहेंगाई कम हो सकती है ? ;) मेहेंगाई से बचने के लिये आपकी "कॄपा" पाना बोहोत आवश्यक हो गया है ! क्या आपकी "कॄपा" हिंदुस्थान के सभी लोगों को मिल सकती है ? सभी हिंदुस्थानी लोगों को आपकी यह असीम "कॄपा" प्राप्त करने के लिए कितीनी जेब खाली करनी पडेगी ? यह बताना न भुलिये ! आपका परम भक्त... (बाबा मियॉ प्रेमी) ;)

नान्या खुळावला

माणसाचे जगणे महागच झाले आहे, त्यात विशेष काय? स्वस्त असे काहीच राहिले नाही. भाजीपाल्यापासून, धान्ये, दुध, औषधे, एल.पी.जी, बसभाडे, रिक्षाभाडे इ. सगळ्यांची भाववाढ झालीच आहे, त्यात पेट्रोलची किंमत वाढ्ली इतकेच ( ती दर ४-६ महिन्यांनी होत असते) . :) हे तर सोडा २०११-१२ मध्ये स्टेनलेस स्टीलचा भाव २-३ वेळा वाढला आहे. :) पण सरकारी कामगारांना मात्र ६वा वेतन आयोग मिळाला ना, मग आणखी काय पाहिजे. किंमती वाढ्ल्या की टॅक्स वाढ्ला, टॅक्स वाढ्ला की सरकारी खजिना भरला, मग ७वा वेतन आयोग देता येईल ना.....खाजगी कामगारांच्या हाती काय (२जी आणि ३जी आणि आणखी काही घोटाळयांमुळे) घंटा..... नाचा...धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

समजा, सरकारने डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकाचा ग्यॅस यांची सबसिडी बंद केली, त्याबरोबरच पेट्रोलसह या सर्व इंधनांवरचा करही माफ केला आणि त्यांच्या किंमतींवरील नियंत्रणही रद्द केले तर - १.या इंधनांच्या प्रत्यक्ष किंमती किती असतील? २.ऑईल कंपन्यांना होणारा तोटा भरून निघेल काय? ३. सरकारच्या तिजोरीवरचा बोजा वाढेल की कमी होईल? ४. देशात महागाई वाढेल की कमी होईल? या प्रश्नांची उत्तरे कोणी अगोदरच शोधली आहेत का? असल्यास ती द्यावीत. नसल्यास ती उत्तरे कोठे मिळतील? जाणकारांनी कृपया माहिती द्या.(गोव्यातील प्रयोगाबाबत कुणाला अधिक माहिती आहे काय?) ता.क. रस्त्यावरची स्वयंचलित वाहनांची गर्दी तशीच आहे.

In reply to by विसुनाना

अफाट कर गोळा करून पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुचकामी आहे.

प्रश्न फक्त पेट्रोल दरवाढीचा नाही, त्या अनुषंघाने येणार्‍या इतर वस्तूंच्या दरवाढीचा देखिल आहे. आता पेट्रोलचे दर वाढले म्हटल्यावर, भाजी, दूध, किराणा, आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखिल वाढणार. दूध आजच्या तारखेलाच ४० ते ४५ रुपयांवर आहे, LPG आधिच १२५ ते १४० च्या घरात आहे. आज कुठलीही भाजी २० ते ३० रुपये किलोच्या खाली नाही (निदान ठाण्यात तरी!) या सगळ्या भावांमधे प्रचंड प्रमाणात वाढ होणार. जे लोक दिवसाला २००-२५० रुपये कमावतात त्यांनी कसे जगायचे हा प्रश्न आहे. मी आणि इतर अनेक मिपासदस्य या वर्गात मोडत नाहीत. पण म्हणून जगभर पेट्रोलचे दर वाढतायत तर भारतातही वाढणारचं, पेट्रोल हि गरज नसून चैन आहे वगैरे बोलायला आपल्याला फार त्रास होत नाही. त्यात आपण सुशिक्षित, आपल्याला आकडेवारी आणि इतर सामाजिक, राजकिय समीकरणे समजतात, ती सर्व वर्गातील लोकांना कळतीलच, किंवा कळलीच पाहिजेत हा बालिश विचार आहे. सरकार शिव्या देण्यात मतलब नाही, सरकार काय करणार वगैरे बोलणार्‍यांना हे समजणे अवघड नाही, कि सरकार या सारख्या प्रश्नांवर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी असते. आणि दुर्दैवाने आज भारतात असा कुठलाही पक्ष नाही, ज्याच्या कडे अशा संवेदनशील प्रश्नांचे गांभिर्य जाणून त्यावर तितक्याच सारासार बुद्धीचा वापर करुन तोडगा काढण्याची कुवत असलेले नेते आहेत. काँग्रेस असो वा भाजप असो, सगळेच फक्त या गोष्टीकडे एक "निवडणूकीसाठी मिळालेला मुद्दा" याच नजरेने बघतात. आणि यापुढील धोका हा, कि आज जर परिस्थिती इतकी चिंताजनक आहे तर आज जी पिढी २० वर्षे वयोगटात मोडते, नवतरुणवर्ग, त्यांच्यापुढे काय काय वाढून ठेवले आहे हे तो इश्वरचं जाणे!! :(

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

दूध आजच्या तारखेलाच ४० ते ४५ रुपयांवर आहे,>>>>>>>>> माझ्या दुग्ध आहे या व्यवसायात मला मिळालेले पैसे ! मला आजच्या तारखेला १२.१४ पैसे प्रति लिटर भाव मिळाले मग मि काय करु ????????????

आता पेट्रोलचे दर वाढले म्हटल्यावर, भाजी, दूध, किराणा, आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखिल वाढणार. दूध आजच्या तारखेलाच ४० ते ४५ रुपयांवर आहे, LPG आधिच १२५ ते १४० च्या घरात आहे. आज कुठलीही भाजी २० ते ३० रुपये किलोच्या खाली नाही (निदान ठाण्यात तरी!) या सगळ्या भावांमधे प्रचंड प्रमाणात वाढ होणार. हे कस शक्य आहे, भाव पेट्रोलचे वाढलेतन की डीजलचे?

In reply to by विजय_आंग्रे

जीवनावश्यक वस्तुंची मोठ्या प्रमाणावर वाहतुक डिझेलच्या वाहनातुन होते, पण ज्याला लास्ट माईल म्हणतात ते सगळं पेट्रोलवरच असतं, जवळपास ९०%, त्यामुळं तिथं खुप मोठा फरक पडतो.

पेट्रोलच्‍या दरात प्रति लिटर 7.50 रूपयांची दरवाढ केल्‍यानंतर केंद्र सरकारच्‍या रडावर आता डिझेल आणि घरगुती वापराचा गॅस आहे. सरकारने याचेही दर वाढवण्‍याची तयारी केली आहे. शुक्रवारी होणा-या बैठकीनंतर सरकार याची घोषणा करण्‍याची शक्‍यता आहे. सरकारने डिझेलच्‍या दरात 3 ते 5 रूपये आणि घरगुती गॅसच्‍या दरात 400 रूपये वाढ करण्‍याची योजना केल्‍याचे पेट्रोलियम मंत्रालयाच्‍या एक वरिष्‍ठ अधिका-याने दैनिकभास्‍करडॉट कॉमशी बोलताना सांगितले. पेट्रेलियम पदार्थाच्‍या दरात वाढ करण्‍यासाठी सरकारवर सध्‍या प्रचंड दबाव आहे.

पेट्रोल नश्वर आहे... अन् महागाई सत्य आहे..... मग उगा आक्रंदन करण्यात, काय बरे तथ्य आहे? ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याविषयी उगीच चिडाचीड न करायला शिकलेला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याविषयी उगीच चिडाचीड न करायला शिकलेला,
डांबिसकाका, तुमने तो पीईच नही या धर्तीवर तुमने तो कभी खरी तक्रार कीईच नही. अहो, तक्रार करायची ती आपला ज्या गोष्टीवर बिलकुल कंट्रोल नाही त्या बाबतीतच! आपला कंट्रोल असतो तेव्हा आपल्यावर जबाबदारी येते की काहीतरी करण्याची. यवढं कसं हो तुम्हा झंटलमन लोकांना समजत नाही?

In reply to by राजेश घासकडवी

मग ही घ्या तक्रार...... "आजकाल पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. साधी टाकी फुल्ल करायची तरी खिशाला मोठे भगदाड पडत आहे. शिवाय इतके पेट्रोल जाळल्याने त्या ओझोन लेयरला भलेमोठे भगदाड पडत आहे ते वेगळेच. पृथ्वीच्या पोटातला पेट्रोलचा साठादेखील संपुष्टात येत आहे... स्वर्गामधले लट्ठ देव काय नुसते अमृत ढोसून झोपा काढत आहेत काय?" संतप्त सार्वजनिक मिपाकर, पिवळा डांबिस :)

In reply to by पिवळा डांबिस

ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याविषयी उगीच चिडाचीड न करायला शिकलेला,
मग मराठी माणसानं करावं तरी काय? ;-)

In reply to by Nile

या दोन प्रतिसादांचा विचार करता बाबा घासकडवी पूजावाले उर्फ गुर्जी हे अस्सल मराठी माणूस नाहीतच असा निष्कर्ष निघतो. अधिक संशोधनाअंती ते सरासरीपेक्षा फारच जास्त शिकलेले आणि विचार करणारे (सामान्य भाषेत विचारजंत किंवा दाखवायच्या उच्चभ्रू भाषेत विचारवंत) असल्याचे लक्षात येते. सबब बाबा घासकडवी पूजावाले उर्फ गुर्जी हे अस्सल मराठी माणूस नसून, सामान्यांच्यापेक्षा अधिक शिकलेले विचारवंत* असल्यामुळे त्यांचाही निषेध करते. *मी दाखवायची उच्चभ्रू असल्यामुळे विचारवंत म्हणते. खर्‍या उच्चभ्रूंनी शक्य असल्यास विचारजंत असे वाचावे. अवांतर: जागतिक बाजारात क्रूड अथवा कच्च्या तेलाची किंमत किंचित वाढून आत्ता ९० डालरांवर आहे.

आणखी विश्लेषण दिल्लीऐवजी मुंबईतील किंमत घेतली असती तरी निष्कर्षात फरक आला नसता. टीप: कोणाला असे वाटू शकेल की यूपीए सरकारच्या काळात रुपयाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे क्रूड तेलाचे रुपयातील भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. पण तसे नाही हे खालील गणितातून दिसून येईल. रालोआच्या ७४ महिन्यांच्या (६.१६ वर्षे) काळात डॉलर ३९.५६ रु वरून ४५.१७ रु पर्यंत वाढला. म्हणजे डॉलर प्रतिवर्ष २.१७% दराने वधारला. यूपीए च्या ९६ महिन्यांच्या (८ वर्षे) काळात डॉलर ४५.१७ वरून ५६.०० रु पर्यंत वाढला. म्हणजे प्रतिवर्ष २.७२% दराने वधारला. दोन्ही दरांत फारसा फरक नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरामुळेच दरवाढ होत आहे असे दिसते. तरीही काही प्रमाणात सरकार ही वाढ शोषत आहे असे पेट्रोलच्या दराच्या क्रूड दराशी असलेल्या प्रमाणावरून दिसेल. रालोआ सरकारच्या काळातही अश्याच रीतीने क्रूडतेलाची दरवाढ शोषली जात होती. (गुणोत्तर कमी झाले).

In reply to by नितिन थत्ते

१९९८ ते २०१२ मधे कच्च्या तेलाचे भाव (रूपयामधे) साधारण १० पट वाढले, पण पेट्रोलचे दर ३ पटच वाढलेले आहेत. याचा अर्थ पेट्रोलचे भाव पुरेसे वाढलेले नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर. ती कसर विमानाचे इंधन किंवा वंगणे आणि इतर उत्पादनांच्या भाववाढीतून भरून काढली असावी. वरच्या सारखी तुलना डिझेल, रॉकेल यांच्यासाठी करून पाहिली तर आणखीच वेगळे चित्र दिसेल.

पेट्रोल, डिझेल, केरोसिन व घरगुती वापराचा गॅस (LPG) ह्यांचे भाव भारतात कसे ठरवले जातात, त्यावरील कर किती असतात, ह्यांविषयी अत्यंत उपयुक्त व सविस्तर माहिती येथे मिळेल. ह्या माहितीचे मला उमजलेले संकलन मी येथे केले आहे: भारतात इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम ह्या तीन तेल विक्री कंपन्या ('तेविकं') आहेत, ह्या तिन्ही संपूर्ण भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. २००२ सालापर्यंत केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, केरोसिन व घरगुती वापराचा गॅस ('गॅस') ह्यांच्या किरकोळ विक्रीच्या किंमती स्वतःचे काही 'गुप्त' (opaque) फॉर्म्युले वापरून ठरवत असे. एप्रिल २००२ साली तत्कालिन केंद्र सरकारने ही पद्धत झुगारून देऊन किरकोळ भाव ठरवावयाची नवी पद्धत अवलंबली. त्यानुसार ह्या तीन तेविकंना स्वतः ह्या मालांचे किरकोळ भाव, आयात भावांच्य आधाराने ठरवता येणार होते. ह्याचवेळी केंद्राने खाजगी कंपन्यांनाही रिफायनींग व तेलविक्रीचे परवाने द्यायचे ठरवले. तेव्हा रिलायन्स व एस्सार ह्या दोन कंपन्या ह्या व्यवसायात उतरल्या. परंतु २००४ साली सरकारने ह्या मालांचे भाव ठरवण्याचे तेविकंचे हक्क काढून घेतले, कारण जगातील क्रूड तेलाचे , तसेच इतर तेल- मालांचे भाव वेगाने वाढू लागले होते. ह्यानंतर केंद्राने स्वत: पुन्हा हे भाव ठरवण्याचे हाती घेतले. तेव्हापासून केंद्राने पेट्रोल व डिझेल ह्यांच्या भावांत सुमारे १० वेळा वाढ केली आहे, परंतु केरोसिन व गॅस ह्यांचे भाव जवळजवळ स्थिर ठेवलेले आहेत. आता तेविकंना रिफायनरीजकडून मिळणार्‍या तेलमालांचे (पेट्रोल, डिझेल, केरोसिन व गॅस) भाव वाढू लागले होते, परंतु त्यांच्या विक्रीच्या किंमती, ग्राहकांना परवडाव्यात ह्यासाठी केंद्राने बांधून ठेवल्या होत्या. ह्यामुळे तेविकंचा तोटा होऊ लागला. तेविकंना मिळणारी विक्री किंमत, त्यांना रिफायनरीजना द्यावी लागणार्‍या किंमतींपेक्षा कमीकमी होऊ लागली. ह्या तफावतीस under recoveries असे संबोधले जाते. (हे थोडे सुलभीकरण आहे, पण मूळार्थ बरोबर आहे). वाढत्या under recoveries चा परिणाम त्यांच्या book values घसरण्यात झाला. उदा. एप्रिल २००८ ते डिसेंबर २००८ ह्या अवधित ह्या तीन तेविकंच्या book values सुमारे २५ ते ४३ टक्क्यांनी घसरल्या. त्यांचा हा तोटा भरून काढण्यासाठी केंद्राने दोन मार्ग अवलंबिले. पहिला, तेविकंच्या upstream सरकारी कंपन्यांना पडेल किंमतीत तेविकंना विक्री करण्यास भाग पाडणे. दुसरा, तेविकंना 'तेल रोखे'देणे. हे तेल रोखे तेविकं लगेचच बाजारात विकून नगद पैसा मिळवू शकत, अथवा ते तसेच जवळ बाळगून, redemption च्या वेळेपर्यंत त्यावर सरकारकडून नियमित रीत्या व्याज घेऊ शकत. हे तेल रोखे केंद्राने off budget देणे आरंभले. अर्थात त्याच्या गंगाजळीतून हे पैसे दिले जात होते. ही एक प्रकारची तेविकंना केंद्राने दिलेली सब्सिडीच होय. ह्याचबरोबर केंद्राने गेल्य काही वर्षांत ह्या तेलमालांवरील अबकारी कर कमीकमी करत आणलेले आहेत. उदा. २००४ ते जून २००८ ह्यांदरम्यान पेट्रोलवरील अबकारी कर (२६ % + ७.५ रू.) प्रति लिटरपासून आता तो रू. १४.३५ प्रति लिटर इतका कमी केला आहे, डिझेलवरील अबकरी करातही अशीच घसरण केलेली आहे. ह्याच दरम्यान गॅस व केरोसिन ह्यांवरील अबकारी कर, अनुक्रमे ८ % व १६ % ह्यांपासून दोन्ही शून्यावर आणले आहेत. म्हणजे २००४ सालापासून केंद्राने तेल रोखे व कमी केलेले स्वत:चे कर, अशा दोन्ही उपाययोजना करून तेलमालांचे ग्राहकांना पडणारे भाव रोखून धरण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात ह्याचा बोजा केंद्राच्या अर्थसंकल्पावर पडला आहे. उदा. २००७-८ साली केंद्राची वार्षिक तूट ५.७ % होती, ती २००८-९ ह्या वर्षात ११.४ % इतकी वाढली. ह्या काळांत बहुतांश राज्य सरकारांनी ह्या मालांवरील आपापले कर कमी केलेले नाहीत. आताच्या भाववाढीनंतर पेट्रोलच्या दिल्लीतील भावांचा तक्ता येथे देत आहे. ही व इतर राज्यांतील सध्याचे तेलमालांचे भाव ह्यांची माहिती येथे मिळेल.

In reply to by प्रदीप

भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचा अतिशय सोप्या भाषेत घेतलेला आढावा आवडला. नियंत्रण अर्थातच अनंतकाळपर्यंत करता येत नाही. त्यामुळे कधीतरी भाववाढ होणारच. सध्या झालेल्या भाववाढीमागे हे कारण आहे, हे छान समजावून सांगितलेलं आहे. दुर्दैवाने भाववाढ रोखून धरण्यासाठी, किंवा ती संयतपणे व्हावी याबद्दल श्रेय देण्याऐवजी जेव्हा ती अनिवार्यपणे करावी लागते तेव्हा तक्रार होते. 'सरकारने भाव वाढवले (किंवा वाढू दिले)' एवढंच लोकांना लक्षात येतं. या सगळ्या कंपन्या पूर्णपणे प्रायव्हेटाइज केल्या तर भाव भसाभस वरखाली गेले असते आणि शेवटी हिशोब तोच राहिला असता, हे विचारात घेतलं जात नाही.

In reply to by राजेश घासकडवी

>>या सगळ्या कंपन्या पूर्णपणे प्रायव्हेटाइज केल्या तर भाव भसाभस वरखाली गेले असते आणि शेवटी हिशोब तोच राहिला असता, हे विचारात घेतलं जात नाही. -- कंपन्य पूर्णपणे प्रायव्हेटाईज केल्या असत्या तर भाव वर-वर-वर-एखादवेळी खाली असं काहि झालं असतं... मग त्यात राजकारणी+उद्योगपती अश्या लॉबीप्रेरीत इतर कंपन्या उतरल्या असत्या... आणि एक सहकार क्षेत्रासारखं कुरण तयार झालं असतं. मग परत आत्महत्या वगैरे आल्याच. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

माझ्या प्रतिसादात मी रिलायन्स व एस्सार ह्यांचा उल्लेख केलेला आहे. २००२ सालच्या खाजगी कंपन्यांनाही रिफायनरींग व मार्केटींगसाठी परवानगी देण्यात येण्याच्या धोरणामुळे ह्या दोन्ही कंपन्या त्या क्षेत्रात उतरल्या. पण त्या कंपन्या डोमेस्टिक मार्केटसाठीच्या आपापल्या तेलमालाची, मी निर्देशिलेल्या तीन तेविकंना, घाऊक विक्री करतात, त्यामुळे सरकारच्या नियंत्रित भावांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.

In reply to by शिल्पा ब

अमेरिकेला हवे तेव्हा डॉलर छापून तेल विकत घेता येतं*. भारताला डॉलर छापता येतील, पण ते डॉलर तेल विक्री करणारे देश मान्य करणार नाहीत. भारताला खरोखरच निर्यात करून डॉलर कमावून खर्च करावे लागणार. किंवा इतर कोणत्या देशाने भारतीय रूपये घेऊन त्याबदल्यात तेल विकायचं ठरवलं तर त्या ही देशाचा इराक/इराण व्हायला फार वेळ लागणार नाही. *अमेरिका प्रत्येक वेळेस डॉलर छापतेच असं नाही, पण QE वगैरेंचा परिणाम बाजारावर होतोच. भारतातल्या अशा प्रकारच्या फियाट करन्सीच्या तेजी-मंदीमुळे तेलबाजारावर परिणाम होत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारताला डॉलर छापता येतील, असहमत. भारतात डॉलर नाही डालर छापता येतात. शिवाय ते नाण्यांमधे असतात त्यामुळे टाकसाळीत तयार होतात. :-)

In reply to by विकास

हा विनोद असेल तरी डोक्यावरून गेला. आणि विनोद नसेल तरीही. कृपया मला मदत कराल का? Will you please help me here?

In reply to by प्रदीप

प्रतिसाद खूपच माहितीपूर्ण आहे! धन्यवाद! अर्थात ह्याचा बोजा केंद्राच्या अर्थसंकल्पावर पडला आहे. उदा. २००७-८ साली केंद्राची वार्षिक तूट ५.७ % होती, ती २००८-९ ह्या वर्षात ११.४ % इतकी वाढली. सहमत. पण त्याचे कारण केवळ पेट्रोल / तेल आहे असे वाटत नाही तर एकूणच धोरणात्मक निर्णय आहेत. हे (क्लिंटनच्या एका प्रतिसादास दिलेल्या उत्तरात म्हणल्याप्रमाणे) काही कोणा एका पक्षासंदर्भात अथवा आघाडीसंदर्भात म्हणत नाही.

In reply to by विकास

त्याचे कारण केवळ पेट्रोल / तेल आहे असे वाटत नाही तर एकूणच धोरणात्मक निर्णय आहेत
अगदी मान्य. विमान तेले व वंगणे (ज्यांच्या विक्रीभावांवर मर्यादा ठेवलेल्या नाहीत) वगळता इतर तेलमालांपासून सरकारला किती निव्वळ नफा होतो, ह्याची मलाही नक्की माहिती नाही.पण मी उल्लेखिलेल्या आय. ई. ए. च्या दुव्यावरील Petrolium Product Pricing In India ह्या पेपरात ह्या संबंधात असा उल्लेख आहे :
Mounting oil bond debt has led to a period of considerable budgetary excess in India. With tax revenues falling, stimulus spending accelerating, and off-budget debt issuance increasing rapidly, India’s government deficit (across all levels of government and including off-budget components) more-than-doubled in nominal terms from 5.7% of GDP in FY 2007-08 to 11.4% in FY 2008-09. Total state and central government debt is estimated at 82% of GDP. As rating agency Standard & Poor’s (S&P) is keen to highlight, the key factor in this fiscal excess is the rapid increase in off-budget debt issuance, and in particular oil bond issuance
(ह्यातील अधोरेखन माझे आहे).

In reply to by प्रदीप

थोडक्यात घेतलेला आढावा आवडला. यात किंचित सुधारणा करतो. अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी २०१० च्या अर्थसंकल्पात नवीन तेल रोखे न जारी करायची निती पुढे चालू ठेवली जाईल असे म्हटले होते. " I have made a conscious effort to avoid issuing bonds to oil and fertiliser companies.I would like to continue with this practice of extending Government subsidy in cash, thereby bringing all subsidy related liabilities into our fiscal accounting" अर्थमंत्र्यांचे अधिकृत भाषण India Budget या संकेतस्थळावर इथे मिळेल. याचा अर्थ नवे तेल रोखे जारी करणे २००९-१० मध्येच बंद केले होते असे दिसते. तसेच २०११ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी म्हटले: "In my last Budget, I had stated that Government would avoid issuing bonds in lieu of subsidies to oil and fertiliser companies. I have adhered to this decision, thereby bringing all subsidy related liabilities into our fiscal accounting" (मुद्दा क्रमांक १३७). तर २०१२ च्या अर्थसंकल्प सादर केलेल्या भाषणात या रोख्यांचा उल्लेख नाही. २०१० च्या अर्थसंकल्पात सरकार नवीन तेल रोखे जारी करणार नाही हे अर्थमंत्र्यांनी जाहिर केले ही चांगली गोष्ट असल्याचे प्राध्यापक टी.टी. राम मोहन यांनी वर्गात म्हटल्याचे मला चांगलेच आठवते. तेव्हा सरकारने तेल रोखे जारी करणे २-२.५ वर्षांपूर्वी बंद केले आणि तेवि कंपन्यांना रोख सबसिडी देणे चालू केले. जर सरकारने ती सबसिडी वेळेवर दिली नाही तर या कंपन्यांना बाजारातून खेळत्या भांडवलासाठी कर्ज घ्यावे लागेल आणि या कंपन्यांचा आकार लक्षात घेता त्यांना अनेक हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागेल आणि एकदम बल्कमध्ये इतके कर्ज घ्यावे लागल्यास अर्थातच व्याजाचे दर वाढतील आणि त्याचे सगळे वाईट परिणाम होतील हे नक्कीच.

पेट्रोलवरील राज्यवार कर पुढीलप्रमाणे: जाणकारांनी आता ह्यातून राजकीय पक्षवार करांची मोजदाद करावी. गोव्यात स्थानिक कर जवळजवळ नाहीच! त्याउलट बंगळूरमधे तो सर्वाधिक म्हणजे ३४ % आहे! (संदर्भ : पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनॅलिसीस सेल, भारत सरकारचा हा दुवा)

क्लिंटन, प्रदीप आणि नितिन थत्ते यांचे विशेष आभार. (भारताचा पर कॅपिटा जीडीपी / पेट्रोलची किंमत = ९८७ , अमेरिकेचा पर कॅपिटा जीडीपी / पेट्रोलची किंमत = ४४००९) (बरे, ते जाऊदे...आणखी साधा हिशोब--- भारतातील मध्यमवर्गीयाचा महिन्याचा पगार / पेट्रोलची किंमत = १२५० , अमेरिकेतील कनिष्ट मध्यमवर्गीयाचा महिन्याचा पगार / पेट्रोलची किंमत = ३७३३)

In reply to by विसुनाना

:) अर्थशास्त्राचे नियम सर्वत्र समान पद्धतीने लावायचे असतात. त्यामुळे त्यामधे मध्यमवर्ग, त्याचे उत्पन्न वगैरे क्षुल्लक बाबी ह्या प्रभाव न पाडणारे घटक मानून त्यांचा विचार करायचा नसतो. :)

असतील नसतील ते रूपये देऊन डॉलर घ्या ! डॉलर कमवा, डॉलर खर्चा आणि मजेत रहा. एका डॉलरमधे सहा कप चहा येतो. कटिंग घेतला तर आठ कप.. अवांतर : " अहो , मला एखाद्या महागड्या जागी घेऊन चला बरं ....." " ठीक आहे. पेट्रोलपंपावर जाऊयात "

छान माहितीपुर्ण प्रतिसाद [ लेख नाही :) ]. बरीच आकडेवारी आणि समिकरणे वाचायला मिळालीत. मला फक्त काही गोष्टी कळल्यात आणि त्या म्हणजे, १) पेट्रोल ची किंमत ठरवणे माझ्या हातात नाही. २) पेट्रोल च्या किंमती ठरवणार्‍या सरकार वर माझं नियत्रंण नाही. ३) सरकारच्या राजकिय संधिसाधू निर्णयांवर माझं नियत्रंण नाही. ४) सरकारच्या आणि प्रशासनच्या अनियंत्रीत खर्चावर माझं नियत्रंण नाही. ५) माझ्या आधीच्या पिढ्या ज्या प्रमाणे पुर्वीच्या बादशाह, सुलतान, महाराज, राणी, वाईसरॉय वगैरे यांच्या विविध करातून जिवंत सुटल्यात त्याच प्रमाणे मी सुद्धा (संसदीय लोकशाही) सरकारच्या विविध करातून जिवंत सुटेलच आणि माझ्या पुढील पिढ्या सुद्धा :) शेवटी काय आपण सगळेच "डॉर्वीनच्या" सिद्धांताला बांधील आहोत { जो फीट्टेस्ट तो वाचणार}. [अवांतर: पेट्रोल च्या किंमती कितीही वाढू देत, प्रश्न आहे तो परवडण्याचा. आणि दोनच प्रकारच्या व्यक्तींना कोणतीही किंमत परवडू शकते आणि त्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे राजकिय पक्षात एखादी महत्त्वाची जागा धरून ठेवणारा आणि व्यावसाईक कंपनीत मोठी जागा धरून ठेवणारा. दोघांनाही स्वतः ची गाडी वापरण्याचीच काय विकत घेण्याची सुद्धा गरज नाही.]

सत्ताधारी सरकारला* निवडणुकांनंतर आपलेच सरकार यावे याव्यतिरिक्त जनतेच्या त्रासाशी काहीही घेणे नाही. जेव्हा हवे तेव्हा भाव कमी नाहीतर वाढवुन.तेव्हा बर्‍या या तेल कंपन्या काही बोलत नाहीत. * म्हणजे सत्तेवर असणारे ते कोणीही असो...फक्त आताचेच असे नाही....................नायतर काहीजण उगाच "दिलपे" घेतात.