Skip to main content

पाऊली यांचा वगळ सिद्धांत

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 25/04/2012 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊली यांचा वगळ सिद्धांत (अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल) त्या काळी एन्रिको फर्मी, वुल्फगँग पाऊली ह्या ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञाच्या, अलीकडील एका संशोधनाबाबत विचार करत होते. पाऊली एकेकाळी मॅक्स बॉर्न ह्यांचे सहकारी होते. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या आण्विक विजकांच्या हालचालींचा अभ्यास करत असतांना, पाऊलींनी असे निरीक्षण केलेले होते की, एका कक्षेत केवळ एकच विजक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत. फर्मींना हे समजले की, ही घटना प्रत्येक अणूत, याआधी लक्षात न आलेली आणखी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सूचित करत आहे. वायूतील अणू हे घनातील अणूच्या मानाने अभ्यासास जास्त सोपे असतात, म्हणून त्यांनी वायूतील अणू आणि त्यांतील कणांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. फार फार पूर्वी त्यांनी "परिपूर्ण" वायूची कल्पना केलेली होती. खरेखुरे वायू अनिश्चित स्वरूपाच्या बाह्य बलांनी बाधित होतात. त्याउलट "परिपूर्ण" वायू स्थिरपद राहत असावेत अशी त्यांची कल्पना होती. अशाप्रकारचा "परिपूर्ण" वायू, अणू आणि विजकांच्या वर्तनांचा अभ्यास करण्यासाठी आदर्श पर्यावरण ठरू शकतो. प्रारणांनी उत्सर्जित ऊर्जेचे त्यात निरीक्षण करता येते आणि ती मोजताही येते. पण अशा वायूचे नियमन कुठल्या नियमांनी होत असावे? त्या नियमांत आणि पाऊलींच्या संशोधनात काय संबंध असावा? गप्पा मारत मारत, फर्मी आणि त्यांचे मित्र फ्रँको रासेट्टी एव्हाना डबक्यापाशी पोहोचलेले होते. त्यांनी त्यांचे सोबत दोन लांब दांडे आणलेले होते. प्रत्येकाच्या टोकाशी रेशमी दोरीचा सरफास बांधलेला होता आणि त्याच्या टोकाशी मासेमार लोक बांधतात तशा पद्धतीने लहान सहान किटकांचे आमिषही बांधलेले होते. ते डबक्याच्या कडेला भुकेल्या सरड्यांनी आमिषांवर झडप घालण्याची वाट पाहत बसून राहिले. "सरडा अगदी समोरच आहे," रासेट्टी कुजबुजले. "ईशान्येकडे सरकत आहे. वेग शून्य दशांश एक सात नॉटस्." फर्मींनी तेवढ्यात असे काही पाहिले होते, ज्याकडे रासेट्टींचे लक्षच गेलेले नव्हते. दुसरा एक लहान सरडा, त्याच आमिषाकडे समांतरपणे सरकत होता. त्यांनी एकाच वेळी झेप घेतली. मोठ्या सरड्याने आमिष पकडले. रासेट्टींनी दोऱ्याला झटका दिला, फास आवळला आणि मोठा सरडा गिरफ्तार झाला. मात्र झेपावणारा लहान सरडा थोडा कमी पडला. आणि मागे वळून पळून गेला. हो! खरेच आहे!! कुठलेही दोन विजक एकाच कक्षेत राहू शकत नाहीत. कारण कुठल्याही दोन विजकांची पुंज स्थिती सारखीच नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ते एकाच आकाराचे नसतात. किंवा त्यांचे तापमान सारखेच नसते, किंवा त्यांचेवरील विद्युत अधिभार सारखाच नसतो, अथवा ह्या तीन्ही गोष्टी असतात. हेच काही मुद्दे विजकांची कक्षा ठरवत असतात. फर्मींचे मन धावत होते. आधीच ते त्या "परिपूर्ण" वायूच्या संदर्भात विचार करत होते, जो त्यांनी एकल अणूचा मानला होता. त्याच्या अणूतील विजक कसे वागत असावेत. मग फायरेंझमध्ये परतल्यावर पुन्हा, त्यांनी लगेचच "परिपूर्ण एकल वायूच्या पुंजीकरणाबाबत" नावाचा शोधनिबंध लिहायला घेतला. त्या शोधनिबंधात काढलेले निष्कर्ष आजही धातुवैज्ञानिक आणि अभियंते अनुसरत आहेत. इतर गोष्टींसोबतच, त्यात विविध धातू किती चांगल्या वा वाईट प्रकारे उष्मा वा विद्युत वहन करतात ते निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. फर्मींचे निष्कर्ष वैध होते आणि आजही आहेत. एवढेच नव्हे तर आणखीही एका शास्त्रज्ञांनी -पॉल डिरॅक ह्यांनी- स्वतंत्रपणे तेच आकडे शोधून काढले होते. ह्याच सूत्रांना अजूनही "फर्मी-डिरॅक संख्यांकने -Fermi-Dirac Statistics-" म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या नियमांचे अनुसरण करणाऱ्या वायूकणांना "फर्मिओन्स" म्हटले जाते. हा लेख, “एन्रिको फर्मी: अणुयुगाचा प्रणेता [१]” ह्या पुस्तकातील एका उतार्‍याचा मराठी अनुवाद आहे. पूर्वप्रसिद्धीः मनोगत डॉट कॉम ०६-०२-२००८ [१] एन्रिको फर्मी: अणुयुगाचा प्रणेता (Enrico Fermi: Pioneer of Atomic Age), मूळ इंग्रजी लेखक: टेड गॉटफ्रीड, मालिका: आधुनिक युगाचे कर्ते (Makers of the Modern Age), प्रकाशक: युनिव्हर्सिटी प्रेस, प्रकाशन काल: १९९९, वितरक: ओरिएंट लाँगमन लिमिटेड, किंमत: रु.१२५/- फक्त.

वाचने 16171
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

छान लेख गोळेकाका. पण प्रत्येक शब्दाला मराठी शब्द देण्याच्या अट्टाहासापायी भाषा जास्त बोजड बनत आहे. उदा. वगळ, विजक, एकल अणू, पुंज स्थिती इ. त्याऐवजी मराठीत रूळलेले इंग्रजी शब्द वापरलेत (उदा. इलेक्ट्रॉन इ.) तर लेख अधिक सुघड होईल. अर्थात ही टीका नसून सूचना.

In reply to by कुंदन

असेच म्हणतो. "वगळ सिद्धांत" वाचून कुठल्यातरी आश्रमात महर्षी वृक(वुल्फ्)गांगेय पाउलिन हे शिष्यांना वस्त्रगाळ पूड वगैरे करायला सांगून सहाणेवर गंध उगाळत आहेत असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले!! (तसेही आमच्या प्राचीन ऋषींना सर्व शास्त्रे येतच होती, क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे कोणत्या सूक्तातली ऋचा ;))

In reply to by बॅटमॅन

(तसेही आमच्या प्राचीन ऋषींना सर्व शास्त्रे येतच होती, क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे कोणत्या सूक्तातली ऋचा ) ख्‍या: ख्या: ख्या: ! कणादाने (कणदच ना हो तो? ) तर अणव: अणव: करीत जीव सोडला म्हणे ;-)

In reply to by यकु

कणव(कणाद+अणव) हा शब्द तिथूनच आला काय हो :P @ गोळेकाका: ह. घ्या. लेख उत्तम विषयावर आहे, अजून विस्तार आवडला असता नक्की.

In reply to by बॅटमॅन

असेल .. असेल... ;-) तूर्तास मिपासंस्‍थापक तात्यासाहेबांची न्यूटन वरची एक फेसबुक प्रसिद्ध टिप्पणी पुन्यांदा आठवून ख्‍या: ख्या: ख्‍या: हसत आहे ;-)

वल्ली, कुंदन आणि बॅटमन प्रतिसादांखातर मन:पूर्वक धन्यवाद! वल्ली, मराठी शब्द देण्याच्या अट्टाहासापायी भाषा जास्त बोजड बनत आहे. >>>> बनत नाही आहे. ती आहे तशीच आहे. आपण विसरलो तरी ती कशी बदलेल अचानकच? त्याऐवजी मराठीत रूळलेले इंग्रजी शब्द वापरलेत (उदा. इलेक्ट्रॉन इ.) तर लेख अधिक सुघड होईल.>>>> फार फार वर्षांपूर्वी गंभीर लेखन संस्कृतात केले जाई. बहुसंख्यांना ते फारसे कळत नसे. मग काही काही लोक असे म्हणू लागले की अस्सल"मागधी" म्हणजे संस्कृत, सगळ्यांना थोडीच समजते? मग अर्धे-मागधीत आणि अर्धे प्राकृतात लिहिले तर सुघड होईल. अशा रीतीने अर्धमागधी भाषेचा जन्म झाला. तुम्ही म्हणता तसे केल्यास अर्ध-मराठी भाषेचा जन्म होण्याची चिन्हे मला दिसत आहेत.

In reply to by नरेंद्र गोळे

मराठी संस्कृतोद्भव, प्राकृतोद्भव असून फारसी, अरबी, तसेच इतरही अनेक भाषांतील शब्द घेऊन तयार झाली आहे. ज्ञानेश्वरीतील मराठी, शिवकालीन मराठी, स्वातंत्र्यपूर्वकालीन मराठी तसेच आजची मराठी बघितलीत तर भाषा सतत बदलत आली आहे. किंबहुना सतत बदलत असल्यानेच ती आज जिवंत आहे. भाषा जितकी सोपी होईल तितके चांगले. उगाच क्लिष्ट करण्याचा प्रयत्न कशाला? असो. चांगल्या लेखात विषयांतर होत असल्याने माझा पूर्णविराम.

गोळे काका, सरड्यांवरचे प्रात्यक्षिक = विजकांबद्दलचे अनुमान सरडे जीव असल्याने प्रात्यक्षिक आणि अनुमानातील संबंध कळला नाही.

In reply to by यकु

सरडे जीव असल्याने प्रात्यक्षिक आणि अनुमानातील संबंध कळला नाही.
एक आमिष एकाच सरड्याला (/प्राण्याला) मिळाले त्याप्रमाणेच दोन फर्मिऑन एकाच जागेवर दावा ठोकू शकत नाहीत. एक कक्षा => एकसमान ऊर्जा => एकच इलेक्ट्रॉन (/फर्मिऑन).

In reply to by नरेंद्र गोळे

एक आमिष एकाच सरड्याला (/प्राण्याला) मिळाले त्याप्रमाणेच दोन फर्मिऑन एकाच जागेवर दावा ठोकू शकत नाहीत. एक कक्षा => एकसमान ऊर्जा => एकच इलेक्ट्रॉन (/फर्मिऑन).
पण फर्मिऑन जीव थोडेच आहेत?

In reply to by नरेंद्र गोळे

तसे कोण म्हणतंय?
कुणी म्हणत नसेल, पण कथा कुणीकडे जातेय ते पहा ना. माझी अडचण ही आहे की सरड्यांच्या ( जीव) वर्तनावरचे प्रात्यक्षिक फर्मिऑन्स (निर्जीव म्हणू का? ) च्या वर्तनाचा अंदाज लावण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते?

In reply to by यकु

यकु, संवादात रुची राखत आहात ही आनंदाची गोष्ट आहे. निर्जीवांच्या वर्णनाकरता केवळ सजीवांचे रूपक वापरलेले आहे. त्यांच्या वर्तनाचा अंदाज बांधायचे साधन म्हणून वापर कुठेच केलेला नाही.

In reply to by यकु

सरड्यांच्या ( जीव) वर्तनावरचे प्रात्यक्षिक फर्मिऑन्स (निर्जीव म्हणू का? ) च्या वर्तनाचा अंदाज लावण्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकते?
सामान्यतः उपयुक्त नाहीच. म्हणूनच भौतिकशास्त्राच्या पुस्तकात एक्सक्लूजन तत्त्व शिकवताना अशी तुलना देत नाहीत. भौतिकशास्त्राच्या इतिहासाबद्दल लिहीताना या घटनेचा उल्लेख होतो. स्वतःचं शेपूट खाणारा साप स्वप्नात पाहिल्यानंतर केक्यूलेला बेन्झिनच्या रेणूची रचना अशी असू शकते याचा साक्षात्कार झाला. स्वतःचं शेपूट खाणारा साप प्रत्यक्षात कदाचित अस्तित्त्वातही नसेल. संशोधकाला काय पाहून त्याचा संबंध आपल्या डोक्यात सुरू असणार्‍या प्रश्नाशी लावता येईल याचा अंदाज खुद्द संशोधकालाही नसतो.

काका, अजुनही असेच चांगले लेख येऊद्यात. फक्त मराठीकरणाचा अट्टाहास थोडास्सा कमी करा. किंवा शक्य तिथे कंसात पर्यायी इंग्रजी शब्द तरी लिहित चला. या लेखाबद्दल बोलायचे झाल्यास, सरड्यांचे उदाहरण पटले नाही. उद्या असेच मुंगीच्या चालण्यावरुन कुणीही काहीही अनुमान काढेल की!

In reply to by अन्या दातार

अन्याजी, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद! काका, अजुनही असेच चांगले लेख येऊद्यात. >>>> मंजूर आहे! फक्त मराठीकरणाचा अट्टाहास थोडास्सा कमी करा. >>> वगळ आणि सिद्धांत हे दोन्हीही मुळात मराठीच शब्द आहेत. किंवा शक्य तिथे कंसात पर्यायी इंग्रजी शब्द तरी लिहित चला.>>> मथळाही कंसात दिलेला आहेच की! या लेखाबद्दल बोलायचे झाल्यास, सरड्यांचे उदाहरण पटले नाही. उद्या असेच मुंगीच्या चालण्यावरुन कुणीही काहीही अनुमान काढेल की!>>>>> सत्यवचन! उगाच नाही पडत्या सफरचंदाला पाहून न्यूटनला गुरूत्वाकर्षणाचा शोध लागला! उदाहरण पटले नसले तर कदाचित दुसरे उदाहरण देता येऊ शकेलही. मात्र, अनुवादकाला मूळ लिखाणात बदल कसा करता येईल हो!

In reply to by अन्या दातार

मराठी फारसे बोजड वाटले नाही. पण बर्‍याच जणांना वाटू शकते हे ही पटलं. यावर, कंसात प्रचलीत इंग्रजी शब्द देण्याचा पर्याय उत्तम वाटतो. एयत्ता नववीपासून मराठी माध्यमाच्या विज्ञानाच्या पुस्तकात आम्हाला असे इंग्रजीतील पर्यायी शब्द दिलेले असायचे.

In reply to by स्वानन्द

मराठी फारसे बोजड वाटले नाही. >>> अत्यंत मोलाचा अभिप्राय आहे आपला. मला आवडला! हार्दिक धन्यवाद!!

In reply to by पैसा

पैसाताई, धन्यवाद. आपल्याला आवडल्याने लिहिण्याचे चीज झाले. असे मला वाटते आहे. पैसा पैसा करून रुपया होईल का बघतो आहे!

छान लेख. पदार्थ विज्ञानावर अजुन लेख येउ द्यात . मराठीच्या अट्टाहासाचे स्वागत. वाचताना थोडे कष्ट पडले तरी चालतील पण समजाउन घेण्याचा निश्चित प्रयत्न करु.

In reply to by मराठी_माणूस

मराठीच्या अट्टाहासाचे स्वागत. वाचताना थोडे कष्ट पडले तरी चालतील पण समजाउन घेण्याचा निश्चित प्रयत्न करु.>>> ये हुई ना बात. वाचक असे असतील तर लेखक हजार मिळतील. माझ्या एकट्याची काय पत्रास!

एन्रिको फर्मी सरडे पकडायचा? कशासाठी? किमान त्या सरड्यासाठी काय इंग्रजी शब्द दिलाय ते तरी सांगा हो!!!

In reply to by पिवळा डांबिस

प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद! एन्रिको फर्मी सरडे पकडायचा? कशासाठी?>>>>> हो. फर्मींच्या चरित्राच्या पाचव्या प्रकरणाचे नावच "अह लव्ह, अह लिझार्डस-१९२५-१९२८" असे आहे. कशाकरता हे समजून घेण्यासाठी मूळ पुस्तक वाचलेत तर बरे. किमान त्या सरड्यासाठी काय इंग्रजी शब्द दिलाय ते तरी सांगा हो!!!>>> अवश्य. या उतार्‍याचा मूळ इंग्रजी मसूदा काय असावा ह्याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसल्याने तो खाली देत आहे. त्या उत्सुकतेचे मूळ, कदाचित हा अनुवाद बरोबर नसावा आणि मूळ इंग्रजी कळल्यास निदान खरे काय ते तरी समजेल, ह्या विचारात असल्याचे दिसते. तो विचार सफल होवो! Lately he had been thinking about a recent discovery by Austrian physicist Wolfgang Pauli, a one-time assistant of Max Born’s. Pauli, while studying the movements of atomic electrons around a nucleus, had observed that there was only one electron to each orbit. Put another way, no two electrons followed the same path. Fermi appreciated that this suggested an additional order inside each atom that had not been recognized before. The atoms of gases were more accessible than those of solid forms, so he zeroed in on the movements of atoms and their particles in gases. A long time ago he had imagined a “perfect” gas, a gas that was stable as real gases subject to erratic outside forces are not. Such a perfect gas would be the ideal environment in which to study the behavior of atoms and electrons. The energy given off by radiation could be observed and measured. But what laws would govern such a gas? What would be the connection between them and Pauli’s discovery? The young men had reached the marshland. They had brought with them two long rods, each with a silk noose hanging from its tip. Now they baited the tips of these rods with small insects, much as one might bait a fishing pole. They stretched out at the edge of a muddy pond with their poles extended and waited for hungry geckos to take the bail. “Gecko dead ahead, sir,” hissed Rasetti. “Proceeding north easterly direction. Speed point-oh-one-seven knots.” Fermi spied something Rasetti had not yet noticed. A second, small lizard was making for the bait on a path parallel to that of the larger one. They made the final jump at the same moment. The larger gecko took the bait; Rasetti jerked his line, tightened the noose and caught him. But the leaping smaller lizard had fallen short and now it scampered away. Of course! That was it! No two electrons followed the same orbit because no two electrons were in the same quantum state. In other words, they were not the same size, or not the same temperature, or not charged with the same amount of electrical energy-or all three. These were some of the factors that determined an electron’s orbit. Fermi’s mind raced. Already he was thinking in terms of that perfect gas he had dubbed monoatomic gas and how the orbiting electrons of its atoms might behave. Back in Firenze, he immediately began work on a paper entitled “On the quantization of a Perfect Monoatomic Gas.” The conclusions reached in that paper are still followed by metallurgists and engineers today. Among other things, it presented guidelines to determine how well or badly various metals conduct heat or electricity. Fermi’s calculations were –and are- valid. Not only that, but another scientist, Paul Dirac, had independently come up with the same figures. These formulas are still known as the “Fermi-Dirac Statistics”, and the particles of gas which follow their laws are called “fermions.”

In reply to by नरेंद्र गोळे

शंकासमाधानाबद्दल धन्यवाद गोळेसाहेब!! पण काय कमाल आहे बघा! इतका मोठा सायंटिश्ट, पण सरडे पकडायचा!!! आम्ही लहानपणी एकदाच पावसाळ्यात गटारीतली खेकड्याची पिल्लं काय पकडली, सणकून मार खाल्लाय तीर्थरूपांचा!!! नाहीतर कदाचित आम्हीपण सायंटिश्ट झालो असतो की! च्यायला, मोठ्यांचं सगळंच मोठं म्हणतात ते काय खोटं नाही!!!! :(

पाउलीज एक्स्क्लुजन प्रिन्सिपल आठवी-नववी च्या पुस्तकात शिकवलंच होतं. मराठीत ते समजावून सांगणं हा जर उद्देश असेल तर ज्या शास्त्रीय संकल्पना वापरल्या आहेत त्यांचं साध्या, समजेल अश्या बोली-मराठी भाषेत स्प्ष्टीकरण देणं उचित ठरलं असतं. म्हणजे, विजक = ऋणभार असलेला अणू-घटक (= इलेक्ट्रॉन). एकल, परिपूर्ण वायू म्हणजे काय? हे सांगितलं नाही तर लेख कळतच नाही.

In reply to by एक

एक, लेखाचा उद्देश फर्मिऑन्स ह्या संकल्पनेचा जन्मदाता फर्मी, पाऊली यांच्या वगळ सिद्धांताकडे कसे कसे पाहत होता, त्यापाठची कथा समोर आणणे हा होता. पाउलीज एक्स्क्लुजन प्रिन्सिपल आठवी-नववी च्या पुस्तकात शिकवलंच होतं.>>> असेल. त्यामुळे समजायला सोपे होईल. मराठीत ते समजावून सांगणं हा जर उद्देश असेल तर ज्या शास्त्रीय संकल्पना वापरल्या आहेत त्यांचं साध्या, समजेल अश्या बोली-मराठी भाषेत स्प्ष्टीकरण देणं उचित ठरलं असतं.>>>> तसा उद्देश नाही. म्हणजे, विजक = ऋणभार असलेला अणू-घटक (= इलेक्ट्रॉन). एकल, परिपूर्ण वायू म्हणजे काय? हे सांगितलं नाही तर लेख कळतच नाही.>>>> तुम्हाला कसे काय कळले, न सांगताही?

मराठी प्रतिशब्द शोधण्याचा उपक्रम स्तुत्य असला तरी जे मराठी शब्द अगोदरच प्रचलित आहेत ते बदलण्याचा उद्देश समजला नाही.

उपयोग काय? काही कळलं नाही. मी तर भाषेचा उपयोग अर्थ पोहोचवणं इतकाच मानतो. भाषा माध्यम आहे, साध्य नाही. तुम्हाला हा सिद्धांत उपयोगी आणि महत्त्वाचा वाटत असेल तर तो कृपया सरळ ,साध्या आणि सोप्या भाषेत लिहा.

In reply to by संजय क्षीरसागर

हा सिद्धांत निरुपयोगी आणि बिनमहत्वाचा मुळीच नाही आणि दुर्बोध असणं तर शक्यच नाही... सरळ साध्या सोप्या भाषेतच लिहिला आहे. परत वाचून बघा आत्ताच समजेल. तरीही समजलं नाही तर पुन्हा प्रयत्न करा. यात अवघड काहीच नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

इत्यादी कुठच्याही विजकीय (इलेक्ट्रॉनिक) गोष्टी तुम्ही वापरता का? या शोधाशिवाय त्या बनवता आल्या नसत्या.

In reply to by राजेश घासकडवी

राजेश, इलेक्ट्रॉनिक गोष्टी वापरण्यासाठी त्या आतून माहित असण्याची गरज नसते. टीव्ही बघण्यासाठी एलीडी आणि एल्सीडी तंत्रज्ञान काय हे माहित असणे आवश्यक नाही. रिमोट कसा वापरायचा हे समजणं महत्त्वाचं आहे. ;-) पण काही लोकांना आपण कोण आहोत, कसे आहोत, असेच का आहोत असे प्रश्न पडतात. असे प्रश्न कोण्या बाबा-बुवा-मातांना विचारण्याऐवजी काही लोकं हे प्रश्न स्वतःला विचारतात. उत्त्तर शोधण्यासाठी विज्ञान हे साधन म्हणून वापरतात. मी, माझं घर, माझा संसार, माझा नवरा/बायको, माझं बचत खातं यापुढेही काही जग आहे याची या लोकांना जाणीव असते आणि त्याबद्दल कुतूहलही असतं. अशा सर्व लोकांना पावलीचे एक्सक्लूजन तत्त्व काय, डिरॅकला हे कसं सुचलं असेल अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायला आवडतात. बाहेरच्या जगाची जाणीव नसणार्‍या आणि/किंवा त्याबद्दल कुतूहल नसणार्‍यांसाठी आणि/किंवा बाबा-बुवा-मातांचे शब्द शेवटचा शब्द म्हणून मान्य करणार्‍यांसाठी हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं निरर्थक आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वैज्ञानीक शोधांच्या कथा, त्यामागचे संशोधकांनी लावलेले तर्क/परिक्षणे/प्रयोग, त्यांची धडपड आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे सगळं जाणुन घेण्याचा "कीडा".. हे सगळं इतकं इंटरेस्टींग आहे कि मनाला/बुद्धीला मेजवानी. तिचा उपभोग घेणे हाच त्यामागचा सर्वात मोठा उपयोग !! अर्धवटराव

In reply to by संजय क्षीरसागर

संजयजी, सिद्धांत आध्यात्मिक असता तर कळला न कळला असा भेदभाव संभवू शकतो. सिद्धांत साधा सोपा आणि विज्ञानास समजून घेण्यास आवश्यक आहे असे लोक मानतात. आपल्याला निरुपयोगी वाटत असल्यास दुर्लक्ष करावे ही विनंती.

In reply to by नरेंद्र गोळे

मी सिद्धांत निरूपयोगी आहे असं कुठं म्हटलंय? माझा प्रश्न साधा आहे: `हा जर पाऊलीचा शोध असेल तर त्याचा रोजच्या जगण्यात, किंवा ते सोपं करण्यात कसा उपयोग झालाय'? याचं उत्तर हे कसं असं शकेल? >आपल्याला निरुपयोगी वाटत असल्यास दुर्लक्ष करावे ही विनंती.

In reply to by संजय क्षीरसागर

`हा जर पाऊलीचा शोध असेल तर त्याचा रोजच्या जगण्यात, किंवा ते सोपं करण्यात कसा उपयोग झालाय'?>>>> पाऊलीच्या सिद्धांताने त्या काळपर्यंत अनाकलनीय असलेले विजकांचे वर्तन आकलनीय झाले. त्याबाबतचे पूर्वानुमान आणि भाकीतेही खरी ठरू लागली. म्हणजेच त्यांच्या वापराची दारे मोकळी झाली. नंतर राजेश घासकडवींनी म्हटल्यानुसार विजकीय उपायोजनांची अनंत आविष्करणे झाली. त्यांपकी आज तुमच्या वापरात अनेक वस्तू आहेत. हा त्या सिद्धांताचा तुम्हाला झालेला अप्रत्यक्ष उपयोग आहे. तुम्ही जर भौतिक विज्ञान स्नातक असाल तर तुम्हाला त्या सिद्धांताचा प्रत्यक्ष उपयोगही होऊ शकला असेल. हे उत्तर आपल्याला समाधानकारक वाटत आहे काय?


कुणी काही वाईट साईट म्हटले तरी आपण आपले कार्य चालू ठेवा अशी विनंती. प्रचलित इंग्रजी शब्द तसेच्या तसे मराठीत वापरणे ही एक सोयिस्कर कुबडी आहे. स्वप्रतिभेने नवे शब्द बनवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तशी प्रतिभा सगळ्यांकडेच असते असे नाही. नवे शब्द यशस्वी होतात की नाही ते काळच ठरवेल पण अशी नवी निर्मिती, असे प्रयोग झाल्याशिवाय भाषेत नवे शब्द निर्माण होत नाहीत, रुळत नाहीत. सावरकर वगैरे लोकांनी असेच प्रयोग केले त्यातील कित्येक शब्द आज व्यवस्थित रुळलेले आहेत. ते यायच्या आधी सर्रास इंग्रजी शब्द वापरले जायचे. जसे संपादक, महापौर, स्तंभ (वर्तमानपत्रातील कॉलम या अर्थी). सावरकरांनाही लोकांनी नाके मुरडली. त्यांचे सगळेच शब्द लोकांनी स्वीकारले नाहीत. पण त्यांच्यामुळे काही नवे, उत्तम मराठी शब्द भाषेला मिळाले हे खरे. तुमचेही शब्द मायमराठीत रुळोत अशी शुभेच्छा.

In reply to by हुप्प्या

हुप्प्या, बोला जय बजरंग! आपल्या “हौसला अफजाईने” नवी उमेद निर्माण झालेली आहे. आपला अभिप्राय आवडला. आपल्या शुभेच्छांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

पाऊली यांचा वगळ सिद्धांत (अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल)
सिद्धांत हा शब्द theory साठी वापरला जातो. सैद्धांतिक भौतिकशास्त्र म्हणजे theoretical physics असं अनेक ठिकाणी वाचलेलं आहे. तत्त्व हा शब्द principleसाठी अधिक योग्य वाटतो.
कुठलेही दोन विजक एकाच कक्षेत राहू शकत नाहीत. कारण कुठल्याही दोन विजकांची पुंज स्थिती सारखीच नसते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, ते एकाच आकाराचे नसतात. किंवा त्यांचे तापमान सारखेच नसते, किंवा त्यांचेवरील विद्युत अधिभार सारखाच नसतो, अथवा ह्या तीन्ही गोष्टी असतात. हेच काही मुद्दे विजकांची कक्षा ठरवत असतात.
दोन इलेक्ट्रॉन एकाच कक्षेत असू शकत नाहीत हे वाक्य मान्य आहे. पण या पुढे पुंज स्थितीचा उल्लेख येतो. पुंज स्थिती हा शब्द इलेक्ट्रॉनची कक्षा, ग्रहांचं परिवलन वगैरे म्हणण्याएवढा सामान्य वापरात नाही. त्यामुळे पुंज स्थिती सारखी नसते हे वाक्य quantum states are not the same यापेक्षा फार वेगळं नाही. या वाक्याचं निदान काही स्पष्टीकरण आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनचे तापमान शक्यतो सांगत नाहीत, इलेक्ट्रॉनच्या गटाचं तापमान सांगितलं जातं. एका अणूतल्या दोन इलेक्ट्रॉनची ऊर्जा समान नसते असं सोप्या आणि स्पष्ट शब्दांत सांगता येईल.
त्यांचेवरील विद्युत अधिभार सारखाच नसतो
इलेक्ट्रॉनवरील विद्युतभार हे नैसर्गिक एकक म्हणून वापरण्यात येते. किंवा इलेक्ट्रॉनचा विद्युतभार अतिशय प्रिसीजन (मराठी शब्द?)पूर्वक मोजलेला आहे. त्यामुळे हे वाक्य अजिबातच समजलं नाही. किंबहुना पॉलीचे एक्सक्लूजन तत्त्व इलेक्ट्रॉनसंदर्भात सांगताना इलेक्ट्रॉनच्या कक्षा आणि इलेक्ट्रॉनची ऊर्जा यांचे स्पष्टीकरण टाळणे अशक्य आहे*. या कक्षांमधला सर्वात आतला पदर म्हणजे इलेक्ट्रॉनचा स्पिन हा असतो. स्पिनचं विद्युत अधिभार हे भाषांतर असल्यास अयोग्य आणि अग्राह्य आहे. (नसल्यास आधीचं वाक्य रद्द समजावं.) इलेक्ट्रॉनचा स्पिन त्याच्या कोनीय संवेगाशी संबंधित असतो. कोनीय संवेग म्हणजे angular momentum. सरळ रेषेत न फिरणार्‍या कोणत्याही वस्तूचा कोनीय संवेग त्याचे वस्तूमान, वेग आणि कक्षेच्या त्रिज्जेवर अवलंबून असतो. (याचे अधिक स्पष्टीकरण इथे आणि/किंवा मराठीत देणं माझ्या आवाक्याबाहेरचं काम आहे.) Franco Rasetti या नावाचा त्याच्या मातृभाषेतला उच्चार देवनागरी लिपीत लिहीताना फ्रान्को रासेत्ती याच्या (फ्रॅङ्को रासेट्टी नव्हे! फ्रॅङ्को रासेट्टी हा साधारण अ‍ॅंग्लिकन किंवा इंग्रजाळलेला उच्चार आहे.) जवळ जाणारा असेल. चुभूदेघे. तळटीपा: *अथवा वाचकांना अणूरचना, इलेक्ट्रॉनच्या कक्षा, त्यांचा इलेक्ट्रॉनच्या उर्जेशी असणारा संबंध हे माहित आहे असे गृहीत धरावे लागते. मराठी संस्थळांवरच्या किती वाचकांना या गोष्टी माहित असतील किंवा आता आठवत असतील याबाबतीत मला शंका आहे. अशा सोप्या गोष्टीही समजून सांगितल्यास वाचकांना संज्ञा आणि संकल्पना व्यवस्थित समजतात. १. मराठी पाठ्यपुस्तकांमधे इलेक्ट्रॉन हा शब्द वापरलेला असतो. सबब, टेबल, पेन, बटाटा, फरक, हालहवाल, अशा आयात केलेल्या आणि आता मराठी गणल्या जाणार्‍या शब्दांप्रमाणेच इलेक्ट्रॉन हा ही मराठी शब्दच आहे असं मानणारा बराच मोठा वर्ग अस्तित्त्वात आहे. १अ. मराठी शुद्धलेखनाच्या नियमांमधे विजक हा शब्द अशुद्ध मानावा का? अंत्याक्षर दीर्घ नाही, उपान्त अक्षरही दीर्घ नाही आणि उप-उपान्त्य अक्षरही दीर्घ नाही; जिथे मूळ मराठी शब्द वीज असा आहे तर वीजक (यातल्या ज चा उच्चार जमा किंवा जमीन किंवा जहाज मधे असल्यासारखा सॉफ्ट, विभाजकमधल्या ज सारखा नाही) असा नको का? २. एक्सक्लूजनचं भाषांतर वगळपेक्षा अधिक चांगलं झालं असतं तर कदाचित स्वीकारार्ह वाटलं असतं. क्रियापद आणि आडनाव म्हणूनही वापरला जाणारा शब्द नाम म्हणून रूचला नाही. ३. पॉलीचं तत्त्व एका प्रणालीत बद्ध असणार्‍या सर्व फर्मिऑन्सना लागू पडतं. इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, कार्बन-१३ ही फर्मिऑन्सची काही उदाहरणं आहेत. ४. पॉलीचं हे तत्त्व ज्या तार्‍यांचे मृत्युसमयी वस्तूमान सूर्याच्या १.४४ पटीपेक्षा अधिक असते तिथे इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत मोडते. हे दाखवून देण्याबद्दल सुब्रमण्यन चंद्रशेखर यांना आधी हेटाळणी सहन करावी लागली. आणि मृत्युसमयाच्या काही काळ आधीच नोबेल पुरस्कारही मिळाला. एका एक्स-रे दुर्बीणीला याच चंद्रशेखर यांच्या स्मरणार्थ चंद्रा असे नाव दिलेले आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती, असे म्हणतात की “सरशोभा एक हंस सो बढती, लाख काक कहे काम” त्यानुसार आपला प्रतिसाद मला मोलाचा वाटतो आहे. इलेक्ट्रॉनवरील विद्युतभार हे नैसर्गिक एकक म्हणून वापरण्यात येते.>>> ह्या आपल्या विधानाशी मी शतप्रतिशत सहमत आहे. नावांच्या उच्चारांबाबतही आपल्या सूचनांची मी दखल घेतली आहे. योग्य उच्चार जाणून घेणे महत्त्वाचे आहे. इंग्रज पुण्याला ’पूना’ म्हणोत, आपण मात्र ब्रिटिशांना ’ब्रिटिस’ म्हणता नये! स्पिन म्हणजे फिरत. प्रिसाईझ म्हणजे नेमका.

In reply to by नरेंद्र गोळे

आधीच्या इतर आक्षेपांबद्दल, विशेषतः वैज्ञानिक माहितीमधल्या त्रुटी आणि चुकांबद्दल तुमचं म्हणणं समजल्यास आवडेल. त्याशिवाय,
कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत.
अशा प्रकारच्या वाक्यांनी गैरसमज होऊ शकते. इलेक्ट्रॉन्सना स्वतःची काही इच्छा असते असा काही या वाक्याचा अर्थ निघतो आहे. No two electrons are in the same orbit अशा प्रकारच्या वाक्यांचे शब्दशः भाषांतर चांगल्या मराठीत करत नाहीत. प्रस्तुत वाक्याच्या ठिकाणी "कोणत्याही दोन इलेक्ट्रॉन्सची कक्षा एकसमान नसते" अशा प्रकारची वाक्यरचना शास्त्रीय लिखाणात आढळते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती, हजाराहून जास्त वाचने आणि सत्तराहून अधिक प्रतिसाद झाल्यानंतर गुणवत्तेवर आधारित आक्षेपांना उत्तर देण्यास उसंत मिळते आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सुदैव इतकेच की प्रत्यक्षात ती वेळ आली. अनुवाद यथातथ्य झाला नाही असे होऊ शकते. तसे आढळल्यास ती माझी चूक मी नक्कीच पदरात घेईन. अनुवादातील त्रुटी उघड व्हाव्यात म्हणूनच तर मी मूळ उताराही एका प्रतिसादात दिलेला आहे. "कोणत्याही दोन विजकांची कक्षा एकसमान नसते" ही आपण सुचवलेली शब्दयोजना जास्त समर्पक आणि निस्संदिग्ध आहे. मला ती मंजूर आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

>>>सरशोभा एक हंस सो बढती, लाख काक कहे काम” ह्याचे मराठीकरण नाहि केलेत हो? ज्यांचे प्रतिसाद सोयीचे त्यांची वाह वाह आणि जे टीकेचे ते काय कावळे काय?

In reply to by अग्यावेताळ

>>>सरशोभा एक हंस सो बढती, लाख काक कहे काम” ह्याचे मराठीकरण नाहि केलेत हो? >>>> अरेच्चा राहिलेच की! सरशोभा एक हंस वाढवी, लाख काक कुचकाम ज्यांचे प्रतिसाद सोयीचे त्यांची वाह वाह आणि जे टीकेचे ते काय कावळे काय?>>>> नाही हो. अग्या वेताळही आहेतच की. ज्यांचे प्रतिसाद सोयीचे त्यांची वाह वाह, कावळ्यांची काव काव आणि अग्या वेताळांची लावालाव ह्यांचीही वाह वाह. असेच करण्याचे दिवस आलेले आहेत. कालाय तस्मै नमः

उत्तम माहितीपूर्ण लेख आहे नेहमीप्रमाणेच. यापूर्वीही खूप वेगवेगळे विज्ञानविषय श्री. गोळे यांनी मांडले आहेत आणि हा मराठीतला स्तुत्य उपक्रम आहे. शुभेच्छा. बाकी मराठीच्या मूलगामी रुपाविषयी. कोणत्याच क्षेत्रात मूलतत्त्ववादी, मूलनिवासी, अस्मिताधारक असू नये असं आपलं आमचं एक वैयक्तिक मत. या चार्तीन गोष्टींमुळे जगात निम्म्या समस्या उभ्या राहतात. समजणं महत्त्वाचं. नवे मराठी शब्द रुढ केले पाहिजेत असं वाटत असेल तर आजच्या काळात पचतील असे हलके शब्द बनवावे. एक उदाहरण देतो. कै. डॉ. विवेक परांजपे या निसर्गप्रेमी अभ्यासक डॉक्टरांनी ऐंशीच्या दशकात "आपली सृष्टी-आपले धन" नावाची मराठीत प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची छपाई आणि मजकूर असलेली ग्रंथमालिका बनवली होती. त्यात यच्चयावत प्राणीसृष्टीचा (सूक्ष्मजंतूंपासून, पक्षी ते सस्तन प्राण्यांपर्यंत सर्व) मराठी नामसंग्रह होता. प्रत्येक फोटोला मराठी नाव (प्रचलित असेल तर कष्टाने शोधून किंवा नसेल तर तयार करुन..) पण ही तयार केलेली नावं इतकी सुलभ होती की एक आदर्श उदाहरण म्हणून त्याचा अभ्यास करावा. वॅगटेल या पक्ष्याचे भाषांतर शेपूट वरखाली हलवणारा पक्षी , "पुच्छहलव्या" किंवा "पॅरेडाईज फ्लायकॅचर"चे रुपांतर "नंदनवनातील मक्षिकाभक्षक" असे न करता त्यांनी उदा. धोबी, वटवट्या, सातभाई, शेकाट्या अशी प्रचलित नावं शोधून दिली होती आणि जिथे तशी नव्हती तिथे याच चालीवरची सोपी सुटसुटीत नावं बनवली होती.. जुनी भाषा काही असो, आजरोजी सर्वांना वाचताना आनंद मिळणंही गरजेचं आहेच. फक्त विज्ञानच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात अशा भाषेत परिच्छेद आले की वाचक अर्ध्यात सोडून जाण्याची आणि अर्थात त्यामुळे मूळ सत्त्व त्याच्यापर्यंत न पोचण्याची भीती राहते. उदा.
व्यष्टी आणि समष्टी यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य काढण्याची सर्वसमावेशक क्रिया समाजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे का आणि असल्यास तिचे व्यष्टी अंगाने संदर्भघनत्व किती आणि समष्टीच्या अंगाने किती याचा ताळमेळ प्राधान्याने गरजेचा आहे. विविध सामाजिक, आर्थिक, पारंपरिक आणि अपारंपरिक व्यष्टी एकमेकींना छेद देत आणि तरीही समांतर राहून समाजउर्जेची एकूण परिमिती आणि भूमिती आपल्याला दाखवतात. दुर्दैवाने या भूमितीमागचे बीजगणित अध्याहृतच राहते. अनंत अंतरावर एकमेकांशी संलग्न होणा-या या समाजरेषा आपल्या वाटेच्या दोन्ही बाजूंना एक उर्जास्रोत स्त्रवत जातात आणि उजव्या आणि डाव्या विचारसरणी जन्माला येत जातात.
काळजी नको.. पूर्वी एका ठिकाणी हे मीच लिहिलंय. ;) कोणीही यापूर्वी वाचलं असण्याची शक्यता नाही.. ;)

In reply to by गवि

कै. डॉ. विवेक परांजपे या निसर्गप्रेमी अभ्यासक डॉक्टरांनी ऐंशीच्या दशकात "आपली सृष्टी-आपले धन" नावाची मराठीत प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची छपाई आणि मजकूर असलेली ग्रंथमालिका बनवली होती. त्यात यच्चयावत प्राणीसृष्टीचा (सूक्ष्मजंतूंपासून, पक्षी ते सस्तन प्राण्यांपर्यंत सर्व) मराठी नामसंग्रह होता.>>> मीही हे सर्व खंड वाचले आहेत. मला ते बेहद्द आवडलेली आहेत.

In reply to by नरेंद्र गोळे

अजूनही मिळतात का हो त्याच्या प्रती? माझ्या चार खंडांपैकी दोन विविध लोकांनी वाचायला म्हणून नेऊन गायब केले. मनस्ताप वाटतो या गोष्टीचा.. :( पाचवा खंड दुर्दैवाने निघूच शकला नाही अशी माझी समजूत आहे, कारण एकदाच रक्कम भरा स्वरुपाच्या योजनेत ८५ सालच्या सुमारास पैसे भरुन ते खंड ऑर्डर केले होते. पहिल्या खंडाच्या वेळेसच डॉ. परांजपेंचं निधन झालं आणि सगळा प्रकल्प आर्थिक संकटात सापडला. मग अनामत रक्कम परत करु नका असं सांगून चाहत्यांनी तो प्रोजेक्ट जगवला. त्यांच्या मित्रांनी चिकाटीने चार खंड काढले. पाचवा बहुधा नाही जमू शकला असं मला वाटलं होतं कारण तो खंड कधीच आला नाही. याविषयी वेगळी काही माहिती आहे का?

In reply to by गवि

त्या प्रती नितांतसुंदर होत्या, मिळाल्या तर मलाही हव्याच आहेत!

In reply to by नरेंद्र गोळे

अतिशय सुंदर खंड आहेत. आणि भाषा अत्यंत सोपी आहे. पाचवा खंड मात्र निघाला नाही. मी काही वर्षांपूर्वी चौकशी केली होती.

In reply to by राजो

फारच उत्सुकतेने धागा उघडला, मात्र निराशा झाली. हेटस्टोरीचे परिक्षण असावेसे वाटले होते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

फारच उत्सुकतेने धागा उघडला, मात्र निराशा झाली.
निराशा होत असेल तर असे धागे उघडावेच कशाला ? वरच्या तद्दन फालतु प्रतिक्रियेचे कारण कळालेले नाही. सुस्त बंदर

In reply to by परिकथेतील राजकुमार

येवढ्या गंभीर सिद्धांताच्या धाग्यावरती भिक्कुला दात काढायला काय झाले ते समजले नाही. अल्पा ढ