Skip to main content

सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 17/05/2012 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या भागाचे शेपूट बरेच लांबल्यामुळे हा दुसरा भाग सुरु करत आहे. http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर डावांचे थेट प्रक्षेपण बघता येते. पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी प्रत्यक्ष प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. चला तर मग सुरु करुयात पाचव्या डावाचे विश्लेषण. -चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23990
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

आनंदने ई२ मधला घोडा सी३ मधे आणून बोरिसला विचारात पाडले. वेगळ्या खेळ्या सुरु झाल्यात. बोरिसने एफ६ वरचा घोडा एच५ मधे नेला दोघांनी सातव्या खेळीपासूनच विचार सुरु केलाय. ह्या स्थितीचे होम प्रिपरेशन फारसे नसावे. बहुदा जी४ करुन प्यादे घोड्यावर घालतो का ते बघायचे!

In reply to by चतुरंग

वेगळी केली आनंदने. बहुधा प्यादे एफ-६ खेळायला फोर्स करतोय आनंद. कारण त्याशिवाय बोरिसला मागचे ई प्यादे हलवता येत नाही. पण या खेळीने बोरिसचा उंट बंद होतो नि आनंदचा सी पट्टीतला घोडा मोकळा होईल (जो हलल्यास थेट हत्तीला धोका निर्माण होऊ शकतो.)

आनंदने उंट जी५ मधे नेऊन चांगली खेळी केली. ई५/६ अशी काळ्या प्याद्याची खेळी थांबवली. काळ्याला एफ३ असे प्यादे खेळता येत नाही कारण मग जी४ अशा पांढर्‍याच्या खेळीला घोड्याला जागा राहत नाही! बघूयात बोरिस काय करतो.

आनंदला उंट थेट मागे घ्यावा लागतो असे दिसते. अर्रर्र, उंट तर दिला. अशा खेळीमागे काय कारण असतं हो ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फार पर्याय नव्हता. पण बोरिसने मात्र घोड्याने उंट न घेता ई-प्याद्याने घेतला हे जरा आश्चर्यच आहे. प्यादे डबल तर झालेच पण आनंदच्या डी-प्याद्याला शह द्यायला प्यादे उरले नाही. कदाचित हुशारीने या डबल झालेल्या प्याद्याचा वापर करून ई पट्टीत (राजाच्या!) प्याद्यांच्या कोटाला भोक पाडायचा विचार दिसतोय. शिवाय ई पट्टी वजीराला मोकळी झाली.

आज दोघेही नेहेमीच्या समजुतीना धक्का देऊन खेळताहेत. आनंदने काळा उंट एक्सचेंज केला. बोरिसने घोड्याने पांढरा उंट घेऊन ई६ असे प्यादे सरकवणे आणि केंद्रात भक्कम फळी उभारणे हा आडाखा मोडून ई प्याद्याने उंट घेतला! आता हत्ती ई पट्टीत आणून नंतर एफ ४ असे प्यादे सारुन आनंदच्या अजूनही किल्लेकोट न झालेल्या राजाला कोंडीत पकडायचा डाव आहे! लै भारी!

आनंदचा काळा उंट गमावल्याने पांढर्‍या घरातील प्याद्यांचा कोट पार करून पलिकडे जायला त्याचा दुसरा उंट कामात येणार नाही. तो उंट वापरात आणण्यासाठी तो कोट आधी कुठेतरी फुटावा लागेल. बोरिस बहुधा एफ-६ खेळेल. त्याआधी वजीर पुढे घेऊन आनंदने बोरिसचा घोडा धोक्यात आणला. त्याला बहुधा जी-७ ला माघार घ्यावी लागेल.

अपेक्षेप्रमाणे काळ्याचे प्यादे एफ५ असे आलेच! आता आनंद जी४ खेळू शकत नाही. त्यामुळे घोड्याला धोका नाही. परंतु या मागे आनंदचा डाव असा असावा की उगाच राजाच्या बाजूची प्याद्याची फळी जी ४ खेळून खिळखिळी करायची आणि घोड्याला उचकवून मागे ढकलायचे त्यापेक्षा त्या घोड्याला पटाच्या बाजूलाच बसूदेत. आपसूक एक मोहरे डावातून बाहेर जाते!

आनंदने ई४ ने एफ५ चे प्यादे घेतले. आता उंटाने मारले तर जी४ ला उत्तर नाही जी ६ ने प्यादे मारले तर काळा राजा उघडा पडतो! क्या बात है!!

In reply to by चतुरंग

एकदम मस्त खेळी. (प्यादे न खाता पर्यायी थ्रेट निर्माण करता येईल का हे तपासून पहावे लागेल. गुंतागुंत वाढते आहे. :) )

गोष्ट नजरेतून निसटली माझ्या जी४ ला काळा उंटाने बी१ मधला घोडा घेऊन उत्तर देऊ शकतो. आनंद तेच खेळला आता बोरिस बहुदा आधी हत्तीने शह देईल मग राजा डी१ जाईल त्यानंतर उंटाने घोडा मारला की आनंद काळा घोडा मारेल.

In reply to by चतुरंग

पण वाचलेला घोडा मागे जाण्यापलिकडे काही फारसे साधत नाही. शिवाय तो मागचा घोडा बाहेर पडायला अडचणच आहे आनंदला, पिन झालेला तो घोडा देऊन त्याबदली बोरिसचा उंट मिळणे हा फायदाच म्हणायला हवा. शिवाय आनंदचा हत्तीही मोकळा होतोय.

In reply to by रमताराम

आनंदने तेच कॅलक्यूलेट केले असणार. राजा डी१ सी२ असा नेऊन पांढरा उंट बाहेर काढला की हत्तींचा समन्वय होतो. काळ्या राजाच्या बाजूला हल्लबोल आहे. काळ्याचा पांढरा उंट मेला की घोडा ई४ मधे येऊन बसतो पांढर्‍याचा. आज आनंद त्याच्या प्राईमटाईम मधे खेळला तसा खेळतोय!

In reply to by चतुरंग

अपेक्षित खेळी आलीच. हत्ती आला समोर. पुढच्या दोन खेळ्याही अपेक्षेप्रमाणेच.

In reply to by रमताराम

राजा डी१, उंटाने घोडा मारला आता हत्तीने उंट मारला घोडा हलवावा लागणार आता जी ७ किंवा एफ ६.

डावावर आनंदची पकड म्हणावी काय ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिवाय उजवीकडून बोरिसचा वजीर घुसला असता की. मधे आणायला वजीराला उंटाचा अडथळाच झाला असता. अर्रर्र. मी प्रतिसाद देईतो एडिटलात प्रतिसाद (आमच्या सारखेच दिसताय. :) ) असो. मला आनंदला अ‍ॅडवांटेज आहे असं वाटतंय या क्षणी.

In reply to by रमताराम

अर्रर्र. मी प्रतिसाद देईतो एडिटलात प्रतिसाद आपले प्रतिसाद टाकून होईपर्यंत तरी त्यांनी दम मारावा ना. उंट मधे आणावा असा प्रतिसाद टाकून पट बघायला गेलो तर राजा हलवलेला होता मी तरी त्याला काय करु :) काळ्याचा वजीर इ४ खेळतो वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परंतु बोरिसचे मनगट त्याने पकडले आहे असे म्हणायला हरकत नाही! ;)

बोरिसने मस्त गंडवला आनंदला. हत्ती गमावला. फोर्क ध्यानात आला नव्हता कि काय आनंदच्या. आता आनंदने वजीर ई पट्टीत आणून बोरिसच्या वजीराला जेरबंद केला आहे. आता फक्त मोकळ्या हत्तीच्या बळावर बोरिस काय करतो पाहू. मजा आ रहा है. :)

In reply to by रमताराम

एफ ३ हे विषारी प्यादे होते, तो ट्रॅप होता. हत्तीचे बलिदान देऊन आनंदने बोरिसला चांगलेच गोत्यात आणले आहे!

In reply to by चतुरंग

अंमळ उशीरा समजला आम्हाला. :) वजीराच्या खेळीनंतरच कळले हे. (काही हरकत नाय, बोरिस म्हणतोय त्यालाही समजले नव्हते. :) )

बोरिस रिजाईन्स. हुर्रे.

मागे अडकलेले घोडे नि हत्ती मोकळे करण्यास बर्‍याच खेळ्या गेल्या असत्या. त्या दरम्यान आनंदने एच प्याद्याच्या मदतीने बोरिसचा राजा नागवा केला असता त्यामु़ळे बोरिसने रिजाईन केले असावे. मझा आला. आमची कालची प्रॉफसी खरी ठरली. ताबडतोब परतफेड करण्याची परंपरा आनंदने राखली आणि फक्त सतरा खेळ्यात मात! क्या बात है. आहा! बोरिस म्हणतोय मी आनंदची शेवटची (वजीर एफ-२) खेळी लक्षातच घेतली नव्हती. हॅट्स ऑफ चॅम्पियन आनंद.

In reply to by रमताराम

वा रे पठ्ठे!! केवळ १७ खेळ्यात डाव संपवला. आज आनंदच्या खेळाने तालची आठवण करुन दिली!! ररा तुमच्या कालच्या प्रॉफसीबद्दल तुमच्या तोंडात उंट, घोडे, हत्ती इ. पडो!! ;)

In reply to by चतुरंग

डावाचे अ‍ॅनलिसिस करणारे (करा "लेको" अ‍ॅनलिसिस ;) ) म्हणत होते की दहा पंधरा मिन्टांपूर्वी गेल्फंदची सिचुएशन बरी होती आणि अचानक सारे शॉकिंग घडले... ( बोरीस अति शहाणपणा करयला गेला वगैरे वगैरे) म्हणजे ग्रेट गेमचे आनंदला क्रेडिट मिळण्या ऐवजी बोरीएसची गोडचूक अधिक कारणीभूत आहे असा अर्थ काढायचा का? रंगाकाका आणि ररांचे काय मत? काहीका असेना, आनंद जिंकला हे भारी झाले....

In reply to by भडकमकर मास्तर

लेको' वरचा श्लेष आवडला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण यात बोरिसने घोडचूक केली हे म्हणण्यापेक्षा आनंदची शेवट्ची खेळी एकदम आउट ऑफ द हॅट झाली. पोजिशनल अ‍ॅडवांटेज घेण्याच्या किंवा मेटिंग थ्रेट देण्यासाठी आनंद वजीराला एफ-४ मधे आणेल अशी सार्‍यांचीच अपेक्षा होती. तसे झाले असते तर बोरिसने जी पट्टीत येऊन वजीराला आरामात सोडवला असता. पटाच्या वरच्या बाजूला प्याद्याचे एक्स्चेंज होऊन वजीराला मागे फिरण्याची संधी मिळाली असती. तसे झाले असते तर एक हत्ती कमी राहिलेल्या आनंदची स्थिती कमकुवत ठरली असती. शिवाय फोर्क बसणे हा म्हणजे 'माथा आळ लागे' असा प्रकार असतो. बहुधा 'गाढवाला एवढं पण लक्षात आलं नाही का?' अशी प्रतिक्रिया मिळते (माझीच पहा ना. :) ) त्यामुळे अचानक ज्याला फोर्क बसला त्याच्या खेळाबद्दल लोक शंका घेऊ लागतात. पण आनंद हा आनंद आहे. उगाच २००७ पासून चॅम्पियनच्या खुर्चीत घट्ट बसलेला नाही. :)

In reply to by भडकमकर मास्तर

'लेको' हा पार लेकोच आहे ;) तो आणि तिथला दुसरा ग्रँमा नेपो ह्या दोघांनाही आनंदचा डाव समजला नव्हता. पण एक गंमत सांगू का डाव सुरु असताना चेसडोमवरच्या ऑनलाईन अ‍ॅनालिसिस मधे आनंदच्या बाराव्या खेळीनंतर तिथला अ‍ॅनालझर ग्रँ.मा. बालोग साबा काय म्हणालाय बघा - There is a very important detail: 12...Bxb1 13.Rxb1 Re8 14.Kd1 and here Qf6 with idea to stabilize the knight on f4 is refuted by 15.gxh5! Qxf3 16.Kc2 Qxh1 and 17.Qf2! and the Black queen is trapped after the bishop moves away from f1. म्हणजे १२ व्या खेळीलाच हा धोका लक्षात आलेला होता! किंबहुना आनंदने हा ट्रॅप १० व्या खेळीला बोरिसने एफ५ असे प्यादे ढकलल्यावरच शोधला असे माझे म्हणणे आहे! राजाच्या बाजूची काळी घरे उंटाच्या अनुपस्थितीत कमजोर आहेत त्यामुळे तिकडून काळ्या वजिराला घुसायची वाट ठेवत आनंदने एकप्रकारे बोरिसला 'टनेल सायटेड' ठेवले. शिवाय एफ१ मधला उंट न हलवून दोन्ही हत्ती समन्वयाबाहेर राहतील याचीही खबरदारी घेतली. राजाला पटाच्या मध्यात अशाप्रकारे उघडा टाकला की बोरिसच्या तोंडाला पाणी न सुटते तर नवल! आधी हत्ती चाल करुन आला तसा राजा हळूच सी १ ह्या सुरक्षित स्थानात गमन करता झाला पण त्याच वेळी काळ्या वजिराला चेक द्यायचा मोह अनावर होईल याचीही खबरदारी त्याने घेतली ती पुढे आलेल्या काळ्या वजिरासमोर एफ३ चे विषारी प्यादे ठेवत, शिवाय कोपर्‍यातला हत्ती खुणावत होताच. वजीर एफ२ ही अफलातून खेळी इतकी सटल आहे की त्याचा परिणाम चटकन लक्षात येत नाही. हा गनिमी कावाच होता. भर डावात सात मूव्ज आधी हे सगळे बघू शकणे हीच जग्गज्जेत्यांची खासियत. तोच त्यांच्यातला आणि इतरांमधला फरक!! त्यामुळे मी तरी संपूर्ण क्रेडिट आनंदलाच देईन.

In reply to by चतुरंग

ररा आणि रंगा, दोघांच्या प्रतिक्रिया वाचल्या... बोर्ड समोर बघत चाली मागे पुढे करून पाहिल्या.... ( त्याशिवाय काहीच झेपत नाही)... एकदम मजा आली.. दहाव्या अक्राव्या मूवपासून बोरीसला लालूच दाखवत आत घ्यायचा, एफ थ्री प्यादे मोकळे सोडायचे, फोर्क बसवून घ्यायचा, हत्ती मारून घ्यायचा आणि मग वजीर एफ टू .. खल्लास.... काल लाईव म्याच पाहताना--- शेवटची क्वीन एफ टू खेळी करून आनंद उठून गेला आणि मग बोरीस थोडा वेळ थक्क ..... लेको नेंपो सुद्धा " धिस इज शॉकिंग" वगैरे वगैरे...आणि शांतपणे आनंद कडेला उभा होता... बोरीसने घड्याळ थांबवले.. म्याच खतम.... अहाहा.... अवांतर : . काय मजाय . चेस समालोचकांनाही किती शिव्या पडताहेत .. चेस समालोचनपेक्षा क्रिकेट समालोचन किती सोपे.... सेहवागचा सिक्सर बसला तर म्हणायचे " एक्सलंट हँड आय कोऑर्डिनेशन" आ ऊट झाला तर म्हणायचे, " नो फीट मूवमेंट, प्लेयिन्ग अवे फ्रॉम बॉडी"... हाहाहा

बोरीसनं लैच लवकर मान टाकली. रंगाशेठ काल म्हणाले होते. आनंद उद्या परतफेड करेल तसेच झाले. चला आभार्स लोकहो. :) -दिलीप बिरुटे

ट्रॅप लावून अडकवले हा ज्यांना फ्लूक वाटत असेल आणि आनंदला डावाचे श्रेय देणे जड जात असेल तर त्यांनी आनंदने २००८ च्या विश्वविजेतेपदाच्या सामन्यात क्रामनिकला कसे हरवले होते ते बघावे. २७ व्या खेळीला हत्तीपुढे आला प्याद्याने चाल करवून घेतली, नंतर हत्तीने डी स्तंभातल्या प्याद्याला बढत द्यायची आहे असे भासवून सी ३ मधे मुक्काम केला, क्रामनिकच्या घोड्याने ते प्यादे मारले आणि नंतर आनंदने वजिराने घोडा मारुन हत्तीला बळेच अंगावर घेतले, आनंदच्या घोड्याने पांढर्‍या वजिरावर हल्ला केला, वजिरावजिरीच्या नंतर राजाला शह देऊन आपल्याला उंटही मिळतोय अशा भ्रमात क्रामनिकला ठेवले मग राजाने शह घेत उंटाचे बलिदान दिले आणि शेवटच्या पट्टीत हत्तीने चाल करुन दोन खेळ्यात डाव संपवला! केवळ लाजवाब!! इथेही पुन्हा ८ खेळ्यांचे (२८ ते ३५) कॅलक्यूलेशन अचूक झालेले होते! निव्वळ जीनिअस!!

In reply to by चतुरंग

आहा, शेवटी प्यादे कसे बरोब्बर नेमक्या घरात बसणार याचे कॅल्क्युलेशन! एक उंट जास्त असूनही प्रतिस्पर्धी xट काही करू शकत नाही. जबरा.