Skip to main content

हे धदंड तत्तड...पेट्रोल अजून महाग झाले

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 23/05/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! पेट्रोल साडेसात रुपयांनी महाग झाले धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13411047.cms सरकारला शिव्या घालून, संताप करुन काही उपयोग नाही :) त्यापेक्षा नाचलेले काय वाईट ! :) धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! नाचा रे नाचा !!! आज सोनियाचा दिन आला... धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

वाचने 22819
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

In reply to by मोहनराव

डॉलर ६० च्या वर गेला की पेट्रोल १००. धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

In reply to by जेनी...

हा ताशा चा आवाज आहे धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

आम्ही गोव्यात रहातो म्हणजे लुस्कानीत गेलो की! गेल्या महिन्यात १५ रुपये कमी झाले होते! असो. तुमच्या आनंदात सहभागी आहोत. भारतीय नागरिकानी वाहने वापरू नयेत आणि चालून हेल्दी रहावं म्हणून भारत सरकारने उचललेलं पाऊल आहे ते! सरकारचे अभिनंदन! http://www.kshitij.com/research/petrol.shtml ही लिंक बघा. म्हणजे पाकिस्तानपेक्षा आपण किती सुदैवी आहोत हे कळेल!! :D

In reply to by पैसा

भारतीय नागरिकानी वाहने वापरू नयेत आणि चालून हेल्दी रहावं म्हणून भारत सरकारने उचललेलं पाऊल आहे ते! सरकारचे अभिनंदन! सहमत आहे :)

सरकार तरी काय करणार? निर्यात कमी आयात भरम साठ. त्या मुळे तुट वाढत आहे. रुपया घसरला. अताच अर्नब गोस्वामी म्हणत होते पुढच्या २ आठवड्यात..डिझेल व ग्यास पण कडाडणार... भारतात निर्यात करण्या सारखे काय आहे? चिन ने सारे मार्केट आपल्या हातात ठेवले आहे. मुलभुत प्रषणाच्या मुळाशी गेलात तर डोके चक्रावते.

In reply to by अविनाशकुलकर्णी

भारतात बुद्धिमत्ता खच्चून भरली आहे. म्हणूनच तर एवढ्या परदेशी कंपन्या आहेत इकडे. आता एकच पर्याय आहे. भारतातून माणसांनी भरलेल्या बोटी सर्व दिशांना पाठ्वा.

सरकारचे अभिनंदन. लवकरात लवकर सर्व इंधनांवरच्या सबसिडी काढून मूळ बाजार भावात इंधने उपलब्ध व्हावीत. नाहीतरी लोकाना फुकटच्या सबसिड्या लाटायची सवयच आहे आपल्याकडे.

खरेतर प्रगत देशात अत्यंत महाग मानली जाणारी एक वस्तू* सरकारने आधीच अत्यंत स्वस्त उपलब्ध करुन दिली आहे. मग पेट्रोल सारख्या फडतूस गोष्टी महाग झाल्या तर काय झालं? . . . . * मानवी जीवन ही ती वस्तू

भारतात असलेल्या मिपाकरांचे अभिनंदन!! तुम्ही लवकरच स्वतःची गाडी वापरणे बंद करुन सार्वजनिक वाहतूकीचा आनंद घेणार आहात...

लिफ्ट पंचायत , कार पुलिंग , सायकिल रिक्षा हे पर्याय योग्य ठरावेत का अशा परिस्थितीत ?

नाना हल्कत अहे. बाकी आता आठ वाजता गाडी काढून बागडायला बाहेर पडलो तेव्हा पेट्रोल पंपावरची प्रचंड म्हणजे प्रचंड अगदी तुफान गर्दी पाहून ह. ह. पु. वा. पार बाहेर रस्त्यावर लागलेल्या रांगा नि पेट्रोल पंपावर सभा असल्यासारखी एकमेकाच्या उरावर बसलेले लोक. येड्यांचा बाजार सगळा. चारचाकी गाडीवाल्यांचे समजू शकतो पण दुचाकीची आठ लिटरची शिंची ती टाकी, फुल्ल केली तरी वट्ट पन्नास रुपये वाचतात. ते एखाद्या चैनीच्या क्षणी कुठे खर्च करतो पत्ताही लागत नाही. मग हा आचरटपणा कशाला. वर एवढ्या लोकांना पुरेल एवढे इंधन एकावेळी पंपावर नसणारच, मग ते संपले की हेच 'जागरूक' वैग्रे लोक च्यानेलना नि पेप्रांना पंपवाले कशी कृत्रिम टंचाई निर्माण केली वैग्रे मुलाखती देणार (मला 'अ वेन्स्डे' चित्रपटातला इलेक्ट्रिक बाबा आठवतो अशा वेळी) . सगळा मूर्खपणाचा कारभार. (गरीबांना पन्नास रूपये पण खूप होतात वगैरे तर्क आगाऊच फाट्यावर मारण्यात आला आहे. ज्यांच्या दृष्टीने पन्नास रूपये 'इतके' महत्त्वाचे असतात त्यांच्याकडे दुचाकी गाड्या असतात यावर माझा विश्वास नाही.)

In reply to by रमताराम

आमच्या ६ डिस्ट्रिब्यूटर्स कडे मिळून जवळपास १२०-१२५ सेल्समन काम करतात. ६०००-८००० प्रति महिना पगारावर घर चालवणार्या या लोकांपैकी बहुतेकांना स्वत्।ची दुचाकी वापरावी लागते. इतक्या पगारावर काम करणारी असंख्य जनता आहे जी एखाद्या चैनीच्या क्षणी ५० रुपये सहज खर्च करू शकत नाही. उगाच जनरलाईज (सरसकटीकरण?) करू नये. असो.

In reply to by श्रीरंग

बरं. पण मला एक सांगा, चार वाजता दरवाढ जाहीर झाल्यावर दोन्-तीन तासात एकरकमी १०% पगार खर्चून ते पेट्रोलची टाकी फुल करून घेऊ शकतील?

In reply to by रमताराम

टाकी फुल करून घेण्यासाठी गर्दी करणं मूर्खपणाचंच आहे यात शंका नाही. फक्त "५० रु. म्हणजे फार नाहीत. एवढी रक्कम कोणीही एरवीच सहज खर्च करत असावेत." हे तुमचं मत पटलं नाही.

In reply to by श्रीरंग

सिगारेटचे पाकीट ५०-६० रुपयांस मिळते. साधा चहा ५ रुपयाखाली गावांतही मिळत नाही. हॉटेलात नाश्ता केला तरी ५० रुपये सहज जातात :( ता.क. स्वतःची दुचाकी वापरायची जबरदस्ती करण्यात आलेली आहे काय?

In reply to by आनंदी गोपाळ

जबरदस्तीमुळे नव्हे, तर अपरिहार्यतेमुळे वापरावी लागते स्वत्।ची दुचाकी. बाकी मी ज्या स्तरातील लोकांबद्दल बोलत होतो ते ५०-६० रुपयांच्या सिगारेट नाही ओढू शकत दिवसभरात.

पेट्रोल महाग होत असले तरी मोठमोठ्या गाड्या खपतच आहेत. महिंद्र XUV(१५-१६ लाख) ला भारतात बराच डिमांड असल्याचे वाचले. होंडा BRIO ला पण बरीच मागणी आहे.

In reply to by चिरोटा

आपण वर उल्लेखीलेल्या मोठमोठ्या गाड्या (होंडा BRIO नव्हे) या सर्व डिजेलवर चालतात. आणि गेले कित्येक वर्षे डिजेलची भाववाढ होत नाही. त्यामुळे अश्या गाड्यांना जास्त मागणी असते असे म्हणल्यास वावगे ठरू नये. (आत्ताच्या घटकेला डिजेलची किंमत पेट्रोलच्या जवळपास निम्मी आहे.) डिजेलची भाववाढ का होत नाही त्याच्या कारणांविषयी वेगळी चर्चा करण्यास हरकत नाही.

धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! यु.पि.ए. सरकारला काल तीन वर्षे पुर्ण झाली. त्याचे बक्षीस मिळाले. धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! यु.पि.ए. सरकारला काल तीन वर्षे पुर्ण झाली. त्याचे बक्षीस मिळाले. धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !! धंदड तत्तड !!

In reply to by चिंतामणी

तीन वर्षापुर्वी सरदरजीचा शपथविधी असताना पेट्रोल ४० रु लिटर होतं. आता तीन वर्षात दुप्पट भाव झाला आहे. बट वी डीझर्व इट! :)

अहो, एवढं नाचायला काय झालंय? किमती जगभरच वाढलेल्या आहेत. भारतात गेल्या दहा वर्षांत पेट्रोलच्या किमती अडीच पट झाल्या. म्हणजे इन्फ्लेशन रेट ९.६%. अमेरिकेत गेल्या आठ वर्षांत पेट्रोलच्या किमती दुप्पट झाल्या. इन्फ्लेशन रेट - ९.३%. २००८ मध्ये पडलेल्या किमती आता चार वर्षांत सव्वादोन पट झाल्या. इन्फ्लेशन रेट - २२.०% मी स्वतः ९९ साली १ डॉलरला गॅलन भरलेलं आहे. आता मुकाट्याने ४ डॉलर काढून देतो. १३ वर्षांत चौपट म्हणजे इन्फ्लेशन रेट ११.३%. उगाच सरकार अमुक करतं सरकार तमुक करतं वगैरे म्हणून का नाचावं? हे जगच विचित्र आहे, मागणी वाढली की किंमत येड्यासारखं वाढवतं, तरीही आम्हाला मागणी वाढवत गाड्या चालवायच्याच आहेत म्हणून नाचा हवं तर.

In reply to by राजेश घासकडवी

जगात काय चालतं ते आम्हाला सांगू नका. आमचं जग वेगळं आहे, इथे बाहेरचं, आम्हाला हवं तसं आणि हव तेव्हढच पाहिलं, समजलं जातं. तेव्हा रॅशनली आम्ही काही घेऊ शकत नाही. काय समजलेत?

In reply to by प्रदीप

हेच म्हणतो. तुम्ही उगाच आकडेवारी फेकु नका आमच्या तोंडावर. आम्ही मग उगाच पाकिस्तान, बांग्लादेश अशा देशात किमती किती आहेत अशी शेंडाबुडखा नसलेली आकडेवारी तुमच्या तोंडावर फेकु, काय समजलात ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

आकडेवारीचं काय हो, आपल्या हवी तशी जमा करता येते. यावरून हे आठवलं. (संख्याशास्त्री) रमताराम

काँग्रेसचे समर्थक अजून कसे नाही आले. तुम्ही ९९ मधे १ डॉ ने पेट्रोल घेतलेत म्हणून तो अमेरिकेतील सरासरी दर होतो का? इथे हा आलेख पहा http://gasbuddy.com/gb_retail_price_chart.aspx २००४ सरासरी भाव २.११ डॉ/गॅलन २०१२ सरासरी भाव ३.६२ डॉ/गॅलन फरक किती? १.७१ पट. शिवाय, अमेरिकेत भाव खालीही येतात. भारतात जवळपास कायम चढता आलेख असतो. त्यामुळे नुकसान जास्त. हा भारतातील पेट्रोलच्या भावाचा आलेख http://www.mypetrolprice.com/petrol-price-chart.aspx १० वर्षात २.५ पट. पेट्रोलची भेसळ, कायम वाहतूक कोंडी, अत्यंत वाईट रस्ते, कमी पगार ह्या प्रकारामुळे भारतातील पेट्रोल आणि अमेरिकेतील पेट्रोल ह्यांची उपयुक्तता फार वेगळी आहे हा मुद्दा वेगळाच.

In reply to by हुप्प्या

शिवाय, अमेरिकेत भाव खालीही येतात. भारतात जवळपास कायम चढता आलेख असतो. त्यामुळे नुकसान जास्त.
साहेब, असं करा, तेव्हढी सबसीटी काढून टाका म्हणावं आणि जागतीक बाजारपेठेतल्या प्रमाणे ठरू दे दर पेट्रोलचा. म्हणजे भाव खाली येण्याचं सुख तुम्हालाही मिळेल.

In reply to by Nile

अमेरीकेत सबसिडी काढून निव्वळ जागतिक बाजारपेठेनुसार भाव वाढतो असे म्हणायचे आहे का? त्या केस मध्ये तुम्ही खालील आलेखाशी सहमत असाल असे समजतो. :-) सरकारी संस्थळावरील माहितीनुसारः
Table ES6. Subsidies and support to fuels used outside of the electricity sector
  2000 Fuel Production Excluding that used for Electricity Generation
(quadrillion Btu)
2010 Fuel Production Excluding that used for Electricity Generation
(quadrillion Btu)
FY 2010 Subsidy and Support
(million 2010 dollars)
Share of 2010 Non-Electricity-Related Fuel Production (percent) Share of 2010 Fuel-Specific Non-Electricity-Related Subsidies (percent)
Coal 2.52 2.94 169 8.3% 1.6%
Natural Gas Petroleum Liquids 28.20 28.55 2,165 80.3% 20.7%
Biofuels 2.55 3.87 7,646 10.9% 73.2%
Geothermal 0.02 0.06 73 0.2% 0.7%
Solar 0.06 0.10 169 0.3% 1.6%
Other Renewables 0.04 0.02 226 0.0% 2.2%
    Total 33.39 35.54 10,448 100.0% 100.0%
त्या शिवाय योग्य रेग्यूलेशनविरहीत असलेले speculation market म्हणजेच जागतिक बाजारपेठ आणि मुक्तअर्थव्यवस्था का? हे म्हणत असताना, मी सबसिडींच्या बाजूने बोलत नसून लेवल फिल्ड न करता जेंव्हा एकतर्फी अपेक्षा केली जाते, त्या बद्दल आक्षेप घेत आहे. तेच मुक्त अर्थव्यवस्थेसंदर्भात. जागतिक बाजारपेठ ठीक आहे, पण मागणी-पुरवठा या (जागतिक बाजारपेठेतल्या) कारणाव्यतिरीक्त, स्पेक्यूलेशन आणि त्या अनुषंगाने तयार नाचवली जाणारी कल्पनेची भुते पण सधारण १५% भाववाढीस (2nd largest) कारणीभूत असतात.

In reply to by हुप्प्या

काँग्रेसचे समर्थक अजून कसे नाही आले.
मी कुठल्या पक्षाचा समर्थक वगैरे नाही. मी विदा न पहाता बरळणाऱ्यांचा विरोधक आहे.
तुम्ही ९९ मधे १ डॉ ने पेट्रोल घेतलेत म्हणून तो अमेरिकेतील सरासरी दर होतो का?
हो. त्यावेळी होता. खालच्या लिंकवरती अगदी १९१९ सालपासूनचे सरासरी भाव दिलेले आहेत. ९८-९९ च्या आसपास हेच भाव होते. http://www1.eere.energy.gov/vehiclesandfuels/facts/2005/fcvt_fotw364.ht…
फरक किती? १.७१ पट.
निदान तुम्ही आकडेवारीविषयी तरी बोलता आहात. हे चांगलं आहे. या आकड्यांमध्ये गंमत अशी असते की त्या वर्षाचे योग्य ते आकडे घेतले की १.७१ पट होऊ शकते किंवा २.२ पट होऊ शकते. मला त्या वादात पडायचं नाही. माझा मुद्दा असा आहे की जगभरच किमती वाढलेल्या आहेत गेल्या दहा ते पंधरा वर्षात. भारतातही ते होतं आहे. यात साधं डिमांड सप्लायचं गणित आहे. उगाच सरकारच्या नावाने (मग ते कुठच्याही पक्षाचं का असेना) बोंब कशाला मारायची?
शिवाय, अमेरिकेत भाव खालीही येतात. भारतात जवळपास कायम चढता आलेख असतो. त्यामुळे नुकसान जास्त.
हे बरोबर नाही. तुम्हीच दिलेल्या लिंकवरती गेल्या आठ वर्षांत अमेरिकेतले भाव बघा. २००८ साली अगदी ४.१२ पर्यंत पोचलं होतं, आणि दाणकन १.६१ पर्यंत आपटलं. पुन्हा आता ३.७५ च्या आसपास आहे. भारतात हे धक्के अत्यंत सौम्य करण्यात आले. तुम्हाला low pass filter ही संकल्पना माहीत आहे का? अमेरिकेतल्या खुल्या बाजारातल्या भसाभस बदलणाऱ्या किमतींना लो पास फिल्टर लावला तर भारतातल्या किमती मिळतील. सरासरी फायदा-तोटा शून्य. फक्त भाव हळूहळू बदलल्याने त्यांच्याशी ऍडजस्ट होणं त्यामानाने सोपं जातं.

In reply to by राजेश घासकडवी

>> हे बरोबर नाही. तुम्हीच दिलेल्या लिंकवरती गेल्या आठ वर्षांत अमेरिकेतले भाव बघा. २००८ साली अगदी ४.१२ पर्यंत पोचलं होतं, आणि दाणकन १.६१ पर्यंत आपटलं. पुन्हा आता ३.७५ च्या आसपास आहे. भारतात हे धक्के अत्यंत सौम्य करण्यात आले. तुम्हाला low pass filter ही संकल्पना माहीत आहे का? अमेरिकेतल्या खुल्या बाजारातल्या भसाभस बदलणाऱ्या किमतींना लो पास फिल्टर लावला तर भारतातल्या किमती मिळतील. सरासरी फायदा-तोटा शून्य. फक्त भाव हळूहळू बदलल्याने त्यांच्याशी ऍडजस्ट होणं त्यामानाने सोपं जातं. लो पास फिल्टर बद्दल का बोलावे? माणूस हा काय कपॅसिटर आहे का की भावातील हाय फ्रिक्वेन्सीचे चढ उतार अनुभवल्यावर जळून जाईल? भाव झपाट्याने कमी झाल्याने गिर्‍हाईक दु:खी होईल हे शक्य नाही. वर चढल्यावर दु:खी होईल पण अनुभव असा आहे की असा झपाट्याने खाली वा वर गेलेला भाव फार टिकत नाही. भारतात मात्र अत्यंत क्वचित वर गेलेला भाव खाली येतो. पेट्रोल कमी जास्त झाले तरी साधारण प्रवास सामान्य माणूस तेवढाच ठेवतो. रोजचे ऑफिसला जाणे, मुलांना शाळा, क्लासेसला सोडणे, थोडीफार खरेदी, मित्रांकडे जाणे वगैरे. आता दोन वर्षाच्या काळात कायम चढता आलेख असेल तर होणारा खर्च आणि भाव वरखाली होत असताना होणारा खर्च सारखा असतो का? मला नाही वाटत.

In reply to by विसुनाना

पण त्या आधिही एक "ऑर" गेट आहे. आंतरराष्ट्रीय भाववाढ, रुपयाचं अवमुल्यन, अचानकच दिसणारी पेट्रोलियम कंपन्यांची तूट वगैरे इनपूट आहेत. :)

In reply to by राजेश घासकडवी

यात साधं डिमांड सप्लायचं गणित आहे.
पेट्रोलच्या सध्याच्या भाववाढीच्या संदर्भात हे थोडं तपशिलात मांडा...

In reply to by श्रावण मोडक

जगभर पेट्रोलची मागणी वाढत चालली आहे हे सत्य आहे. जगभरची पेट्रोलची उत्पादनं मंदावली आहेत हेही सत्य आहे. (पीक ऑईल या विषयावरचा विकीपीडियावरचा लेख वाचावा). असं झालं की किमती वाढतात हेही सत्य आहे. आजच का किमती वाढल्या हे सांगता येत नाही. पण कधीतरी वाढायच्याच होत्या, इतकंच. यापेक्षा अधिक खोलात जायला सध्या फार वेळ नाही.

कहाँ गंगु तेली... उठसूट अमेरीकेशी तुलना करायचा मोह का होतो पब्लीकला कुणास ठाऊक... म्हणजे कसं कि तिकडे पहा किमती कशा कंट्रोलमध्ये असतात, नाहितर आपल्याकडे.. वगैरे वगैरे. आज बोटावर मोजण्याइतके देश सोडले तर जगातल्या उर्वरीत सर्व देशांपेक्षा भारतातले मध्यमवर्गी जीवनमान म्हणजे नंदनवन म्हणावे इतके चांगले आहे. सरकारने पब्लीक ट्रान्सपोट सिस्टीम व्यवस्थीत डेव्हलप केली नाहि हा दोष आहे... मान्य... पण पेट्रोल सारख्या गोष्टी विडी ओढावी इतक्या सहजपणे फुकणार्‍या पब्लीकला काय म्हणावे?? साधे पाण्याचे साठे व्यवस्थीत सांभाळता न येणार्‍या आपल्या मध्यमवर्गी सभ्य समाजाला पेट्रोल-वीज वगैरे वापरायची शिस्त पार्श्वभागावर लाथ मारुन शिकवायला पाहिजे होती... पण इथे जनताच राजा आणि जनताच प्रजा !!! अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

उठसूट अमेरीकेशी तुलना करायचा मोह का होतो पब्लीकला कुणास ठाऊक... म्हणजे कसं कि तिकडे पहा किमती कशा कंट्रोलमध्ये असतात, नाहितर आपल्याकडे.. वगैरे वगैरे.
कृपा करून मी दिलेल्या दुव्यांवरचा विदा पहा. भारतात किमती उत्तम कंट्रोलमध्ये आहेत - अत्यंत हळुवारपणे, सावकाश भाववाढ झालेली आहे. याउलट त्याच काळात अमेरिकेतल्या किमती वेड्यासारख्या वरखाली झालेल्या दिसतात. तेव्हा माझा मुद्दा खरा तर उलट होता. अमेरिकन ग्राहकाची किती वाईट परिस्थिती आहे, भारतात ती तितकी नाही असं काहीसं सांगायचं होतं. खरं तर व्यापक मुद्दा असा होता की जगभरच किमती वाढल्या आहेत, आपल्याकडे निदान त्या नियंत्रित पद्धतीने वाढलेल्या आहेत. अमेरिकेचं उदाहरण केवळ माझ्या गेल्या काही वर्षांतल्या माहितीचं उदाहरण म्हणून वापरलं. तुम्ही इतर देशांमधल्या पेट्रोलच्या किमती तपासून बघू शकता. भारतापेक्षा काही फार वेगळं चित्र दिसणार नाही.

In reply to by राजेश घासकडवी

अमेरिकन ग्राहकाची किती वाईट परिस्थिती आहे, भारतात ती तितकी नाही असं काहीसं सांगायचं होतं. खरं तर व्यापक मुद्दा असा होता की जगभरच किमती वाढल्या आहेत, आपल्याकडे निदान त्या नियंत्रित पद्धतीने वाढलेल्या आहेत.
मज्जाच आहे. इतर कुठल्याही गोष्टीची (रस्ते, वाहतूक व्यवस्था, भाववाढ नियंत्रण) जेंव्हा तुलना केली जाते, तेंव्हा भारताची समस्या, परिस्तिथी वेगळ्या आहेत वगैरे असं म्हटलं जातं. आणि या बाबतीत सोइस्कररित्या जगभरातला विदा तोंडावर फेकून आहे हेच किती चांगलं म्हणायच काय? पेट्रोल वाढल्यामुळे बाकीचं अगदी अनधान्यासकट जी भाववाढ होते त्याचं नियंत्रण करणारी यंत्रणा आपल्याकडे आहे काय? तुम्ही म्हणता तसं खरच असलं तर अमेरिकेतून लोकं भारतात रहायला आले नसते का? (मागच्या महिन्यात पुण्यात काकडीचे भाव ८०रु किलो बघितलेला) दादा

ठाण्यात सगळ्यात महाग पेट्रोल मिळते ! ( ८१.३५)ही बातमी कळल्यावर माझ्या दुचाकीचा लगेच टॅक फुल केला. ! :( सामान्य नागरीकांना अजुन नागवण्याचा सरकारच्या या निर्णयाचा मी निषेध करतो... तुझा पगार किती आणि तू पेट्रोल भरतोस किती ? अशी नवी म्हण आता वापरली गेली पाहिजे ! धड रस्ते नसलेल्या देशात आता पेट्रोल विकत घेण्याचे वांदे ! जीडीपी ग्रोथ रेट उत्तम आहे आणि त्याची फळे नागरिक चाखत आहेत...

people get what they deserve! अामचे भाई पेट्रोल ची किंमत कमी व्हावी म्ह णून येवढे त्रास घेतहेत आणि इथे हे त्यावर पाण ओतायला एका पयावर!!! we r proud of you manohar bhai

पेट्रोलमध्ये झालेल्या दरवाढीबद्दल कोणाही पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही कारण कोणतेही सरकार असते तरी हाच निर्णय घ्यावा लागला असता.महागाई वाढण्यासाठी जागतिक कारणांबरोबरच सरकार राबवत असलेल्या पॉप्युलीस्ट धोरणांचाही (नरेगा,सबसिड्या इत्यादी) भाग आहे.यामुळे सरकारचा फिस्कल डेफिसिट वाढला आहे. २०११-१२ मध्ये फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या ५.९% होता. २००७ मध्ये हाच आकडा ३.५% च्या आसपास होता.यात राज्यांचा डेफिसिट पण add केला तर हा आकडा खूप मोठा होईल. डेफिसिट वाढला की सरकारला एक तर बाजारातून पैसे कर्जाऊ घावे लागतात किंवा नोटा छापून डेफिसिट भरून काढावा लागतो. सरकारने प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले तर व्याजाचे दर वाढतात आणि त्याचा महागाईवर परिणाम होतो तर नोटा छापल्या तर डायरेक्ट महागाई वाढेल. काही झाले तरी वाढणाऱ्या डेफिसिटमुळे महागाई वाढणार. महागाई आणि व्याजदर वाढले की रूपया घसरणार.रूपया घसरला की आयात केलेले तेल अजून महाग पडणार. तेव्हा तेलाचे दर वाढवले नाही (म्हणजेच सरकारने सबसिडी दिली) तर डेफिसिट आणखी वाढणार म्हणजे आणखी महागाई वाढणार. हे दुष्टचक्र चालूच राहिल. यात आणखी गुंतागुंत वाढवणारा मुद्दा म्हणजे युरोपातील संकट. यामुळे परदेशी गुंतवणुकदारांनी भारतातून पैसे काढून डॉलर या "सेफ करन्सी" मध्ये नेले आहेत/ अजूनही नेले जात आहेत. तेव्हा यातूनच डॉलरची मागणी वाढून डॉलर अजून जास्त महाग होत आहे. भारतातल्या कोणत्या पक्षाच्या सरकारने या पॉप्युलीस्ट धोरणांना तिलांजली द्यायचे धैर्य दाखविले असते? तेव्हा विरोधी पक्षांनी बाहेर राहून मजा बघावी आणि सत्ताधारी पक्षाने चटके भोगावेत हेच दृष्य इतर कोणताही पक्ष सत्तेत असता तरी बघायला मिळाले असते. याविषयी हा लेख वेळ मिळाल्यास वाचावा ही विनंती. माझ्यातला अर्थशास्त्राचा विद्यार्थी हेच म्हणत आहे. बाकी चालू द्या.

In reply to by क्लिंटन

क्लिंटनराव मला तुम्हासनी एक प्रश्न इचारायचा आहे, तो म्हणजे वर्षानु वर्ष या तेल कंपन्या ओरडत आहेत की त्यांना करोडोंचा तोटा होत आहे, तरी या कंपन्या अजुन चालतात कश्या ? प्रचंड तोटा सहन करत असुन सुद्धा त्यांच्या कर्मचार्‍यांना पगार,बोनस कसा काय देता येउ शकतो ? जाता जाता :--- इथेनॉल मिश्रीत पेट्रोल विक्रीस का येत नसावे बरं ?

In reply to by मदनबाण

या कंपन्यांमध्ये अजूनही बहुसंख्य शेअर सरकारकडेच आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांना झालेला तोटा भरून काढायला सरकारवर अवलंबून राहावे लागते.म्हणजे सरकारचा पैसा (सरकारचा कसला आपलाच करदात्यांचा पैसा) या कंपन्यांचा तोटा भरून काढायला जातो. आणि तो कोणावर खर्च होतो? ते सगळेच "जेन्युईन गरज असलेले" थोडीच असतात?आज गरज म्हणून दुचाकी वापरणारे आणि इमेज म्हणून दुचाकी उडविणारे असे दोन्ही त्यात येतात. किंवा हाताशी दुचाकी आहे म्हणून अगदी ५ मिनिटांच्या चालत जायच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीही दुचाकीवरून जाणारे लोक कमी का असतात?लोकांनीच अशा व्यर्थ उधळपट्टीला आळा घातला तर पेट्रोलची मागणी कमी होईल आणि असे झटके वरचेवर बसायचे नाहीत. दुसरे म्हणजे पेट्रोलच्या झालेल्या प्रत्येक दरवाढीनंतर डिझेलच्या गाड्या घ्यायचे प्रमाण वाढते. कारण डिझेलच्या किंमती अजूनही नियंत्रणातच आहेत आणि डिझेलवर सबसिडी जास्त आहे. तेव्हा पेट्रोल महाग झाले म्हणून लोक डिझेलच्या गाड्यांकडे वळतात आणि जास्त सबसिडी असलेले इंधन वापरतात. तेव्हा पेट्रोलचे दर वाढवून कमी झालेली सबसिडी अशा पध्दतीने परत वाढते!! खाजगी वाहतुकीसाठी असलेल्या डिझेलवर असलेली सबसिडी चालू आहे तोपर्यंत हा perverse incentive चालूच राहिल.

In reply to by क्लिंटन

लोकांनीच अशा व्यर्थ उधळपट्टीला आळा घातला तर पेट्रोलची मागणी कमी होईल आणि असे झटके वरचेवर बसायचे नाहीत. ह्म्म्म... तसेच सरकारने चांगले रस्ते बांधले तर, ट्रॅफिक जाम होउन जे लाखोंचे/ करोडोंचे इंधन वाया जाते त्यालाही आळा बसेल नाही ? ;) (भिकार रस्त्यांच्या ठाण्यात राहणारा)

In reply to by क्लिंटन

>> किंवा हाताशी दुचाकी आहे म्हणून अगदी ५ मिनिटांच्या चालत जायच्या अंतरावर असलेल्या ठिकाणीही दुचाकीवरून जाणारे लोक कमी का असतात?लोकांनीच अशा व्यर्थ उधळपट्टीला आळा घातला तर पेट्रोलची मागणी कमी होईल आणि असे झटके वरचेवर बसायचे नाहीत. ह्यावर काही विदा आहे का? खर्च होणार्‍या पेट्रोलमधील किती टक्के अशा (तुमच्या मते)व्यर्थ प्रवासात खर्च होतात? समजा ०.००१ टक्का असेल तर हा कमी केल्याने पेट्रोलचे भाव कमी होतील का? अब्जावधी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, असल्याच अगडबंब आकड्याचा काळा पैसा हे सगळेही कसे कुणीही सत्तेवर असले तरी चालूच राहिल, आघाडीचा काहीच दोष कसा नाही आणि त्याला सामान्य माणसाची सिनेमे बघण्याची, भेळ खाण्याची, सुट्टीत गावी जायची हौसच कशी कारणीभूत आहे ह्याविषयी जडजंबाल अर्थशास्त्रीय स्पष्टीकरण वाचायला आवडेल.

In reply to by हुप्प्या

ही हौस पुरी करायला जास्त पैसे लागतील म्हणून होते आहे काय?

In reply to by क्लिंटन

महागाई वाढण्यासाठी जागतिक कारणांबरोबरच सरकार राबवत असलेल्या पॉप्युलीस्ट धोरणांचाही (नरेगा,सबसिड्या इत्यादी) भाग आहे.
नक्की? नरेगा आणि सबसिड्या व तत्सम योजना यांचा परिणाम कसा ते लिही ही विनंती. आणि त्याच जोडीने अशा योजनांच्या स्वरूपात न येणाऱ्या निर्णयांचा (दर अर्थसंकल्पात उद्योगांची किती कर्जे माफ केली वगैरे आकडे असतात ते) यासंदर्भात विचार कसा करायचा हेही लिही. वाचायचे आहे.

In reply to by श्रावण मोडक

यापूर्वी डिसेंबर महिन्यात प्रदीप यांच्या भारताची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे का? या चर्चेत काही प्रतिसाद लिहिले होते त्यात या गोष्टींचा उल्लेख केला होता. त्या प्रतिसादांचे दुवे देतो: महागाई नरेगा क्लिंटन

In reply to by क्लिंटन

पेट्रोलमध्ये झालेल्या दरवाढीबद्दल कोणाही पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही कारण कोणतेही सरकार असते तरी हाच निर्णय घ्यावा लागला असता. अर्थ आहे कारण, तुमच्याच पुढील वाक्यांमध्ये आहे:
२०११-१२ मध्ये फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या ५.९% होता. २००७ मध्ये हाच आकडा ३.५% च्या आसपास होता.यात राज्यांचा डेफिसिट पण add केला तर हा आकडा खूप मोठा होईल.
हा २०१० चा रॉयटरचा आलेख पहा... त्यामुळे सगळेच दोषी आहेत असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. अर्थात तुम्ही नंतर, "भारतातल्या कोणत्या पक्षाच्या सरकारने या पॉप्युलीस्ट धोरणांना तिलांजली द्यायचे धैर्य दाखविले असते?..." असे म्हणलेले असल्याने आणि त्याच्याशी अंशतः सहमत असल्याने, केवळ १५%च गुण कापलेत. ;) अजून एक महत्वाचे कारण येथे चर्चिलेले दिसले नाही. (ही चर्चा मी आत्ताच वाचत आहे). ते म्हणजे इराणमधून असलेली आपली जवळपास वार्षिक ११% च्या तेल आयात. India to cut Iran oil imports by 11% amid US pressure वरील विषयासंदर्भात, तमाम (विशेष करून अमेरिकेत राहून माज करणार्‍या) अनिभांना ठोकायच्या संधीकडे या धाग्यात दुर्लक्ष केले गेले म्हणून मी निषेध करत आहे. ;) एनी वे, जोक्स अपार्ट, १५ मे च्या आसपास ही बातमी जाहीर झाली आणि तात्काळ भाववाढ झाली, यात डायरेक्ट कोरीलेशन असू शकते असे वाटत नाही का?

In reply to by विकास

ते म्हणजे इराणमधून असलेली आपली जवळपास वार्षिक ११% च्या तेल आयात. India to cut Iran oil imports by 11% amid US pressure
आताच दरवाढ केली त्यामागे हे कारण असू शकेलही. पण मला वाटते की झालेली दरवाढ ही गेल्या वर्षातील परिस्थितीमुळे झाली आहे आणि इराणमधून होत असलेल्या स्वस्त तेलाची आयात कमी झाल्यामुळे होणारे परिणाम यापुढील काळात जाणवतील. स्टॅन्डर्ड ऍन्ड पूअर्स चा तेलाची किंमत मोजणारा एक इंडेक्स असतो. गेल्या वर्षभरात तो इंडेक्स सुमारे ६% ने खाली आला आहे तर भारतीय रूपया त्याच काळात सुमारे २५% ने घसरला आहे. याचाच अर्थ तेल ६% ने स्वस्त झाले असले तरी रूपयातील घसरगुंडीमुळे आपल्या आयातीचे बिल वाढले आहे. तेव्हा आयात केलेल्या प्रत्येक पिंप तेलामागे आपल्याला तोटा होत होता आणि इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन कंपन्यांना मिळून २०११-१२ मध्ये एकूण १,३८,५४१ कोटी रूपयांचा तोटा झाला.तेव्हा दरवाढ करणे अपरिहार्य होते. आता ही दरवाढ आताच का केली असावी? इथे आपल्या लोकशाही पध्दतीच्या मर्यादा प्रकर्षाने जाणवतात.ही दरवाढ उत्तर प्रदेशातील निवडणुका पूर्ण होईपर्यंत करणे म्हणजे राजकीय आत्महत्या झाली असती.तसेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना जर दरवाढ केली असती तर संसदेत होणाऱ्या हाणामारीला तोंड द्यायची सरकारची तयारी नव्हती असे दिसते.आणखी उशीर केला तर गुजरातमधील निवडणुका अधिक जवळ आल्या असतील.तेव्हा काय करा? तर आता दरवाढ करा. जर काही चमत्कार होऊन रूपया पुढील ३-४ महिन्यात सावरला तर दरांमध्ये कपात करून गुजरात निवडणुकांना सामोरे जाता येईल असा एकंदरित हिशेब असावा असे वाटते. रूपयाची घसरगुंडी होण्यात युरोपमधील संकटाचा वाटा आहेच. पण त्याच बरोबर fiscal deficit नियंत्रणात ठेवण्यात सरकारला आलेले अपयश हा पण महत्वाचा मुद्दा विसरता येणार नाही. भारताच्या रूपयाइतकी घसरगुंडी इतर कोणत्याच चलनाची झालेली नाही. जर deficit आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले असते तर अर्थातच रूपया इतका गडगडला नसता. तेव्हा या बाबतीत सरकारचे अपयश आहेच. तेव्हा जर काही करायचेच असते तर ते यापूर्वी करायला हवे होते. सद्यपरिस्थितीत दरवाढीशिवाय पर्याय नव्हता.

In reply to by क्लिंटन

>>पण त्याच बरोबर fiscal deficit नियंत्रणात ठेवण्यात सरकारला आलेले अपयश हा पण महत्वाचा मुद्दा विसरता येणार नाही. भारताच्या रूपयाइतकी घसरगुंडी इतर कोणत्याच चलनाची झालेली नाही. जर deficit आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले असते तर अर्थातच रूपया इतका गडगडला नसता. तेव्हा या बाबतीत सरकारचे अपयश आहेच. तेव्हा जर काही करायचेच असते तर ते यापूर्वी करायला हवे होते. रुपयाची घसरण ही गेल्या काही दिवसात जास्त दिसत असली तरी सरासरीने रुपया दरसाल २.५%ने घसरत आहे. मधून मधून अशी अचानक घसरण दिसतच असते. या तक्त्यात २००२ च्या सुरुवातीस ४९ रु च्या आसपास गेलेला दर २००४ मध्ये उतरलेला दिसतो. २००८ मध्ये हाच दर ४०च्या खाली गेलेला दिसतो. तसेच २००९ च्या सुरुवातीला ५२ च्या वर गेलेला दर मार्च २०१२ मध्ये ४५ रुपयांपर्तंत उतरलेला दिसतो.

In reply to by नितिन थत्ते

चलनाचे अवमूल्यन का होते याविषयीचे तीन मुद्दे इथे लिहिले आहेत. बाकी तुम्ही दिलेले आकडे बरोबरच आहेत पण थोडेसे फसवेही आहेत. याचे कारण २००२ ते २००७ या काळात रूपया ४९ वरून ३९ वर चढला तर २००८-०९ मध्ये ४० वरून ५२ वर गेला, परत २००९-११ मध्ये ५२ वरून ४४ पर्यंत वर चढला आणि गेल्या वर्षात ४४ वरून ५६ वर आपटला. तेव्हा 'दरवर्षी २.५% depreciation' म्हणणे ही फसवी सरासरी झाली. १९९७ पासून रूपया आपटायचे प्रकार पाच वेळा झाले. १९९७ मध्ये पूर्व आशियाई देशांमधील संकटाच्या वेळी नोव्हेंबर १९९७ मध्ये, मे १९९८ च्या अणुचाचण्या आणि अमेरिकेचे भारतावर आलेले निर्बंध तसेच ऑगस्ट १९९८ मधील रशियन सरकारचा default आणि त्यानंतर सप्टेंबर १९९८ मध्ये LTCM हा हेज फंड कोसळल्यानंतर मे-जून ते सप्टेंबर १९९८ मध्ये, २००२ मध्ये जून-जुलै महिन्यात भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव असताना कधीही युध्द भडकेल अशी परिस्थिती होती तेव्हा, सप्टेंबर २००८ ते मार्च २००९ दरम्यान लेहमन ब्रदर्स बुडाल्यानंतरच्या काळात आणि गेल्या वर्षभरात. या सर्व वेळी भारतातून परकीय गुंतवणुकदारांनी पैसा मोठ्या प्रमाणावर काढून अमेरिकन सरकारच्या bonds मध्ये गुंतवला म्हणून dollar ची मागणी वाढली होती. परिणामी dollar च्या तुलनेत रूपया कोसळला. यावेळीही dollar भारताबाहेर जायचे महत्वाचे कारण म्हणजे युरोपातील संकट हे आहेच. अशा कोणत्याही संकटाच्या वेळी जागतिक गुंतवणुकदार इतर सगळी गुंतवणुक विकून जगातील सर्वात सुरक्षित अशा अमेरिकन सरकारच्या bonds मध्ये गुंतवणुक करतात. हे पूर्व आशियाई देशांमधील संकट, LTCM, लेहमन ब्रदर्स कोसळल्यानंतर आणि सध्या युरोपातील संकटाच्या वेळी दिसून आलेच आहे.पण यावेळी फरक काय आहे? भारताने २००८-०९ चे संकट पार पाडले कारण त्यावेळी fiscal deficit आणि महागाई दोन्ही नियंत्रणात होते. पण नंतरच्या काळात दोन्हींवरील नियंत्रण सुटले. तसेच सरकारच्या policy paralysis मुळे (आणि काही सरकारच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींमुळेही) कसे प्रश्न वाढले याचा आढावा इथे आणि इथे घेतला आहे. आज विविध राज्य वीज मंडळांची परिस्थिती खूपच नाजूक आहे. २००३ च्या Electricity reforms च्या वेळी या मंडळांना बेल- आऊट दिला होता आणि परत बेल-आऊट मिळणार नाही असे निक्षून सांगितले होते.पण वीजगळती रोखणे, वीजचोरीला आळा घालणे अशी पावले उचलणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल त्यामुळे राज्य सरकारांनी या बाबतीत विशेष पावले उचलली नाहीत. आज तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान वीज मंडळांचा २००३ पासूनचा एकूण cumulative loss १ लाख कोटी हा भयावह आकडा पार करून गेला आहे. आता वरचाच मुद्दा-- काहीच फुकट मिळत नाही तर प्रत्येक गोष्टीची कोणाला तरी किंमत मोजावीच लागते. आता या १ लाख कोटी रूपयांची किंमत कोण मोजत आहे हे समजणे फारसे कठिण नाही. पण यामुळे वीजेसारख्या मुलभूत क्षेत्रात भारतीय आणि परदेशी गुंतवणुकदारांचा विश्वास उडत चालला आहे. वीज हे क्षेत्र किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायलाच नको. यामुळे आजच्या घडीला परदेशी गुंतवणुकदार भारतात पूर्वीइतक्या सहजपणे पैसा गुंतवू शकत नाहीत. आता या परिस्थितीला सरकार (केंद्र आणि राज्य सरकारे सुध्दा) जबाबदार नाहीत हे म्हणणे खूपच धाडसाचे ठरेल. प्रश्न आहे की यासाठी काही कठोर पावले उचलायला लागतील (वीज चोरी पूर्णपणे थांबविणे, तेलाच्या किंमती वाढविणे यासारख्या) आणि अशी कठोर पावले उचलणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल. ते करायला आपल्या देशातले राजकीय पक्ष तयार आहेत का? मला इतर देशांविषयी माहिती नाही. पण तथाकथित BRICS देशांमधील केवळ भारताचे चलन इतके वेगाने आपटत चालले आहे. तेव्हा युरोपातल्या परिस्थितीबरोबरच अंतर्गत कारणे इतर देशांपेक्षा भारतात जास्त असावीत असा एक कयास.

डिझेल SUV न परवडणार्‍या आणि नाईलाजाने पेट्रोल Sedan घ्याव्या लागलेल्या गरीब लोकांचे कंबरडे मोडेल आता. कंपनीच्या किंवा सार्वजनिक बसने प्रवास करण्याचा तिटकारा असलेल्या आणि कुल्ल्याखाली ६०-७० हजार रुपयांची दुचाकी घेऊन फिरणार्‍या अतिसामान्य लोकांचे हाल तर कुत्रेही खाणार नाही. किती हा दैवदुर्विलास!

In reply to by नगरीनिरंजन

कंपनीच्या किंवा सार्वजनिक बसने प्रवास करण्याचा तिटकारा असलेल्या आणि कुल्ल्याखाली ६०-७० हजार रुपयांची दुचाकी घेऊन फिरणार्‍या अतिसामान्य लोकांचे हाल तर कुत्रेही खाणार नाही. सर्वच कंपनीच्या बसेस त्यांच्या कर्मचार्‍यांना फुकटात नेत नाहीत्,एक तर त्यांच्या पगारातुन पैसे कापले तरी जातात किंवा महिना ठराविक रक्कम भरुन प्रवास करावा लागतो, बर्‍याच वेळा ही रक्कम महिन्याला जे पेट्रोल लागते त्याच्या आस-पास असायची ( आता नसणार !) शिवाय सार्वजनिक बसचे तीन तेरा वाजलेले असतात ( ठाण्याची टीएमटी हे याचे उत्तम उदाहरण आहे.) रिक्षा परवडत नाही;तेव्हा सामान्य लोकांना कुल्ल्याखाली ६०-७० हजार रुपयांची दुचाकी घेऊन प्रवास करण्या शिवाय पर्याय उरत नाही !

In reply to by नगरीनिरंजन

आपल्याकडे डिझेल SUV आहे आणि ती आपल्याला परवडते हे ऐकुन आनंद झाला. बाकी कुल्ल्याखाली ६०-७० हजाराची दुचाकी घेउन जे हिंडतात त्यांच्यासारखे उन्हातानात गरज म्हणून हिंडतात. तुमच्यासारखे वातानुकुलीत ऑफीस ते वातानुकुलीत घर एव्हढाच प्रवास, तो सुद्धा वातानुकुलीत डिझेल SUV मधून, नसतो अश्या लोका़ंचा. गरज तुला चैन वाटत असेल तर वाटो.

In reply to by चिंतामणी

माझ्याकडे डिझेल SUV काय साधी सायकलही नाही. नुकताच घरी गेलो होतो तेव्हा दिसलं की कॉलनीत प्रत्येक घरासमोर चारचाकी उभी आहे. काही घरांसमोरची जुनी जाऊन नवी आली आहे. क्षणभर वाटलं घ्यावी आपणही पण विचार केला तेव्हा कळलं की खरंच काही गरज नाही. नुकताच मटा मध्ये रिक्षाच्या दरवाढीवर एक लेख वाचला. बस व्यवस्थेला नावं ठेवणार्‍यांनी हा लेख नक्की डोळ्याखालून घालावा. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापराच असा आग्रह नाही पण मग पेट्रोल वाढले तर किमान आरडा-ओरडा तरी नको. पेट्रोल हा हक्क नसून प्रिव्हिलेज आहे एवढेच मला म्हणायचे आहे.

In reply to by नगरीनिरंजन

नुकताच मटा मध्ये रिक्षाच्या दरवाढीवर एक लेख वाचला. बस व्यवस्थेला नावं ठेवणार्‍यांनी हा लेख नक्की डोळ्याखालून घालावा. मटा मधला हा लेख सुद्धा वाचावा... {टीएमटीचा 'दे धक्का{} http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12631719.cms रिक्षावाले एक नंबरचे माजुरडे असता (सगळेच नाही,पण बहुसंख्य) हल्लीच इलेक्ट्रॉनिक मिटर असलेल्या रिक्षातुन नेहमीच्याच मार्गावरुन प्रवास करुन घरी आलो, जवळपास ७ ते ८ रु चा फरक पडला,म्हणजे मिटर मधे झोल करुन हे ग्राहकांना कसे लुबाडतात ते कळाले.सिएनजी रिक्षा असली तरी बर्‍याच प्रवाशांकडुन पेट्रोलचे दर पत्रक आकारले जाते. त्यांची इच्छा असेल तरच तुमच्या इच्छित स्थळी ते जाण्यास तयार होतात.