Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 04/04/2012 - 20:32
लेखनविषय (Tags)
संस्कृती
वावर
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद
विरंगुळा
पुणं कितिही बदललं,नवनविन रुप घेत गेलं तरी पुण्याच्या काही सांस्कृतिक खुणा,किंबहुना पाऊलखुणा आहेत. त्या काळानुरुप काहि तश्याच,काही बदललेल्या,तर काही अपरिहार्यपणे पुसल्या गेलेल्याही आहेत...अशीच एक जुनी आणी खास जुन्यासाठीच प्रसिद्ध असलेली एक काळाच्या ओघातही टिकलेली खुण म्हणजे आमचा लोकप्रीय जुना बाजार... ऐतिहासिक शनिवारवाड्यापासुन पायी दहा मिनिटाच्या अंतरावर दर रविवारी आणी बुधवारी भरणारा हा बाजार म्हणजे एक प्रकारचा अघोषित सम्राटासारखा आहे... हे एक प्रकारचं गिर्‍हाईकी लोकाधारावर उभं असलेलं लोकं-राज्य आहे. माझ्या ऐकिव माहिती प्रमाणे हा बाजार जुना म्हणजे अगदी ब्रिटिशकालिन आमदानी पासुनचा आहे. त्याचं जुना हे नाव कालावाचक जेवढं आहे,त्यापेक्षा ते आत्मवाचक जास्त आहे. इथे आजही सगळ्या जुन्याच वस्तू मिळतात का हो..?,तर नाही, गरीब जनतेची सोय पाहाणारे कपड्यांचे/भांड्यांचे/चादरी/ब्लँकेटांचे/गृहोपयोगी वस्तुंचे ही स्टॉल्स इथे आहेत..पण ते काळाची गरज म्हणुन...!,जुन्या बाजाराचं खरं वैशिष्ठ्य म्हणजे अगदी शिवकालापासुन ते त्या आधी नंतरच्याही कालातली जुनी नाणी, भांडी,अडकित्ते,देवाची पुजेची उपकरणी,तलवारिंच्या मुठी(आणी तुंम्ही खात्रीचं गिर्‍हाइक वाटलात,तर पाती सुद्धा ;-) ) दुर्बिणी,होकायंत्रे,लाँगप्ले रेकॉर्ड्स,त्याचे प्लेअर्स,कासवछाप-किसण्या,पानाचे डबे,गाड्या,जुने पितळी वस्तरे,चुनाळ्या ,पितळ्या/तांब्याची भांडी अश्या असंख्य आणी नाना प्रकारच्या वस्तू इथे कित्येक वर्ष अव्याहत पणे विकल्या जात आहेत.. माझी या बाजाराशी ओळख अगदी लहानपणापासुनची(इयत्ता ७वी) आहे...आंम्ही रविवारी घरातुन सकाळी हादडुन झालं की ज्यादिवशी ५रु अ-खंड मिळतील,(तेही आपल्याला पाहुण्यांनी दिल्यानंतर आईनी(च),''दे रे इकडे अत्ता..!'' असं करुन कधितरी काढुन घेतलेले) म्हणजे तसे-परत मिळतील तेंव्हा मी २:५०रुपये- ५तास दरानी भाड्याची छोटी सायकल घेऊन आम्च्या ग्यांगमधिल येतिल त्या मित्रांसह जुन्याबाजारात कुच करायचो..अता त्यावेळी आमचं प्रमुख आकर्षण इथे ते काय होतं..?,तर इथे मिळणारे ऊल्हास नगरमेड हेडफोन आणी मुख्य म्हणजे इंग्रजी गाण्यांच्या कॅसेट्स,सोनी,बिलबेर्ड आदी कंपन्यांच्या अत्यंत महाग असलेल्या,जॅक्सन,फिल कॉलिन्स,पेट्शॉप बॉइज,बोनी एम या कलाकार/ग्रुपच्या,,,वापरलेल्या किंवा चोरुन आलेल्या क्यासेटी तिथे,तेंव्हा सुद्धा पंधरा ते पस्तीस रुपयांना मिळायच्या...(दुकानात जाऊन नव्यांच्या किमती ऐकणं सुद्ध तेंव्हा परवडायचं नाही,तर विकत घेऊन त्यातली गाणी कोण ऐकणार...?) वस्तुतः या कॅसेटही दरवेळी आंम्ही घ्यायचोच असे नाही,पण तिथे फिरायला सुद्धा एक वेगळीच मजा वाटायची...इथे एक बरं आहे,तुंम्ही मालाची कितिही चौकशी केली,हाताळला तरी कोणिही वसकन..ठेवाss असं म्हणुन अंगावर येत नाही,अर्थात हाही काही अगदी पूर्ण सद्गुण नसुन ते एक प्रकारचं,गिर्‍हाइकाला वस्तूच्या प्रेमात-पडू द्यायचं कौशल्य आहे,हे तिथे मुरलेल्या गिर्‍हाइकाला कळुन येतच...! इथे खरेदी करताना काही गोष्टी गाडीबरोबर पार्क करुन आत शिरावं लागतं,नाहितर भल्या-भल्या गिर्‍हाइकांच्या हा बाजार अंगाशी आल्याशिवाय रहात नाही...!आपल्याला खरेदीतलं खूपच कळतं,हा भाव असला तर इथले व्यपारी ते दोन मिनिटात हेरुन आपला भावच करतात. बारगेनिंग हवं तितकं करा पण इरेस पडलात,तर तुम्हाला ती वस्तू अख्या बाजार समोर इज्जत घेऊन तो विक्रेता फुकट सुद्ध अंगावर मारायला कमी करत नाही. हां...अता गिर्‍हाईकी चलाखी हवी तेवढी करता येते..म्हणजे एखादी वस्तू अवडली तर आधी चेहेर्‍यावर 'फार अवडल्याचा' भाव आणणं,नंतर किमतीत उतरवुन...शेवटी ''येताना घेतो...'' असं म्हणुन,फार लांब न जात,त्या विक्रेत्याला दिसेल अश्या तसल्याच वस्तू विकणार्‍या दुसर्‍या स्टॉल समोर जाऊन उभं रहाणं,मग तो आपल्याला लांबुन हाक मारतो,मग ''आलोच'', असं खुणावत,,,जरावेळानी जाऊन,''बघा दादा आपण लास्ट मंजे लास्ट पाचशे देऊ''..असं एखाद वाक्य फेकणं, हे सगळं जमलं तर साधारण अपेक्षित भावात वस्तू हाती लागते. अर्थात यापेक्षाही रोखठोक डायरेक सेटलमेंट सारखे पर्याय वापरता येतात...पण सगळा गिर्‍हाइकी भावुकपणा दूर ठेऊन...! त्यामुळेच मला, 'अगदी तय्यारातल्या तयार अट्टल गिर्‍हाइक' असं म्हणवणारा कुणी भेटला,तर मी त्याला हे च्यायलेंज अगदी बिन दिक्कत देऊ शकतो- हा बाजार उठवुन दाखवा...! आपण मानलं तुम्हाला...! ;-) १)अता त्यावेळचं कॅसेटयुग संपत आलं असलं,तरी इथे अजुनही केसेट्स,टेप,वॉकमन्स आदी तुरळक प्रमाणात दिसतातच...! २)अवजारं आणी हत्यारं-खाटिककामापासुन ते सुतारकामा,बांधकाम,लोहारकामा पर्यंतची...! ३)अता नाणी/नोटा-सातवाहन,गुप्तकाळ शिवकाळ,ब्रिटिशकाळापासुन ते,अगदी आजच्या काळापर्यंतची... ४)आणी अता हाय अँड टेरर पॉइंट ऑफ जुना बाजार... सावधपणे खरेदी करण्याच्या जुन्या वस्तू... ५)ह्या काचेच्या वस्तू...मी खास असल्याचा आव अणला,आणी मग त्यानी मला खास-आत नेऊन दाखवल्या...! ;-) ६)गृहोपयोगी वस्तूंची म्होट्टी रेंज... ७)दुर्बिणी,भिंग,होकायंत्र,घड्याळं..इ...इ... ८) ही आडवी पडलेली सुबक,नाजुकशी बाटली...(मेली भलतीच गोंडस होती,पण किमत ऐकल्यावर मी ही अडवा पडलो...! ;-) ) ९)आणी आता सगळी जुनी भांडी,अडकित्ते,चुनाळ्या,पळी-पंचपात्रं,साखळ्या,पंचारत्या,तांबे,पितळी डबे,किसण्या,देव मूर्ती...इ...इ... १०)हे मला अवडलेले खास २ अडकित्ते...यात सुपारी लवकर फुटेल..पण विक्रेत्याचा...भाव..?..तो नै लवकर फुटायच..! लै चकरा मारायला लावतात...तेंव्हा सुपारी'फुटते...! ;-) ११) आणी हा पण बाजारा इअतकीच जुनेपणाची साक्ष देणारा... कसा चमचम करतोय बघा...! :-)
  • Log in or register to post comments
  • 51051 views

प्रतिक्रिया

Submitted by किचेन on Tue, 04/10/2012 - 17:12

In reply to @मी कधी जुना बाजार भरलाय by अत्रुप्त आत्मा

Permalink

महिने नहि वर्ष.

महिने नहि वर्ष.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 04/05/2012 - 01:38

Permalink

झकास!

मस्त फोटू हो, भटजीबुवा. एकदा फेरी मारायला हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 04/05/2012 - 01:52

Permalink

मस्त!

जुन्या वस्तूंचे फोटो आवडले... आता पुढल्या वेळेस तुलाच घेऊन गेलं पाहिजे तिथे! माहितगार असलेला बरा...
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 04/05/2012 - 05:20

Permalink

छान

मस्त चक्कर घडवून आणलीत!!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 04/05/2012 - 07:44

Permalink

खास

चायला अफाट आहे हो हा बाजार ... आवर्जून यायला हव... वो अडकित्तोने तो जान हि लेली :)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 04/05/2012 - 09:10

Permalink

बर्‍याचदा गेलोय इथे पण

बर्‍याचदा गेलोय इथे पण गाभार्‍यात गेलो नाही... म्हणुन बरंच मिस केलेलं दिसतंय... अजुन एक वेळ जाउन येतो...
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 04/05/2012 - 09:18

Permalink

एक ठसठसणारी आठवण

१९७० ला अकरावी झाल्याच्या निमिताने मला माझी आयुष्यतली पहिली फुलप्यांट मिळाली. त्या एका प्यांटवरच आठवडा काढावा लागे. रविवारी धुवायची. दुसरी नवी घेणे दुरापास्त . कारण फी भरण्याला प्राधान्य. असाच मग जुन्या बाजाराची माहिती मिळाली. काही लोक याला चोर बाजार ही म्हणतात.एका जागी जुने कपडे विकणारा बसला होता. एकदाची एक प्यांट पसंत केली. पनास सांगितले.. मला विसातच परवडत होती. ( मिसळ हा प्रकार अर्ध्या रूपयाला मिळत असे ) सौदा फिसकटला. पुरते एक वर्ष एकच वापरली. ही परिस्थीती असताना एकाद्या मुलीवर इंप्रेशन पडण्याचा प्रश्नच येत नसे. आपल्याला जुनी वापरलेली प्यांट वापरायची वेळ आली होती. हे आठवले की आजही अस्वस्थ व्हायला होते. बाकी ही जागा निरखणे हा एक रोमान्स आहे. फक्त उन्ह उतरले असताना जावा. बाकी अट्रुप्ट आटमा याणी ताकलेले फोतो पाहून दोले ट्रुप्ट जाले. ढ्ण्यवॉड !
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 04/05/2012 - 09:39

Permalink

गुर्जी कधी नेताय बाजारला? ते

गुर्जी कधी नेताय बाजारला? ते माश्याचे कुलुप, पितळी बैलगाडी आणि आडकिते आणि दुर्बिणी लैच आवडल्यात बघा आपल्याला पण साले बार्गेनिंग जमत नाही. तुम्ही तयारीचे दिसाताय त्यातले. तुमच्याबरोबरच येतो खरेदीला.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 04/05/2012 - 10:00

Permalink

अरे व्वा !!!! इथल्या काही

अरे व्वा !!!! इथल्या काही वस्तु उदा. बैलगाडी ,घोडागाडी प्रचन्ड आवडली गेली आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 04/05/2012 - 10:02

Permalink

मस्त आहे एक्दम

कधी मिळाला चानस तर नक्की येइन. एका फोटोत स्वातंत्र्यदेवतेचा पितळी बॉट्ल ओपनर पाहून मौज वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 04/05/2012 - 10:12

Permalink

अ आ.आपला 'स्मायल्या' नी

अ आ. आपला 'स्मायल्या' नी '...' (अल्मोस्ट)विरहीत लेख जास्त आवडला. छान माहिती आणि फोटो. >>>त्याचं जुना हे नाव कालावाचक जेवढं आहे,त्यापेक्षा ते आत्मवाचक जास्त आहे. << हे वाक्य विशेष भावलं. अ-अवांतरः असेच मुद्देसूद नी विशेष म्हणजे बांधेसूद लिहीलेत तर जास्त बरे. मिसळपाववर जास्तीत जास्त 'असंच' चांगलं वाचू या ना आपण सगळेच. दंगा करायला ख व, ख फ आणि व्यनि आहेत. तेवढं पथ्य पाळाच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 04/05/2012 - 14:21

In reply to अ आ.आपला 'स्मायल्या' नी by प्यारे१

Permalink

असेच म्हण्तो.

>>>आपला 'स्मायल्या' नी '...' (अल्मोस्ट)विरहीत लेख जास्त आवडला. (अजून भर घालतो) आणि नेहमीची वाट सोडून नवीन विषय निवडलेला आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 04/05/2012 - 10:26

Permalink

थोडे सांभाळुन खरेदी करा....

बरोबर कुणी माहितगार असल्याशिवाय खरेदी करु नका... मला ग्रामोफोन इथेच मिळाला..पण ओळख असल्याने चांगला निघाला.... बाकी हे अत्रुप्त आत्मे मस्त आहेत....कुठे , कुठे भटकतात.....मस्त फोटो काढतात्...आणि माहिती पण देतात.. धन्यवाद हो अत्रुप्त आत्मे साहेब....
  • Log in or register to post comments

Submitted by निश on गुरुवार, 04/05/2012 - 10:56

Permalink

अत्रुप्त आत्मा साहेब, मस्त लेख व भारी पुणे...

अत्रुप्त आत्मा साहेब, मस्त लेख व भारी पुणे... आताही पुण्याला आलो कि बुधवारी जुन्या बाजारात एक फेरी असतेच. तसही पुणे म्हंजे आमच सगळ्यात आवडिच ठिकाण ... कलेजेचा टुकडा म्हणा हव तर... पण पुणे ते पुणेच निव्वळ लाजवाब.. अत्रुप्त आत्मा साहेब एका सुंदर लेखासाठि तुमचे मनापासुन आभार
  • Log in or register to post comments

Submitted by मनराव on गुरुवार, 04/05/2012 - 10:58

Permalink

मस्त

भटजीबुवा.... नव्या पुण्यातल्या जुन्या बाजाराची सैर मस्त करुन दिलीत
  • Log in or register to post comments

Submitted by स्वातीविशु on गुरुवार, 04/05/2012 - 11:42

Permalink

छान सचित्र लेख आवड्ला. जुन्या

छान सचित्र लेख आवड्ला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. (वडिलांचा हात धरुन बाजारात फिरणे वगैरे) :) त्या पितळेच्या वस्तू विशेष आवडल्या... मत्स्य कुलूप, कासव कुलूप, बैलगाडी, घोडागाडी, अडकीत्ते... जुन्या बाजाराची सैर घडवून आणल्याबद्द्ल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 04/05/2012 - 11:59

Permalink

पुन्हा एकदा आपला आसमंत उघड्या

पुन्हा एकदा आपला आसमंत उघड्या डोळ्यांनी आणि संवेदनशील मनाने टिपण्याचं उत्तम उदाहरण. पुन्हा एकदा धन्यवाद..
  • Log in or register to post comments

Submitted by एम.जी. on गुरुवार, 04/05/2012 - 13:36

Permalink

मिलिटरीच्या हॅवरसॅक्स,

मिलिटरीच्या हॅवरसॅक्स, टेन्ट्स अशा गोष्टी घेतल्या होत्या फार पूर्वी.. मुंबईच्या एका मित्राला जुन्या ट्रायुम्फला बसू शकेल असा एक पार्ट मिळाला होता. त्यासाठी तीन बुधवार आअणि तीन रविवार घालवले होते.. पण फोटो बघून पुन्हा आठवण जागी झाली. तळाला स्टड्स असलेले स्पोर्ट्स शूजसुद्धा मस्त मिळायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by पहाटवारा on गुरुवार, 04/05/2012 - 13:52

Permalink

झकास फोटो अन ऊत्तम ओळख

झकास फोटो अन ऊत्तम ओळख .. होस्टेल डेज च्या सुरुवातीला , कुणीतरी सांगितले कि इथुन काहि घेउ नकोस .. चोरिचा माल असतो .. पोलिस मागे येतील .. तर आधी खरेच वाटले .. पण मग नंतर बर्याच फेर्‍या झाल्या .. अर्थात घेणे कमी अन घासाघीस जास्ती ..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रास on गुरुवार, 04/05/2012 - 13:57

Permalink

भटजीबुवा,

एका मनोहर विश्वाची उत्तम सचित्र ओळख करून दिलेली आहे. जुन्या बाजारातील वस्तू बघून पारणं फिटलंय. कधी तरी जरूर तिथे भटकायला आवडेल. आपला अत्यंत आभारी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 04/05/2012 - 14:01

Permalink

ड्यांबिसपणा आहे....

हे असले लेख ताकताय ठिक आहे. पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही. तुमचा अखास अ‍ॅण्टिक शैलीत निषेध करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 04/05/2012 - 14:08

In reply to ड्यांबिसपणा आहे.... by मन१

Permalink

@पण तिथं हाकेच्या अंतरावर

@पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही. >>> ठिक आहे,पुढल्यावेळी योग्य अंतरावरुन हाक-मारली जाइल. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 04/05/2012 - 14:01

Permalink

ड्यांबिसपणा आहे....

हे असले लेख ताकताय ठिक आहे. पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही. तुमचा अखास अ‍ॅण्टिक शैलीत निषेध करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on गुरुवार, 04/05/2012 - 15:42

Permalink

मस्तच...

पितळी वस्तू आम्हालाही प्रचंड आवडतात, पण महागही असतात ब्वॉ.. मस्त बाजार.. तृप्त केलंत, आत्मारामा..
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 04/05/2012 - 16:15

Permalink

इथे मिळणारी इस्त इंडिया

इथे मिळणारी इस्त इंडिया कंपनीची नाणी एकदम बोगस असतात. ती अगदी १८३५ सालची असली तरी त्यावर यू के असे लिहिलेले असते. १८५७ च्या अगोदर मुघल सरकाराची नाणी कंपनी सरकार काढीत असे पण त्यावेळेस इंग्लंडचा युके झालेला नव्हता . मुघलकालीन नाणी मात्र भरपूर मिळतात. पेशवेकालीन नाणी मात्र फारशी दिसत नाहीत. अवांतरः तुघलकाने काढलेल्या चाम्ड्याच्या नाण्यापैकी एखाद्या नाण्याबद्दल काही म्हैती मिळेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on गुरुवार, 04/05/2012 - 16:19

Permalink

धन्यवाद..

धन्यवाद..साहेब झकास फोटो अन ऊत्तम ओळख .. कसब्यात असताना बर्‍याच वेळा चक्कर टाकलेली आहे,आजकाल त्या शुज वगेरे विकणार्‍या लोकानी बाजाराची बरीच जागा व्यापली आहे. @ अन्या दातार :कोल्हापुरात पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत भरायचा (सध्या माहित नाही). रेकॉर्ड प्लेयर, जुने व्हॉल्ववाले रेडीओ याची बर्‍यापैकी व्हरायटी दिसायची............... ...............साहेबा आमच्या सोलापुरात देखील पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत असा बाजार भरतो दर मन्गलवारी.(आज ही) अवातर : च्यायला काल बाजारात चक्कर टाकायला हवी होती राव... काही खास नाही तरी मिपा ची दोन अमुल्य रत्ने "याची डोळा" पहायला मिळाले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 04/05/2012 - 16:33

Permalink

मस्त !

बाजाराची सफर आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on गुरुवार, 04/05/2012 - 17:08

Permalink

मी कसबा पेठेतली,आमच्या

मी कसबा पेठेतली,आमच्या घरापासून काही अंतरावरच जुना बाजार आहे.आजोबा, बाबा,काका हे वेळ घालवायला तिथे चक्कर मारत असत,त्यांच्याबरोबर आम्हीही असायचोच. माझ्या पणजोबांनी माझ्या बाबांना खेळण्यासाठी जुन्या बाजारातून काही पितळेची खेळणी आणली होती.ती हि तिथल्याच एका पितळी पेटीतून.त्यात काही पितळेच्या वाघ,सिंह,हत्ती असे अनेक प्राणी,पक्षी होते.नंतर मात्र ती पेटी माळ्यावर गेली.आई,बाबा,आजी,आजोबा नेहमी त्या खेलण्यान्बद्दल बोलत असत,पण ती खेळणी कुठे आहेत हे कोणलाच माहित नव्हत.आम्हाला मात्र ती बघण्याची खूप इच्छा होती.ती खेळणी शोधण्यासाठी आईने कित्येकवेळा पूर्ण वाडा स्वच्छ केला.अचानक एक दिवस आईने माळा साफ करायला घेतला तेव्हा ती पेटी सापडली.त्या सर्व मूर्ती अंत्यंत आकर्षक,सुबक आणि वजनदार आहेत. त्यात गौरींचे आकर्षक पितळेचे दोन मुखवटेही होते.तेव्हापासून आमच्या घरी गौरी बसतात
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on गुरुवार, 04/05/2012 - 18:04

Permalink

अ.आ. च्या creativity ला सलाम.

अ.आ. च्या creativity ला सलाम. असाच एक बाजार नाशिकला बालाजी मंदिराजवळ (कापडपेठ) आहे. पण ती पिढीजात दुकाने आहेत. शिवाय ते लोक रस्त्यावर विक्री करत नाहीत.जुनी नाणी गंगेवर बसणाऱ्या वैदू लोकांकडे अनेक प्रकारची मिळतात. पण जास्त माहिती नसल्याने कधी घेतली नाही. भद्रकाली मार्केट जवळ नळ बाजारापासून ते दूध बाजारापर्यंत जुन्या वस्तू अनेक मिळतात.पण इतक्या वेगवेगळ्या वस्तू नाही भेटत. पितळेच्या अनेक वस्तू सायान्ताराचा साबुदाणा वडा खाता खाता दृष्टीस पडल्या आहेत. पण त्याचे फोटो काढून अशी सुंदर माहिती देवून संकलन करण्याची बुद्धी आम्हाला देवाने देऊ नये याची खंत वाटते. आणि अशी बुद्धी असणार्या लोकांचे अतृप्त आत्मे जगात अजून वावरत आहेत याचा आनंद ! ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sat, 04/07/2012 - 12:12

Permalink

लेख लाईकला........ वापरलेले

लेख लाईकला........ वापरलेले टुल्स..ड्रील्स, गाईंडींग व्हील्स व मशीन पारट्स मिळण्याचे हमहास ठिकाण म्हणे जुना बाजार.. अनेक वेळा माल खरेदी केला आहे..मजा येते हिंडताना बाजारात... माल कमी भावात खरेदी करणे पण एक शास्त्र व कला आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sat, 04/07/2012 - 19:50

Permalink

लय भारी हा सचित्र लेख पाहून

लय भारी हा सचित्र लेख पाहून मला एकदम मुंबईच्या चोर बाजाराची आठवण आली. ह्या लेखामुळे अनेक पुणेकर ह्या बाजारात बाजारहाट करतील ह्यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर मुतालीक on Sun, 04/08/2012 - 14:34

Permalink

जबरी !!

भारी हय राव. कधी कधी अशा बाजाराच्या बाजुनं जाणं होतं पण त्यामध्ये असणारी गंमत बघायची द्रुष्टी नसते. आपल्या लिखाणामुळे वेगळ्या नजरेने बघता येइल. छान.
  • Log in or register to post comments

Submitted by रघु सावंत on Sun, 04/08/2012 - 15:06

Permalink

सायबा मस्त बाजार दाखवलात

(मेली भलतीच गोंडस होती,पण किंमत ऐकल्यावर मी ही आडवा पडलो...! जरा त्या गोंडस बाटलीची किंमत सांगा म्हणजे इतर अंदाज बांधता येतील कारण वडीलां करिता अडकित्ता घेऊ म्हणत होतो रघु सावंत
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 04/11/2012 - 00:13

In reply to सायबा मस्त बाजार दाखवलात by रघु सावंत

Permalink

@जरा त्या गोंडस बाटलीची किंमत

@जरा त्या गोंडस बाटलीची किंमत सांगा >>> ''अवो..जादा नाय घेनार...फक्त ७०० रुपे द्या... '' ---इति विक्रेता.. :-(
  • Log in or register to post comments

Submitted by रघु सावंत on Sun, 04/08/2012 - 15:39

Permalink

यक्कू क्रूरसिंह

सायबा यक्कू क्रूरसिंग ही शस्‍त्रे तुम्ची स्वत:ची आहेत जमा करायची जरुर नाही. आमच्याही घरी आहेत अशी शस्त्रे म्हणजे तलवार,खंजीर,व इतर रघु सावंत
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 04/08/2012 - 17:08

Permalink

मस्त...

बाजारात फिरुन यायला मजा आली. स्वाती
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 04/11/2012 - 10:33

Permalink

माहितीपूर्ण धागा ! मला

माहितीपूर्ण धागा ! मला देवांना ओवाळायची पंचारती फार फार आवडली ! :) कधी त्या भागात येण झालं तर मी नक्कीच ती घेईन ! :) फोटो मस्तच आहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 04/13/2012 - 17:45

Permalink

धाग्यावर येऊन गेलेल्या

धाग्यावर येऊन गेलेल्या सर्वांचे धन्यवाद... हा धागा अनेकांना विशेषत्वानी अवडला...तसे संदेशही अनेकांनी पाठवले,त्यामुळे पुण्यातल्या अश्याच काही जुन्या-[हयात असलेल्या] वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देण्याचे मनाने घेतले आहे... जसे अठवत जाइल,तसे भेट देऊन वृत्तांत टाकणार आहे. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 04/16/2012 - 02:05

In reply to धाग्यावर येऊन गेलेल्या by अत्रुप्त आत्मा

Permalink

जरूर फोनवा..

वीकांत असेल आणि वल्ली व माझी सोबत चालणार असेल तर जरूर फोनवा... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 04/17/2012 - 09:21

In reply to जरूर फोनवा.. by मोदक

Permalink

@वल्ली व माझी सोबत चालणार

@वल्ली व माझी सोबत चालणार असेल तर जरूर फोनवा... >>> चालणार असेल'' चा तीव्र णिषेध :evil:...चालणार असेल काय..? हवीच आहे... जाताना कळवले जाणारच आहे... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 05/03/2012 - 10:28

In reply to जरूर फोनवा.. by मोदक

Permalink

च्यायला, तुम्ही दोघे काय

च्यायला, तुम्ही दोघे काय पॅकेज डील मध्ये येता काय रे ?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 05/03/2012 - 14:28

In reply to च्यायला, तुम्ही दोघे काय by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिष्टा on Mon, 04/16/2012 - 12:12

Permalink

इथे छान वस्तू दिसत आहेत

इथे छान वस्तू दिसत आहेत :-) पुर्वी रस्ता चुकून मुंबईतल्या चोरबाजारात जाऊन पोहोचले होते तेव्हा जिकडे तिकडे हत्यारंच दिसली होती. एवढी हत्यारं पाहून जिथून आले त्याच रस्त्याने परत गेले होते. नंतर तिकडे फिरकलेच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 04/17/2012 - 17:22

Permalink

मला माझ्याकडच्या जुन्या

मला माझ्याकडच्या जुन्या कॅसेट्स, वॉकमन, कॅसेट प्लेयर, १-२ जुने मोबाईल फोन्स, चार्जर्स वगरै विकायचय. १) मला तिथे जाउन बसता येईल का की हाकलतील? २) माझ्याबरोबर कोण कोण येणार? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 04/17/2012 - 17:27

In reply to मला माझ्याकडच्या जुन्या by कवितानागेश

Permalink

@मला माझ्याकडच्या जुन्या

@मला माझ्याकडच्या जुन्या कॅसेट्स, वॉकमन, कॅसेट प्लेयर, १-२ जुने मोबाईल फोन्स, चार्जर्स वगरै विकायचय. १) मला तिथे जाउन बसता येईल का की हाकलतील? >>> Image removed. २) माझ्याबरोबर कोण कोण येणार? >>> म्या हाय ना...फक्त तिथे गेल्यावर गुरगुरायचं नाय ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Tue, 05/01/2012 - 00:45

Permalink

अ -आ, अत्यंत अफलातून मेहनत घेतलीये फोटो सेशनसाठी

बहोत खूब, ले़ख नजरेतून सुटल्यानं प्रतिसादाला उशीर झाला, लगे रहो!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 05/03/2012 - 15:29

Permalink

चारच राहीलेत

बघा होतेय काय
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 05/03/2012 - 16:34

Permalink

१००

होणारच :) आमच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Mon, 05/14/2012 - 16:28

Permalink

अरेरे..

हा धागा अजुन इथेच??? धाग्यात 'सचिनचा' उल्लेख आलाय की काय???
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 05/14/2012 - 18:09

Permalink

चला एकच राहीला

तो पण पुरा करुन टाकतो. खुश ......... झाले १००
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com