Skip to main content

जुन्या पुण्यातला-जुना बाजार

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 04/04/2012 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुणं कितिही बदललं,नवनविन रुप घेत गेलं तरी पुण्याच्या काही सांस्कृतिक खुणा,किंबहुना पाऊलखुणा आहेत. त्या काळानुरुप काहि तश्याच,काही बदललेल्या,तर काही अपरिहार्यपणे पुसल्या गेलेल्याही आहेत...अशीच एक जुनी आणी खास जुन्यासाठीच प्रसिद्ध असलेली एक काळाच्या ओघातही टिकलेली खुण म्हणजे आमचा लोकप्रीय जुना बाजार... ऐतिहासिक शनिवारवाड्यापासुन पायी दहा मिनिटाच्या अंतरावर दर रविवारी आणी बुधवारी भरणारा हा बाजार म्हणजे एक प्रकारचा अघोषित सम्राटासारखा आहे... हे एक प्रकारचं गिर्‍हाईकी लोकाधारावर उभं असलेलं लोकं-राज्य आहे. माझ्या ऐकिव माहिती प्रमाणे हा बाजार जुना म्हणजे अगदी ब्रिटिशकालिन आमदानी पासुनचा आहे. त्याचं जुना हे नाव कालावाचक जेवढं आहे,त्यापेक्षा ते आत्मवाचक जास्त आहे. इथे आजही सगळ्या जुन्याच वस्तू मिळतात का हो..?,तर नाही, गरीब जनतेची सोय पाहाणारे कपड्यांचे/भांड्यांचे/चादरी/ब्लँकेटांचे/गृहोपयोगी वस्तुंचे ही स्टॉल्स इथे आहेत..पण ते काळाची गरज म्हणुन...!,जुन्या बाजाराचं खरं वैशिष्ठ्य म्हणजे अगदी शिवकालापासुन ते त्या आधी नंतरच्याही कालातली जुनी नाणी, भांडी,अडकित्ते,देवाची पुजेची उपकरणी,तलवारिंच्या मुठी(आणी तुंम्ही खात्रीचं गिर्‍हाइक वाटलात,तर पाती सुद्धा ;-) ) दुर्बिणी,होकायंत्रे,लाँगप्ले रेकॉर्ड्स,त्याचे प्लेअर्स,कासवछाप-किसण्या,पानाचे डबे,गाड्या,जुने पितळी वस्तरे,चुनाळ्या ,पितळ्या/तांब्याची भांडी अश्या असंख्य आणी नाना प्रकारच्या वस्तू इथे कित्येक वर्ष अव्याहत पणे विकल्या जात आहेत.. माझी या बाजाराशी ओळख अगदी लहानपणापासुनची(इयत्ता ७वी) आहे...आंम्ही रविवारी घरातुन सकाळी हादडुन झालं की ज्यादिवशी ५रु अ-खंड मिळतील,(तेही आपल्याला पाहुण्यांनी दिल्यानंतर आईनी(च),''दे रे इकडे अत्ता..!'' असं करुन कधितरी काढुन घेतलेले) म्हणजे तसे-परत मिळतील तेंव्हा मी २:५०रुपये- ५तास दरानी भाड्याची छोटी सायकल घेऊन आम्च्या ग्यांगमधिल येतिल त्या मित्रांसह जुन्याबाजारात कुच करायचो..अता त्यावेळी आमचं प्रमुख आकर्षण इथे ते काय होतं..?,तर इथे मिळणारे ऊल्हास नगरमेड हेडफोन आणी मुख्य म्हणजे इंग्रजी गाण्यांच्या कॅसेट्स,सोनी,बिलबेर्ड आदी कंपन्यांच्या अत्यंत महाग असलेल्या,जॅक्सन,फिल कॉलिन्स,पेट्शॉप बॉइज,बोनी एम या कलाकार/ग्रुपच्या,,,वापरलेल्या किंवा चोरुन आलेल्या क्यासेटी तिथे,तेंव्हा सुद्धा पंधरा ते पस्तीस रुपयांना मिळायच्या...(दुकानात जाऊन नव्यांच्या किमती ऐकणं सुद्ध तेंव्हा परवडायचं नाही,तर विकत घेऊन त्यातली गाणी कोण ऐकणार...?) वस्तुतः या कॅसेटही दरवेळी आंम्ही घ्यायचोच असे नाही,पण तिथे फिरायला सुद्धा एक वेगळीच मजा वाटायची...इथे एक बरं आहे,तुंम्ही मालाची कितिही चौकशी केली,हाताळला तरी कोणिही वसकन..ठेवाss असं म्हणुन अंगावर येत नाही,अर्थात हाही काही अगदी पूर्ण सद्गुण नसुन ते एक प्रकारचं,गिर्‍हाइकाला वस्तूच्या प्रेमात-पडू द्यायचं कौशल्य आहे,हे तिथे मुरलेल्या गिर्‍हाइकाला कळुन येतच...! इथे खरेदी करताना काही गोष्टी गाडीबरोबर पार्क करुन आत शिरावं लागतं,नाहितर भल्या-भल्या गिर्‍हाइकांच्या हा बाजार अंगाशी आल्याशिवाय रहात नाही...!आपल्याला खरेदीतलं खूपच कळतं,हा भाव असला तर इथले व्यपारी ते दोन मिनिटात हेरुन आपला भावच करतात. बारगेनिंग हवं तितकं करा पण इरेस पडलात,तर तुम्हाला ती वस्तू अख्या बाजार समोर इज्जत घेऊन तो विक्रेता फुकट सुद्ध अंगावर मारायला कमी करत नाही. हां...अता गिर्‍हाईकी चलाखी हवी तेवढी करता येते..म्हणजे एखादी वस्तू अवडली तर आधी चेहेर्‍यावर 'फार अवडल्याचा' भाव आणणं,नंतर किमतीत उतरवुन...शेवटी ''येताना घेतो...'' असं म्हणुन,फार लांब न जात,त्या विक्रेत्याला दिसेल अश्या तसल्याच वस्तू विकणार्‍या दुसर्‍या स्टॉल समोर जाऊन उभं रहाणं,मग तो आपल्याला लांबुन हाक मारतो,मग ''आलोच'', असं खुणावत,,,जरावेळानी जाऊन,''बघा दादा आपण लास्ट मंजे लास्ट पाचशे देऊ''..असं एखाद वाक्य फेकणं, हे सगळं जमलं तर साधारण अपेक्षित भावात वस्तू हाती लागते. अर्थात यापेक्षाही रोखठोक डायरेक सेटलमेंट सारखे पर्याय वापरता येतात...पण सगळा गिर्‍हाइकी भावुकपणा दूर ठेऊन...! त्यामुळेच मला, 'अगदी तय्यारातल्या तयार अट्टल गिर्‍हाइक' असं म्हणवणारा कुणी भेटला,तर मी त्याला हे च्यायलेंज अगदी बिन दिक्कत देऊ शकतो- हा बाजार उठवुन दाखवा...! आपण मानलं तुम्हाला...! ;-) १)अता त्यावेळचं कॅसेटयुग संपत आलं असलं,तरी इथे अजुनही केसेट्स,टेप,वॉकमन्स आदी तुरळक प्रमाणात दिसतातच...! २)अवजारं आणी हत्यारं-खाटिककामापासुन ते सुतारकामा,बांधकाम,लोहारकामा पर्यंतची...! ३)अता नाणी/नोटा-सातवाहन,गुप्तकाळ शिवकाळ,ब्रिटिशकाळापासुन ते,अगदी आजच्या काळापर्यंतची... ४)आणी अता हाय अँड टेरर पॉइंट ऑफ जुना बाजार... सावधपणे खरेदी करण्याच्या जुन्या वस्तू... ५)ह्या काचेच्या वस्तू...मी खास असल्याचा आव अणला,आणी मग त्यानी मला खास-आत नेऊन दाखवल्या...! ;-) ६)गृहोपयोगी वस्तूंची म्होट्टी रेंज... ७)दुर्बिणी,भिंग,होकायंत्र,घड्याळं..इ...इ... ८) ही आडवी पडलेली सुबक,नाजुकशी बाटली...(मेली भलतीच गोंडस होती,पण किमत ऐकल्यावर मी ही अडवा पडलो...! ;-) ) ९)आणी आता सगळी जुनी भांडी,अडकित्ते,चुनाळ्या,पळी-पंचपात्रं,साखळ्या,पंचारत्या,तांबे,पितळी डबे,किसण्या,देव मूर्ती...इ...इ... १०)हे मला अवडलेले खास २ अडकित्ते...यात सुपारी लवकर फुटेल..पण विक्रेत्याचा...भाव..?..तो नै लवकर फुटायच..! लै चकरा मारायला लावतात...तेंव्हा सुपारी'फुटते...! ;-) ११) आणी हा पण बाजारा इअतकीच जुनेपणाची साक्ष देणारा... कसा चमचम करतोय बघा...! :-)

वाचने 51382
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

हे असले लेख ताकताय ठिक आहे. पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही. तुमचा अखास अ‍ॅण्टिक शैलीत निषेध करण्यात येत आहे.

In reply to by मन१

@पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही. >>> ठिक आहे,पुढल्यावेळी योग्य अंतरावरुन हाक-मारली जाइल. ;-)

हे असले लेख ताकताय ठिक आहे. पण तिथं हाकेच्या अंतरावर आम्ही असतानाही बोलावलो गेलो नाही. तुमचा अखास अ‍ॅण्टिक शैलीत निषेध करण्यात येत आहे.

पितळी वस्तू आम्हालाही प्रचंड आवडतात, पण महागही असतात ब्वॉ.. मस्त बाजार.. तृप्त केलंत, आत्मारामा..

इथे मिळणारी इस्त इंडिया कंपनीची नाणी एकदम बोगस असतात. ती अगदी १८३५ सालची असली तरी त्यावर यू के असे लिहिलेले असते. १८५७ च्या अगोदर मुघल सरकाराची नाणी कंपनी सरकार काढीत असे पण त्यावेळेस इंग्लंडचा युके झालेला नव्हता . मुघलकालीन नाणी मात्र भरपूर मिळतात. पेशवेकालीन नाणी मात्र फारशी दिसत नाहीत. अवांतरः तुघलकाने काढलेल्या चाम्ड्याच्या नाण्यापैकी एखाद्या नाण्याबद्दल काही म्हैती मिळेल का?

धन्यवाद..साहेब झकास फोटो अन ऊत्तम ओळख .. कसब्यात असताना बर्‍याच वेळा चक्कर टाकलेली आहे,आजकाल त्या शुज वगेरे विकणार्‍या लोकानी बाजाराची बरीच जागा व्यापली आहे. @ अन्या दातार :कोल्हापुरात पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत भरायचा (सध्या माहित नाही). रेकॉर्ड प्लेयर, जुने व्हॉल्ववाले रेडीओ याची बर्‍यापैकी व्हरायटी दिसायची............... ...............साहेबा आमच्या सोलापुरात देखील पद्मा टॉकिजच्या समोर एका गल्लीत असा बाजार भरतो दर मन्गलवारी.(आज ही) अवातर : च्यायला काल बाजारात चक्कर टाकायला हवी होती राव... काही खास नाही तरी मिपा ची दोन अमुल्य रत्ने "याची डोळा" पहायला मिळाले असते.

बाजाराची सफर आवडली.

मी कसबा पेठेतली,आमच्या घरापासून काही अंतरावरच जुना बाजार आहे.आजोबा, बाबा,काका हे वेळ घालवायला तिथे चक्कर मारत असत,त्यांच्याबरोबर आम्हीही असायचोच. माझ्या पणजोबांनी माझ्या बाबांना खेळण्यासाठी जुन्या बाजारातून काही पितळेची खेळणी आणली होती.ती हि तिथल्याच एका पितळी पेटीतून.त्यात काही पितळेच्या वाघ,सिंह,हत्ती असे अनेक प्राणी,पक्षी होते.नंतर मात्र ती पेटी माळ्यावर गेली.आई,बाबा,आजी,आजोबा नेहमी त्या खेलण्यान्बद्दल बोलत असत,पण ती खेळणी कुठे आहेत हे कोणलाच माहित नव्हत.आम्हाला मात्र ती बघण्याची खूप इच्छा होती.ती खेळणी शोधण्यासाठी आईने कित्येकवेळा पूर्ण वाडा स्वच्छ केला.अचानक एक दिवस आईने माळा साफ करायला घेतला तेव्हा ती पेटी सापडली.त्या सर्व मूर्ती अंत्यंत आकर्षक,सुबक आणि वजनदार आहेत. त्यात गौरींचे आकर्षक पितळेचे दोन मुखवटेही होते.तेव्हापासून आमच्या घरी गौरी बसतात

अ.आ. च्या creativity ला सलाम. असाच एक बाजार नाशिकला बालाजी मंदिराजवळ (कापडपेठ) आहे. पण ती पिढीजात दुकाने आहेत. शिवाय ते लोक रस्त्यावर विक्री करत नाहीत.जुनी नाणी गंगेवर बसणाऱ्या वैदू लोकांकडे अनेक प्रकारची मिळतात. पण जास्त माहिती नसल्याने कधी घेतली नाही. भद्रकाली मार्केट जवळ नळ बाजारापासून ते दूध बाजारापर्यंत जुन्या वस्तू अनेक मिळतात.पण इतक्या वेगवेगळ्या वस्तू नाही भेटत. पितळेच्या अनेक वस्तू सायान्ताराचा साबुदाणा वडा खाता खाता दृष्टीस पडल्या आहेत. पण त्याचे फोटो काढून अशी सुंदर माहिती देवून संकलन करण्याची बुद्धी आम्हाला देवाने देऊ नये याची खंत वाटते. आणि अशी बुद्धी असणार्या लोकांचे अतृप्त आत्मे जगात अजून वावरत आहेत याचा आनंद ! ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेख लाईकला........ वापरलेले टुल्स..ड्रील्स, गाईंडींग व्हील्स व मशीन पारट्स मिळण्याचे हमहास ठिकाण म्हणे जुना बाजार.. अनेक वेळा माल खरेदी केला आहे..मजा येते हिंडताना बाजारात... माल कमी भावात खरेदी करणे पण एक शास्त्र व कला आहे..

लय भारी हा सचित्र लेख पाहून मला एकदम मुंबईच्या चोर बाजाराची आठवण आली. ह्या लेखामुळे अनेक पुणेकर ह्या बाजारात बाजारहाट करतील ह्यात शंका नाही.

भारी हय राव. कधी कधी अशा बाजाराच्या बाजुनं जाणं होतं पण त्यामध्ये असणारी गंमत बघायची द्रुष्टी नसते. आपल्या लिखाणामुळे वेगळ्या नजरेने बघता येइल. छान.

(मेली भलतीच गोंडस होती,पण किंमत ऐकल्यावर मी ही आडवा पडलो...! जरा त्या गोंडस बाटलीची किंमत सांगा म्हणजे इतर अंदाज बांधता येतील कारण वडीलां करिता अडकित्ता घेऊ म्हणत होतो रघु सावंत

In reply to by रघु सावंत

@जरा त्या गोंडस बाटलीची किंमत सांगा >>> ''अवो..जादा नाय घेनार...फक्त ७०० रुपे द्या... '' ---इति विक्रेता.. :-(

सायबा यक्कू क्रूरसिंग ही शस्‍त्रे तुम्ची स्वत:ची आहेत जमा करायची जरुर नाही. आमच्याही घरी आहेत अशी शस्त्रे म्हणजे तलवार,खंजीर,व इतर रघु सावंत

बाजारात फिरुन यायला मजा आली. स्वाती

माहितीपूर्ण धागा ! मला देवांना ओवाळायची पंचारती फार फार आवडली ! :) कधी त्या भागात येण झालं तर मी नक्कीच ती घेईन ! :) फोटो मस्तच आहेत...

धाग्यावर येऊन गेलेल्या सर्वांचे धन्यवाद... हा धागा अनेकांना विशेषत्वानी अवडला...तसे संदेशही अनेकांनी पाठवले,त्यामुळे पुण्यातल्या अश्याच काही जुन्या-[हयात असलेल्या] वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देण्याचे मनाने घेतले आहे... जसे अठवत जाइल,तसे भेट देऊन वृत्तांत टाकणार आहे. :-)

In reply to by मोदक

@वल्ली व माझी सोबत चालणार असेल तर जरूर फोनवा... >>> चालणार असेल'' चा तीव्र णिषेध :evil:...चालणार असेल काय..? हवीच आहे... जाताना कळवले जाणारच आहे... :-)

इथे छान वस्तू दिसत आहेत :-) पुर्वी रस्ता चुकून मुंबईतल्या चोरबाजारात जाऊन पोहोचले होते तेव्हा जिकडे तिकडे हत्यारंच दिसली होती. एवढी हत्यारं पाहून जिथून आले त्याच रस्त्याने परत गेले होते. नंतर तिकडे फिरकलेच नाही.

मला माझ्याकडच्या जुन्या कॅसेट्स, वॉकमन, कॅसेट प्लेयर, १-२ जुने मोबाईल फोन्स, चार्जर्स वगरै विकायचय. १) मला तिथे जाउन बसता येईल का की हाकलतील? २) माझ्याबरोबर कोण कोण येणार? ;)

In reply to by कवितानागेश

@मला माझ्याकडच्या जुन्या कॅसेट्स, वॉकमन, कॅसेट प्लेयर, १-२ जुने मोबाईल फोन्स, चार्जर्स वगरै विकायचय. १) मला तिथे जाउन बसता येईल का की हाकलतील? >>> २) माझ्याबरोबर कोण कोण येणार? >>> म्या हाय ना...फक्त तिथे गेल्यावर गुरगुरायचं नाय ;-)

होणारच :) आमच्या शुभेच्छा!!

हा धागा अजुन इथेच??? धाग्यात 'सचिनचा' उल्लेख आलाय की काय???

लय भारी जागा आहे ही ! आता पुण्यात आलो की एकदा आत्मुबुवांसोबत इथे चक्कर मारायलाच पाहिजे !! बाकी तुम्हाला आवडलेले दोन्ही अडकित्ते बेस्ट आहेत ..एस्पिशीयली दुसरा तर लयच भारी ! घेतला का विकत ? कितीला पडला ??

In reply to by प्रसाद गोडबोले

घेतला होता...होता म्हणायचे..कारण आमच्या कर् नाटक ;) वाल्या एका मित्रानी तो माझ्या कडून नेला... हिंदीत अगवा करना .. म्हणातात ना तसा. पार शृंगेरीला गेल्यावर सांगितलन मला.. :-/ वर म्हणतो..तू पुण्यातलाच तुला मिळेल की दुसरा! :-/ मी अता एका चित्याच्या अडकित्त्यावर गेली ३ महिने नजर ठेऊन आहे. इक्रेता मेला १४०० वर अडून बसलाय.. :-/

ट्रेकिंगचे पहिले पिट्टू इथूनच घेतलेले आम्ही... एकच नंबर जागा आहे ही. एकदा ठासणीची बंदूक घ्यायची इच्छा आहे पण इथे मिळाली नाही... *bomb* *mamba* *crazy*

वाह बुवा .... __/|\__ भन्नाट धागा .. ह्या सगळ्या वस्तू जबरा आहेत

मस्त मस्त .. पुण्याची आठवण अजूनच तीव्र झाली .. खफ च्या निमित्ताने हा लेख वाचायला मिळाला हे एक बर झाल.

भारी असतो हा बाजार! कॉलेजच्या बाजूलाच असल्याने कॉलेजच्या दिवसात दर बुधवारी चक्कर असायची! खासकरून कॉम्पुटरचे पार्ट मिळवण्यासाठी. १०० रु. किलो हार्ड डिस्क विकल्या जायच्या. किलोभर घ्यायच्या, लागली तर लागली एखादी चांगली डिस्क! माझ्या एका मित्राला एक ८० GB (त्याकाळात खूप जास्त समजली जायची) लागली होती! :):)