Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Wed, 05/09/2012 - 03:05
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
लेख
माहिती
प्रतिभा
येत्या १० तारखेला मॉस्कोच्या त्रेत्याकोव आर्ट गॅलरीमध्ये आनंद विश्वनाथन वि. बोरिस गेलफंड असा सामना सुरु होत आहे. तेव्हा बुद्धीबळप्रेमींनो पुन्हा एकदा जगज्जेतेपदाच्या सामन्याचा सोहळा अनुभवण्याची तयारी करा. आनंद तिसर्‍यांदा विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे तर बोरिस त्याच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या इतका जवळ प्रथमच पोचलेला आहे. त्यामुळे बोरिस हा अतिशय उत्साहात आणि कमालीच्या तयारीनिशी स्पर्धेत उतरणार हे नक्की. त्यामानाने आनंदला तिसरे विजेतेपद मिळवणे ही गोष्ट किती चालना देऊ शकेल हा अनेक बुद्धीबळ तज्ञांच्या मते प्रश्न आहे. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे दोन्ही खेळाडू वयाची चाळीशी पार केलेले आहेत म्हणजे विशीतल्या तरुण खेळाडूंचे पेव बघता 'म्हातारेच' म्हणायला हवेत. ते काहीही असो आपला पाठिंबा तर लाडक्या आनंदलाच आहे हे नक्की! चला, दोन्ही खेळाडूंची ओळख करुन घेऊयात. बोरिस गेलफंड - जन्माने बेलोरशियन आणि नागरिकत्त्वाने इस्रायली असलेला बोरिस असामान्य प्रतिभावान खेळाडू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी रशियन जेतेपद आणि दोन वर्षांनी जागतिक कनिष्ठ विजेतेपद मिळवणारा बोरिस १९९६ साली कँडिडेट मॅचेसमध्ये उपांत्य सामन्यात अनातोली कार्पोवकडून पराजित झाला. त्यानंतर पुन्हा एकदा २००७ मध्ये व्लादिमीर क्रामनिकने त्याला पराभूत करुन आनंदचा प्रतिस्पर्धी म्हणून नाव निश्चित केले. शेवटी २०११ च्या कँडिडेट्स स्पर्धेत बोरिसने आपल्या अतिशय चिवट खेळाने गाटा काम्स्की आणि अलेक्झांडर ग्रिश्चुकसारख्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना नमवून बाजी मारली. असा त्याचा २०१२ च्या स्पर्धेपर्यंतचा प्रवास आहे. खेळाच्या भाषेत ज्याला 'नर्व्ज ऑफ स्टील' म्हणतात तशा प्रकारचा कणखरपणा आणि अत्यंत चिवट मनोवृत्ती ही बोरिसची शक्तिस्थाने आहेत. मागल्या आठवड्यातच त्याची एक मुलाखत झाली. त्यावेळी त्याला विचारले "सध्याच्या तरुण खेळाडूंच्या जमान्यात तू किंवा आनंदसारखे जुने खेळाडू टिकून राहण्याचे कारण तुला काय वाटते?" बोरिसने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. तो म्हणतो "आम्ही जुन्या पद्धतीने बुद्धीबळ शिकलो. खेळाचा सखोल अभ्यास करण्याचे तंत्र हे स्वतः विचार करुन उत्तरे शोधण्यात आहे. सध्याच्या पिढीतल्या बहुतांश खेळाडूंचे पान संगणकाशिवाय हलत नाही. विशिष्ठ परिस्थितीत संगणक काय चाली करेल हे बघून त्यानुसार डावपेच आखण्याचे धोरण हे त्यांच्या बुद्धीबळाच्या मूलभूत व्यासंगावर परिणाम करते आहे असे मला वाटते. संगणकाचे फायदे जरुर आहेत परंतु त्यांचा वापर हा मर्यादित परिघातच करायला हवा अन्यथा तुम्ही तुमची विचारशक्ती मर्यादित करता." बुद्धीबळाचे डावपेच नुसते माहीत असून उपयोग नाही तर प्रत्यक्ष सामन्याच्या वातावरणात अतिशय तणावाच्या स्थितीत, मनोधैर्य टिकवून चिवटपणाने खेळ करणे हे गरजेचे असते अन्यथा तुम्ही डाव आणि पर्यायाने सामना गमावता. पांढर्‍या मोहोर्‍यानी खेळतांना डी४ ही बोरिसची आवडती खेळी आहे तर काळ्याने खेळताना तो नॅ़जडॉर्फ सिसिलियन, पेट्रॉफ बचाव, स्लाव बचाव आणी राजाचा भारतीय बचाव (किंग्ज इंडीयन डिफेन्स) यावर भर देतो. अत्यंत सशक्त पोझीशनल अवेअरनेस आणि कमितकमी चुका करण्याची प्रवृत्ती ही त्याची वैशिष्ठ्ये आहेत. बोरिस हा वाद निर्माण करणारा खेळाडू नाहीये. पण तो अतिशय नाट्यपूर्ण चेहरे आणि हालचाली करतो. त्याच्या भावना त्याला सहजासहजी लपवता येत नाहीत. वानगीदाखल पहा ही मुद्रा! आनंद त्याच्याबद्दल काय म्हणतो पहा. "बोरिस उच्च दर्जाचा खेळाडू आहे. मी आणि तो १९८९ पासून एकमेकांशी खेळतो आहोत. एकमेकांचा खेळ चांगलाच ओळखून असलो तरी यावेळी बोरिस काही वैशिष्ठ्यपूर्ण तयारीने येणार हे नक्की. बुद्धीबळ रसिकांसाठी एक उत्कंठापूर्ण सामना देण्यात आम्ही दोघेही यशस्वी होऊ अशी आशा आहे." ------------------------------ आनंद विश्वनाथन - २००८ साली व्लादिमीर क्रामनिकला हरवून प्रथम आणि २०१० साली वॅसेलीन टोपालोवला धूळ चारुन द्वितीय जगज्जेतेपद कमावणारा आनंद आता तिसर्‍यांदा स्पर्धेत आहे ही बाबच आनंद देणारी आहे. वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धीबळातला श्रीगणेशा आपल्या आईकडून गिरवणारा आनंद अत्यंत वेगाने खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'ब्लिट्झ किड' म्हणूनच तो ओळखला जायचा. अजूनही जलदगती बुद्धीबळात त्याच्या तोडीला असलेले मोजकेच खेळाडू आहेत. २००३ - २००९ अशी ७ वर्षे तो जलदगती चँपियन होता. अत्यंत वेगवान खेळ्या आणि उच्च दर्जाची टॅक्टिकल समज ही आनंदची शक्तिस्थाने आहेत. घोड्यांचा अतिशय कल्पक वापर हा देखील त्याच्या अनेक डावांचे वैशिष्ठ्य ठरलेला आहे. शांत आणि निगर्वी असलेला आनंद देखील वादात पडत नाही. प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे त्याची हेटाळणी करणे असले उद्योग तो कधीही करत नाही. संयमी असल्याने फारसा भावनांच्या आहारी जाताना दिसत नाही. चेहेर्‍यावरही चुकीच्या खेळीचा पश्चाताप तो सहजासहजी दिसू देत नाही. जगज्जेतेपदासारख्या सर्वोच्च स्पर्धातून तुमची ही वैशिष्ठ्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरतात. तो मुलाखतीही अतिशय प्रसन्न चेहेर्‍याने आणि स्पष्ट विचाराने देतो. त्याची उत्तरे सहजासहजी तुमच्या हाती काहीही वादग्रस्त लागू देत नाहीत. बोरिसने केलेले आनंदचे कौतुक "आनंदची स्मरणशक्ती अफाट आहे. अत्यंत वेगाने विचार करुन खेळणे हे त्याचे बलस्थान आहे. आनंदशी खेळणे हे सोपे काम नाही पण मी त्याचे कच्चे दुवे शोधून काढेन आणि त्याचा फायदा उठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन." ----------------------------- स्पर्धा कशी होणार आहे? १० मे स्पर्धेचे उद्घाटन होईल. ११ व १२ मे डाव १ व २ मग एक विश्रांतीचा दिवस, पुन्हा दोन डाव मग एक विश्रांती अशा प्रकारे २४ मे पर्यंत पहिले १० डाव खेळले जातील. त्यानंतर ११ वा आणि १२ वा डाव हे दोन्ही मधे एकेक दिवस ठेवून खेळले जातील. १२ डावांच्या अखेरीस जर ६-६ गुणांची बरोबरी असेल तर ३० मे रोजी टाय ब्रेकर खेळला जाईल. त्यात २५ मिनिटांचे ४ डाव खेळले जातील प्रत्येक दोन डावांच्या मध्ये १० मिनिटांची विश्रांती असेल. तरीही निर्णय झाला नाही तर ५ मिनिटांचे २ डाव एकूण ५ वेळा (म्हणजे एकूण १० डाव) खेळले जातील, तरीही निर्णय झाला नाही तर 'सडन डेथ' डाव होईल. फिडेच्या संकेतस्थळावर सामन्यासंबंधी सर्व माहिती दिलेली आहे. २८ पानी नियमावली देखील वाचून बघावी. किती गोष्टींचा विचार केला आहे हे बघून मजा वाटते! मॉस्कोच्या स्थानिक वेळेनुसार पहिल्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता उद्घाटन सोहोळा आहे. ११ तारखेला पहिला डाव दुपारी ३ वाजता सुरु होईल. (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता. चुभूदेघे.) स्पर्धेसाठी नायजेल शॉर्ट, यान टिम्मान, व्लादिमिर क्रामनिक, पीटर स्वीडलर, पीटर लेको असे ग्रँडमास्टर्स कॉमेंटरी करायला हजर असणार आहेत. विजेत्याला १५ लाख डॉलर्स आणि उपविजेत्याला १० लाख डॉलर्स अशा घसघशीत रकमांची बक्षिसे आहेत! पुढील संकेत स्थळांवर सामने थेट प्रक्षेपित केले जातील काही ठिकाणी फक्त पट आणि चाली बघायला मिळतील तर काही ठिकाणी पट आणि प्रत्यक्ष खेळाडू खेळताना बघायला मिळतील. रसिकांनी त्या त्या संकेतस्थळावर जाऊन खात्री करून घ्यावी. अजून इतरही संकेत स्थळे नक्कीच असतील त्यांचाही जालावर शोध घ्यावा. http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 http://www.anand-gelfand.com/ http://moscow2012.fide.com/en/ मला डावांचे विश्लेषण देणे कितपत शक्य होईल माहित नाही परंतु मी थोडेफार लिहिण्याचा जरून प्रयत्न करेन. निदान ज्या डावांचे निकाल लागले आहेत (अनिर्णीत नाहीत) अशांचे तरी विश्लेषण देईन असे म्हणतो. तर अशा रीतीने या महा सोहळ्याला आता दोनच दिवस बाकी आहेत. चला आनंदाला शुभेच्छा देऊयात आणि महासोहळ्याची तयारी करू यात! (आनंदी)चतुरंग सर्व प्रकाशचित्रे आंजावरुन साभार.
  • Log in or register to post comments
  • 32271 views
  • सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ३
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ४
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - शेवटचा टायब्रेकर - भाग ६

Book traversal links for सामना ६४ घरांच्या राजेपदाचा!!

  • सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २ ›

प्रतिक्रिया

Submitted by तुकाम्हणे on Wed, 05/09/2012 - 03:24

Permalink

सुंदर

सुंदर ओळख. तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 05/09/2012 - 08:48

Permalink

अधाशासारखी आनंदची ओळख पहिल्यांदा वाचली..

अधाशासारखी आनंदची ओळख पहिल्यांदा वाचली. याच्या शांतपणाचे कायम आश्चर्य वाटत आले आहे, इतर बुध्दीबळ पटूंच्या विक्षीप्तपणाचे किस्से ऐकल्यावर याचा शांतपणा आणि सोज्वळपणा जास्ती उठून दिसतो. (द्रवीड सारखा) धन्यवाद. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 05/09/2012 - 09:22

Permalink

मस्त ! पु. ले. प्र. (एक घर,

मस्त ! पु. ले. प्र. (एक घर, अडीच घर, तिरकस, सरळ चालणारा) यकु ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अँग्री बर्ड on Wed, 05/09/2012 - 09:36

Permalink

छान

छान, तुमच्याच शब्दात आनंद बद्दल अजून माहिती वाचायला आवडले असते असे म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 05/09/2012 - 10:33

Permalink

ओह्हो.

व्वा. बोरीसची ओळख आणि त्याची भावमुद्रा आवडली. बाकी, खेळाचं विश्लेषण तर वाचायला आवडेलच. पण, वेळात-वेळ काढून सामन्याचं धावतं समालोचन केलं तर अजून मजा येईल. -दिलीप बिरुटे (वजीर)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 05/09/2012 - 10:37

Permalink

मस्तच हो रंगाशेठ. विश्लेषण

मस्तच हो रंगाशेठ. विश्लेषण वाचायला आवडेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 05/09/2012 - 11:05

Permalink

आता मेजवानीच! धावत्या

आता मेजवानीच! धावत्या समालोचनाबद्दल प्रा.डाँ.शी सहमत.. धावते नाही जमले तर विस्तॄत पंचनामा येऊच दे!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 05/10/2012 - 13:04

In reply to आता मेजवानीच! धावत्या by ऋषिकेश

Permalink

अगदी, अगदी..

आता मेजवानीच! धावत्या समालोचनाबद्दल प्रा.डाँ.शी सहमत.. धावते नाही जमले तर विस्तॄत पंचनामा येऊच दे! ऋ सारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 05/09/2012 - 11:18

Permalink

छान !

फारच छान ! आनंद ला खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/09/2012 - 11:31

Permalink

मस्त!

नांदी चांगली झालीय. स्पर्धा रंगतदार होणारच. चतुरंग सामन्यांचं विश्लेषण करणार हे वाचून बरं वाटलं. पुढच्या लेखाची वाट पहाणार!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 05/10/2012 - 00:42

In reply to मस्त! by पैसा

Permalink

+१

असेच म्हणतो. पुढील भागांची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Wed, 05/09/2012 - 16:28

Permalink

निर्णायक सामन्यांचा सविस्तर लेखाजोखा तुमच्याकडून

समजावून घ्यायला अतिशय आनंद होईल. विषेशतः विजेत्याने आखलेल्या योजना, त्यांना प्रतिस्पर्ध्यानं दिलेलं उत्तर आणि अंतीम विजयी ठरणार्‍या योजनेचा निर्विवादपणा या तीन गोष्टींचं तुमच्याकडून सामन्याच्या दरम्यानचं समालोचन अत्यंत उत्कंठापूर्ण होईल, तरी जरूर लिहावे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 05/09/2012 - 12:55

Permalink

.

वरील सर्वांशी सहमत. बिगुल चांगला वाजवला आहे हो रंगाशेट. दुरदर्शन वाहिनीवर थेट प्रक्षेपण दाखवणार आहेत का हो मालक? (असल्यास कुठल्या?)
  • Log in or register to post comments

Submitted by पहाटवारा on Wed, 05/09/2012 - 15:11

Permalink

वेल्कम ब्याक सर

तुमच्या सामना - विश्लेषणाच्या लेखांच्या प्रतीक्षेत ! जरा वेळ काढाच ..
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Wed, 05/09/2012 - 16:04

Permalink

अरे वा

रंगाकाकांचे विश्लेषण म्हणजे पर्वणी. धन्यवाद. (सध्या रिकाम्यावेळेत भिंतीला तुंबड्या लावण्याऐवजी चतुरंग डावाशी सलगीत असलेला) रमताराम
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Wed, 05/09/2012 - 16:25

Permalink

ओळख आवडली

स्पर्धेची आणी बोरीसची ओळख आवडली. पुढे जसजशी स्पर्धा रंगेल तसे सामन्यांचे विश्लेषण वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 05/09/2012 - 16:56

Permalink

ताज्या वृत्तानुसार आनंद आणि

ताज्या वृत्तानुसार आनंद आणि बोरिस दोघांनी स्पर्धेच्या ठिकाणाची रीतसर पहाणी केली. या आधीच्या स्पर्धेवेळी २०१० मध्ये टोपालोव आणि आनंद यांनी वेगवेगळ्या वेळी येऊन पहाणी केली होती कारण टोपालोवची इच्छा तशी होती. यावेळी मात्र आनंद आणी बोरिस एकाचवेळी आले. पटासमोर एकत्र बसले देखील! आनंद समवेत त्याची पत्नी आणि मॅनेजर अरुणा देखील आहे. पुढील दुव्यांवरती प्रकाशचित्रे बघता येतील. http://www.chessdom.com/anand-and-gelfand-meet-in-moscow-during-the-venue-inspection/ -रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 05/10/2012 - 13:49

Permalink

पॉशच

वाट बघतो आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 05/10/2012 - 13:55

Permalink

आपल्या आनंदप्रमाणे गेलफंड

आपल्या आनंदप्रमाणे गेलफंड देखील सभ्य माणूस दिसतो आहे. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव खासकरुन खुपच निरागस आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/10/2012 - 18:00

Permalink

एक दुरुस्ती

मॉस्कोची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा दीड तासाने मागे आहे त्यामुळे मॉस्कोत दुपारी ३ वाजता सुरु होणारे सामने भारतीय वेळेनुसार ४.३० वाजता असतील. (वरती लेखात चुकून मी दीड तास वजा करुन दुपारी १.३० वाजता असे लिहिले आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 05/10/2012 - 22:36

Permalink

ताज्या बातमीनुसार

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरळित सुरु झाला. आनंद आणि बोरिस उद्घाटन सोहळ्याला शेजारी बसले होते याचं बर्‍याच जणांना आश्चर्य वाटलं असावं. हे बघा प्रकाशचित्र - Image removed. रशियन, भारतीय आणि इस्रायली राष्ट्रगीतं वाजली आणि दोघांनी चार शब्द बोलले. त्यानंतर आनंदने "टॉस" जिंकला आणि उद्या होणार्‍या पहिल्या सामन्यात तो पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळेल हे निश्चित झाले! ही चांगली सुरुवात झाली असे मानायला हरकत नाही. अधिक प्रकाशचित्रे इथे बघता येतील. http://photo.chessdom.com/index.php?cat=10038 -रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/11/2012 - 09:07

In reply to ताज्या बातमीनुसार by चतुरंग

Permalink

धन्स...

असंच थोडं थोडं वृत्तांत सांगत राहा. विश्वनाथ आनंदने पांढर्‍या मोहर्‍या घेऊन पटावर खेळायला सुरुवात केल्यावर कोणती प्यादी सरकवली. आता बोरीस काय करेल असं सांगत गेला तर आम्हाला आणखी मजा येईल. मिपावर पडीक असलो तर पोच देईनच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 05/11/2012 - 16:40

Permalink

लाईव

चेसडम च्या साईटवर या मॅचेस लाईव पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 05/14/2012 - 21:11

In reply to लाईव by रमताराम

Permalink

धन्स राराशेट.

धन्स राराशेट.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/11/2012 - 17:22

Permalink

पहिला डाव सुरु झाला

http://moscow2012.fide.com/en/ इथे विश्लेषणासह वीडिओ बघता येईल. आनंदने डाव अपेक्षेप्रमाणे डी४ ने सुरु केला. या आधीच्या दोन्ही विश्वविजेतेपद स्पर्धात आनंदने हीच खेळी वापरली होती. पहिल्या सहा खेळ्यांनंतर डाव ग्रुनफेल्ड ओपनिंग एक्सचेंज वेरिएशन मध्ये गेलाय. बाराव्या खेळी अखेर पांढरा राजा किल्लेकोटात, हत्तीला बी स्तंभ मोकळा, पटाच्या मध्यात दोन प्याद्यांची बढत तर कच्चे दुवे त्याची दोन प्यादी हँगिंग आहेत ए२ आणि सी३ वरची बोरिससाठी काळा उंट मुख्य कर्णात बसलाय, वजिराची प्रगती झाली, कच्चे दुवे अजून राजाचा किल्लेकोट नाही, सी स्तंभात डबल प्यादे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 05/11/2012 - 17:30

In reply to पहिला डाव सुरु झाला by चतुरंग

Permalink

रंगा

सी३ (डबल फोर्स होता, नि मधला पट कन्ट्रोल मधे येत होता) उचलण्याऐवजी ए२ का उचलले असावे? चेसडम वर याचे संभाव्य धोके दाखवले होते. आता हत्ती बी२ ला गेला तर वजीराला परत फिरावे लागेल किंवा सी४ ला येऊन बसावे लागेल
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/11/2012 - 17:44

In reply to रंगा by रमताराम

Permalink

ए२

हे मुक्त प्यादे आहे म्हणून उचलले. आता काळ्याच्या ए पट्टीतल्या प्याद्याला मोकळा रस्ता आहे. शिवाय एका प्याद्याची बढत मिळाली आहे. पोझीशनल अ‍ॅडवांटेज विरुद्ध मटेरिअल अ‍ॅडवांटेज असा सामना आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 05/11/2012 - 17:55

In reply to ए२ by चतुरंग

Permalink

पण

सी३ ही तसेच मोकळे - अनसपोर्टेड - होते ना. शिवाय, वजीर मध्यभागी कन्ट्रोल घेऊन बसला असता. मागे डी५ लाही धोका निर्माण केला असता पांढर्‍याला. शिवाय मधल्या डबल झालेल्या प्याद्याला संरक्षण मिळाले असते. एकुण मध्यावर काळ्याची हुकमत बसली असती. अपेक्षेनुसार वजीर ब्याक टू प्याविलियन.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/11/2012 - 18:10

In reply to पण by रमताराम

Permalink

नाही

ही ओपन पोझिशन आहे. काळ्याकडे दोन उंट आणि पांढर्‍याकडे एकच आहे. ओपन पोझिशन मध्ये उंट जास्त प्रभावी असतात. सी प्यादे घेण्याने उंटांची मारामारी होऊन काळ्याचा मुख्य कर्णावरचा ताबा सुटत होता. त्यापेक्षा त्याने ए वरचे प्याद्दे मटकावणे सोपे समजले.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 05/11/2012 - 18:15

In reply to नाही by चतुरंग

Permalink

अच्छा

म्हणजे पांढर्‍याचा प्रतिवाद बिशप-डी२ असा प्रतिहल्ला करण्याचा असावा (नि पुढे उंटांचे एक्श्चेंज) अशी शक्यता म्हणताय का तुम्ही? पटले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/11/2012 - 18:21

Permalink

स्ट्राँग पोझिशन

रमताराम आणि चतुरंग एवढ्यावरुन कोणाची स्ट्राँग पोझिशन आहे, एवढे सांगा ना राव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 05/11/2012 - 18:29

In reply to स्ट्राँग पोझिशन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मी?

अहो मी आपला हौशी प्रेक्षक आहे. मला ओपनिंग्स सुद्धा सांगता येणार नाहीत धड, पुढचे तर सोडूनच द्या. इथे या निमित्ताने रंगाकडून अ‍ॅनलिसिस समजून घेतोय. हौशी माणसाच्या दृष्टीकोनातून काळा अंमळ वरचढ दिसतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/11/2012 - 18:42

In reply to स्ट्राँग पोझिशन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

नाही सध्या

दोघेही समसमान वाटताहेत. पांढर्‍याचे पोझीशनल अ‍ॅडवांटॅज काळ्याने जवळपास संपुष्टात आणले आहे. आणि काळ्याच्या मटेरिअल अ‍ॅडवांटेजचा त्याला फारसा उपयोग नाही असे दिसते. डाव बहुदा बरोबरीकडे निघालाय. बघूयात काय होते.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 05/11/2012 - 19:42

In reply to नाही सध्या by चतुरंग

Permalink

ऊप्स

ड्रॉ. :(
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 05/11/2012 - 19:29

Permalink

अरे वा

लेख आवडला. क्रिकेटप्रमाणे धावते समालोचन करण्याची पद्धत आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/11/2012 - 19:56

Permalink

अपेक्षेप्रमाणे डाव बरोबरीत सुटला!

पोस्ट मॅच अ‍ॅनालिसिस सुरु आहे. प्रश्नोत्तरे सुरु आहेत. http://moscow2012.fide.com/en/
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Fri, 05/11/2012 - 23:40

Permalink

छान!

रंगा आणि ररा, जे काही समालोचन केलेत ते अगम्य असले तरीही मस्त वाटले :) - (बुद्धीचे बळ कमी असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 05/12/2012 - 00:04

Permalink

मस्तच

लेख आणि माहीती एकदम मस्त आहे. आता कोण जिंकते आहे ते बघण्याची उत्सुकता लागली आहे. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 05/12/2012 - 01:49

Permalink

ररा, चेसडमच्या लिंकबद्दल धन्यवाद! आणि चतुरंग तुम्हाला दोन

प्रश्न आहेतः १० वी चाल आनंद Rb1 ऐवजी a4 का खेळला नाही? आणि ड्रॉची मागणी कोण करू शकतं?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 05/12/2012 - 09:18

Permalink

ए४ का खेळला नाही

कदाचित पुढीलप्रमाणे खेळ्या होऊ शकतील a4 - a6 Bxc6 - bxc6 dxc6 -Rb8! --- काळ्या हत्तीला बी स्तंभ मोकळा मिळाला आता पांढर्‍याचा हत्ती कोपर्‍यात अडकला. 0-0 - 0-0 त्यानंतर काळा Be6 करुन पुढे Rd1 असा दुसरा हत्ती डी स्तंभात बसवू शकतो. दोन हत्ती मोक्याच्या स्तंभात शिवाय पुढे आलेला वजीर आणि काळ्याचे दोन बलवान उंट या समोर पांढर्‍याचे सहाव्या घरातले एकाकी प्यादे कोपर्‍यात अडकलेला हत्ती आणि तितकासा प्रभावी नसलेला वजीर यांचा टिकाव लागणे अवघड होऊ शकते. अजूनही काही विश्लेषण असू शकेल परंतु मला जेवढे समजले त्यावर आधारित लिहितो आहे. -------------------------------- ड्रॉ ची मागणी दोन्हीपैकी कोणताही खेळाडू आपली खेळी झाली की घड्याळ थांबवण्याआधी करु शकतो. जर सामना अधिकार्‍याने डाव तपासण्याआधी प्रतिस्पर्ध्याने मागणी मान्य केली तर लगेच गेम ड्रॉ होते. एकदा दिलेली ड्रॉची ऑफर मागे घेता येत नाही. प्रतिस्पर्ध्याने ड्रॉ नाकारला तर खेळ पुढे चालू ठेवावा लागतो. अजूनही काही बारकावे आहेत परंतु सध्या इतकेच. -रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 05/12/2012 - 09:40

Permalink

धन्यवाद!

या सामन्यात तरी मला बोरिस जास्त कल्पक, अग्रेसिव आणि निश्चींत वाटला
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 05/12/2012 - 16:13

Permalink

चला, आले का रंगाशेठ...

पट मांडून ठेवलाय. डावाला सुरुवात करा... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 05/12/2012 - 16:53

Permalink

मा.संपादक मंडळ, या स्पर्धेची

मा.संपादक मंडळ, या स्पर्धेची सांगता होइपर्यंत या सामन्यांबद्दल एक वेगळे सदर मुखपृष्ठावर करुन ठेवता येईल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sat, 05/12/2012 - 17:03

Permalink

टक टक

रंगाकाका इथेच राहतात का? ;) सुरवात स्लाव पद्धतीने झाली आहे. मध्य पटावर वर्चस्वाची लढाई केंद्रित झालेली दिसते....
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 05/12/2012 - 17:25

Permalink

हा आलोच. डाव आज बराच वेगाने

हा आलोच. डाव आज बराच वेगाने पुढे सरकला त्यामुळे तो बघण्यात वेळ जातोय. स्लाव डिफेन्स मधल्या मेरान वेरिअशन ने डाव पुढे सरकला. पटाच्या मध्यात प्याद्यांची मारामारी करुन वर्चस्व स्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहेत. आज आनंद आणि बोरिस दोघेही आक्रमक वाटताहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sat, 05/12/2012 - 17:38

In reply to हा आलोच. डाव आज बराच वेगाने by चतुरंग

Permalink

बरे सापडले

या क्षणी (१४ व्या चालीत) आनंदने घोडा वजीराच्या पट्ट्यात आणल्याने बोरिसने उंट जी-५ ला बसवला की हा घोडा बूच मारल्याप्रमाणे बंद होतो (मागचा वजीर हलवेपर्यंत). आणि हे करतानाच पांढर्‍याचा वजीर समोरच्या प्याद्याला आधार देऊन मागचा घोडा पुढे जाण्यास मोकळा होतो. थोडक्यात इथे काळा एक मूव मागे पडतो असे वाटत नाही का? की हा पुढे जाऊ देण्याचा जाणीवपूर्वक घेतलेला पवित्रा असावा?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 05/12/2012 - 17:43

In reply to बरे सापडले by रमताराम

Permalink

पांढर्‍या मोहर्‍याने सुरुवात

करायची असल्याने काळा नेहेमीच एक मूव मागे असतो. आणि ही डावाची खासियत आहे. बरोबर आहे उंट जी५ मधे गेला तर घोड्याला बूच बसते. प्यादे एच ६ मधे येऊन काळा त्या उंटाला मागे ढकलू शकतो. बोरिस गहन विचारात गढलेला आहे. मधूनच डोळे झाकून घेऊन त्याचा विचार सुरु आहे. आनंद उठून गेलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 05/12/2012 - 17:47

In reply to पांढर्‍या मोहर्‍याने सुरुवात by चतुरंग

Permalink

>>>>>> बोरिस गहन विचारात

>>>>>> बोरिस गहन विचारात गढलेला आहे. मधूनच डोळे झाकून घेऊन त्याचा विचार सुरु आहे. आनंद उठून गेलाय. कुठं पाहताय. जरा लिंक द्याना...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sat, 05/12/2012 - 17:52

In reply to >>>>>> बोरिस गहन विचारात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

http://www.chessdom.com/anand

http://www.chessdom.com/anand-gelfand-live/ (फक्त पट नि मूव आहेत आणि अ‍ॅनलिसिस) http://moscow2012.fide.com/en/ (लाइव वीडिओ)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 05/12/2012 - 17:59

In reply to http://www.chessdom.com/anand by रमताराम

Permalink

अंहं. :(

>>> http://moscow2012.fide.com/en/ (लाइव वीडिओ) काही तरी माझ्याच संगणकाचा तांत्रिक गुंता दिसतोय. गेम २ आणि खाली कोपर्‍यात क्वॉलिटी एचडी.एसडी दिसतंय पण विडियो नाही दिसत. :( जाने दो....! आता डाव रंगात आलाय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com