Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Wed, 05/23/2012 - 09:07
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
लेख
प्रतिभा
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या दोन्ही भागाचे दुवे http://www.misalpav.com/node/21605 http://www.misalpav.com/node/21686 http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे. तिसर्‍या भागात नवव्या डावापासून सुरुवात करायची आहे. आनंद आणी बोरिस दोघांची गुणसंख्या समसमान आहे. उरलेल्या चार डावात दोघांकडे दोन दोन वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत. कालच्या डावात आनंदने बाजी मारुन आक्रमक झाल्याचे दाखवून दिले आहेच, बोरिस तर पहिल्यापासून शड्डू ठोकूनच खेळतोय त्यामुळे उरलेले चारही डाव रंगतदार होतील अशी आशा आहे. -चतुरंग
  • Log in or register to post comments
  • 22723 views

Book traversal links for सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ३

  • ‹ सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २
  • Up
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ४ ›

प्रतिक्रिया

Submitted by चतुरंग on Wed, 05/23/2012 - 20:37

In reply to दोघे रिझल्टसाठी कष्ट करताहेत by भडकमकर मास्तर

Permalink

प्रत्येकी पहिल्या ४० खेळ्या

प्रत्येकी २तासात व्हायला हव्यात. त्या झाल्या आहेत. मग एकेक तास वाढवून मिळतो. त्यात प्रत्येकी २० खेळ्या व्हायला हव्यात. त्याप्रमाणे दोघेही पुढल्या १ तासात शिरले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 05/23/2012 - 20:39

In reply to प्रत्येकी पहिल्या ४० खेळ्या by चतुरंग

Permalink

अरे बाप रे....

वेळेच्या बाबतीत खेळाचे नियम बदलायला पाहिजेत.:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 05/23/2012 - 20:41

In reply to अरे बाप रे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

घ्या तुम्ही

पुढाकार त्याबाबतीत! :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 05/23/2012 - 20:46

Permalink

पुन्हा एकदा

घोडा एफ ६ ला जाणार मग जी ४ प्यादे पुढे सरकणार मग मारामारी. बोरिसच्या पदरी काही पडेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 05/23/2012 - 21:18

Permalink

बोरीस आनंदचा बचाव भेदून

बोरीस आनंदचा बचाव भेदून काढतोय. डावाचा काय निकाल लागेल कोणास ठाऊक ?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 05/23/2012 - 21:29

Permalink

झाली, बरोबरी झाली!

कसला सॉलिड डिफेन्स केला आनंदने!! प्रत्येक बुद्धीबळपटूने हा डाव अभ्यासावा असाच आहे. बोरिसचे चिवटपणाने बचाव भेदण्याचे प्रयत्न करणे आणि आनंदने तितक्याच चिकाटीने अभेद्य बचाव करणे. एंडगेम थिअरीचे प्रात्यक्षिकच!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on गुरुवार, 05/24/2012 - 04:27

Permalink

बरोबरीच अपेक्षित होती

हत्ती, घोडा विरुद्ध वजीर ज्यावेळी पटावर राहिले त्यावेळीच बरोबरी दिसत होती. एकतर प्यादी फार नव्हती आणि आनंदचे सगळेच मोहरे इतके समन्वयात होते ( विशेषतः हत्ती, घोडा आणि राजा) की पांढर्‍याला कुठूनही शिरकाव करायला जागा नव्हती. तरी गेलफंडने शेवटी आणखी प्यादी बळी देऊन शिरकाव करायचा प्रयत्न केला पण आनंदने तो हाणून पाडला. शेवटाच्या Ng8 आणि Kh8 या खेळ्या तर मस्तच. चला आता पुढच्या डावात आनंदकडे पांढरे मोहरे. अ‍ॅडवांटेज आनंद :)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 05/24/2012 - 10:32

Permalink

काल गेम पाहत होतो.. आज हे

काल गेम पाहत होतो.. आज हे रश्रशीत समालोचन! सध्या एकुणच मजा चालु आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 16:37

Permalink

ओहो!

आज आनंदने ई४ ने सुररुवात केली! तिसर्‍याच खेळीला उंट बाहेर काढून आणि पुढच्याच खेळीला उंट आणि घोड्याची मारामारी करुन आनंदने इरादे दाखवून दिले की आज निकाल हवा आहे. बोरीसही तापलेला आहेच! आज जुगलबंदी जोरदार होणार बुवा! :)
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 16:43

Permalink

वा:

बोरिसचे ई-५ प्यादे खाण्याचे पहिले आव्हान आनंदने स्वीकारले आहे. यात आनंदचे मागचे राजाचे प्यादे धराशायी करुन राजा उघडा करण्याचा इरादा आहे बोरिसचा. आनंदने काय उपाय शोधून ठेवलाय त्यालाच ठाऊक.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 05/24/2012 - 16:49

Permalink

गेम वकडातिकडा आणि ब्वेगळा

गेम वकडातिकडा आणि ब्वेगळा सुरू झालाय... मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 16:53

Permalink

घोडा पुन्हा ई-५ मधे न नेता

घोडा पुन्हा ई-५ मधे न नेता मागे आणून अधिक धोक्यात का आणला आनंदने देव जाणे. बोरिसची प्यादी अधिक खोलवर घुसली आहेत. की त्यांना कोणत्याही पाठिंब्याविना पुढे यायला लालूच दाखवून आपल्या मोठ्या मोहर्‍यांची झटपट हालचाल करून त्यांना कोंडीत पकडायचे असा कावा असावा. वजीरावजीरी लवकर होणार अशी चिन्हे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/24/2012 - 16:52

Permalink

बोरीसची डी पट्टीतली प्यांदी

बोरीसची डी पट्टीतली प्यांदी लैच पुढं सरकली. आनंद, बंदोबस्त करावा लागतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 05/24/2012 - 16:56

Permalink

बोरीस जी २ आणि सी २ वगैरे

बोरीस जी २ आणि सी २ वगैरे प्यादे लक्ष ठेवून असेल काय? भयंकर पोझिशन आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/24/2012 - 16:57

Permalink

वजिरावजीरी शिवाय पर्याय

वजिरावजीरी शिवाय पर्याय नाही. आणि वजीरांशिवाय डाव पाहणे मला लै जड जाते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on गुरुवार, 05/24/2012 - 17:02

In reply to वजिरावजीरी शिवाय पर्याय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

राणी नसेल तर डावात काय मजाये ?

सहमत!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 17:13

In reply to राणी नसेल तर डावात काय मजाये ? by संजय क्षीरसागर

Permalink

चतुरंगाच्या खेळामधली राजा

चतुरंगाच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव सोडते राणी केविलवाणी! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 05/24/2012 - 17:17

In reply to चतुरंगाच्या खेळामधली राजा by चतुरंग

Permalink

अवांतर : य निमित्ताने या

अवांतर : य निमित्ताने या गाण्याचे रामदासांनी केलेले विडंबन आठवले....
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 17:00

Permalink

लहान मुले प्यादी घुसवत पुढे पुढे चाल

करुन खेळत जातात तसे वाटते आहे! घोड्याच्या उड्या मस्तच. आता वजिरावजिरी अटळ आहे. काय डाव सुरु आहे! दोघांचा किल्लेकोट नाही, आनंदने तर सरळ राजा मध्यात ठेवलाय, वजीर स्मोरासमोर. काळ्याचे प्याद्यांचे स्ट्रक्चर बोंबलले आहे. सी स्तंभात दुहेरी प्यादी आहेत. किल्लेकोट झालेला नाही. उलट पांढर्‍याचा उंट मुख्य कर्णात आहे. घोडा चांगल्या जागी विराजमान आहे. दुसर्‍या घोड्याच्या एका खेळीत दोन्ही हत्ती समन्वयात येतील अशी चिन्हे आहेत. आनंद निश्चितच काहीतरी सखोल योजना करुन आलेला आहे. क्या बात है!
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 17:09

In reply to लहान मुले प्यादी घुसवत पुढे पुढे चाल by चतुरंग

Permalink

आनंद

पांढर्‍या मोहर्‍या असल्याने वजीर लवकर गमावण्याचा धोका पत्करणार नाही नि राजा ई-१ मधे नेईल असा होरा असावा बोरिसचा. तसे झाले असते तर पुढे आलेली प्यादी नि वजीर याच्या सहाय्याने त्याने आनंदला जेरीला आणला असता (सी-२ प्यादे धोक्यात आणून डाव्या बाजूला कल्ला केला असता). वजीरावजीरी झाली की अ‍ॅडवांटेज आनंद! मधल्या प्याद्यांना - त्यातही एका पट्टीत डबल झालेले - वाचवणे अवघड होईल. उंट किंवा घोड्याचा पाठिंबा घेऊन वजीराला जगवण्याचा प्रयत्न करेल बोरिस, पण आनंद एक्स्चेंज फोर्स करेल असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 17:17

In reply to आनंद by रमताराम

Permalink

खल्लास

आपण वीस-पंचवीस मिनिटापूर्वीच बोल्लेलो आज वजीर लवकर खपणार. आनंद लै म्हजी लैच ड्याम्बिस मानूस हाय ह्ये पटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 05/24/2012 - 17:20

In reply to खल्लास by रमताराम

Permalink

आनंद लै म्हजी लैच ड्याम्बिस

आनंद लै म्हजी लैच ड्याम्बिस मानूस हाय ह्ये पटलं.
+१ या डावात केव्हाच खपलोय
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 05/24/2012 - 17:16

Permalink

मला तर आज काही झेपतच नाहि

मला तर आज काही झेपतच नाहि आहे! पहिल्यापासून प्रत्येक अंदाज चुकविल्यावर आता फक्त बघाय्चे ठरवले आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 17:29

Permalink

आता हत्ती ईए मधे आणून

राजा एफ १ असा नेणे हा आनंदचा उद्देश असावा. बोरिस राजाच्या बाजूची मोहरी एकेक करुन बाहेर काढायला लागला आहे. तो किल्लेकोट करेल की नाही सांगता येत नाही कदाचित राजाच्या बाजूला करेल. आनंदला मध्यात हत्ती आणायला जितके लांबवता येईल तितका बोरिसचा डाव सुरक्षित होत जाणार. दोन घोड्यांनी आनंद आज काहीतरी करामत दाखवेल! :) येस! मला अपेक्षित असलेली घोडा डी२ खेळला आनंद!!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 17:32

Permalink

ऐला वजिराच्या बाजूला

किल्लेकोट केला बोरिसने (अर्थात आजच्या परिस्थितीत ह्याला किल्लेकोट म्हणणे म्हणजे मल्लिका शेरावतने अंगभर कपडे घातले आहेत असे म्हणण्यासारखं आहे!) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 17:34

In reply to ऐला वजिराच्या बाजूला by चतुरंग

Permalink

खी खी खी:

ह्ये बाकी बरूबर बोल्ला तुमी. =))
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 17:32

Permalink

आईच्या गावात

लाँग कॅसल करून बोरिसने स्वतःचा राजा खंप्लिट नागवा केला. काय समजंना झालंय. कशापाय क्येल हे आसं. फकस्त हत्ती मधे आणला लवकर, पण त्यापाई राजा पारच नागवा झाला की.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 17:34

Permalink

दोघे ज्या वेगाने खेळताहेत

त्यात मला घरच्या तयारीचा भरपूर सहभाग वाटतो आहे. पुढच्या खेळीला आनंद आता राजा एफ १ मधे हलवणार का हे बोरिस हत्ती कुठे ठेवतो त्यावर ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 17:39

Permalink

एक लक्षात घेण्यासारखे आहे की आनंदने

त्याच्या सातही प्याद्यांची फळी कमितकमी उघडली आहे! काळ्याच्या डावात अनेक भगदाडे पाडून घोड्यांना कुठेही उड्या मारता येतील याची व्यवस्था करुन ठेवली आहे. पण त्याला प्रतिकार करायला बोरिसचे दोन उंट आहेत. आनंदचा डाव अजूनही माझ्या लक्षात येत नाहीये!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 17:43

Permalink

बोरिसची

राजाच्या बाजूची प्यादी आता तो रोलर कोस्टर करत पुढे ढकलणार असे वाटते. कारण एक हत्ती सोडला तर आनंदची जवळजवळ सगळी मोहरी राणीच्या बाजूलाच सभा भरवून बसली आहेत त्यंची पळापळ होऊ शकेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 17:45

Permalink

आनंद

प्याद्यांना फोर्क देईल? बहुधा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 17:50

In reply to आनंद by रमताराम

Permalink

बी स्तंभातले प्याद्दे

पुढे सरकवायचे अशी आनंदची योजना आणि ते थोपवायचे ही बोरिसची! आताबहुदा हत्ती बी१ असा येईल. फोर्क कसा?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 17:53

Permalink

बोरिस्चा घोडा

सी३ मधे येऊन बसला तर अवघड आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 18:00

In reply to बोरिस्चा घोडा by चतुरंग

Permalink

घोडा ई-४

आणावाच लागेल आनंदला. त्यातून हत्तीची पट्टी बंद होईल. :( बोरिसने कॅसल केल्याकेल्या आनंदने घोड्याने सी-६ प्याद्यावर हल्ला केला असता तर पुढे डाव कसा उलगडला असता याचा विचार करतोय......
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 05/24/2012 - 18:04

In reply to घोडा ई-४ by रमताराम

Permalink

आणलाच..:अवांतर : नुकतीच

आणलाच..: अवांतर : नुकतीच बोरीसने तक्रार केलेली आहे की रमताराम आनंदला सूक्ष्मात जाऊन शिकवत आहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 18:15

In reply to आणलाच..:अवांतर : नुकतीच by भडकमकर मास्तर

Permalink

खी खी खी:

आम्ही सांगितलेलं ऐकायला लागला आनंद तर तो तर मार खाईलच वर आम्हालाही कायमचं सूक्ष्मात रहायची वेळ येईल. घोडा - ई-४ ही अगदीच ऑब्वियस मूव होती हो. उगाच आम्ही कशी ओळखली म्हणून भाव खाऊन घेतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 05/24/2012 - 17:59

In reply to बोरिस्चा घोडा by चतुरंग

Permalink

बी ४ ला आला.

बी ४ ला आला.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 05/24/2012 - 18:40

In reply to बी ४ ला आला. by प्रीत-मोहर

Permalink

अय्या, तुला बुद्धीबळ समजते ??

अय्या, तुला बुद्धीबळ समजते ?? मस्तच ग, छानच ग, कसे जमते ग ??? ;-) (काहीं जुने प्रसंग आठवून अंमळ हळवा झालेला) विमे
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 18:06

Permalink

घोडा सी३ मधे येणे तर थांबवले पण आता

तो बी४ मधे बसलाय. आनंद आता मारामारी करेल का? कारण सी२ वरचे प्यादे दुबळे आहे तिथून हत्तीला फोर्क बसू शकतो! आनंद मुद्दाम बोरिसला चाटण लावत पुढेपुढे आणतो आहे असे मला वाटते आहे कारण दिसणारे फोर्क इतके ऑब्विअस आहेत की ते लक्षात येणार नाहीत हे शक्यच नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 05/24/2012 - 18:10

In reply to घोडा सी३ मधे येणे तर थांबवले पण आता by चतुरंग

Permalink

पण सी२ मधल्या घोड्याला आनंदचा

पण सी२ मधल्या घोड्याला आनंदचा वजीर मारुच शकतो की.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 05/24/2012 - 18:15

In reply to पण सी२ मधल्या घोड्याला आनंदचा by प्रीत-मोहर

Permalink

वजीर???

वजीर पटाबाहेरून का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 05/24/2012 - 18:16

In reply to वजीर??? by भडकमकर मास्तर

Permalink

स्वारी स्वारी. हत्ती होता तो.

स्वारी स्वारी. हत्ती होता तो.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 18:20

Permalink

प्रकाटाआ

.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 05/24/2012 - 18:25

Permalink

बी पट्टी उघडी... सी पट्टीवर

बी पट्टी उघडी... सी पट्टीवर दोघांची दब्बल प्यादी.... अनयूज्वल...
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 18:30

Permalink

बोरिसचा घोडा

बी पट्ट्यात अडकला. तो हलला तर मागचे सी-५ प्यादे गमावणार तो. (उंटाने ठारच मारला तर.......? प्याद्यांचे स्ट्रक्चर पारच मोडून पडेल बोरिसचे........ चला चेक करून पाहू.....) अपेक्षेप्रमाणे आनंदने ई प्यादे न हलवता बी प्याद्याने उंट घेतला. बॅक टू बॅलन्स.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 05/24/2012 - 18:44

Permalink

ब्रोब्री जली..ब्रोब्री

ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 18:52

Permalink

ड्रॉ

आज आपल्याला आनंदचा खेळ अजाबात आवडला नाय. वजीरावजीरी झाल्यावर नि बोरिसने कॅसल मारल्यावर आनंदला मधल्या पटावर घोड्याच्या मदतीने मुसंडी मारण्याची संधी होती. हॅट्स ऑफ टू बोरिस. वजीरावजीरीमधे मैदान गमावून, खुल्या मैदाना कॅसल करूनही पठ्ठ्याने अनिर्णित राखला गेम.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/24/2012 - 18:57

In reply to ड्रॉ by रमताराम

Permalink

+१ एकदम सहमत!

आज आनंदने काहीतरी चमत्कारिक खेळ केला.मला वाटते त्याची काहीतरी गफलत झाली खेळताना. काही कॅलक्यूलेशन चुकले असावे. ओवर कॉन्फिडन्स नडला की काय? एकूण त्याचा आजचा खेळ आवडला नाही हे खरे. बोरिसने जिगरबाज खेळ करुन आनंदला बरोबरीत रोखले. टोपी काढली आहे! उद्या बोरिस पांढरा आहे, जाम मजा येणार!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 05/24/2012 - 21:13

In reply to +१ एकदम सहमत! by चतुरंग

Permalink

मला वाटते

१४व्या खेळीअखेर बोरिसने कॅसल केले तेव्हाच आनंदने घोडा ई-५ मधे आणून सी-६ च्या प्याद्यावर हल्ला करायला हवा होता. राजा त्याच पट्टीत असल्याने हत्ती मागे येऊन प्याद्याला आधार देऊ शकत नव्हता. एकमेव पर्याय म्हणजे पांढरा उंट डी-७ ला आणून बसवावा लागला असता त्याला. यातून मागचा हत्तीला बूच बसले असते. मग आनंदला इनिशिएटिव मिळाला असता. आज सारा गेम बोरिसची चाल नि आनंद फक्त प्रत्युत्तर देतोय असाच होता, त्याला स्वतः इनिशिएटिव घेऊन आपली चाल करण्याची संधीच मिळाली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/25/2012 - 00:16

In reply to मला वाटते by रमताराम

Permalink

नाही,

सी ६ च्या प्याद्यावर हल्ला करता येत नाही ते विषारी प्यादे आहे! कारण - घोडा ई५, मग हत्ती ई८, घोड्याने सी ६ प्यादे मारले की उंट डी७ मधे येऊन घोड्यावर हल्ला करतो आणि त्याचवेळी राजाला काटशह बसून घोडा पडतो! घोडा पुन्हा ई५ मधे येऊन शह काढू शकत नाही कारण तो बिनजोरी आहे आणि हत्तीने मारला जाईल. त्याऐवजी १७ व्या खेळीला घोड्याने सी प्याद्यावर हल्ला केला (आणि त्याचवेळी स्वतःच्या डी३ मधल्या बिन्जोरी प्याद्याला सपोर्ट दिला असता) असता तर काळ्या हत्तीला डी५ मधून/किंवा उंटाला डी४ मधून सी६ ला सपोर्ट करावा लागला असता. (उंट डी७ मधे जाऊन सपोर्ट करु शकत नाही कारण एफ ७ प्यादे पडते आणि डी८ मधल्या हत्तीवर हल्ला होऊन तो स्वतःच्याच सवंगड्यांमधे चिणून मारला जातो!) :( मग दुसरा घोडा डी४ मधे आणून बसवणे आणि मग ए३, बी४ अशी प्यादी ठकलून अ७ वरच्या प्याद्यावर हत्ती घालणे असे पर्याय होते असे वाटते. किमान ए३ तरी खेळायलाच हवी होती त्यामुळे घोडा नंतर जो बी ४ मधे येऊन बसला तो आला नसता! असो. पुढच्या डावात आनंदने "ब्लॅकमॅजिक" करावी असे वाटते! :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com