Skip to main content

सत्यमेव जयते

लेखक सोत्रि यांनी रविवार, 06/05/2012 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. ह्या कार्यक्रमासाठी आमीरने तो 'मि. परेफेक्ट' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाची प्रमोशल गाणी आणी कॅम्पेन हे त्याने त्याच्या परफेक्ट स्टाइलने एकदम व्यावसायिकरित्या केले आहे. आजचा विषय होता "स्त्री भ्रूण हत्या". आमिर नेहमीप्रमाणेच त्याच्या परफेक्ट मुडमध्ये कार्यक्रम सादर करत आहे. वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव सर्व दर्शकांसमोर व्यक्त करत आहेत. आता बर्‍याच जणांना 'ह्यात काय' नविन?' असा प्रश्न पडेल आणि तो सार्थ आहेच. अश्या फॉर्मॅटमधले आणि अश्या विषयांना वाहिलेले ढीगभर कार्यक्रम आत्तापर्यंत येऊन गेलेत. पण आज पहिलाच भाग झाला आहे, जरा वेळ देवूयात आमिरला टीव्हीच्या छोट्या पडद्यावर स्थिर स्थावर व्हायला. काळच ठरवेल हा कार्यक्रम कसा आहे ते, तो यशस्वी होईल का ते आणि आमिर छोट्या पदड्यावर सेटल होईल का ते. मला तरी असे वाटते आहे, तुम्हाला काय वाटते?

वाचने 46976
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

मालिकेचे फक्त १३ एपिसोडच आहेत आणी ते बनवायला २ वर्ष लागली असे कळाले.. पहिला एपिसोड तर एकदम हीट झाला आहे.. त्याबद्दल वादच नाही.. प्रथमच बॉलिवुड ने रियाल्टी शो मधुन सरकार ला धारेवर धरले आहे.. बघुया राजस्थान सरकार वर काही फरक पडतो का ते.. नाहीतर चालुच आहे आपली लोकशाही आणी पहिले पाढे पंच्चावण

असो. कार्यक्रम जरी नेहमीच्याच विषयावरील चर्चेचा असला तरी सोत्री भाषेतच सांगायचे तर "वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया त्यांचे भयानक, अतिशय अंगावर येणारे, अनुभव " सुन्न करून गेले.

सुरुवात एकदम दणक्यात.... पब्लिसिटी तुफान झालीय आणि पहिला एपिसोड प्रचंड वादळ उठवून गेलाय. बघुया पुढे काय होतंय.....
||सत्यमेव जयते ||

सुरुवात एकदम दणक्यात
+१. बॉलिवूडच्या काळ्या धंद्यावरही एखादा एपिसोड यावा आणि आमीरने दुवे घ्यावेत.

आमीर माझा आवडता अभिनेता.. त्याच्या परफेक्शनीझ्मच्या गफ्फा लोकांना आवडत नसतीलही, पण तो वेगळ्या विषयांना हात घालतो, हे नक्की.. नाहीतर आपल्या स्वतः दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात डिस्लेक्सियासारख्या विषयाला घेऊन, त्यात इंटर्व्हलला एंट्री घ्यायचं धाडस आणि धैर्य फार कमी लोकांत असतं.. असो. आता कार्यक्रमाविषयी.. पहील्याच भागात त्याने कन्या-भृण-हत्या सारख्या विषयाला हात घातला. ह्या भागात दाखवलेल्या अमिषाची कहाणी आणि त्या नवर्‍याने केलेल्या क्रूर हल्ल्याला तोंड दिलेल्या स्त्रीची कथा तर भयानक होतीच, पण अत्यंत उच्चशिक्षीत घरातील डॉ.ची कहाणी आणखीच व्यथीत करणारी होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्या गुन्ह्यांची सुरुवात होण्यामागे सरकारची "जनसंख्या घटाओ" वाली अति-महत्त्वाकांक्षा होती, ही माहिती नवीन आणि विदारक होती. कुरुक्षेत्रातल्या "रंडवों की टोली" आणि लग्नासाठी बायकांची खरेदी करण्याची गोष्ट "मातृभूमी" ह्या चित्रपटाची आठवण देऊन गेल्या.. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावी लागेल, की ही आग माझ्या-तूमच्या घरांपर्यंत झळ कधीही पोहचवू शकते.स्त्रीयांचे पुरुषांच्या तुलनेत असलेले कमी प्रमाण आणि त्यामूळे होणारी पुरुषांची होणारी लैंगिक उपासमार हे स्त्रीयांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराचे मुख्य कारण असावे. (दिल्लीचे "रेप स्टॅटीस्टिक्स" ह्याकडे इशारा करते, असं मला वाटतं.) आणि आजची परीस्थिती येत्या काही वर्षांत आणखीच बिकट होऊ शकते.

In reply to by चिगो

>>धाडस आणि धैर्य फार कमी लोकांत असतं.. अगदी योग्य बोललात. निव्वळ गल्लाभरूपणा न करता, हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून दूरदर्शन वर प्रक्षेपणासाठी आग्रही असणं, यासाठी स्टार समूहाला राजी करणं, टेलीकॉम कंपन्यांना या कार्यक्रमासाठीच्या एसेमेस चा दर वाढवू न देणं, या छोट्याश्या गोष्टी असल्या, तरी महत्वाच्या आहेत. याचप्रमाणे, नुसता लोकांच्या दु।खाचा बाजार न मांडता यावर कृती करण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न करणं, यातून निर्माता म्हणून आमीरची स्वच्छ नीयत दिसून येते.

हा कार्यक्रम पाहू न शकल्याने, चिगो यांचा विस्तृत प्रतिसाद खूप आवडला. निदान पहील्या भागात काय झाले याचा थोडाफार आढावा घेता आला. स्त्रीभ्रूणहत्या हा घृणास्पद गुन्हा करणार्‍या नालायक लोकांनी कमीत कमी देवीची स्तोत्रे कधीही आयुष्यात म्हणू नयेत ना देवीची (स्त्री तत्वा असल्याने) उपासना करू नये. बाकी राहीली बाब - आमीर खान च्या नव्या वेंचर (प्रकल्पाची)ची, खूपच कौतुकास्पद आहे. नावदेखील सुरेख शोधले आहे - "सत्यमेव जयते"

In reply to by शुचि

स्त्रीभ्रूणहत्या हा घृणास्पद गुन्हा करणार्‍या नालायक लोकांनी कमीत कमी देवीची स्तोत्रे कधीही आयुष्यात म्हणू नयेत ना देवीची (स्त्री तत्वा असल्याने) उपासना करू नये.
हाच तर दुटप्पीपणा असतो ना ताई.. दुर्दैवाने, दुरच्या नात्यात एका कुटूंबाने दोन मुली झाल्यावर तिसरीच्या वेळी भृणहत्या करवली आणि हे कोल्हापुरच्या अंबाबाईचे उपासक आहेत म्हणे. कोल्हापुरात आणि महाराष्ट्रातही कन्याभृणहत्येचे प्रमाण चिंताजनक आहे, हे वाचल्याचे स्मरते. "सत्यमेव जयते"मध्ये भिलवाडा, राजस्थान मधून आलेल्या एका डॉक्टरीणबाईंच्या मते आदिवासी लोकांमध्ये हा प्रकार अजिबात नाहीये. ते लोक मुलगा वा मुलगी दोघांचाही जन्म अगदी समानरीत्या सिलेब्रेट करतात. नृवि़ज्ञान (Anthropology) मध्ये शिकल्याप्रमाणे बहुतेक आदिवासी संस्कृतींमध्ये मुलीचे/स्त्रीचे स्थान पुरुषांसारखेच असते. किंबहुना, बर्‍याच ठीकाणी स्रीचे स्थान पुरुषांपेक्षाही उच्च असते. (उदा. मेघालय).. कदाचित, सुसंस्कृत/उच्चभ्रू /उच्चशिक्षीत होत असतांना आपण माणुसकी नावाची बेसिक गोष्टच विसरलोय..

In reply to by चिगो

>>दुरच्या नात्यात एका कुटूंबाने दोन मुली झाल्यावर तिसरीच्या वेळी भृणहत्या करवली आणि हे कोल्हापुरच्या अंबाबाईचे उपासक आहेत म्हणे. -- :( . देवीच्या उपासना करताना स्वतः दुनीयाभरचे व्रतवैकल्ये -अनुष्ठानं करायचे आणि त्याकरता दिवसभर घरच्या स्त्रीयांना राब राब राबवायचे, वृद्ध आईला कस्पटाची देखील किंमत द्यायची नाहि.. हे सगळं मी फार जवळुन बघितलय :( अर्धवटराव

ह्या कार्यक्रमाचे पुन:प्रक्षेपण कधी होते मला कुणी सांगेल का?इथे त्या डिश टिव्हीच्या सिग्नल प्रणालीने वात आणलाय्!!!!!!!!!!!!!बातम्यांमधे दाखवले त्यावरुन तरी कार्यक्रम उत्तम आहे अर्थात आमिरचा असल्याकारणाने कुठलीही शंका घेण्यास वाव असणार नाही याची पुर्ण खात्री आहेच्....पहिल्याच भागात ज्या कन्या-भृण-हत्या सारख्या विषयाला हात घातलाय तो पाहता टिव्हीचे माध्यम देखिल आमिर आपल्या खुबीने आणि वैविध्यपुर्ण शैलीने पादाक्रांत करणार हे निश्चित...

In reply to by JAGOMOHANPYARE

गाणे बघायचे राहून गेले होते.. धन्यवाद. कंठ दाटून येण्याइतपत आणि डोळे झरण्याइतपत माणूसकी अजून माझ्यात जिवंत आहे, हे ह्या गाण्याने नव्याने कळले..

खूपचं सुंदर असा कार्यक्रम आहे :) सुरुवात जोरदार झाली आहे आणी आजचा स्त्री-भृण-हत्या विषय तर गंभीर होता त्यावर काही स्त्रीयांचे अनुभव तर खूपचं वाईट व भयानक होते . आमीर खान माझा आवडता अभिनेता आहे आणी तो जे काम करतो ते तितकेच जास्तं बघायला आवडते ही , तो खरचं एक परफेक्शनीस्ट आहे ह्यात माझं दूमत नाही. स्वानंद किरकिरे ह्यांचे ओ रे चिरैया हे गाणं तर उत्तम होतं , अगदी मन भरुन आले. पुढचे भाग बघण्याची उत्सुकता आणखीनच वाढलिये.

अतिशय उत्तम कार्यक्रम आहे. उत्तम सुरुवात आहे. आजच्या पहिल्या भागात 'स्त्री भ्रूण हत्ये 'च्या निमित्ताने सुशिक्षित- अशिक्षित स्त्रियांचे अनुभव, विविध समाज गटातील स्त्रियांचे अनुभव ऐकल्यानंतर पहिल्याच भागाने कार्यक्रम पाहणार्‍यांच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ उठवला असेल. आता कार्यक्रम हा व्यावसायिक दृष्टीने यशस्वी करण्याचा उद्देशही आहेच. अमिरखान या कार्यक्रमाचा संचलन करणारा नसता तर कार्यक्रम किती लोकांनी कार्यक्रम पाहिला असता ? कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने अमिरखानचा उपयोग करायचे ठरवलेले दिसते. अमिरखानला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी तयार केले आहे. बाकी, काहीही असो. पहिल्या भागाने कार्यक्रमाची उत्सूकता वाढवली आहे. पुढील भागात काय येते. कार्यक्रम काय अनुभव देतो. प्रेक्षकांचा पसंतीला हा कार्यक्रम उतरतो का ? या आणि अनेक प्रश्नांच्या उत्तरे पुढील काही भाग देतीलच असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने अमिरखानचा उपयोग करायचे ठरवलेले दिसते. अमिरखानला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी तयार केले आहे.
खरे काय ते माहित नाही पण अमिर खानच्या मुलाखती नुसार स्टार वाले त्याचा कडे गेम शो घेउन गेले होते. अमिर ने त्याला नकार दिला व नंतर ह्या शो ची कल्पना चॅनल कडे घेउन गेला. सत्यमेव जयतेची पुर्ण कल्पना त्याचीच असल्याचे सांगितले आहे.

In reply to by निखिल देशपांडे

स्टार वाले अमिरखानकडे रियलॅटी शोच्या कार्यक्रमासाठी गेले होते आणि त्याने नकार दिला इथपर्यंत बरोबर वाटते. पुढे सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डींग होत गेले तेव्हा या कार्यक्रमाचे संचलन अमिरने करावे असे टीमला वाटत होते, सुरुवातीला अमिरने त्यास नकार दिला. (अमिरने नकार दिला असता तर कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली नसती) पुढे सत्यमेव जयतेच्या टीमने अमिरला थेट विविध गावांमधे फिरवून आणल्यावर सामाजिक विषयावरच्या कहाण्या-समस्या पाहून अमिरचे डोळे पाणावले वगैरे आणि त्याने या कार्यक्रमासआठी होकार दिला, असे वाचनात आले. एका भागाचे संचलन करण्यासाठी अमिरला तीन कोटी मिळणार आहेत. आता हे तीन कोटी कोण देणार आहेत ते मला काही कळलं नाही. अमीरने सदरील कार्यक्रमाच्या भागासाठी ज्या अटी टाकल्यात 'रविवार सकाळची वेळ आणि विविध वाहिन्यांवरचे प्रसारण' व्हावे. अमीरखानच्या भाषेत रामायण मालिकेप्रमाणे सर्व कुंटुंबाने एकत्र बसून कार्यक्रम पाहावा. उद्देश चांगलाच आहे. पण, यात काही व्यावसायिक गोष्टी दडून बसल्या आहेत काय, याचाही विचार व्हायला पाहिजे. कारण इतर प्रतिसादात अनेकांनी म्हटल्याप्रमाणे सामाजिक समस्येवरचा हा काही पहिला कार्यक्रम नाही. असो, आपण फक्त कार्यक्रमच नव्हे तर त्यानिमित्ताने काय काय घडते त्यावरही चाणाक्षपणे लक्ष ठेवले पाहिजे. उगाच नंतर अपेक्षाभंगाचे प्रसंग येतात. निखिल, कालच्या कार्यक्रमात डॉ. चा अनूभव ऐकतांना तिचे अनुभव सांगणं झालं की, कॅमेरा अमिरखानच्या चेहर्‍यावर फिरायचा. अ.खानच्या विविध भाव-भावना, छटा, डोळे पाणावणे वगैरे (डोळे पाणावणे खरेच होते त्यात काही वाद नाही.) त्यामुळे कार्यक्रम थेट भिडतो ही क्लृप्ती मला आवडली. असो, कार्यक्रम अजून खूप बाकी आहे. आपण प्रेक्षक जागृक राहू इतकेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यावसायिक गणितं या कार्यक्रमामागे नक्कीच असणार. पण तरीदेखील, आपल्या सेलेब्रिटी स्टेटस चा, माध्यमांमध्ये असलेल्या दबदब्याचा वापर अशा कार्यक्रमांसाठी करणं, हे कोणत्यातरी टिनपाट पुरस्कारासाठी लॉबींग करणं, सहकलाकारांचा रोल कापून स्वतःचा वाढवणं, असल्या चाळ्यांपेक्षा कितितरी जास्त श्रेयस्कर आहे. म्हणून आमीरचं कौतुक. इतर सेलेब्रिटीजनी देखील यातून शिकण्यासारखं आहे. .

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणाच्याका कोंबडयाने होईना पण उजाडल्याशी कारण!! कार्यक्रम आवडला. बायकांनाच मुलाची भारी हौस आहे असं दिसलं...स्त्रीच स्त्रीची वैरी !! अवांतरः पैशाचं गणित हे असणारंच पण आमिर खानने कुठलातरी गेम शो करण्यापेक्षा हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं हेसुद्धा चांगलं लक्षण आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विविध समाज गटातील स्त्रियांचे अनुभव ऐकल्यानंतर पहिल्याच भागाने कार्यक्रम पाहणार्‍यांच्या मनात प्रश्नांचा कल्लोळ उठवला असेल.
अगदी असेच झाले. वर लेखात लिहिलेल्याप्रमाणे काही स्त्रियांचे अनुभव अंगावर येणारे होते आणि ते बघून काही वेळापुरती माझीच मनस्थिती बिघडली.
अमिरखान या कार्यक्रमाचा संचलन करणारा नसता तर कार्यक्रम किती लोकांनी कार्यक्रम पाहिला असता ?
हेच मत माझ्या नवर्‍याचेही पडले. याआधी इतर वाहिन्यांवरही अश्या प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत पण त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळालीच नाही. पण अमिर खानच्या निमित्ताने का होईना, थोडी जनजागृती झाली तर उत्तमच! तसेच या कार्यक्रमात समस्येचा सर्व अंगांनी विचार होण्याऐवजी चार पिडितांच्या दु:खाचा बाजार झाल्याचे किंचितसे वाटले. स्त्री-भ्रूणहत्येच्या समस्येचे बीज असणार्‍या आपल्या विवाह व्यवस्थेचा (ज्यात आई-वडिलांना मुलीच्या पालन-पोषण, शिक्षणावर खर्च करून, वर हुंडा देवून तिचे लग्न करून द्यायला लागते आणि पुढे तिच्याकडून कुठल्याही आधाराची अपेक्षा करता येत नाही) आजच्या एपिसोडमधे उल्लेखही झाला नाही. अनेक कुटुंबांत मुली नकोश्या होण्याला हे एक सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे असं मला वाटतं. अर्थात ही एक वेगळी समस्या म्हणून पाहिलं जात असेल तर पुढे काय बोलावं ते कळत नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शकाने अमिरखानचा उपयोग करायचे ठरवलेले दिसते. अमिरखानला मोठी रक्कम देऊन कार्यक्रमासाठी तयार केले आहे.
एपिसोडचे टायटल क्रेडिट्स तुमच्यासाठी इथे देतो. दिग्दर्शक :- सत्यजित भटकळ. (लगान पासून आमीर खान बरोबर काम करतो आहे) कोर क्रिएटीव्ह टीम :- आमीर खान, सत्यजित भटकळ , ... कल्पना आणि निर्मिती :- आमीर खान

कार्यक्रमाचे आवडलेले काही वेगळे मुद्दे
  • हा कार्यक्रम स्टार चा जरी असला तरी रविवारी सकाळी ११ वाजता दुरदर्शन वरही दाखवला जातोय.
  • आज कार्यक्रमात मागवलेल्या एस एम एस ची कॉस्ट ही फक्त १ रुपया आहे. साधारणता एस एम एस वाल्या रिअ‍ॅलिटी शोज साठी कॉस्ट ३-६ रुपये असते.
आमिर नसता तर हे कदाचीत घडले नसते.

कार्यक्रम बघताना काही वेळेला डोळे भरून आले. शेवटच गाणं तर मस्तच. हा कार्यक्रम ज्या लोकांना आजुबाजूला काय चाल्लय हे माहीत नाही/परीणामांची कल्पना नाहीये. आणि जे लोक हे सगळं कळत असूनही शाइनिंग इंडीया, उद्याची आर्थिक महासत्ता म्हणत डोळ्यावर कातडं ओढून मॉलमध्ये रमत आहे त्यांच्यासाठी आयओपनर असेल. पुढील पंधरा भागांची थीम काय काय असेल त्याची कल्पना आली आहे, पण कार्यक्रम बघण्याची उत्सुकता आहेच.

उपक्रम चांगलाच आहे पण आता या विषयावरचे कार्यक्रम पाहणार नाही असे ठरवले आहे. नंतर दोनेक दिवस फार वाईट वाटत राहते. काये ना की आपण मुलगा मुलगी हा भेद मानात नाही, जातियता मानत नाही, नोकराचाकरांना चांगले वागवायचे आणि पुन्हा वाईटही वाटून घ्यायचे. हा कार्यक्रम बघूनपु न्हा घरातल्या बायकांना राबवून घेणारे असतातच. त्यांचे काही म्हणता काही बिघडत नाही. निर्लज्जपणे आल्या प्रसंगात "हो, आम्ही तसेच आहोत." म्हणताना लाजा वाटत नाहीत. सगळा त्रास काय तो आपण करून घ्यायचा मक्ता घेतलेला नाही.

In reply to by रेवती

या विषयावरचे कार्यक्रम पाहणार नाही >>>>>>>>>>>> अवांतर : माझी अशीच परिस्थिती ज्यू होलोकॉस्ट वरचे चित्रपट पाहिल्यावर होते... मग आठवड्यात तसले चार पाच सिनेमे पाहून टाकतो.. ( मग त्या सिनेमाच्या अनुषंगाने गूगलून जी मिळेल ती माहिती काढणे ,वाचणे वगैरे) . मग रीतसर त्रास वगैरे होतो. .. मानवाच्या मनात असले टोकाचे विचार येतात आणि ऑर्गनाईज्ड आधुनिक मशीनरी वापरून अनेक माणसं या सार्‍या हत्याकांड घडवून आणण्याला साथे देतात , हे काही दशकांपूर्वी आपल्याच जगात खरोखर घडलेलं आहे; याचा प्रत्येक मानवाने विसर पडू देऊ नये, अस्लं काही डोक्यात यायला लागतं... त्या काळात घरी/ मित्रांच्यात वगैरे मी याच विषयावरती बोलायला लागतो ..... मग लगेच वाटतं, " एवढा त्रास होतो तर पाहायचे कशाला असले सिनेमे? आणि कशाला वाचायचं हे सारं?" ______________________________________

In reply to by रेवती

नोकराचाकरांना चांगले वागवायचे आणि पुन्हा वाईटही वाटून घ्यायचे. यावरून आठवले. नोकर चाकरांवर अन्याय होत असेलही, नाही म्हणत नाही पण हे नोकर चाकर विशेषतः मोलकरणी प्रचंड माजलेले आहेत. गॅस सिलींडरांची डिलीव्हरी देणारे भैय्ये, फर्निचर वस्तू घरी आणून पोचत्या करणारे हमाल. याबाबत २-३ किस्से असे १. आमच्या घरी भांडी घासणार्‍या बाईला विचारले माझे शर्टपॅट धुशील का? आणि त्याचे किती घेशील? तिने सांगितले १ वेळेला १० पँट, १० शर्ट धुण्याचे ९० रुपये. जर कपडे त्यापेक्षा कमी असतील तरी पैसे तेवढेच. विचार केला ९० रु. २० कपडे धुतले जात असतील तर चांगले आहे १ जोडी २ दिवस या हिशोबाने महीन्याभरा साठी पुरतील. चालेल. त्या महीन्यात २ वेळा तिला बोलावून पहिल्यांद २० कपडे आणि दुसर्‍यांदा १३च कपडे धुवून घेतले. एकून पैसे दिले १८० . म्हटले असूदे जरा जास्तच कपडे होते. पुढच्या महीन्यात तिला बोलावले तर सदर बाईंनी रेट डायरेक्ट वाढवून १७० रु एकावेळेचा करून टाकला होता. म्हणलं जवळ जवळ ८५ % वाढ एका महीन्यात? काय कारण? तर आमच्या शेजारच्या फ्लॅट मधे एक ये**वी आयटीवाली राहते तिला ४०००० पगार आहे तर ती या बाईला एका वेळेला १६०- १७० देते म्हणून हिला माझ्याकडूनही तितके पैसे पाहीजेत. मी म्हटलं माझे कपडे काही इतके मळके नसतात. परत तू साबण पण प्रचंड वापरतेस. मी काही इतके पैसे देणार नाही मला परवडत नाही. तर मला म्हणे "तुम्ही इतके पैसे कमावता मग आम्हाला थोडे द्यायला काय होतंय?" त्यावर प्रचंड संतापून मी म्हणलं "आम्ही दिवसातले १२-१२ तास सुधा ऑफिसमधे थांबतो. दिलेल्या वेळा पाळतो. तुला कामाला बोलावले तर १० येते सांगून दुपारी २ ला येतेस. न सांगता खाडे करतेस. तेव्हा भांडी आम्हीच आमची घासून घ्यायची. मस्ती आली आहे तुम्हाला. आमच्या सारखी मर मर करून कामं करा म्हणजे कळेल. तुमची ज्वारी १६० रु किलो झाली की मग उतरेल मस्ती तुमची". २. अशीच पैशाची मागणी सिलिंडर आणून देणारा मनुष्य करत असे. त्याला चांगलाच फटकारला. पैसे दिले नाहीत तर हा मुद्दामहून सिलिंडरची डीलीव्हरी द्यायचा नाही. डीलर कडे घरात कोणी नव्हते असे रीपोर्टींग करायचा (अर्थात हे डीलरकडे जाऊन विचारल्यावर कळले). मग एक दिवस त्याची रीतसर कंप्लेंट करून त्याच्या नोकरीवर गदा आणली मग कुठे जरा सुधारला.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अरे पुपे, तुझं सगळं म्हणणं मान्य आहे बाबा, पण आजकाल त्यांना लाडीगोडी लावली नाही तर कामं करत नाहीत. शिवाय मला म्हणतात की ताई, तुमचं काम वर्षातून चार पाच दिवस, तुम्ही इथं विमानात बसून येता, आम्ही चालत येतो मग द्याकी पैसे! तरीही त्यांचा वाट्टेल तसा अपमान करणं जमतं का? तुझं एक ठिके ब्याचलर मनुष्या! संसारी लोकांना कसं जमावं असं वागणं . ;) त्यावर वेगळा धागा सुरु केला तर कमी का प्रतिसाद येतील पण मोह आवरते. ;)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आम्ही वर्षानुवर्षे हरियाणात रहात आहोत, महाराष्ट्रात रहायला मिळत नाही, म्हणून वाईट वाटून घेत. परंतु हे असे अनुभव ऐकून वाटले, इकडले लोक त्यामानाने पुष्कळ बरे आहेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कुठेही जा जस्तीच्या वरच्या पैश्यांसाठी तोंड वेंगाडणं आहेच. सिग्नलवरच्या भिकार्‍यापासून डिलीवरी बॉइज पर्यंत, रिक्षावाल्यांपासून ते देवळातल्या पुजार्‍यांपर्यंत. (बंगळुरूच्या नंदी टेंपलमध्ये प्रदक्षीणा मारत असताना माझ्यापुढं काही परदेशी नागरीक होते. त्या मुख्य पुजार्‍याने ताटात दोन-चार शंभरच्या नोटा ठेउन "ब्लेसिंग्स, ब्लेसिंग्स" म्हणत अक्षरशः भीक मागयला सुरुवात केली. त्यांच्या मागोमाग मी येत होतो, त्याला म्हणालो, त्यापेक्षा तीथं बाहेर पायर्‍यांवर बसून भीक माग. नंतर शिवीगाळ होउन मारहाणीपर्यंत प्रकरण गेलं होतं, असो) त्यांची गरीबी वगैरे मान्य केली तरी कधिकधी असह्य होतं. इतकी लाचारी बघून आपणच लाचार होतो,आणि बहुतेक वेळा पैसे देतो. :(

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तुमची ज्वारी १६० रु किलो झाली की मग उतरेल मस्ती तुमची
पुपेजी, खरे आहे तुमचे. अन मला मान्यही आहे. रेशनवर स्वस्तात धान्य, राजीवगांधी विम्यात फुकट औषधोपचार, घरकुले फुकट झोपडपट्टी निर्मूलनात.. इ. इ. खरंच मातले आहेत हे लोक. मग मी ही सगळ्याच सबसिड्या सरकारने काढून टाकाव्यात या मतापर्यंत येतो. मग सगळा लोचा होतो.. मग तिथे ग्यास अन पेट्रोल महागले म्हणून आपणच हळहळतो. मुळापासून सगळे इलाज करण्याची गरज आहे. त्यात प्रत्येकालाच झळ बसेल, ती सोसायची तयारी हवी!

ओ री चिरैया नन्हीसी चिडिया अंगना में फिर आ जा रे अंधियारा है भरा और लहू से सना किरनोंके तिनके अंबरसे चुनके अंगना में फिर आ जा रे हमने तुझपे हजारो सितम है किये हमने तुझपे जहांभरके जुल्म किये हमने सोचा नही , तू जो उड जायेगी यह जमीं तेरे बिन सूनी रह जायेगी किसके दमपे सजेगा मेरा अंगना तेरे पंखोमें सारे सितारे जडूं तेरी चूनर थनक सतरंगी बुनूं तेरे काजलमें मैं काली रैना भरूं तेरी मेहंदीमें मैं कच्ची धूप मलूं तेरे नैनो सजा दू नया सपना ओ री चिरैया, मेरी चिरैया अंगना में फिर आजा रे ओ री चिरैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आजा रे ओ री चिरैया

आताच कार्यक्रम पाहिला. प्रश्नाचा सर्व बाजूनी विचार केला आहे. आमिरचा कार्यक्रम म्हटल्यावर हे अपेक्षितच होतं. पुढचे कार्यक्रम असेच उत्तम असणार यात काही शंका नाही. स्त्री भ्रूणहत्या हा प्रश्न गावांपेक्षा शहरातच जास्त असावा सं वाटलं, कारण गावांमधे अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध नसावेत. कार्यक्रमातल्या भाग घेतलेल्या महिलांवर घरातल्या मंडळीनी जबरदस्ती केली होती, पण माझ्या माहितीतल्या काही घरातून सुशिक्षित, नोकर्‍या करणार्‍या स्त्रियानी आपणच हे प्रकार करून घेतलेले माहिती आहेत. अमूक एका गटाकडूनच असे प्रकार होतात असं म्हणण्यात काही अर्थ नाही. खेडेगावात प्रॅक्टिस करणार्‍या सातीचे या विषयातले अनुभव वाचायला आवडतील. भडकमकर मास्तर, गाण्यासाठी धन्यवाद!

अतिशय सुंदर कार्यक्रम!! अवघ्या १३ भागांसाठी घेतलेली २ वर्षांची मेहनत कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात दिसुन आली. तद्दन भिकारड्या सास-बहुच्या सिरियल्स, तसेच उगाच भंपकपणा दाखवणार्या रिअॅलिटी शोंपेक्शा आमीर खानचा 'सत्यमेव जयते' नक्कीच कौतुकास्पद आहे.

.

हा कायक्रम पाहून मला लहानपणी पाहिलेल्या आव्हान ह्या मराठी मालिकेची आठवण झाली. हुंडा बळी ह्या विषयाला वाचा फोडण्यासाठी भेंडे ह्यांनी ही मालिका काढली. ह्या मालिकेचा परिणाम व जनजागृती होऊन समाजात विवाहित बायका जळून मारण्याचे प्रमाण लक्षणीय घटले. आता ह्या कार्यक्रमामुळे एक मात्र नक्की होईल की तलाश वर राजस्थान मध्ये बंदी येईल.

कालच हा कार्यक्रम पाहिला.अतिशय दर्जेदार कलाकृती आहे. अर्थात, आमिर खान असल्यावर दर्जाबाबत शंका घेण्याचे कारणच नाही. कार्यक्रमावर ओप्रा विन्फ्रेचा प्रभाव मात्र प्रकर्षाने जाणवला.

की आमीर खान आहे. समजा हाच शो शाहरुख खानने सादर केला असता तर.....................................( नैइइइइइइइइइइइइइइइइइइइ केह दो कि ये झुट है.)

In reply to by इरसाल

माझ्या मते तरी शाहरुख खानाला तरी असे कार्यक्रम करणे झेपणार नाही असो हे माझे वैक्तिक मत आहे

सर्वात महत्वाचा भाग हा वाटला की बहुतेकांची असलेली समजूत चुकीची ठरली.. या गुन्ह्यात अल्प उत्पन्न गट, ग्रामीण भाग, अल्प शिक्षित लोक यांचा सहभाग जास्त नसून शहरी भागातील सुशिक्षित लोक जास्त सहभागी आहेत!!!

"सत्यमेव जयते" कार्यक्रम खरोखरच एक उत्तम निर्मिती आहे, त्यात आमीर खान असल्याने नक्कीच तो त्याचे चीज करेल. :) कार्यक्रम पाहताना अनेकदा डोळे भरुन येत होते. :( त्या तीनही स्त्रीयांना ज्यांनी स्वतःचा विचार न करता, आपल्या मुलींसाठी जे काही सोसले व खंबीरपणे मुलींचे पालनपोषन करत आहेत त्यांना मनापासून सलाम. "सत्यमेव जयते" निमित्ताने भारतात सर्वत्र कन्या भ्रुणहत्तेविरुद्ध जनजाग्रुती व्हावी आणि भ्रुणह्त्या करणारे डॉक्टर, करुन घेणारे पालक यांना त्वरीत शिक्षा व्हावी अशी खुप तळमळीने इच्छा झाली. चला तर सुरुवात आपल्यापासून करुया. :) ओ री चिरैया, नन्ही सी चिडीया घर आजा रे.......

मागे वाचले होते कि एका पुण्यातील कंपनी ने कोल्हापूर जिल्ह्याच्या पायलट प्रोजेक्ट साठि एक यंत्र बनवले होते. हे यंत्र अल्ट्रासाऊंड मशीनला जोडले जाते आणी जर कुणी लिंग तपासणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची नोंद होते. हे कितपत यशस्वी पणे राबवले जातेय याचि कल्पना नाहि. याच प्रकारे जर अल्ट्रासाऊंड मशीन मूळे जर सोय झाली असेल लिंग तपासणी ची तर सरकारने त्यातील लिंग तपासणी ची सुविधा बंद करण्याचे निर्देश या कंपन्यांना दिले तर ह्यावर मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकेल. जिथे जिथे हि तपासणी वैदयकिय गरज म्हणून आहे , तिथे मोजक्या ठिकाणी ऊपलब्ध करून त्यावर कंट्रोल ठेवता येऊ शकेल.

२ वर्षापूर्वी झी मराठीवर 'याला जीवन ऐसे नाव' नावाचा रेणुका शहाणे यांचा Talk शो होता.तो पण असाच ह्रीदयस्पर्शी शो होता.पण यात सामाजिक सामाजिक विषय/मुद्दे नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशश्वी झालेल्या आणि त्यांना मदत केलेल्या लोकांना शो मध्ये बोलावलं जायचं.सत्यमेव जयते साधारण तसाच वाटला...

आमीरचा कार्यक्रम आवडला. त्यांत सत्यावर झगझगीत प्रकाश तर टाकला आहेच पण हा प्रश्न का निर्माण झाला तेही दाखवले. तसेच केवळ निराशावादी सूर न लावता पंजाबातील गावात या रानटी प्रथेविरुद्ध जे सकारात्मक प्रयत्न झाले ते पण दाखवले. पहिला भाग तर मन जिंकून गेला.

कार्यक्रम आवडला. कार्यक्रमाच्या आड व्यावसायिक गणित दडलेली असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे? मला वाटते हे एक उघड गुपित आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

कार्यक्रमाच्या आड व्यावसायिक गणित दडलेली असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे
करेक्ट! एकतर 'शिवाजी जन्मावा तो दुसर्‍याच्या घरात आणि जन्माला आला रे आला की त्याने लगेच लष्कराच्या भाकरी भाजाव्यात' ही अपेक्षा कशी काय रास्त असू शकेल ? - (व्यावसायिक + सामाजिक) सोकाजी

In reply to by अप्पा जोगळेकर

कार्यक्रमाच्या आड व्यावसायिक गणित दडलेली असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचे काय कारण आहे ? सहमत आहे. उगाच आपण कशाला कोणाला किती पैसे मिळतात वगैरे चर्चा करायच्या ? . याच्यामागे काही व्यावसायिक गणितं आहेत काय ? कोणी छोटा पडदा कॅश करण्याचा प्रयत्न करत आहे का ? स्टारवाल्यांना किती मिळतील, लगान टीमला किती मिळतील ? आपल्याला एका सामाजिक प्रश्नाची डोळ्यात अंजन घालणारी ओळख करुन दिली जात असतांना एक स्टार कलाकार सामाजिक विषयाला हात घालत असतांना लोकांना उगीच का पोटदूखी होते काही कळत नाही. :) -दिलीप बिरुटे

मेडिकल टुरिझम मुळे परदेशी लोक भारतात येत असतांना अनेक भारतीय परदेशात म्हणजे इंडोनेशिया व बेन्कोक मध्ये जात्तात. कारण येथे ह्या चाचण्या करता येतात आणि बिन भोपट शस्त्रक्रिया एकाच पेकेज मध्ये व परत भटकंती महाराष्ट्रातील प्रगत भागात ह्या हत्या वाढल्या. आणि मुलींचा टक्का घसरला पण महाराष्ट्रातील जेष्ठ व दृष्ट्या नेत्याने हरयाणा व राजस्थान मधील भीषण परिस्थिती पाहून आपल्या भागात हि वेळ येऊ नये म्हणून भ्रूण हत्येबाबत जागृत्ती सुरु केली आहे. देर आये ,लेकीन दुरुस्त आये असेच म्हणावे लागेल.

In reply to by निनाद मुक्काम …

पण महाराष्ट्रातील जेष्ठ व दृष्ट्या नेत्याने हरयाणा व राजस्थान मधील भीषण परिस्थिती पाहून आपल्या भागात हि वेळ येऊ नये म्हणून भ्रूण हत्येबाबत जागृत्ती सुरु केली आहे.
कोण हो?

लोकशिक्षण हे विविध प्रकाराने सारखे करावे लागते. एखादी गोष्ट पब्लीकने ऐकावी म्हणून सातवेळेस सांगावी लागते असे काहीसे समाजशास्त्रीय सांख्यिकी आकडा येथे ऐकला होता. खरे-खोटे माहीत नाही. तो मुद्दा नाही तर बर्‍याचदा सांगावे लागते इतकाच मुद्दा आहे. आमिर खानने जर स्वत:चे नाव वगैरे वापरून जर समाजातील दोषांवरचे पांघरूण दूर केले लोकांना समजेल अशा भाषेत सांगितले तर चांगलेच आहे. त्याची इतरांनी कॉपी करायचे ठरवले तरी उत्तमच आहे... पब्लीकला केवळ जाहीरातीतून खरेदीदार करण्याऐवजी जरा जबाबदारी शिकवणारे हे कार्यक्रम आहेत. दूरदर्शनच्या आधी जेंव्हा आकाशवाणी केंद्र चालू झाले तेंव्हा त्याचे ध्येयवाक्य हे "बहुजन हिताय बहुजन सुखाय " असे ठेवले गेले होते. ते वास्तवीक केवळ आकाशवाणीचे नव्हते तर भारतातील "पब्लीक ब्रॉडकास्टींग"साठीचे ध्येयवाक्य होते. मला वाटते असले कार्यक्रम हे ध्येयवाक्यास योग्य ठरतात... ८०च्या दशकात जेंव्हा दूरदर्शनवर मालिका चालू झाल्या, जाहीराती आल्या तेंव्हा मनोरंजन+लोकशिक्षण अशा दुहेरी कार्यंक्रमांसाठी बराच वापर झाला... त्यात या क्षणाला आठवणारे लोकप्रिय कार्यक्रम महणजे: प्रिया तेंडूलकरची "रजनी", हुंडाबळीवरील "आव्हान" ही मालीका, किरण बेदीच्या जिद्दीवरून तयार केलेली "उडान", शहारूख खानने पहीले काम केलेली "फौजी", "बोल बाबी बोल" या नाटकावरून (नाव आठवत नाही पण) १०-१२च्या प्रवेशावरून होणार्‍या मुलांच्या छळणुकीवरची मालीका, कॉलेजमधील ड्र्ग्जच्या व्यसनावरील तसेच इतर समस्यांवरील "चुनौती" असे अनेक काही आठवते... त्यातील काही फिल्मी होते पण काहीतरी विचार करायला लावणारे देखील होते. नंतर हळू हळू अनेक चॅनल्स आले आणि वास्तवातल्या भृणहत्यांकडे दुर्लक्ष होऊन सास-बहुंनी टिव्हीचा कब्जा करून खर्‍या अर्थाने "इडीयट बॉक्स" केला... जर सत्यमेव जयतेच्या निमित्ताने त्यात बदल होत असेल तर ते स्वागतार्हच आहे.

आमचा ई मेल गेला. --------------------------------- माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन. विषय : स्त्रीभ्रुणहत्येविरोधात गांभिर्याने दखल घेणेबाबत संदर्भ : देशभर प्रसारीत झालेला कार्यक्रम सत्यमेव जयते- भाग १ Daughters are precious महोदय, काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरुन सत्यमेव जयते या मालिकेचा पहिला भाग प्रसारीत झाला. त्यात आपल्या देशात आणि आपल्या राज्यात होत असलेल्या स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने मी आपणास खालील विनंती करत आहे.. १. सामाजिक संस्थानी स्टिंग ऑपरेशन द्वारे शोधलेल्या दाव्यांचीसुनावणी जलद गतीने व्हावी. २. गुन्हे शाबीत झालेल्या लोकाना शिक्षा सुनावल्या असतील तर त्यांची अंमलबजावणी त्वरीत करणेत यावी. ३. स्त्रीभ्रूणहत्येविरोधात व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्यावी. यात स्त्री भ्रूणहत्येचे समाजावरील दुष्परिणाम आणि हा गुन्हा केल्याबद्दल दिली जाणारी शिक्षा यांचा प्रामुख्याने उल्लेख असावा. धन्यवाद. आपला विश्वासू, ------------------------------------------------------------------------------------ http://www.sarkaritel.com/states/chief_ministers.php इथे ई मेल आय डी मिळाला. आमीर खान , सत्यमेव जयते, स्टार यांचे ई मेल मिळू शकतील का, त्याना सी सी पाठवायची आहे.

Manjusha Thatte Joglekar यांची मूळ पोस्ट आहे मी इथे फक्त शेअर केली ६ मे ला रविवारी आमीर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम काय संपला आणि फेसबुक, ट्विटर पासून दूरदर्शनवरील विविध वाहिन्या सगळीकडे या आमीर खानचा नुसता उदो उदो. जसं काही श्री. विष्णूंनी या आमीरच्या रुपानी अवतारच घेतलाय आणि नुसता त्याला पाठिंब्यावर पाठिंबा. का ? कशासाठी हा उदोउदो ? काय महान कार्य केलंय या आमीर खानने ? या कार्यक्रमाची एव...ढ्या मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली होती आणि त्याचे सादरीकरण खुद्द मि. परफेक्शनिस्ट करणार आणि त्यात रविवार त्यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या दणक्यात होणार हे स्वाभाविकच होतं. मी स्वतः आमीर खानची चाहती आहे. पण जर नीट विचार केला तर या कार्यक्रमासाठी आमीरला एवढं डोक्यावर घेण्याची खरंच गरज आहे ? एक तर आमीर खान हा या फिल्मी जगतातला एकमेव नाही की जो समाजासाठी काही कार्यक्रम करत आहे. वारंवार समाजकार्य करणाऱ्या वेगवेगळ्या कलाकारांची नावं ही पुढे येतंच असतात. पण हा आमीर खान समाजकार्य करत आहे हे कसं म्हणता येईल ? कारण हा कार्यक्रम योग्य तो मोबदला घेऊनच तो करत आहे. समाजकार्य कारायचं म्हणून तो विनामूल्य किंवा अत्यल्प मोबदला घेऊन नक्कीच करत नाही. त्यामुळे जशा त्याच्या फिल्म्स, जाहिराती तसाच हा कार्यक्रम. त्यामुळे तो समाजासाठी काही फार मोठं करत आहे हे असं आजिबात नाही. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात स्त्रीभ्रूणहत्या सारखा एक मोठा ज्वलंत आणि चिंतेचा सामाजिक प्रश्न मांडला गेला. आता या पहिल्या भागाचा परिणाम समाजावर किती झाला आहे म्हणजेच या पहिल्या भागाला यश किती मिळालं आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा या कार्यक्रमामुळे या स्त्रीभ्रूणत्येचं प्रमाण कमी होईल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे आमीर खान. या कार्यक्रमाचे १३ भाग प्रसारित केले जाणार आहेत आणि त्यात वेगवेगळे सामाजिक विषय हाताळले जाणार आहेत. हे सर्व भाग आमीर खान सादर करणार आहे. सामाजिक विषयांवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमीर खान सारखा एक अभिनेता करणार, हो अभिनेताच कारण जसा तो चित्रपटांमध्ये अभिनय करतो तसाच तो या कार्यक्रमात अभिनय करणार. कारण एक माणूस म्हणून हा आमीर खान अशा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी आजिबात योग्य नाही. आपल्या घरच्यांचा, आईवडिलांचा विरोध पत्करून एक महिला या आमीर खान बरोबर लग्न करते. त्यांना दोन मुलेही होतात. हा असा संसार चालू असताना हा आमीर खान या महिलेला टाकून म्हणजे चांगल्या शब्दात सांगायचं तर घटस्फोट घेऊन सरळ दुसरा संसार थाटतो, असा माणूस काय सामाजिक प्रश्न कार्यक्रमात सादर करणार ? हा शब्द वापरू नये पण त्याची काय लायकी आहे हा कार्यक्रम सादर करण्याची ? उद्या या कार्यक्रमात घटस्फोटीत महिलांचा प्रश्न हाताळला गेला तर हा प्रश्न या आमिरने सादर करावा ? काही नाही हा फक्त इतर कार्यक्रमांसारखा फक्त व्यावसायिक दृष्टिकोन आणि टी.आर.पी. हे डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेला कार्यक्रम आहे. त्याला या प्रसिद्धीमाध्यमांनी नको तेवढं डोक्यावर घेतलंय बस्स.

In reply to by अविनाशकुलकर्णी

हे सगळे खान एकाच माळेचे मणी आहेत.. सलमानने काय केले हे तर आपणा सर्वांना माहितच आहे. आणी ईतर सगळे खान आधी हिंदू मुलींशी लग्न करून आणि मग तिला घट्स्फोट देवून इतर मूलींशी लग्न करायला मोकळे झाले. ह्यातल्या एकालाही लग्न टिकवता आले नाही आणि लोकांना अक्कल शिकवायला निघाले. दुनिया झुकती है.झुकाव... स्साला आपून तो टी.व्ही, और ये खान लोगोंका पिक्चर देखताच नही है.गांधी बाबांचे असहकार तत्व. आपण काही ह्या पापात सहभागी होणार नाही.

In reply to by मुक्त विहारि

मग ह्या खान मंडळींनी काय राज कपूर चा आदर्श बाळगायला हवा होता का म्हणजे नर्गिस वर अमाप प्रेम करून स्वतःच्या बायकोला सोडचिठ्ठी न देता तिची रवानगी जशी त्यांच्या कॉटेज मध्ये हलविण्याचा त्याचा बेत होता तर तिला हक्काचे आणि मानाचे स्थान हवे होते. का हिंदू सुपर स्टार अमिताभ सारखा सिलसिला करायचा होता. अमीर ची दुसरी बायको सुद्धा हिंदूच आहे. तर शाहरुख बायकोसोबत प्रामाणिक आहे. व त्यांचा करण अर्जुन ह्या हिंदू जिवलग मित्रांशीसुद्धा सलमान तर हिंदू व मुसलमान सगळ्याच मैत्रिणींवर त्याच्या (आजी माजी )अजूनही सारखाच प्रेम करतो. तेव्हा ह्याबाबतीत उगाच धर्म आणू नका

In reply to by निनाद मुक्काम …

तेव्हा ह्याबाबतीत उगाच धर्म आणू नका प्रिय अमीर खान याने एका हिंदू मुलीशी लग्नं करणार्‍या मुसलमान मुलाला त्या मुलीच्या घरच्यांनी ठार मारलेले दाखवले. त्याच्या आईला शोमधे बोलावून तिच्या कडून रडून घेऊन भावनिक आवाहन वगैरे केले. हे सारे बघताना आम्हाला अत्यंत आनंद झाला. चला म्हणलं कुठेतरी हिंदू जागृत आहेत. अमीर महाशयांनी याच्या उलट्या केस मधे म्हणजे जिथे मुलगा हिंदू होता आणि मुलगी मुसलमान होती तिथे मात्र मुलगा जिवंत असल्याची केसच दाखवली होती. मुलालाही मारले गेले आहे अशा केसेस कोकणात देखील पुष्कळ मिळाल्या असत्या. (तो आमीर पक्का भारतभरात गेला पण कोकणात नाही आला! ;) ) सदर अमीर महाशयांचे लक्ष लव्ह जिहाद या संकल्पनेकडे गेले नाही काय? गेले असेल तर ते तितके सिरीयस वाटले नाही काय? जर खरोखर त्यांचे विचार समतोल असतील तर याविरुद्ध आवाज उठवासा वाटला नाही का? का हिंमत नाही तेव्हढी?