✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे धदंड तत्तड...पेट्रोल अजून महाग झाले

न
नाना चेंगट यांनी
Wed, 05/23/2012 - 19:27  ·  लेख
लेख
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! पेट्रोल साडेसात रुपयांनी महाग झाले धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13411047.cms सरकारला शिव्या घालून, संताप करुन काही उपयोग नाही :) त्यापेक्षा नाचलेले काय वाईट ! :) धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! नाचा रे नाचा !!! आज सोनियाचा दिन आला... धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22648 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

आता पेट्रोल १०० रु वर कधी

मोहनराव
Wed, 05/23/2012 - 19:29 नवीन
आता पेट्रोल १०० रु वर कधी पोचते ते बघायचे!!
  • Log in or register to post comments

डॉलर ६० च्या वर गेला की

नाना चेंगट
Wed, 05/23/2012 - 19:31 नवीन
डॉलर ६० च्या वर गेला की पेट्रोल १००. धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

जेनी...
Wed, 05/23/2012 - 19:32 नवीन
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! हे काय आहे?? :-O
  • Log in or register to post comments

धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्

जोयबोय
गुरुवार, 05/24/2012 - 16:25 नवीन
हा ताशा चा आवाज आहे धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अरेरे!

पैसा
Wed, 05/23/2012 - 19:34 नवीन
आम्ही गोव्यात रहातो म्हणजे लुस्कानीत गेलो की! गेल्या महिन्यात १५ रुपये कमी झाले होते! असो. तुमच्या आनंदात सहभागी आहोत. भारतीय नागरिकानी वाहने वापरू नयेत आणि चालून हेल्दी रहावं म्हणून भारत सरकारने उचललेलं पाऊल आहे ते! सरकारचे अभिनंदन! http://www.kshitij.com/research/petrol.shtml ही लिंक बघा. म्हणजे पाकिस्तानपेक्षा आपण किती सुदैवी आहोत हे कळेल!! :D
  • Log in or register to post comments

भारतीय नागरिकानी वाहने वापरू

नाना चेंगट
Wed, 05/23/2012 - 19:39 नवीन
भारतीय नागरिकानी वाहने वापरू नयेत आणि चालून हेल्दी रहावं म्हणून भारत सरकारने उचललेलं पाऊल आहे ते! सरकारचे अभिनंदन! सहमत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हेल्दी

चिरोटा
Wed, 05/23/2012 - 20:22 नवीन
हेल्दी रहावे म्हणताय तर रस्ते तरी नीट ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

सरकार तरी काय करणार? निर्यात

अविनाशकुलकर्णी
Wed, 05/23/2012 - 20:21 नवीन
सरकार तरी काय करणार? निर्यात कमी आयात भरम साठ. त्या मुळे तुट वाढत आहे. रुपया घसरला. अताच अर्नब गोस्वामी म्हणत होते पुढच्या २ आठवड्यात..डिझेल व ग्यास पण कडाडणार... भारतात निर्यात करण्या सारखे काय आहे? चिन ने सारे मार्केट आपल्या हातात ठेवले आहे. मुलभुत प्रषणाच्या मुळाशी गेलात तर डोके चक्रावते.
  • Log in or register to post comments

माणसे

चिरोटा
Wed, 05/23/2012 - 20:25 नवीन
भारतात बुद्धिमत्ता खच्चून भरली आहे. म्हणूनच तर एवढ्या परदेशी कंपन्या आहेत इकडे. आता एकच पर्याय आहे. भारतातून माणसांनी भरलेल्या बोटी सर्व दिशांना पाठ्वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

खच्चून बुद्धिमत्ता

नगरीनिरंजन
Wed, 05/23/2012 - 20:50 नवीन
=)) =)) =)) लै भारी. आवडला ज्योक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

मिपाकरांना प्राधान्य अमेरिकेत

निनाद मुक्काम …
Wed, 05/23/2012 - 23:23 नवीन
मिपाकरांना प्राधान्य अमेरिकेत वाईट हॉउस आणि हॉलीवूड मध्ये चित्रपट समीक्षक म्हणून सहज खपतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

अगदी अगदी!

हंस
गुरुवार, 05/24/2012 - 10:05 नवीन
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

भारतात निर्यात करण्या सारखे

गोंधळी
Wed, 05/23/2012 - 20:33 नवीन
भारतात निर्यात करण्या सारखे काय आहे? BLACK MONEY
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

भारतात निर्यात करण्या सारखे काय आहे?

तुषार काळभोर
गुरुवार, 05/24/2012 - 08:06 नवीन
माणसं!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

सरकारचे अभिनंदन. लवकरात लवकर

llपुण्याचे पेशवेll
Wed, 05/23/2012 - 20:51 नवीन
सरकारचे अभिनंदन. लवकरात लवकर सर्व इंधनांवरच्या सबसिडी काढून मूळ बाजार भावात इंधने उपलब्ध व्हावीत. नाहीतरी लोकाना फुकटच्या सबसिड्या लाटायची सवयच आहे आपल्याकडे.
  • Log in or register to post comments

स्वस्त

मन१
Wed, 05/23/2012 - 22:43 नवीन
खरेतर प्रगत देशात अत्यंत महाग मानली जाणारी एक वस्तू* सरकारने आधीच अत्यंत स्वस्त उपलब्ध करुन दिली आहे. मग पेट्रोल सारख्या फडतूस गोष्टी महाग झाल्या तर काय झालं? . . . . * मानवी जीवन ही ती वस्तू
  • Log in or register to post comments

परवाच चेपुवर वाचलेला शेर

दादा कोंडके
Wed, 05/23/2012 - 23:14 नवीन
चंद सिक्को में बिकता है इंसान का जमीर यहां... कौन केहता है, के मेरे मुल्क में महंगाई बहोत है :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

लैच आवडेश. परत चेपुवर टाकला

मृत्युन्जय
Sat, 05/26/2012 - 10:59 नवीन
लैच आवडेश. परत चेपुवर टाकला आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

:)

मी-सौरभ
Wed, 05/23/2012 - 22:48 नवीन
भारतात असलेल्या मिपाकरांचे अभिनंदन!! तुम्ही लवकरच स्वतःची गाडी वापरणे बंद करुन सार्वजनिक वाहतूकीचा आनंद घेणार आहात...
  • Log in or register to post comments

लिफ्ट पंचायत

कुंदन
Wed, 05/23/2012 - 23:40 नवीन
लिफ्ट पंचायत , कार पुलिंग , सायकिल रिक्षा हे पर्याय योग्य ठरावेत का अशा परिस्थितीत ?
  • Log in or register to post comments

नाना हल्कत अहे. बाकी आता आठ

रमताराम
Wed, 05/23/2012 - 23:43 नवीन
नाना हल्कत अहे. बाकी आता आठ वाजता गाडी काढून बागडायला बाहेर पडलो तेव्हा पेट्रोल पंपावरची प्रचंड म्हणजे प्रचंड अगदी तुफान गर्दी पाहून ह. ह. पु. वा. पार बाहेर रस्त्यावर लागलेल्या रांगा नि पेट्रोल पंपावर सभा असल्यासारखी एकमेकाच्या उरावर बसलेले लोक. येड्यांचा बाजार सगळा. चारचाकी गाडीवाल्यांचे समजू शकतो पण दुचाकीची आठ लिटरची शिंची ती टाकी, फुल्ल केली तरी वट्ट पन्नास रुपये वाचतात. ते एखाद्या चैनीच्या क्षणी कुठे खर्च करतो पत्ताही लागत नाही. मग हा आचरटपणा कशाला. वर एवढ्या लोकांना पुरेल एवढे इंधन एकावेळी पंपावर नसणारच, मग ते संपले की हेच 'जागरूक' वैग्रे लोक च्यानेलना नि पेप्रांना पंपवाले कशी कृत्रिम टंचाई निर्माण केली वैग्रे मुलाखती देणार (मला 'अ वेन्स्डे' चित्रपटातला इलेक्ट्रिक बाबा आठवतो अशा वेळी) . सगळा मूर्खपणाचा कारभार. (गरीबांना पन्नास रूपये पण खूप होतात वगैरे तर्क आगाऊच फाट्यावर मारण्यात आला आहे. ज्यांच्या दृष्टीने पन्नास रूपये 'इतके' महत्त्वाचे असतात त्यांच्याकडे दुचाकी गाड्या असतात यावर माझा विश्वास नाही.)
  • Log in or register to post comments

चुकीची समजूत

श्रीरंग
गुरुवार, 05/24/2012 - 00:09 नवीन
आमच्या ६ डिस्ट्रिब्यूटर्स कडे मिळून जवळपास १२०-१२५ सेल्समन काम करतात. ६०००-८००० प्रति महिना पगारावर घर चालवणार्या या लोकांपैकी बहुतेकांना स्वत्।ची दुचाकी वापरावी लागते. इतक्या पगारावर काम करणारी असंख्य जनता आहे जी एखाद्या चैनीच्या क्षणी ५० रुपये सहज खर्च करू शकत नाही. उगाच जनरलाईज (सरसकटीकरण?) करू नये. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

बरं

रमताराम
गुरुवार, 05/24/2012 - 08:29 नवीन
बरं. पण मला एक सांगा, चार वाजता दरवाढ जाहीर झाल्यावर दोन्-तीन तासात एकरकमी १०% पगार खर्चून ते पेट्रोलची टाकी फुल करून घेऊ शकतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

टाकी फुल करून घेण्यासाठी

श्रीरंग
गुरुवार, 05/24/2012 - 14:12 नवीन
टाकी फुल करून घेण्यासाठी गर्दी करणं मूर्खपणाचंच आहे यात शंका नाही. फक्त "५० रु. म्हणजे फार नाहीत. एवढी रक्कम कोणीही एरवीच सहज खर्च करत असावेत." हे तुमचं मत पटलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

चैनीचा क्षण

आनंदी गोपाळ
गुरुवार, 05/24/2012 - 12:22 नवीन
सिगारेटचे पाकीट ५०-६० रुपयांस मिळते. साधा चहा ५ रुपयाखाली गावांतही मिळत नाही. हॉटेलात नाश्ता केला तरी ५० रुपये सहज जातात :( ता.क. स्वतःची दुचाकी वापरायची जबरदस्ती करण्यात आलेली आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

जबरदस्तीमुळे नव्हे, तर

श्रीरंग
गुरुवार, 05/24/2012 - 14:16 नवीन
जबरदस्तीमुळे नव्हे, तर अपरिहार्यतेमुळे वापरावी लागते स्वत्।ची दुचाकी. बाकी मी ज्या स्तरातील लोकांबद्दल बोलत होतो ते ५०-६० रुपयांच्या सिगारेट नाही ओढू शकत दिवसभरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

पेट्रोल

चिरोटा
Wed, 05/23/2012 - 23:59 नवीन
पेट्रोल महाग होत असले तरी मोठमोठ्या गाड्या खपतच आहेत. महिंद्र XUV(१५-१६ लाख) ला भारतात बराच डिमांड असल्याचे वाचले. होंडा BRIO ला पण बरीच मागणी आहे.
  • Log in or register to post comments

चिरोटा- जरा अवांतर ज्ञान वाढवा थोडे.

चिंतामणी
गुरुवार, 05/24/2012 - 08:50 नवीन
आपण वर उल्लेखीलेल्या मोठमोठ्या गाड्या (होंडा BRIO नव्हे) या सर्व डिजेलवर चालतात. आणि गेले कित्येक वर्षे डिजेलची भाववाढ होत नाही. त्यामुळे अश्या गाड्यांना जास्त मागणी असते असे म्हणल्यास वावगे ठरू नये. (आत्ताच्या घटकेला डिजेलची किंमत पेट्रोलच्या जवळपास निम्मी आहे.) डिजेलची भाववाढ का होत नाही त्याच्या कारणांविषयी वेगळी चर्चा करण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

आज सोनियाचा दिन आला..

चिंतामणी
गुरुवार, 05/24/2012 - 00:03 नवीन
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! यु.पि.ए. सरकारला काल तीन वर्षे पुर्ण झाली. त्याचे बक्षीस मिळाले. धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
  • Log in or register to post comments

आज सोनियाचा दिन आला..

चिंतामणी
गुरुवार, 05/24/2012 - 00:03 नवीन
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! यु.पि.ए. सरकारला काल तीन वर्षे पुर्ण झाली. त्याचे बक्षीस मिळाले. धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!
  • Log in or register to post comments

दादानूं

रमताराम
गुरुवार, 05/24/2012 - 00:11 नवीन
यवडं खूस जाह्लासा का पर्तिसाद दोनदा टायपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

ररासायेब

चिंतामणी
गुरुवार, 05/24/2012 - 00:35 नवीन
चूकीने झाले. येक डाव माफी असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हा हा...

दादा कोंडके
गुरुवार, 05/24/2012 - 00:17 नवीन
तीन वर्षापुर्वी सरदरजीचा शपथविधी असताना पेट्रोल ४० रु लिटर होतं. आता तीन वर्षात दुप्पट भाव झाला आहे. बट वी डीझर्व इट! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अहो, एवढं नाचायला काय झालंय?

राजेश घासकडवी
गुरुवार, 05/24/2012 - 01:50 नवीन
अहो, एवढं नाचायला काय झालंय? किमती जगभरच वाढलेल्या आहेत. भारतात गेल्या दहा वर्षांत पेट्रोलच्या किमती अडीच पट झाल्या. म्हणजे इन्फ्लेशन रेट ९.६%. अमेरिकेत गेल्या आठ वर्षांत पेट्रोलच्या किमती दुप्पट झाल्या. इन्फ्लेशन रेट - ९.३%. २००८ मध्ये पडलेल्या किमती आता चार वर्षांत सव्वादोन पट झाल्या. इन्फ्लेशन रेट - २२.०% मी स्वतः ९९ साली १ डॉलरला गॅलन भरलेलं आहे. आता मुकाट्याने ४ डॉलर काढून देतो. १३ वर्षांत चौपट म्हणजे इन्फ्लेशन रेट ११.३%. उगाच सरकार अमुक करतं सरकार तमुक करतं वगैरे म्हणून का नाचावं? हे जगच विचित्र आहे, मागणी वाढली की किंमत येड्यासारखं वाढवतं, तरीही आम्हाला मागणी वाढवत गाड्या चालवायच्याच आहेत म्हणून नाचा हवं तर.
  • Log in or register to post comments

शू......

प्रदीप
गुरुवार, 05/24/2012 - 10:16 नवीन
जगात काय चालतं ते आम्हाला सांगू नका. आमचं जग वेगळं आहे, इथे बाहेरचं, आम्हाला हवं तसं आणि हव तेव्हढच पाहिलं, समजलं जातं. तेव्हा रॅशनली आम्ही काही घेऊ शकत नाही. काय समजलेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

छोटा डॉन
गुरुवार, 05/24/2012 - 11:11 नवीन
हेच म्हणतो. तुम्ही उगाच आकडेवारी फेकु नका आमच्या तोंडावर. आम्ही मग उगाच पाकिस्तान, बांग्लादेश अशा देशात किमती किती आहेत अशी शेंडाबुडखा नसलेली आकडेवारी तुमच्या तोंडावर फेकु, काय समजलात ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

+२

रमताराम
गुरुवार, 05/24/2012 - 14:50 नवीन
आकडेवारीचं काय हो, आपल्या हवी तशी जमा करता येते. यावरून हे आठवलं. Image removed. (संख्याशास्त्री) रमताराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

तरीच म्हटले

हुप्प्या
गुरुवार, 05/24/2012 - 03:29 नवीन
काँग्रेसचे समर्थक अजून कसे नाही आले. तुम्ही ९९ मधे १ डॉ ने पेट्रोल घेतलेत म्हणून तो अमेरिकेतील सरासरी दर होतो का? इथे हा आलेख पहा http://gasbuddy.com/gb_retail_price_chart.aspx २००४ सरासरी भाव २.११ डॉ/गॅलन २०१२ सरासरी भाव ३.६२ डॉ/गॅलन फरक किती? १.७१ पट. शिवाय, अमेरिकेत भाव खालीही येतात. भारतात जवळपास कायम चढता आलेख असतो. त्यामुळे नुकसान जास्त. हा भारतातील पेट्रोलच्या भावाचा आलेख http://www.mypetrolprice.com/petrol-price-chart.aspx १० वर्षात २.५ पट. पेट्रोलची भेसळ, कायम वाहतूक कोंडी, अत्यंत वाईट रस्ते, कमी पगार ह्या प्रकारामुळे भारतातील पेट्रोल आणि अमेरिकेतील पेट्रोल ह्यांची उपयुक्तता फार वेगळी आहे हा मुद्दा वेगळाच.
  • Log in or register to post comments

साहेब

Nile
गुरुवार, 05/24/2012 - 03:33 नवीन
शिवाय, अमेरिकेत भाव खालीही येतात. भारतात जवळपास कायम चढता आलेख असतो. त्यामुळे नुकसान जास्त.
साहेब, असं करा, तेव्हढी सबसीटी काढून टाका म्हणावं आणि जागतीक बाजारपेठेतल्या प्रमाणे ठरू दे दर पेट्रोलचा. म्हणजे भाव खाली येण्याचं सुख तुम्हालाही मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

?

विकास
Fri, 05/25/2012 - 00:33 नवीन
अमेरीकेत सबसिडी काढून निव्वळ जागतिक बाजारपेठेनुसार भाव वाढतो असे म्हणायचे आहे का? त्या केस मध्ये तुम्ही खालील आलेखाशी सहमत असाल असे समजतो. :-) Image removed. सरकारी संस्थळावरील माहितीनुसारः
Table ES6. Subsidies and support to fuels used outside of the electricity sector
  2000 Fuel Production Excluding that used for Electricity Generation
(quadrillion Btu) 2010 Fuel Production Excluding that used for Electricity Generation
(quadrillion Btu) FY 2010 Subsidy and Support
(million 2010 dollars) Share of 2010 Non-Electricity-Related Fuel Production (percent) Share of 2010 Fuel-Specific Non-Electricity-Related Subsidies (percent) Coal 2.52 2.94 169 8.3% 1.6% Natural Gas Petroleum Liquids 28.20 28.55 2,165 80.3% 20.7% Biofuels 2.55 3.87 7,646 10.9% 73.2% Geothermal 0.02 0.06 73 0.2% 0.7% Solar 0.06 0.10 169 0.3% 1.6% Other Renewables 0.04 0.02 226 0.0% 2.2%     Total 33.39 35.54 10,448 100.0% 100.0% त्या शिवाय योग्य रेग्यूलेशनविरहीत असलेले speculation market म्हणजेच जागतिक बाजारपेठ आणि मुक्तअर्थव्यवस्था का? हे म्हणत असताना, मी सबसिडींच्या बाजूने बोलत नसून लेवल फिल्ड न करता जेंव्हा एकतर्फी अपेक्षा केली जाते, त्या बद्दल आक्षेप घेत आहे. तेच मुक्त अर्थव्यवस्थेसंदर्भात. जागतिक बाजारपेठ ठीक आहे, पण मागणी-पुरवठा या (जागतिक बाजारपेठेतल्या) कारणाव्यतिरीक्त, स्पेक्यूलेशन आणि त्या अनुषंगाने तयार नाचवली जाणारी कल्पनेची भुते पण सधारण १५% भाववाढीस (2nd largest) कारणीभूत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

काँग्रेसचे समर्थक अजून कसे

राजेश घासकडवी
गुरुवार, 05/24/2012 - 06:27 नवीन
काँग्रेसचे समर्थक अजून कसे नाही आले.
मी कुठल्या पक्षाचा समर्थक वगैरे नाही. मी विदा न पहाता बरळणाऱ्यांचा विरोधक आहे.
तुम्ही ९९ मधे १ डॉ ने पेट्रोल घेतलेत म्हणून तो अमेरिकेतील सरासरी दर होतो का?
हो. त्यावेळी होता. खालच्या लिंकवरती अगदी १९१९ सालपासूनचे सरासरी भाव दिलेले आहेत. ९८-९९ च्या आसपास हेच भाव होते. http://www1.eere.energy.gov/vehiclesandfuels/facts/2005/fcvt_fotw364.html
फरक किती? १.७१ पट.
निदान तुम्ही आकडेवारीविषयी तरी बोलता आहात. हे चांगलं आहे. या आकड्यांमध्ये गंमत अशी असते की त्या वर्षाचे योग्य ते आकडे घेतले की १.७१ पट होऊ शकते किंवा २.२ पट होऊ शकते. मला त्या वादात पडायचं नाही. माझा मुद्दा असा आहे की जगभरच किमती वाढलेल्या आहेत गेल्या दहा ते पंधरा वर्षात. भारतातही ते होतं आहे. यात साधं डिमांड सप्लायचं गणित आहे. उगाच सरकारच्या नावाने (मग ते कुठच्याही पक्षाचं का असेना) बोंब कशाला मारायची?
शिवाय, अमेरिकेत भाव खालीही येतात. भारतात जवळपास कायम चढता आलेख असतो. त्यामुळे नुकसान जास्त.
हे बरोबर नाही. तुम्हीच दिलेल्या लिंकवरती गेल्या आठ वर्षांत अमेरिकेतले भाव बघा. २००८ साली अगदी ४.१२ पर्यंत पोचलं होतं, आणि दाणकन १.६१ पर्यंत आपटलं. पुन्हा आता ३.७५ च्या आसपास आहे. भारतात हे धक्के अत्यंत सौम्य करण्यात आले. तुम्हाला low pass filter ही संकल्पना माहीत आहे का? अमेरिकेतल्या खुल्या बाजारातल्या भसाभस बदलणाऱ्या किमतींना लो पास फिल्टर लावला तर भारतातल्या किमती मिळतील. सरासरी फायदा-तोटा शून्य. फक्त भाव हळूहळू बदलल्याने त्यांच्याशी ऍडजस्ट होणं त्यामानाने सोपं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

असहमत

हुप्प्या
गुरुवार, 05/24/2012 - 07:45 नवीन
>> हे बरोबर नाही. तुम्हीच दिलेल्या लिंकवरती गेल्या आठ वर्षांत अमेरिकेतले भाव बघा. २००८ साली अगदी ४.१२ पर्यंत पोचलं होतं, आणि दाणकन १.६१ पर्यंत आपटलं. पुन्हा आता ३.७५ च्या आसपास आहे. भारतात हे धक्के अत्यंत सौम्य करण्यात आले. तुम्हाला low pass filter ही संकल्पना माहीत आहे का? अमेरिकेतल्या खुल्या बाजारातल्या भसाभस बदलणाऱ्या किमतींना लो पास फिल्टर लावला तर भारतातल्या किमती मिळतील. सरासरी फायदा-तोटा शून्य. फक्त भाव हळूहळू बदलल्याने त्यांच्याशी ऍडजस्ट होणं त्यामानाने सोपं जातं. << लो पास फिल्टर बद्दल का बोलावे? माणूस हा काय कपॅसिटर आहे का की भावातील हाय फ्रिक्वेन्सीचे चढ उतार अनुभवल्यावर जळून जाईल? भाव झपाट्याने कमी झाल्याने गिर्‍हाईक दु:खी होईल हे शक्य नाही. वर चढल्यावर दु:खी होईल पण अनुभव असा आहे की असा झपाट्याने खाली वा वर गेलेला भाव फार टिकत नाही. भारतात मात्र अत्यंत क्वचित वर गेलेला भाव खाली येतो. पेट्रोल कमी जास्त झाले तरी साधारण प्रवास सामान्य माणूस तेवढाच ठेवतो. रोजचे ऑफिसला जाणे, मुलांना शाळा, क्लासेसला सोडणे, थोडीफार खरेदी, मित्रांकडे जाणे वगैरे. आता दोन वर्षाच्या काळात कायम चढता आलेख असेल तर होणारा खर्च आणि भाव वरखाली होत असताना होणारा खर्च सारखा असतो का? मला नाही वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

लो पास फिल्टर की पीक होल्ड?

विसुनाना
गुरुवार, 05/24/2012 - 11:18 नवीन
लो पास फिल्टर की पीक होल्ड? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हा हा...

दादा कोंडके
गुरुवार, 05/24/2012 - 23:19 नवीन
पण त्या आधिही एक "ऑर" गेट आहे. आंतरराष्ट्रीय भाववाढ, रुपयाचं अवमुल्यन, अचानकच दिसणारी पेट्रोलियम कंपन्यांची तूट वगैरे इनपूट आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

मांडा थोडं तपशिलात

श्रावण मोडक
गुरुवार, 05/24/2012 - 16:39 नवीन
यात साधं डिमांड सप्लायचं गणित आहे.
पेट्रोलच्या सध्याच्या भाववाढीच्या संदर्भात हे थोडं तपशिलात मांडा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

जगभर पेट्रोलची मागणी वाढत

राजेश घासकडवी
गुरुवार, 05/24/2012 - 18:35 नवीन
जगभर पेट्रोलची मागणी वाढत चालली आहे हे सत्य आहे. जगभरची पेट्रोलची उत्पादनं मंदावली आहेत हेही सत्य आहे. (पीक ऑईल या विषयावरचा विकीपीडियावरचा लेख वाचावा). असं झालं की किमती वाढतात हेही सत्य आहे. आजच का किमती वाढल्या हे सांगता येत नाही. पण कधीतरी वाढायच्याच होत्या, इतकंच. यापेक्षा अधिक खोलात जायला सध्या फार वेळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

कहाँ राजा भोज...

अर्धवटराव
गुरुवार, 05/24/2012 - 04:47 नवीन
कहाँ गंगु तेली... उठसूट अमेरीकेशी तुलना करायचा मोह का होतो पब्लीकला कुणास ठाऊक... म्हणजे कसं कि तिकडे पहा किमती कशा कंट्रोलमध्ये असतात, नाहितर आपल्याकडे.. वगैरे वगैरे. आज बोटावर मोजण्याइतके देश सोडले तर जगातल्या उर्वरीत सर्व देशांपेक्षा भारतातले मध्यमवर्गी जीवनमान म्हणजे नंदनवन म्हणावे इतके चांगले आहे. सरकारने पब्लीक ट्रान्सपोट सिस्टीम व्यवस्थीत डेव्हलप केली नाहि हा दोष आहे... मान्य... पण पेट्रोल सारख्या गोष्टी विडी ओढावी इतक्या सहजपणे फुकणार्‍या पब्लीकला काय म्हणावे?? साधे पाण्याचे साठे व्यवस्थीत सांभाळता न येणार्‍या आपल्या मध्यमवर्गी सभ्य समाजाला पेट्रोल-वीज वगैरे वापरायची शिस्त पार्श्वभागावर लाथ मारुन शिकवायला पाहिजे होती... पण इथे जनताच राजा आणि जनताच प्रजा !!! अर्धवटराव
  • Log in or register to post comments

उठसूट अमेरीकेशी तुलना करायचा

राजेश घासकडवी
गुरुवार, 05/24/2012 - 06:34 नवीन
उठसूट अमेरीकेशी तुलना करायचा मोह का होतो पब्लीकला कुणास ठाऊक... म्हणजे कसं कि तिकडे पहा किमती कशा कंट्रोलमध्ये असतात, नाहितर आपल्याकडे.. वगैरे वगैरे.
कृपा करून मी दिलेल्या दुव्यांवरचा विदा पहा. भारतात किमती उत्तम कंट्रोलमध्ये आहेत - अत्यंत हळुवारपणे, सावकाश भाववाढ झालेली आहे. याउलट त्याच काळात अमेरिकेतल्या किमती वेड्यासारख्या वरखाली झालेल्या दिसतात. तेव्हा माझा मुद्दा खरा तर उलट होता. अमेरिकन ग्राहकाची किती वाईट परिस्थिती आहे, भारतात ती तितकी नाही असं काहीसं सांगायचं होतं. खरं तर व्यापक मुद्दा असा होता की जगभरच किमती वाढल्या आहेत, आपल्याकडे निदान त्या नियंत्रित पद्धतीने वाढलेल्या आहेत. अमेरिकेचं उदाहरण केवळ माझ्या गेल्या काही वर्षांतल्या माहितीचं उदाहरण म्हणून वापरलं. तुम्ही इतर देशांमधल्या पेट्रोलच्या किमती तपासून बघू शकता. भारतापेक्षा काही फार वेगळं चित्र दिसणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अच्छा!

दादा कोंडके
गुरुवार, 05/24/2012 - 10:31 नवीन
अमेरिकन ग्राहकाची किती वाईट परिस्थिती आहे, भारतात ती तितकी नाही असं काहीसं सांगायचं होतं. खरं तर व्यापक मुद्दा असा होता की जगभरच किमती वाढल्या आहेत, आपल्याकडे निदान त्या नियंत्रित पद्धतीने वाढलेल्या आहेत.
मज्जाच आहे. इतर कुठल्याही गोष्टीची (रस्ते, वाहतूक व्यवस्था, भाववाढ नियंत्रण) जेंव्हा तुलना केली जाते, तेंव्हा भारताची समस्या, परिस्तिथी वेगळ्या आहेत वगैरे असं म्हटलं जातं. आणि या बाबतीत सोइस्कररित्या जगभरातला विदा तोंडावर फेकून आहे हेच किती चांगलं म्हणायच काय? पेट्रोल वाढल्यामुळे बाकीचं अगदी अनधान्यासकट जी भाववाढ होते त्याचं नियंत्रण करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे काय? तुम्ही म्हणता तसं खरच असलं तर अमेरिकेतून लोकं भारतात रहायला आले नसते का? (मागच्या महिन्यात पुण्यात काकडीचे भाव ८०रु किलो बघितलेला) दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ठाण्यात सगळ्यात महाग पेट्रोल

मदनबाण
गुरुवार, 05/24/2012 - 06:37 नवीन
ठाण्यात सगळ्यात महाग पेट्रोल मिळते ! ( ८१.३५)ही बातमी कळल्यावर माझ्या दुचाकीचा लगेच टॅक फुल केला. ! :( सामान्य नागरीकांना अजुन नागवण्याचा सरकारच्या या निर्णयाचा मी निषेध करतो... तुझा पगार किती आणि तू पेट्रोल भरतोस किती ? अशी नवी म्हण आता वापरली गेली पाहिजे ! धड रस्ते नसलेल्या देशात आता पेट्रोल विकत घेण्याचे वांदे ! जीडीपी ग्रोथ रेट उत्तम आहे आणि त्याची फळे नागरिक चाखत आहेत...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा