✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 05/17/2012 - 16:33  ·  लेख
लेख
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या भागाचे शेपूट बरेच लांबल्यामुळे हा दुसरा भाग सुरु करत आहे. http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर डावांचे थेट प्रक्षेपण बघता येते. पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी प्रत्यक्ष प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. चला तर मग सुरु करुयात पाचव्या डावाचे विश्लेषण. -चतुरंग

Book traversal links for सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २

  • ‹ सामना ६४ घरांच्या राजेपदाचा!!
  • Up
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
23867 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

बरोबरी!

चतुरंग
Fri, 05/18/2012 - 19:06 नवीन
पुन्हा एकदा! :( आनंद अ‍ॅग्रेसिव हो रे बाबा जरा!
  • Log in or register to post comments

आरं चला ना भो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/20/2012 - 16:33 नवीन
चांगली झोप लागली होती सातव्या डावात तरी आनंद काही पराक्रम करेल म्हणून ही झोपमोड रंगासेठ आणि रमतारम, चला ना भो लवकर. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हुश्श!

चतुरंग
Sun, 05/20/2012 - 17:48 नवीन
आत्ता कुठे मला गेम दिसायला सुरुवात झाली! :( एक तास नुसताच झगडतोय इंटर्नेटशी. असो. पुन्हा एकदा स्लाव. यावेळी तरी काही नाविन्य असेल का?
  • Log in or register to post comments

>>>>आत्ता कुठे मला गेम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/20/2012 - 17:55 नवीन
>>>>आत्ता कुठे मला गेम दिसायला सुरुवात झाली ! थेट डाव पाहता येत होता. पण चेसबाँबवर लटकलो होतो. १५ व्या कॅसलिंगच्या खेळीनंतर पुन्हा एकदा बोरीस बचाव आण डावाला ड्रॉकडे घेऊन जातोय का ? आनंद काही अफलातून खेळी करेल असे वाटत नाहीच. :( -दिलीप बिरुटे (आनंदच्या परफॉर्मंसवर नाराज)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पंधराव्या खेळीअखेर

चतुरंग
Sun, 05/20/2012 - 17:50 नवीन
दोघांचे किल्लेकोट झालेत. पटाच्या मध्यात डी४ डी५ अशी प्यादी आली आहेत. सी स्तंभात पांढर्‍याचा वजीर आणि हत्ती जोरात आहेत. ई स्तंभात काळ्याचे प्यादे आहे आणि त्या स्तंभाचा ताबा अजून कोणी घेण्याचा प्रयत्न केला नाहीये! अजून तरी समसमान स्थिती आहे.
  • Log in or register to post comments

चला आनंदने

चतुरंग
Sun, 05/20/2012 - 18:10 नवीन
क्यू बी ८ खेळी केली. तो आक्रमक खेळलेला आहे! एफ६ वरच्या घोड्याला वजिराचा आधार होता. आता एच ४ वरच्या बोरिसच्या उंटाने तो घोडा मारला तर जी७ वरचे प्यादे त्या उंटाला मारते. किल्लेल्कोट झालेला काळा राजा उघडा पडण्याचा धोका आहे. त्यानंतर सी३ वरचा घोडा ई२, जी३, एच ५ असा झेपा घेत आला तर काळ्या राजाला स्थिती अवघड होऊ शकेल.
  • Log in or register to post comments

>>>>>आता एच ४ वरच्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/20/2012 - 18:16 नवीन
>>>>>आता एच ४ वरच्या बोरिसच्या उंटाने तो घोडा मारला तर नै ना. बीजी३ खेळून बोरीसनं शेपूट घातलं वाटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

उंटांची

चतुरंग
Sun, 05/20/2012 - 18:39 नवीन
मारामारी करुन बोरिसने डावात आणखी गुंतागुंत टाळली. आता सी स्तंभात हत्ती दुहेरी करणार तो. केंद्रातले डी४ वरचे आयसोलेटेड प्यादे, जी पट्टीतले डबल प्यादे असे काही सूक्ष्म दोष पांढर्‍याच्या डावात निर्माण झालेत. तसेच आनंदसाठी ए६ वरचे प्यादे आयसोलेटेड आहे. बघूया काय होते.
  • Log in or register to post comments

सी स्तंभात

चतुरंग
Sun, 05/20/2012 - 18:53 नवीन
हत्ती दुहेरी करणे हा पांढर्‍याचा उद्देश. ए ८ मधला हत्ती हलवण्यासाठी ए ६ वरच्या प्याद्याला जोर मिळणे आवश्यक त्यामुळे आनंदने घोडा डी ७ मधे घेतला. पांढरे हत्ती दुहेरी झाले. आता काळे हत्ती दुहेरी होणार का? कॉमेंटरीबॉक्समधे कार्पोव येतोय! :)
  • Log in or register to post comments

तेवीसाव्या खेळीच्या मारामारीनंतर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/20/2012 - 19:27 नवीन
आता डाव कुठे जाईल कोणास ठाऊक ? पण आज मजा येत आहे.
  • Log in or register to post comments

आज उशीराच

रमताराम
Sun, 05/20/2012 - 20:25 नवीन
उगवलो. भलत्याच कामात अडकलो होतो. आलो तर गेम तुफान झालेला दिसतोय. समजायला वेळ जाणार.
  • Log in or register to post comments

तुफान झाला हा डाव!

चतुरंग
Sun, 05/20/2012 - 20:33 नवीन
१९ वर्षांनंतर बोरिसने आनंदला हरवले!! आजचा डाव आनंदने मध्य डावात चुका केल्या. त्याचा पांढरा उंट डावात जो अडकून बसला तो शेवटपर्यंत सुटला नाही अणि तीच त्याची डोकेदुखी ठरली. एक चांगले झाले की आज आनंद हरला! कारण ह्या शॉकनंतर आता तो चवताळून उठेल आणि पुढचे डाव नक्कीच रंगतदार होतील!!
  • Log in or register to post comments

मध्य डावानंतर पटावर बोरीसची

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/20/2012 - 20:46 नवीन
मध्य डावानंतर पटावर बोरीसची पकड घट्ट झाली. रंगाशेट म्हणतात तसं आनंदचा उंट शेवटपर्यंत हलला नाही आणि आनंदने काही चुका केल्या. आनंद डावाच्या शेवटी हत्ती आणि घोड्याला घेऊन काही अप्रतिम चाली खेळून डावावर पकड मिळवतो का किमान डावाला ड्रॉ तरी करेल असे वाटत होते परंतु आनंदला महत्प्रयासानेही जमले नाही. काल कास्पोरव्ह म्हणाला की, आनंद पूर्वीसारखा खेळत नाही. (मला विश्वनाथ आनंदचा सचिन व्हायला लागला की काय असे वाटले) असो, पण आज पटावर खेळ पाहतांना मजा आली. आजच्या पराभवानंतर वि.आनंद जिद्दीने खेळेल आणि विजयी होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन माझे दोन शब्द सं. वेगवेगळ्या खेळींचे विश्लेषन करणारे रंगाशेठचे आणि उशिरा आलेले रमतारामचे आभार. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

धन्यवादाबद्दल धन्यवाद

रमताराम
Sun, 05/20/2012 - 22:31 नवीन
पुन्हा एकवार सचिनवर घसरण्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईनोचा टँकर पाठवला आहे. :) रंगाशेठशी सहमत. जेव्हा निर्विवाद वर्चस्व निर्माण होते तेव्हा थोडी कॉम्प्लसन्सि निर्माण होते, आळस भरतो. एक दणका बसला की खडबडून जागा होण्यास फायदा होतो. पराभवाचा बदला आनंद लगेचच पुढच्या सामन्यात घेतो असा इतिहास आहे. उद्या इतिहासाची पुनरावृत्ती होते का पहायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रर्र हे तर वाचलंच नव्हतं. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/21/2012 - 15:54 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईनोचा टँकर पाठवला आहे आमची मतं स्पष्ट आणि न आवडणारी असतात त्यामुळे टँकर परत आपल्या पत्त्यावर पाठवला आहे. :) बाय द वे, संजय, खाली प्रतिसाद म्हणतात ते मलाही पटतंय. आनंद वजीर जीवंत करायच्या नादात बोरीसला चान्स देऊन बसला अर्थात रंगाशेठ आणि आपणच त्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकाल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आनंदचं नंबर ऑफ मूव्हजच कॅल्युलेशन चुकल्यामुळे हारला का?

संजय क्षीरसागर
Sun, 05/20/2012 - 23:54 नवीन
अदर वाईज त्यानं उंटाच्या बदल्यात वजीर निर्माण केला होता, तो हरला तरी हरकत नाही त्याचा आजचा गेम मला आवडला, ही हॅज टेकन अ रिस्क!. बहुदा वजीर तयार करण्याच्या उत्साहात, बोरिसच्या मात करणार्‍या चालींना आपल्यापेक्षा फक्त एक मूव कमी लागतेय हे त्याच्या लक्षात आलं नाही . तुम्हाला काय वाटतं चतुरंग?
  • Log in or register to post comments

आणखी एक सांगावस वाटतं

संजय क्षीरसागर
Mon, 05/21/2012 - 00:07 नवीन
तुम्ही `सामना विश्वविजेतेपदाचा' : डाव- ८, ९,१० वगैरे प्रत्येकी स्वतंत्र पोस्ट करा, इथे प्रतिसाद मिक्स-अप होतायत
  • Log in or register to post comments

वरती संजय आणि प्राडॉ

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 16:27 नवीन
म्हणताहेत त्याप्रमाणे आनंद वजीर करायच्या मागे लागला नव्हता, म्हणजे "वजीर करण्याच्या नादात डाव गेला" असे झाले नव्हते. तर डाव ऑलरेडी गेल्यात जमा असल्याने ज्याला निर्वाणीचा प्रयत्न म्हणतात तशा प्रकारची ती हाराकिरी होती! साधारणपणे विसाव्या खेळीपासूनच आनंदची डावावरची पकड ढिली होत गेली. आणखीन विस्तृत विश्लेषण नंतर देईन. आता डाव आठवा बघूयात.
  • Log in or register to post comments

आठवा डाव

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 16:46 नवीन
ग्रुनफेल्ड डिफेन्सने सुरु झाला! आनंदने चौथ्या खेळीला डी५ खेळून आधीच्या तिसर्‍या डावापेक्षा वेगळी खेळी केली. आता डाव किंग्ज इंडियन सामिश वेरिएशनकडे जातोय. पांढर्‍याची धडपड जास्तीतजास्त जागा पटकवण्याची असते त्याबदल्यात त्याची मोहरी आधी थोडी कमी विकसित राहतात. हे शार्प वेरिएशन आहे. मुख्य म्हणजे हा ग्रुन्फेल्ड डिफेन्स बोरिसचा बालेकिल्ला समजला जातो. त्याचा ह्यातला अनुभव प्रचंड आहे! असे असताना आनंदने हा प्रकार निवडावा म्हणजे "तुम्हारे इलाके में आके" असे सरळसरळ आव्हान आहे. आज मजा येणार!
  • Log in or register to post comments

खरं आहे.

रमताराम
Mon, 05/21/2012 - 16:53 नवीन
मला हा प्रकार धोकादायक वाटतो. मी जेव्हा जेव्हा (अर्थात कम्पूटरशी) असा प्याद्यांचा व्यूह रचतो तेव्हा अनफोल्डिंगमधे गडबड करतो नि बहुधा हरतोच. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सातव्या खेळीला

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 16:54 नवीन
आनंदने ई२ मधला घोडा सी३ मधे आणून बोरिसला विचारात पाडले. वेगळ्या खेळ्या सुरु झाल्यात. बोरिसने एफ६ वरचा घोडा एच५ मधे नेला दोघांनी सातव्या खेळीपासूनच विचार सुरु केलाय. ह्या स्थितीचे होम प्रिपरेशन फारसे नसावे. बहुदा जी४ करुन प्यादे घोड्यावर घालतो का ते बघायचे!
  • Log in or register to post comments

उंटाची खेळी

रमताराम
Mon, 05/21/2012 - 17:06 नवीन
वेगळी केली आनंदने. बहुधा प्यादे एफ-६ खेळायला फोर्स करतोय आनंद. कारण त्याशिवाय बोरिसला मागचे ई प्यादे हलवता येत नाही. पण या खेळीने बोरिसचा उंट बंद होतो नि आनंदचा सी पट्टीतला घोडा मोकळा होईल (जो हलल्यास थेट हत्तीला धोका निर्माण होऊ शकतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बोरिसची घोड्याची खेळी ही उचकवणारी होती

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 17:04 नवीन
आनंदने उंट जी५ मधे नेऊन चांगली खेळी केली. ई५/६ अशी काळ्या प्याद्याची खेळी थांबवली. काळ्याला एफ३ असे प्यादे खेळता येत नाही कारण मग जी४ अशा पांढर्‍याच्या खेळीला घोड्याला जागा राहत नाही! बघूयात बोरिस काय करतो.
  • Log in or register to post comments

उंट थेट मागे घ्यावा लागतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/21/2012 - 17:10 नवीन
आनंदला उंट थेट मागे घ्यावा लागतो असे दिसते. अर्रर्र, उंट तर दिला. अशा खेळीमागे काय कारण असतं हो ?
  • Log in or register to post comments

उंट दिला त्याला

रमताराम
Mon, 05/21/2012 - 17:17 नवीन
फार पर्याय नव्हता. पण बोरिसने मात्र घोड्याने उंट न घेता ई-प्याद्याने घेतला हे जरा आश्चर्यच आहे. प्यादे डबल तर झालेच पण आनंदच्या डी-प्याद्याला शह द्यायला प्यादे उरले नाही. कदाचित हुशारीने या डबल झालेल्या प्याद्याचा वापर करून ई पट्टीत (राजाच्या!) प्याद्यांच्या कोटाला भोक पाडायचा विचार दिसतोय. शिवाय ई पट्टी वजीराला मोकळी झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वॉव!

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 17:19 नवीन
आज दोघेही नेहेमीच्या समजुतीना धक्का देऊन खेळताहेत. आनंदने काळा उंट एक्सचेंज केला. बोरिसने घोड्याने पांढरा उंट घेऊन ई६ असे प्यादे सरकवणे आणि केंद्रात भक्कम फळी उभारणे हा आडाखा मोडून ई प्याद्याने उंट घेतला! आता हत्ती ई पट्टीत आणून नंतर एफ ४ असे प्यादे सारुन आनंदच्या अजूनही किल्लेकोट न झालेल्या राजाला कोंडीत पकडायचा डाव आहे! लै भारी!
  • Log in or register to post comments

हम्म

रमताराम
Mon, 05/21/2012 - 17:23 नवीन
आनंदचा काळा उंट गमावल्याने पांढर्‍या घरातील प्याद्यांचा कोट पार करून पलिकडे जायला त्याचा दुसरा उंट कामात येणार नाही. तो उंट वापरात आणण्यासाठी तो कोट आधी कुठेतरी फुटावा लागेल. बोरिस बहुधा एफ-६ खेळेल. त्याआधी वजीर पुढे घेऊन आनंदने बोरिसचा घोडा धोक्यात आणला. त्याला बहुधा जी-७ ला माघार घ्यावी लागेल.
  • Log in or register to post comments

येस!

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 17:27 नवीन
अपेक्षेप्रमाणे काळ्याचे प्यादे एफ५ असे आलेच! आता आनंद जी४ खेळू शकत नाही. त्यामुळे घोड्याला धोका नाही. परंतु या मागे आनंदचा डाव असा असावा की उगाच राजाच्या बाजूची प्याद्याची फळी जी ४ खेळून खिळखिळी करायची आणि घोड्याला उचकवून मागे ढकलायचे त्यापेक्षा त्या घोड्याला पटाच्या बाजूलाच बसूदेत. आपसूक एक मोहरे डावातून बाहेर जाते!
  • Log in or register to post comments

जोबर्‍या!

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 17:30 नवीन
आनंदने ई४ ने एफ५ चे प्यादे घेतले. आता उंटाने मारले तर जी४ ला उत्तर नाही जी ६ ने प्यादे मारले तर काळा राजा उघडा पडतो! क्या बात है!!
  • Log in or register to post comments

+१

रमताराम
Mon, 05/21/2012 - 17:37 नवीन
एकदम मस्त खेळी. (प्यादे न खाता पर्यायी थ्रेट निर्माण करता येईल का हे तपासून पहावे लागेल. गुंतागुंत वाढते आहे. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

एक

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 17:46 नवीन
गोष्ट नजरेतून निसटली माझ्या जी४ ला काळा उंटाने बी१ मधला घोडा घेऊन उत्तर देऊ शकतो. आनंद तेच खेळला आता बोरिस बहुदा आधी हत्तीने शह देईल मग राजा डी१ जाईल त्यानंतर उंटाने घोडा मारला की आनंद काळा घोडा मारेल.
  • Log in or register to post comments

ते तर आहेच

रमताराम
Mon, 05/21/2012 - 17:53 नवीन
पण वाचलेला घोडा मागे जाण्यापलिकडे काही फारसे साधत नाही. शिवाय तो मागचा घोडा बाहेर पडायला अडचणच आहे आनंदला, पिन झालेला तो घोडा देऊन त्याबदली बोरिसचा उंट मिळणे हा फायदाच म्हणायला हवा. शिवाय आनंदचा हत्तीही मोकळा होतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हो.

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 18:00 नवीन
आनंदने तेच कॅलक्यूलेट केले असणार. राजा डी१ सी२ असा नेऊन पांढरा उंट बाहेर काढला की हत्तींचा समन्वय होतो. काळ्या राजाच्या बाजूला हल्लबोल आहे. काळ्याचा पांढरा उंट मेला की घोडा ई४ मधे येऊन बसतो पांढर्‍याचा. आज आनंद त्याच्या प्राईमटाईम मधे खेळला तसा खेळतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

:)

रमताराम
Mon, 05/21/2012 - 18:07 नवीन
अपेक्षित खेळी आलीच. हत्ती आला समोर. पुढच्या दोन खेळ्याही अपेक्षेप्रमाणेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

येस!

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 18:08 नवीन
राजा डी१, उंटाने घोडा मारला आता हत्तीने उंट मारला घोडा हलवावा लागणार आता जी ७ किंवा एफ ६.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

शह

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/21/2012 - 18:06 नवीन
डावावर आनंदची पकड म्हणावी काय ?
  • Log in or register to post comments

कशाला अडकवायचा

रमताराम
Mon, 05/21/2012 - 18:12 नवीन
शिवाय उजवीकडून बोरिसचा वजीर घुसला असता की. मधे आणायला वजीराला उंटाचा अडथळाच झाला असता. अर्रर्र. मी प्रतिसाद देईतो एडिटलात प्रतिसाद (आमच्या सारखेच दिसताय. :) ) असो. मला आनंदला अ‍ॅडवांटेज आहे असं वाटतंय या क्षणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/21/2012 - 18:20 नवीन
अर्रर्र. मी प्रतिसाद देईतो एडिटलात प्रतिसाद आपले प्रतिसाद टाकून होईपर्यंत तरी त्यांनी दम मारावा ना. उंट मधे आणावा असा प्रतिसाद टाकून पट बघायला गेलो तर राजा हलवलेला होता मी तरी त्याला काय करु :) काळ्याचा वजीर इ४ खेळतो वाटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अजून संपूर्ण नाही

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 18:10 नवीन
परंतु बोरिसचे मनगट त्याने पकडले आहे असे म्हणायला हरकत नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त

रमताराम
Mon, 05/21/2012 - 18:23 नवीन
बोरिसने मस्त गंडवला आनंदला. हत्ती गमावला. फोर्क ध्यानात आला नव्हता कि काय आनंदच्या. आता आनंदने वजीर ई पट्टीत आणून बोरिसच्या वजीराला जेरबंद केला आहे. आता फक्त मोकळ्या हत्तीच्या बळावर बोरिस काय करतो पाहू. मजा आ रहा है. :)
  • Log in or register to post comments

नाही आनंद चुकला नाहीये!

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 18:29 नवीन
एफ ३ हे विषारी प्यादे होते, तो ट्रॅप होता. हत्तीचे बलिदान देऊन आनंदने बोरिसला चांगलेच गोत्यात आणले आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अंमळ उशीरा

रमताराम
Mon, 05/21/2012 - 18:35 नवीन
अंमळ उशीरा समजला आम्हाला. :) वजीराच्या खेळीनंतरच कळले हे. (काही हरकत नाय, बोरिस म्हणतोय त्यालाही समजले नव्हते. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

क्या बात है!

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 18:25 नवीन
काळा वजीर अडकवलाय आनंदने!!
  • Log in or register to post comments

आहा

रमताराम
Mon, 05/21/2012 - 18:25 नवीन
बोरिस रिजाईन्स. हुर्रे.
  • Log in or register to post comments

बोरिसचे

रमताराम
Mon, 05/21/2012 - 18:32 नवीन
मागे अडकलेले घोडे नि हत्ती मोकळे करण्यास बर्‍याच खेळ्या गेल्या असत्या. त्या दरम्यान आनंदने एच प्याद्याच्या मदतीने बोरिसचा राजा नागवा केला असता त्यामु़ळे बोरिसने रिजाईन केले असावे. मझा आला. आमची कालची प्रॉफसी खरी ठरली. ताबडतोब परतफेड करण्याची परंपरा आनंदने राखली आणि फक्त सतरा खेळ्यात मात! क्या बात है. आहा! बोरिस म्हणतोय मी आनंदची शेवटची (वजीर एफ-२) खेळी लक्षातच घेतली नव्हती. हॅट्स ऑफ चॅम्पियन आनंद.
  • Log in or register to post comments

आनंद स्ट्राईक्स बॅक!!

चतुरंग
Mon, 05/21/2012 - 18:33 नवीन
वा रे पठ्ठे!! केवळ १७ खेळ्यात डाव संपवला. आज आनंदच्या खेळाने तालची आठवण करुन दिली!! ररा तुमच्या कालच्या प्रॉफसीबद्दल तुमच्या तोंडात उंट, घोडे, हत्ती इ. पडो!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

डावाचे अ‍ॅनलिसिस करणारे (करा

भडकमकर मास्तर
Mon, 05/21/2012 - 20:32 नवीन
डावाचे अ‍ॅनलिसिस करणारे (करा "लेको" अ‍ॅनलिसिस ;) ) म्हणत होते की दहा पंधरा मिन्टांपूर्वी गेल्फंदची सिचुएशन बरी होती आणि अचानक सारे शॉकिंग घडले... ( बोरीस अति शहाणपणा करयला गेला वगैरे वगैरे) म्हणजे ग्रेट गेमचे आनंदला क्रेडिट मिळण्या ऐवजी बोरीएसची गोडचूक अधिक कारणीभूत आहे असा अर्थ काढायचा का? रंगाकाका आणि ररांचे काय मत? काहीका असेना, आनंद जिंकला हे भारी झाले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

खी खी खी:

रमताराम
Tue, 05/22/2012 - 09:14 नवीन
लेको' वरचा श्लेष आवडला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण यात बोरिसने घोडचूक केली हे म्हणण्यापेक्षा आनंदची शेवट्ची खेळी एकदम आउट ऑफ द हॅट झाली. पोजिशनल अ‍ॅडवांटेज घेण्याच्या किंवा मेटिंग थ्रेट देण्यासाठी आनंद वजीराला एफ-४ मधे आणेल अशी सार्‍यांचीच अपेक्षा होती. तसे झाले असते तर बोरिसने जी पट्टीत येऊन वजीराला आरामात सोडवला असता. पटाच्या वरच्या बाजूला प्याद्याचे एक्स्चेंज होऊन वजीराला मागे फिरण्याची संधी मिळाली असती. तसे झाले असते तर एक हत्ती कमी राहिलेल्या आनंदची स्थिती कमकुवत ठरली असती. शिवाय फोर्क बसणे हा म्हणजे 'माथा आळ लागे' असा प्रकार असतो. बहुधा 'गाढवाला एवढं पण लक्षात आलं नाही का?' अशी प्रतिक्रिया मिळते (माझीच पहा ना. :) ) त्यामुळे अचानक ज्याला फोर्क बसला त्याच्या खेळाबद्दल लोक शंका घेऊ लागतात. पण आनंद हा आनंद आहे. उगाच २००७ पासून चॅम्पियनच्या खुर्चीत घट्ट बसलेला नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

अगदी अगदी!

चतुरंग
Tue, 05/22/2012 - 00:16 नवीन
'लेको' हा पार लेकोच आहे ;) तो आणि तिथला दुसरा ग्रँमा नेपो ह्या दोघांनाही आनंदचा डाव समजला नव्हता. पण एक गंमत सांगू का डाव सुरु असताना चेसडोमवरच्या ऑनलाईन अ‍ॅनालिसिस मधे आनंदच्या बाराव्या खेळीनंतर तिथला अ‍ॅनालझर ग्रँ.मा. बालोग साबा काय म्हणालाय बघा - There is a very important detail: 12...Bxb1 13.Rxb1 Re8 14.Kd1 and here Qf6 with idea to stabilize the knight on f4 is refuted by 15.gxh5! Qxf3 16.Kc2 Qxh1 and 17.Qf2! and the Black queen is trapped after the bishop moves away from f1. म्हणजे १२ व्या खेळीलाच हा धोका लक्षात आलेला होता! किंबहुना आनंदने हा ट्रॅप १० व्या खेळीला बोरिसने एफ५ असे प्यादे ढकलल्यावरच शोधला असे माझे म्हणणे आहे! राजाच्या बाजूची काळी घरे उंटाच्या अनुपस्थितीत कमजोर आहेत त्यामुळे तिकडून काळ्या वजिराला घुसायची वाट ठेवत आनंदने एकप्रकारे बोरिसला 'टनेल सायटेड' ठेवले. शिवाय एफ१ मधला उंट न हलवून दोन्ही हत्ती समन्वयाबाहेर राहतील याचीही खबरदारी घेतली. राजाला पटाच्या मध्यात अशाप्रकारे उघडा टाकला की बोरिसच्या तोंडाला पाणी न सुटते तर नवल! आधी हत्ती चाल करुन आला तसा राजा हळूच सी १ ह्या सुरक्षित स्थानात गमन करता झाला पण त्याच वेळी काळ्या वजिराला चेक द्यायचा मोह अनावर होईल याचीही खबरदारी त्याने घेतली ती पुढे आलेल्या काळ्या वजिरासमोर एफ३ चे विषारी प्यादे ठेवत, शिवाय कोपर्‍यातला हत्ती खुणावत होताच. वजीर एफ२ ही अफलातून खेळी इतकी सटल आहे की त्याचा परिणाम चटकन लक्षात येत नाही. हा गनिमी कावाच होता. भर डावात सात मूव्ज आधी हे सगळे बघू शकणे हीच जग्गज्जेत्यांची खासियत. तोच त्यांच्यातला आणि इतरांमधला फरक!! त्यामुळे मी तरी संपूर्ण क्रेडिट आनंदलाच देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

ररा आणि रंगा, दोघांच्या

भडकमकर मास्तर
Tue, 05/22/2012 - 11:44 नवीन
ररा आणि रंगा, दोघांच्या प्रतिक्रिया वाचल्या... बोर्ड समोर बघत चाली मागे पुढे करून पाहिल्या.... ( त्याशिवाय काहीच झेपत नाही)... एकदम मजा आली.. दहाव्या अक्राव्या मूवपासून बोरीसला लालूच दाखवत आत घ्यायचा, एफ थ्री प्यादे मोकळे सोडायचे, फोर्क बसवून घ्यायचा, हत्ती मारून घ्यायचा आणि मग वजीर एफ टू .. खल्लास.... काल लाईव म्याच पाहताना--- शेवटची क्वीन एफ टू खेळी करून आनंद उठून गेला आणि मग बोरीस थोडा वेळ थक्क ..... लेको नेंपो सुद्धा " धिस इज शॉकिंग" वगैरे वगैरे...आणि शांतपणे आनंद कडेला उभा होता... बोरीसने घड्याळ थांबवले.. म्याच खतम.... अहाहा.... अवांतर : . काय मजाय . चेस समालोचकांनाही किती शिव्या पडताहेत .. चेस समालोचनपेक्षा क्रिकेट समालोचन किती सोपे.... सेहवागचा सिक्सर बसला तर म्हणायचे " एक्सलंट हँड आय कोऑर्डिनेशन" आ ऊट झाला तर म्हणायचे, " नो फीट मूवमेंट, प्लेयिन्ग अवे फ्रॉम बॉडी"... हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा