✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोंकणी माणूस असा का?

M
Madhavi_Bhave यांनी
गुरुवार, 04/12/2012 - 12:22  ·  लेख
लेख
मला खालील प्रश्न खूप वर्षांपासून पडलेला आहे. इतकी वर्षे मनातच ठेवला होता. मिपाकर नक्की उत्तर देतील असा विश्वास आहे. मी बऱ्याचदा कोकणात फिरायला जाते. माझा एक मामा भालावली (राजापूर जवळ) मध्ये राहतो. एक दोन वर्षांनी त्याच्याकडे पण चक्कर होते. कधी सावंतवाडी, मालवण इत्यादी ठिकाणी देखील फिरणे होते. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे "कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस वाटतो. म्हणजे आपली परिस्थिती सुधारायला हात पाय हलवायला पाहिजे ह्या गोष्टी वर विश्वासच नसावा वाटते. एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे. घरा भोवतीचा परिसर हा स्वच्छ ठेवणे म्हणजे काही पाप करतो असे वाटत असावे. मला आठवते ४ - ५ वर्षांपूर्वी मी काश्मीरला गेले होते. (येथे एक उल्लेख करावासा वाटतो. केसरी च्या भूलथापाना बळी पडून मुंबईतील उन्हाळा पासून थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून गेलो होतो. श्रीनगरला गेलो तेव्हा आपण काश्मीर मध्ये आहोत कि मुंबई मध्ये असा प्रश्न पडला होता. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात वाचले म्हणून गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. तेव्हा तुम्ही केसरी किंवा तत्सम tour operators ने केलेल्या भूलथापाना शक्यतो बळी पडू नका. माफ करा थोडे विषयांतर झाले. सांगायचा मुद्दा हा होता कि सर्वसामान्य काश्मिरी माणूस हा त्याच्यावर आलेल्या संकटांमुळे मुळातच पिचलेला होते. कधी काय होईल ह्याचा नेम नाही. उद्याची कसलीच शाश्वती नाही. फिरायला आलेल्या माणसांनी काही खरेदी केली तर दोन घास खायला मिळतील अशी परिस्थिती. अश्या परीस्थितदेखील ह्या सर्वसामान्य लोकांची घरे स्वच्छ, आजूबाजूचा परिसर साफ आणि कोकणात आढळून येणारा उदासपणा नसणे हे एक वैशिष्ट जाणवले मला. ह्या उलट आपल्या कोकणात कितीतरी करण्यासारखे आहे पण काही ना करता गोष्टी होत आहेत ना तर होऊ दे हा स्थायीभाव आहे आपल्या कोकणी माणसाचा असे वाटायला लागले आहे. कितीतरी गुजराथी किंवा साउथ इंडिअनस किंवा अगदी भय्यानि आपला मोर्चा कधीच वळवला आहे कोकणाकडे आणि उद्या आपला कोकणी माणूस काही ना करता आपल्या पोटा पानाच्या साधनांवर इतरांनी कब्जा केला आहे हे एखाद्या स्थितः प्रतन्या सारखा पाहत बसेल. माझ्या मामाच्या घरासमोर मोठी वाडी आहे. सर्वत्र नुसता कचराच कचरा. मी समजू शकते कि प्रत्येक वेळी साफ सफाई शक्य नसते पण जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा थोडा आपला परिसर स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे. मी मामला जेव्हा विचारले तेव्हा तो म्हणाला कि ह्या कचर्याचे पुढे मागे आपोआप खत बनेल. कदाचित खरे असेलही पण त्यामुळे सर्व भकास वातावरण निर्मिती होते त्याचे काय. देवळात पूल टाकले तर सर्वत्र काळोख आणि एक प्रकारचा डोक्यात जाणारा विचित्र वास. कधी बाहेर पडतो असे वाटते. कधी कोणत्या हॉटेल मध्ये जाऊन राहायचे म्हटले तर छानसे हॉटेल मिळेलच ह्याची guarantee नाही". ह्या लेख बद्दल माफ करा. माझा हा पहिलाच लेख आहे आणि तो साहित्य मध्ये पोस्ट करायचा कि चर्चा मध्ये हे देखील माहित नाही आहे. तसेच काहीना हा लेख एकांगी किंवा पूर्व ग्रह दुषित वाटू शकेल. किंवा अगदी negative वाटू शकेल पण खरेच हा प्रश्न मला गेले काही वरचे खूप छळत आहे. येवा कोंकण आपलाच असा किंवा कोंकणाचा कॅलीफोर्णिया वगैरे राजकीय घोषणा ठीक आहेत पण मला वाटते जो पर्यंत कोंकणी माणसाची मानसिकता जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण असेच मागासलेले राहणार. मला कोणालाही दुखवायचे नव्हते आणि कदाचित आपल्याला आलेला अनुभव वेगळा असू शकेल. आणि लेख खूप लांबला आहे ह्या बद्दल देखील क्षमस्व.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27134 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

कोंकण आणि अस्वच्छ..? विशेषतः

गवि
गुरुवार, 04/12/2012 - 12:26 नवीन
कोंकण आणि अस्वच्छ..? विशेषतः मूळ कोंकणी माणसांच्या स्वभावात अस्वच्छपणा? प्र..चं..ड.. गैरसमज.. आळशीपणा म्हणून जे काही दिसलं असेल तो आळशीपणा नसतो.. ती एक लाईफस्टाईल आहे. छ्या छ्या छ्या छ्या... (कदाचित) प्रचंड प्रतिसादासाठी जागा राखीव..
  • Log in or register to post comments

सहमत !! कोकणी आणि अस्वच्छ ??

कपिल काळे
गुरुवार, 04/12/2012 - 13:38 नवीन
सहमत !! कोकणी आणि अस्वच्छ ?? गैरसमज आहे. आळशी असेल कदाचित पण अस्वच्छ ?? बिल्कुल नाही. एका माणसावरुन सगळ्यांना नका जोखू .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एक दुसर्‍या अनुभवावरून निष्कर्श काढणे चुकीचे आहे असे वाटते.

मोदक
गुरुवार, 04/12/2012 - 12:33 नवीन
एक दुसर्‍या अनुभवावरून निष्कर्श काढणे चुकीचे आहे असे वाटते. कोकणातला माणूस आळशी आहे यावर पण विश्वास नाहीये माझा.. डॉ बाळ. जयगड का कुठेतरी प्रायवेट डॉक बांधणारे भटकळ / भाटकर.. ते दिवसेंदिवस मासेमारीकरता समुद्रात जाणारी बरीच मंडळी खूप कष्टाचे जीवन जगतात. लेखाचा नीट उद्देश कळाला नाही. :-(
  • Log in or register to post comments

छ्या !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/12/2012 - 12:37 नवीन
लेख काय पटला नाही ! प्रत्येक शहराची, गावाची, पेठेची, वाडीची आपापली एक जीवनशैली असते, आणि तीच त्यांची खासियत असते. उगाच दुसर्‍याचे बघून ते बदलायला जाऊ नये. अन्यथा 'घर का न घाट का' अशी अवस्था होते.
  • Log in or register to post comments

परा शी सहमत आहे. लोक जेंव्हा

विजुभाऊ
गुरुवार, 04/12/2012 - 15:09 नवीन
परा शी सहमत आहे. लोक जेंव्हा पुण्याला , मुळा मुठेला नावे ठेवतात तेंव्हा असेच वाटते. नागझरी ते संगम असा एक जलवाहतूक पर्यटन मार्ग काढायचा नवा क्रांतीकारी विचार पुण्यात जोर धरतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

काय सांगता

रमताराम
गुरुवार, 04/12/2012 - 19:22 नवीन
काय सांगता काय, होड्या सोडण्याचं कंत्राट तुम्हाला मिळालेलं दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

कोंकणी माणूस असा का?

Madhavi_Bhave
गुरुवार, 04/12/2012 - 12:42 नवीन
खरे आहे. कष्टमय जीवन आहे आणि काही सन्माननीय अपवाद देखील नक्कीच आहेत. मी सर्व साधारणपाने आढळून येणार्या स्थितीबद्दल मत मांडले आहे. कोंकणी माणूस हा फणसा सारखा आहे असे म्हणतात म्हणजे बाहेरून काटेरी पण आतून गोड. मला थोडे वाईट वाटते एकंदरीत सर्वसामान्य माणसाच्या मानसिकतेबद्दल आणि ह्या गोष्टीवर नितांत विश्वास आहे कि हि परिस्थिती बदलू शकते. फक्त ते होत नाही हे शल्य आहे मनात म्हणून हा लेख लिहिला आहे.
  • Log in or register to post comments

??

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/12/2012 - 12:44 नवीन
परिस्थिती बदलू शकते
पण का ? परिस्थीती येवढी हालाखीची वा वाईट आहे का ? की ती बदलायलाच पाहिजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Madhavi_Bhave

परिस्थिती हलाखीची वयाच्या आतच

किचेन
गुरुवार, 04/12/2012 - 17:51 नवीन
परिस्थिती हलाखीची वयाच्या आतच बदलली गेली पाहिजे.त्यांना ज्याअर्थी हा प्रश्न अनेक वर्ष छळतोय त्यार्थी त्यांना मामाच्या जमिनीव्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी खटकल्या असणार.उगीचच आपण 'राज'करण्यांना निवडणुकीसाठी 'कोकणातून भय्ये आणि उडपी बाहेर गेलेच पाहिजेत ' असे विषय देण्यापेक्षा निसर्गरम्य कोकणचा एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा अशी मागणी केली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तू खूप Hypothetical बोलते आहेस असे वाटते आहे.

मोदक
गुरुवार, 04/12/2012 - 12:47 नवीन
तू खूप Hypothetical बोलते आहेस असे वाटते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Madhavi_Bhave

कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस

कुंदन
गुरुवार, 04/12/2012 - 12:44 नवीन
काहीही काय. आमचा एक कोकणी मित्र आहे आणि तो प्रचंड उद्योगी आहे; इतका की आताशा जालावरही दिसत नाही तो.
  • Log in or register to post comments

काहीही काय. आमचा एक कोकणी

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/12/2012 - 12:47 नवीन
काहीही काय. आमचा एक कोकणी मित्र आहे आणि तो प्रचंड उद्योगी आहे; इतका की आताशा जालावरही दिसत नाही तो.
हम्म! कुंद्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

अरे तो तुला दिसत नसेल.... पण

प्यारे१
गुरुवार, 04/12/2012 - 13:11 नवीन
अरे तो तुला दिसत नसेल.... पण आजदेखील जालावरदेखील 'उद्योग' सुरु आहेत असे ऐकिवात आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

कुणीतरी विदा जमवा रे,

कवितानागेश
गुरुवार, 04/12/2012 - 13:01 नवीन
कुणीतरी विदा जमवा रे, 'जालावरचे कोकणी माणसाचे प्रमाण' यावरचा. त्यावरुनच ठरेल कोण किती उद्योगी आहे ते! ;)
  • Log in or register to post comments

"उद्योगी" पणाची व्याख्या काय आहे गं माऊ..?

मोदक
गुरुवार, 04/12/2012 - 16:20 नवीन
"उद्योगी" पणाची व्याख्या काय आहे गं माऊ..? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हा विदा काय प्रकार आहे??

राजो
गुरुवार, 04/12/2012 - 19:13 नवीन
हा विदा काय प्रकार आहे?? उपक्रमावर सुद्धा ब-याच ठिकाणी दिसला हा शब्द...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

विदा = DATA

मराठे
गुरुवार, 04/12/2012 - 21:23 नवीन
विदा = DATA
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजो

येथे एक उल्लेख करावासा वाटतो.

मृत्युन्जय
गुरुवार, 04/12/2012 - 13:19 नवीन
येथे एक उल्लेख करावासा वाटतो. केसरी च्या भूलथापाना बळी पडून मुंबईतील उन्हाळा पासून थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून गेलो होतो. श्रीनगरला गेलो तेव्हा आपण काश्मीर मध्ये आहोत कि मुंबई मध्ये असा प्रश्न पडला होता. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात वाचले म्हणून गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. तेव्हा तुम्ही केसरी किंवा तत्सम tour operators ने केलेल्या भूलथापाना शक्यतो बळी पडू नका. तुमचे नशीब प्रचंड वाईट होते म्हणायचे. मी १ ते ७ मे मध्ये गेलो होतो काश्मीरात. प्रचंड बर्फ होता आणि श्रीनगरातदेखील १३-१४ तापमान होते. पुण्यापेक्षा प्रचंडच सुसह्य. पहलगाम मध्ये तर ३-४ होते आणि सोनमर्ग आणि गुलमर्ग बर्फाने वेढलेले होते :)
  • Log in or register to post comments

केसरी वाल्यानी

कुंदन
गुरुवार, 04/12/2012 - 13:25 नवीन
केसरी वाल्यानी गायब केला असेल बरफ तर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

>>केसरी वाल्यानी गायब केला

सूड
गुरुवार, 04/12/2012 - 13:44 नवीन
>>केसरी वाल्यानी गायब केला असेल बरफ तर ? हो हो, तैंना विचारा त्यांना बर्फाचे गोळे दिले होते का कॉम्लिमेंटरी आहे असं सांगून !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने

गणपा
गुरुवार, 04/12/2012 - 13:46 नवीन
गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते.
ऑफ सिझनला किंवा सिझन संपता संपता गेल्यावर काय हाती लागणार म्हणा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. :)
एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे.
या वाक्याने तर एकदम भाईकाकांची आठवण झाली. ;) बाकी अलिकडेच कुणी तरी पुणेकरांवर धागा काढला होता. हा लेख त्या लेखाची 'उत्तर'पुजा म्हणुन बांधलाय का ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हा हा हा

रमताराम
गुरुवार, 04/12/2012 - 19:27 नवीन
बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. मेलो. =)) बाकी अलिकडेच कुणी तरी पुणेकरांवर धागा काढला होता. हा लेख त्या लेखाची 'उत्तर'पुजा म्हणुन बांधलाय का ? अलिकडे???? अरे पलिकडे , डावीकडे, उजवीकडे, मागे, पुढे सगळीकडे आहेत असे धागे. नवी ब्रिगेड जशी स्थापन होताक्षणी प्रसिद्ध होणारी पुस्तके बारकाइने वाचून वादग्रस्त लिखाण शोधायला एखाद्या स्वतःला तज्ञ म्हणवू इच्छिणार्‍याला कामाला लावते, तसा संस्थळावर आलेला नवा सदस्य टीआरपीसाठी डोळे झाकून पुण्यावर वा पुणेरी पाट्यांवर चारोळी धागा टाकतो नि पदार्पणातच शतक काढतो. एरवी कुठेही न दिसणारे जुनेपुराणे सदस्यही तिथे आपली चिरकी 'बासरी' वाजवून जातात. आहेस कुठं. अवांतर: 'उत्तर'पूजा की 'छट' पूजा म्हणायचंय तुला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

प्रचंड असहमत.. इतर कोणत्याही

शैलेन्द्र
गुरुवार, 04/12/2012 - 13:24 नवीन
प्रचंड असहमत.. इतर कोणत्याही बाबीवर चर्चा होवु शकते पण कोकन आणी अस्वच्छ? मि सगळा भारत फिरलोय, पण कोकणात जी नैसर्गीक स्वच्छता दिसते, ती पश्चीम किनारपट्टीचा अपवाद वगळता कुठेच आढळत नाही, ओरीसा, बंगाल इथले किणारपट्टीचे लोक मला तरी अस्वछ वाटले.. बाकी आळशीपणावर सविस्तर प्रतिसाद देतो नंतर..
  • Log in or register to post comments

शैलेंद्र यांच्याशी प्रचंड

गवि
गुरुवार, 04/12/2012 - 13:28 नवीन
शैलेंद्र यांच्याशी प्रचंड सहमत..
  • Log in or register to post comments

1. गावाकडे दिसणार्‍या

यकु
गुरुवार, 04/12/2012 - 13:47 नवीन
1. गावाकडे दिसणार्‍या काडीकचर्‍यातून भकासपणा, अस्वच्छपणा जाणवतो. 2. आणि हा भकासपणा, अस्वच्छपणा 'गावाकडचे' लोक दूर करीत नाहीत त्याबद्दल लेखिकेला वाइट वाटले एवढेच कळले. पण 3. लेखिका कोकणात गेली असल्याने 'कोकणी माणूस अस्वच्छ' असे काहीतरी ‍झाले आणि सगळा गेमच फिसकटला असावा.
  • Log in or register to post comments

कोकणी माणूस आळशी आहे इतपत ठीक

बाळ सप्रे
गुरुवार, 04/12/2012 - 13:48 नवीन
कोकणी माणूस आळशी आहे इतपत ठीक आहे.. पण अस्वच्छ.. नाही पटतं.. कोकणातली गावं घाटावरच्या (घाटावरचा हा कोकणीच्या विरुद्धअर्थी शब्द आहे त्याला भौगोलिक सीमा नाहीत :-) ) गावांपेक्षा खूपच स्वच्छ आहेत .. त्यात खास सावंतवाडीचं म्हणाल तर हे मत अजिबातच पटतं नाही.. आणि केसरीच्या भूलथापा ??? नाही हो.. आमचा केसरीचा अनुभव तर एकदम पंचतारांकीत आहे!!
  • Log in or register to post comments

काय सांगता कोकणी माणूस

सूड
गुरुवार, 04/12/2012 - 13:49 नवीन
काय सांगता कोकणी माणूस अस्वच्छ ?? एक रुममेट होता माझा, माझा तर समज असा झाला आहे की लोक जितके घारे आणि गोरे तितका स्वच्छतेकडे कल अधिक. तो महाभाग वीकेंड आला रे आला की झाडू घेऊन घर झाडायला निघायचा, जनाची नाही पण मनाची तरी बाळगून आम्हाला झकत मदत करावी लागायची. किचनमध्ये इकडचा चमचा तिकडे नको. कहर म्हणजे खाताना जमिनीवर जरा काही सांडता कामा नये. एक ना दोन, तुमचा समज गंडलेला आहे.
  • Log in or register to post comments

असहमत...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 04/12/2012 - 13:52 नवीन
कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि अस्वच्छ तर अज्जिबात नाहीत. तिथले जीवन संथ आहे. मुंबई सारखी धावपळ त्यांच्या स्वभावात नाही. आता, मुंबईच्या माणसाला एखाद्या खेड्यात ठेवा १५-२० दिवस तो भयंकर अस्वस्थ होईल. कारण, मुंबईची धावपळ, घड्यालाशी बांधिलकी अनुभवास न मिळाल्याने तो चुळबुळ करीत राहतो.
  • Log in or register to post comments

कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि

गवि
गुरुवार, 04/12/2012 - 14:05 नवीन
कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि अस्वच्छ तर अज्जिबात नाहीत. तिथले जीवन संथ आहे.
अत्यंत अचूक शब्दात नेमका प्रतिसाद.. अनेक धन्यवाद.. आमचे पानभर टंकन खर्ची पडले असते. कोंकणी माणूस आहे त्यात सुखी असतो. बाहेरुन तिथे येऊन ईर्षा, स्पर्धा, उभी करणार्‍यांना ते आळशी वाटतात.. पण ती त्यांची मूळ सुशेगाद वृत्ती आहे. पोफळीच्या वाडीत बनियन वर करुन पोटाला गार वारा देत आरामखुर्चीत पडलेला कोंकणी मनुष्य पाहताना सुखी माणसाचा बनियन काय असतो तो असंख्य वेळा पाहिला आहे. आपल्या आवारात उगवणारे लाल भात आणि वरी / नाचणी ..शिवाय एखादी आंबी, फणस, पोफळी, माड यांच्या आधारे तेवढ्यात चरितार्थ बसवून कोणत्याही रॅटरेसमधे न पडता भरपूर मोकळा वेळ मिळवणारी कोंकणी माणसं माझी आदर्श आहेत. कोंकणात मी जन्मून मोठा झालो. कोंकण पुरेपूर अंतर्बाह्य पाहिलेलं आहे. कोंकणात मुळात गरीब (खाऊन पिऊन सुखी पण श्रीमंत नसलेले) बहुसंख्य आहेत.. पण.. त्याचवेळी मूलतः भिकारी नगण्य आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या नशिबी इतरांचे आर्थिक मिंधेपण येणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. कोंकणातला मनुष्य रेज द बार तत्वाने उंच उड्या मारत आयुष्यात वरवर चढत जाईलच असं नाही.. पण तो याला स्वतःचा नाकर्तेपणा समजून कुरतडत कुरकुरत बसणार नाही.. तो "साफल्य" नावाचं छोटं घर बांधून कृतार्थ असेल. यातली मजा पैशात मोजता येणार नाही.. स्वच्छतेबाबत : मी अस्वच्छता हा प्रकार कोंकण सोडल्यावर पहिल्यांदा पाहिला एवढंच म्हणतो. "पालापाचोळा" याला अस्वच्छता म्हटले असावे बहुधा लेखिकेने. आमच्या कोंकणातल्या गावी बाहेरुन आलेल्या एका कुटुंबाने एकदा रस्त्यावर मूल शी करायला बसवलं तेव्हा आख्खी आळी एक होऊन त्यांच्याविरुद्ध गेली होती. पहिल्याच प्रसंगानंतर ही पद्धत हाणून पाडण्यात आली.. हे फक्त एक उदाहरण. मी कोंकण सोडून देशावर आलो तर हागणदारी हा नॉर्म होता.. आणि न हगलेले रस्ते ही दुर्मिळ गोष्ट. कोंकणात रस्त्याबाजूला वाहणार्‍या पावसाच्या पाण्यात ओंजळ बुडवून प्यायची इच्छा होईल इतकं स्वच्छ ते असायचं.. कसलाच कचरा, गाळही नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१

अस्मी
गुरुवार, 04/12/2012 - 15:01 नवीन
सहमत. अतिशय उत्तम आणि चोख प्रतिसाद.
कोंकणात मी जन्मून मोठा झालो. कोंकण पुरेपूर अंतर्बाह्य पाहिलेलं आहे. कोंकणात मुळात गरीब (खाऊन पिऊन सुखी पण श्रीमंत नसलेले) बहुसंख्य आहेत.. पण.. त्याचवेळी मूलतः भिकारी नगण्य आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या नशिबी इतरांचे आर्थिक मिंधेपण येणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मानली जाते.
अगदी सोळा आणे सत्य!
कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि अस्वच्छ तर अज्जिबात नाहीत. तिथले जीवन संथ आहे.
१००% करेक्ट!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+२

प्रीत-मोहर
गुरुवार, 04/12/2012 - 15:36 नवीन
मी कोकणातल जीवन सुशेगात आहे म्हणेन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्मी

लाख बोललास, मित्रा! प्रत्येक

श्रीरंग
गुरुवार, 04/12/2012 - 18:10 नवीन
लाख बोललास, मित्रा! प्रत्येक वाक्याशी सहमत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

यशोधरा
गुरुवार, 04/12/2012 - 19:21 नवीन
पेठकर काका आणि गवि दोघांच्याही प्रतिसादांना अनुमोदन. कोकण अस्वच्छ आहे हे म्हणणारी पहिलीच व्यक्ती पाहिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+ २

मेघवेडा
गुरुवार, 04/12/2012 - 21:05 नवीन
तंतोतंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

लेखाबद्दल प्रचंड असहमत आमचे

स्पा
गुरुवार, 04/12/2012 - 13:58 नवीन
लेखाबद्दल प्रचंड असहमत आमचे आडगावच किती सुंदर आहे... बाकी कोकण बघायलाच नको
  • Log in or register to post comments

जुन ठाकुर्ली पाहिलयेस का? ते

शैलेन्द्र
गुरुवार, 04/12/2012 - 14:16 नवीन
जुन ठाकुर्ली पाहिलयेस का? ते पण छान होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अगदि मस्त शेताडी... भरपूर

स्पा
गुरुवार, 04/12/2012 - 14:19 नवीन
अगदि :) मस्त शेताडी... भरपूर झाड :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

असहमत

तिमा
गुरुवार, 04/12/2012 - 14:12 नवीन
कोकणी माणसावर अस्वच्छतेचा डाग ? तुमचे काहीतरी चुकताय. गरीबीत सुद्धा स्वच्छ रहाणारा माणूस म्हणजे कोकणी !
  • Log in or register to post comments

मी तुम्हा सर्वांच्या

Madhavi_Bhave
गुरुवार, 04/12/2012 - 14:49 नवीन
मी तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया समजू शकते आणि appreciate हि करत आहे. मुळात माझी पण पाळेमुळे कोंकणातच रोवलेली आहेत. आयुष्याची सुरवातीची दहा वर्षे मी वेंगुर्ल्यात काढलेली आहेत आणि वयाच्या अकराव्या वर्षी (मी सातवीला असताना) मुंबईला आले व गावाला कायमची पारखी झाले. जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा शैक्षणिक जीवनातील इयःत्ता पाचवी आणि सहावी (जी मी वेंगुर्ला शाळेत काढली) हि दोन वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्षे होती. एखादाच दिवस असा गेला असेल जेव्हा मी शाळेत मार खाल्ला नसेन. सुट्टीत फक्त हुंदडणे आणि रान मेवा खाणे (म्हणजे कुदने) ह्या शिवाय दुसरे काही केले नाही. पावसाळ्यातील कोंकण पूर्णपणे अनुभवले आहे. रात्री कौलांवर पडणाऱ्या मुसळधार पावसांमुळे होणारा तो आवाज, कडाडणाऱ्या विजा ह्यामुळे घाबरून गेलेली मी आईच्या कुशीत स्वताला घट्ट सामावून घ्याची आणि झोपून जात असे. इतक्या वर्षांनतर देखील ती दहा वर्षे आठवली कि मन अलगद हळवे होऊन जाते. वेन्गुर्लाच्या तो समुद्र किनारा, सातेरी आणि रामेश्वारचे देऊळ मनात घर करून आहेत. त्यामुळे मुळात मी कोकणचीच. कदाचित मला लेखात काय म्हणायचे ते नीट मांडता आले नसेल. जेव्हा मी लेख लिहायला घेतला तेव्हा माझ्या मनातील दुख फक्त मांडले. लहानपणी काही कळत नव्हते पण आज जेव्हा मी कोकणात जाते तेव्हा वातावरणातील एकंदर असणारा तो उदासपणा आणि एकंदरीतच काही प्रमाणातील निष्क्रियता ह्यामुळे मला नेहमी वाईट वाटते. नैसर्गिकरीत्या कोकण खूप सुंदर आहे ह्याबद्दल दुमत नाही किंवा वादही नाही. आपण आपले पहिले प्रेम कधी विसरू शकत नाही त्याप्रमाणे माझे आयुष्यच जेथे सुरु झाले ते कोकण मी कसे विसरेन. पण आज इतक्या वर्षांनी देखील कोकणातील माणूस आहे तिथेच आहे (अर्थात सन्माननीय अपवाद आहेतच) म्हणून वाईट वाटते. आपले कोकण मुळात इतके सुंदर आहे कि नीट infrastructure जर पुरवले तर खूप प्रगती होईल पण तसे होत नाही आणि त्याची जाणीव पण नाही असे दृश्य उभे रहाते. मी जेव्हा अस्वच्छते बद्दल लिहिले आहे ते आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबद्दल असलेल्या अनास्थेबद्दल. प्रत्येकाचे घर आतून सारवलेले असते आणि बऱ्यापैकी स्वच्छ असते हे मान्य आहेच मला. आणि मी काही एकदा दोनदा गेले नाही कोकणात. दर एक दोन वर्षांनी माझी चक्कर असतेच. इतक्या वर्षांनी माझे झालेले हे मत आहे जे अगदीच खोटे आहे किंवा चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही. तरी देखील जर कोण दुखावले गेले असेल तर क्षमस्व. बाकी आपल्या सर्वांच्या लाल मातीबद्दल असणाऱ्या अस्मितेला मनापासून दाद. मी पण कोकणवर मनापासून प्रेम करते ह्याबद्दल कोणीही शंका घेवू नये. धन्यवाद. आणि शेवटचे म्हणजे श्री गणपा ह्याच्यासाठी - गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने प्रेषक गणपा गुरुवार, 12/04/2012 - 13:46. गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. ऑफ सिझनला किंवा सिझन संपता संपता गेल्यावर काय हाती लागणार म्हणा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. Smile श्री गणपा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. Smile आपली हि कॉमेंट रुचली नाही. It was not in a good spirit.
  • Log in or register to post comments

गणपाचा

कपिलमुनी
गुरुवार, 04/12/2012 - 15:16 नवीन
तीव्र शब्दात णिशेढ !! नव्या लेखकांची भ्रुणहत्या खपवून घेतली जाणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Madhavi_Bhave

"आपले कोकण मुळात इतके सुंदर

शैलेन्द्र
गुरुवार, 04/12/2012 - 15:32 नवीन
"आपले कोकण मुळात इतके सुंदर आहे कि नीट infrastructure जर पुरवले तर खूप प्रगती होईल पण तसे होत नाही आणि त्याची जाणीव पण नाही असे दृश्य उभे रहाते." कशाला हो वाट लावता कोकणाची.. मी कोकणातला नाही, पण कोकणच्या प्रेमात आहे.. इंफ्रास्ट्रक्चरने लवासा आनी आंबी व्हॅली बांधता येत.. कोकण कसं घडवणार? कोकण आहे तसच राहुद्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Madhavi_Bhave

आपली हि कॉमेंट रुचली नाही. It

गणपा
गुरुवार, 04/12/2012 - 16:32 नवीन
आपली हि कॉमेंट रुचली नाही. It was not in a good spirit.
नाही हो अगदी स्वच्छ मनाने दिला होता प्रतिसाद. अधिक स्पष्टिकरण दिले असते पण मग सारवा सारव करतोय असा आरोप झाला असता म्हणुन माझे शब्द मागे घेतो. आय एम स्वारी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Madhavi_Bhave

प्रचंड मोठा गैरसमज. तुम्ही

पिंगू
गुरुवार, 04/12/2012 - 15:09 नवीन
प्रचंड मोठा गैरसमज. तुम्ही कोकणात जाऊन काय फक्त अस्वच्छताच पाहिली? कोकणात जे दिसले, त्या पालापाचोळ्याला तुम्ही जर अस्वच्छता म्हणत असाल, तर मात्र कमालच झाली.. बाकी स्वच्छतेचे धिंडवडे काढलेले बघायचे असतील तर जरा सोलापूर, बीड अशा ठिकाणी जाऊन बघा. - पिंगू
  • Log in or register to post comments

आंजा आणि मराठ्वाडा , विदर्भ

कपिलमुनी
गुरुवार, 04/12/2012 - 15:26 नवीन
आंजा वर सुद्धा अनुशेष बाकी आहे का ? मराठ्वाडा , विदर्भ मधले कोणी आहे का मिपा वर ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

मुनीवर......

इरसाल
गुरुवार, 04/12/2012 - 15:29 नवीन
असले तरी ते वैदर्भीय "मिसळबोंडापाव" वर असतिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

Madhavi_Bhave जी, मुळात कोकणातील माणुस हा ठेवीले अनंते ...

निश
गुरुवार, 04/12/2012 - 15:27 नवीन
मुळात कोकणातील माणुस हा ठेवीले अनंते तैसेची रहावे ह्या विचारसरणीचा आहे. मी खुद्द वेंगुर्ला दाभोली ह्या गावचा आहे. आजही मी वर्षांतुन ३ ते ४ वेळा तिथे जातो पण मला कुठेही घाण व अस्वच्छता दिसत नाही. उलट गावाला गेल्यावर कामाचा जो ताण असतो तो एकदम निघुन जातो. तुम्हाला स्वच्छतेच एक उदाहरण देतो.... दाभोली मठ येथे कुडाळदेशकर गौड ब्राम्हण लोकांचा मठ आहे. तिथे आजही वेदाभ्यास चालतो तो बघुन या अतिशय स्वच्छ व देखणा आहे तो मठ.. किंवा कुडाळ पिंगुळि येथिल राऊळ महाराजांचा मठ आहे. तो बघा निवळ्ळ अप्रतिम आहे.
  • Log in or register to post comments

असहमत

विशाखा राऊत
गुरुवार, 04/12/2012 - 16:31 नवीन
अजिबात पटले नाही
  • Log in or register to post comments

आणि हो, एखाद्या कोकणबाहेरच्या

मिसळपाव
गुरुवार, 04/12/2012 - 16:50 नवीन
माणसाने तिथे येऊन घाण करून ठेवली असली तर कृपा करुन त्यावरनं तिथल्या कोकण्याला उल्लेखू नका. गेल्याच नोव्हेंबरात रत्नागिरीत पांढर्‍या समुद्रावर जाताना मी याचं क्लेशदायक उदाहरण बघितलं आहे. शैलेंद्र, तुझ्या वाक्यात थोडा बदल करून १००००००००% सहमत; "कशाला हो वाट लावता कोकणाची.. मी नशिबाने कोकणातला आहे आणि कोकणच्या प्रेमात आहे.. इंफ्रास्ट्रक्चरने लवासा आनी आंबी व्हॅली बांधता येत.. कोकण कसं घडवणार? कोकण आहे तसच राहुद्या.."
  • Log in or register to post comments

कैच्याकै.... !!!!

सुहास झेले
गुरुवार, 04/12/2012 - 17:14 नवीन
कैच्याकै.... !!!!
  • Log in or register to post comments

देशावरील.....

चौकटराजा
गुरुवार, 04/12/2012 - 17:34 नवीन
कोकण नैसर्गिक रित्या सुंदर असणे हा एक भाग झाला. दुसरा भाग एखाद्याने आपला परिसर स्वच्छ ठेवणे हा दुसरा भाग झाला. खालील बाबतीत मात्र दुमत होउ नये. १.देशावरची खेडी इनवेरिबली अस्वच्छ आहेत. त्यामानाने कोकणातील गावे अधिक स्वच्छ. २, काश्मीरी लोक आपला परिसर चांगला ठेवतात. केसरीवाले नैसर्गिक बाग व बाब नियंत्रित करू शकत नाहीत. ३.भारतात दक्षिणेतील गावात दिसणारी टापटीप उत्तरेकडे जावे तशी कमी होत जाते. ( अपवाद हिमालयीन भाग व काश्मीर)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा