पुणं कितिही बदललं,नवनविन रुप घेत गेलं तरी पुण्याच्या काही सांस्कृतिक खुणा,किंबहुना पाऊलखुणा आहेत. त्या काळानुरुप काहि तश्याच,काही बदललेल्या,तर काही अपरिहार्यपणे पुसल्या गेलेल्याही आहेत...अशीच एक जुनी आणी खास जुन्यासाठीच प्रसिद्ध असलेली एक काळाच्या ओघातही टिकलेली खुण म्हणजे आमचा लोकप्रीय जुना बाजार...
ऐतिहासिक शनिवारवाड्यापासुन पायी दहा मिनिटाच्या अंतरावर दर रविवारी आणी बुधवारी भरणारा हा बाजार म्हणजे एक प्रकारचा अघोषित सम्राटासारखा आहे... हे एक प्रकारचं गिर्हाईकी लोकाधारावर उभं असलेलं लोकं-राज्य आहे. माझ्या ऐकिव माहिती प्रमाणे हा बाजार जुना म्हणजे अगदी ब्रिटिशकालिन आमदानी पासुनचा आहे. त्याचं जुना हे नाव कालावाचक जेवढं आहे,त्यापेक्षा ते आत्मवाचक जास्त आहे. इथे आजही सगळ्या जुन्याच वस्तू मिळतात का हो..?,तर नाही, गरीब जनतेची सोय पाहाणारे कपड्यांचे/भांड्यांचे/चादरी/ब्लँकेटांचे/गृहोपयोगी वस्तुंचे ही स्टॉल्स इथे आहेत..पण ते काळाची गरज म्हणुन...!,जुन्या बाजाराचं खरं वैशिष्ठ्य म्हणजे अगदी शिवकालापासुन ते त्या आधी नंतरच्याही कालातली जुनी नाणी, भांडी,अडकित्ते,देवाची पुजेची उपकरणी,तलवारिंच्या मुठी(आणी तुंम्ही खात्रीचं गिर्हाइक वाटलात,तर पाती सुद्धा ;-) ) दुर्बिणी,होकायंत्रे,लाँगप्ले रेकॉर्ड्स,त्याचे प्लेअर्स,कासवछाप-किसण्या,पानाचे डबे,गाड्या,जुने पितळी वस्तरे,चुनाळ्या ,पितळ्या/तांब्याची भांडी अश्या असंख्य आणी नाना प्रकारच्या वस्तू इथे कित्येक वर्ष अव्याहत पणे विकल्या जात आहेत..
माझी या बाजाराशी ओळख अगदी लहानपणापासुनची(इयत्ता ७वी) आहे...आंम्ही रविवारी घरातुन सकाळी हादडुन झालं की ज्यादिवशी ५रु अ-खंड मिळतील,(तेही आपल्याला पाहुण्यांनी दिल्यानंतर आईनी(च),''दे रे इकडे अत्ता..!'' असं करुन कधितरी काढुन घेतलेले) म्हणजे तसे-परत मिळतील तेंव्हा मी २:५०रुपये- ५तास दरानी भाड्याची छोटी सायकल घेऊन आम्च्या ग्यांगमधिल येतिल त्या मित्रांसह जुन्याबाजारात कुच करायचो..अता त्यावेळी आमचं प्रमुख आकर्षण इथे ते काय होतं..?,तर इथे मिळणारे ऊल्हास नगरमेड हेडफोन आणी मुख्य म्हणजे इंग्रजी गाण्यांच्या कॅसेट्स,सोनी,बिलबेर्ड आदी कंपन्यांच्या अत्यंत महाग असलेल्या,जॅक्सन,फिल कॉलिन्स,पेट्शॉप बॉइज,बोनी एम या कलाकार/ग्रुपच्या,,,वापरलेल्या किंवा चोरुन आलेल्या क्यासेटी तिथे,तेंव्हा सुद्धा पंधरा ते पस्तीस रुपयांना मिळायच्या...(दुकानात जाऊन नव्यांच्या किमती ऐकणं सुद्ध तेंव्हा परवडायचं नाही,तर विकत घेऊन त्यातली गाणी कोण ऐकणार...?)
वस्तुतः या कॅसेटही दरवेळी आंम्ही घ्यायचोच असे नाही,पण तिथे फिरायला सुद्धा एक वेगळीच मजा वाटायची...इथे एक बरं आहे,तुंम्ही मालाची कितिही चौकशी केली,हाताळला तरी कोणिही वसकन..ठेवाss असं म्हणुन अंगावर येत नाही,अर्थात हाही काही अगदी पूर्ण सद्गुण नसुन ते एक प्रकारचं,गिर्हाइकाला वस्तूच्या प्रेमात-पडू द्यायचं कौशल्य आहे,हे तिथे मुरलेल्या गिर्हाइकाला कळुन येतच...! इथे खरेदी करताना काही गोष्टी गाडीबरोबर पार्क करुन आत शिरावं लागतं,नाहितर भल्या-भल्या गिर्हाइकांच्या हा बाजार अंगाशी आल्याशिवाय रहात नाही...!आपल्याला खरेदीतलं खूपच कळतं,हा भाव असला तर इथले व्यपारी ते दोन मिनिटात हेरुन आपला भावच करतात. बारगेनिंग हवं तितकं करा पण इरेस पडलात,तर तुम्हाला ती वस्तू अख्या बाजार समोर इज्जत घेऊन तो विक्रेता फुकट सुद्ध अंगावर मारायला कमी करत नाही. हां...अता गिर्हाईकी चलाखी हवी तेवढी करता येते..म्हणजे एखादी वस्तू अवडली तर आधी चेहेर्यावर 'फार अवडल्याचा' भाव आणणं,नंतर किमतीत उतरवुन...शेवटी ''येताना घेतो...'' असं म्हणुन,फार लांब न जात,त्या विक्रेत्याला दिसेल अश्या तसल्याच वस्तू विकणार्या दुसर्या स्टॉल समोर जाऊन उभं रहाणं,मग तो आपल्याला लांबुन हाक मारतो,मग ''आलोच'', असं खुणावत,,,जरावेळानी जाऊन,''बघा दादा आपण लास्ट मंजे लास्ट पाचशे देऊ''..असं एखाद वाक्य फेकणं, हे सगळं जमलं तर साधारण अपेक्षित भावात वस्तू हाती लागते. अर्थात यापेक्षाही रोखठोक डायरेक सेटलमेंट सारखे पर्याय वापरता येतात...पण सगळा गिर्हाइकी भावुकपणा दूर ठेऊन...!
त्यामुळेच मला, 'अगदी तय्यारातल्या तयार अट्टल गिर्हाइक' असं म्हणवणारा कुणी भेटला,तर मी त्याला हे च्यायलेंज अगदी बिन दिक्कत देऊ शकतो- हा बाजार उठवुन दाखवा...! आपण मानलं तुम्हाला...! ;-)
१)अता त्यावेळचं कॅसेटयुग संपत आलं असलं,तरी इथे अजुनही केसेट्स,टेप,वॉकमन्स आदी तुरळक प्रमाणात दिसतातच...!
२)अवजारं आणी हत्यारं-खाटिककामापासुन ते सुतारकामा,बांधकाम,लोहारकामा पर्यंतची...!
३)अता नाणी/नोटा-सातवाहन,गुप्तकाळ शिवकाळ,ब्रिटिशकाळापासुन ते,अगदी आजच्या काळापर्यंतची...
४)आणी अता हाय अँड टेरर पॉइंट ऑफ जुना बाजार... सावधपणे खरेदी करण्याच्या जुन्या वस्तू...
५)ह्या काचेच्या वस्तू...मी खास असल्याचा आव अणला,आणी मग त्यानी मला खास-आत नेऊन दाखवल्या...! ;-)
६)गृहोपयोगी वस्तूंची म्होट्टी रेंज...
७)दुर्बिणी,भिंग,होकायंत्र,घड्याळं..इ...इ...
८) ही आडवी पडलेली सुबक,नाजुकशी बाटली...(मेली भलतीच गोंडस होती,पण किमत ऐकल्यावर मी ही अडवा पडलो...! ;-) )
९)आणी आता सगळी जुनी भांडी,अडकित्ते,चुनाळ्या,पळी-पंचपात्रं,साखळ्या,पंचारत्या,तांबे,पितळी डबे,किसण्या,देव मूर्ती...इ...इ...

१०)हे मला अवडलेले खास २ अडकित्ते...यात सुपारी लवकर फुटेल..पण विक्रेत्याचा...भाव..?..तो नै लवकर फुटायच..! लै चकरा मारायला लावतात...तेंव्हा सुपारी'फुटते...! ;-)
११) आणी हा पण बाजारा इअतकीच जुनेपणाची साक्ष देणारा... कसा चमचम करतोय बघा...! :-)
२)अवजारं आणी हत्यारं-खाटिककामापासुन ते सुतारकामा,बांधकाम,लोहारकामा पर्यंतची...!
३)अता नाणी/नोटा-सातवाहन,गुप्तकाळ शिवकाळ,ब्रिटिशकाळापासुन ते,अगदी आजच्या काळापर्यंतची...
४)आणी अता हाय अँड टेरर पॉइंट ऑफ जुना बाजार... सावधपणे खरेदी करण्याच्या जुन्या वस्तू...
५)ह्या काचेच्या वस्तू...मी खास असल्याचा आव अणला,आणी मग त्यानी मला खास-आत नेऊन दाखवल्या...! ;-)
६)गृहोपयोगी वस्तूंची म्होट्टी रेंज...
७)दुर्बिणी,भिंग,होकायंत्र,घड्याळं..इ...इ...
८) ही आडवी पडलेली सुबक,नाजुकशी बाटली...(मेली भलतीच गोंडस होती,पण किमत ऐकल्यावर मी ही अडवा पडलो...! ;-) )
९)आणी आता सगळी जुनी भांडी,अडकित्ते,चुनाळ्या,पळी-पंचपात्रं,साखळ्या,पंचारत्या,तांबे,पितळी डबे,किसण्या,देव मूर्ती...इ...इ...

१०)हे मला अवडलेले खास २ अडकित्ते...यात सुपारी लवकर फुटेल..पण विक्रेत्याचा...भाव..?..तो नै लवकर फुटायच..! लै चकरा मारायला लावतात...तेंव्हा सुपारी'फुटते...! ;-)
११) आणी हा पण बाजारा इअतकीच जुनेपणाची साक्ष देणारा... कसा चमचम करतोय बघा...! :-)
वाचने
51366
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !!!
मस्त
.(मेली भलतीच गोंडस होती,पण
@रुंदीला दीड इंची आणि लांबीला
In reply to .(मेली भलतीच गोंडस होती,पण by यकु
व्वा, भारीच आहे मग बाजार.
In reply to @रुंदीला दीड इंची आणि लांबीला by अत्रुप्त आत्मा
>>>रुंदीला दीड इंची आणि
In reply to .(मेली भलतीच गोंडस होती,पण by यकु
>>>मूळ शस्त्र कुणाकडं आहे? की
In reply to >>>रुंदीला दीड इंची आणि by प्यारे१
'माझं' लक्ष गेलं म्हणून हा
In reply to >>>मूळ शस्त्र कुणाकडं आहे? की by यकु
हे कोण बोलले...बोला...?
In reply to 'माझं' लक्ष गेलं म्हणून हा by प्यारे१
बिना म्यानची तलवार हवेत फिरवू नका
In reply to >>>मूळ शस्त्र कुणाकडं आहे? की by यकु
>>>>>ठराविक आकाराचे म्यान हवे
In reply to बिना म्यानची तलवार हवेत फिरवू नका by मालोजीराव
वेगळी दुनिया...
फोटो आवडले. त्यातल्या कितीतरी
इथल्या खरेद्यांचे आणि विक्रेत्यांचेही
धन्यवाद!! इतके सगळे फोटो
+१
In reply to धन्यवाद!! इतके सगळे फोटो by प्रीती
मस्त!
मस्त हो!
@त्या पितळी वस्तूंमधे माझा
In reply to मस्त हो! by पैसा
अधिक काय बोलू, तुमच्याबरोबरच
कोल्हापुरात पद्मा टॉकिजच्या
@या जागा माणसांचे निरीक्षण
In reply to कोल्हापुरात पद्मा टॉकिजच्या by अन्या दातार
मस्त ओळख !
आम्ही या बाजारात दर
In reply to मस्त ओळख ! by इष्टुर फाकडा
अ.आ. जी... छान लेख!..
In reply to आम्ही या बाजारात दर by सुहास..
आर्मीतल्या पाठपिशव्या
In reply to मस्त ओळख ! by इष्टुर फाकडा
त्याच्या सॅकला एक AK 47 / AK
In reply to आर्मीतल्या पाठपिशव्या by मोदक
Jack Wolfskin
In reply to त्याच्या सॅकला एक AK 47 / AK by इष्टुर फाकडा
फ्फक्कड लेख.
वरील फोटू लेख पाहून एक
मला माहीत असलेला गमतीदार किस्सा..
In reply to वरील फोटू लेख पाहून एक by रेवती
@दुकानदाराने त्याच्याच गाडीची
In reply to मला माहीत असलेला गमतीदार किस्सा.. by मोदक
मस्त. मला कुंकवाचे करंडे, अन
खत्रुड
उत्तम बाजार आहे, पण प्रचंड
आजच्या दिवसात चांगले असे खूप कांही चुकवले आहे..
चोर बाजार.
जुनी आठवण वगैरे ठीक आहे पण
@रस्त्याचा एक भाग व्यापून
In reply to जुनी आठवण वगैरे ठीक आहे पण by बाळ सप्रे
नियमात बसवलय म्हणून कयदेशीर
In reply to @रस्त्याचा एक भाग व्यापून by अत्रुप्त आत्मा
@पण बकालपणा जात नाही ना !!
In reply to नियमात बसवलय म्हणून कयदेशीर by बाळ सप्रे
+१
In reply to @पण बकालपणा जात नाही ना !! by अत्रुप्त आत्मा
रस्ता हा वहातुकीसाठी असतो.
In reply to +१ by प्रचेतस
@रस्ता हा वहातुकीसाठी असतो.
In reply to रस्ता हा वहातुकीसाठी असतो. by बाळ सप्रे
अहो बाजार "लै जुना" आहे,
In reply to @रस्ता हा वहातुकीसाठी असतो. by अत्रुप्त आत्मा
@अहो बाजार "लै जुना" आहे,
In reply to अहो बाजार "लै जुना" आहे, by बाळ सप्रे
रस्ता हा वहातुकीसाठी असतो.
In reply to @अहो बाजार "लै जुना" आहे, by अत्रुप्त आत्मा
@याला मी समर्थन समजलो..
In reply to रस्ता हा वहातुकीसाठी असतो. by बाळ सप्रे
खर आहे.पण जुना बाजार हि
In reply to जुनी आठवण वगैरे ठीक आहे पण by बाळ सप्रे
@मी कधी जुना बाजार भरलाय
In reply to खर आहे.पण जुना बाजार हि by किचेन
महिने नहि वर्ष.
In reply to @मी कधी जुना बाजार भरलाय by अत्रुप्त आत्मा
झकास!
मस्त!
छान
खास
बर्याचदा गेलोय इथे पण
एक ठसठसणारी आठवण
गुर्जी कधी नेताय बाजारला? ते
अरे व्वा !!!! इथल्या काही
मस्त आहे एक्दम
अ आ.आपला 'स्मायल्या' नी
असेच म्हण्तो.
In reply to अ आ.आपला 'स्मायल्या' नी by प्यारे१
थोडे सांभाळुन खरेदी करा....
अत्रुप्त आत्मा साहेब, मस्त लेख व भारी पुणे...
मस्त
छान सचित्र लेख आवड्ला. जुन्या
पुन्हा एकदा आपला आसमंत उघड्या
मिलिटरीच्या हॅवरसॅक्स,
झकास फोटो अन ऊत्तम ओळख
भटजीबुवा,