Skip to main content

कोंकणी माणूस असा का?

लेखक Madhavi_Bhave यांनी गुरुवार, 12/04/2012 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
मला खालील प्रश्न खूप वर्षांपासून पडलेला आहे. इतकी वर्षे मनातच ठेवला होता. मिपाकर नक्की उत्तर देतील असा विश्वास आहे. मी बऱ्याचदा कोकणात फिरायला जाते. माझा एक मामा भालावली (राजापूर जवळ) मध्ये राहतो. एक दोन वर्षांनी त्याच्याकडे पण चक्कर होते. कधी सावंतवाडी, मालवण इत्यादी ठिकाणी देखील फिरणे होते. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे "कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस वाटतो. म्हणजे आपली परिस्थिती सुधारायला हात पाय हलवायला पाहिजे ह्या गोष्टी वर विश्वासच नसावा वाटते. एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे. घरा भोवतीचा परिसर हा स्वच्छ ठेवणे म्हणजे काही पाप करतो असे वाटत असावे. मला आठवते ४ - ५ वर्षांपूर्वी मी काश्मीरला गेले होते. (येथे एक उल्लेख करावासा वाटतो. केसरी च्या भूलथापाना बळी पडून मुंबईतील उन्हाळा पासून थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून गेलो होतो. श्रीनगरला गेलो तेव्हा आपण काश्मीर मध्ये आहोत कि मुंबई मध्ये असा प्रश्न पडला होता. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात वाचले म्हणून गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. तेव्हा तुम्ही केसरी किंवा तत्सम tour operators ने केलेल्या भूलथापाना शक्यतो बळी पडू नका. माफ करा थोडे विषयांतर झाले. सांगायचा मुद्दा हा होता कि सर्वसामान्य काश्मिरी माणूस हा त्याच्यावर आलेल्या संकटांमुळे मुळातच पिचलेला होते. कधी काय होईल ह्याचा नेम नाही. उद्याची कसलीच शाश्वती नाही. फिरायला आलेल्या माणसांनी काही खरेदी केली तर दोन घास खायला मिळतील अशी परिस्थिती. अश्या परीस्थितदेखील ह्या सर्वसामान्य लोकांची घरे स्वच्छ, आजूबाजूचा परिसर साफ आणि कोकणात आढळून येणारा उदासपणा नसणे हे एक वैशिष्ट जाणवले मला. ह्या उलट आपल्या कोकणात कितीतरी करण्यासारखे आहे पण काही ना करता गोष्टी होत आहेत ना तर होऊ दे हा स्थायीभाव आहे आपल्या कोकणी माणसाचा असे वाटायला लागले आहे. कितीतरी गुजराथी किंवा साउथ इंडिअनस किंवा अगदी भय्यानि आपला मोर्चा कधीच वळवला आहे कोकणाकडे आणि उद्या आपला कोकणी माणूस काही ना करता आपल्या पोटा पानाच्या साधनांवर इतरांनी कब्जा केला आहे हे एखाद्या स्थितः प्रतन्या सारखा पाहत बसेल. माझ्या मामाच्या घरासमोर मोठी वाडी आहे. सर्वत्र नुसता कचराच कचरा. मी समजू शकते कि प्रत्येक वेळी साफ सफाई शक्य नसते पण जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा थोडा आपला परिसर स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे. मी मामला जेव्हा विचारले तेव्हा तो म्हणाला कि ह्या कचर्याचे पुढे मागे आपोआप खत बनेल. कदाचित खरे असेलही पण त्यामुळे सर्व भकास वातावरण निर्मिती होते त्याचे काय. देवळात पूल टाकले तर सर्वत्र काळोख आणि एक प्रकारचा डोक्यात जाणारा विचित्र वास. कधी बाहेर पडतो असे वाटते. कधी कोणत्या हॉटेल मध्ये जाऊन राहायचे म्हटले तर छानसे हॉटेल मिळेलच ह्याची guarantee नाही". ह्या लेख बद्दल माफ करा. माझा हा पहिलाच लेख आहे आणि तो साहित्य मध्ये पोस्ट करायचा कि चर्चा मध्ये हे देखील माहित नाही आहे. तसेच काहीना हा लेख एकांगी किंवा पूर्व ग्रह दुषित वाटू शकेल. किंवा अगदी negative वाटू शकेल पण खरेच हा प्रश्न मला गेले काही वरचे खूप छळत आहे. येवा कोंकण आपलाच असा किंवा कोंकणाचा कॅलीफोर्णिया वगैरे राजकीय घोषणा ठीक आहेत पण मला वाटते जो पर्यंत कोंकणी माणसाची मानसिकता जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण असेच मागासलेले राहणार. मला कोणालाही दुखवायचे नव्हते आणि कदाचित आपल्याला आलेला अनुभव वेगळा असू शकेल. आणि लेख खूप लांबला आहे ह्या बद्दल देखील क्षमस्व.

वाचने 27417
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

ईथे अमेरीकेत राहुन जेव्हा भारतात जाता...तेव्हा मला तर कोंकणीच नाही तर प्रत्येक भारतीय माणुस अस्वच्छ आणी आळ्शी वाटतो. आणी येवढेच नाही तर अडाणी सुध्धा. साधा "सिव्हीक सेन्स" नाही आहे. माझ्याकडे अगणीत उदाहरण आहेत. तुम्ही काहीही म्हणा मला कही फरक पडणार नाही. बाकी तुमचे चालु द्या.

In reply to by खादाड_बोका

प्रतिसाद कळला नाही. जर वाद उकरून काढायचा प्रयत्न असेल तर तो फारच क्षीण वाटला. जर वरच मत खरच असेल तर मग तिथली सिटिझनशीप घेउन खुशाल तिथेच सुखाने रहा. हाकानाका. :)

मी एकदम सपशेल माघार घेते आणि माझी चूक मान्य करते तेव्हा हा विषय आपण येथेच थांबवूया. फक्त एक लक्षात घ्याल अशी अपेक्षा करते "मी कोकणी माणसाचा उपहास करण्याच्या दृष्टीने हा लेख लिहिला नव्हता कारण मी स्वताला कोकणीच समजते. कोठेतरी मनात माझ्या सल होता आणि कोठेतरी अशी तळमळ देखील आहे कि मनात आणले तर कोकणी माणूस खूप पुढे जावू शकतो आणि तो जाइलही". विषय मला नीट मांडता आला नाही असेच मी समजते. बाकी माझ्या कोकण विषयीच्या आपुलकीबद्दल कोणी शंका घेवू नये. जरी मी फक्त दहाच वर्षे वेन्गुर्लायला काढली असली तरी देखील माझ्यासाठी माझे बालपण म्हणजे माझे वेन्गुल्यातील बालपणच आणि ते मला अगदी नीट आठवते आहे. बाकी सर्वांनी माझ्या पहिल्याच लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या पण बर्याच समझुती दूर झाल्या. ह्याचे फलित म्हणजे पुढच्या वेळी कोकणात जाताना मी वेगळ्या दृष्टीने कोकण बघण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

इथे एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते. मी खुप पूर्वी पासून गणपतीपुळे येथे नियमितपणे दर्शनाला जातो. अगदी तिथले गणेशमंदीर कौलारु होते तेव्हापासून. पण आपल्या स्वयंघोषीत महागुरुंचा एक भंपक चित्रपट आला होता काही वर्षांपूर्वी "नवरा माझा नवसाचा" तो चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तिथे गर्दी प्रचंड वाढली. गणेश दर्शनाचा मुळ उद्देश बाजुला पडून समुद्र किनार्‍यावर धिंगाणा करण्याचा उद्देश डोके वर काढू लागला. त्या प्रकाराच्या धिंगाण्याला अजिबात विरोध नाही, पण हे करतांना त्या सुंदर, स्वच्छ किनार्‍याचे रुपांतर एका अस्वच्छ आणि ओंगळ जागेत होऊ लागले. आता यात कोकणी माणसाचा सहभाग अगदी नगण्य आहे, कारण हि अस्वच्छता पसरण्याचे महान कार्य तिथे येणार्‍या पर्यटकाचे आहे. कोकणी माणसाचा दोष असेल तर तो इतकाच कि, अस्वच्छता पसरविण्यार्‍यांवर वचक ठेवायचे काम, तिथल्या शासन यंत्रणेला जमले नाही. तिथल्या शासन यंत्रणेवर कोकणी माणसचं आहेत. पण त्यांना याची फार पर्वा दिसत नाही. आजची गणपतीपुळ्यातली परिस्थिती पाहीली कि मला देऊळ चित्रपट आठवतो. देऊळ मधील गाव तर दुर्लक्षित होते, मागासलेले होते, पण गणपतीपुळे तसे अजिबात नव्हते. अगदी काही वर्षांपूर्वी जिथे अत्यंत शांत आणि सुस्वरुप गाव नांदत होते तेथे आज प्रचंड कलकलाट आणि उबग आणणारी दृश्य दिसतात. तिथे किनार्‍यावर "वॉटर स्पोर्टस्" या गोंडस नावाखाली पर्यावरणाचा यथेच्छ र्‍हास चालू आहे. आणि हे सगळं करणारी माणसे कोकणी वाटत नाही. विषाद एकाच गोष्टीचा वाटतो कि थोड्याश्या फायद्यासाठी कोकणी माणूस हे सगळं सहन करतो. आता मंदिर एकदम झकपक झाले, निवासाच्या चांगल्या सोयी झाल्या. पंचतारांकित रिसॉर्टस झाली, पण या सगळ्याची किंमत भयंकर आहे, आणि ती कोकणी माणसालाच मोजावी लागणार, पर्यटकांना नाही. ते काय, नविन ठिकाण शोधतील. पण गावाचा र्‍हास हा गावकर्‍यांच्या येणार्‍या पिढ्यांनाच भोगावा लागेल! हि फक्त गणपतीपुळे याच ठिकाणची परिस्थिती असेल असे वाटत नाही. पण इतर ठिकाणी मी जास्त फिरलो नसल्यामुळे त्यावर काही बोलत नाही. मला कुठल्याही वादात शिरण्याची इच्छा नाही पण जे काही चालले आहे ते काही फार भूषणावह नाही, इतकेच म्हणेन.

एखाद्या व्यक्तिसमूहास दिले गेलेले विशेषण अनेकदा तुलनात्मक असते. तसे ते इथेही भावेबाईंच्या लेखात दिसते आहे. कोकणी लोकांना 'आळशी' संबोधणे रोखठोक व थोडेसे कठोर आहे खरे, पण असे विशेषण अर्थात इतर प्रांतातल्या लोकांच्या तुलनेच्या संदर्भात आहे, हे लक्षात घेणे जरूरीचे आहे. ह्या बाबतीत, अनेक वर्षे भारतात व जवळजवळ तेव्हढीच वर्षे परदेशी काढल्यामुळे, मीही माझे तुलनात्मक मत (जे संपूर्ण anecdotal आहे, माझ्या निरीक्षणांवर, माहितीवर आधारलेले आहे, त्यास कुठलाही 'विदा' नाही) नोंदवतो... जगातील इतर अनेक देशांतील लोकांच्या तुलनेत, सर्वसाधारण भारतीय कामगार/ मजूर (ह्यात प्रोफेशनल्सचा समावेश नाही), कामतत्परता, कामाची शिस्त, कार्यक्षमता असा अनेक बाबींचा विचार करता, बराच मागे आहे. आणि भारतातील प्रांतांच्या संदर्भात हाच विचार केला तर सर्वसाधारणपणे मराठी माणूस, व महाराष्ट्राच्या प्रांतांपुरता विचार केला तर कोकणी माणूस अशाच परिमाणांनुसार बराच मागे आहे, असे मला वाटते. वर आलेल्या अनेक प्रतिसादांतून असा सूर दिसतो की कोकणी माणूस जगण्याच्या बाबतीत फारश्या अपेक्षा ठेवत नाही, थोडक्यात तो आनंद मानतो. तो 'आहे त्यात सुखी' असतो, कुठल्याही रॅटरेसमधे पडायची त्याला आवश्यकता भासत नाही. थोडक्यात, तो जे काही थोडेसे अगदी जरूरीपुरते करतो, त्यात त्याला आनंद आहे, (त्याला ह्याची कसलीच खंत नाही, तुम्हा बाहेरून आलेल्यांना/ बाहेरून हे न्याहाळत असलेल्यांना ह्याबद्दल काय वाटायचे ते वाटो). ही कारणमीमांसा जरी बरोबर मानली तरी ह्यातून त्याचा दिवसेंदिवस तोटाच होत आलेला आहे, व ह्यापुढेही होत रहाणार आहे. कोकण काही जगापासून वेगळे असलेले बेट नाही. त्याचे त्याच्या परिसराशी संबंध आहेत. तिथे, अगदी 'कमीतकमी अपेक्षेने' रहायचे कुणी म्हटले तरी तेथील जनतेस बाहेरून अनेकानेक ( कोकणच्या संदर्भात तर बहुसंख्य) जिन्नस व सेवा आयात कराव्या लागणार. हे करतांना त्यांना त्या बाहेरील जीवघेण्या स्पर्धेच्या भागीदारांशीच व्यवहार करावा लागणार. म्हणजे 'चढ्या' भावाने त्याला त्या खरीदाव्या लागणार. अर्थात त्यास स्वतःची क्रयशक्ति वाढवणे भाग आहे? वैद्यकीय सेवेचे एक साधे उदाहरण घेऊयात. ही सेवा देणारे बाहेरून शिक्षण घेऊन आलेले असणार, त्यांचे दवाखाने, हॉस्पिटले स्थापन करून ती चालवण्यासाठी त्यांनी बाहेरूनच उपकरणे घेतलेली असणार. तेव्हा त्यांना स्वतःचा किमान चरितार्थ चालवायचा तर काही वाजवी 'सेवाशुल्क' घ्यावे लागणार. ('लोकप्रभे'त लिहीत असलेले सेवाभावी डॉ. कुळकर्णी व तत्सम उदाहरणे अपवाद आहेत, त्यांच्या ह्या चर्चेत विचार करणे इष्ट नाही). तर अगदी जुजबी उत्पन्न असलेला कोकणी माणूस हा खर्च कसा, व कितपत करू शकेल? अनेकांनी कोकणी प्रदेश किती खडतर आहे, त्यात फारशी पिके घेता येत नाहीत, वगैरे लिहीले आहे. हाच निकष लावायचा म्हटला तर फिलीपीन्स, ऑस्ट्रेलिया, नेपाळ ह्या देशांतील जनतेने काय म्हणावे? ऑस्ट्रेलिया तूर्तास सोडून देऊ. फिलीपीन्सचे उदाहरण घेऊ. द्वीपसमूहाचा बनलेला, नैसर्गिक आपत्यांना सदैव तोंड देत झगडणारा हा देश. पण तेथील अनेकानेक पुरूष व प्रामुख्याने स्त्रिया परदेशांत मोलमजूरी करतात, व भरपूर पैसा देशात धाडतात. मी रहातो त्या, आग्नेय आशियातील एका शहरातच सुमारे २ लाख फिलीपिना घरांघरांतून मोलकरणींची कामे करतात. आमच्या जवळच्याच अशाच एक दोन शहरांतूनही त्या अशाच संखेने आहेत, तसेच त्यांतील अनेक दुबाई व मध्य पूर्वेच्या अनेक शहरांतूनही हीच कामे करत आहेत. ह्यांचे काम पाहून घ्यावे! अत्यंत सुबक, नीटनेटके, तत्पर काम त्या करतात. त्यामुळे त्यांना परदेशात ह्या कामांसाठी मागणी असते. नेपाळ्यांचे असेच. आपल्या तुलनेने बराच मागासलेला हा देश. पण येथील जनताही आमच्या व आजूबाजूच्या शहरांतून रेस्टॉरंट्समधे कामे करतांना आढळून येतात. सेवातत्पर, हसतमुख, व कार्यक्षम असल्याने त्यांना येथे मागणी आहे. तर प्रश्न हा, कोकणी माणसास शेतीशिवाय इतर पर्याय नाहीत का? कोकणी माणसेही वर दिलेल्या उदाहरणांतील फिलीपिना अथवा नेपाळींप्रमाणे परप्रांतात, परदेशात का बरे जाऊ शकत नाहीत? संधि उपलब्ध नाहीत, हे सरळ उत्तर थोडे फसवे आहे. कारण मग केरळीयांना अशा संध्या परदेशात, आणी उत्तर भारतीयांना सर्व भारतभर त्या कश्या उपलब्ध होतात? आणि कामे करण्याची, कामे शिकून पुढे जाण्याची मानसिकता मुळात असावयास पाहिजे. मुंबईचेच उदाहरण घेऊ यात. कोकणी माणूस इथे इतरांच्या अगोदर बहुसंख्येने दाखल झाला, तो बहुतेक सर्वच्या सर्व कापड गिरण्यात कामे करण्यासाठी. तो बर्‍याच अंशी तेच करत राहिला, त्यातून त्याला राजकारणात अत्यंत रस, व स्वतःच्या हक्कांविषयी नको तितकी जागरूकता. तेव्हा तो संप करीत राहिला, सर्वाथाने होता तिथेच राहिला. शेवटचा 'संप' तर त्याने अजून मागे घेतलेला नाही. त्यात तो मुंबईबाहेर फेकला गेला. त्या तुलनेने मागाहून मुंबईत आलेले माथाडी कामगार पहा, मावळातून आलेले डबेवाले पाहा. कोकणी आंब्याच्या संदर्भात मला एक प्रश्न नेहमी पडत आलेला आहे. ह्या आंब्यात खराब होण्याचे प्रमाण, इतर प्रांतांतून आलेल्या आंब्यांच्या तुललेने बरेच जास्त वाटते. आमच्या येथे थायलंड, ऑस्ट्रेलिया येथून आंबा येतो. त्यात इतके रिजेक्षन असत नाही. आपला कोकणी आंबा चवीस ह्या सार्‍या आंब्यांच्या अनेक पटींनी मधूर आहे. पण त्यात रिजेक्षन रेट बराच जास्त आहे. असे का असावे? पॅकेजिंगचा परिणाम? का मालच तसा, इतर आंब्यांच्या तुलनेत पटकन खरब होणारा, जास्त 'सेन्सेटिव्ह'? तसे आहे तर मग त्यावर उपाय का शोधले जात नाहीत? शेतीशिवाय इतर उद्योगधंदे कोकणात का येऊ शकत नाहीत? टूरिझमबद्दलचा पैसा ह्यांनी मांडलेला आक्षेप मला, भारतीय संदर्भात मान्य आहे. (बाहेर टूरिझम आले तरीही जागेचे स्वत्व टिकवून ठेवता येते, बाली हे एक सुंदर उदाहरण. पण भारतात हे शक्य नाही, कारण बेधुन्द राजकारण्यांना कुठे थांबायचे हे समजत नसल्याने, एखाद्या ठिकाणात टूरिझम बेफाट वाढवून त्याची रया घालवण्याचे कार्य ते तत्परतेने करतात. गोव्याचे उदाहरण आपल्यापूढे आहेच). असो. लेखिकेने चर्चाविषय चांगल्या रीतिने सादर केला आहे, चर्चाही भावनाविवश न होता व्हावी.

In reply to by प्रदीप

प्रदीप प्रतिसाद आवडला. असंच काही या लेखाचं शीर्षक वाचून लिहणार होते. पण लेखिकेने एकदम पाल्यापाचोळ्याचा कचरा केला म्हणून नाही लिहीलं. केवळ वैद्यकीय सेवेतच नव्हे तरशिक्षक,अधिकारी,पर्यटन या सर्वच क्षेत्रात आमच्या अल्पसंतुष्ट वृत्तीने ईतर लोकांची संया वाढवली आहे आणि आम्ही 'हे साले घाटी कोकनाची वाट लावतंत' अशा शिव्या देत आहोत तिथेच. कोंकणात इंडस्ट्र्या नकोत, पर्यटनाधारीत धंदे नकोत मग तुमचा विकास व्हावा म्हणुन काय पाहिजे? माझ्या घरात राहाणारे सारे भाडेकरू कुणि पूण्याचे तर कुणी पार गुजरातचे. बांधकाम,खाणककरी, फोटो स्टुडियो असे धंदे करून लाखोंनी कमावून गेले पण गावातल्या कुणाला चार महिने भातशेती आणि नंतर किरकोळ भाजीपाला याशिवाय दुसरे काही करावेसे वाटत नाही.

In reply to by साती

प्रदिपयांचा प्रतिसाद आवडला. पण साती अग सगळेच शेती सोडुन इतर उद्योगाला लागले तर आम्ही कोंबड्या आणि मासेच किती खायच्या म्हणतो मी? (खर तर माझी याला काही हरकत नाही) ;)

कोकणी माणसास शेतीशिवाय इतर पर्याय नाहीत का? कोकणी माणसेही वर दिलेल्या उदाहरणांतील फिलीपिना अथवा नेपाळींप्रमाणे परप्रांतात, परदेशात का बरे जाऊ शकत नाहीत? मध्य पूर्वेतील देशांपैकी मस्कतमध्ये मी गेली ३१ वर्षे रहात आहे. पर्यटन निमित्ताने दुबाई, शारजा, अबुधाबी, बाहरेन इत्यादी शहरांना भेटी दिल्या आहेत. इथे, उपहारगृह आणि कापड, जोडे आणि सरसाधारण वस्तूंच्या दुकानांमधून कोकणी माणूस मी आल्या दिवसा पासून पाहतो आहे. ८१ साली आलो तेंव्हा, बाजारात, मराठी भाषा ऐकू यायची ती ह्या लोकांच्या तोंडूनच. १२ -१२ तास नोकरी/व्यवसाय करणारी ही जमात आहे. फिलीपिनो सुद्धा आहेत. सर्वच नाहीत पण, बहुसंख्य फिलीपिनो स्त्रीया अनैतिक व्यवसायात आहेत. घरगड्यांची कामे करता करता इतर 'कमाई'कडे आकर्षित होतात. त्यांच्या संस्कृतीत ह्यात गैर मानीत नाहीत असे ऐकले आहे. फिलीपिनो स्त्रीयांच्या खालोखाल श्रीलंकन स्त्रीया ह्या व्यवसायात आहेत.आपल्या कोकणी स्त्रीयांचे असे काही उद्योग नाहीत. जे कोकणी आहेत ते पुरुष कर्मचारी आहेत. कष्टकरी आहेत. त्यांची कुटुंब इथे असली तरी ती गृहीणी पदावर संतुष्ट आहेत. इतर 'कमाई'चा प्रश्नच उद्भवत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

तिथे कोकणी अनेक वर्षांपासून आहेत हे वाचून आनंद झाला. पण त्यांची संख्या किती आहे? 'विदा' ह्या अर्थाने हे विचारत नाही, तर ज्याप्रमाणे फिलीपिना, अथवा गेली काही वर्षे, इंडोनेशियन स्त्रीया, प्रचंड संख्येने इतर देशात असतात, ज्यातून त्या बर्‍यापैकी पैसा मायदेशात पाठवू शकतात, त्यांच्या तुलनेत कोकणी माणसे कितपत असावीत, असा अंदाज यावा म्हणून विचारतोय. त्यांची संख्या बर्‍यापैकी असल्यास ते बराच पैसा कोकणात पाठवत असावेत, व त्यातून तिथे थोडीफार सुबत्ता दिसावी. तसे प्रत्यक्ष आहे असे वाटत नाही. म्हणून विचारतोय. तिथे केरळीय मजूर/ कोकणी मजूर ह्यांचे प्रमाण अंदाजाने काय असावे? आग्नेय आशियातील अनेक मोठ्या शहरांतून फिलीपिना अत्यंत निगुतीने मोलकरणीची कामे करत आहेत. अल्पशा शरीरविक्रयसंबंधी व्यवसायात आहेत, पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. आमच्या येथे श्रीलंकन स्त्रीयाही बर्‍याच प्रमाणात मोलकरणीची कामे करीत असतात. त्यांपैकी फाश्या कुणी शरीरविक्रयसंबंधी व्यवसायात आहेत असे पाहण्यात आलेले नाही.

In reply to by प्रदीप

फिलीपिना, अथवा गेली काही वर्षे, इंडोनेशियन स्त्रीया, प्रचंड संख्येने इतर देशात असतात. फिलीपिनोंपेक्षा कोंकणी कितीतरी जास्त असावेत असे दिसते आहे. चिपळूण, रत्नागिरी, खेड इथले रहिवाशी जास्त आहेत. खेडच्या तर जवळ जवळ प्रत्येक घरातील एक व्यक्ती आखातात आहे असे म्हंटले जायचे. ह्यातील अतिशयोक्ती (असल्यास) वगळता अनेक कोंकणी आखातात आहेत. मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा त्यांनी पाठवलेल्या पैशातून कोंकण विकासाचा नाही तर कोंकणी माणूसही शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायात आणि भारता बाहेर कार्यरत आहे हे मला सांगायचे आहे. तिथे केरळीय मजूर/ कोकणी मजूर ह्यांचे प्रमाण अंदाजाने काय असावे? केरळीय मजूर सर्वत्रच जास्त आहेत. उलट त्यांनीच आखातातील रोजगार मिळेल त्या रोजंदारीवर स्विकारून इतरांची कोंडी केली आहे. केरळात घरोघर जास्त मुलं आहेत आणि त्यांनी पैसे कमाऊन घरी पाठवले नाहीत तरी घरातील एक खायचे तोंड कमी झाले हिच वडिलांना मदत अशी विचारधारा आहे. केरळीय मजूर कधी कधी ५-६ वर्ष भारतात घराकडे परतत नाहीत. अशी परिस्थिती आहे. नोकरी बरोबर बेकायदेशिर रित्या दारू विकणे, सीडीज् विकणे, निळ्या चित्रफिती भाड्याने देणे आदी धंदे करतात. आपल्या मित्रांना, भावंडांना आखातात नोकर्‍या मिळवून देणे असे उद्योगही करतात. पण कोंकणी कामगारांच्या तुलनेत केरळीय कामगार जास्त आहेत ह्यात शंका नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा त्यांनी पाठवलेल्या पैशातून कोंकण विकासाचा नाही तर कोंकणी माणूसही शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायात आणि भारता बाहेर कार्यरत आहे हे मला सांगायचे आहे.
कोकणी माणसे बर्‍याच संख्येने मध्य पूर्वेत आहेत हे तुमचे निरीक्षण आहे, ते मान्य करतो. पण त्यांच्या मिळकतीचा कोकणावर अगदी अल्प परिणाम दिसतो, ह्याचे आश्चर्य मात्र वाटतच राहील. केरळात तर (म्हणे) आखाती मजूरांनी बंगले बांधले, (त्यातील काही मग देशोधडीलाही लागले, पण हे प्रमाण अल्प असावे), तिथे सुबत्ता आली. कोकण होता तसाच राहिला, असे सकृतदर्शनी दिसत आहे.

In reply to by प्रदीप

श्री. प्रदीप, केरळात तर (म्हणे) आखाती मजूरांनी बंगले बांधले. माझ्या आधीच्या प्रतिसादात पुढील विधान आहे: (केरळीय माणसे) नोकरी बरोबर बेकायदेशिर रित्या दारू विकणे, सीडीज् विकणे, निळ्या चित्रफिती भाड्याने देणे आदी धंदे करतात. पैसा कमविण्यासाठी केरळीय माणूस काहीही करतो. ८२-८३ च्या काळात दुबाई मध्ये एक घटना घडल्याचे कानावर आले होते. एक केरळीय जोडपे टॅक्सीने चालले होते. टॅक्सी ड्रायव्हरही केरळीय होता. मागे बसलेल्या जोडप्यातील स्त्री, त्या माणसाची पत्नी, रडत होती. आणि तो माणूस, तिचा नवरा, तिला एका अरबाकडे एकदाच शेवटचे जायला विनवत होता. कशाला हे मी तुम्हाला सांगायलाच पाहीजे असे नाही. त्या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांचा संवाद ऐकला आणि संतापाने दोघांनाही आपल्या टॅक्सीतून खाली उतरवून त्या नवर्‍याला न भूतो न भविष्यती अशा शिव्या घातल्या आणि टॅक्सी घेऊन निघून गेला. सगळे केरळीय असे आहेत असे मला म्हणायचे नाही पण अनैतिक, बेकायदेशीर कामे करायला ते मागे-पुढे पाहात नाहीत. साध्यात साध्या डुप्लीकेट सीडीज विकण्यापासून ते वरील (३० वर्षात) एकदाच ऐकलेल्या घटने पर्यंत काहीही करून पैसा कमवितात. कोकणी माणसांचे नांव ह्या प्रकारांमध्ये कानावर येत नाही. त्यामुळे त्यांच्या हाती पैसा कमी असतो. ते सुद्धा उरलेल्या पैशातून गावच्या घराची डागडुजी करतात, जमीनीचा तुकडा विकत घेतात. पण केरळीयांपेक्षा त्यांच्या हाती पैसा बराच कमी असतो. सज्जन आणि सरळमार्गी केरळीयही बरेच आहेत माझ्या पाहण्यात/ओळखित. तसेच, मोठे उद्योजकही आहेत. साधा इंजिनियर म्हणून आलेल्या केरळीय माणसाने स्वतःच्या कंपन्या चालू करून भरपूर माया कमविली आहे. तसे उदाहरण कोकणी माणसांमध्ये कुठे दिसत नाही हे सत्य आहे. बिचारे कष्टकरी म्हणून आले आणि कष्टकरीच राहिले. पुन्हा कमी उत्पन्नात संतुष्ट राहिले पण गैरमार्गाने माया कमविली नाही आणि उद्योजक म्हणूनही पुढे आले नाहीत.

कोकणी माणूस आळशी आणि अस्वच्छ आहे या आपल्या मताशी मी सहमत नाही .कोकणातील भातशेती यासाठी वारेमाप मेहनत करावी लागते. बहरलेली वाडी, आंबे हे सर्व एका वर्षात उभे राहिलेले नाही.कोकणात गेल्या काही वर्षात विकसित होणारे पर्यटन कोकणी माणसाच्या आळशीपणामुळे नक्किच नाही.आपल्या वृद्ध आईवडीलांना गावी ठेवून मुंबईत कष्टाची भाकरी खात गावी मनीआँर्डर पाठविणारा कोकणी आळशी कसा काय ? .राहिला प्रश्न स्वच्छतेचा ...ती तर व्यक्तीनिहय असते, तरी पण सुंदर सारवलेले अंगण ,,नियमीत स्नान करून होणारी देवपूजा....मला वाटतं आपला निष्कर्ष योग्य नाही

फुटकळ वादावरुन चर्चा माहितीपुर्ण आणि अर्थशास्त्रीय मुद्यांकडे वळविल्याबद्दल श्री.प्रदीप यांना धन्यवाद. पेठकर काकांचेही प्रतिसाद माहितीपुर्ण.

असा ह्या तुमचा वैयक्ती क मत अस्सात....... कोक्णात ह्या असाच चल्ता असा काय नाय..... आम्चे झिल्गे सुधा आता फुद्ड्ला शिक्शान घेवन बिजिनिस करुक लाग्लेय्त. रव्ता रवली गोश्ट घरा फुड्ल्या कचर्याची..... ता काय सगळ्यान कडेच नसता... माजो कोकण आळ्शी नाय आसा.... वायच जरा हात तोक्डे पडतत केवा तरी......

आजच मी कोकणातून मुम्बईला आलो. माझेही गाव भालवली जवळच आहे. मला मात्र भालवलि गाव आवडला. मी ही माझे घर साफ केले काल. आजुबाजुचा परिसर साफ करताना कम्बर मोडली हो. वाट्ते तितके हे काम सोपे नाहि आहे हो.