Skip to main content

सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ३

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 23/05/2012 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या दोन्ही भागाचे दुवे http://www.misalpav.com/node/21605 http://www.misalpav.com/node/21686 http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे. तिसर्‍या भागात नवव्या डावापासून सुरुवात करायची आहे. आनंद आणी बोरिस दोघांची गुणसंख्या समसमान आहे. उरलेल्या चार डावात दोघांकडे दोन दोन वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत. कालच्या डावात आनंदने बाजी मारुन आक्रमक झाल्याचे दाखवून दिले आहेच, बोरिस तर पहिल्यापासून शड्डू ठोकूनच खेळतोय त्यामुळे उरलेले चारही डाव रंगतदार होतील अशी आशा आहे. -चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22936
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by रमताराम

आपण वीस-पंचवीस मिनिटापूर्वीच बोल्लेलो आज वजीर लवकर खपणार. आनंद लै म्हजी लैच ड्याम्बिस मानूस हाय ह्ये पटलं.

मला तर आज काही झेपतच नाहि आहे! पहिल्यापासून प्रत्येक अंदाज चुकविल्यावर आता फक्त बघाय्चे ठरवले आहे :)

राजा एफ १ असा नेणे हा आनंदचा उद्देश असावा. बोरिस राजाच्या बाजूची मोहरी एकेक करुन बाहेर काढायला लागला आहे. तो किल्लेकोट करेल की नाही सांगता येत नाही कदाचित राजाच्या बाजूला करेल. आनंदला मध्यात हत्ती आणायला जितके लांबवता येईल तितका बोरिसचा डाव सुरक्षित होत जाणार. दोन घोड्यांनी आनंद आज काहीतरी करामत दाखवेल! :) येस! मला अपेक्षित असलेली घोडा डी२ खेळला आनंद!!

किल्लेकोट केला बोरिसने (अर्थात आजच्या परिस्थितीत ह्याला किल्लेकोट म्हणणे म्हणजे मल्लिका शेरावतने अंगभर कपडे घातले आहेत असे म्हणण्यासारखं आहे!) ;)

लाँग कॅसल करून बोरिसने स्वतःचा राजा खंप्लिट नागवा केला. काय समजंना झालंय. कशापाय क्येल हे आसं. फकस्त हत्ती मधे आणला लवकर, पण त्यापाई राजा पारच नागवा झाला की.

त्यात मला घरच्या तयारीचा भरपूर सहभाग वाटतो आहे. पुढच्या खेळीला आनंद आता राजा एफ १ मधे हलवणार का हे बोरिस हत्ती कुठे ठेवतो त्यावर ठरेल.

त्याच्या सातही प्याद्यांची फळी कमितकमी उघडली आहे! काळ्याच्या डावात अनेक भगदाडे पाडून घोड्यांना कुठेही उड्या मारता येतील याची व्यवस्था करुन ठेवली आहे. पण त्याला प्रतिकार करायला बोरिसचे दोन उंट आहेत. आनंदचा डाव अजूनही माझ्या लक्षात येत नाहीये!

राजाच्या बाजूची प्यादी आता तो रोलर कोस्टर करत पुढे ढकलणार असे वाटते. कारण एक हत्ती सोडला तर आनंदची जवळजवळ सगळी मोहरी राणीच्या बाजूलाच सभा भरवून बसली आहेत त्यंची पळापळ होऊ शकेल का?

प्याद्यांना फोर्क देईल? बहुधा नाही.

In reply to by रमताराम

पुढे सरकवायचे अशी आनंदची योजना आणि ते थोपवायचे ही बोरिसची! आताबहुदा हत्ती बी१ असा येईल. फोर्क कसा?

In reply to by चतुरंग

आणावाच लागेल आनंदला. त्यातून हत्तीची पट्टी बंद होईल. :( बोरिसने कॅसल केल्याकेल्या आनंदने घोड्याने सी-६ प्याद्यावर हल्ला केला असता तर पुढे डाव कसा उलगडला असता याचा विचार करतोय......

In reply to by रमताराम

आणलाच..: अवांतर : नुकतीच बोरीसने तक्रार केलेली आहे की रमताराम आनंदला सूक्ष्मात जाऊन शिकवत आहेत...

In reply to by भडकमकर मास्तर

आम्ही सांगितलेलं ऐकायला लागला आनंद तर तो तर मार खाईलच वर आम्हालाही कायमचं सूक्ष्मात रहायची वेळ येईल. घोडा - ई-४ ही अगदीच ऑब्वियस मूव होती हो. उगाच आम्ही कशी ओळखली म्हणून भाव खाऊन घेतोय.

In reply to by प्रीत-मोहर

अय्या, तुला बुद्धीबळ समजते ?? मस्तच ग, छानच ग, कसे जमते ग ??? ;-) (काहीं जुने प्रसंग आठवून अंमळ हळवा झालेला) विमे

तो बी४ मधे बसलाय. आनंद आता मारामारी करेल का? कारण सी२ वरचे प्यादे दुबळे आहे तिथून हत्तीला फोर्क बसू शकतो! आनंद मुद्दाम बोरिसला चाटण लावत पुढेपुढे आणतो आहे असे मला वाटते आहे कारण दिसणारे फोर्क इतके ऑब्विअस आहेत की ते लक्षात येणार नाहीत हे शक्यच नाही!

बी पट्ट्यात अडकला. तो हलला तर मागचे सी-५ प्यादे गमावणार तो. (उंटाने ठारच मारला तर.......? प्याद्यांचे स्ट्रक्चर पारच मोडून पडेल बोरिसचे........ चला चेक करून पाहू.....) अपेक्षेप्रमाणे आनंदने ई प्यादे न हलवता बी प्याद्याने उंट घेतला. बॅक टू बॅलन्स.

ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..ब्रोब्री जली..

आज आपल्याला आनंदचा खेळ अजाबात आवडला नाय. वजीरावजीरी झाल्यावर नि बोरिसने कॅसल मारल्यावर आनंदला मधल्या पटावर घोड्याच्या मदतीने मुसंडी मारण्याची संधी होती. हॅट्स ऑफ टू बोरिस. वजीरावजीरीमधे मैदान गमावून, खुल्या मैदाना कॅसल करूनही पठ्ठ्याने अनिर्णित राखला गेम.

In reply to by रमताराम

आज आनंदने काहीतरी चमत्कारिक खेळ केला.मला वाटते त्याची काहीतरी गफलत झाली खेळताना. काही कॅलक्यूलेशन चुकले असावे. ओवर कॉन्फिडन्स नडला की काय? एकूण त्याचा आजचा खेळ आवडला नाही हे खरे. बोरिसने जिगरबाज खेळ करुन आनंदला बरोबरीत रोखले. टोपी काढली आहे! उद्या बोरिस पांढरा आहे, जाम मजा येणार!! :)

In reply to by चतुरंग

१४व्या खेळीअखेर बोरिसने कॅसल केले तेव्हाच आनंदने घोडा ई-५ मधे आणून सी-६ च्या प्याद्यावर हल्ला करायला हवा होता. राजा त्याच पट्टीत असल्याने हत्ती मागे येऊन प्याद्याला आधार देऊ शकत नव्हता. एकमेव पर्याय म्हणजे पांढरा उंट डी-७ ला आणून बसवावा लागला असता त्याला. यातून मागचा हत्तीला बूच बसले असते. मग आनंदला इनिशिएटिव मिळाला असता. आज सारा गेम बोरिसची चाल नि आनंद फक्त प्रत्युत्तर देतोय असाच होता, त्याला स्वतः इनिशिएटिव घेऊन आपली चाल करण्याची संधीच मिळाली नाही.

In reply to by रमताराम

सी ६ च्या प्याद्यावर हल्ला करता येत नाही ते विषारी प्यादे आहे! कारण - घोडा ई५, मग हत्ती ई८, घोड्याने सी ६ प्यादे मारले की उंट डी७ मधे येऊन घोड्यावर हल्ला करतो आणि त्याचवेळी राजाला काटशह बसून घोडा पडतो! घोडा पुन्हा ई५ मधे येऊन शह काढू शकत नाही कारण तो बिनजोरी आहे आणि हत्तीने मारला जाईल. त्याऐवजी १७ व्या खेळीला घोड्याने सी प्याद्यावर हल्ला केला (आणि त्याचवेळी स्वतःच्या डी३ मधल्या बिन्जोरी प्याद्याला सपोर्ट दिला असता) असता तर काळ्या हत्तीला डी५ मधून/किंवा उंटाला डी४ मधून सी६ ला सपोर्ट करावा लागला असता. (उंट डी७ मधे जाऊन सपोर्ट करु शकत नाही कारण एफ ७ प्यादे पडते आणि डी८ मधल्या हत्तीवर हल्ला होऊन तो स्वतःच्याच सवंगड्यांमधे चिणून मारला जातो!) :( मग दुसरा घोडा डी४ मधे आणून बसवणे आणि मग ए३, बी४ अशी प्यादी ठकलून अ७ वरच्या प्याद्यावर हत्ती घालणे असे पर्याय होते असे वाटते. किमान ए३ तरी खेळायलाच हवी होती त्यामुळे घोडा नंतर जो बी ४ मधे येऊन बसला तो आला नसता! असो. पुढच्या डावात आनंदने "ब्लॅकमॅजिक" करावी असे वाटते! :)

In reply to by चतुरंग

अजून राजा एफ-१ ला सरकलेला नाही इकडे दुर्लक्षच झाले की. :) सतराव्या खेळीबाबत एकदम सहमत. उंट ए पट्टी आणण्याने फारतर हत्ती बी-१ मधे आणून मग बी प्यादे पुढे सरकवता आले असते, पण यातून मोठी मोहरी पुढे जाण्यास काही फारशी मदत होत नाही. तिथला डेड-लॉक लगेच फुटला असता तरी बोरिसचा काळा उंट परत बाहेर येऊन पटाच्या वरच्या बाजूला मध्यावर परत १४ व्या खेळीनंतरची स्थितीच निर्माण झाली असती. एकच फायदा, आता मी दुर्लक्षलेला राजा कोटात गेलेला असल्याने घोड्याने सी प्याद्यावर हल्ला करता आला असता. आता पांढरा उंट मदतीला येऊ शकत नसल्याने राजाला पुढे येऊन प्याद्याला संरक्षण द्यावे लागले असते. मग कदाचित आनंद मागच्या घोड्याने सी पट्ट्यातील पुढच्या प्याद्यावर मोर्चा लावू शकला असता. पण हे काही फार फायदेशीर झाले नसते, कारण बोरिसने घोडे एक्स्चेंज करून स्थिती परत बरोबरीत आणली असती. त्यामु़ळे मुळातच उंट ए-३ ही खेळी काही फारसे साधणारी नव्हतीच. :( मला तरी त्यामागचे लॉजिक लक्षात आले नाही.

१२ डावांच्या अखेरीस जर ६-६ गुणांची बरोबरी असेल तर ३० मे रोजी टाय ब्रेकर खेळला जाईल. त्यात २५ मिनिटांचे ४ डाव खेळले जातील प्रत्येक दोन डावांच्या मध्ये १० मिनिटांची विश्रांती असेल. तरीही निर्णय झाला नाही तर ५ मिनिटांचे २ डाव एकूण ५ वेळा (म्हणजे एकूण १० डाव) खेळले जातील, तरीही निर्णय झाला नाही तर 'सडन डेथ' डाव होईल. हम्म्म्म्म्म्म्म

In reply to by भडकमकर मास्तर

हा टायब्रेकर हा आचरट प्रकार आहे. अरे बारा डाव खेळूनही तो चॅलेंजर लेकाचा हरवू शकला नाही तर त्या माजी विजेत्याला विजेतेपद राखण्याचा हक्क हवा असे मला वाटते. त्याने ते आधीच मिळवले आहे. ते हिरावून घेण्यासाठी निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध व्हायला हवे चॅलेंजरचे. तसे होत नसेल तर हे टायब्रेकर म्हणजे रडीचा डाव खेळून म्हणजे चॅलेंजरला संधीमागून संधी देण्याचा प्रकार आहे.

In reply to by रमताराम

हा टायब्रेकर प्रकार पसंत नाहीये. त्यापेक्षा पूर्वी २४ डावांचा सामना असे तसा १६ डावांचा सामना ठेवावा कारण आता प्रायोजक, प्रेक्षक सर्वांनाच २४ -२४ डावांइतका प्रदीर्घ वेळ देणे शक्य नसावे. १६ डावांमधे जर आव्हानवीर काही करु शकत नसला तर आधीच्या खेळाडूनेच जेतेपद राकह्ले असे जाहीर करावे. (अवांतर - २४ डावांची व्यवस्था येण्याआधी पहिल्यांदा सहा डाव जिंकणारा खेळाडू विजेता घोषित होई. अनिर्णित डाव धरले जात नसत. हा एक कसोटी बघणारा प्रकार असतो. कार्पोव्-कास्पारोव सामना तब्बल ५ महिने आणि ४८ डाव चालला शेवटी ५-३ असा कार्पोवच्या बाजूने स्कोर असताना सामनाधिकार्‍यांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला, आणि कार्पोव विजेता घोषित झाला, त्यांच्या मते प्रदीर्घ ताणाने खेळाडूंच्या तब्बेती बिघडलेल्या होत्या (कार्पोवचे वजन तब्बल १० किलोने कमी झाले होते, परंतु कास्पारोव टुणटुणीत होता!). या वादग्रस्त निर्णयाने कास्परोव चवताळला. त्याच्यामते सोविएत यूनियनला त्यांचे वर्चस्व मोडीत निघत आलेले बघवत नव्हते. कारण कास्पारोव नागरिकत्वाने रशियन असला तरी अर्धा अर्मेनियन - अर्धा ज्यू असल्याने त्याला दुजाभाव केला जात असे.)

भाग ४ प्लीज :) लिहित नसलो तरी तुमची प्रत्येक प्रतिक्रीया वाचून डाव समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे